History Samadhan Mahajan
10.2K subscribers
607 photos
10 videos
131 files
299 links
इतिहासाचा टेलिग्राम ग्रुप
(Add ur friends)
https://t.me/historysamadhanmahajan

@SRMAHAJAN
Download Telegram
*राज्यसेवा मुख्य परीक्षा स्ट्रॅटेजि* *(जनार्दन कासार उपजिल्हाधिकारी)*

नमस्कार मित्रांनो,
माझ्या आधीच्या लेखामध्ये मी पुस्तकं कशी वाचावी याविषयी माहिती दिली आहे आणि त्यात शेवटी म्हटल्याप्रमाणे आता या लेखात मी राज्यसेवा मुख्य परीक्षेचे योग्य नियोजन कसे असावे, रीव्हीजन कशा कराव्या आणि एकंदरीत आपली स्ट्रॅटेजि कशी असावी याविषयी चर्चा करणार आहे. यासाठी मला खुप साऱ्या मित्रांचे फोन आणि मेसेज येत होते पण काही कारणास्तव वेळ न मिळाल्यामुळे ही पोस्ट टाकण्यासाठी उशीर झाला त्याबद्दल माफी मागतो.

1) आता आपल्याकडे मुख्य परीक्षेसाठी साधारणपणे 100 दिवस शिल्लक आहेत. येथे सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की पूर्व परीक्षेनंतरचा हा टप्पा केवळ रीव्हीजनचा टप्पा असतो. म्हणजे आपला मुख्य परीक्षेचा अभ्यास किंवा विस्तृत वाचन हे पूर्व परीक्षेआधीच झालेले असावे. कारण मुख्य परीक्षेचा आवाका पाहता या टप्प्यात नवीन माहितीचे वाचन शक्य तितके टाळणे आवश्यक असून आपल्याकडील उपलब्ध माहितीचे जास्तीत जास्त रीव्हीजन करणे फायदेशीर ठरते.

2) सर्वप्रथम आपण आपल्याकडे उपलब्ध असलेल्या दिवसांचे नियोजन करून घ्यावे. आणि आपल्या नियोजनामध्ये किमान 4 रीव्हीजन होतील याप्रमाणे प्रत्येक विषयासाठी दिवस वाटून द्यावे. आता बऱ्याच जणांना प्रश्न पडेल की एवढ्या कमी वेळात एवढ्या रीव्हीजन कशा होतील. यासाठी प्रत्येक पुढच्या रीव्हीजन साठी आधीच्या रीव्हीजनपेक्षा कमी दिवस द्यावे. उदा GS 2 साठी 20 दिवस दिले असतील तर प्रथम वाचन 8, द्वितीय वाचन 6, तृतीय वाचन 4, आणि लास्ट 2 दिवस याप्रमाणे...

3) म्हणजे आपल्याला प्रत्येक नेक्स्ट रीव्हीजनच्या वेळी आपले वाचन कमी कमी करत जायचे आहे. ज्या बाबी कमी महत्वाच्या आहेत किंवा ज्या बाबी आता आपल्याला पक्क्या स्मरणात राहतील याची खात्री असेल त्या बाबी प्रत्येक नेक्स्ट रीव्हीजन मध्ये वगळत चालायच्या आहेत.

4) प्रत्येक विषयास दिवसांचे वाटप समान न करता त्या विषयाच्या आउटपुट नुसार करावे. उदा. GS2 जास्त आउटपुट देणारा विषय आहे त्याचा बारकाईने अभ्यास करणे कधीही जास्त फायदेशीर ठरते. GS 1 मधील इतिहास हा कमी आउटपुट देणारा विषय आहे तसेच त्यास केवळ 60 गुणांचे वेटेज आहे त्यामुळे शेवटच्या टप्प्यात त्या विषयाला खूप कमी वेळ द्यावा व त्यातील केवळ जास्त महत्वाच्या टॉपिकचा अभ्यास करावा.

5) आउटपुट जास्त असणारे विषय म्हणजे GS 2, GS 3 आणि मराठी - इंग्लिश व्याकरण. त्यामुळे या विषयांचा चांगला अभ्यास करून जास्तीत जास्त गुण मिळवण्याचा प्रयत्न करावा. GS 1 मध्ये भूगोल आणि कृषी यातून चांगले गुण मिळवता येतात तर GS 4 मध्ये अर्थशास्त्र विषयातून जास्त गुण मिळवता येतात. विज्ञान आणि तंत्रज्ञान यावर 40 प्रश्न असतात पण त्याचा आवाका मोठा असल्यामुळे त्यातून गुण मिळवणे अवघड आहे. त्यामुळे शेवटच्या टप्प्यात याचेही मर्यादितच वाचन करणे आवश्यक आहे. सांगण्याचं तात्पर्य इतकच की जास्त गुण मिळवायचे असतील तर आपल्याकडील उपलब्ध दिवस आधीच कमी असल्यामुळे ते दिवस जास्त आउटपुट देणाऱ्या विषयांवर खर्च करणे जास्त फायदेशीर असते.

6) आणखी एक अतिशय महत्वाची बाब म्हणजे मुख्य परीक्षेच्या नियोजित तारखेपूर्वीच किमान 30 दिवस आधी सुरुवात करून आपण 2018, 2017, 2016 याप्रमाणे शक्य असेल तर 2013 पर्यंतच्या मुख्य परीक्षा प्रामाणिकपणे वेळ लावून सोडवायच्या आहेत आणि प्रत्येक परीक्षेत प्रत्येक विषयात टॉप 10 मध्ये येण्याचा प्रयत्न करायचा आहे. प्रत्येक परीक्षेनंतर तुमच्या झालेल्या चुका सुधारण्यासाठी योग्य वेळ देऊन त्यानंतर पुढील परीक्षा द्यायची आहे. याचा खूपच जास्त फायदा होतो. विशेषतः ज्यांची ही पहिलीच मुख्य परीक्षा आहे, त्यांच्या पहिल्याच परीक्षेत खुप साऱ्या चुका, सिली मिस्टेक्स होत असतात. एक गोष्ट लक्षात असू द्या की पास होणारे व नापास होणारे यांच्यात जास्त गुणांचा फरक नसतो. प्रत्येक पेपर मध्ये तुम्ही फक्त 3 सिली मिस्टेक्स टाळल्या तरी प्रत्येकी 4 याप्रमाणे (नेगेटिव्ह मार्किंगचा विचार करता) एकूण 4×5= 20 गुण वाढतात. आणि हे 20 गुण नापास होणाऱ्याला क्लास 2 आणि क्लास 2 मिळणाऱ्याला क्लास 1 मिळवून देतात. मित्रांनो अभ्यास तर सर्वांचा जवळपास सारखाच असतो पण फक्त या छोट्या छोट्या गोष्टीच तुम्हाला पोस्ट मिळवून देतात किंवा क्लास 2 पासून क्लास 1 कडे नेतात. त्यामुळे आपल्याकडे या गतवर्षीच्या मुख्य परीक्षांचा अनुभव गाठीशी असेल तर या चुका कमी होतात. तसेच एखाद्या विषयात टॉप 10 च्या सरासरी पेक्षा खुप कमी गुण मिळत असतील तर आपण कुठे चुकतोय हे लक्षात यायला लागते व त्या चुका सुधारण्यासाठी वेळ मिळतो. आणि (विशेषतः gs 2 सारख्या विषयात) आपण ज्या बाबी कमी महत्वाच्या म्हणून दुर्लक्षित केलेल्या असतात त्यांचे महत्व लक्षात येते व प्रत्यक्ष मुख्य परीक्षेआधीच आपल्या चुका सुधारण्याची संधी मिळते.
तसेच प्रत्येक मुख्य परीक्षेत मागील जुने प
्रश्न रिपीट होत असतात त्यामुळे त्याचाही फायदा मिळतो. याचबरोबर यामुळे शेवटच्या टप्प्यात अति महत्वाच्या गोष्टींवर आपला फोकस टिकून राहतो.

7) टेस्ट सिरीज लावावी का? ---
मी स्वतः कुठलीच टेस्ट सिरीज लावली नव्हती. याची अनेक कारणे आहेत मुख्य म्हणजे टेस्ट सिरीज चा दर्जा. हा दर्जा जर चांगला नसेल तर विनाकारण तुमचा शेवटच्या टप्प्यातील अमूल्य वेळ वाया जातो. यापेक्षा मी आयोगाच्या 2013 ते 2017 पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिकांचा 3 वेळेस बारकाईने अभ्यास केला. म्हणजे एखादा पर्याय चुकीचा असेल तर तो का चुकीचा तसेच जरी एखादा पर्याय बरोबर असेल तर तो का बरोबर यावर विचार केला. स्वतः प्रश्नांचे विश्लेषण केले. आणि त्या प्रश्नांच्या अनुषंगाने महत्वाच्या बाबींचे वाचन व रीव्हीजन केले. आणि त्याचा मला खूपच जास्त फायदा झाला. यामुळे माझा अंतिम टप्प्यातील अभ्यास खूपच प्रॉडक्टिव्ह झाला.
शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की टेस्ट सिरीज मध्ये काय विचारतात यापेक्षा आयोग काय विचारतो हे जास्त महत्वाचे आहे. आयोगाचे प्रश्नपत्रिका तयार करणारी माणसेच असतात हे लक्षात घ्या त्यामुळे आयोगाच्या प्रश्नांचा बारकाईने अभ्यास केला की त्या माणसांची प्रश्न तयार करण्याची मानसिकता आपल्या लक्षात यायला लागते. आणि पुस्तक वाचता वाचताच आपण मनोमन त्या अनुषंगाने प्रश्न तयार करू लागतो आणि ते प्रश्न कोणत्याही टेस्ट सिरीज पेक्षा नक्कीच जास्त दर्जेदार असतात.
त्यामुळे मी हा सल्ला देईल की आपल्याकडे वेळ कमी असल्यामुळे सर्वप्रथम आयोगाच्याच जुन्या प्रश्नपत्रिका 2 3 वेळेस बारकाईने अभ्यासा आणि त्यानंतर वेळ मिळाला तरच टेस्ट सिरीज मधील प्रश्नपत्रिका सोडवा.

तुमच्या लक्षात आले असेल की मी इथे कोणतेच साचेबद्ध नियोजन तुमच्यासाठी करून दिलेले नाही. याचे कारण म्हणजे प्रत्येकाची आकलन शक्ती वेगवेगळी असते, कुणाचा एका विषयाचा आधीच जास्त अभ्यास झालेला असतो तर कुणाचा दुसऱ्या विषयाचा, कुणी जॉब करून अभ्यास करतो तर कुणी फुल time, कुणाला एक विषय सोपा वाटतो तर कुणाला दुसरा. कुणाचा पहाटे अभ्यास होतो तर कुणाचा रात्री.
प्रत्येक जण वेगळा आहे हे लक्षात घेतले पाहिजे त्यामुळे कुणीतरी आपले नियोजन करून देईल आणि आपण त्याप्रमाणे अभ्यास करू ही मानसिकता सोडा. *आपले नियोजन आपणच केले पाहिजे.*
त्यामुळे मी फक्त तुमचे नियोजन कसे असावे याचा आराखडा दिलाय आणि त्यात काय केले पाहिजे हे सांगितलंय. आता यामध्ये तुम्हाला योग्य वाटतील ते बदल करून तुमचे नियोजन तुम्हीच तयार करा आणि त्याचे काटेकोर पालन होईल याची काळजी घ्या.

*लवकरच यानंतरच्या लेखात मी प्रत्यक्ष परीक्षेच्या दिवशी प्रश्नांना कसे सामोरे जावे, योग्य ऍटेंम्प्ट किती असावा, योग्य उत्तरापर्यंत कसे पोहचावे आणि प्रत्यक्ष पेपर सुरु होण्यापूर्वीच्या कळत शेवटच्या तासांत काय वाचावे याविषयी लेख लिहीन.*

सर्वांना परीक्षेसाठी शुभेच्छा...

*जनार्दन अंबादास कासार*
*उपजिल्हाधिकारी*
*(राज्यसेवा 2018) Rank 6th*
श्रीकांत जिचकार
एकच माणूस डॉक्टर होता,
तो वकिलही होता,
तो आयपीएस
अधिकारी
तसंच आयएएस अधिकारी होता.

याशिवाय
तो पत्रकारही होता.
इतकंच नाही तो किर्तनकार, आमदार,
खासदार आणि मंत्रीही होता.

इतक्या पदव्या मिळवणारा ज्ञानयोगी म्हणजे""- श्रीकांत जिचकार""
होय.
"श्रीकांत जिचकार" यांचं नाव आज पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे.

जिचकारांचा 2004 साली अपघाती मृत्यु झाला आहे.
याप्रकऱणी आज कोर्टाने एसटी महामंडळाला जबाबदार धरलं
आहे. तसंच जिचकार यांच्या कुटुंबियांना 50 लाख 67 हजार रुपयांची नुकसान
भरपाई देण्याचे आदेशही कोर्टाने दिले आहेत.

शैक्षणिक क्षेत्रातील ‘महामेरू’ म्हणून संबोधता येईल, असं नाव म्हणजे
श्रीकांत जिचकार होय.
अवघ्या 49 वर्षांचं जीवन, 42
विद्यापीठं, 20 पदव्या आणि 28 सुवर्णपदकं
असा ज्ञानाचा खजिना या अवलियाने जिंकला.

आयएएस असो वा आयपीएस, एलएलएम
असो वा एमबीबीएस, देशातील बहुतेक सर्वच
पदव्यां मिळवण्याचा विक्रम श्रीकांत जिचकार यांच्या नावावर जमा आहे.
जिचकारांनी मिळवलेल्या 20 पदव्यांमध्ये
एमबीबीएस आणि एमडी,
एलएलबी, एलएलएम, डीबीएम
आणि एमबीए, जर्नालिझम यांचा समावेश आहे.

जिचकरांनी 10 विषयांत एम ए केलं. यामध्ये लोकप्रशासन, समाजशास्त्र,
अर्थशास्त्र, संस्कृत, इतिहास, इंग्रजी साहित्य, फिलॉसॉपी,
राज्यशास्त्र, भारताचा प्राचीन इतिहास संस्कृती आणि पुरातत्व,
मानसशास्त्र यांचा समावेश आहे.

जिचकारांनी संस्कृतमध्ये मानाची डी.लिट
ही पदवी मिळवली.
जिचकारांनी मिळवलेल्या बहुतेक पदव्या या प्रथम श्रेणीतून
मिळवल्या आहेत.
श्रीकांत जिचकार यांची भारतातील सर्वात शिक्षित
व्यक्तींच्या पक्तिंत गणती होते.
या ज्ञानयोगी चैतन्याच्या झऱ्याने,
ज्ञानदेवता सरस्वतीलाही अक्षरश: मोहून टाकलं. त्यामुळेच
आपल्या अपार बुद्धिमत्तेच्या जोरावर त्यांनी एकही वर्ष
वाया जाऊ न देता, बहुतेक सर्व पदव्यांवर नाव कोरलं.

जिचकार यांनी 1978
साली यूपीएससीची पर
यामध्ये त्यांनी अपेक्षित यश मिळवून आयपीएस झाले. पुढे
दोनच वर्षात म्हणजे 1980
साली त्यांनी आयएएसची पदवी खि
टाकली.
जिचकार यांच्या वैयक्तिक ग्रंथालयामध्ये ५२,००० पुस्तकांचा संग्रह आहे.
विधानसभेची निवडणूक
लढवण्यासाठी त्यांनी आयएएसचा राजीनामा दिला.

या बुद्धिवंताने वयाच्या 25 व्या वर्षी पहिली सार्वत्रिक
निवडणूक लढवली आणि जिंकून दाखवली. जिचकार महाराष्ट्र
विधानसभेमध्ये १९८० साली वयाच्या २५ व्या वर्षी निवडून
गेले. महाराष्ट्र निवडून गेलेले ते सर्वांत तरुण सभासद होते.
जिचकारांनी १२ वर्षे विधानसभेमध्ये काम केले.
एकेकाळी त्यांच्याकडे १४ खात्यांचा कारभार होता.
यानंतर त्यांनी राज्यसभेवरही धडक मारली.
१९९२ साली त्यांची राज्यसभेवर निवड झाली.
जिचकार १९९८ सालापर्यंत राज्यसभेचे सदस्य होते. या काळामध्ये
त्यांनी विविध समित्यांमध्ये काम केले.
त्यांनी युनो आणि युनेस्को संघटनांसाठी ही काम
केले.
सलाम या अवलीयास...
Forwarded from History Samadhan Mahajan
हे नक्की वाचा विद्यार्थी मित्रांनो,
उद्योगपती आणि कार्यकारी संचालक :- जोतीराव फुले.
जोतीरावांच्या कंपनीनं केलेली महत्त्वाची कामं म्हणजे कात्रजचा बोगदा, येरवड्याचा पूल आणि खडकवासला धरणाचा कालवा होय.
जोतीरावांच्या उद्योगपती, कार्यकारी संचालक, अर्थतज्ज्ञ आणि शेअर मार्केटविषयक योगदानाकडे जाणकारांचं अद्याप पुरेसं लक्ष गेलेलं नाही.
ख्यातनाम विचारवंत डॉ. रामचंद्र गुहा यांनी जोतीरावांना आधुनिक भारताचे "शिल्पकार" मानलेले आहे. डा.बाबासाहेब आंबेडकर त्यांना गुरूस्थानी मानायचे आणि फुले यांचा वारसा आपण कायम उराशी बाळगू असे अभिमानानं सांगायचे. १९३२ साली पुण्यात बोलताना महात्मा गांधी म्हणाले होते, "जोतीराव फुले देशके पहले महात्मा थे. असली महात्मा वोही थे." स्वातंत्र्यवीर सावरकरांनी फुल्यांना "समाज क्रांतिकारक" म्हणून गौरविले होते. तीन अगदी भिन्न वैचारिक छावण्यांमधील या नेत्यांनी फुल्यांचा गौरव केलेला आहे.
जोतीरावांचा जन्म ११ एप्रिल १८२७ ला झाला. अवघ्या दहा वर्षांनी या घटनेला २०० वर्षे पूर्ण होतील. त्यांना ६३ वर्षांचे आयुष्य लाभले. कोणताही महापुरूष हा त्या काळाच्या मर्यांदांनी वेढलेला असतो. फुले द्रष्टे, योद्धा आणि समाजक्रांतिकारक असले तरी त्यांनाही काळाच्या मर्यादा होत्याच. आज त्यांचा कालातीत वारसा कोणता याचा विवेक करायला हवा. आजच्या जागतिकीकरणाच्या संघर्षशील जिवनात असे काही फुल्यांकडून आपल्याला मिळण्याची शक्यता आहे काय? असल्यास किती आणि कोणत्या गोष्टी याचा विचार करायला हवा.
जोतीरावांनी सर्वांना शिक्षण,ज्ञाननिर्मिती, कौशल्यनिर्मिती, स्त्री-पुरुष समता, जातीनिर्मुलन, संसाधनांचे फेरवाटप, धर्मचिकित्सा आणि आंतरजातीय विवाह या कार्यक्रम पत्रिकेच्या आधारे आधुनिक भारताच्या पायाभरणीचं काम केलं.
जोतीराव आयुष्यभर विनावेतन आणि विना मानधन पूर्णवेळ सामाजिक कार्यकर्ते राहिले. त्यांनी स्वकष्टार्जित संपत्ती खर्चून समाजकार्य केलं. ते 'पुणे कमर्शियल आणि कॉट्रॅक्टींग कंपनी'चे [Pune commercial & contracting Company] कार्यकारी संचालक होते. एक अव्वल दर्जाचे यशस्वी उद्योगपती, व्यापारी आणि नामवंत शेतकरी म्हणून जोतिरावांचा नावलौकिक होता. या कंपनीने धरणं, कालवे, बोगदे, पूल, इमारती, कापडगिरण्या, राजवाडे, रस्ते आदींची भव्य आणि देखणी बांधकामं केली. जोतीरावांच्या उद्योगपती, कार्यकारी संचालक, अर्थतज्ज्ञ आणि शेअर मार्केटविषयक योगदानाकडे जाणकारांचं अद्याप पुरेसं लक्ष गेलेलं नाही. जोतीराव हे स्वत:च्या तेलानं जळणारे सामाजिक कार्यकर्ते होते. वर्गणीवर समाजकार्य करण्याची प्रथा तोवर निर्माण झालेली नव्हती. स्वकष्टार्जित संपत्ती खर्चून त्यांनी समाजकार्य केलं.
‘बिल्डर’ हा शब्द आज वेगळ्या अर्थानं प्रचलित झालेला आहे. त्याला ‘आदर्श’ रूप प्राप्त झाल्यानं तो वापरताना काळजी घ्यावी लागते. जोतीराव हे मूलत: एक ‘नेशन बिल्डर’ होते. त्यांच्या कंपनीचे भागीदार असलेले वा सत्यशोधक समाजाचे सदस्य असलेले अनेक मान्यवर बांधकाम क्षेत्रावर आपली मोहर उमटवून गेले आहेत. मुंबई महानगरपालिकेची मुख्य इमारत, भायखळा पूल आणि परळचे रेल्वे वर्कशॉप, मुंबईतील अनेक कापडगिरण्या, भंडारदरा जलाशय, बडोद्याचा सयाजीराव गायकवाडांचा लक्ष्मीविलास राजवाडा, आदींची बांधकामे सत्यशोधकांनी केलेली आहेत. राजू बाबाजी वंजारी यांनी मुंबईतील टाइम्स ऑफ इंडियाची इमारत, सोलापूरची लक्ष्मी विष्णू मिल आणि लक्ष्मीदास खिमजी यांच्या मुंबईतील कापड गिरण्या बांधल्या. हे सर्वजण जोतीरावांचे निकटचे स्नेही आणि जोतीरावांच्या कंपनीचे भागीदारही होते. त्यांनी सत्यशोधक चळवळीला फार मोठे योगदान दिलेलं आहे. जोतीरावांच्या कंपनीनं केलेली महत्त्वाची कामं म्हणजे कात्रजचा बोगदा,येरवड्याचा पूल आणि खडकवासला धरणाचा कालवा होय. पूल, धरणे, कालवे, बोगदे आणि रस्ते व सुंदर इमारती यांसारखी अनेक दर्जेदार बांधकामं त्यांनी केली. त्यातून मिळविलेली रक्कम सामाजिक कामासाठी मुक्त हस्ते खर्चून टाकली.
जोतीरावांच्या या कंपनीतर्फे पुस्तक प्रकाशनाचंही काम केलं जाई. बौद्ध विचारवंत अश्वघोष यांच्या वज्रसूची या जगप्रसिद्ध ग्रंथावर आधारित पुस्तक तुकाराम तात्या पडवळ यांनी १८६५ साली लिहिलं. जोतीरावांनी ते ‘जातीभेद विवेकसार’ प्रकाशित केलं. या कंपनीचं पुण्यात पुस्तकविक्री केंद्र होतं.
सोन्याचे दागिने बनविण्याचे साचे विकण्याची एजन्सी जोतीरावांकडे होती.
ही कंपनी भाजीपाला विक्री व पुरवठा यांचेही काम करीत असे.
एक अव्वल दर्जाचे यशस्वी व्यापारी, उद्योगपती आणि नामवंत शेतकरी म्हणून जोतीरावांचा नावलौकिक होता. सामाजिक कार्यकर्ता आणि यशस्वी उद्योगपती असा संगम फार विरळाच म्हटला पाहिजे.
कितीतरी मोठी कामं या कंपनीमार्फत त्यांनी केल्याच्या कागदोपत्री नोंदी मिळालेल्या आहेत. १५० वर्षांपूर्वी कृषी-औद्योगिक शिक्षणाचा आग्रह धरणारे फुले हे आधुनिक भारताच्या कृषी-औद्योगिक प्रगतीचे द्रष्टे शिल्पकार ठरतात. भारतीय कामग
Forwarded from History Samadhan Mahajan
ार चळवळीचे जनक नारायण मेघाजी लोखंडे यांना पहिली कामगार संघटना बांधायला जोतिरावांचेच प्रोत्साहन होते.
नेल्सन मंडेला आणि बराक ओबामा भारत भेटीवर आलेले असताना आपण त्यांना फुले यांनी १८७३ साली [144 वर्षांपुर्वी ] लिहिलेल्या "गुलामगिरी" ह्या ग्रंथाचा इंग्रजी अनुवाद भेट दिला. ते दोघेही भाराऊन गेले. फुले यांनी हे पुस्तक निग्रोमुक्तीच्या चळवळीला अर्पण केलेले आहे. संपुर्ण आशिया खंडातील हा एकमेव विचारवंत आहे की ज्यानं दिडशे वर्षांपुर्वी विचारांचं जागतिकीकरण केलेलं होतं.
डॉ. जी.एस.घुर्ये आणि डॉ. एम.एन.श्रीनिवासन यांच्या अनेक वर्षे आधी महात्मा जोतीराव फुले यांनी भारतीय समाजाचं विशेषत: जातीव्यवस्थेचं ज्या पद्धतीनं शास्त्रीय विश्लेषण केलं होतं ते पाहता, जोतीराव हेच आद्य भारतीय समाजशास्त्रज्ञ ठरतात. त्यांचं हे लेखन आंतरराष्ट्रीय दर्जाचं आहे.
प्रा. हरी नरके
.......................
संदर्भ 1. आम्ही पाहिलेले महात्मा फुले, महाराष्ट्र शासन, मुंबई, 1993
2, महात्मा फुले - शोधाच्या नव्या वाटा, महाराष्ट्र शासन, मुंबई, 1998
3. महात्मा फुले - समग्र वांड्मय, महाराष्ट्र शासन, मुंबई, 1991
जून 1948 मध्ये मणिपूर येथे मतदान झाले त्यानुसार घटनात्मक राजेशाहीची स्थापना झाली.
मणिपूर हे भारतातील पहिले राज्य बनले जिथे सार्वभौम प्रौढ मतदानाच्या सिद्धांतानुसार मतदान झाले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा द्रष्टेपणा- -- प्रा.हरी नरके
#AmbedkarJayanti १४ एप्रिल २०१९
शंभर वर्षांपुर्वी १९१८ साली त्यांनी शेतकर्‍यांच्या व्यथा, त्यांच्यापुढच्या शेतीसमस्या मांडणारं पुस्तक लिहिलं. "समॉल [small] होल्डींग्ज इन इंडीया अ‍ॅंड देअर रेमेडीज" शेतीवरचा बोजा कमी करा, एकच मुल शेतीत ठेवा, बाकीच्यांना तिथून बाहेर काढा नी उद्योग, व्यापार, शिक्षण, सेवा क्षेत्रात घाला.शेतीमालाला योग्य बाजारभाव, सिंचन आणि उद्योगाचा दर्जा मिळायला हवा.शेतकरी सुखी तर देश सुखी.हे उपाय तातडीने
केले नाहीत तर शेतकरी डेंजर झोनमध्ये येईल असं भाकीत त्यांनी शंभर वर्षांपुर्वी केलं होतं.

डॉ. बाबासाहेबांनी 1929 साली पहिली शेतकरी परिषद घेतली. त्यांनी विधीमंडळावर काढलेला पहिला मोर्चा दलितांचा नव्हता तर शेतकर्‍यांचा होता.कसणाराला जमीन मिळावी म्हणून त्यांनी 1932 मध्ये खोती रद्द करण्याचे विधेयक मांडले.

डॉ. बाबासाहेब हे फक्त दलितांचे हे समीकरण इतके घट्टपणे कोरले गेलेय की 1919 साली सर्वप्रथम "सर्व भारतीयांना मतदानाचा अधिकार मिळाला पाहिजे" असे साऊथबरो कमिटीला सांगणारे डॉ. बाबासाहेब फारसे कोणाला माहित नसतात.

देशाचे उर्जामंत्री, पाटबंधारे मंत्री, सार्वजनिक बांधकाम खात्याचे व विमान वहातूक खात्याचे मंत्री असलेले बाबासाहेब देशाला "उर्जा साक्षरता व जल साक्षरतेची सर्वाधिक गरज आहे" असं 1942 साली सांगत होते.
देशातली पहिली 15 धरणं बांधणारे, देशातल्या मोठ्या नद्या एकमेकीला जोडून दुष्काळ हटवण्याची योजना करणारे, सारा देश हायवेंनी जोडणारे, भारताला विकास हवाय, बिजली, सडक, पाणी म्हणजेच विकास हे सुत्र ते मांडत होते.

अशा महापुरूषाला दलितांपुरते सिमित करणारे आपण भारतीय करंटेच नाही काय?

[ लेखक डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे या मालिकेतील खंड १७ ते २२ चे संपादक आहेत ]
हा संपुर्ण लेख वाचण्यासाठी पाहा https://harinarke.blogspot.com/
http://newspaper.pudhari.co.in/viewpage.php
पुढारी,बहार, रविवार, दि. १४ एप्रिल २०१९,पृ. ३
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2018 ला जोड्या जुळवा हा एक प्रश्न होता, त्यातील व्यक्ती होत्या पी.एस.भिंदर, अंबिका सोनी, रूक्सना सुलताना व जगमोहन. खरे तर या चारही व्यक्ती आणीबाणीच्या काळात प्रसिद्दीस आल्या होत्या व त्या थेट पणे संजय गांधी यांच्या वर्तुळातील होत्या.

संजय गांधींच्याभोवती जे मित्रमंडळ तयार झाले होते त्यात जगमोहन होते जे संजय भोवती असलेल्या गटाचे सूत्रधार होते. लेफ्टनंट गव्हर्नर चे सचिव नवीन चावला होते, ज्येष्ठ पोलीस अधिकारी पी.एस.भिंदर होते, स्रियापैकी युवा कॉंग्रेसच्या अध्यक्षा अंबिका सोनी होत्या. संजयच्या वतीने झोपडपट्टीवासियांकडे अनधिकृत प्रतिनिधी म्हणून वावरणारी, स्वतःला सामाजिक कार्यकर्ता म्हणवानरी रुक्साना सुलताना होती.
Channel name was changed to «HISTORY SAMADHAN MAHAJAN»
१९६९ मध्ये कांग्रेसमध्ये फुट कोणत्या गोष्टिमुळे पडली? (राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१८)

a) खालावलेली सामाजिक व् आर्थिक स्थिति 

b) US कडून मिळनारी मदत कमी होवून , १९६४-६५ च्या मदतीच्या निम्मे झाली होती. 

c) कांग्रेसमध्ये अंतर्गत राजकीय तान-तनाव होते.

d) मंत्र्यांचे न सोडवलेले प्रश्न 


पर्यायी उत्तरे 


1) a आणि  b   2) b आणि d     3) c आणि d    4) a, b, c आणि  d 


स्पष्टीकरण- आयोगाने दिलेल्या अंतरिम उत्तरानुसार याचा योग्य पर्याय 4 आहे , वरील सर्व. 

a) खालावलेली सामाजिक व आर्थिक स्थिति - १९६९ च्या काही दिवस आधीच १९६७ ला चौथ्या निवडनुका झाल्या होत्या. ६५ च्या युद्धाचा आर्थिक भार आधीच देशावर पडला होता. इंदिरा गांधी या अधिकृत पंतप्रधान झालेल्या होत्या. या काळात परदेशातून धान्य, शस्रे, यंत्र व कच्चा माल या सर्वांची आयात मोठ्या प्रमाणावर झाल्यामुळे भारताची परकीय चलनाची गंगाजळीत तुट आली होती. ती भरून काढण्यासाठी जून १९६६ मध्ये भारताने रुपयाचे अवमूल्यन करण्याचा निर्णय घेतला होता . बंगाल मध्ये १९६९ च्या आसपास नक्षलवाद उगम पावलेला होता. राज्यतुन प्रथमच मोठ्या प्रमाणावर आघाद्यांचे शासन स्थापन झाले होते. 

    b) US कडून मिळनारी मदत कमी होवून , १९६४-६५ च्या मदतीच्या निम्मे झाली होती. - १९६६ मध्ये इंदिरा गांधी अमेरिकेच्या दौऱ्यावर गेल्या होत्या त्यानुसार झालेल्या पी.एल ४८० कराराअंतर्गत भारताने  १९६५-६६ मध्ये अमेरिकेकडून १५ दशलक्ष टन गहू आयात केला. तसेच ९० कोटी डॉलरची मदत केली. प्रत्येक्षात हि मदत अनियमित व लहान हप्त्यात होती. त्याचप्रमाणे मदतीच्या बदल्यात अमेरिकेने ज्या अटी भारतावर लादल्या होत्या त्या इंदिरा गांधींना पसंत नव्हत्या. अंतरराष्ट्रीय प्रश्नांवर व्हिएतनाम संबंधी अमेरिकेबाबतचा दृष्टीकोन भारताने बदलावा म्हणून अन्नधान्यचा हप्ता व पाठवायची वेळ यावर  नियंत्रण ठेवले. अमेरिकेचे हे धोरण इंदिरा गांधींना पसंत पडले नाही त्यांनी यानंतर अमेरिकेचा उघड विरोध सुरु केला, परिणामी us कडून मिळणारी मदत नंतर कमी होत गेली. 

    c) कांग्रेसमध्ये अंतर्गत राजकीय तान-तनाव होते. - शास्रीनंतर १९६६ ला इंदिरा गांधी पंतप्रधान होण्यामागे कॉंग्रेस मधील सिंडीकेट गटाचा हात होता.  मोरारजी देसाई यांच्या नावाला या गटाचा विरोध होता. त्याचप्रमाणे इंदिरा गांधी ज्या जनहितार्थ निर्णय घेत होत्या त्यालाही कॉंग्रेसमधून काहींचा विरोध होता. हळूहळू सिंडीकेट गट इंदिरांच्या विरोधात गेला व कॉंग्रेसअंतर्गत इंदिरा समर्थकांचा एक गट तयार झाला होता. 

    d) मंत्र्यांचे न सोडवलेले प्रश्न - मोरारजी देसाईंना पंतप्रधान होण्याची इच्छा होती. इंदिरांच्या बँक राष्ट्रीयीकरणाच्या निर्णयाला देसाई गटाचा विरोध होता. शेवटी इंदिरांनी मोरारजी यांना अर्थमंत्री पदावरून काढून टाकले. राष्ट्रपती पदाचे उमेदवार म्हणून इंदिरांनी व्ही.व्ही. गिरी यांना पाठींबा जाहीर केला होता तर सिंडीकेट कॉंग्रेसचे उमेदवार होते नीलम संजीव रेड्डी. या वेळी व्ही व्ही गिरी यांचा विजय झाला. 

   अखेर १२ नोव्हेंबर १९६९ मध्ये कॉंग्रेसचे अध्यक्ष निजलिंगप्पा यांनी इंदिरांना कॉंग्रेसमधून काढले. कॉंग्रेसचे दोन गट पडले १) इंदिरा समर्थक गट म्हणजेच कॉंग्रस(R) - Requisinist (अधिग्रहणकरता सौम्य डाव्या विचारांचा बनलेला) २) सिंडीकेट गट म्हणजेच कॉंग्रेस (O)- Organisation). 
https://t.me/historysamadhanmahajan
नमस्कार मित्रांनो,मी आज माझी राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१९ साठीची Booklist share करतोय.हीच पुस्तके मी राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१८साठी वाचली होती.पुस्तके कमी ठेऊन जास्त वेळा revision द्या.कमी कमी २ revision द्या. previous year question papers या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे आहेत ते पण refer करा. इंटरनेट चा GS paper 3 & 4 साठी योग्य वापर करा.
तुम्हां सर्वांना येणाऱ्या सर्व परीक्षा साठी माझ्याकडून All the best...
समाधान गायकवाड (तहसीलदार)
प्रश्न - 1977 मधील सहाव्या निवडणुकात काँग्रेसचा पराभव झाल्या मूळे इंदिरा गांधी यांनी राजीनामा दिला. तो राजीनामा त्यांनी कोणाकडे सादर केला ?
उत्तर- उपराष्ट्रपती बी.डी. जत्ती

स्पष्टीकरण -
कारण राष्ट्रपती फक्रुद्दीन अली अहमद यांचे फेब्रुवारी 1977 मध्ये निधन झाले होते व या निवडणुकीचे निकाल मार्च 1977 मध्ये लागले.
राजीनामा देण्या पूर्वी इंदिराजींनी आणीबाणी उठवल्याची घोषणा केली. आणीबाणी च्या निर्णयावर फक्रुद्दीन अली अहमद यांची सही होती
एल्फिन्स्टन याने मुंबईचा गव्हर्नर असताना कायदेसंहित तयार करण्यासाठी बॉबिन्गटन च्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली.
अखेर सर्व अभ्यास करून 27 कायद्यांची एक संहिता तयार केली. ती 1 जानेवारी 1827 रोजी अमलात आली. हे 27 कायदे म्हणजे एल्फिन्स्टन ची कायदेसंहिता.
#संकेत देवळेकर#

#mpsc_mains
नमस्कार मित्रांनो,

मला बुकलिस्ट साठी बरेच जण विचारत आहेत. बुकलिस्ट लवकरच अपलोड करेल. तत्पूर्वी राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी मला महत्वाचे जे वाटले किंवा अनुभवले ते काही मुद्दे शेअर करावे वाटतात.

*- हाती असलेल्या वेळेचा योग्य नियोजन करून पूरेपूर फायदा घ्यावा.

*- जे नवीन content वाचायचे आहे किंवा मागच्या वेळी वाचायचे राहून गेले असे सगळे टॉपिक्स सर्वप्रथम कव्हर करणे कारण नंतर ते रिविजन ला सोईचे जाईल व परत ते skip करण्याची वेळ येणार नाही.

*- सुरूवातीलाच टेस्ट सिरीज नुसार स्वत:चा शेड्युल बनवू नये. साधारणत: first रिविजन मधे सर्व topics कव्हर झाल्यानंतरच टेस्ट द्याव्यात.

*- नवीन उमेदवारांनी (पहिली मेन्स) कसलेही दडपण घेऊ नये. योग्य दिशेने वाटचाल असेल व नियोजनाचा अंमल चांगला असेल तर सगळी तयारी चांगल्या प्रकारे होते.

*- सर्वांच्या बुकलिस्ट बघाव्यात पण बरेच वेळा पुस्तकांचे selective पार्टच वाचावे लागतात पूर्ण मोठे बुक्स वाचण्याची काही गरज नसते. उदा. Dutt&Sundaram चे Agro Economy व काही प्रमाणात Industry पार्ट वाचला तरीही पुरेसा असतो बाकी कोळंबे/देसले मधे कव्हर होते. किंवा Arun Katyayan (Vol 1) चाही Soil , water management etc. असा पार्टच वाचावा. पुर्ण पुस्तके वाचण्यात वेळ घालू नये.

*- एका विषयाचा अभ्यास/रिविजन करताना गॅप जास्त नसावा. उदा. बरेच जण या वीक मधे Gs1, next week Gs2, मग Gs3 etc. असा प्लान बनवतात. पण मग एका महिन्यानंतरच पुन्हा revision ला पहिल्या विषयावर यावे लागेल. तेव्हा परत सगळेच नवीन वाटू शकते. त्यापेक्षा सतत विषयांच्या टच मधे राहावे व तसा प्लान बनवावा.

*- मराठी-इंग्लिश साठी वेगळे दिवस बाजूला काढण्याची गरज नाही. रोज २ तास दिले तर रिविजन्स पण जास्त होतील व शेवटच्या रिविजन ला GS पेपर्स कडे सुद्धा लक्ष देता येईल.

*- मराठी/इंग्रजी लेखी पेपर्स मधे दर्जेदार शब्दांचा वापर करावा. उदा. I am tired. ऐवजी I am exhausted वापरले तर तपासणारा चांगले गुण देऊ शकतो. अक्षर सुंदर, मुद्देसुद मते, विषयाला अनुसरून निबंध व टापटिपपणा असेल तर ५५+ स्कोअर येतो.

*- शेवटचे रिविजन फार imp असते, सर्व वाचलेले व झालेला अभ्यास revise होईल अशाच पद्धतीने नियोजन करा. या final रिविजन वेळी काही skip करू नये.

*- मागील पेपर्सचे अॅनालिसीस काळजीपूर्वक करावे त्यातच अभ्यासात महत्वाचे फोकस करण्याचे मुद्दे लक्षात येतात.

*- पेपर सोडवताना काळजीपूर्वक व पूर्ण लक्ष देऊनच सोडवावेत. बरेच वेळा अभ्यासात/वाचण्यात कधीही विषयाचा संबंध न आलेले प्रश्न केवळ लॉजिक लावूनच सुटतात.

हे काही मुद्दे मी माझ्या अनुभवातून मांडलेले आहेत. अर्थातच प्रत्येकाचा approach वेगळा असतो तरीही याचा काही फायदा होईल अशी अपेक्षा आहे.

धन्यवाद ! सर्वांना मुख्य परीक्षांसाठी शुभेच्छा !

Thank u सुमित शिंदे sir!
Deputy Collector Rank #3 (2018)
#mpsc_mains
#लेखी_पेपर_100गुण
वर्णनात्मक पेपर अभ्यास करायला अतिशय सोप्पा पण थोडासा tricky आहे. मराठी आणि इंग्रजी दोन्ही पेपर मध्ये निबंध, भाषांतर आणि सरांशलेखन एवढे तीनच प्रश्न असल्याने खुप अभ्यास करावा नाही लागत, परंतु यातील कोणत्याही प्रकारात एखादी लक्षात येण्यासारखी चूक झाली तर मार्क्स एकदम खूप कमी होतात. म्हणून तिन्ही बाबींचा व्यवस्थित नियोजनबद्ध अभ्यास व सराव लागतो.

निबंध/ Essay:

मराठी व इंग्रजी दोन्ही पेपर मध्ये 25 मार्क्स साठी एक एक निबंध विचारला जातो. भाषा वेगळ्या असल्या तरी दोन्ही निबंधांमध्ये अपेक्षित असणाऱ्या बाबी सारख्याच असतात. त्यामुळे दोन्हीच्या अभ्यासाची पद्धत सारखीच आहे.

निबंध हा भाषेच्या पेपर मध्ये आहे, तो GS चा भाग नाही हे लक्षात घ्यावे. त्यामुळे त्यात माहितीचा भडीमार नको. तसेच GS चे उत्तर लिहितोय असंही वाटता कामा नये. स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासात आपणाला प्रत्येक गोष्टीबद्दल खुप काही माहिती असते. त्यामुळे एखादा विषय समोर येताच त्याबद्दल आपल्याला माहिती असलेले सगळे कसे लिहिता येईल याकडे आपला भर असतो. त्यामुळे निबंध हा रुक्ष माहितीने भरून जातो आणि तो वाचण्यात वाचणाऱ्याला विशेष रस येत नाही. म्हणून मग फक्त माहिती पेक्षा, थोडी माहिती आणि त्याचे वेगवेगळ्या angle ने केलेले analysis जास्त असावे. निबंधात तुमच्या माहितीच्या range पेक्षा तुमच्या विचारांची खोली आणि सूत्रबद्धता कळणे जास्त महत्वाचे आहे.

एखाद्या विषयामध्ये तुम्ही काय लिहिले आहे किंवा काय लिहायचे राहिले यावर तो निबंध किती चांगला आहे हे ठरत नाही. त्यासाठी तुम्ही जे लिहिले आहे ते किती परिणामकारक रित्या मांडले आहे हे फार महत्वाचे आहे. हा पेपर भाषेचा असल्याने या मांडणीला आणि त्यात वापरलेल्या शब्दांना तसेच वाक्यरचनेला जास्त महत्व प्राप्त होते. म्हणून एखाद्या विषयाची मांडणी कशी करावी, एखादा विषय मुद्देसूदपणे कसा लिहावा हे कळण्यासाठी वर्तमानपत्रातील अग्रलेख आणि column वाचणे अतिशय उपयुक्त ठरते.

अग्रलेखात एखादा विषय त्याच्या जास्तीत जास्त पैलूंचा विचार करून लिहिलेला असतो. त्यात positive, negative दोन्ही बाबी उल्लेखिलेल्या असतात. लेखकाला कोणती बाजू जास्त बरोबर वाटते ते पटवून देण्याचा प्रयत्न केलेला असतो. ज्यांचे मत त्याविरुद्ध असेल त्यांना ते तसे असण्यास वाव दिलेला असतो. एखादा मुद्दा स्पष्ट करताना उदाहरणे किंवा आकडे दिलेले असतात पण फक्त माहितीचा भडीमार नसतो. तसेच या विषयाबद्दल कोणी महत्वाची व्यक्ती वा संस्था काही बोलले असतील तर त्याचा उल्लेख केलेला असतो. सामान्यपणे त्या विषयासंबंधी बहुतेक लोक जो किंवा जसा विचार करत नाही तो विचार केलेला असतो, आणि एक-दोन नाविन्यपूर्ण मुद्दे त्यात लिहिलेले असतात. तसेच या विषयांचा सामाजिक, आर्थिक, राजकीय, ऐतिहासिक, भौगोलिक,मानसशास्त्रीय, वैज्ञानिक, आंतरराष्ट्रीय अशा अनेकविध विषयांशी संबंध जोडण्याचा प्रयत्न केलेला असतो. तसेच संपूर्ण लिखाणाला एक लय व flow असतो. मध्ये कुठेच एक मुद्दा संपून वेगळेच काहीतरी सुरु झाले असे वाटत नाही. सगळे कसे अगदी क्रमाने येत आहे आणि सर्व मिळून एक integrated approach आहे असे वाटते.

कोणत्याही निबंधामध्ये या वर नमूद केलेल्या गोष्टी असतील तर तो निबंध जास्त परिपूर्ण आणि परिणामकारक ठरतो. म्हणून मग अग्रलेख वाचताना फक्त त्यात काय दिले आहे याकडे लक्ष न देता, त्यात विषय कसा मांडलाय याचा बारकाईने अभ्यास करावा. सुरुवात कशी केलीय, त्यानंतर मुद्दे एकमेकांना कसे जोडलेत, उदाहरणे कशी स्पष्ट केलीत आणि मग विषय शेवटाकडे कसा नेलाय हे पहावे. सुरुवातीला हे थोडंस टिपण स्वरूपात लिहून काढले तरी चालेल. हे सातत्याने केल्यास आपोआप आपल्याला विषय कसा मांडायचा याची idea येऊन जाते. मग तसा सराव केल्यास ते कौशल्य आत्मसात होऊन आपोआप आपला निबंध चांगला बनू लागतो.

निबंध किती चांगला झालाय हे, वाचणाराला तो न थांबता वाचून काढावासा वाटला का?, पुढे काय लिहिले असेल अशी उत्सुकता त्याला वाटली का?, तुम्ही लिहिलेलं त्याला पटो न पटो पण ते त्याच्या मनाला भिडले का?, यावर ठरते. हे सर्व वाटण्यासाठी भाषेवर थोडंस प्रभुत्व असावे लागते आणि वाक्यांची रचना थोडी interesting करावी लागते. उदाहरणार्थ "समाजात खूप भ्रष्टाचार वाढला आहे" हे असे सांगण्यापेक्षा "आज आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या बायकोला, सरकारकडून नवऱ्याच्या मृत्यूमुळे मिळणाऱ्या रकमेतील निम्मा वाटा स्थानिक राजकारण्यांच्या घश्यात घालावा लागतो" असे सांगितले तर ते जास्त परिणामकारक ठरते. "अर्भक मृत्यू दर 50 एवढा आहे" असे सांगण्यापेक्षा "50 बालकांना आईला आई म्हणून हाक मारण्याऐवढे देखील आयुष्य मिळत नाही" असे लिहिणे वाचनाराला जास्त भिडते आणि मग तो पुढील गोष्टी लक्ष देऊन वाचतो. पेपर तापसणाऱ्याला सगळा पेपर वाचायला लावणे हे सर्वात मोठे काम यामुळे होऊ