MPSC 360
1.44K subscribers
70 photos
3 files
545 links
✔️ चालू घडामोडी
✔️ Tricks & Tips
✔️ Test Series , Study Material Pdf
✔️ नवीन जाहिराती ,सूचना इ.
✔️ Previous Question Papers
✔️ Syllabus
✔️ Motivation


Vist - www.mpsc360.com
Download Telegram
मराठी मोटिवेशन
शास्त्रीय नियमांचे संशोधक
महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्याने
Geography MPSC Notes
» जागतिक वसुंधरा दिवस
[International Mother Earth Day]
» 22 एप्रिल
» 1970 पासून
» 2019 Theme : Protect Our Species
» 2020 Theme : Climate Action
» SDG तील 13 वा गोल Climate Action असे आहे.
» या दिवसाला 50 वर्ष पूर्ण होत आहेत
» 22 एप्रिल 2016 रोजी पॅरिस ऍग्रिमेंट वर सह्या केल्या आहेत.

Visit - www.mpsc360.com
5मे पर्यंत इनकमिंग कॉलची सुविधा देण्याचा बीएसएनएलचा निर्णय.

🔰कोरोनामुळे देशभरात लॉकडाऊन असल्याने घराबाहेर पडणे शक्य नसल्याने व रिचार्ज करणे अशक्य झाल्याने ज्यांची मुदत समाप्त झाली आहे, अशा ग्राहकांना दिलासा देण्यासाठी बीएसएनएलने त्यांना 5 मे पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.

🔰लॉकडाऊनमुळे रिचार्ज करण्यासाठी दुकाने बंद असल्याने अनेक ग्राहकांना रिचार्ज करता आलेले नाही. त्यामुळे त्यांच्या प्लँनची वैधता समाप्त झाल्याने त्यांचा संपर्क तुटण्याची भीती निर्माण झाली आहे.

🔰तर ऑनलाइन रिचार्ज करण्यास प्राधान्य देण्याचे आवाहन बीएसएनएलतर्फे करण्यात आले आहे मात्र तरीही ज्यांना ऑनलाइन रिचार्ज करता येणे शक्य नाही त्यांना इनकमिंग कॉलची सुविधा कायम राहण्यासाठी पाच मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

🔰तसेच घर बैठे रिचार्ज व अपनो की मदद से रिचार्ज अशा दोन योजना जाहीर करण्यात आल्या आहेत. घर बैठे रिचार्ज योजनेत ग्राहकाने त्याचा क्रमांक नोंदवल्यावर बीएसएमएलचे प्रतिनिधी त्यांच्या घपी जातील व त्यांच्या गरजेनुसार रिचार्ज करुन देतील.
करोना विषाणूवर औषध बनवण्याच्या स्पर्धेत सहा भारतीय कंपन्या :

करोना विषाणूनं जगभरात थैमान घातलं असून, सगळेच देश सध्या करोनावर मात करण्यासाठी पूर्ण ताकदीनं प्रयत्न करताना दिसत आहेत. चीननंतर जगातील अनेक राष्ट्रांमध्ये पोहोचलेल्या करोना विषाणूचा झपाट्यानं प्रसार होत असून, त्यावर अद्यापही औषध न सापडल्यानं दिवसेंदिवस चिंता वाढत चालली आहे. करोनावर औषध बनवण्याचे प्रयत्न जगभरातील शास्त्रज्ञ करत आहेत. औषध बनवण्याच्या स्पर्धेत सहा भारतीय कंपन्यांचाही समावेश आहे.

करोना या साथीच्या आजारानं जगातील लाखो लोकांना ग्रासलं आहे. आतापर्यत जगात करोनामुळे दीड लाखांहून अधिक लोकांना प्राण गमवावा लागला आहे. भारतातही १८ हजारांहून अधिक लोकांना करोनाची लागण झाली आहे.

५९० लोकांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. दुसरीकडे करोनाचा प्रसार नियंत्रणात येत नसल्यानं चिंता वाढत चालली आहे. दरम्यान, करोनाच्या विषाणूवर सगळीकडं औषध बनवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यात औषध निर्माण क्षेत्रातील सहा भारतीय कंपन्याचा समावेश आहे.
🔰 महाराष्ट्राचा भूगोल 🔰
_______________________

❗️महत्त्वाचे घाट... ❗️स्थान

उत्तरेकडून दक्षिणेकडे

🛤 थळ घाट(कसारा घाट)=मुंबई- नाशिक

🛤 माळशेज घाट =ठाणे-अहमदनगर

🛤 बोर घाट (खंडाळा घाट)=मुंबई-पुणे

🛤 वरंधा घाट=भोर - महाड

🛤 खंबाटकी घाट=पुणे - सातारा

🛤 पसरणी घाट= वाई - महाबळेश्वर

🛤 आंबेनळी घाट =महाबळेश्वर - महाड

🛤 कुंभार्ली घाट =कराड - चिपळूण

🛤 आंबा घाट = कोल्हापूर - रत्नागिरी

🛤 फोंडा घाट= कोल्हापूर - पणजी

🛤 हनुमंते घाट = कोल्हापूर - कुडाळ

🛤 अंबोली घाट= बेळगाव - सावंतवाडी

___________________________
२४ एप्रिल – भारतीय पंचायती राज दिन
📝 केंद्रीय पथकांच्या सूचनांची तातडीने अंमलबजावणी करा

जॉईन करा @impsc360

केंद्रीय पथकाने राज्यातील विविध ठिकाणांची पाहणी करुन कोरोना नियंत्रणासाठी केलेल्या सूचनांवर तातडीने अंमलबजावणी करा,असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.

💁‍♂️ तसेच राज्यात मुंबई -पुण्यातील कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंचा दर कमी करणे आणि रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचा कालावधी वाढवणे याला प्राधान्य असल्याचंही नमूद केलं.

🖥️ यासाठी केंद्रीय पथकाच्या सूचना महत्त्वाच्या असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. मुंबई आणि पुण्याच्या केंद्रीय पथकांसमवेत मुख्यमंत्र्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा केली.

💫 यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे देखील उपस्थित होते. यावेळी केंद्रीय पथकाने राज्य सरकारकडून होणाऱ्या मोठ्या प्रमाणावरील चाचण्यांबद्दल समाधान व्यक्त केलं.

🗣️ *मुख्यमंत्री म्हणाले* :

▪️ “पीपीई कीट्सची आवश्यकता पुढील काळात आणखी लागू शकते. त्यामुळे आता अशा कीट्स केंद्राने तातडीने उपलब्ध करणे महत्वाचे आहे.

▪️ स्थानिकरित्या देखील काही कंपन्या असे कीट्स उत्पादित करत आहेत. मात्र, केंद्राने याबाबतीत त्वरित मार्गदर्शन करणे गरजेचे आहे.”

▪️ केंद्रीय पथकाने रुग्णालयांतील सुविधा, क्वारंटाईन पद्धती, चाचण्या व या अनुषंगाने दिलेल्या सूचनांवर प्रशासनाने त्वरित कार्यवाही सुरु करावी.

▪️ सध्या राज्यात रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी सुमारे 7 दिवसांचा आहे आणि तो 10 दिवसांपेक्षा जास्त करण्याचे ठरवण्यात आले आहे.

▪️ मृत्यू झालेल्यांमध्ये 78.9 टक्के रुग्णांमध्ये इतरही आजार होते. तसेच मरण पावलेले रुग्ण हे 51 ते 60 वयोगटातील आहेत असंही समोर आलं आहे.

📍 अतिरिक्त केंद्रीय सचिव मनोज जोशी यांच्या अध्यक्षतेखाली 5 जणांचे केंद्रीय पथक गेल्या 3 दिवसांपासून मुंबईत आले आहे.

📣 स्पर्धा परिक्षेबाबत परिपूर्ण माहिती देणारे पोर्टल @impsc360 विविध MPSC मटेरियल डाउनलोड करण्यासाठी भेट द्या mpsc360.com
🧐 *कोविड-19 च्या सर्व चाचण्या-उपचार निशुल्क!

जॉईन @impsc360

कोविड-19 चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या अखत्यारीतील शासकीय वैद्यकीय तसेच दंत महाविद्यालयांमध्ये व रुग्णालयांमध्ये सर्व चाचण्या आणि उपचार निशुल्क करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी यांनी येथे दिली.

जागतिक आरोग्य संघटने कडून कोविड-19 प्रादुर्भावास पंडेमिक घोषित केले आहे. राज्यात या आजाराच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, हे विचारात घेऊन वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या अखत्यारीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, दंत महाविद्यालय व रुग्णालयांमध्ये कोविड-19 संदर्भातील रुग्णांच्या सर्व तपासण्या व उपचार यापुढे निशुल्क केले आहेत.

कोविड -19 ग्रस्त रुग्णांना सुलभतेने उपचार घेता यावेत व यावर उपचार घेण्यासाठी अधिकाधिक रुग्णांनी पुढे यावे या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. कोविड-19 ग्रस्त रुग्णावर उपचारासाठी अधिक पैसे लागतील या भीतीपोटी अनेक रुग्ण आपला आजार लपवतात. असा अनुभव आहे.

या निर्णयामुळे अधिकाधिक रुग्ण पुढे येऊन स्वतः वर उपचार करून घेतील, त्याचप्रमाणे या निर्णयामुळे अधिकाधिक चाचण्या घेणे शक्य होणार असल्याने कोविड-19 ला प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वपूर्ण ठरेल असेही वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी म्हटले आहे.

📣 स्पर्धा परिक्षेबाबत परिपूर्ण माहिती देणारे पोर्टल @impsc360 विविध MPSC मटेरियल डाउनलोड करण्यासाठी भेट द्या mpsc360.com
जादव पायेंग यांना ‘स्वामी विवेकानंद कर्मयोगी पुरस्कार’ जाहीर.

जॉईन करा @impsc360

🔰 ‘माय होम इंडिया’ या संस्थेच्या वतीने यावर्षीच्या ‘स्वामी विवेकानंद कर्मयोगी’ पुरस्कारासाठी जादव पायेंग यांची निवड करण्यात आली आहे. मानवनिर्मित जंगल तयार करण्याच्या त्यांच्या सतत प्रयत्नांसाठी जादव पायेंग यांना सहावा कर्मयोगी पुरस्कार दिला जात आहे.

🔰 पायेंग यांना हा पुरस्कार 29 फेब्रुवारी 2020 रोजी नवी दिल्लीत एका सोहळ्यात दिला जाणार आहे.

🔰जादव पायेंग (द फॉरेस्ट मॅन): -
जादव पायेंग हे भारतातले फॉरेस्ट मॅन म्हणून लोकप्रिय आहेत. ते एक पर्यावरणवादी आणि वन कामगार आहे. ते आसाम राज्याच्या जोरहाट गावाचे रहिवासी आहेत. गेल्या 30 वर्षांपासून त्यांनी वाळवंटीकरणाला आळा घालण्यासाठी ब्रह्मपुत्र नदीच्या लगत एकट्यानेच मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करीत आहेत. त्यांच्या त्या प्रयत्नातून मिळालेले फलित म्हणजे आज तिथली भूमी वन आच्छादित असून ते अनेक नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या वन्य प्राण्यांचे घर आहे.

📣 स्पर्धा परिक्षेबाबत परिपूर्ण माहिती देणारे पोर्टल @impsc360 विविध MPSC मटेरियल डाउनलोड करण्यासाठी भेट द्या mpsc360.com
केंद्राची AC तापमान बाबत मार्गदर्शक तत्त्वे

जॉईन करा @impsc360

करोना व्हायरस महामारीदरम्यान घरातील एअर कंडीशनरचे तापमान 24 ते 30 डिग्री दरम्यान असावे, असे केंद्र सरकारकडून सांगण्यात आले आहे. एसीच्या वापरावेळी आर्द्रता 40 ते 70 टक्के असावी. देशातील हवामानाच्या परिस्थितीचा अभ्यास करुन ही मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली. घरात एअर कंडीशनरचा वापर करताना खिडक्या थोड्या उघड्या ठेवाव्यात. याशिवाय, एसी वापरताना एग्जॉस्ट फॅनचा वापर करावा, असेही यात सुचवण्यात आले आहे. पंखा वापरतानाही खिडक्या थोड्या उघड्या ठेवाव्यात असे, या मार्गदर्शक तत्वांमध्ये म्हटले आहे.

📣 स्पर्धा परिक्षेबाबत परिपूर्ण माहिती देणारे पोर्टल @impsc360 विविध MPSC मटेरियल डाउनलोड करण्यासाठी भेट द्या mpsc360.com