History Samadhan Mahajan
10.2K subscribers
609 photos
10 videos
131 files
299 links
इतिहासाचा टेलिग्राम ग्रुप
(Add ur friends)
https://t.me/historysamadhanmahajan

@SRMAHAJAN
Download Telegram
अहिंसेवर आणि प्राणीमात्राच्या पावित्र्यावर भर देवून बौद्ध धर्माने भारतातील गोधनात वाढ केली. सुत्तनिपातसारख्या बौद्ध धर्मातील संहितांनी “अन्न देणारी, सौंदर्य (रूप) देणारी आणि सुख देणारी” असे गाईचे वर्णन केले आहे व त्यामुळे गाईचे संरक्षण केले पाहिजे असे आवाहण केले आहे. ज्या काळात आर्येतर अन्नासाठी प्राण्यांना ठार मारीत असत आणि आर्य धर्माच्या नावाखाली गाई,पशू मारत असत, अशा ऐन मोक्याच्या वेळी बौद्ध धर्माने अहिंसेची शिकवण दिली. ब्राम्हणवादाने गाईचे पावित्र्य आणि अहिंसेचे उपदेश यावर दिलेला भर बौद्ध धर्माच्या शिकवणुकीतून घेतलेला असावा.

- प्राचीन भारत
(आर.एस.शर्मा)
कोल्हापूर संस्थानात शाहूकालात,

१८९४ सालची ब्राह्मणेत्तर विद्यार्थी संख्या ८,०८८ होती ती १९२१-२२ साली २१,०२७ इतकी झाली.

तर अस्पृश्य विद्यार्थी संख्या १८९४ साली २३४ इतकी होती ती १९२१-२२ साली २,१६२ इतकी झाली.

तर १८९४ साली ब्राह्मण विद्यार्थी संख्या होती २५२२ ती १९२२ साली २७२२ इतकी झाली.

संदर्भ : कोल्हापूर आणि एस.एम.सी. संस्थानाचा शिरगणती अहवाल १८९१-१९२१
बुद्धीच्या देशा…
‘तर्कवाद जागा करणारं देशातलं पहिलं राज्य’ ही महाराष्ट्राची खरी आणि अभिमानास्पद ओळख.( महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेला येत्या 1 मे 2020 रोजी 60 वर्ष पूर्ण होत आहेत त्या निमित्ताने)
गिरीश कुबेर | April 26, (लोकसत्ता)

(अनेक बुद्धिप्रामाण्यवादी आणि सुधारणावादी चळवळकर्त्यांची, विचारवंतांची महाराष्ट्र ही जन्मभूमी. देशातील अनेक पहिलेपणाच्या गोष्टी या भूमीत आकारास आल्या आणि मग त्या देशभरात पोहोचल्या)

‘तर्कवाद जागा करणारं देशातलं पहिलं राज्य’ ही महाराष्ट्राची खरी आणि अभिमानास्पद ओळख. अनेक बुद्धिप्रामाण्यवादी आणि सुधारणावादी चळवळकर्त्यांची, विचारवंतांची ही जन्मभूमी. देशातील अनेक पहिलेपणाच्या गोष्टी या भूमीत आकारास आल्या आणि मग त्या देशभरात पोहोचल्या. असं असताना आज महाराष्ट्रात तर्कवाद, वैचारिक अधिष्ठान यांचं वावडं का दिसत आहे? आपला समृद्ध वैचारिकतेचा, सुधारणेचा वारसा का लोप पावला? याचा आपण सर्वानीच अंतर्मुख होऊन विचार करायला हवा.

राम गणेश गडकरी तथा ‘गोविंदाग्रज’ यांची वाङ्मयसंपदा कालातीत आहे. पण तरी त्यांनी ते ‘मंगल देशा, पवित्र देशा..’ हे ‘श्रीमहाराष्ट्रदेश गीत’ लिहिलं नसतं तर बरं झालं असतं का?

एक तर मराठी माणसाला बंगाल्यांसारखी संपूर्ण कविता पाठ नसते. आणि त्यामुळे गोविंदाग्रजांच्या कवितेतलं ‘राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा’ इतकीच आणि इतक्यापुरतीच या कवितेची अनेकांना ओळख. आणि मग ते ‘राकट देशा’ मिरवणं वगैरे नेहमीचंच. तसा मराठी माणूस गोविंदाग्रजांना खरं ठरवण्याची एकही संधी वाया घालवत नाही. अगदीच कोणी कविताप्रेमी किंवा तत्सम असला तर त्याला पुढची फार फार तर ‘नाजूक देशा, कोमल देशा, फुलांच्याही देशा’ ही ओळ माहीत असते. या सगळ्यापलीकडे महाराष्ट्राची खरी ओळख आपण पूर्ण विसरून गेलो आहोत. हे आकारानं भव्य राज्य आपला साठावा वर्धापनदिन साजरा करत असताना या ओळखीशी नव्यानं ओळख करून घ्यायला हवी.

पारतंत्र्यात गाढ विसावलेल्या भारतात ‘तर्कवाद जागा करणारं देशातलं पहिलं राज्य’ ही महाराष्ट्राची खरी आणि अभिमानास्पद ओळख.

पेशवाईची अखेर होऊन शनिवारवाडय़ावर युनियन जॅक फडकायच्या आधी पाच र्वष युनायटेड किंगडमच्या- म्हणजे इंग्लंडच्या पार्लमेंटने १८१३ साली ‘द ईस्ट इंडिया कंपनी अ‍ॅक्ट’ मंजूर केला. १८१३ चा चार्टर अ‍ॅक्ट म्हणून ओळखला जातो तो हा कायदा. त्यानुसार भारतीयांना आधुनिक शिक्षणासाठी उद्युक्त करण्याचा आदेश ईस्ट इंडिया कंपनीला दिला गेला. त्यासाठी वर्षांला एक लाख रुपयांची तरतूद राणीच्या सरकारनं केली. हे आश्चर्यकारक होतं. कारण त्यावेळपर्यंत भारतात स्थिरावलेले ब्रिटिश अधिकारी नेटिव्हांना अधिकाधिक पारंपरिक शिक्षणच कसं दिलं जाईल याचा विचार करत होते. अशा वेळी या आधुनिक शिक्षणाचा आग्रह ब्रिटिश पार्लमेंटनं धरला.

तो उचलून धरणारी पहिली व्यक्ती अर्थातच राजा राममोहन रॉय. हे नाव सगळ्यांना माहीत असतं. सतीची चाल बंद व्हावी यासाठी प्रयत्न करणारे वगैरे म्हणूनही आपल्याकडे या नावाचा दबदबा फार. त्या पहिलेपणाचा मान त्यांना द्यायलाच हवा. पण तरीही एक गोष्ट विसरून चालणार नाही, ती म्हणजे रॉय आणि त्यांच्यानंतरचे बहुतांशी बंगाली सुधारक हे धर्मकेंद्री वा धर्मवादी होते. त्यामुळे रॉय यांची बंगाली परंपरा ही धर्माच्या अंगानेच गेली.

पण महाराष्ट्राचं (सुदैवाने) तसं झालं नाही. यात आदरानं घ्यायला हवं असं नाव म्हणजे बाळशास्त्री जांभेकर (१८१२-१८४६). ‘दर्पण’ या नियतकालिकाचे संपादक आणि मराठी पत्रकारितेचे अध्वर्यु या नात्याने ते अनेकांना माहीत असतात तसे. पण ‘दर्पण’ हे त्यांच्या आयुष्यातलं सगळ्यात कमी महत्त्वाचं काम. बाळशास्त्री हे त्यापेक्षा कितीतरी मोठे होते. गणित, खगोलशास्त्र, भौतिकशास्त्र ही शुद्ध विज्ञानाची अनेक अंगं आणि ती समजावून सांगण्यासाठी ग्रीक, लॅटिन, फ्रें च, अरेबिक, फारसी, बंगाली, गुजराती, कन्नड आणि अर्थातच इंग्रजी इतक्या भाषांत पारंगत असा हा विद्वान एलफिन्स्टन महाविद्यालयात सहप्राध्यापक होता. ब्रिटिशांना त्यांच्या देशाचा इतिहास, इंग्रजी व्याकरण सुबोधपणे सांगणाऱ्या ग्रंथाचे लेखक बाळशास्त्री आणि गणित व शून्य यांचे महत्त्व सांगणाऱ्या पुस्तकाचेही लेखक तेच. इतकी चतुरस्र विद्वत्ता त्यांच्या ठायी होती. अनेक संस्थांची उभारणी त्यांनी केली. विचारशक्ती दीपवणाऱ्या त्यांच्या बौद्धिकांचा आनंद घेण्यासाठी आणि त्यातून नवीन काही समजून घेण्यासाठी शास्त्रीबोवांना ऐकण्यास अनेक मान्यवर नियमितपणे येत. त्यातील दोन नावं अनेकांना परिचयाची असतील. दादाभाई नवरोजी आणि भाऊ दाजी लाड. पण केवळ हेच काही बाळशास्त्रींचं मोठेपण नाही. इंग्रजी शिक्षणाचं कवतिक आणि समर्थन करतानाच ब्रिटिशांच्या करपद्धतीविरोधात, तसंच त्यांच्याकडून होत असलेल्या भारताच्या आर्थिक पिळवणुकीविरोधात शास्त्रशुद्ध मांडणी करणारा हा देशातला पहिला अभ्यासक.

पुढे महात्मा फुले, न्या. महादेव गोविंद रानडे, गोपाळ गणेश आगरकर, पंडिता रमाब
ाई अशा एकापेक्षा एक तेज:पुंज महोदयांनी प्रशस्त केलेल्या समाजसुधारणेच्या मार्गाची मुहूर्तमेढ बाळशास्त्रींनी घातली. बालविवाहाविरोधात आणि विधवा-विवाहासाठी उठलेला हा पहिला मराठी आवाज. महाराष्ट्राने पुढे जो करकरीत बुद्धिवाद देशाला दिला आणि ज्या मुद्दय़ावर बंगाल आणि महाराष्ट्र यांची फारकत झाली, त्या तर्कवादाचे अर्वाचीन काळातील प्रवर्तक म्हणजे बाळशास्त्री जांभेकर. अवघ्या ३४ व्या वर्षी १८४६ साली ते निवर्तले.

पुढे त्यांनी दाखवून दिलेल्या बुद्धिवादाच्या मार्गाचे अनेक पथिक महाराष्ट्राला सुदैवाने लाभले. त्यांच्याच हयातीत उदयास येत असलेले भास्कर पांडुरंग तर्खडकर (१८१६-१८४७), त्यांचे ज्येष्ठ बंधू दादोबा पांडुरंग (१८४२-१८८२), त्याच तर्खडकरी माळेतले आत्माराम पांडुरंग (१८२३-१८९८), ‘लोकहितवादी’ नावाने ओळखले जाणारे गोपाळ हरी देशमुख (१८२३-१८८२) अशी किती नावं सांगावीत? यातील प्रत्येकाचं कार्य इतकं मोठं आहे, की त्यावर स्वतंत्र लेख नव्हे, तर पुस्तक लिहिता येईल. यातले आत्माराम पांडुरंग प्रार्थना समाजाच्या स्थापनेत होते. आणि त्यावेळी त्यांनी वैद्यकीतले सहविद्यार्थी भाऊ दाजी लाड यांच्या साह्य़ानं मुंबईत देवीच्या आजाराविरोधात लसीकरण कार्यक्रम आयोजित केला होता. इतकंच नाही तर १८६८ साली अस्तित्वात आलेल्या ‘कंटेजियस अ‍ॅक्ट’ (साथीचे रोगप्रतिबंधक कायदा) मध्ये नोंदल्या गेलेल्या १४ व्या कलमाचं लेखन त्यांनी केलं होतं. हे तिघेही तर्खडकर बंधू हे हिंदू धर्मातल्या मागास प्रथांचे तितकेच कडवे टीकाकार होते. संमतीवयाचं प्रकरण खरं तर दूर होतं, पण त्यावेळी आत्माराम पांडुरंगांनी मुलींसाठी विवाहाचं वय २० असावं अशी मागणी करून भलतीच खळबळ उडवून दिली होती. हे असे तर्खडकर! आणि ‘ब्राह्मण म्हणवून घेणाऱ्यांमधील अज्ञान हा सर्वात मोठा शाप’ असं कडकपणे मांडत, शेषशायी नागावर झोपणारा विष्णू, चंद्राला गिळंकृत करणारे राहू-केतू या ‘हिंदू ज्ञाना’ची यथेच्छ रेवडी उडवणारा बुद्धिवाद वयाच्या अवघ्या पंचविशीत दाखवणारे ‘शतपत्रे’कार गोपाळ हरी देशमुख ही महाराष्ट्राची परंपरा आहे.

ती अधिक सुदृढ आणि अधिक उंचीवर नेली जोतिबा-सावित्रीबाई फुले यांनी. वरील सर्व जण धर्मातील उणिवा दाखवत सुधारणा सुचवीत होते. पण महात्मा जोतिबा फुले (१८२७-१८९०) यांनी त्याहून पुढे जात धर्म-संकल्पनांत आमूलाग्र बदल सुचवला आणि ‘जात’ ही संकल्पनाच मोडीत काढण्याचा आग्रह धरला. खरं तर महिला सुधारणा, सती-प्रथाविरोध वगैरे मुद्दे राजा राममोहन रॉय यांनी कितीतरी आधी उपस्थित केले होते. पण तरी महिला शिक्षणाची आणि स्त्रियांच्या एकूणच पुनरुत्थानाची पहिली हाळी आणि त्याप्रमाणे कृती ही फुले पती-पत्नींनी केली. ख्रिश्चन मिशनऱ्यांची संस्था पाहिल्यावर महिलांसाठी आपणही असे भरीव काही करावे असे वयाच्या अवघ्या विशीत वाटणारे आणि जे वाटले ते आचरणात आणणारे फुले ही महाराष्ट्राची खरी परंपरा. स्त्रीशिक्षणाची परंपरा त्यांच्यामुळे- कलकत्त्यात नव्हे- पुण्यात सुरू झाली, हीदेखील महाराष्ट्राच्या साठीत आठवावी अशी बाब.

हे असं बरंच काही सुरू असताना जॉन विल्सन नामक एका स्कॉटिश ख्रिश्चन मिशनऱ्यानं मुंबईत आणखी एक मोठी शिक्षणसंस्था काढायचा घाट घातला. ती संस्था म्हणजे मुंबई विद्यापीठ. विल्सन महाविद्यालय ही या जॉनचीच निर्मिती. मुंबई विद्यापीठाच्या जन्मामुळे बुद्धिवंतांच्या निर्मितीला काहीएक शिस्त आली. अंधारलेल्या वातावरणात एकामागोमाग एक तारे-तारका उमलत जाऊन आकाशाच्या अंगणात चांदण्यांचा खच पडावा तसा महाराष्ट्र त्यावेळी होत होता. मुंबई विद्यापीठामुळे त्याला एक संस्थात्मक आकार आणि अर्थ मिळाला. विद्यापीठाचा जन्म १८५७ चा. भारतीयांच्या मनात पारतंत्र्याची जोखडं उलथून टाकण्याचा अंगार फुलू लागत असतानाच बौद्धिक स्वातंत्र्याचीही पहाट त्याचवेळी उगवावी, हा खचितच मोठा योग. त्यानंतर या मराठी मातीनं जे काही भरघोस असं बुद्धिवंतांचं पीक अनुभवलं, त्याची तुलना १५ व्या शतकातल्या युरोपीय रेनेसाँशीच काही अंशी होऊ शकेल. त्यातल्या फक्त नावांवर जरी नजर टाकली तरी आजही छाती दडपेल.

विष्णु परशुराम शास्त्री (१८२७-१८७६), रामकृष्ण गोपाळ भांडारकर (१८३७-१९२५), नारायण महादेव परमानंद (१८३८-१८९३), महादेव गोविंद रानडे (१८४२-१९०१), विष्णुशास्त्री चिपळूणकर (१८५०-१८८२), काशिनाथ त्र्यंबक तेलंग (१८५०-१८९३), गणेश वासुदेव जोशी (१८५१-१९११), नारायण गणेश चंदावरकर (१८५५-१९२३), गोपाळ गणेश आगरकर (१८५६-१८९५), पंडिता रमाबाई (१८५८-१९२२), धोंडो केशव कर्वे (१८५८-१९६२), रखमाबाई अर्जुन (१८६४-१९५५), गोपाळ कृष्ण गोखले (१८६६-१९१५), बाळ गंगाधर टिळक (१८५६-१९२०).. असे शब्दश: अनेक. आणि या सर्व प्रज्ञावानांच्या मालिकेचे मेरुमणी डॉ. भीमराव रावजी आंबेडकर (१८९१-१९५६). या सर्व व्यक्ती आणि त्यांच्या कार्याचा परिचय काहीएक किमान बहुश्रुत मराठीजनांना असतोच असतो. पण यांच्याखेरीज असे अनेक आहेत की त्यांची पुरेशी ओळख मराठीजनांना राज्याच्या साठीतही न
ाही.

टिळक-आगरकर देदीप्यमान असताना वयाच्या चोविशीत ‘किरण’ हे अर्थविषयक नियतकालिक काढणारे, रुसो-टर्की युद्धावर त्यावेळी स्तंभलेखन करणारे महादेव नामजोशी, अमेरिकेतील राईट बंधूंप्रमाणे विमानोड्डाणाचा प्रयत्न करणारे शिवकर बापूजी तळपदे, बॉलीवूडचे जनक धुंडिराज ऊर्फ दादासाहेब फाळके, देशात सर्कस ही कल्पना प्रत्यक्षात आणणारे विष्णुपंत छत्रे, सौर्यमालेचा अभ्यास करणारे गणिती केरो लक्ष्मण ऊर्फ केरोनाना छत्रे, ‘भारतीय एडिसन’ असं ज्यांचं वर्णन केलं जातं आणि ज्यांच्या नावावर २०० हून अधिक शोध आहेत असे डॉ. शंकर आबाजी भिसे अशी अनेक तेजस्वी मराठीजनांची नावे सांगता येतील.

ही माती अशी आहे की कडव्या उजव्या विचारांनाही तिनं आसरा दिला आणि रॉयिस्ट म्हणून गणल्या जाणाऱ्या डाव्या चळवळीचीही मशागत तिनं केली. ‘रॅडिकल ह्य़ुमॅनिझम’ या बंगाली बाबू मानवेंद्रनाथ रॉय यांच्या विख्यात विचारधारेचा जन्म पुण्यातला आहे. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, यशवंतराव चव्हाण, बॅरिस्टर व्ही. एम. तारकुंडे, गोवर्धन व इंदुमती पारीख, गोविंदराव तळवलकर, ह. रा. महाजनी हे अलीकडचे काही नामांकित रॉयिस्ट. संघ-संस्थापक आणि संघ-स्थापनाही महाराष्ट्रातली. आणि कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक श्रीपाद अमृत डांगे हेदेखील महाराष्ट्रातलेच. देशात राखीव जागांचा जन्म महाराष्ट्रातल्या कोल्हापुरात

राजर्षी शाहू महाराजांच्या दरबारात झाला. सार्वजनिक गणपतींसाठी लोकमान्यांचे नेहमीच कौतुक होतं. पण ‘हे गणपती उत्सवाचं सार्वजनिकीकरण उद्याचा उच्छाद ठरेल’ असं ठणकावून सांगणारे केशव सीताराम ऊर्फ प्रबोधनकार ठाकरे या मराठी मातीतलेच. (राजारामशास्त्री भागवत म्हणजे दुर्गाबाईंचे आजोबा. यांचाही टिळकांच्या गणपती सार्वजनिक करण्याला विरोध होता.) नारायण मेघाजी लोखंडे हे पहिल्या कामगार संघटनेचे संस्थापक याच राज्यातले.

हा सगळा इतिहास आठवायचा याचं कारण.. आपण कोण आहोत याची जाणीव आजच्या मराठी माणसाला व्हावी! एकेकाळी या देशाचं राजकीय आणि त्यानंतर बौद्धिक नेतृत्व महाराष्ट्राकडे होतं याचा विसर पडून आपल्याला चालणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज, थोरले बाजीराव, महात्मा फुले, लोकमान्य टिळक आणि डॉ. आंबेडकर हे त्या- त्या काळात महाराष्ट्रातून देश घडवत होते. ते असं करू शकले, कारण महाराष्ट्र हे देशातल्या तर्कवादाचं केंद्र होतं. बुद्धिगामी समाज ही या राज्याची देशाला देणगी.

साठाव्या वर्धापनदिनी आता कोणता निर्धार करायचा असेल, तर महाराष्ट्राला ते स्थान पुन्हा मिळवून देण्याचा असायला हवा. गोविंदाग्रजांच्या त्याच कवितेत ‘भावभक्तिच्या देशा.. आणिक बुद्धिच्या देशा’ अशीही एक ओळ आहे. भावभक्ती खूप झाली. आता ‘बुद्धिच्या देशा’ कसं होता येईल याचा विचार व्हायला हवा. ते ‘मोडेन, पण वाकणार नाही’ वगैरे आता पुरे.

येत्या १ मे रोजी महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेला ६० वर्षे पूर्ण होत आहेत. तशात आज आपण करोनाग्रस्ततेच्या भीषण संकटातून जात आहोत. राज्याचा हीरकमहोत्सव ‘साजरा’ करण्याची ही वेळ नसली तरी महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासाकडे विविध परिप्रेक्ष्यांतून दृष्टिक्षेप टाकणं गैर ठरणार नाही; ज्यातून आपल्याला भविष्यातील वाटचालीकरता खचितच ऊर्जा मिळू शकेल..

(हार्परकॉलिन्स प्रकाशनातर्फे लवकरच प्रकाशित होणाऱ्या पुस्तकाच्या आधारे..)
स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थी मित्रांना सध्या बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यात महत्वाचे म्हणजे पुस्तक अभ्यासिका किंवा पुण्यात अडकलीत त्यामुळे अभ्यासासाठी मटेरियल नाही. त्यांच्या साठी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने आजवर प्रकाशित केलेली सर्व 434 पुस्तके, त्यांच्या वेबसाईटवर eBook स्वरूपात मोफत उपलब्ध आहेत. यात सर्व विषयांची व अभ्यासक्रमानुसार पुस्तक नाहीत ती सर्व संदर्भ पुस्तके आहेत. पण त्यातील नक्कीच काही चांगली पुस्तके आहेत.
दुसरे महत्वाचे म्हणजे आयोगाचा एखादा प्रश्न चुकला की authentic source म्हणून तुम्ही या पुस्तकातील संदर्भ देऊ शकतात कारण ती शासनाच्या अधिकृत साईट वर अधिकृत पणे उपलब्ध आहेत. त्यामुळे की काय कॉपी राईट चे देखील उल्लंघन होत नाही.
434 पुस्तकांमध्ये बहुतेक सर्व वैचारिक पुस्तके अधिक आहेत. ललीतलेखनाचे असेलही एखादे...

साहित्य संस्कृती मंडळाने सर्व 434 पुस्तकं PDF सोबतच .epub या फॉरमॅट मध्येही उपलब्ध करून दिली आहेत. मोबाईलवर पुस्तके वाचायची तर epub हा एक पर्याय आहे.

त्यासाठी प्ले स्टोरवरून lithium app डाउनलोड करा. मोफत आहे. ही लिंक त्याची: https://play.google.com/store/apps/details?id=com.faultexception.reader

एकदा हे app डाउनलोड झाले की साहित्य संस्कृती मंडळाच्या वेबसाईटवर जा. ही त्याची शॉर्ट केलेली लिंक: https://bit.ly/3aADyWF

यावर एकावेळी 20 eBooks दिसतात. त्याखाली 2,3 अशी 23 पानं आहेत.

तर यावरून आपल्याला हव्या त्या पुस्तकांसमोरील .epub वर क्लिक केलं की पुस्तक डाउनलोड होतं
ते तुम्ही pdf मध्ये download करून देखील वाचू शकतात

- समाधान महाजन
इंडो-ग्रीकांचा इतिहास हा प्रामुख्याने त्यांच्या नाण्यांवरून समजतो. भारतीय-युनानी(इंडो-ग्रीक) हे पहिले शासक होते ज्यांच्या नाण्यांवर राजांचे नाव व चित्र होते. त्याआधीच्या भारतीय शासकांच्या नाण्यांवर राजांचे नाव व चित्र नव्हते. हे पहिले शासक होते ज्यांनी सोन्याची नाणे काढली. त्यांच्या नाण्यांवरील ठसे, मजकूर, राजांचे चित्र, देवतांचे चित्र या नवीन बाबी म्हणजे भारतीय नाणकपरंपरेला मिळालेली देणगी आहे. प्राचीन काळात भारतीयांनी ग्रीक नाण्यांचे अनुकरण केले कारण ग्रीकांची नाणी आकर्षक व निश्चित वजनाची होती तर भारतीय नाण्यांचे वजन व आकार अनिश्चित असे. तसेच भारतीय नाणी आहतमुद्रा(punch marked) पद्धतीची होती.
* कनिष्क (ईस.78 ते ईस.101) - कानिष्कने कुषान साम्राज्याचा विस्तार केला. कनिष्क हा कुषाण वंशाचा सर्वात लोकप्रिय व प्रतापी राजा होता. तो ईस. 78 मध्ये सिंहासनावर बसला. काही इतिहासकारांचे म्हणणे आहे की त्यानेच ‘शक संवंत’ सुरू केले. त्याने चीनवर दोनदा आक्रमण केल्याचे उल्लेख आढळतात. पुरुषपूर(पेशावर) आणि मथुरा या त्याच्या दोन राजधान्या होत्या.
* कनिष्क बौद्ध धर्माचा अनुयायी होता. कनिष्कच्या शासनकाळात काश्मीरमध्ये ‘कुंडलवन’ येथील विहारात चौथी बौद्धधर्मपरिषद आयोजित केली होती. कनिष्कच्या दरबारात पार्श्व, वसुमित्र, अश्वघोष, चरक व नागार्जुन सारखे विद्वान होते.
* कनिष्क नंतर वाशिष्क, हुविष्क, वासुदेव हे सत्तेवर आले. कुशांनांचा शेवटचा राजा वासुदेव होता. हे नाव देखील पूर्णत भारतीय होते. वासुदेव हे नाव वैष्णव असले तरी स्वतः राजा मात्र शैव होता. कुशांनांची सत्ता पंजाब आणि गांधार या प्रदेशात चौथ्या शतकापर्यंत अस्तीत्वात होती.
१ मे महाराष्ट्र दिनानिमित्तानं द युनिक फाउंडेशन आणि EPW यांच्या संयुक्त विद्यमाने EPW अंकातील संपादकीय लेखांच्या मराठी Translation Project ची सुरुवात झाली आहे. त्या अंतर्गत ७ मार्च रोजीच्या अंकातील तीन संपादकीय लेख वाचकांना उपलब्ध करून देत आहोत.

नक्की वाचा,
EPW अर्थात economic and political weekly
चे दर्जेदार इंग्रजी लेखांचे मराठी भाषांतर नक्की वाचा
'ईपीडब्ल्यू'तील संपादकीय आता 'द युनिक फाउंडेशन'मार्फत मराठीतून...🖋
-------------------------------------------------

मराठी भाषिक वाचकांना कळविण्यास आनंद होत आहे की, सामाजिक शास्त्रातील नावाजलेल्या 'Economic & Political Weekly' या साप्ताहिकामधील चिकित्सक आणि आशयघन अशा संपादकीय लेखांचे मराठी भाषेमध्ये अनुवाद करून तो जिज्ञासू वाचकांसाठी उपलब्ध करून देण्याचे काम 'द युनिक फाउंडेशन' ने हाती घेतले आहे.

याचा उपयोग पत्रकार, कार्येकर्ते, प्राध्यापक, संशोधक विध्यार्थी तसेच स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना होईल, अशी आशा आहे.

ईपीडब्ल्यू सोबतच्या 'द युनिक फाउंडेशन' च्या नव्या भूमिकेचे आपण स्वागत कराल, ही खात्री आहे....

'ईपीडब्ल्यू'तील संपादकीय PDF स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी आमच्या Telegram Channel join करा.
Follow us on :- F @ theuniquefoundationpune
* Bulletin of The Unique Academy

https://t.me/TheUniqueFoundation1

----------------------------------------------
संपादक (EPW) - प्रा. गोपाळ गुरू
प्रकल्प संपादक - तुकाराम जाधव l मुक्ता कुलकर्णी l विवेक घोटाळे
अनुवादक - मुक्ता कुलकर्णी l निर्भय जाधव l मनोज जगताप
"तथागत गौतम बुद्धांएवढा बुद्धिमान, प्रगल्भ, परिपूर्ण माणूस जगाने आजवर पाहिलेला नाही. बुद्धांच्या सामर्थ्याचा एक थेंब माझ्याकडे असता, तरी खूप झाले असते! एवढा थोर तत्त्वचिंतक कोणीच आजवर बघितला नाही. असा शिक्षक यापूर्वी कधी होऊन गेला नाही. काय सामर्थ्य होते पाहा. जुलमी ब्राह्मणांच्या सत्तेसमोरही हा माणूस वाकला नाही. उभा राहिला. तेवत राहिला…"

हे कोण म्हणतंय?
साक्षात स्वामी विवेकानंद.
हिंदुत्वाचा ध्वज जगभर घेऊन जाणारे विवेकानंद १९०० मध्ये तथागत गौतम बुद्धांविषयी कॅलिफोर्नियात बोलत होते.

भारताची जगभरातली खरी ओळख आजही 'बुद्धांचा देश' हीच आहे. भलेही त्यांचे जन्मगाव असणारे लुंबिनी आता नेपाळमध्ये असेल, पण बुद्ध आपले आणि आपण सारे बुद्धांचे.

'बुद्धांशी तुलना होईल, असा एकही माणूस नंतर जन्मलाच नाही', असे आचार्य रजनीशांनी म्हणावे!

बुद्ध थोर होतेच, पण बुद्धांची खरी थोरवी अशी की, आपण प्रेषित असल्याचा दावा त्यांनी कधी केला नाही. येशू, पैगंबर, कृष्ण यांच्याविषयी आदर स्वाभाविक आहे. पण, बुद्ध हे या इतरांप्रमाणे प्रेषित नव्हते. स्वतःला परमेश्वर मानत नव्हते. मला सगळं जगणं समजलंय, असा त्यांचा दावा नव्हता. मीच अंतिम आहे, असे बुद्ध कधीच म्हणाले नाहीत. डॉ. आ. ह. साळुंखे म्हणतात त्याप्रमाणे, "अन्य धर्मसंस्थापकांनी लोकांना कर्मकांडाची चाकोरी दिली. त्या चाकोरीने बांधून टाकले. तथागतांचा धम्म ही विचारांची चाकोरीबद्ध मांडणी नव्हती. चाकोरी तोडून मुक्त करणारा धर्म बुद्धांनी सांगितला."

'प्रत्येकामध्ये पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे पूर्णत्व दडलेले आहेच', असे विवेकानंद म्हणाले, तो प्रभाव बुद्धांचाच तर होता. तुम्ही सगळं जग ओळखलं, पण स्वतःला ओळखलं नाही. म्हणून तर स्वतःला शरण जा, असे तथागत म्हणाले. 'बुद्धं सरणं गच्छामि' म्हणजे अन्य काही नाही. स्वतःला शरण जा, हाच त्याचा अर्थ. "कोणी काही सांगेल, म्हणून विश्वास ठेऊ नका. उद्या मीही काही सांगेल. म्हणून ते अंतिम मानू नका. पिटकात एखादी गोष्ट आली आहे, म्हणून विश्वास ठेऊ नका", असं म्हणाले बुद्ध.

जगातला एक धर्म सांगा, एक धर्मसंस्थापक सांगा, की जो स्वतःची अशी स्वतःच चिरफाड करतो! चिकित्सेची तयारी दाखवतो!
'भक्त' वाढत चाललेले असताना, विखार ही मातृभाषा होत असताना आणि 'व्हाट्सॲप फॉरवर्ड' हेच ज्ञान झालेलं असताना बुद्धांचा हा दृष्टिकोन आणखी समकालीन महत्त्वाचा वाटू लागतो.
माणूस बदलतो, यावर बुद्ध विश्वास ठेवतात. कोणीही मानव बुद्ध होऊ शकतो, याची हमी देतात. मात्र, स्वतःला शरण जा, हीच पूर्वअट सांगतात.

ज्याला बुद्ध समजला, त्याला 'सो कॉल्ड सक्सेस'वरची गल्लाभरू पुस्तकं वाचण्याची काही गरज नाही. 'अत्त दीप भव' म्हणणारे बुद्ध तुमच्या आत असलेला दिवा प्रकाशमान करत असतात. दिवा असतोच आत, पण काजळी एवढी चढते की, आपण आपल्यालाच अंधारकोठडीत ढकलून देतो.

बुद्ध जगात दुःख आहे, हे मान्य करतात. पण दुःखावर मात करण्याचं बळ देतात. दुःख आहे, हे समजायला तर हवंच. मग त्याचं स्वरूप शोधायला हवं, अशा वाटेनं जात तुमच्या आयुष्यात बुद्ध आनंदाची उधळण करतात. जन्मापूर्वी काय आणि मृत्यूनंतर काय, अशा कोणत्याही हुबासक्या न मारता, बुद्ध जीवनाविषयी बोलतात. जगण्याविषयी बोलतात. त्यातला प्रत्येक पदर उलगडून दाखवतात. अगदी झोपेवर बोलतात आणि आहारावरही. मैत्रीवर बोलतात आणि संसारावरही. आधुनिक मानसशास्त्रज्ञांनाही बुद्ध थक्क करतात. मनाची गुपितं उघड करतात आणि मानवी मनाचं विश्वरूपदर्शन घडवतात.

बुद्ध माझ्या आयुष्यात आले ते डॉ. प्रदीप आवटे यांच्या 'धम्मधारा' या पुस्तकामुळे. बुद्ध एवढा रसाळ, सोपा आहे; तो कोणी परका नाही. तो तर 'मित्र' आहे, असे वाटले 'धम्मधारा' हा कवितासंग्रह वाचताना. डॉ. आवटे म्हणजे तेच, जे आज 'कोरोना'विषयी अखंड बोलताहेत आणि लढताहेत. त्यांच्या शब्दातून मी बुद्धाची 'करूणा'ही वाचलीय! विनोबांनी जे 'गीताई'त केलं, गदिमांनी 'गीतरामायणा'त केलं, त्यापेक्षाही महत्त्वाचं काम बुद्धांच्या संदर्भानं 'धम्मधारा'नं केलं. मलाच काय, अनेक साध्यासुध्या मराठी माणसांना बुद्ध त्यामुळं समजला.

बुद्धांच्या तत्त्वज्ञानाचं संस्कृत भाषांतर करावं, अशी इच्छा काही शिष्यांनी व्यक्त केली होती. त्यावर बुद्ध भडकले होते. संस्कृतला त्यांचा विरोध नव्हता. पण, जी कोणाचीच मातृभाषा नाही, त्या भाषेत माझे तत्त्वज्ञान कशाला? मूठभरांना मिरवण्यासाठी हे तत्त्वज्ञान नव्हतेच. सर्वसामान्य माणसासाठी बुद्ध मांडत होते. त्यांच्या आयुष्यात परिवर्तन घडवू पाहात होते. भाषेवरून आठवलेः संवादाची आवश्यकताही बुद्ध एके ठिकाणी सांगतात. आणि, मतभेद असले तरीही भाषेचा स्तर घसरता कामा नये, हेही स्पष्ट करतात.

बुद्धांनी सगळ्यात महत्त्वाचे काय केले?

एक प्रसंग आहे. बुद्ध कोसल देशात विहार करत होते. झाडाखाली झोपले होते. तेव्हा एक ब्राह्मण तिकडे अग्निहोत्र करत होता. तो ब्राह्मण बुद्धांना प्रसाद देण्यासाठी गेला. पण, आधी त्याने बुद
्धांना जात विचारली. तेव्हा, बुद्ध म्हणाले, "जात नको विचारूस. आचरण विचार." पुढे बुद्ध त्याला म्हणाले, "हे ब्राह्मणा, यज्ञात लाकूड जाळून शुद्धी मिळत नाही. मी लाकूड जाळत नाही. आंतरिक ज्योती उजळवतो. माझा हा अग्नी नित्य प्रज्वलित असतो!" त्यांचे हे विचार ऐकून ब्राह्मण प्रभावित होतो आणि त्यांना भोजनाचा आग्रह करू लागतो. तेव्हा, बुद्ध म्हणतातः "जेथे मी धम्माचा उपदेश करतो, तेथे भोजन करत नाही."

बुद्ध अमोघ वक्ते होते. विलक्षण संघटकही होते. तुकडोजी महाराज म्हणतात त्याप्रमाणे, हातात तलवार न घेता बुद्धांनी जगावर राज्य केले. अशोकासारखे जगज्जेते सम्राटही बुद्धाच्या वाटेने चालू लागले. तेही त्या काळात. (इ.स.पू ६२३ - ५४३ हा बुद्धांचा काळ मानला जातो. ८० वर्षांचे आयुष्य बुद्ध जगले.) बुद्धांनी संघ स्थापन केला. संघामुळेच धम्म जगभर पोहोचला. बुद्धांचे अपहरण करणा-यांनी बुद्धाला विष्णूचा अवतार तर केलेच, पण पुढे 'संघ' हा शब्दही चोरला. बुद्धांना 'भगवान' म्हणतात, ते 'भगवा' यावरून आले आहे. पण, या भगव्या रंगाचेही अपहरण झाले. माणूस मोठा झाला की त्याचे अपहरण करायचे, पण त्याच्या विचारांच्या विपरित वागायचे! हा डाव कळला नाही, म्हणून बुद्धाचेही बोट आपण सोडले. बुद्धांच्या निधनानंतर चारशे वर्षांनी 'मनुस्मृती' येते, याची आणखी कारणपरंपरा कोणती सांगणार?

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारताला पुन्हा ख-याखु-या बुद्धाची वाट दाखवली. प्रज्ञा, शील, करूणा आणि स्वातंत्र्य, समता, बंधुता सांगणारा- 'बहुजन हिताय, बहुजन सुखाय' सांगणारा बुद्ध बाबासाहेबांना प्रकाशमान करणे अगदीच स्वाभाविक होते. बुद्ध म्हणजे असा प्रकाश आहे, जो अनुभवता येतो. भरून घेता येतो, असे बाबासाहेब सांगतात.

रजनीश म्हणतात त्याप्रमाणे, बुद्धाचे खरे वेगळेपण हेच की त्याला स्पर्श करता येतो. बाकी सगळे धर्म धमकावत असताना, हा आईच्या मायेने जवळ घेतो. मनात घर करतो. आणि, मुख्य म्हणजे, त्याला शोधायला कुठे हिमालयात जावे लागत नाही. अगदी बाहेरच्या चौकात बुद्ध भेटतो.

बुद्ध बाहेर भेटला तरी तो असतो तुझ्या-माझ्या मनात.

गोंधळलेल्या अर्जुनाला साक्षात परमेश्वर विश्वरूपदर्शन देतात. परमेश्वराला शरण ये, असे सांगत स्वतःच्या दैवी प्रकाशाने थक्क करतात. मग, युद्धाचा मार्ग सांगतात. इथे मात्र गोंधळलेल्या अर्जुनांना 'तू स्वतःलाच शरण जा. तुझ्यातला प्रकाश तुला सापडेल', असे समजावत बुद्ध युद्धाची नव्हे, तर शांतीची- प्रेमाची दिशा दाखवतात.

बाबासाहेब म्हणतात त्याप्रमाणे, संपन्न शेतकरी कुटुंबातला हा सिद्धार्थ.
आपल्यासारखाच गोंधळलेला सिद्धार्थ 'बुद्ध' होऊ शकतो. तर, तू का नाही? मी का नाही?

व्यवस्थेला शरण जाणारे तू नि मी स्वतःला शरण का जात नाही?
गृहत्यागानंतर सिद्धार्थला समजले, ते बुद्ध सोबत असताना गृहवासात आपल्याला का समजणार नाही?

आजचा दिवस आहे, हाच प्रश्न या गृहवासात स्वतःला विचारण्याचा.
'अत्त दीप भव' हाच तर 'पासवर्ड' आहे 'बुद्ध' होण्याचा!

- संजय आवटे
#बुद्ध_जयंती/ ७ मे

(संदर्भः
१. डॉ. बाबासाहेब आंबेडकरः बुद्ध आणि त्यांचा धम्म
२. डॉ. आ. ह. साळुंखेः सर्वोत्तम भूमिपुत्रः गोतम बुद्ध
३. डॉ. प्रदीप आवटेः धम्मधारा)
स्पर्धा परीक्षा आणि लॉकडाऊन....
लॉकडाऊन चा आपल्या दैनंदिन जीवनावर खूप परिणाम झाला आहे.

त्यातील अनेक घटकांपैकी एक म्हणजे स्पर्धा परीक्षा...
बघा लॉक डाऊन मध्ये विद्यार्थ्यांनी काय करावं?

अगदी अभ्यासापासून ते मनोरंजनातून माहिती कशी मिळेल याबद्दल सांगितलंय स्वतः DrSushils Spotlight चे मा.डॉ. सुशील बारी सरांनी...
नक्की पहा...

https://youtu.be/FlMNxoV2v-M
*स्पर्धा परीक्षा, MPSC, UPSC परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या आणि आता संभ्रमात असणाऱ्या तरुणांसाठी - (संदीपकुमार साळुंखे, अप्पर आयकर आयुक्त)* - (पोस्ट मुक्तपणे शेअर करावी)

काल पुण्यात अडकलेल्या, मुख्यतः स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या तरुणांना आपल्या गावी परत घेऊन जाणाऱ्या गाड्यांची बातमी टीव्हीवर पाहिली आणि मनापासून आनंद झाला. चुकीच्या कारणाने का होईना पण एका न संपणाऱ्या दुःखातून तरुणांची सुटका होत आहे की काय असा भास झाला. अशा सर्व मित्रांना माझे सांगणे आहे की मुळात पूर्व परीक्षा पुढे ढकलली गेल्यामुळे, तसेच यापुढे कदाचित लवकर मोठ्या प्रमाणावर पदे भरली जाणार नाहीत अशा बातम्या सर्वत्र प्रसारित होत असल्यामुळे *तुमच्या मनात निराशा, अनिश्चितता आणि संभ्रम* निर्माण झाला असेल यात शंकाच नाही. पण तरीही खचून जाऊ नका. जे होते ते चांगल्यासाठीच होते असा विश्वास बाळगा. साधारणतः महिन्याभरातच तुमच्या लक्षात येईल की व्यवस्थित नियोजन केले तर *घरीसुद्धा अभ्यास होऊ शकतो. त्यासाठी मोठ्या फी भरून, मेसमध्ये निकृष्ट खाऊन, एखाद्या १० बाय १० च्या रूममध्ये ३-४ जण कोंडवळ्यासारखे किंवा खुराड्यासारखे राहून, आपल्या आई-बापांना कर्जबाजारी करून, त्यांना बकऱ्या, बैल नाहीतर शेतीचा तुकडा विकायला लाऊन मोठ्या शहरांमध्ये राहायची अजिबात गरज नाही.*

*मी स्वतः MPSC आणि UPSC अशा दोन्ही स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी झालेलो आहे आणि तेही पूर्णवेळ नोकरी करून.* दोन आठवड्यातून केवळ एक दिवस मी टिळक रोड सदाशिव पेठेकडे जायचो, मित्रमंडळींना भेटायचो, काही नवीन नोट्स किंवा पुस्तके आली असल्यास घ्यायचो आणि परत येऊन पुन्हा पुढचे पंधरा दिवस दहा तासाची ड्युटी करून उरलेल्या वेळात अभ्यास करायचो. अत्यंत कमी वेळ अभ्यासाला मिळत असल्यामुळे मी अनेक युक्त्या करून अभ्यास करायचो. उदाहरणार्थ, महत्वाचे टॉपिक टेपवर रेकॉर्ड करून सकाळी ब्रश, आंघोळ वगैरे प्राथमिक विधी करण्याच्या 40 मिनिटांच्या काळात मोठ्या आवाजात टेप लावून द्यायचो, महत्वाच्या नोट्सच्या, पुस्तकांच्या खिशात मावतील अशा छोट्या झेरॉक्स करून कंपनीत लंच ब्रेक मध्ये पाच मिनिटात जेवण आटोपून उरलेल्या अर्ध्या तासात खिशातील त्या नोट्स वाचायचो, रात्री मेसमध्ये जेवताना रेकॉर्ड केलेल्या कॅसेट वॉकमन मध्ये टाकून हेडफोन लाऊन ऐकायचो. इतरांना वाटायचे की मी गाणी ऐकत आहे, प्रत्यक्षात मात्र मी माझ्याच आवाजातल्या नोट्स ऐकत बसायचो. माझ्या *"हम होंगे कामयाब"* या पुस्तकात मी नोकरी करत असताना अभ्यास कसा करायचा यावर एक स्वतंत्र प्रकरणच लिहीले आहे. ही २००१-२००४ यादरम्यानची गोष्ट आहे. त्यावेळी स्मार्टफोन्स फारसे चलनात नसल्यामुळे walkman आणि कॅसेटचा वापर करायचो.. आता तर तुमच्याकडे स्मार्टफोन्स आहेत आणि इंटरनेट देखील आहे त्यामुळे ठरवले तर तुमच्या सगळ्यांसाठी या गोष्टी खूप सोप्या आहेत.

अर्थात मला पर्याय नव्हता म्हणून मी तसे करत होतो आणि तुम्ही देखील असेच केले पाहिजे असा माझा आग्रह नाही परंतु प्राप्त परिस्थितीत तुम्हाला आधार वाटावा म्हणून मी हे सांगत आहे. तुमच्याकडे महत्त्वाची पुस्तके आणि नोट्स सोबत असतीलच. शिवाय अनेक विषयांवर तुम्हाला युट्युब आणि विविध वेबसाइट्स व्हाट्सअप ग्रुप आणि इतर सोशल मिडीयाद्वारे सर्व माहिती अद्यावत स्वरुपात मिळतेच. त्यामुळे *आपला काही अभ्यास राहून जाईल अशी भीती मनात बाळगू नका. मुख्य म्हणजे फोमो (FOMO - Fear of Missing Out) म्हणजे आपल्याला काही गोष्टी कळणार नाहीत किंवा आपण मागे राहून जाऊ ही भीती मनातून काढून टाका. ही सर्व भीती केवळ निर्माण केलेली असते.* शिवाय आता सर्वचजण आपापल्या घरी अभ्यास करत आहेत त्याच्यामुळे सर्व एकाच पातळीवर आले आहेत हे लक्षात ठेवा. प्रत्यक्षात आता स्पर्धा परीक्षांच्या प्रश्नांचे स्वरूप असे आहे की तुम्हाला जर मूलभूत संकल्पना व्यवस्थित समजल्या असतील तर बऱ्याच प्रश्नांची उत्तरे intelligent guessing म्हणजे बुद्धिधारित अंदाजाने तसेच एलिमिनेशन पद्धतीने देता येतात. नुसत्या माहितीवर आधारित प्रश्नांचे स्वरूप आता बरेच कमी झाले आहे. त्यामुळे खूप भारंभार आणि डझनावारी पुस्तके वाचण्यापेक्षा मूलभूत संकल्पना स्पष्ट करणारी, अद्ययावत माहिती असणारी अशी निवडक पुस्तकेच वाचा. *खूप पुस्तके एकेकदा वाचण्यापेक्षा निवडक आणि महत्त्वाची पुस्तके अनेकदा वाचा.* आपण मागे राहून जाऊ या भीतीला घालवण्यासाठी आपापल्या मित्र-मैत्रिणींचे फक्त अभ्यासासाठीचे व्हाट्सअप ग्रुप तयार करून त्यात अभ्यासाव्यतिरिक्त दुसरी कुठलीही चर्चा होणार नाही असे नियम बनवा, म्हणजे तुम्हाला एकत्र अभ्यासिकेत बसल्यासारखी किंवा गटचर्चा केल्यासारखी फिलिंग येईल. ज्या तरुणांची गावाकडची घरे छोटी असतील किंवा घरात अभ्यासाचे वातावरण नसेल त्यांनी *एखादी तात्पुरती अभ्यासिका गावात तयार करा किंवा सरळ सरळ आपल्या किंवा मित्राच्या शेतावर जाऊन मस्त झाडाखाली किंवा गावाबाहेरच्या एखाद्या मंदिरावर अभ्यास