LOKSATTA- नकाशा-कार्याचे मोल..
अर्कोट आणि त्रिचनापल्लीच्या वेढय़ात जोखीमबाज हल्ल्याने लौकिक कमावलेला रॉबर्ट क्लाइव्ह!
प्रा. प्रदीप आपटे | January 22, 2021 12:03 am
घबाड मिळाल्याप्रमाणे बंगाल सुभा इंग्रजांना मिळाला आणि शासनकर्ते होण्याचे कामही अंगावर पडले. त्यास कंपनीने दिलेला प्रतिसाद साम्राज्यविस्तारासाठी नमुनेदार ठरणार होता. त्याआधी नकाशे बनविण्याचे काम केले जेम्स रेनेलने..
दख्खन काबीज करण्याच्या महत्त्वाकांक्षेने औरंगजेब दक्षिणेत आला खरा, पण अखेरीस दख्खनच्या धुळीत मिळाला! त्याच्यानंतर मुघल साम्राज्य विस्कटले. मराठेशाही विस्तारून बहरू लागली. जीर्ण मुघल साम्राज्याची छकले सांभाळणारे छोटेमोठे प्रांतीय म्होरके आपआपल्या मुलखाचे धनी बनले. मुघलांप्रमाणेच बाहेरून आलेल्या ‘युरोपीय व्यापारी वखारी’ व्यापारासाठीचे आपले लष्करी बळ अधिक परजू लागल्या. पसरायची जमेल तशी संधी साधायला त्यांनी सुरुवात केली. फ्रेंच आणि इंग्रजांची सत्तापसरण, ईर्षां आणि परस्पर स्पर्धादेखील बळावली.
अर्कोट आणि त्रिचनापल्लीच्या वेढय़ात जोखीमबाज हल्ल्याने लौकिक कमावलेला रॉबर्ट क्लाइव्ह! तो भारतात परतला आणि ईस्ट इंडिया कंपनीच्या ‘सेंट डेव्हिड वस्ती’चा प्रमुख म्हणून पुन्हा भारतात दाखल झाला होता. १७५७ च्या ‘प्लासी’ ऊर्फ ‘पलासी’च्या (म्हणजे पलाश किंवा मराठी पळस) लढाईत त्यानेच सिराज उद्दौलाचा पाडाव केला. लढाई अशी फार झालीच नव्हती. क्लाइव्हच्या कावेबाज लाचलुचपतीने आणि फोडाफोडीने डाव साधला होता!!
सिराज उद्दौलाच्या जागी क्लाइव्हने मीर कासिमला मुर्शिदाबादच्या ‘गादी’वर बसवले. त्याच्या बदल्यात बंगालातील ‘२५ लाखांचा मुलूख’ : बंगाल- बिहारमधील सोन्याचा मक्ता कंपनीला मिळवून घेतला! २३,४९,००० रु. एवढी रक्कम (जी पूर्वी कंपनी मोजत असे!) कंपनीला मिळेल अशी तजवीज केली! फ्रेंच आणि डचांचा पूर्ण बंदोबस्त केला. पुढे १७५९ साली देहलीच्या बादशहाचा मुलगा शाह आलमने अलाहाबाद आणि अयोध्येच्या सरदारांशी संगनमत केले आणि त्यांनी एकत्र मिळून मीर जाफरवर स्वारी केली. क्लाइव्हने त्याला मीर जाफरकडून नजराणा देवविला आणि ते प्रकरण मिटविले. याकरिता ‘चोवीस परगणा’च्या मालकी हक्काचा ताबा स्वत:ला मिळवला. बंगालभोवतीच्या ओडिशा, बिहार दिशेच्या प्रदेशावर कब्जा करण्याचा सपाटा नंतरही चालूच राहिला.
बंगाल सुभ्यासारख्या एवढय़ा मोठय़ा प्रदेशाच्या ताब्याचे घबाड कंपनीच्या ध्यानीमनी नव्हते. फिलिप मॅसन या लेखकाने तर म्हटले आहे की, एखाद्या शहरातल्या छोटय़ा दुकानदाराने एकाएकी भल्या मोठय़ा मॉलचे मालक व्हावे तसे काहीसे झाले! अमुक रकमेच्या महसुलाचा मुलूख कब्जात येणे वेगळे आणि तो महसूल प्रत्यक्ष गोळा करणे वेगळे! मुलखाचा महसूल गोळा करायचा तर किती तरी अधिक पण प्राथमिक तपशील पाहिजेत.. उदा. तुकडय़ाचा आकार, मालक कोण, कसणारा कोण, पूर्वी किती ‘वसूल’ होता, जमिनीतले पीक, त्याचे उत्पादन आणि बाजारात मिळण्याजोगते उत्पन्न, थकबाकी, माफी, दंड इ. इ.! तोपर्यंत चालत आलेल्या महसुली नोंदी आणि प्रत्यक्ष जमाबंदी करणारे अपरिचित होते. त्यांच्यावर किती विश्वास ठेवायचा याची साशंकता होती. महसुलाची वसुली करण्यासाठीची माहिती आणि वसुली यंत्रणा तर दूरच, कंपनीला या मुलखाचीच पुरेशी माहिती नव्हती!
तोवरचा कंपनी उलाढालीचा अनुभव शाही परवानगीने उभारलेल्या वखारी, त्याभोवतीचा तटबंदीने राखून आणि भेदून घेतलेला परिसर आणि मालवाहतुकीचे वाटाडय़ांनी दाखवून दिलेले रस्ते याभोवतीच फिरत असे. कंपनीसाठी माल गोळा करून आणणाऱ्या अडत्या लोकांना देशाची जरा अधिक माहिती असे. एतद्देशीय व्यापारी, वाहतूकदार आणि भाडोत्री वाटाडे यावर गुजारा होई. या अंगवळणीच्या व्यापारापल्याड जाऊन अवघा मुलूख पदरी आला. त्याबरोबरीने त्याचा मुल्की लष्करी बंदोबस्तपण डोईवर चढला. तोपर्यंत तंटेकज्जे निवारणे, त्यांचा निवाडा, अंमल इत्यादीसाठी आखलेले वखारी वसाहतीपुरते मर्यादित शिरस्ते आणि कायदे अपुरे ठरणार होते.
व्याप भलताच फुगला होता. त्या परिसरातील गावे, त्यांच्या हद्दी,गावांची नावे, गावांचे पाडे वा विखुरलेल्या वस्त्या, तिथली कसणुकीखालची जमीन, पाणी, गावांच्या आतले रस्ते, गावागावांच्या मधले रस्ते.. अशा किती तरी प्राथमिक माहितीचा गंधदेखील नव्हता.
अपरिचित प्रदेशाचा प्राथमिक भूगोल कंपनीच्या अंगी भिनलेला असला पाहिजे याची निकड भासू लागली. त्या ज्ञानाची उणीव नव्याने तळपून खुपू लागली. फक्त बंगाल प्रांतातच हे घडले असे नव्हे. पण बंगालचा अनुभव घेताना कंपनीने दिलेला प्रतिसाद नमुनेदार ठरला.
कोलकाता (फोर्ट विल्यम्स) गव्हर्नरने जेम्स रेनेलची सर्वेक्षणाच्या कामासाठी नेमणूक केली. (६ मे १७६४) त्या नेमणूक पत्रातील मजकूर असा :
‘‘तुमची पहिली नेमणूक गंगेच्या पूर्वागाला जलंगी नदीपर्यंतच्या सर्वेक्षणासाठी केली आहे. त्यामध्ये गंगेपासून रंगफुल खाडीपर्यंत पोहोचणारा सर्वात कमी अंतराचा, पण वाहतुकीसाठी सुरक्षित क्रमणा करायचा मार्ग तो कोणता? हे धुंड

ाळणे हाच तुमचा मुख्य उद्देश आणि काम असले पाहिजे.. ..यास्तव गंगेच्या दक्षिण किनाऱ्याने जाऊन तेथून उपजणारा आणि दक्षिणेस जाणारा प्रत्येक खाडी वा नाला मार्ग अवलंबावा. असे कुठवर जाता येते ते शोधावे आणि निदान तीनशे मणांपर्यंत ओझे वाहणाऱ्या बोटी हाकारायला हे मार्ग सुलभ आणि सोयीस्कर आहेत का हे पडताळून घ्यावे. त्यासाठी स्थानिक लोकांशी बोलून सदर जलमार्ग वर्षभर उपलब्ध आणि जारी असतो का? की मोसमानुसारी त्यात फरक पडतो? याची विचारपूस करून माहिती घ्यावी आणि चाचपणी करावी. असे करताना इतरांनी जे सांगितले त्यातला तथ्यांश स्व-अनुभवाने प्रत्यक्ष निरीक्षण करून पडताळावा आणि किनाऱ्यांची ठेवण आणि उतार पाहून जोखावा.. ..या देशाटनामध्ये जे जे काही दृष्टीस पडेल त्याची नेटकी नोंद ठेवावी. प्रत्येक गावाचे नाव, पाहिलेल्या वस्तू आणि परिसर दृष्टोत्पत्तीस कसा आढळतो, त्या त्या भागातून कशाची पैदास होते याचे यथार्थ वर्णन नोंदवून ठेवावे. खेरीज जे काही निराळे वा विशेष आढळेल तेही नोंदवावे. आपण तयार केलेल्या नदी व खाडींच्या नकाशासोबतच अशा नोंदवहीची एक स्वतंत्र प्रत माझ्या परिशीलनार्थ तयार करून माझ्या कचेरीस धाडावी..’’
ज्याला हे आज्ञावजा पत्र धाडले तो जेम्स रेनेल कोण होता? डेव्हॉनशायरमधल्या ख्युडलेग गावात जन्मलेला अवघा २४ वर्षांचा तरुण. त्याचे वडील तोफखान्यात कप्तान होते. तो वयाच्या १४ व्या वर्षीच नाविक दलात भरती झाला होता. १६ वर्षांचा असतानाच तो नाविक सर्वेक्षणात काम करीत होता. १७६३ साली तो ईस्ट इंडिया कंपनीत दाखल होऊन फिलिपिन बेटांच्या सर्वेक्षणांत सामील झाला. त्याचा नाविक सर्वेक्षणाचा अनुभव लक्षात घेऊनच त्याची वर्णी या विशेष कामी लागली होती.
पुढे दोन-अडीच वर्षांनी त्याचे कौशल्य, धाडस, ध्यास धरून निगुतीने काम करण्याची वृत्ती बघून त्याला सर्वेक्षण अधिप्रमुख म्हणून नेमण्याची शिफारस क्लाइव्हने केली. त्याने केलेल्या कामाची गुणवत्ता, त्याने सोसलेली झीज, शारीरिक इजा आणि जिवाचे धाडस याबद्दल क्लाइव्हने त्याची प्रशंसा केली होती.
शारीरिक इजा आणि जिवावर बेतण्याचे प्रसंग आणि जोखमा कोणत्या? एक तर सर्वेक्षण जिथे चाले तो भाग हवामानाने गरम आणि दमट. त्यामुळे अतोनात थकवा येई. अस्वच्छ पाणी, मिळेल तसे अन्न यामुळे शारीरिक व्याधी जडत. काही प्रदेश तर इतके खडतर असायचे की तिथे कामाला धाडणे म्हणजे मृत्युदंड समजला जाई! त्यावर कडी म्हणजे सर्वेक्षण करणाऱ्यांना लुटारू लुबाडायचे आणि मारहाण करायचे. खेरीज हिंस्र श्वापदांचे हल्ले होत असत. सहकाऱ्यांवर लुटारूंनी केलेल्या हल्ल्याला तोंड देताना रेनेल जायबंदी झाला होता. खेरीज एका बिबटय़ाने बरोबरच्या पाच जणांना घायाळ केल्यावर आपल्या संगिनीने त्या बिबटय़ाला रेनेलने मारले होते.
त्याच्या नेमणुकीबाबत संचालक मंडळाला लिहिलेल्या पत्रात जे म्हटले आहे त्याचा गोषवारा असा- ‘‘आपल्या अखत्यारीतील मुलूख, तेथील संपत्ती आणि लष्करी कारवाई या दोन्ही दृष्टीने अचूक सर्वेक्षण फार जरुरी असते. यासाठी सगळ्यांनाच सध्या जुंपून सामील केले जाते, पण त्यात सुटेसुटेपणा, विस्कळीतपणा आणि विसंगती राहतात. हे ध्यानात घेऊन सर्वेक्षणाच्या कामात विशेष तरबेज कौशल्य आणि अनुभव असलेल्या तरुण जेम्स रेनेल [सोबतचे चित्र रेनेलचेच] याची सर्वेक्षण सर्वाधिकारी (सव्र्हेअर जनरल) म्हणून नेमणूक करण्यात यावी. त्याने सर्व माहिती व चित्रणांचा वापर करून एकसंध बृहत् आराखडा तयार करावा. अर्थात हे काम करताना त्यांचे स्वत:चे जारी असलेले सर्वेक्षण चालू ठेवण्यास काहीच प्रत्यवाय नाही. या कामात नुकताच मोठा शारीरिक इजा व नुकसान करणारा बाका प्रसंग त्यांच्यावर ओढवला. त्यातून ते निभावले आहेत. प्रतिकूल स्थिती, तुटपुंजी साधने असूनही अन्य युरोपीयांनी अजिबात न धुंडाळलेला मोठा भूभाग ते नेटाने आणि जोमाने पालथा घालीत आहेत. त्यांनी आपल्या आधिपत्याखालील अभियंत्यांना असेच प्रशिक्षण देऊन कार्य सातत्याने राखावे.. जिवावर बेतणारी जोखीम घेत त्यांनी केलेली मोलाची कामगिरी लक्षात घेता त्यांना दरमहा ३०० रु. इतके वेतन देण्याची शिफारस आम्ही करतो.’’
रेनेलची स्वत:ची सर्वेक्षणाची मूळ ‘स्मरण नोंदवही’ छापली गेली आहे. त्याच्या चरित्र-प्रस्तावनेत या ३०० रुपये महिना वेतनाबद्दल केलेली तळटीप सांगते की, नियामक मंडळाचा सदस्य असताना वॉरन हेस्टिंगला मिळणाऱ्या रकमेइतके हे वेतन आहे! एरवी कवडीचुंबक असणाऱ्या कंपनीच्या लेखी असणारे हे ‘नकाशा-कर्त्यां’चे वेतनमानच खरे तर नकाशांचे मोल सांगते!
लेखक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सुप्रतिष्ठ प्राध्यापक असून ख्यातनाम अर्थतज्ज्ञ आणि विचक्षण अभ्यासक आहेत.

https://unacademy.com/course/medieval-india-revision-1st-session/2WPZM44I
*मध्ययुगीन भारताचा इतिहास*
*प्रथम & द्वितीय Revision Session*
( *सर्वांसाठी मोफत सत्र* )
दिनांक : *२४ जानेवारी २०२१*
वेळ : *सकाळी ११ ते १२* &
*१२.१० ते १.१०*
(लागोपाठ २ सत्रे)
[ *आगामी राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी (१४ मार्च) अत्यंत उपयुक्त* ]

Unacademy
Medieval India (Revision 1st Session) | Unacademy
In this course, Sushilkumar will provide in-depth knowledge of Medieval History. The course will be helpful for aspirants preparing for MPSC. Learners at any stage of their preparation will be benefited from the course. All doubts related to the topic will…
Forwarded from HISTORY OF INDIA (SUSHILKUMAR AHIRRAO)
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM

एमपीएससी आणि स्पर्धक💞
आपला पण हाच मार्ग आहे का ?
१) मराठी भाषेतून पुस्तके वाचताना,स्टेट बोर्ड पुस्तके वाचताना लाज वाटून घेऊ नये.
२) एखादा प्रश्न,डाऊट, कन्सेप्ट कळत नसेल तर विचारण्यात कमीपणा वाटून न घेणे.
३) आपल्यापेक्षा लहान व्यक्तीकडून काही विचारण्यात कमी पणा वाटून न घेणे.(जेथून ज्ञान मिळेल तेथून जमा करावे).
४)दिवसाच्या शेवटी स्वतःचे मूल्यांकन करावे.
५)नियोजन करून अभ्यास करणे.दिवसातून किती वेळ अभ्यास होतो याचे परीक्षण करणे.त्यात बदल करणे.
६)अभ्यासात सातत्य ठेवावे.(वेळोवेळी घरी जाऊन त्यामध्ये गॅप पडू देऊ नये).
७) अभ्यास हा जीवन मरणाचा प्रश्न बनला तरी चालेल.
८)निस्वार्थ मनाने आपल्याजवळील ज्ञानाचे वाटप,संकलन करावे.
९)नुसते एकामागे एक पुस्तके वाचून काढून त्याचा काही उपयोग नाही.आपण प्रश्न सोडवता का?अचानक प्रश्न विचारल्यावर आपल्याला त्यातलं काहीतरी आठवत का? घोकंपट्टी करतो का?
१०)चर्चा करावी.(पण चर्चेत सर्व अभ्यासू शामील व्हावे).वायफळ चर्चा नको. ट्रिक्स बनवाव्या.
११) नोट्स काढल्या तर रिव्हिजन लवकर होईल.(मन आणि हाताचे गुंफण करावे).पण त्या स्वतःच्या असाव्यात.नोट्स दिल्यानं तो पुढे जाईल हा संकुचित विचार सोडावा.
१२)हसत खेळत शिकावं.म्हणजे नुसत उदास राहून,टेन्शन घेऊन अभ्यास करू नये.करमणुकीसाठी मूवी पहावी किंवा छंद जोपासा.
१३) पूर्णवेळ झोप घेऊन अभ्यास करावं.
१४)दिवसातून ७-८ तास तरी अभ्यास करावा.(आपल्याला दुसर काही काम नसेल तर).मग त्यासाठी वेळ ठरवूनच ठेवावी असे नाही.तुम्हाला योग्य वाटेल तेंव्हा करा.मग सकाळी ६-७ वाजताच लाल डोळे करून अभ्यासिकेत जाऊन बसण्यात काही अर्थ नाही.किंवा रात्री १-२ पर्यंत जागण्याची काही गरज नाही.
१५) दुसऱ्याच अनुकरण करू नये.(चांगल्या गोष्टींचा अपवाद)
हा जो पुस्तक वाचेल तोच मी वाचणार,हा रात्री अभ्यास करतो म्हणून मी पण रात्रीच करणार इ.
१६) मोबाईलचा वापर टाळला तर सोन्याहून पिवळ.कारण मोबाईलचा वापर करत अभ्यास होतो असे मला तरी वाटत नाही.अभ्यासिकेत मूवी,कॉमेडी शो,गेम खेळणे,राजकीय गप्पा टाळावे.
१७) रविवारला रविवार समजू नये.म्हंजे अभ्यास होत असताना देखील जाणूनबुजून खूप tired झाल्यासारखं टाईमपास करणे,त्या दिवशी झोपून राहणे,कपडे धुणे, मूवीला जाणे.
१८) सतत फिरायला जाणे,पार्ट्या,वाढदिवस साजरा करणे,ब्रीज वर वारंवार जाऊन बसणे टाळावे.
१९) नुसते इंस्पिरेशनल व्हिडिओ पाहणे,मार्गदर्शन करत फिरणे,नुसत्या बुकलीस्ट जमा करणे,कोणाला इम्प्रेस करण्यासाठी मेन्स दिली,हे केलं - ते केलं सांगणे,दुसऱ्याला दाखवण्यासाठी अभ्यास करणे,इंग्लिश पेपर वाचणे,अधिकाऱ्यांच्या ओळखी काढणे,त्यावर चर्चा टाळावी.
२०) जास्त मित्रपरिवार बनवू नये.बनला तरी टाईमपास करू नये.(चहाच्या वेळी,बर्थ डे साजरा,सतत पार्ट्या,जेवायला तासनतास बसणे).
२१) प्रश्न सोडवावे,सखोल पुस्तके वाचावी,टेस्ट सीरिज लावली तर उत्तमच.
२२) नव्या उमेदीने अभ्यास करायचे २-३ वर्षच असतात.त्यामुळे प्रत्येक प्रयत्न हा पहिला आणि शेवटचा असं समजावं.तेंव्हाच अभ्यास करायला पाहिजे होता म्हणून नंतर वाईट वाटून घेऊ नये.
२३)एकवेळ योग्य पुस्तके(बुकलिस्ट)ठरवून घेऊन अभ्यास सुरू करावा.हे वाच - ते वाच,ते जमा कर.अश्याने एक ना धड भराभर चिंध्या होते.वाचन कमी आणि ढीगभर पुस्तके अशी अवस्था.
२४)सारखं एकच विषय घेऊन वाचत बसू नये.कोअर विषय छान वाचून घ्यावे.
२५)कमी पुस्तके,वारंवार रिविजन,एमपीएससी पेपर्स,सातत्य ठेवावे.
२६)व्यायाम करून आरोग्य चांगले ठेवावे.सतत रीविजन केल्यानी गोष्टी लक्षात राहतात.
२७)कोणताही विषय इंटरेस्ट घेऊन वाचवा.पहिल्यांदाच टेन्शन घेऊन,दुसऱ्याच ऐकुन त्या विषयाबाबत नकारात्मक विचार करून घेऊ नये.नाहीतर तो विषय हमेशा के लिये तुम्हाला कंटाळवाणा वाटेल.
२८)वर्तमानपत्र वाचताना संपादकीय पेज वाचावं.१ तास त्यासाठी खूप झालं.उगाच भरकटत जाऊ नये.लोकसत्ता आणि एक चांगली मॅगझीन खूप झालं.
२९) अभ्यास करताना काही क्षण मिस होऊ देऊ नका.(मी सणाला सुद्धा घरी जाणार नाही, घरच्यांना भेटणार नाही,मूव्ही पाहणार नाही,फिरायला जाणार नाही, हे करणार नाही,ते करणार नाही फक्त अभ्यास करेन) यामुळे तुम्ही जीवनाचे खूप अनमोल क्षण वाया घालवत आहात.
३०) ४-५ वर्षात जर एकही पूर्व परीक्षा पास झाला नसाल तर दुसरा मार्ग शोधावा.सल्ला देणाऱ्यालाच विरोध करून मैत्रीला दुभंगू नये.
31)अधिकारी मित्र जसा अभ्यास करत होते,तसाच मी करेन असा विचार सोडा.आपली स्ट्रटेजी बनवा.आपल नियोजन बनवा.(समजा मी सकाळी 10 वाजता उठून अभ्यास करणारा असेल तर तुम्ही पण असच करणार का? तुम्ही सकाळी 6 ला उठणारे असाल तर 4तास का टाइम्प्पास करणार का?)
३२) स्वयं निर्भर व्हा.प्रत्येक गोष्टीसाठी दुसऱ्यावर निर्भर राहू नका.
हा एक सल्ला समजावा.बाकी आपण सुजाण आहातच....
- अक्षय सुक्रे (तहसीलदार)

कलेक्टर कचेरीवर फडकावला तिरंगा- कुमुदिनी नाचने / गुप्ते
महाराष्ट्र टाइम्स 14 Feb 2021,
महात्मा गांधीजींनी १९४२ साली ब्रिटिशांना 'चले जाओ' म्हणून ठणकावले आणि देशभरात स्वातंत्र्य आंदोलनाची आग भडकली. ठाण्यासारख्या शहरात जिथे आधीपासूनच स्वातंत्र्य चळवळीला पूरक आणि पोषक वातावरण होते, तिथे या आंदोलनाचे पडसाद मोठ्या प्रमाणावर उमटले. शालेय विद्यार्थ्यांनी शाळांवर बहिष्कार घातला. विदेशी कपड्यांच्या होळ्या करण्यात आल्या, महिला-मुले मोर्चांमधून आंदोलनाचा आवाज बुलंद करू लागले. यातच काही शाळकरी मुलींच्या मनात एक धाडसी कल्पना आली. ठाण्याच्या कलेक्टर कचेरीवर ब्रिटिशांचा युनियन जॅक फडकत असे, तो काढून तिथे भारताचा तिरंगा फडकवण्याचा बेत आखला गेला. एका सकाळी कलेक्टर साहेबांनी झेंडा फडकवला आणि ते आपल्या कचेरीत गेले. त्यानंतर या विरबाला कचेरीच्या मागे दत्त मंदिर होते,तिथल्या झाडांवर चढून झेंड्यापर्यंत पोहोचल्या आणि त्यांनी ब्रिटिशांचा झेंडा काढून तिथे भारताचा तिरंगा फाडकावला. त्यानंतर 'भारत माता की जय' च्या आरोळ्यांनी त्यांनी कलेक्टर कचेरी दणाणून सोडली. साहजिकच बंदोबस्तावरचे पोलिस जमा झाले आणि मुलींनी गाजवलेला पराक्रम लक्षात आला. मग या मुलींना रितसर अटक करण्यात आली, पण कोर्टात उभे केल्यानंतर यांची वये १५पेक्षा कमी आहेत म्हणून दोन दिवसांच्या तुरुंगवासानंतर त्यांना सोडण्यात आले. शाळकरी वयात थेट कलेक्टर कचेरीवर झेंडा फडकवण्याचे शौर्य गाजवणाऱ्या या मुली म्हणजे कुमुद गुप्ते, नलिनी प्रधान आणि सुमन नाडकर्णी. या मुलींनी शाळेत असल्यापासूनच स्वातंत्र्य चळवळीत भाग घेऊन आपले कर्तव्य चोखपणे बजावले.
ठाण्यातील सुप्रसिद्ध डॉक्टर बाळासाहेब गुप्ते यांची कन्या कुमुदिनी तथा कुमुद हिने शाळकरी वयात घेतलेला देशसेवेचा वसा आजन्म निष्ठेनं पाळला. ८ एप्रिल१९२९ रोजी कुमुदचा जन्म झाला. ठाण्यातल्या न्यू गर्ल्स हायस्कूलमध्ये मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण झाले. शाळकरी वयापासूनच स्वातंत्र्य चळवळीत सहभागी झाल्याने सामाजिक क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्यांच्या पदरी होता. बेचाळीसच्या चळवळीत पत्रके वाटणे, प्रभात फेरीत, मोर्चात सहभागी होणे, परदेशी कपड्यांच्या होळीसाठी घरोघरी जाऊन तसे कपडे गोळा करणे ही कामे त्यांनी मनापासून केली. गुप्ते कुटुंबाचे स्नेही असलेल्या नाचणे कुटुंबातच त्यांची सोयरिक जमली. वसंत वासुदेव नाचणे यांच्याशी कुमुदचा विवाह झाला.
कुमुद यांचे पती वसंत नाचणे यांचा जन्म २८ डिसेंबर १९२६ रोजी झाला. ठाण्याच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये त्यांचे शालेय शिक्षण झाले. शाहीर लिलाधर हेगडे हे त्यांचे शाळासोबती. वसंताही आपल्या मित्रांबरोबर स्वातंत्र्य आंदोलनात सहभागी झाला होता. सेवा दलाच्या मुशीत सामाजिक समता, सर्वधर्म समभाव, अहिंसक आंदोलने याचे संस्कार त्यांच्यावर झाले होते. त्यामुळेच १९५१ साली कुमुदबरोबर विवाह झाल्यानंतर त्यांनी कुमुदलाही सेवादलाच्या कामात जोडून घेतले. रिझर्व बँकेत नोकरी करणारे वसंतराव सेवा दलाच्या इंटरनॅशनल विभागाचे प्रमुख होते. पुढे याच विभागामार्फत ते युरोपमध्ये कॉन्फरन्सला गेले. तिथे सिंगापूर, अर्जेंटिनाच्या प्रतिनिधींसोबत त्यांनी युरोपातील आठ देशांचा दौरा केला आणि त्या त्या देशातील शिक्षण व्यवस्था, शाळा, जीवनशैली यांची पाहणी केली. लग्नानंतर कुमुदताई सेवादलाच्या माध्यमातून सुरू झालेल्या 'समाजवादी महिला परिषदेच्या' स्थापनेत सहभागी होत्या. या परिषदेच्या मार्फत महिलांमध्ये जागृती करणे, त्यांचे प्रश्न सोडवणे यासाठी त्या काम करू लागल्या.
१९५४ साली ठाण्यातील नागरिकांनी एकत्र येऊन मासुंदा तलावात वाढलेली हायसिंथ वनस्पती काढून तलाव स्वच्छ केला तेव्हा या मोहिमेत वसंतराव सहभागी होते. त्यानंतर या तलावाचा काही भाग बुजवून वाढत्या शहरासाठी नवा रस्ता करावा का ? याचा निर्णय घ्यायला एक समिती तयार करण्यात आली होती. ग. ल. जोशींच्या अध्यक्षतेखालील त्या समितीत वसंतराव नाचणे सभासद होते आणि त्या समितीच्या शिफारसीनुसार आजच्या जांभळी नाक्यावरून रेल्वे स्थानकाकडे जाणारा रस्ता निर्माण झाला. पुढे १९७५ साली आणीबाणी जारी झाली तेंव्हा त्या दडशपशाही विरुद्ध आवाज उठवण्यात नाचणे दाम्पत्य आघाडीवर होते. आणीबाणीमध्ये सरकारी हुकुमांचा भंग केल्याच्या कारणावरून शेकडो लोकांना ठाण्याच्या तुरुंगात बंदिवान केले होते. यातील ठाण्याबाहेरच्या कैद्यांच्या परिवारासाठी नाचण्यांचे घर म्हणजे हक्काचे आश्रयस्थान ठरले होते. बाहेरगावचे लोक ठाण्याच्या तुरुंगात अडकलेल्या आपल्या कुटुंबीयांना भेटायला यायचे तेंव्हा त्यांना वसंतराव आणि कुमुदताई मदत करायच्या. या लोकांना ठाणे कारागृहाकडे घेऊन जाणे, बंदिवासातील त्यांच्या माणसाशी भेट घडवून आणणे आणि तुरुंगातील राजबंद्यांना घरचे जेवण देणे ही कामे कुमुदताईंनी आपुलकीने केली. वसंतराव सरकारी नोकरीत असूनही त्यांनी आणि कुमुदताईंनी परिणामांची पर्वा न करता मानवतेच्या दृष्टीने कैद्यांना मद

त करायचे धाडस दाखवले. १८ फेब्रुवारी २००० रोजी कुमुदताईंनी या जगाचा निरोप घेतला. गेल्या ९५ वर्षांतील अनेक रोमांचक क्षणांचे साक्षीदार असलेले वसंतराव आज आपल्या कुटुंबियांसह समाधानाचे वार्धक्य अनुभवत आहेत. त्यांच्याशी बोलताना जुन्या ठाण्याचे आणि ठाणेकरांचे आनंददायी दर्शन घडते.
दर्पण'कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे नाव शासकीय अभिवादन यादीत समाविष्ट
मुंबई : मराठी वृतपत्रसृष्टीचे जनक
दर्पण'कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे नाव महाराष्ट्र शासनाने राष्ट्रपुरुष / थोर व्यक्ती यांच्या शासकीय अभिवादन यादीत नव्याने समाविष्ट केले असून येत्या शनिवारी, दि. 20 फेब्रुवारी 2021 रोजी बाळशास्त्री जांभेकर यांच्या 209व्या जयंतीदिनी राज्य शासनाच्या मंत्रालय, विधिमंडळ, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद व अन्य शासकीय, निमशासकीय जिल्हा व तालुका येथील शासकीय कार्यालयांमधून जांभेकर यांना अभिवादन करण्याचे आदेश शासनाने निर्गमित केले आहेत. त्याकरीता शासनातर्फे आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे अधिकृत छायाचित्र उपलब्ध करून दिले जाणार असून त्याकरीता मुंबई मराठी पत्रकार संघामध्ये विराजमान असलेल्या बाळशास्त्री जांभेकर यांच्या तैलचित्राची निवड करण्यात आली आहे. सदर तैलचित्र सुप्रसिध्द चित्रकर्ती सौ. चंद्रकला कुमार कदम यांनी तयार केलेले आहे.१ 'जय जिजाऊ, जय भवानी, जय शिवाजी' ही घोषणा होती, महाडच्या सत्याग्रहींची. चवदार तळ्याचा जो ऐतिहासिक सत्याग्रह डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली १९२७ मध्ये झाला, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज हे त्या आंदोलकांचे 'आयकॉन' होते. तेव्हाचे 'मूकनायक'चे अंक चाळले, तरी त्याची खात्री पटते.
२. त्याही पूर्वी, १८८० च्या सुमारास महात्मा फुल्यांनी शिवरायांची रायगडावरची समाधी जगाला तर दाखवलीच, पण त्याच्या आधी 'शिवाजीचा पवाडा'ही जगासमोर आणला. तोवर, हा प्रेरणास्रोत महाराष्ट्राला समजलेला नव्हता.
३. शिवाजी महाराज - अफजलखान 'युद्धा'चे कवित्व आजही दंगली घडवण्यास पुरेसे असते. पण, मुळात अफजलखानाच्यासोबत शिवरायांवर हल्ला करणारा कृष्णाजी कुलकर्णी होता, हे लक्षात घेतले पाहिजे. तर, शिवबासोबत सिद्धी इब्राहिम होता. शिवाय, तो कोणी कृष्णाजी 'कुलकर्णी' होता, म्हणून चर्चा भरकटवण्याचेही कारण नाही. शिवाजी राजांना विरोध करणारे मराठे कमी थोडेच होते?
शिवाजी महाराजांवर एका धर्माचा, जातीचा हक्क सांगणारे लाभार्थी कितीही वाढू द्या.
इतिहास एवढेच सांगेल,
शिवरायांचा वारसा म्हणजे क्रांतीची कहाणी आहे!
मानवी समुदायाच्या उन्नत प्रतिभेची कहाणी आहे.
तिला कुठे जात, धर्म वगैरे लेबल लावत बसताय, येडे हो?
एवढा मोठा माणूस आपल्या मातीत जन्मला, म्हणून माती कपाळाला लावावी, असा दिवस आहे हा!
माझ्या शिवरायांचा वाढदिवस आहे, बॉस!
चांगभलं!
- संजय आवटे

२० वर्षात मेहनत करून कमावलेले एका वर्षात ९०% पेक्षा जास्त गमवावे लागते. शिवाय स्वतःचे आणि कुटुंबाचे आयुष्य पणाला लागून कॉम्पिटिटर च्या समोर जाऊन उभं रहावं लागतं.
कॉम्पिटिटर पुढील सहा महिने हजार किलोमीटर दूरवर स्वतःच्या लोकेशन पासून दूर ठेवतो आणि त्या तरुणाला संपवण्याचा प्लॅन करतो.
केवढा धक्का! केवढं फ्रस्ट्रेशन!! केवढा सेटबॅक!!!
तो ३६ वर्षांचा तरुण आत्महत्या करत नाही...त्या ही परिस्थितीत मनोधैर्य उंचावून आधी त्याची टीम बाहेर काढतो आणि मग स्वतः कॉम्पिटिटरच्या जाचातून सुटका करवून घेतो. पेशन्स ठेवत कंसिस्टंट मजल मारत स्वतःच्या लोकेशनवर पोहोचतो आणि २० वर्षांच्या मेहनतीने उभारलेले जे गमावलं होतं ते पुढील फक्त १ वर्षात पुन्हा कमवतो इतकंच नाही तर कॉम्पिटिटरला ही मोठे तडाखे देतो..
फ्रस्ट्रेशनचा उपाय सुसाईड नाही तर क्वांटम लीप मध्ये शोधणारा तो ३६ वर्षीय तरुण : "छत्रपती शिवाजी महाराज"
आणि तो झालेला सेटबॅक म्हणजे पुरंदर चा तह ज्यात 90% किल्ले छत्रपतींनी त्या औरंग्याला दिले. चार पाच पावले मागे आले म्हणणे नव्हे तर 20 वर्षे मागे गेले आणि पुढच्या 8 वर्षात 360 किल्ले केले.
क्वांटम लीप
गरुड भरारी
हीच असते
निराश होऊन धोकादायक पाऊल टाकण्या आधी शिवस्मरण करणे छत्रपतींचा आदर्श समोर ठेवणे ही आज काळाची आणि परिस्थितीची गरज आहे.
🙏🏻

शिवजयंती परवा साजरी झाली, महाराजांच्या जयंतीनंतर एका दिवसाने औरंगजेबाचा निर्वाणदिन असावा हा काव्यगत न्याय आहे, औरंगजेब समजून घेतल्याशिवाय शिवराय नीट कळतं नाहीत. म्हणून मला कळलेला आलमगीर औरंगझेब मांडून पाहण्याचा तीन वर्षांपूर्वी केलेला प्रयत्न.
#आलमगीर
आजचा अफगाणिस्तान, पाकिस्तान, भारत आणि बांगलादेश या चार देशांची लोकसंख्या, जागतिक लोकसंख्येच्या साधारण 28% आहे. अवघ्या 300 वर्षांपूर्वी हे चारही देश एकाच विशाल साम्राज्याचा भाग होते. या साम्राज्याचा महसूल, जागतिक महसुलाच्या 1/4 होता. अशा या जगातील सर्वात शक्तिशाली साम्राज्याचा सम्राट होता, "हजरत सलामत किब्ला ई दिनों दुनिया अबुल मुजफ्फर मुहिउद्दीन मोहंमद औरंगजेब आलमगीर बादशहा ई गाझी शहेनशहा ए सल्तनत ए हिंद" .. ज्याला जग आज फक्त औरंगझेब म्हणून ओळखते. त्याच्या नावाच्या पुढच्या आणि मागच्या पदव्या, त्याच्या साम्राज्यसह गळून पडल्यात आणि उरलाय फक्त एक माणूस, त्याच्या समाधीइतकाच साधा, रुक्ष आणि जुनाट.. 20 फेब्रुवारी 1707 साली नगरजवळच्या भिंगार येथे औरंगझेबाने देह ठेवला.
कसा होता औरंगजेब?
अत्यंत कर्तृत्ववान, खंदा लढवैय्या, उत्कृष्ट प्रशासक, उत्कृष्ट सैन्य संचालक, व्यक्तिगत नैतिकतेचा वस्तुपाठ, चिवट, स्वतःच्या तत्वांशी आणि हाती घेतलेल्या कार्याशी अत्यंत प्रामाणिक, दिर्घद्योगी, माणसांची प्रचंड पारख असलेला, न्यायनिष्ठुर, प्रचंड धार्मिक, काटकसरी .
एखाद्या प्रचंड वटवृक्षासारखा अवाढव्य आणि जटिल माणूस होता औरंगझेब आलमगीर..
पण तरी या औरंगझेबाच्या कपाळी इतिहासाने काही मोठी पापं गोंदवून ठेवलीत. त्यातलं सगळ्यात मोठं पाप आहे, त्याच्या दक्खन स्वारीच्या काळात घडून आलेल्या मनुष्यहत्येचे.
साधारण अंदाजानुसार औरंगझेब आणि त्याचे विरोधक दोघांचे मिळून, बारा ते पंधरा लाख सैनिक या काळात मृत्युमुखी पडले. यात जितके लढून मेले त्याहूनही अधिक विविध रोगांच्या साथीत, कधी उपासमारीने मेले. बहुदा जितके सैनिक मेले त्याच्या काही पट नागरिक मेले असावेत. दुष्काळाने, उपासमारीने, लुटालुटीने मुलुख वैराण झाला. साम्राज्य पोखरून निघालं.
औरंगझेबाने सामर्थ्यशाली मुघल साम्राज्याच्या गंडस्थळी स्वतःच्या टोकदार हट्टाचा एक पाशवी खिळा ठोकून ठेवला.
औरंगझेबाच्या मृत्यूनंतर अवघ्या काही दशकांत, मुघल साम्राज्याच्या सीमा फक्त दिल्ली शहरापूरत्या मर्यादित झाल्या. आपल्या आयुष्यातील शेवटची सत्तावीस वर्ष औरंगझेबाने, ज्या मराठी वादळाचा पाठलाग करण्यात घालवली, त्या वादळाने संपूर्ण भारत व्यापला. औरंगझेबाच्या मृत्यूनंतरचा इतिहास वाचल्यास, औरंगझेब हा प्रचंड हताश, दयनीय आणि हरलेला सम्राट वाटतो.
या दयनीय पराभवाचे मूळ औरंगझेबाच्या स्वभावातच आहे. औरंगझेब कसा होता हे जितकं महत्वाचं आहे तितकंच, औरंगझेब कसा नव्हता हेही महत्वाचं आहे. एका शब्दात सांगायचं तर औरंगझेब हा राजा नव्हता, एका प्रचंड मोठ्या साम्राज्याच्या सम्राटाकडे हवा असणारा दिलदारपणा, क्षमाशीलता, औदार्य, मोकळेपणा, दया, विवेक यापैकी कोणताही गुण औरंगझेबाच्या ठायी नव्हता. औरंगझेब कदाचित उत्कृष्ट वझीर, निजाम होऊ शकला असता पण तो अत्यंत वाईट शहेनशहा होता. औरंगझेबाच्या धार्मिक कट्टरतेने त्याच्या राज्याला, त्याच्या प्रजेपासून, ज्यात त्याचे सैनिकही होते, दूर नेले. औरंगझेबाच्या धार्मिक निष्ठा या त्याच्या राजकीय निष्ठांपेक्षा बलवत्तर ठरल्या आणि मोगल साम्राज्य ज्या आधारावर तोलले होते तो आधारच खचला. दक्खन काबीज करण्याचा त्याचा हट्ट अविवेकी होता. वाऱ्यावर स्वार झालेल्या आणि स्वतःच्या मनातील स्वराज्याच्या निष्ठेशिवाय इतर कोणतेही नैतृत्व न जुमानणाऱ्या मराठ्यांशी, औरंगझेब एक न संपणारे युद्ध लढत राहिला.
औरंगझेब जे करत आहे ते व्यर्थ आहे हे त्याच्या सहकाऱ्यांना, वारसदारांना कळतं नव्हते का? कळतं होते, त्या काळात त्याची मुलं साठ वर्षांची झाली होती. पण औरंगझेब इतका कर्तृत्ववान होता की वयाच्या नव्वदीपर्यंत त्याच्या घरात त्याच्या विरुद्ध बंड होऊच शकले नाही. 1680 च्या दरम्यान घडलेल्या अकबरच्या बंडानंतर कोणत्याही राजपुत्राने औरंगझेबाला हटवण्याचा प्रयत्न केला नाही, किंबहुना तसा प्रयत्न होणारच नाही याची काळजी बादशहाने घेतली. हे इतक्या टोकाला पोहचले की स्वतःच्या मुलींचे विवाह करणेही त्याने टाळले.
औरंगझेबाने मृत्यूसमयी लिहिलेलं पत्र हा त्याच्या आयुष्याचा सारांश आहे. तो लिहितो, "मी कोण आहे, कुठे जाणार हे मला माहित नाही. माझं सगळं आयुष्य व्यर्थ ठरलंय. देव माझ्या हृदयात होता पण माझ्या डोळ्यासमोर काळोख दाटला होता. मला आता काहीही आशा वाटत नाही. माझ्या हातून बरंच पाप घडलंय."
इतिहास हा नेहमी, सामाजिक आणि राजकीय प्रवाहांच्या संदर्भात अभ्यासला पाहिजे. व्यक्तींपेक्षा असा प्रवाहांचा अभ्यास जास्त वास्तववादी आणि दिशादर्शक असतो. सतराव्या शतकात, भारतीय राजकारणात दोन मोठे प्रवाह आढळतात. एक छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि दुसरा

आलमगीर औरंगझेबाचा. छत्रपतींचे राजकारण एक विवेकवादी, समंजस पण तरीही खंबीर निष्ठांचे स्वरूप घेऊन समोर येते. या प्रवाहात व्यक्ती मोठी नाही तर त्या व्यक्तीने रुजवलेल्या श्रद्धा मोठ्या असतात. याच श्रद्धा सामान्य मराठी प्रजेला सत्तावीस वर्ष जगातील सर्वशक्तिमान साम्राज्याशी लढण्याचे बळ देतात. नैतृत्वापेक्षाही समाजाची जीवनमूल्ये महत्वाची मानण्याची, तानाजी पडला तरी कोंढाणा न सोडण्याची सवय याच श्रद्धा रुजवतात. दुसरीकडे औरंगझेबाचा प्रवाह हा अतिरेकी धार्मिक निष्ठा, स्वकेंद्रित विचारसरणी, धर्मग्रंथावरील फाजील विश्वास, स्वतःच्या समजुतींभोवती फिरवत ठेवलेली मूल्यव्यवस्था या गुणांभोवती घुटमळत राहतो, स्वतःबरोबरच समाजाच्या ऱ्हासाला कारणीभूत ठरतो.
औरंगझेब कोणत्या धर्माचा होता हे गौण आहे, छत्रपती कोणता धर्म मानत होते हेही गौण आहे. ते कोणत्या प्रवाहाला बळ देत होते हे महत्वाचे आहे. स्वतःच्या व इतरांच्या श्रद्धांचा विवेकवादी स्वीकार व अतिरेकी, समाजघातक श्रद्धाना कणखर विरोध हा छत्रपतींचा प्रवाह आहे.
आजही हे दोन्ही प्रवाह समाजात वाहत आहेत. बऱ्याचदा ते एकमेकांत मिसळून जातात, तर कधी एकमेकांच्या साथीने, समांतर वाहतात. व्यक्ती महत्वाची नसतेच, प्रवाह महत्वाचा असतो. आपण कोणत्या प्रवाहाला बळ द्यावं हे आपल्याला ठरवावं लागेल, त्यावरच आपलं आणि आपल्या पिढ्यांच भवितव्य अवलंबून आहे.
माझा छत्रपतींच्या प्रवाहातच राहण्याचा निर्णय पक्का आहे.
- शैलेंद्र कवाडे (Shailendra Kawade)

सोयिस्कर इतिहासाच्या तर्कापलीकडलं सिक्रेट
-
सिक्रेट्स ऑफ सिनौलीः डिस्कव्हरी ऑफ द सेन्चुरी
---
निरज पांडेनं बनवलेला आणि मनोज बाजपेयीच्या निवेदनानं सज्ज ‘सिक्रेट्स ऑफ सिनौली’ माहितीपट ९ फेब्रुवारीला डिस्कव्हरीनं रिलीज केला. भारतीय पुरातत्त्वच नाही, तर प्रचीन इतिहास व मानववंशाचे अनेक मूलभूत सिद्धांत येत्या काळात बदलले जातील का? असे अनेक प्रश्न निर्माण करून, हा माहितीपट वस्तुनिष्ठ इतिहास जाणून घ्यायची इच्छा असलेल्या प्रत्येक भारतीयाची अस्वस्थ उत्कंठा जागृत करू शकतो.
उत्तर प्रदेशातल्या बागपत तालुक्यातील 'सिनौली' गावातील शेतांत ताम्रयुगीन वस्तूचे अवशेष सापडू लागले होते. एकोणीसाव्या शतकाच्या सुरुवातीपासून तिथं सापडणाऱ्या मौल्यवान वस्तूंची विल्हेवाट परस्पर लावली जात होती. मात्र 2005ला पुरातत्व खात्याला जाग आली. तिथं उत्खनन केलं. सापडलेल्या अवशेषांची कार्बन डेटिंग केली. त्यानुसार हडप्पा- मोहेंजोदारोनंतरच्या काळातील साधारण इसवी सनपूर्व 2000वर्षांपूर्वीच्या अत्यंत प्रगत व स्वतंत्र संस्कृतीचे अवशेष असल्याचं सांगितलं गेलं. पुन्हा भारतीय पुरातत्वखातं निद्रिस्त झालं. 2018साली परत गांभीर्यानं उत्खनन केलं तर, त्यात त्या संस्कृतीचं स्मशानच सापडलं. योद्ध्यांचं दफन तिथं केलं जात असावं असा प्राथमिक कयास निघाला.
योध्यांचं दफन त्यांच्या तांब्याची अत्यंत प्रगत शस्त्र आणि मृत्यूपश्चात जगात लागणाऱ्या मूल्यवान वस्तूंसह केलेलं आढळलं. माती, तांब्यांची भांडी, स्त्रीयांच्या अंगावर सोन्याची आभूषणं. त्या सगळ्या वस्तूंची घडणावळीतील सुबकपणा त्या संस्कृतीत असणाऱ्या प्रगत तंत्राची साक्ष देतो. अशाप्रकारे मोठ्याप्रमाणात व प्रमाणबद्ध शस्त्र उत्खननात पहिल्यांदाच आढळल्याचं पुरातत्ववेत्ते सांगतात. तूर्तास ही संस्कृती बेनाम असली तरी तिच्यातील वस्तूंचे व अंत्यविधीच्या पद्धती वेदात नमूद असल्याचा दावाही या माहितीपटातले काही पुरातत्ववेत्ते करतात. या उत्खननात आणखी महत्त्वाच्या आढळलेल्या पाच गोष्टी. या संस्कृतीत महिला योध्यांच्या कबरींसह त्यांचे अवशेषही सापडले आहेत! दुसरी बाब मूठ असलेल्या दुधारी तलवारी, तिसरी बाब तांब्याचं कोरीवकाम केलेल्या दोन प्रकारच्या ढाली (स्त्री व पुरुष योद्ध्यांची वेगवेगळी), चौथी बाब धनुष्यबाण, तर पाचवी ही महत्त्वाची बाब... भारतात पहिल्यांदा पूर्ण आकाराचे तीन युद्धरथ सिनौलीत सापडले आहेत!
वर्तमान परिस्थिती इतिहासाचा अन्वय काय, कसा व किती वस्तुनिष्ठ लागेल हा प्रश्न मोठा आहे. हे उत्खनन फक्त एखाद-दोन एकरांतील आहे. त्यामुळे पुढच्या अतीव्यापक कामाला किती काळ लागेल हे सांगणं सिनौलीच्या संस्कृतीइतकंच गूढ वाटतं.
वर्तमानात इतिहासाला आपापल्या सोयीचे संदर्भ लावून सगळेच इतिहासाच्या स्वरचित श्टोऱ्या सांगण्याच्या काळात, हे वस्तुनिष्ठ इतिहासाच्या व्यापक अभ्यासाचा विषय ठरणार आहे. माहितीपट पहायलाच हवा.
- अजित अभंग