MPSC 360
1.44K subscribers
70 photos
3 files
545 links
✔️ चालू घडामोडी
✔️ Tricks & Tips
✔️ Test Series , Study Material Pdf
✔️ नवीन जाहिराती ,सूचना इ.
✔️ Previous Question Papers
✔️ Syllabus
✔️ Motivation


Vist - www.mpsc360.com
Download Telegram
केंद्राची AC तापमान बाबत मार्गदर्शक तत्त्वे

जॉईन करा @impsc360

करोना व्हायरस महामारीदरम्यान घरातील एअर कंडीशनरचे तापमान 24 ते 30 डिग्री दरम्यान असावे, असे केंद्र सरकारकडून सांगण्यात आले आहे. एसीच्या वापरावेळी आर्द्रता 40 ते 70 टक्के असावी. देशातील हवामानाच्या परिस्थितीचा अभ्यास करुन ही मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली. घरात एअर कंडीशनरचा वापर करताना खिडक्या थोड्या उघड्या ठेवाव्यात. याशिवाय, एसी वापरताना एग्जॉस्ट फॅनचा वापर करावा, असेही यात सुचवण्यात आले आहे. पंखा वापरतानाही खिडक्या थोड्या उघड्या ठेवाव्यात असे, या मार्गदर्शक तत्वांमध्ये म्हटले आहे.

📣 स्पर्धा परिक्षेबाबत परिपूर्ण माहिती देणारे पोर्टल @impsc360 विविध MPSC मटेरियल डाउनलोड करण्यासाठी भेट द्या mpsc360.com
📚📚मराठी प्रकाशक संघाचा यंदाचा जीवनगौरव पुरस्कार दिलीप माजगावकर यांना जाहीर.

जॉईन करा @impsc360

⭐️ज्येष्ठ प्रकाशक आणि राजहंस प्रकाशनचे संचालक दिलीप माजगावकर यांची, तर साहित्यसेवा कृतज्ञता पुरस्कारासाठी सुप्रसिद्ध लेखिका प्रतिभा रानडे यांची निवड करण्यात आली आहे.

⭐️अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघातर्फे उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती, जीवनगौरव आणि साहित्यसेवा कृतज्ञता पुरस्कारांची घोषणा गुरुवारी करण्यात आली.तर दरवर्षी जागतिक पुस्तकदिनाचे औचित्य साधून प्रकाशक संघातर्फे जाहीर समारंभात या पुरस्कारांचे वितरण करण्यात येते.

⭐️मात्र यावर्षी उद्धवलेल्या कोरोना विषाणूच्या प्रादूभार्वामुळे सध्या केवळ पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून, भविष्यात कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव संपल्यानंतर या पुरस्कारांचे वितरण करण्यात येईल, अशी माहिती अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाचे अध्यक्ष राजीव बर्वे, प्रकाशक संघाच्या उपाध्यक्षा शशिकला उपाध्ये, प्रमुख कार्यवाह पराग लोणकर आणि प्रकाशक संघाच्या कार्यकारिणीने कळविले आहे.

⭐️तसेच आत्तापर्यंत जीवनगौरव पुरस्कराने पॉप्युलर प्रकाशनाचे रामदास भटकळ, बेळगाव येथील नवसाहित्य प्रकाशनाचे जवळकर बंधू, अमरावती येथील नंदकिशोर बजाज, बॉम्बे बुक डेपोचे पां. ना. कुमठा, परचुरे प्रकाशन मंदिराचे आप्पा परचुरे आदी मान्यवरांना सन्मानित करण्यात आले आहे. तर, साहित्यसेवा कृतज्ञता पुरस्काराने आजपर्यंत द.मा.मिरासदार, निरंजन घाटे आदी साहित्यिकांना गौरविण्यात आले आहे.

📣 स्पर्धा परिक्षेबाबत परिपूर्ण माहिती देणारे पोर्टल @impsc360 विविध MPSC मटेरियल डाउनलोड करण्यासाठी भेट द्या mpsc360.com