History Samadhan Mahajan
10.2K subscribers
610 photos
10 videos
131 files
299 links
इतिहासाचा टेलिग्राम ग्रुप
(Add ur friends)
https://t.me/historysamadhanmahajan

@SRMAHAJAN
Download Telegram
'थॉट्स ऑन पाकिस्तान' या ग्रंथाची अर्पण पत्रिका लिहिताना बाबासाहेब प्रिय रमाई बद्दल लिहितात की, 'जिच्या त्यागामुळे मला महत्त्व प्राप्त झाले, हृदयाचा चांगुलपणा मनाचा उदात्तपणा चारित्र्यातील निष्कलंकपणा जपणारी आणि माझ्यावर ओढवलेल्या संकटांना अगदी शांत चित्ताने पेलवणारी, माझ्या प्रत्येक दुःखमय क्षणांमध्ये सहभागी होणारी, माझ्यावर होणाऱ्या आघातामध्येही मला एकाकी पडू न देता माझे मनोधैर्य उंचावणारी, अशा विशाल हृदयाची माझी प्रिय पत्नी रामू हिच्या स्मृतीस अर्पण."
बाबासाहेबांचे रमाईवर असीम प्रेम होते, रमाई त्यांच्या आधार होत्या! बाबासाहेब शिक्षणासाठी विदेशात गेले असताना त्यांच्या कुटुंबात एकापाठोपाठ एक मृत्यूंचे थैमान घडले, रमाईने त्यास धीराने तोंड दिले! त्यांनी जे सोसलं ते विदेशात असणाऱ्या बाबासाहेबांनाही कळू दिलं नाही!
समर्पण, त्याग, संयम आणि सहनशीलता याच्या त्या मूर्तिमंत प्रतीक होत्या!

१८९८ साल हे किती हो भाग्यवान, रमाबाईचा जन्म झाला वाटा साखरपान!
हे रमाई गौरवगीत दामोदर शिरवळेंनी लिहिलेय. भीमगीते जितकी गोड आहेतच तितकीच रमाईगीतेही अवीट गोडीची आहेत.
'नव कोटींची माता ही उदार अंतःकरणाची, रमाई झाली स्फुर्ती ज्योती भिमराव आंबेडकरांची.. '
'येणार बाई बॅरिस्टर साहेब माझं...' ही रमाई गौरवगाणी आजही प्रेमस्नेहाने ऐकली जातात.

आपल्या आईचे स्थान रमाईला बहाल करणारे लाखो युवक भोवताली दिसून येतात, त्यांना रमाईचा त्याग ठाऊक आहे नि तिची थोरवी, संयम, सहनशीलताही ज्ञात आहे. बाबासाहेबांविषयी ऋणभावनेने बोलणारी हरेक व्यक्ती रमाईलाही वंदन करताना दिसते.
बाबासाहेबांच्या सावली बनून राहिलेल्या रमाईत आपली माय न दिसली तर नवलच होय! त्या खऱ्या अर्थाने नवकोटींच्या माता आणि उत्तुंग व्यक्तिमत्वाच्या सहचारिणी होत! आज त्यांची जयंती!

माता रमाईंना वंदन!

- समीर गायकवाड
Forwarded from Kapil pawar geography (kapil Pawar)
क्रमवारी लक्षांत ठेवा...यावर नेहमी प्रश्न येतो
आपल्या आधुनिक भारताचा इतिहास या पुस्तकावरील सराव प्रश्नसंच व प्राचीन भारताचा इतिहास ही दोन्ही पुस्तके ऑनलाईन available आहेत
Forwarded from Kapil pawar geography (kapil Pawar)
महाराष्ट्र भूगोल
राज्य सेवा पूर्व साठी महत्वाचे टॉपिक

महाराष्ट्र स्थान व विस्तार

भूगर्भीय रचना

प्राकृतिक विभाग यात घाट, शिखर,कोकण मधील बेट , बंदर, खाड्या याला महत्व द्या

महाराष्ट्रातील नद्या

महाराष्ट्र वने ,राष्ट्रीय उद्यान, अभयारण्य, व्याघ्र प्रकल्प

खनिज संपत्ती

महाराष्ट्र पर्यटन

एवढे टॉपिक अधिक चांगले करा


संदर्भ - भगीरथ महाराष्ट्र भूगोल

आवृत्ती -5 वी (४ कलर)

लेखक - कपिल पवार
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023
सेट A, प्रश्न 1
आधुनिक काळातील पहिले मराठी नाटक जे विष्णुदास भावे यांनी 1843 मध्ये सादर केले होते? .....
आधुनिक भारताचा इतिहास - समाधान महाजन
पेज नंबर 496
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023
सेट A, प्रश्न 3
संगीत रत्नाकर या भारतीय संगितावरील प्रमाणभूत असणाऱ्या ग्रंथाचे लेखक कोण ?

आधुनिक भारताचा इतिहास - समाधान महाजन
पेज नंबर 507
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023
सेट A, प्रश्न 5
इंडियन पेट्रियाटीक असोसिएशन 1888 या संघटनेचा सबंध कोणत्या व्यक्तीशी येतो ?

आधुनिक भारताचा इतिहास - समाधान महाजन
पेज नंबर 296
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023
सेट A, प्रश्न 11
पुढीलपैकी कोणत्या वकिलांनी असहकार चळवळीचा भाग म्हणून त्यांची किफायतशीर वकिली सोडून दिली  ?

आधुनिक भारताचा इतिहास - समाधान महाजन
पेज नंबर 234
*अजिंठ्याच्या ‘प्रकाश’चित्रकार !*

*भुसावळ हे मुंबई-नागपूरदरम्यानचं ब्रिटिशकालीन जंक्शन रेल्वे स्थानक. या रेल्वे स्थानकाच्या ओव्हरब्रीजच्या लाकडी पायर्‍या उतरून स्टेशनच्या पलीकडे काही अंतरावर असलेल्या भुसावळ कॅथोलिक चर्चमध्ये विश्वविख्यात महान प्रकाशचित्रकार (फोटोग्राफर) मेजर रॉबर्ट गिलचं थडगं आहे. गेल्या दहा वर्षांपूर्वी ‘अजिंठा’ चित्रपटामुळे रॉबर्ट गिल आणि त्याच्या सहजीवनात काही काळ घालवलेल्या ‘पारो’ या त्याच्या प्रेमिकेची सुरचित कथा प्रसारमाध्यमांतून मोठ्या चर्चेचा विषय बनली. या चर्चेत मात्र अथक परिश्रमाने आपल्या फोटोग्राफीतून अजिंठ्याबरोबरच मराठवाडा, खान्देश व विदर्भाच्या भूमीने आपल्या गर्भात साठवलेला अप्रतिम असा सांस्कृतिक ठेवा जगासमोर अजरामर करणारा प्रकाशचित्रकार म्हणून मेजर रॉबर्ट गिल अप्रकाशितच राहिला आहे…*

*जिल्हा माहिती अधिकारी रणजितसिंह राजपूत यांचा आपलं महानगर च्या ‘सारांश’ पुरवणीतील ‘अवशेष’ सदरात प्रसिद्ध लेख*
https://www.mymahanagar.com/featured/saransh/ajanthas-prakash-painter/708873/