MPSC 360
1.44K subscribers
70 photos
3 files
545 links
✔️ चालू घडामोडी
✔️ Tricks & Tips
✔️ Test Series , Study Material Pdf
✔️ नवीन जाहिराती ,सूचना इ.
✔️ Previous Question Papers
✔️ Syllabus
✔️ Motivation


Vist - www.mpsc360.com
Download Telegram
चालू घडामोडी - 01 December 2020
https://bit.ly/33yPCH3
MPSC Daily Quiz – 02 December 2020
https://bit.ly/3mv7dY1
*🎯 ब्राह्मोसची नौदलासाठी यशस्वी चाचणी*

[ 📲 _*आता स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन मिळवा WhatsApp वर 🆓*_ 👉 https://bit.ly/MPSCDigitalMagazine ]

▪️ ब्राह्मोस क्षेपणास्त्राच्या नौदलासाठीच्या आवृत्तीची चाचणी बंगालच्या उपसागरात मंगळवारी यशस्वी झाली आहे.

▪️ लष्कराच्या तीनही सेनादलांसाठी या क्षेपणास्त्राच्या चाचण्या सुरू आहेत. सहा आठवडय़ांपूर्वी अशीच चाचणी नौदलासाठी अरबी समुद्रात घेण्यात आली होती.

▪️ ब्राह्मोस एरोस्पेस या भारत-रशिया यांच्या संयुक्त प्रकल्पात हे स्वनातीत क्रूझ क्षेपणास्त्र तयार करण्यात आले आहे.

▪️ 24 नोव्हेंबरला त्याची जमिनीवरून जमिनीवर मारा करणारी चाचणी 2.8 मॅक वेगाने (ध्वनीच्या तीन पट वेगाने) यशस्वी झाली होती.


[ 📲 _*आता स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन मिळवा WhatsApp वर 🆓*_ 👉 https://bit.ly/MPSCDigitalMagazine ]
युनेस्को व लंडनस्थित वार्की फाउंडेशन यांच्या वतीने दिला जाणारा ग्लोबल टीचर प्राइज सोलापूर जिल्हा परिषदेच्या परितेवाडी शाळेचे शिक्षक 'रणजितसिंह डिसले' यांना जाहीर झाला आहे.

लंडनमधील नॅचरल हिस्ट्री म्युझियममध्ये झालेल्या समारंभात सुप्रसिद्ध अभिनेते स्टीफन फ्राय यांनी पुरस्काराची अधिकृत घोषणा केली.

क्युआर कोडेड पुस्तकांच्या माध्यमातून महाराष्ट्रतच नव्हे, तर देशातील शिक्षण क्षेत्रांत डिसले यांनी केलेल्या उल्लेखनीय कामाची दखल घेत त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.

असा पुरस्कार मिळणारे ते पहिलेच भारतीय शिक्षक ठरले आहेत.

जगभरातील १४० देशांतील १२ हजारांपेक्षा अधिक शिक्षकांच्या नामांकनातून अंतिम विजेता म्हणून डिसले गुरुजींची घोषणा करण्यात आली आहे.

पुरस्काराच्या एकूण रक्कमेपैकी ५० टक्के रक्कम अंतिम फेरीतील ९ शिक्षकांना, त्याचप्रमाणे ३० टक्के रक्कम टीचर इनोव्हेशन फंड करीता वापरणार आहे.

तर, उर्वरित २० टक्के रक्कम विविध देशातील विद्यार्थ्यांच्या 'पीस आर्मी'साठी वापरणार येणार असल्याचे डिसले यांनी सांगितले.

@impsc360
MPSC Daily Quiz – 07 December 2020
https://bit.ly/3mNyYLC
*🎯 अवकाश स्थानकात मुळ्याची लागवड यशस्वी*

*_MPSC 360 | चालू घडामोडी_*

[ 📲 _*आता स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन मिळवा WhatsApp वर 🆓*_ 👉 https://bit.ly/MPSCDigitalMagazine ]

▪️ आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात मुळ्याची लागवड प्रथमच यशस्वी झाली असून त्यामुळे अवकाशवीरांना आता ताज्या मुळ्यांचा आस्वाद घेता येणार आहे.

▪️ महिला अवकाशवीर केट रुबीन्स यांनी लागवड केलेल्या बियाण्यांना कोंब फुटून नंतर त्याचे रोप झाले व 30 नोव्हेंबरला मुळे तयार झाले आहेत.

▪️ ऐतिहासिक अशी ही घटना मानली जात असून अवकाशस्थानकातील वनस्पती उद्यानात *सूक्ष्म गुरुत्वाला मुळ्याची लागवड* करण्यात आली होती.

▪️ वनस्पती अवकाशात वाढवणे कठीण असते, त्यामुळे *एका विशिष्ट कक्षात त्याची लागवड करून त्यावर एलइडीचा प्रकाश* सोडला होता. त्याला नियंत्रित पद्धतीने पाणी, पोषके व खते तसेच ऑक्सिजन देण्यात आला.

▪️ मुळ्याचे रोप परिपक्व होण्यास केवळ 27 दिवस लागतात त्यामुळे मुळ्याची लागवडीसाठी निवड केली आली होती. ते मुळे 2021 मध्ये पृथ्वीवर आणले जाणार आहेत.

▪️ आतापर्यंत अवकाश स्थानकात *कोबी, मोहरी, झिनिया पुष्प वनस्पती, आणि एका रशियन वनस्पतीची* लागवड झाली आहे.

▪️ अवकाशवीरांना ताजे अन्न मिळावे व तेथे वनस्पतींची वाढ कशी होते याचा अभ्यास करणे या हेतूने प्रयोग केले जात आहेत.


[ 📲 _*आता स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन मिळवा WhatsApp वर 🆓*_ 👉 https://bit.ly/MPSCDigitalMagazine ]
MPSC Daily Quiz – 08 December 2020
https://bit.ly/3olZ3l8
🎯 पंधरावा वित्त आयोग

MPSC 360 | जनरल नॉलेज

[ 📲 आता स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन मिळवा WhatsApp वर 🆓 👉 https://bit.ly/MPSCDigitalMagazine ]

स्थापना - 27 नोव्हेंबर 2017
अध्यक्ष - N K सिंग (नंदकुमार सिंग)
सदस्य - अजय झा, अनुपम सिंग, अशोक लाहिरी, रमेशचंद (अर्धवेळ)
सचिव - अरविंद मेहता
शिफारस कालावधी - 2020 ते 2025

📣 पंधरावा वित्त आयोगामार्फत केंद्र व राज्यातील कर वाटपाचा आढावा घेतला जाणार आहे. त्याच बरोबर GST परिणामांचाही आढावा घेतला जाणार आहे. संरक्षण आणि देशांतर्गत सुरक्षितता या घटकांसाठी निधी वाटपाबाबत केंद्र सरकाला शिफारशी सुद्धा करण्यात येणार आहेत.

👉 N K सिंग यांच्याबद्दल -
1. राज्य वित्त विभाग सचिवालय सदस्य - 1968-69
2. वाणिज्य खात्याचे अप्पर सचिव - 1969-73
3. वाणिज्य मंत्र्यांचे विशेष सहाय्यक - 1973-77
4. जपान मधील भारताचे पहिले आर्थिक दूतावास - 1981-85
5. UN ग्लोबल एन्विर्मेन्ट फॅसिलिटीचे अध्यक्ष - 1993-94
6. नियोजन आयोगाचे सदस्य

पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष के सी नियोगी होते.


[ 📲 आता स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन मिळवा WhatsApp वर 🆓 👉 https://bit.ly/MPSCDigitalMagazine ]
MPSC Daily Quiz – 10 December 2020
https://bit.ly/372IDZl
MPSC Daily Quiz – 11 December 2020
https://bit.ly/3m8ph9t
MPSC Daily Quiz – 12 December 2020
https://bit.ly/3mhZSdy
चालू घडामोडी - 12 December 2020
https://bit.ly/3oL5UVq
एका ओळीत सारांश, 12 डिसेंबर 2020


[ 📲 आता स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन मिळवा WhatsApp वर 🆓 👉 https://bit.ly/MPSCDigitalMagazine ]


दिनविशेष
• आंतरराष्ट्रीय तटस्थता दिन - 12 डिसेंबर
• 2020 साली आंतरराष्ट्रीय सार्वत्रिक आरोग्य व्याप्ती दिन (12 डिसेंबर) याचा विषय - "हेल्थ फॉर ऑल: प्रोटेक्ट एव्हरीवन"

अर्थव्यवस्था
• भारतीय रिझर्व्ह बँकेनी जाहीर केले की 14 डिसेंबर 2020 पासून __ सुविधा चोवीस तास उपलब्ध असणार - रीअल टाईम ग्रॉस सेटलमेंट (RTGS)

पर्यावरण
• या ठिकाणी कठोर परिस्थितीत टिकून राहणाऱ्या भारतीय मुरैन गवत (Indian Muraingrasses) याची एक नवीन प्रजाती शोधली गेली - पश्चिम घाट
• मेक्सिकोच्या किनारपट्टीलगत वैज्ञानिकांनी __ ची एक नवीन प्रजाती शोधली, जी इतर व्हेल माश्यांपेक्षा आकाराने छोटी आहे, त्याची सुमारे पाच मीटर लांबी आहे आणि डॉल्फिनसारखे तोंड आहे - बीक्ड व्हेल

आंतरराष्ट्रीय
• स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट (SIPRI) संस्थेच्या मते, वर्ष 1990 ते वर्ष 2019 या कालावधीत जागतिक पातळीवर सर्वाधिक संरक्षण शस्त्रे खरेदी करणारा देश - भारत (38 वा).
• या संघटनेनी विकसनशील देशांना कोविड-19 लस खरेदी करण्यासाठी 9 अब्ज डॉलर एवढ्या खर्चाचा एशिया पॅसिफिक वॅक्सीन अॅक्सेस फॅसिलिटी (APVAX) उपक्रचा शुभारंभ केला - आशियाई विकास बँक (ADB)
• या देशाने संवर्धित सैनिक जो वेदना सहन करू शकतो, जास्त काळ जागा राहू शकतो आणि मेंदूची शक्ती आणि श्रवणशक्ती वाढवू शकतो, म्हणून ओळखल्या जाणार्या सुपर सैनिकांच्या विकासाला मंजूरी दिली - फ्रान्स

राष्ट्रीय
• ही अन्न वितरण कंपनी भारत सरकारसोबत प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी (पीएम-स्वनिधी) योजनेसाठी 125 शहरांमध्ये सहकार्य करीत आहे - स्विगी
• 1 डिसेंबर रोजी, देशव्यापी फिट इंडिया अभियानाचा भाग म्हणून सुरु करण्यात आलेली मोहीम - फिटनेस का डोस, आधा घंटा रोज
• या शहरात 10 ते 12 डिसेंबर 2020 पर्यंतच्या कालावधीत पर्यटन मंत्रालयाच्या सहकार्याने ABTO (असोसिएशन ऑफ बुद्धिस्ट टूर ऑपरेटर) आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली आहे - बोधगया, बिहार
• 10 ते 15 डिसेंबर 2020 पर्यंतच्या कालावधीत ___ आणि सेंटर फॉर गंगा नदी बेसिन मॅनेजमेंट अँड स्टडीज (सीगंगा) यांच्यावतीने 5 वी भारत जल प्रभाव शिखर परिषद (IWIS) आयोजित करण्यात आली आहे - राष्ट्रीय स्वच्छ गंगा अभियान


[ 📲 आता स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन मिळवा WhatsApp वर 🆓 👉 https://bit.ly/MPSCDigitalMagazine ]
MPSC Daily Quiz – 14 December 2020
https://bit.ly/37d6BAW
चालू घडामोडी - 14 December 2020
https://bit.ly/3me3HjB