MPSC 360
1.44K subscribers
70 photos
3 files
545 links
✔️ चालू घडामोडी
✔️ Tricks & Tips
✔️ Test Series , Study Material Pdf
✔️ नवीन जाहिराती ,सूचना इ.
✔️ Previous Question Papers
✔️ Syllabus
✔️ Motivation


Vist - www.mpsc360.com
Download Telegram
MPSC Daily Quiz – 31 October 2020
https://bit.ly/3e9QLcm
चालू घडामोडी - 04 November 2020
https://bit.ly/2HVOmWB
MPSC Daily Quiz – 07 November 2020
https://bit.ly/3p8cS7S
MPSC Daily Quiz – 13 November 2020
https://bit.ly/3pjibBL
MPSC Daily Quiz – 15 November 2020
https://bit.ly/35uqP8C
व्यक्तीविशेष - अभिनेते सौमित्र चटर्जी

प्रसिद्ध बंगाली अभिनेते सौमित्र चटर्जी यांचे वयाच्या ८५ व्य वर्षी निधन झाले आहे. कलाविश्वात नावाजलेल्या या व्यक्तीच्या निधनानंतर अनेक सेलिब्रिटींनी सोशल मेडियायच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली आहे. स्पर्धा परीक्षा चालू घडामोडी च्या दृष्टिकोनातून परिपूर्ण अशी माहिती सौमित्र चटर्जी यांच्या बद्दल....

👉 जॉईन @impsc360

कोण आहेत सौमित्र चटर्जी ?

बंगाली कलाविश्वातील ज्येष्ठ कलावंत.
संसार या चित्रपटापासून सुरवात.
सत्यजीत रे या प्रसिद्ध दिग्दर्शक सोबत १४ चित्रपटनामध्ये काम.
फ्रांस मधील सर्वात मानाचा असा Ordre des Arts et des Lettres पुरस्काराने सन्मानित.
दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
राष्ट्रीय पुरस्कार (तीन वेळा)
संगीत नाटक अकॅडमी पुरस्कार
फिल्मफेअर अवॉर्ड
भारत सरकारद्वारे पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित.
-----------------------------------------
👉 जॉईन @impsc360
MPSC Daily Quiz – 16 November 2020
https://bit.ly/35wfULB
RCEP मध्ये १५ नवीन देश सामील, भारत दूरच
--------------------------------------------

👉 स्पर्धा परीक्षांचे परिपूर्ण मार्गदर्शन करणारे एकमेव चॅनेल @impsc360

आरसेप - रिजनल कॉम्प्रेहेन्सिव इकॉनॉमिक पार्टनरशिप या करारावर आता नवीन १५ देशांनी स्वाक्षरी केली आहे. आतापर्यन्त झालेला हा सर्वात मोठा व्यापारी करार असल्याचे मानले जात आहे. आशिया—पॅसिफिकमधील १५ देशांनी आसियानच्या वार्षिक परिषदेवेळी यावर स्वाक्षरी केली आहे.

तब्बल ८ वर्षांच्या वाटाघाटी नंतर RCEP म्हणजेच Regional Comprehensive Economic Partnership करारावर स्वाक्षरी करण्यात आली आहे. भारताने या आधीच आपण RCEP करारावर स्वाक्षरी करत नसल्याचे जाहीर केले आहे. तर भारताबद्दल आम्ही आशादायी आहोत असं RCEP समूहाने म्हंटल आहे.

कोणत्या देशांनी केली स्वाक्षरी ?
इंडोनेशिया, मलेशिया, फिलीपिन्स, सिंगापूर, थायलँड, ब्रुनेई, व्हिएतनाम, लाओस, म्यानमार, कंबोडिया, चीन, जपान, दक्षिण कोरिया, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया

RCEP बद्दल -

प्रादेशिक व्यापक आर्थिक भागीदारी (आरसीईपी) हा एक मुक्त व्यापार करार (एफटीए) आहे
ASEAN च्या दहा देशांचा समावेश.
अधिकच्या देशांचा समावेश - चीन, जपान, दक्षिण कोरिया, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया
हा गट जागतिक जीडीपीच्या कमीतकमी 30% प्रतिनिधीत्व करेल अशी अपेक्षा आहे तर जगातील सर्वात मोठा मुक्त व्यापार करार म्हणून उदयास येण्याची शक्यता आहे.
सामूहिकरीत्या $17 trillion GDP
3 billion पेक्षा जास्त लोकांचा समावेश.
जागतिक व्यापाराच्या ३० टक्के वाटा.
-------------------------------------

👉 स्पर्धा परीक्षांचे परिपूर्ण मार्गदर्शन करणारे एकमेव चॅनेल @impsc360
MPSC Daily Quiz – 18 November 2020
https://bit.ly/3pLKtFl
राजस्थानमध्ये Statue of Peace चे अनावरण
--------------------------------------------------
👉 स्पर्धा परीक्षांचे परिपूर्ण मार्गदर्शन करणारे एकमेव चॅनेल @impsc360

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी Statue of Peace चे राजस्थान मध्ये नुकतेच अनावरण केले.

१. जैनचार्य श्री विजय वल्लभ सुरीश्वर जी महाराज यांच्या 151व्या जयंती महोत्सवाचे औचित्य साधून अनावरण करण्यात आले.
२. अष्टधातू म्हणजेच 8 धातूंनी बनविलेला हा पुतळा 151 इंच उंच आहे तर यात प्रमुख घटक तांबे आहे.

जैनचार्य श्री विजय वल्लभ सुरीश्वर जी महाराज यांच्याबद्दल -

*1870-1954 या कार्यकाळात त्यांनी भगवान महावीरांचा संदेश देण्यासाठी निस्वार्थ व समर्पितपणे कार्य केले.
*त्यांनी लोकांच्या कल्याणासाठी अविरतपणे काम करण्यासोबतच, शिक्षण क्षेत्रात सुद्धा भरीव योगदान दिले आहे. तसेच चुकीच्या सामाजिक रीतींना दुर करण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. त्यांनी प्रेरणादायी लिखाण (कविता, निबंध, भक्ती स्तोत्रे आणि स्तवन) करून स्वातंत्र्य चळवळीला आणि स्वदेशी मोहिमेला पाठिंबा दिला.

👉 स्पर्धा परीक्षांचे परिपूर्ण मार्गदर्शन करणारे एकमेव चॅनेल @impsc360
MPSC Daily Quiz – 19 November 2020
https://bit.ly/3nzbQjO
CBI च्या तपासासाठी राज्यांची परवानगी आवश्यक
----------------------------------------------------------
👉 स्पर्धा परीक्षांचे परिपूर्ण मार्गदर्शन करणारे एकमेव चॅनेल @impsc360

CBI च्या अधिकार क्षेत्राबाबत सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय जाहीर केला आहे. CBI च्या तपासासाठी आता राज्याची परवानगी घेणे आवश्यक आहे.

CBI म्हणजेच केंद्रीय अन्वेषण विभागाच्या अधिकारा बाबत राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्यात गेल्या अनेक वर्षांपासून संघर्ष पाहायला मिळत आहे. याबाबत विविध राज्य सरकारने अनेकदा प्रश्न उपस्थित केले होते. यासाठी काही दिवसांपूर्वी अनेक राज्यांनी CBI च्या तपासासाठी राज्यात बंदी घातली होती.

सर्वोच्च न्यायालयाने याबाबत असं म्हटलं आहे, ही तरतूद संघराज्य वर्णनाशी संबंधित आहे. दिल्ली विशेष पोलीस स्थापने अंतर्गत असनाऱ्या CBI ला राज्याची परवानगी आवश्यक आहे.

👉 स्पर्धा परीक्षांचे परिपूर्ण मार्गदर्शन करणारे एकमेव चॅनेल @impsc360
व्यवसायातील लाचखोरीसंबंधीच्या जागतिक यादीत भारत 77व्या स्थानी!

👉 स्पर्धा परीक्षांचे परिपूर्ण मार्गदर्शन करणारे एकमेव चॅनेल @impsc360

भारत 45 गुणांसह व्यवसायातील लाचखोरीसंबंधीच्या 2020 (Global Bribery Risk Matrix) च्या जागतिक यादीत 77व्या स्थानी आहे. गेल्या वर्षी या यादीत देशाचा 48 गुणांसह 78वा क्रमांक होता. 'ट्रेस' या लाचलुचपत प्रतिबंधक मानक निश्चिती संस्थेने (anti-bribery standard setting organisation) केलेल्या 194 देश, प्रांत, स्वायत्त आणि अर्धस्वायत्त प्रदेशांतील व्यवसाय लाचखोरी जोखमीच्या मूल्यांकनातून हे अनुमान पुढे आले आहे.

'TRACE' 2020 च्या नोंदीनुसार..

▪️ उत्तर कोरिया, तुर्कमेनिस्तान, दक्षिण सुदान, वेनेझुएला आणि एरिट्रियामध्ये लाचखोरीचा सर्वाधिक धोका आढळून आला.

▪️ डेन्मार्क, नॉर्वे, फिनलँड, स्वीडन आणि न्यूझीलंड हे याबाबतीत सर्वांत कमी जोखमीचे देश ठरले.

▪️ सरकारसोबतचे व्यावसायिक संबंध, लाचलुचपत प्रतिबंध प्रणाली व अंमलबजावणी, सरकार व नागरीसेवा पारदर्शकता आणि माध्यमांच्या भूमिकेसह नागरी समाज निरीक्षणाची क्षमता या 4 घटकांना केंद्रस्थानी ठेवून हे मूल्यांकन केले जाते.

📍 पाकिस्तान, चीन, नेपाळ आणि बांगलादेश या शेजारी देशांच्या तुलनेत भारताची कामगिरी चांगली आहे. यापैकी चीनने सततच्या देखरेखीसह सरकारी अधिकाऱ्यांचे लाचखोरीचे प्रमाण बऱ्यापैकी घटवल्याचे 'ट्रेस' आकडेवारी सांगते. दरम्यान, भूतान 37 गुणांसह 48 व्या स्थानी आहे, तर भारताव्यतिरिक्त पेरू, जॉर्डन, उत्तर मॅसेडोनिया, कोलंबिया आणि माँटेनेग्रो यांच्या खात्यावरही प्रत्येकी 45 गुण आहेत.

👉 स्पर्धा परीक्षांचे परिपूर्ण मार्गदर्शन करणारे एकमेव चॅनेल @impsc360