MPSC 360
1.44K subscribers
70 photos
3 files
545 links
✔️ चालू घडामोडी
✔️ Tricks & Tips
✔️ Test Series , Study Material Pdf
✔️ नवीन जाहिराती ,सूचना इ.
✔️ Previous Question Papers
✔️ Syllabus
✔️ Motivation


Vist - www.mpsc360.com
Download Telegram
🖥 चालू घडामोडी सराव पेपर 02 March 2021

🎯 परश्न : 10
🏆 गण : 20
वळ : 30 मिनिटे

🔗लिंक : https://bit.ly/MPSCDailyQuiz
🔴राज्यसेवा परीक्षा प्रवेशपत्र आयोगाच्या संकेत स्थळावर उपलब्ध झालेले आहे.

Download From Here 👇👇
https://mahampsc.mahaonline.gov.in/MPSC/MPSCHome.aspx
“ई-दाखिल”: ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी डिजिटल व्यासपीठ

MPSC 360 | चालू घडामोडी

▪️ ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी दिनांक 7 सप्टेंबर 2020 पासून ई-दाखिल (E-Daakhil) नामक एक राष्ट्रीय पातळीवरील डिजिटल व्यासपीठ कार्यरत करण्यात आलेले आहे.
▪️ हे व्यासपीठ आता 15 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये कार्यरत झाले आहे. केन्द्रीय सरकारच्या राष्ट्रीय ग्राहक तंटा निवारण परिषदेच्यवतीने हे व्यासपीठ तयार करण्यात आले आहे.
▪️ ग्राहकांच्या तक्रारी डिजिटल पध्दतीने नोंदविण्यासाठी या डिजिटल व्यासपीठावर बाबींचा खालील समावेश आहे -
१. ई-सूचना
२. तक्रारीचा दस्ताऐवज डाऊनलोड करणे
३. दूरदृश्य पध्दतीने सुनावणी करण्याचा डिजिटल दुवा
४. प्रतिपक्षाकडून लेखी उत्तराची प्रतिक्रिया
५. तक्रारदाराने फेरदावा करणे
६. एसएमएस/ई-मेल द्वारे सतर्कता दाखविणे

🤔 आजची चालू घडामोडी आधारित Quiz सोडवली का? https://bit.ly/MPSCDailyQuiz
🎯 चौथ्या टप्प्याच्या अंतर्गत स्वच्छ पर्यटन स्थळातरूपांतर करण्यासाठी 12 स्थळांची निवड

MPSC 360 | चालू घडामोडी

▪️ जलशक्ती मंत्रालयाच्या पेयजल व स्वच्छता विभागाने पंतप्रधानांच्या देशातील प्रतिष्ठित वारसा स्थळे, अध्यात्मिक व सांस्कृतिक स्थळांचे परिवर्तन करण्याच्या दृष्टिकोनाचा अंगीकार करून स्वच्छ भारत अभियान- ग्रामीण(SBM-G) याच्या स्वच्छ प्रतीकात्मक स्थळे(SIP) उपक्रमाच्या अंतर्गत चौथ्या टप्प्यातील बारा (12) प्रतीकात्मक स्थळांच्या पुढील यादीची घोषणा केली आहे.

▪️ पर्यटन स्थळ आणि त्याच्या परिसरातील सांडपाणी व्यवस्थापन आणि स्वच्छतेचे निकष यात सुधारणा करून देशी आणि परदेशी पर्यटकांचा अनुभव समृद्ध करणे हे या उपक्रमाचे उद्दीष्ट आहे. तर या ठिकाणी विशेषत: परिघीय आणि प्रविष्ट क्षेत्रात उच्च प्रतीचे सांडपाणी व्यवस्थापन आणि स्वच्छतेचे निकष साध्य करणे हे स्वच्छ प्रतीकात्मक स्थळांचे ध्येय आहे.

🤔 आजची चालू घडामोडी आधारित Quiz सोडवली का? https://bit.ly/MPSCDailyQuiz

▪️ गृह व शहरी व्यवहार मंत्रालय, पर्यटन मंत्रालय, सांस्कृतिक मंत्रालय आणि संबंधित राज्य / केंद्रशासित प्रदेश सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने जलशक्ती मंत्रालयाचा पेयजल व स्वच्छता विभाग हा प्रकल्प राबवित आहे.

ही स्थळे पुढीलप्रमाणे आहेत -

1. अजिंठा लेणी, महाराष्ट्र
2. सांची स्तूप, मध्यप्रदेश
3. कुंभलगड किल्ला, राजस्थान
4. जैसलमेर किल्ला, राजस्थान
5. रामदेवरा, जैसलमेर, राजस्थान
6. गोवळकोंडा किल्ला, हैदराबाद, तेलंगणा
7. सूर्य मंदिर, कोणार्क, ओडिशा
8. रॉक गार्डन, चंदीगड
9. दाल तलाव, श्रीनगर, जम्मू व काश्मीर
10. बांके बिहारी मंदिर, मथुरा, उत्तरप्रदेश
11. आग्रा किल्ला, आग्रा, उत्तरप्रदेश
12. कालीघाट मंदिर, पश्चिम बंगाल
🖥 चालू घडामोडी सराव पेपर 03 March 2021

🎯 परश्न : 10
🏆 गण : 20
वळ : 30 मिनिटे

🔗लिंक : https://bit.ly/MPSCDailyQuiz
📣 12वी उत्तीर्ण, पदवीधरांसाठी सुवर्णसंधी
कर्मचारी राज्य विमा निगम (ESIC) मध्ये 6552 पदांची मेगाभरती
---------------------------------------------------

पदाचे नाव:
1. अप्पर डिव्हिजन क्लर्क
2. स्टेनोग्राफर

शैक्षणिक पात्रता:
1. पदवीधर + संगणकाचे ज्ञान
2. १२ वी उत्तीर्ण

(सविस्तर माहितीकरिता कृपया जाहिरात बघा)

ठिकाण- संपूर्ण भारत

अर्ज शुल्क: खुला प्रवर्ग: फी नाही

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 मार्च 2021

👉 अर्ज करण्यासाठी https://bit.ly/3847bkO या लिकंवर क्लिक करा
🖥 चालू घडामोडी सराव पेपर 04 March 2021

🎯 परश्न : 10
🏆 गण : 20
वळ : 30 मिनिटे

🔗लिंक : https://bit.ly/MPSCDailyQuiz
🎯 ICC T20 रँकिंक जाहीर

MPSC 360 | चालू घडामोडी

▪️ आयसीसीकडून फलंदाजांसाठीची टी २० रँकिंग जारी करण्यात आली. यादीमध्ये *विराट कोहलीने* ६९७ पॉइंटसह *६व्या स्थानी झेप* घेतली आहे. याआधी विराट कोहली सातव्या स्थानावर होता. त्यासोबतच *के एल राहुल* ने ८१६ पॉइंटसह आपले *दुसरे स्थान* कायम राखले आहे.
▪️ या यादीत पहिल्या *१० फलंदाजांमध्ये दोन भारतीय* फलंदाजांचा समावेश असून, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाचे देखील प्रत्येकी २ फलंदाज आहेत.
▪️ याशिवाय, पाकिस्तान, द. आफ्रिका, अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड यांच्या प्रत्येकी एका फलंदाजाचा यादीत समावेश आहे.
▪️ यादीमध्ये सर्वात वर इंग्लंडचा *डेविड मलन* असून त्याच्या नावावर ९१५ पॉइंट आहेत.

📣 डाउनलोड करा स्टेट बोर्ड पुस्तके PDF स्वरूपात 👉 https://bit.ly/3h8hWFX
🖥 चालू घडामोडी सराव पेपर 05 March 2021

🎯 परश्न : 10
🏆 गण : 20
वळ : 30 मिनिटे

🔗लिंक : https://bit.ly/MPSCDailyQuiz
📣 सारस्वत बँकेत 150 जागांसाठी भरती ; 50,000 रुपये पगार
---------------------------------------------------

पदाचे नाव: कनिष्ठ अधिकारी – मार्केटिंग & ऑपरेशन्स (लिपिक संवर्ग)

शैक्षणिक पात्रता: 60% गुणांसह पदवीधर (वाणिज्य/विज्ञान/व्यवस्थापन)

(सविस्तर माहितीकरिता कृपया जाहिरात बघा)

ठिकाण- महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक & गुजरात

अर्ज शुल्क: ₹750/-

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 19 मार्च 2021

👉 अर्ज करण्यासाठी https://bit.ly/2MKrqMK या लिकंवर क्लिक करा
🎯 CRCL प्रयोगशाळेला जागतिक सीमाशुल्क संघटनेची प्रादेशिक सीमाशुल्क प्रयोगशाळा म्हणून मान्यता

MPSC 360 | चालू घडामोडी

▪️ केंद्रीय अप्रत्यक्ष कर व सीमाशुल्क मंडळाच्या अंतर्गत असलेल्या नवी दिल्लीतील केंद्रीय महसूल नियंत्रण प्रयोगशाळा (CRCL) याला आशिया-प्रशांत क्षेत्रासाठी जागतिक सीमाशुल्क संघटनेची (WCO) प्रादेशिक सीमाशुल्क प्रयोगशाळा (RCL) म्हणून मान्यता मिळाली.
▪️ प्रादेशिक सीमाशुल्क प्रयोगशाळा (RCL) म्हणून मान्यता मिळाल्यामुळे केंद्रीय महसूल नियंत्रण प्रयोगशाळा जपान आणि कोरियासारख्या क्षेत्रातील सीमाशुल्क प्रयोगशाळांच्या निवडक गटामध्ये सामील झाली आहे.

🤔 आजची चालू घडामोडी आधारित Quiz सोडवली का? http://bit.ly/DailyMPSCQuiz

जागतिक सीमाशुल्क संघटना (WCO)

- जागतिक सीमाशुल्क संघटना (WCO) याची स्थापना 26 जानेवारी 1952 रोजी झाली.
- संस्थेचे बेल्जियमच्या ब्रसेल्स शहरात मुख्यालय आहे.
- त्याचे 183 सीमाशुल्क प्रशासने सभासद आहेत.
- सीमाशुल्क प्रशासनांचा प्रभावीपणा वर्धित करण्याचे उद्दीष्ट ठेवून संस्थेची स्थापना झाली आहे.
- संस्था आंतरराष्ट्रीय हार्मोनाइज्ड सिस्टम (HS) वस्तूंचे नामकरण आणि सीमाशुल्क मूल्यमापन व मूळ नियमांवरील जागतिक व्यापार संघटनेच्या करारांच्या तांत्रिक बाबींचे प्रशासन बघते.
🎯 राहणीमान सुलभता निर्देशांक 2020

MPSC 360 | चालू घडामोडी

▪️ गृहनिर्माण व शहरी कार्य मंत्रालयाकडून राहणीमान सुलभता निर्देशांक (ईज ऑफ लिव्हिंग इंडेक्स - EoLI 2020) अंतिम मानांकनांची घोषणा करण्यात आली आहे.

👉दशलक्षाहून अधिक लोकसंख्या गटात प्रथम क्रमांक - बंगळुरू
(त्यापाठोपाठ पुणे, अहमदाबाद, चेन्नई, सूरत, नवी मुंबई, कोयंबतूर, वडोदरा, इंदूर आणि बृहन्मुंबई).
👉दशलक्षाहून कमी लोकसंख्या गटात प्रथम क्रमांक - शिमला
(त्यापाठोपाठ भुवनेश्वर, सिल्वासा, काकीनाडा, सालेम, वेल्लोर, गांधीनगर, गुरुग्राम, दावणगिरी आणि तिरुचिराप्पल्ली).

▪️ राहणीमान सुलभता निर्देशांक (EoLI) अंतर्गत वर्ष 2020 मध्ये मूल्यांकन सर्वेक्षण घेण्यात आले. त्यात 111 शहरांनी भाग घेतला होता. त्यांची दोन गटात वर्गवारी करण्यात आली.

🤔 आजची चालू घडामोडी आधारित Quiz सोडवली का? http://bit.ly/DailyMPSCQuiz

▪️ दशलक्ष + म्हणजेच दहा लक्षाहून अधिक लोकसंख्या असणारी शहरे आणि दहा लक्षाहून कमी लोकसंख्या असणारी शहरे. यात स्मार्ट सिटीज कार्यक्रमाच्या अंतर्गत सर्व शहरांचा समावेश करण्यात आला.
▪️ राहणीमान सुलभता निर्देशांक (EoLI), ही एक अशी मूल्यांकन प्रणाली आहे जी राहणीमानाचा दर्जा आणि शहरी विकासासाठी विविध उपक्रमांच्या परिणामाचे मूल्यांकन करते.
▪️ नागरिकांची जीवनशैली, शहराची आर्थिक क्षमता, तिचा टिकाऊपणा आणि लवचिकता यावर आधारित भारतभरातील भाग घेणार्या शहरांची विस्तृत माहिती ही प्रणाली प्रदान करते. जीवनशैली, आर्थिक क्षमता, शाश्वतता अशा 13 श्रेणींमध्ये याचे परिक्षण करण्यात आले आहे.

🤔 स्पर्धा परीक्षांची तयारी करताय ??
मग अभिनव बालुरे सरांनी (MPSC Topper 2017) सांगितलेल्या या टिप्स तुम्हाला माहित असायलाच हव्यात.
👉 https://bit.ly/3kXCgfa
श्रीनगर येथे नौकानयनासाठी खेलो इंडिया स्टेट सेंटर ऑफ एक्सलन्स या केंद्राचे उद्घाटन

MPSC 360 | चालू घडामोडी

▪️ जम्मू व काश्मिर केंद्रशासित प्रदेशाच्या श्रीनगर या शहरात नौकानयन (रोइंग) या खेळासाठी खेलो इंडिया स्टेट सेंटर ऑफ एक्सलन्स या केंद्राचे उद्घाटन झाले. केंद्रीय क्रिडा मंत्री किरेन रिजिजू यांच्या हस्ते जम्मू व काश्मिर क्रिडा परिषद जल क्रिडा प्रबोधिनी येथे या सुविधेचे 10 एप्रिल 2021 रोजी उद्घाटन झाले.
▪️ एप्रिल 2016 मध्ये भारत सरकारने देशात क्रिडा क्षेत्राला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने ‘खेलो इंडिया’ या नवीन योजनेचा प्रारंभ केला. सुरुवातीच्या काळात या योजनेत मैदानी खेळ, वॉलीबॉल, कबड्डी, फुटबॉल, जूडो, हॉकी, बॉक्सिंग, टेबल टेनिस, बास्केट बॉल आणि कुस्ती या खेळांचा समावेश करण्यात आला होता आणि पुढे त्याची व्याप्ती इतर खेळांसाठी वाढविण्यात आली आहे.
▪️ भारतीय क्रिडा शिष्यवृत्ती योजनेंतर्गत गुणवंत तरुण खेळाडूंची निवड करून त्यांना सलग 8 वर्षांसाठी प्रत्येकी 5 लक्ष रूपयांची वार्षिक शिष्यवृत्ती दिली जाते.

🤔 सपर्धा परीक्षांची तयारी करताय ??
मग अभिनव बालुरे सरांनी (MPSC Topper 2017) सांगितलेल्या या टिप्स तुम्हाला माहित असायलाच हव्यात.
👉 https://bit.ly/3kXCgfa
घाऊक महागाईचा दर आठ वर्षांच्या उच्चांकावर

MPSC 360 | चालू घडामोडी

▪️ वाढत्या इंधनाच्या किमतीमुळे गेल्या महिन्यातील घाऊक किमतींवर आधारीत महागाई दर तब्बल आठ वर्षांच्या उच्चांकावर पोहोचला आहे. सलग तिसऱ्या महिन्यात महागाई दर उंचावत मार्च २०२१ मध्ये ७.३९ टक्क्यांच्या चिंताजनक पातळीवर झेपावला आहे. आधीच्या महिन्यात, फेब्रुवारी २०२१ मध्ये घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित महागाईचा दर ४.१७ टक्के होता. तर वर्षभरापूवी, मार्च २०२० मध्ये तो अवघा ०.४२ टक्के होता.
▪️ यापूर्वी, ऑक्टोबर २०१२ मध्ये घाऊक महागाई दर ७.४० टक्के या वरच्या स्तरावर होता. गेल्या महिन्यात इंधन तसेच ऊर्जा गटातील वस्तूंच्या किमती आधीच्या महिन्यातील अध्र्या टक्क्याच्या तुलनेत थेट १०.२५ टक्क्यांपर्यंत भडकल्या.
▪️ मार्च २०२१ मध्ये अन्नधान्याच्या किमती ३.२४ टक्क्यांपर्यंत वाढल्या. त्याचबरोबर फळे, भाजीपाला, डाळींचेही दर वाढले. डाळींच्या किमती १३.१४ टक्क्यांपर्यंत वाढल्या. तर भाज्यांच्या किमती (-) ५.१९ टक्के नोंदल्या गेल्या.
▪️ खनिज तेल, पेट्रोलियम पदार्थ, पोलाद आदींच्या किमती वार्षिक तुलनेत टाळेबंदीमुळे वाढल्याचे केंद्रीय वाणिज्य व उद्योग खात्याने गुरुवारी मार्च २०२१ मधील एकूण घाऊक किंमत निर्देशांक जाहीर करताना स्पष्ट केले.
▪️ पुढील दोन महिन्यांत महागाईचा दर ११ ते ८ टक्के असा उतरता असेल, असे इक्राच्या मुख्य अर्थतज्ज्ञ अदिती नायर यांनी म्हटले आहे. पोलाद, वस्त्र, रसायन आदी वस्तूंच्या किमती वाढण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली आहे.
▪️ मार्च २०२१ मध्ये हा दर ५.५२ टक्के असा गेल्या चार महिन्यांच्या वरच्या पातळीवर नोंदला गेला आहे.

🤔 आजची चालू घडामोडी आधारित Quiz सोडवली का? http://bit.ly/DailyMPSCQuiz
अडीच वर्षांच्या वैदिशाच्या नावाची इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद

MPSC 360 | चालू घडामोडी

▪️ २०० देशाची राजधानी, राष्ट्रध्वज मुखपाठ असल्याने चंद्रपूर येथील वैदिशा शेरेकर या अडीच वर्षांच्या चिमुकलीने इंडिया बुक ऑफ रेकॉर्डनंतर आता इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डमध्ये स्थान मिळवले आहे.
▪️ वैदिशा जवळपास अडीच वर्षांची झाल्यानंतर तिच्यासाठी सर्व देशांच्या राजधानी व राष्ट्रध्वजाची माहिती असलेले चार्ट आणून त्या माध्यमातून तिला तिची आई दिपाली शेरेकर यांनी माहिती देण्यास सुरूवात केली.
▪️ तिने अवघ्या पंधरा वीस दिवसांत २०० पेक्षा अधिक देशांची राजधानी तसेच त्यांचे राष्ट्रीय ध्वज अचूकपणे सांगण्याइतपत तयारी केली.
▪️ वैदिशाला २०० देशाहून अधिक देशाची राजधानी मुखपाठ असून या सर्व देशांचे राष्ट्रीय ध्वज ती अचूक ओळखते.
▪️ तिच्या या कामगिरीची दखल जानेवारी महिन्यातच इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड या संस्थेने घेतली होती. शिवाय तिचे नावाची नोंद देखील इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये केली गेली आहे.

🤔 आजची चालू घडामोडी आधारित Quiz सोडवली का? http://bit.ly/DailyMPSCQuiz
📣 *MES सैन्य अभियंता सेवा, पुणे अंतर्गत 502 जागा ; पगार १ लाख १२ हजार रुपयापर्यंत [आज शेवटची तारीख]*
---------------------------------------------------

*पदाचे नाव* :
1) ड्राफ्ट्समन 52
2) सुपरवाइजर 450

*शैक्षणिक पात्रता*: इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा/

_(सविस्तर माहितीकरिता कृपया जाहिरात बघा)_

*वयोमर्यादा* : 12 एप्रिल 2021 रोजी 18 ते 30 वर्षे

*ठिकाण*- संपूर्ण भारत

*अर्ज शुल्क*:
जनरल १०० रुपये
SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही

*मानधन*
ड्राफ्ट्समन : ३५,४०० ते १,१२,४००
सुपरवाइजर (B/S) : ३५,४०० ते १,१२,४००

👉 *अर्ज करण्यासाठी* https://bit.ly/3drimqx *या लिकंवर क्लिक करा*
चीनने नोंदवला 18.3 टक्के विक्रमी विकासदर

MPSC 360 | चालू घडामोडी

▪️ चीनचा सन 2021 च्या वर्षातील पहिल्या तिमाहीत जीडीपीचा आकडा 18.3 टक्‍के इतका झाला आहे. या कालावधीत चीनचे एकूण सकल घरेलु उत्पादन तब्बल 3.82 ट्रिलियन डॉलरइतके झाले आहे.
▪️ एखाद्या तिमाहीत इतक्‍या मोठ्या प्रमाणावर जीडीपी नोंद होण्याचा चीनच्या आर्थिक इतिहासातील हा पहिलाच प्रसंग आहे.
सन 2021 या वर्षातील पहिल्या तीन महिन्यांत चीनचे औद्योगिक उत्पादन कमालीचे सुधारले असून विक्री आणि गुंतवणूक क्षेत्रातही चीनने चांगली कामगिरी केली आहे.
▪️ सर्वात नीचांकी जीडीपी सन 2020 मध्ये 2.3 टक्‍के इतका नोंदवला गेला होता. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने चीनचा या आर्थिक वर्षातील विकासदर 8.4 टक्‍के इतका राहील, असा अंदाज वर्तवला होता.
📣 *10वी,12वी उत्तीर्णांसाठी संधी ; IAF भारतीय हवाई दलात 1515 जागांसाठी मेगा भरती*
---------------------------------------------------

*पदाचे नाव* :
1. वरिष्ठ संगणक ऑपरेटर
2. अधीक्षक
3. स्टेनो
4. लोअर डिव्हिजन लिपिक
5. हिंदी टायपिस्ट
6. हाऊसकीपिंग स्टाफ

*शैक्षणिक पात्रता*: इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा/10वी उत्तीर्ण

*वयोमर्यादा* : 03 मे 2021 रोजी 18 ते 28 वर्षे

*ठिकाण*- संपूर्ण भारत

*अर्ज शुल्क*: फी नाही.

*अर्ज पद्धती* – ऑफलाईन

👉 *अर्ज करण्यासाठी* https://bit.ly/3ul3yzu *या लिकंवर क्लिक करा*
नासाच्या हेलिकॉप्टरचे मंगळावर यशस्वी उड्डाण

MPSC 360 | चालू घडामोडी

▪️ नासाच्या (NASA) हेलिकॉप्टरने मंगळ ग्रहावर यशस्वीरित्या उड्डाण केले आहे. Perseverance roverने पृथ्वीवर पाठवलेल्या फोटोंमधून हे स्पष्ट झाले आहे. नासाने याची पुष्टी करत म्हटलंय की, इनजेन्यूटी हेलिकॉप्टरने आपलं पहिलं उड्डाण घेतलं.
▪️ एका दुसऱ्या ग्रहावर एअरक्राफ्ट उडण्याची ही बहुधा पहिलीच वेळ आहे.
इनजेन्युटी हेलिकॉप्टरने देखील ब्लॅक अँड व्हाईट फोटो पाठवला असून यात त्याची छाया मंगळाच्या पृष्ठभागावर पडताना दिसली आहे.
इस्रायल ठरला जगातील पहिला कोरोनामुक्त देश

MPSC 360 | चालू घडामोडी

▪️ तब्बल एक वर्षभरानंतर इस्रायलने देशभरात लागू असणाऱ्या मास्क वापरातील निर्बंधांमध्ये शिथिलता आणली आहे.
देशातील जवळपास 80 टक्के जनतेला लस देण्यात यश मिळवल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. इस्रायल जगातील पहिला कोरोनामुक्त देश ठरला.