शोक हे जोन्सने शोधून काढले. ग्रीक साहित्यात उल्लेख येणारे पालिबोथरा म्हणजे मौर्याची राजधानी पाटलीपुत्र (आजचे पटणा) आणि सॅनड्रोकोटस म्हणजे चंद्रगुप्त, हे जोन्सने सिद्ध करून दाखवले. पण या दरम्यान भारतातले वातावरण न झेपल्याने तो वारंवार आजारी पडत होता आणि अखेर त्यातच त्याचा मृत्यू झाला.
‘शतरंज के खिलाडी’ सिनेमामुळे आपल्याला अवधचा नवाब वाजीद अलीशाह माहीत असतो, पण अवध खालसा होऊ नये म्हणून धडपड करणारी त्याची आई मलिका किश्वर मात्र आपल्याला माहीत नसते. तिच्याविषयी पुस्तकात एक लेख आहे. अवधचे राज्य ब्रिटिशांनी खालसा करून वाजीद अलीशाहला पदच्युत केले व संपूर्ण राजघराण्याची रवानगी कोलकात्याला केली. याविरोधात आवाज उठवला तो मलिका किश्वरने. भारतात दाद लागत नाही म्हटल्यावर तिने इंग्लंडच्या राणीकडेच दाद मागायचे ठरवले. इंग्लंडची राणीही स्त्री आहे, तिलाही मुलेबाळे आहेत, तर तिला आपली व्यथा समजेल, असा विचार करून अनेक अडचणींना तोंड देत ती इंग्लंडला जाऊन पोहोचली. तिची आणि राणीची भेटही झाली, पण राणीच्या हातातही काहीच नव्हते. इंग्लंडच्या पार्लमेंटमध्येही तिच्या पदरी काही पडले नाही. दरम्यान भारतात १८५७ च्या बंडाची सुरुवात झाली. मग सगळीच गणिते फिस्कटली. निराशेने ती भारतात यायला निघाली, पण हवामान न झेपल्याने मलिका किश्वरचे पॅरिसमध्येच निधन झाले.
भारताच्या राजकीय आणि सामाजिक इतिहासावर ठसा उमटवणाऱ्या काही अधिकाऱ्यांची दखलही लेखकाने घेतलेली आहे. तसेच झाशीची राणी लक्ष्मीबाई, महात्मा आणि सावित्रीबाई फुले, अॅनी बेझंट, थोर गणितज्ञ रामानुजन आणि त्यांची पत्नी, विवेकानंद अशा वेगवेगळ्या ज्ञात आणि अज्ञात व्यक्तींच्या जीवनाचा आढावा लेखकाने घेतला आहे, त्याचप्रमाणे काही महत्त्वाच्या घटनांबद्दल- जसे की, सावरकर व त्यांची मार्सेलीसची गाजलेली उडी, बाबरी मशिदीविषयीच्या ऐतिहासिक घडामोडी, फुटबॉल आणि भारतीय स्वातंत्र्य चळवळ- रोचक माहिती देतो.
‘द कोर्टेझन, द महात्मा अॅण्ड द इटालियन ब्राम्हीन : टेल्स फ्रॉम इंडियन हिस्टरी’
लेखक : मनु पिल्लई
प्रकाशक : कॉन्टेक्स्ट

The Unique Foundation आणि
Economic & Political Weekly (EPW) यांच्या संयुक्त विद्यमाने...
मराठी अनुवाद प्रकल्प (Translation Project) अंतर्गत 5 एप्रिल 2020 च्या अंकातील तीन संपादकीय लेख वाचकांसाठी उपलब्ध...🖌
1. कोरोना विषाणूचा उद्रेक आणि सामाजिक चिंतेची तीव्रता कमी करण्याचा प्रश्न
(Covid 19 and the Question of Taming Social Anxiety )
2. भारताच्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेच्या कसोटीचा काळ ?
(India's Public Health System on Trial ?)
3. महामारीच्या काळातील अस्तित्व आणि संचार
(Survival & Mobility in the Midst of a Pandemic)

लोकसत्ता- May 24, 2020
सांगतो ऐका : उपेक्षित अन् अपमानित नेहरू
नेहरूंनी आपल्याला दिलेला संपन्न वारसा विस्मृतीत चालला आहे.
मनोहर पारनेरकर |samdhun12@gmail.com
नेहरू देशाच्या स्वातंत्र्यलढय़ातील एक प्रमुख नेते होते. मोहक व्यक्तिमत्त्व आणि देशासाठी केलेला त्याग या दोन्ही कारणांसाठी ते भारतीय जनतेचे दैवत झाले होते.
भारतीय स्वातंत्र्यलढय़ातील एक अग्रणी नेते आणि आधुनिक भारताचे शिल्पकार पंडित नेहरू आज विस्मृतीत गेले असून, त्यांना आता इतिहासाच्या केराच्या टोपलीत टाकून दिलं गेलं आहे. आणि ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे. सध्याच्या सत्ताधारी मंडळींनी देशाच्या या पहिल्या पंतप्रधानांना त्यांच्या अत्युच्च आणि आदरणीय स्थानावरून लज्जास्पदरीत्या का व कसं खाली खेचलं, आणि नेहरूंनी आपल्याला दिलेला संपन्न वारसा नंतरच्या काळात कसा विस्मृतीत चालला आहे याचा ऊहापोह मी या लेखात करणार आहे. मात्र, प्रथम २७ मे रोजी येणाऱ्या त्यांच्या ५६ व्या पुण्यातिथीनिमित्त त्यांच्या स्मृतीला आदरांजली वाहतो.
नेहरू देशाच्या स्वातंत्र्यलढय़ातील एक प्रमुख नेते होते. मोहक व्यक्तिमत्त्व आणि देशासाठी केलेला त्याग या दोन्ही कारणांसाठी ते भारतीय जनतेचे दैवत झाले होते. या किंवा त्यांच्या आधीच्या पिढीतील अनेकांना माहीत नसेल की देश पारतंत्र्यात असताना त्यांनी जवळजवळ नऊ वर्षे ब्रिटिश राजवटीत कारावास भोगला होता. सुरुवातीला स्वातंत्र्यलढय़ातील एक तळपतं व्यक्तिमत्त्व म्हणून आणि नंतर स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून नेहरू हे राष्ट्रभक्तांच्या जवळजवळ दोन पिढय़ांचे हीरो होते. ते अभिजनांचे लाडके होते याचे कारण त्यांच्या उत्तुंग राजकीय नेतृत्वाबरोबरच त्यांचं वैचारिक नेतृत्व हेदेखील होतं. ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ आणि ‘ग्लिम्प्सेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्री’ ही दोन महत्त्वाची पुस्तकं त्यांनी लिहिली.
नेहरूंनी दिलेले मूल्यवान वारसे तसे अनेक आहेत. पण आजच्या संदर्भात जे मला जास्त महत्त्वाचे वाटतात त्या दोन वारशांबद्दल इथे मी बोलतो. एक म्हणजे त्यांनी स्थापन केलेल्या व जोपासलेल्या काही उत्तम संस्था. आणि दुसरं म्हणजे ज्या निष्ठेने, उत्साहाने आणि खंबीरपणे त्यांनी बहुचर्चित ‘सायंटिफिक टेम्पर’ (ज्याला आपण ‘विज्ञाननिष्ठा’ म्हणू.) रुजवण्याचा प्रयत्न केला, ते. ज्या अनेक लोकशाही संस्था आणि परंपरा त्यांनी स्वत: उभारल्या आणि ज्यांचं त्यांनी निगुतीनं संगोपन केलं, त्या आजही कशाबशा तग धरून आहेत. पैकी निवडणूक आयोग आणि कॅग (उअॅ) यांसारख्या काही संस्था सोडल्या तर (अलीकडे त्यांचाही ऱ्हास होताना दिसतोय.) इतर संस्थांचं पद्धतशीरपणे खच्चीकरण केलं जातंय. आणि काहींची वाटचाल तर ‘आयसीयू’च्या दिशेने सुरू झालेली आहे. यातला सगळ्यात मोठा उपरोध म्हणजे या भीषणावह परिस्थितीला नेहरूंचाच पक्ष प्रामुख्याने कारणीभूत आहे. (हा पक्ष सध्या त्याचं स्वत:चं अस्तित्व कसं टिकवावं, या संकटाचा सामना करतोय. आणि ही घसरण सुरू व्हायला त्यांची कन्या इंदिरा गांधी आणि त्यांच्या घराण्यातले इतर सदस्यच जबाबदार आहेत. आणि १३५ वर्षांच्या या पक्षासाठी नेहरूंचा पणतू काय करतोय, असं विचारलं तर आपल्या नेतृत्वाखाली हा पक्ष विसर्जित करण्याची जबाबदारी जणू नियतीने त्याच्यावर टाकली आहे असं दिसतंय.)
शिक्षणाचा प्रसार आणि वैज्ञानिक दृष्टिकोन याच्या मदतीनेच भारतीय समाजात खोलवर रुजलेल्या अंधश्रद्धेचा सामना करता येईल असा ठाम विश्वास नेहरूंना वाटत होता. राष्ट्रीय प्रयोगशाळांची साखळी, बी. ए. आर. सी., आय. आय. टी. संस्था, इस्रो (करफड ही संस्था जरी प्रत्यक्षात १९७५ साली स्थापन झालेली असली, तरी त्याआधीच्या काळात नेहरूंनी घेतलेले धोरणात्मक निर्णय त्यास कारणीभूत होते. या संस्थेची निर्मिती हा नेहरूंच्याच विज्ञाननिष्ठ विचारांचा परिपाक होता, हे आपण कदापि विसरून चालणार नाही.) आणि पहिल्या दोन आय. आय. एम्स आदी संस्थांच्या स्थापनेतून विज्ञान आणि आधुनिक व्यवस्थापन यांच्या क्रांतीची पायाभरणी नव्या भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून त्यांनी केली. आज मंगळयानासारखी एखादी अंतराळ मोहीम जेव्हा यशस्वी होते तेव्हा आपण यांसारख्या आद्य मूलभूत संस्थांच्या योगदानाचंदेखील कौतुक केलं पाहिजे. कारण त्यासाठी लागणाऱ्या तंत्रज्ञांची आणि वैज्ञानिकांची निर्मिती या संस्था गेली काही दशकं करीत आहेत.
आता ‘सायंटिफिक टेम्पर’च्या संदर्भात लोकांना फार कमी माहीत असलेली एक घटना मी सांगतो. साधारणत: १९३० च्या दशकाच्या सुरुवातीला नेहरूंच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाची गांधीजींना चांगलीच चुणूक कशी पाहायला मिळाली ती ही घटना. १९३४ साली बिहारमध्ये मोठा भूकंप झाला होता. ‘अस्पृश्यतेच्या पापामुळे देवाने ही शिक्षा दिली..’ या दृष्टिकोनातून गांधीजी या घटनेकडे बघत होते. तर आपल्या या आध्यात्मिक आणि राजकीय गुरूला नेहरूंनी फार मोठय़ा धैर्याने त्यांची चूक दाखवून देत म्हटलं, ‘‘माणसाच्या एखाद्या प्रथेमुळे पृथ्वीच्या भूकवचात हालचाल होते असं म्हणण

ा तरी पाहण्यात अन्यत्र आलेलं नाही.
“His was truly a full life lived for India – and there is scarcely any public institution or aspect of the republic that Nehru did not shape or influence. There is plenty in his legacy to both celebrate and contest. belitting his role – or worse, forgetting him- only betrays India’s degradation, even if it can not alter Nehru’s place in history.”
आणि आता जाता जाता.. परवाच माझ्या एका मित्राने एक थक्क करणारं निरीक्षण माझ्याकडे नोंदवलं. तो म्हणाला, ‘‘पंडित नेहरूंचं जर लेडी एडविना माऊंटबॅटनबरोबर प्रेम प्रकरण झालं नसतं तर आज आपण ‘अखंड भारता’त राहत असतो.’’ यावर मी त्याला म्हणालो, ‘मित्रा, तुझ्या या भन्नाट भाष्यावरून मला १७ व्या शतकातील प्रसिद्ध फ्रेंच वैज्ञानिक, लेखक व विचारवंत पास्कल याचं एक वाक्य आठवलं. तो म्हणाला होता- क्लिओपाट्राचं नाक जर थोडंसं आखूड असतं तर अख्ख्या जगाचा चेहराच बदलला असता.’’ तर फारसं वाचन नसलेला माझा हा मित्र उद्गारला, ‘‘अरे, काय सांगतोयस काय, नेहरूंचं आणखी एका फिरंगी बाईबरोबर प्रेम प्रकरण होतं? हे मला माहितीच नव्हतं.’’
शब्दांकन : आनंद थत्ते

ं ही आश्चर्याचीच गोष्ट आहे.’’ आणि आज नेहरूंच्या मृत्यूनंतर केवळ सहा दशकांतच देशाचे धुरिण असलेले राजकीय नेते गणपती आणि कर्ण ही पुराणांतील उदाहरणं देत आपले पूर्वज प्लास्टिक सर्जरी आणि रिप्रॉडक्टिव्ह जेनेटिक्स या विषयांतले कसे तज्ज्ञ होते याचे बिनडोक दावे करताहेत. माझ्याप्रमाणेच तुम्हीदेखील नेहरूंचे चाहते असाल, पण त्यांचे अंध भक्त नसाल तर या थोर माणसाने आपल्या पंतप्रधानपदाच्या १४ वर्षांच्या दीर्घ कारकीर्दीत बऱ्याच चुका केल्या, हेही आपल्याला मान्य करावे लागेल. काश्मीर, चीन, सोव्हिएत रशियाच्या प्रभावाखालील चुकीची धोरणं, मुस्लीम समाजाची केलेली तथाकथित भलामण अशा काही गंभीर चुकादेखील त्यामध्ये होत्या; (यापैकी पहिल्या दोन Himalayan Blunders होत्या.) की ज्यांची फार मोठी किंमत देश आजही चुकवतो आहे. (त्यांच्यानंतर लालबहादूर शास्त्री पंतप्रधान झाले, त्यामुळे घराणेशाहीचा आरोप त्यांच्यावर सहजपणे चिकटवता येणार नाही.) हे सगळं असूनसुद्धा देशभक्त आणि नि:पक्षपाती विचार करणाऱ्या करोडो भारतीयांना मला नेहमी एक प्रश्न विचारावासा वाटतो, तो म्हणजे ‘‘या माणसाच्या चुका इतक्या प्रचंड आहेत का, की त्यांना एक ‘काळिमा फासणारं व्यक्तिमत्त्व’ ठरवून इतिहासातील त्यांचं योग्य स्थान देखील आपण त्यांना नाकारावं? इंग्रजीत म्हणायचं झालं तर मी म्हणेन.. By all means, paint him warts and all, but for God’s sake, don’t consign him to the dustbin of history. That would be height of cruelty. बऱ्याचदा अतिशय अन्यायकारक रीतीनं, कधी कधी उगीचच कठोरपणे आणि कधी कधी बेलगामपणे इतिहासातील थोर महापुरुषांचा निवाडा आपण करत असतो, ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे. कित्येक वेळा ही व्यक्तिमत्त्वं त्यांनी भावी पिढय़ांसाठी ठेवलेल्या समृद्ध वारशापेक्षा त्यांच्या काही गोष्टींतील अपयशासाठी, दोषांसाठी आणि त्यांच्या आयुष्यातील कमकुवत क्षणांसाठीच आपल्या लक्षात राहतात. नेहरूंच्या बाबतीत हेच घडलं आहे असं मला वाटतं. म्हणजे त्यांना जवळजवळ समकालीन असलेले नेते गांधीजी, सरदार पटेल, सुभाषचंद्र बोस, राजाजी, मौलाना आझाद आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या सर्वाना इतिहासाने न्याय दिला.. त्यांचं योग्य रीतीने मूल्यमापन केलं. परंतु या सर्व महान नेत्यांच्या मानाने पंडित नेहरू मात्र उपेक्षित आणि सर्वात जास्त अपमानित झालेले दिसतात.
भारताच्या निधर्मी संविधानाशी नेहरूंची ठाम बांधिलकी होती. सध्या देशात सत्तेवर असलेला पक्ष जरी या बांधिलकीचा पुनरुच्चार तारसप्तकात करीत असला, तरीही त्यांना ज्या प्रकारच्या राष्ट्राची निर्मिती करावयाची आहे, ते निधर्मी निश्चितच नाहीए.
नेहरूंनी पाठपुरावा केलेलं आर्थिक विकासाचं मॉडेल सबंध जगभरात अयशस्वी ठरलं. मी ज्याचा अगोदर उल्लेख केला त्या त्यांच्या चुकांमुळे देशाचं खूप नुकसान झालं आणि अपायकारक अशा घराणेशाहीचा पूर्वाधिकारी अशी त्यांची झालेली प्रतिमा (ती बरोबर आहे, पण अंशत:च!).. या सर्व गोष्टी म्हणजे ‘नेहरू विध्वंस’ पथकाच्या हातात मिळालेलं कोलीत ठरल्या आहेत. सरदार पटेल आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याबरोबर त्यांची सतत तुलना करत, ते देशाचं नेतृत्व करण्यात कसे कमी पडले, हे दाखवून देण्याची चलाख क्लृप्ती या मंडळींनी वापरली. शिवाय स्वातंत्र्यानंतर भारतात जे जे काही चुकीचं घडलं, त्या सर्वाचं खापर अथकपणे त्यांच्या डोक्यावर फोडून त्यांनी नेहरूंच्या व्यक्तिमत्त्वाला जवळजवळ खग्रास ग्रहणच लावलं आहे.
‘आई-वडिलांची पापं त्यांच्या मुलांना भोवतात’ अशा आशयाचं बायबलमध्ये एक वचन आहे. नेहरूंच्या बाबतीत या वचनाच्या नेमकी विरुद्ध परिस्थिती उद्भवली असं वाटतं. इंदिरा, संजय, राजीव, सोनिया, राहुल, प्रियंका आणि रॉबर्ट वड्रा (अगदी ताणून घेतलं तर!) यांची एकत्रित पापं नेहरूंना भोवताहेत की काय असं वाटतं.
आज तर पंडितजींची खास ओळख असलेलं ‘नेहरू जॅकेट’देखील नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. आतापर्यंत असं वाटत होतं की नेहरूंचा वारसा म्हणून निदान ‘नेहरू जॅकेट’ तरी शिल्लक राहील. परंतु जवळजवळ १९३० पासून असंख्य राजकारणी लोकांच्या पोशाखाचा अविभाज्य भाग असलेल्या ‘नेहरू जॅकेट’ची जागा आता ‘मोदी जॅकेट’ने घेतली आहे. (दोन वर्षांपूर्वी पंतप्रधान मोदींनी अशी वेगवेगळ्या रंगांची चार जाकिटं दक्षिण कोरियाच्या अध्यक्षांना भेट दिली होती आणि त्यांनाही ती खूप आवडली होती.) नेहरूंचा समस्त वारसा इतक्या वेगाने उद्ध्वस्त केला जातोय, की भविष्यातील एखाद्या इतिहासकाराला १९ व्या शतकातील उर्दू कवी अमीर मिनाई (१८२८-१९००) यांच्या पुढील ओळी उद्धृत कराव्याशा वाटतील.
‘हुवे नामवर बे-निशान कैसे कैसे
जमीं खा गयी आसमां कैसे कैसे’
सुशील आरोन या भारतीय स्वतंत्र पत्रकाराने आधुनिक भारताच्या इतिहासात नेहरूंच्या भूमिकेचं आणि त्यांच्या अनन्यसाधारण स्थानाचं वर्णन पुढील शब्दांत केलं आहे. या वादग्रस्त विषयाचं इतकं वाजवी, समतोल, अचूक आणि इतक्या मोजक्या शब्दांत केलेलं आकलन माझ्य

मराठी अनुवाद प्रकल्प (Translation Project) अंतर्गत 11 एप्रिल 2020 च्या अंकातील तीन संपादकीय लेख वाचकांसाठी उपलब्ध...🖌
1. गरज प्रतीकात्मक कृतींच्या पलीकडे जाण्याची
(Going Beyond Symbolic Gestures)
2. घिसाडघाईचे नियोजन आणि उपासमारीचे संकट
(Abrupt Planning and Looming Hunger)
3. एकार्थक राजकीय प्रतिकवाद
(Univocal Political Symbolism)

(लोकसत्ता, 30 मे 2020) चौकटीपल्याडचे मेनन..
रवींद्र कुलकर्णी
‘अ चेकर्ड् ब्रिलियन्स : मेनी लाइव्हज् ऑफ व्ही. के. कृष्ण मेनन’ लेखक : जयराम रमेश प्रकाशक : पेंग्विन व्हायकिंग
इतिहासातील कर्तृत्ववानांचे मूल्यमापन यश-अपयशाच्या चौकटीतच केले जाते. पण ती चौकट टाळून शोध घेतल्यास अनेक गाळलेल्या जागा भरून निघतात, हेच व्ही. के. कृष्ण मेनन यांच्यावरील या चरित्रपर पुस्तकाचे सांगणे..
१९३४ ते १९६४ या कालखंडाचा भारताचा इतिहास लिहायचा झाला, तर व्ही. के. कृष्ण मेनन यांचे नाव सुवर्णाक्षरांत (वा काळ्या रंगात का होईना) लिहावेच लागेल. ते टाळता येणार नाही. कृष्ण मेनन म्हटले की, संयुक्त राष्ट्रांतले त्यांचे आठ तासांचे भाषण व ते संरक्षणमंत्री असताना १९६२ साली आपला चीनने केलेला लाजिरवाणा पराभव या दोन गोष्टी लगेच डोळ्यांसमोर येतात. यातल्या दुसऱ्या गोष्टीबद्दल आपण इतके संवेदनशील असतो की, मत ठरवण्यासाठी अधीर होऊन जातो. पण भारतीय घटनेची प्रस्तावना ही याच मेनन यांनी लिहिलेली आहे, हे किती जण जाणतात? तेव्हा यश-अपयशापलीकडे जाऊन आपण ज्याला जबाबदार धरले आहे, त्या व्यक्तिमत्त्वाचा शोध घेण्याची आपल्याला गरज वाटत नाही. ही गरज ज्यांना जाणवते अशांपैकी, डॉ. मनमोहन सिंग यांच्या सरकारात मंत्री राहिलेल्या जयराम रमेश यांनी ‘अ चेकर्ड् ब्रिलियन्स : मेनी लाइव्हज् ऑफ व्ही. के. कृष्ण मेनन’ हे चरित्र लिहिले आहे.
१८९६ साली केरळमध्ये कृष्ण मेनन यांचा जन्म झाला. ‘होमरुल’च्या अॅनी बेझंट यांनी त्यांच्यातले गुण प्रथम ओळखले व त्यांना इंग्लंडला पाठवले. जिथे ते नंतर २७ वर्षे राहिले. मेनन यांनी १९२७ साली लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून अर्थशास्त्राची पदवी आणि नंतर इंडस्ट्रियल सायकॉलॉजीमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले. पुढे ‘इंडिया लीग’ ही संस्था त्यांनी भारताची बाजू इंग्लंडमध्ये लावून धरण्यासाठी स्थापली. बर्मिगहॅम, लिव्हरपूल, मँचेस्टर अशा अनेक ठिकाणी त्याच्या शाखा त्यांनी वाढवल्या. पत्रके काढणे, व्याख्याने देणे, भारतातून येणाऱ्या काँग्रेस नेत्यांचे दौरे व भेटीगाठी ठरवणे ही कामे मेनन हिरिरीने करत. इंग्लंडच्या मजूर पक्षाच्या अनेक नेत्यांशी त्यांचे जवळचे संबंध होते. ते ब्रिटिश पार्लमेंटमध्ये भारताच्या प्रश्नांचा पाठपुरावा करत. याशिवाय स्त्रियांचे क्लब, मजुरांच्या संघटना, चर्चमध्ये जाणारे भाविक या सर्वासमोरही मेनन व त्यांची ‘इंडिया लीग’ भारताचे प्रश्न मांडत असे. काँग्रेसच्या स्थापनेनंतर दरवर्षी न खंड पडता काँग्रेसचे अधिवेशन संपन्न होत असे. पण १९३२ साली तत्कालीन ब्रिटिश पंतप्रधान रॅम्से मॅक्डोनाल्ड यांनी त्यास आडकाठी घातली. मेनन यांनी आपल्या ‘द इंडिया रिव्ह्य़ू’ या पत्रात याचा निषेध करताना, अशी एक गोष्ट साऱ्यांच्या लक्षात आणून दिली जी ब्रिटिश व भारतीयही विसरले होते. त्यांनी ब्रिटिश पंतप्रधानांना आठवण करून दिली की, ‘१९११ साली इंडियन नॅशनल काँग्रेसने रॅम्से मॅक्डोनाल्ड यांना अध्यक्षपद देऊ केले होते. ही व्यक्ती पुढे पंतप्रधान होणार आहे, हे त्यामागील कारण नव्हते. काँग्रेसला हे वाटले होते की, ही व्यक्ती स्वातंत्र्याच्या बाजूने, जे दुबळे आहेत त्यांच्या बाजूने बोलेल. पण आज त्यांचे सरकार हे हुकूमशाही असल्याप्रमाणे वागत आहे.’
या साऱ्यासाठी पैसा लागे; तो काँग्रेस, विशेषत: पं. मदनमोहन मालवीय पुरवत. मधेमधे ‘इंडिया लीग’ भारताचे दौरे करत असे. त्यानंतर इथल्या परिस्थितीची माहिती ब्रिटिश जनतेला व तिथल्या गणमान्य व्यक्तींना दिली जात असे. गांधीजी व आंबेडकर यांच्यात झालेल्या पुणे कराराची माहिती देण्यासाठी झालेल्या कार्यक्रमाला बट्र्रान्ड रसेल, हेरॉल्ड लास्की व स्टॅफर्ड क्रिप्स यांची उपस्थिती होती. ‘न्यू स्टेट्समन’च्या संपादकालाही त्यांनी भारतातल्या परिस्थितीबद्दल पत्र लिहिले. त्याचे संपादक व त्यांच्या पत्नी यांना भारताबद्दल सहानुभूती होती व मेनन यांच्याशी त्यांचे उत्तम संबंध होते. याआधी ‘ग्रेट ब्रिटनला संदेश..’ या मथळ्याचा गांधीजींचा लेख त्यांनी ‘डेली हेराल्ड’मधून छापून आणला होता. ‘इंडिया लीग’च्या अनेक कार्यक्रमांना हेरॉल्ड लास्की हजर राहात. १९४९च्या लंडनमधल्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या समारंभात बोलताना ते म्हणाले, ‘‘किती वेळा तरी जाण्याची इच्छा नसताना या संस्थेच्या कार्यक्रमांना मी गेलो आहे; नको वाटणारी भाषणे मी केली आहेत, लिहिण्यासाठी वेळ नसताना लेख लिहिले आहेत. कारण भारताला मुक्त झालेले पाहण्याच्या इच्छेच्या निराशवाण्या बंधनात मी होतो. आता मागे वळून पाहतो तेव्हा या संघर्षांत कृष्ण मेननच्या सेनेतला एक सैनिक होण्याची संधी मला त्याने दिली, हे त्याचे ऋण मी कधी फेडू शकणार नाही.’’ आपल्या विद्यार्थ्यांविषयी यापेक्षा सुंदर उद्गार कुठल्याही शिक्षकाचे नसतील!
मेनन काही काळ ‘सेल्वयन अॅण्ड ब्लाउंट’, ‘जॉन लेन : द बॉडली हेड’ व नंतर जॉन लेनने काढलेल्या ‘पेलिकन’ या प्रसिद्ध प्रकाशनाचे संपादक राहिले. जॉर्ज बर्नार्ड शॉच

ला. डिफेन्स रिसर्च अॅण्ड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (डीआरडीओ) व बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन या संस्था त्यांनी स्थापन केल्या. सर्वोच्च न्यायालयाच्या बाजूला मेनन यांनी स्थापलेल्या सोसायटी ऑफ इंटरनॅशनल लॉ या संस्थेच्या इमारतीचे नाव राष्ट्रपती आर. के. नारायण यांनी ‘कृष्ण मेनन भवन’ असे ठेवले हे समजल्यावर त्याचा खेद वाटू नये, अशा प्रकारे लेखकाने हे चरित्र लिहिले आहे. ‘मी निर्णय देत नाही, तर केवळ वस्तुस्थिती सांगतो आहे,’ असे लेखकाने सुरुवातीलाच म्हटले आहे. पण ते पूर्ण खरे नाही. पुस्तकाची मोठी उणीव म्हणजे पुस्तकाची लांबी आहे. त्यामुळे मेनन यांचे व्यक्तिमत्त्व ठसठशीत उभे राहात नाही. काही ठिकाणी हे पुस्तक म्हणजे केवळ पत्रांना जोडणारा मजकूर आहे असे वाटते.
े ‘इंटलिजंट वुमन्स गाइड टु सोश्ॉलिझम अॅण्ड कॅपिटॅलिझम’, सर जेम्स जीन्स यांचे ‘द मिस्टेरियस युनिव्हर्स’ अशी भारदस्त पुस्तके त्यांनी पहिल्याच वर्षांत प्रकाशित केली. पण नंतर आपल्या अनेक उद्योगांतून यासाठी वेळ देणे मेनन यांना जमेना. याची परिणती जॉन व मेनन यांनी परस्परांपासून फारकत घेण्यात झाली. पण त्याआधी पं. नेहरूंच्या आत्मचरित्राचे प्रकाशन व वितरण त्यांनी घडवून आणले. गांधीजींनाही त्यांनी अहिंसेवर पुस्तक लिहून द्या, अशी विनंती करून पाहिली. जॉन लेनने नंतर म्हटले, ‘‘जनतेसाठी कुठली पुस्तके काढावीत, याचे मेनन यांना भान होते. दर्जेदार व स्वस्त पुस्तके. त्यांच्याकडे असलेल्या उत्साहाचा माझ्यावरही परिणाम झाला. माझे सामाजिक भान त्यांच्यामुळे जागे झाले.’’
१९३४ साली मजूर पक्षाचे ते ग्रेटर लंडनमधल्या वॉर्ड क्रमांक चारचे कौन्सिलर म्हणून निवडून आले. हे पद तीन वर्षांसाठी होते; पण ते १४ वर्षे त्या पदावर राहिले. त्या भागात पब्स् मोठय़ा संख्येने होते. अशा ठिकाणी मेनन यांनी फिरत्या वाचनालयांची सोय मोठय़ा प्रमाणावर करून दिली. दुसऱ्या महायुद्धात हवाई हल्ल्याची सूचना देणारा वॉर्डन म्हणूनही त्यांनी काम केले. लंडनच्या समाजजीवनातला कुठलाही स्तर त्यांना अपरिचित नव्हता. १९४६ साली सेंट पॅनक्रास आर्ट्स अॅण्ड सिव्हिक कौन्सिलचे ते पहिले अध्यक्ष झाले. मेनन यशाच्या शिखरावर असताना १९५५ साली त्यांना या कौन्सिलने गौरवले. याआधी हा सन्मान फक्त जॉर्ज बर्नार्ड शॉला लाभला होता!
‘इंडिया लीग’मध्ये काम करणारे सारे जण विनावेतन काम करत. त्यातही स्त्रियांची संख्या जास्त असे. मेनन यांच्या प्रभावाखाली येऊन त्या सहयोग देत. ‘एक पुरुष आणि अनेक स्त्रियांची ही सेना होती,’ असे लेखकाने त्याचे वर्णन केले आहे! १९३५ साली पं. नेहरू लंडनला आले असताना त्यांच्याशी मेनन यांची पहिली भेट झाली. व्हिक्टोरिया स्थानकावर नेहरूंच्या स्वागतासाठी भारतीयांच्या बरोबरीने बट्र्रान्ड रसेल यांच्यासारखी दिग्गज मंडळीही उपस्थित होती. नेहरूंच्या दहा दिवसांच्या भेटीचे सारे आयोजन मेनन यांनी केले होते. लंडनच्या भेटीत कुठल्याही ब्रिटिश माणसापेक्षा नेहरूंवर अधिक प्रभाव मेनन यांचाच पडला. तेव्हापासून सुरू झालेली या दोघांची मैत्री भारताच्या नंतरच्या वाटचालीत महत्त्वाची ठरली. नेहरूंनी त्यांना जागतिक प्रसिद्धी मिळवून दिली. काँग्रेससाठी व नंतर स्वतंत्र भारताच्या सरकारसाठी ‘लंडन म्हणजे मेनन व मेनन म्हणजे लंडन’ असे समीकरण बनले. साहजिकच स्वातंत्र्यानंतर ते भारताचे इंग्लंडमधले राजदूत झाले. मेनन त्यांच्या इंग्लंडमधल्या कामाशी मानसिकदृष्टय़ा इतके बांधले गेले, की नंतर त्यांना तिथून हलवणे नेहरूंना अवघड होऊन बसले. त्यांच्या तिथल्या एकतंत्री कारभाराचे रंजक किस्से खुशवंतसिंग यांनी आत्मचरित्रात दिले आहेत. नेहरूंच्या पुढे अनेक अडचणी मेनन यांनी उभ्या केल्या, आत्महत्येची धमकी देऊन आपली बदली ते टाळत राहिले. सी. डी. देशमुखांना नेहरू म्हणाले, ‘‘या माणसाच्या बुद्धिमत्तेबद्दल क्रिप्ससारख्यांना आदर आहे. त्याच्या प्रामाणिकपणाबद्दल शंका नाही, पण हा माणूस हट्टी आहे. स्वत:चे घोडे पुढे दामटवणारा आहे. याच्याबरोबर काम करणे अवघड आहे.’’ नेहरूंनी त्यांना लिहिले, ‘तुम्ही एखाद्या हुकूमशहाप्रमाणे तिथला कारभार चालवणार व मीही इथे हुकूमशहाप्रमाणे कारभार करावा अशी तुमची अपेक्षा असेल तर ते शक्य नाही. मी केवळ घटनांना दिशा देऊ शकतो व मला लोकांनाही बरोबर न्यायचे आहे..’ अखेर मेनन यांची उचलबांगडी झाली. त्यानंतर राजदूत म्हणून आलेल्या विजयालक्ष्मी पंडितांनाही मेनन यांचा प्रभाव जाणवत राहिला. त्याबद्दल त्यांनी नेहरूंकडे तक्रार केली असता, ते म्हणाले- ‘‘मला कृष्णाच्या बुद्धिमत्तेबद्दल आदर आहे, पण मी त्यात वाहून जात नाही.’’ विजयालक्ष्मी पंडितांच्या संयुक्त राष्ट्रांतील शिष्टमंडळात मेनन होते; पण आपलाच हेका चालवण्याच्या वृत्तीमुळे ते कोणालाही नकोसे वाटत. ‘एखाद्या वात्रट मुलाला लोकांनी आपल्यावर प्रेम करावे असे वाटत असते; पण तो ते करू देत नाही, तसे मेनन यांचे आहे,’ असे विजयालक्ष्मी पंडितांनी म्हटले.
मेनन यांच्या जिभेचे फटके अनेकांना बसले. अल्जेरिया ही फ्रेंचांची वसाहत होती. फ्रेंच शिष्टमंडळाने त्यांना म्हटले, ‘‘अल्जेरियन हे फ्रेंच आहेत.’’ त्यावर मेनन म्हणाले, ‘‘ब्रिटिशांनी आमच्यावर राज्य केले, कमी दर्जाचे लेखले; पण आम्हाला कधी त्यांनी इंग्लिशमन असे म्हणून हिणवले नाही.’’ न्यू यॉर्कमध्ये मेनन यांच्या भाषणानंतर एका स्त्री पत्रकाराने त्यांच्या कोरियन प्रश्नावरच्या भूमिकेबद्दल प्रतिक्रिया देताना काही शेरा मारला. त्यावर मेनन म्हणाले, ‘‘मॅडम, तुमच्याजवळ जी देणगी आहे ती माझ्याकडे नाही. ती म्हणजे अज्ञान.’’ राजदूत असताना त्यांनी सरदार पटेल यांच्या गृहखात्याच्या कारभारावर काही भाष्य केले, ज्याबद्दल त्यांना नंतर माफी मागावी लागली.
‘मेनन कम्युनिस्ट असल्याची प्रतिमा पाश्चात्त्य

राष्ट्रांच्या मनात पक्की बसली होती. हा समज भारतातही होता. मेनन कम्युनिस्ट नव्हते, पण कम्युनिस्ट कायम मेनन यांच्या बाजूने होते,’असे लेखकाने लिहिले आहे. जागतिक रंगमंचावर कोरियन शस्त्रसंधी, सुएझ कालव्याचा प्रश्न हे दोन मोठे प्रश्न हाताळण्यात मेनन यांचे योगदान मोलाचे होते. गोव्याचा प्रश्न सेनादलाच्या मदतीने त्यांनी सोडवला. मात्र त्यामुळे ते पाश्चात्त्य देशांच्या काळ्या यादीतच गेले. काश्मीर प्रश्नावर भारताची बाजू मांडताना त्यांचे संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा मंडळापुढचे भाषण दोन दिवस लांबले. या भाषणादरम्यान ब्रिटिश शिष्टमंडळाचे सर पिअर्सन डिक्सन मेनन यांच्या इंग्रजीवर शेरेबाजी करीत होते. शेवटी मेनन त्यांच्याकडे वळले व म्हणाले, ‘‘मी जे बोलतो आहे ते समजण्यामध्ये होत असलेली तुमची अडचण मी समजू शकतो. कारण तुम्ही इंग्रजी लंडनच्या रस्त्यांवर शिकला आहात. ती भाषा काळजीपूर्वक शिकण्यासाठी जीवनातला काही काळ मी दिला आहे आणि मला वाटते या सन्मानाला ती पात्र आहे.’’ त्यानंतर सभागृहात खसखस पिकली व डिक्सन शांत बसले. पाकिस्तानचे प्रतिनिधी सर फिरोजखान नून हे सतत काश्मीरमध्ये सार्वमत घेण्याची मागणी करत होते. त्यावर मेनन म्हणाले, ‘‘प्रथम या गृहस्थांना विचारा, त्यांच्या देशातल्या जनतेने कधी मतपेटी पाहिली आहे काय?’’ आठ तास केलेल्या भाषणाचा सुरक्षा मंडळावर परिणाम शून्य झाला, पण भारतात मात्र ते एकदम हिरो ठरले!
मेनन यांच्या अशा कलेकलेने वाढणाऱ्या कर्तृत्वाच्या चंद्राला अखेर चीनचे ग्रहण लागले. लेखकाने या प्रकरणातली वस्तुस्थिती मांडताना मेनन यांना दोषमुक्त केलेले नाही; पण पंतप्रधान ते सेनाधिकारी ते अर्थमंत्रालयापर्यंत प्रत्येकाचे माप त्याच्या त्याच्या पदरात घातले आहे. ते वाचून १९६२च्या पराभवाचे शिल्पकार एकटे कृष्ण मेनन नव्हते हे लक्षात येते. ‘युद्धरहित जग’ या कल्पनेचा संयुक्त राष्ट्रांसारख्या जागतिक संस्थांच्या पातळीवर सतत पाठपुरावा करणाऱ्या व्यक्तीला देशाचा संरक्षणमंत्री बनवणे कितपत सयुक्तिक होते, हे सांगणे अवघड आहे. १९५७ साली संरक्षणमंत्री झाल्यावरदेखील मेनन वर्षांतले चार-चार महिने न्यू यॉर्कमधल्या संयुक्त राष्ट्रांच्या कामात व्यतीत करत असत. चीनच्या कुरापती सुरू झाल्यावरही त्यांना परत बोलावण्यासाठी पंतप्रधानांना सारख्या विनंत्या कराव्या लागल्या. यासंबंधीचीही पत्रे पुस्तकात आहेत. लेखकाने त्या वेळी अर्थमंत्री असलेल्या मोरारजी देसाई यांनी संरक्षण खात्यासाठी पैसे न दिल्याची तक्रार केली आहे; जी खरी आहे. पण या रकमेसाठी मेनन यांनी किती पाठपुरावा केला, हादेखील संशोधनाचा विषय आहे. मेनन यांना त्या वेळचे सेनापती थिमैय्या, थोरात यांच्याविषयी आकस होता हे स्पष्टच होते. हे सारे अधिकारी ब्रिटिश संस्कारात वाढले होते. या लष्करी अधिकाऱ्यांनाही आपले विचार व्यक्त करण्यासाठी पंतप्रधान व संरक्षणमंत्री यांच्यापेक्षा ब्रिटिश राजदूत जवळचा वाटावा, हे धक्कादायक होते. हे देशद्रोहाच्या जवळ जाणारे होते. तर भारताचे नंतर लाडके ठरलेले सेनापती सॅम माणेकशा यांनी आपल्या कचेरीत क्लाइव्ह व हेस्टिंग्सचे फोटो लावले होते, ही लेखकाने दिलेली माहिती कुणालाही अस्वस्थ करणारी आहे. अर्थात मेनन यांनी पक्षपात करून सेनादलाच्या नेतृत्वात अविश्वासाचे वातावरण निर्माण केले होते. जनरल थोरातांनी चीन नेफामध्ये कशा प्रकारे आक्रमण करू शकतो, याबद्दल लिहिलेले पत्र मेनन यांनी दाबून ठेवले. हेही सारे अक्षम्य गुन्हे होते. चीनबरोबरचा पराभव संपूर्ण राष्ट्राचाच पराभव होता.
चीनबरोबरचा सीमाप्रश्न हा वाटाघाटीतून सोडवावा लागेल, या निष्कर्षांवर मेनन सर्वाच्या आधीच आले होते. जनरल थिमैय्या यांचेही मत वेगळे नव्हते. ‘‘जमिनीचा एकही इंच देणार नाही,’’ अशी भाषणे संसदेत करणारे त्या वेळचे तरुण खासदार पंतप्रधान झाल्यावर चीनला भेट देतात आणि सीमाप्रश्न वाटाघाटीने सोडवण्याचा करार करतात, यातच या प्रश्नाचे उत्तर आले आहे! त्या वेळी हा प्रश्न सोडवण्यात नेहरूंचे राजकीय धैर्य कमी पडले; कारण त्यांच्या मंत्रिमंडळातही यास विरोध होता. महावीर त्यागींची नेहरूंबरोबर झालेली चकमक प्रसिद्धच आहे. अशा वातावरणातही मेनन यांना त्यांनी सांभाळून घेणे अनाकलनीय ठरते. शेवटी मेनन जाणार नसतील तर तुमचाही आम्हाला विचार करावा लागेल, असा इशारा पंतप्रधान नेहरूंना दिला गेला. असे सध्या कोण करू शकेल?
लेखकाने मेनन यांचे दोष मांडताना हात आखडता घेतलेला नाही. मेनन यांच्या गरजा थोडय़ा होत्या. एका खोलीत ते राहात व केवळ एक रुपया पगार घेत. बऱ्याचदा कॉफी व बन खाऊन राहात. आजारी पडत. त्याचबरोबर मेनन अहंकारी होते, भावनाप्रधान होते. त्यांना माणसांची पारख नव्हती. माणसांना दुखावण्यात त्यांचा हात कुणी धरणे अवघड होते. त्याचबरोबर ‘मेक इन इंडिया’च्या घोषणा करायच्या व रेडिमेड विमाने पाश्चात्त्यांकडून लिंबू फोडून आणायची, असल्या दिखाऊपणापेक्षा मिग-२१ भारतात बनवण्याचा करार रशियाबरोबर त्यांनी के

आपले आधुनिक भारताचा इतिहास हे पुस्तक आजपासून फ्लिपकार्ट व अमेझॉन वर उपलब्ध होत आहे. तिथे आतापर्यंत जुनेच पुस्तक दाखवत होते या विद्यार्थ्यांच्या तक्रारीची दखल घेऊन त्या साईट्स अपडेट केल्या आहेत. फ्लिपकार्ट वर रेडी आहे. अमेझॉन साईट दुपारपर्यंत अपडेट होईल. ज्या विद्यार्थ्यांना पुस्तक अद्याप पर्यंत उपलब्ध झाले नसल्यास त्यांनी नक्कीच याचा लाभ घ्यावा
🎯संघ –
📌 महावीर व बुद्ध दोघांचे म्हणणे होते की खर्या ज्ञांनाची प्राप्ती करण्यासाठी घर सोडावे लागते. अशा घरांचा त्याग केलेल्या लोकांसाठी त्यांनी संघाची स्थापना केली.
📌 संघात राहणार्या बौद्ध भिक्षुंसाठी बनवलेले नियम विनयपिटक या ग्रंथात आहेत. त्यातील नियमांनुसार संघात राहणार्या पुरुष व स्रियाची वेगवेगळी व्यवस्था होती. सर्व व्यक्ति संघात प्रवेश करू शकत असत.
📌 सुरुवातीच्या काळात संघात फक्त पुरुषच प्रवेश करू शकत असत. बौद्ध ग्रंथानुसार बुद्धांचे शिष्य आनंद यांच्या सांगण्यावरून महिलांना देखील प्रवेश देण्यास सुरुवात झाली. बुदधांची उपमाता महाप्रजापति गौतमी संघात येणारी पहिली बौद्ध भिक्खुणी होती. यशोधरा, नंदा, क्षेमा, आम्रपाली, विशाखा या अजून काही स्रिया होत्या ज्या संघात आल्या. संघात आलेल्या अनेक स्रिया नंतर उपदेशक बनल्या. पुढे जाऊन त्या ‘थेरी’ बनल्या ज्यांचा अर्थ अशा महिला ज्यांनी निर्वाण प्राप्त केले आहे.