पुण्यात शाळा चालवणाऱ्या स्कॉटिश मिशनरी जेम्स मिचेल आणि जॉन मरे मिचेल यांच्याशी जोतिबा फुले यांचा सर्वप्रथम संबंध कसा आला हे विविध संशोधकांनी लिहिले आहे.
`` गोविंदरावांनी जोतीला १८४१ मध्ये एका स्कॉटिश मिशनच्या इंग्रजी शाळेत घातले. तो आता जवळ जवळ १४ वर्षांचा झाला होता. जोती करारी वृत्तीचा होता. तो आपला अभ्यास मन लावून करीत असल्यामुळे आपले पाठ समजून घेण्यास तो सदोदित उत्सुक असे. परीक्षेत त्याला प्रथम श्रेणीचे गुण मिळत असत. त्याविषयी त्याचे शिक्षक आणि वर्गबंधू त्याची वाहवा करीत. असे धनंजय कीर यांनीं लिहिले आहे.
``(गोविंदरावांनी) इंग्रजी शिक्षणासाठी आपल्या मुलाला स्कॉटिश मिशनच्या शाळेत धाडले. इंग्रजी शिक्षणाचा प्रारंभ ही जोतीरावांच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाची घटना होय. यानंतर त्यांच्या जीवनक्रमाला वेगळे वळण लागले’’ असे गं. बा. सरदार यांनी लिहिले आहे. ``स्कॉटिश मिशनच्या शाळेत गेल्यावर जोतीरावांच्या धर्म धर्मचिंतनाला खरोखर प्रारंभ झाला, असे. गं. बा. सरदार लिहितात
``आम्ही पाहिलेले फुले’ या हरी नरके संपादित आणि महाराष्ट्र सरकारने प्रकाशित केलेल्या पुस्तकात सत्यशोधक कार्यकर्ते शास्त्री नारो बाबाजी महाघट पाटील यांनी १८९१ साली लिहिलेले जोतिबांचे अल्पचरित्र समाविष्ट केले आहे. त्यात म्हटले आहे:
``जोतीराव १-१-१८४३ पासून बुधवारवाड्यातील शाळेत पुन्हा जाऊ लागला. त्याच वेळेपासून सगुणाबाईच्या आग्रहामुळे ते सगुणाबाईस व सावित्रीबाईस शिकवू लागले. पत्नीला व माईला मराठीचे सर्व शिक्षण दिल्यावर त्यांना मिसेस मिचेल यांच्या अत्याग्रहावरून शिक्षणिकीचा कोर्स देण्यासाठी त्यांनी ठरविले. हा कोर्स नार्मल स्कूलमध्ये मिचेलबाईच चालवीत होत्या. या बाईंनी सावित्रीदेवीची व सगुणाबाईची परीक्षा घेऊन त्यांना तिसऱ्या वर्षाचा प्रवेश दिला. त्यांचे तिसरे वर्ष (१८४५-१८४६) साली पास झाले. (१८४६- १८४७) साली ४ वर्षाची परीक्षा देऊन त्या स्कूलमधून बाहेर पडल्या. या दोघीही पुढे उत्तम ट्रेड मिस्ट्रेस म्हणून नावाजल्या. १८४७ साली महात्मा जोतीराव इंग्रजी शिक्षणाची शेवटची परीक्षा उत्तम तन्हेने पास झाले. त्यावेळी कॉलेज शिक्षण घेण्याची सोय पुण्यात नव्हती.’’
सावित्रीबाई फुले यांचे एक महत्त्वाचे चरित्रकार असलेले मा. गो. माळी यांनी लिहिले आहे : पुण्यातील सुप्रसिद्ध रहिवासी व युरोपियन एका सामाजिक प्रयत्नाला प्रोत्साहन देण्यासाठी एकत्र जमल्याचे पहिले उदाहरण म्हणून जोतीरावांच्या प्रयत्नाने सुरू झालेल्या मुलींच्या शाळेचा बक्षीस समारंभ वाटतो.
``पूना कॉलेजच्या चौकात शनिवार ता. १२ फेब्रुवारी १८५२ रोजी एतद्देशीय मुलींच्या शाळांच्या परीक्षा झाल्या. समारंभाचा देखावा उत्साहाचा असून मनोरंजन करण्यासारखा होता. चौकामध्ये लोकांना बसण्यासाठी बिछाईत पसरली होती. खुर्च्या आणि कोचही ठेवण्यात आली होती. पुण्यातील मोठ्या हुद्दयावरील हिंदू व युरोपियन मंडळींनी सर्व जागा गच्च भरून गेली होती. इतका मोठा जनसमूह मापूर्वी पुण्यात केव्हाही जमला नव्हता. युरोपिअन पाहुण्यामध्ये पुढील स्त्रीपुरुष उपस्थित होते. ब्रिगेडिअर ट्रायल, मिसेस ट्रायडेल, मिसेस कॉकबर्न, इ. सी. जोन्स (पुण्याचे कलेक्टर), मिसेस जोन्स… ”
माळी यांनी दिलेल्या युरोपियन पाहुण्यांच्या या यादीत अनेक स्त्रीपुरुषांची नावे आहेत. त्यामध्ये एक दाम्पत्य आहे, रेव्हरंड जे. मिचेल आणि मिसेस मिचेल. या सर्व पाहुण्यांचा संबंधित कार्यक्रमाशी कुठल्या ना कुठल्या कारणाने संबंध असल्याने निमंत्रित केलेले असणार हे उघड आहे.
फुले दाम्पत्याच्या शाळेशी रेव्हरंड जेम्स मिचेल आणि मिसेस मिचेल यांचा संबंध असल्यानेच निमंत्रित पाहुण्यांमध्ये त्यांचा समावेश होता.
या महत्त्वाच्या कार्यक्रमास सावित्रीबाई फुले उपस्थित असणार हे साहजिकच आहे. फुले दाम्पत्याचे शिक्षक रेव्हरंड जेम्स मिचेल आणि मिसेस मिचेल होते. आपले विद्यार्थी असलेल्या जोतिबा आणि सावित्रीबाई फुले यांचे स्त्रीशिक्षणाबाबतच्या कार्याचे कौतुक करण्यासाठी उपस्थित असलेल्या मिचेल दाम्पत्याच्या यावेळी काय भावना असतील याची आपण केवळ कल्पनाच करु शकतो.
हंटर शिक्षण आयोगापुढे पुणे येथे १९ ऑकटोबर १८८२ रोजी सादर केलेल्या निवेदनात जोतिबा फुले यांनी पहिल्याच परिच्छेदात लिहिले आहे कि त्यांनी सुरु केलेल्या ``मुलींच्या शाळांची व्यवस्था नंतर शिक्षण खात्याकडे मिसेस मिचेल यांच्या देखरेखीखाली सुपूर्द केली होती आणि मुलींच्या या शाळा अद्यापही चालू आहेत. . ख्रिस्ती धर्मोपदेशकांनीं चालविलेल्या वसतिगृही शाळॆत मी काही वर्षे शिक्षकाचे काम केलेले आहे.’’
(या निवेदनाखाली 'जोतीराव गोविंदराव फुले, व्यापारी, शेतकरी आणि नगरपिते, पेठ जुनागंज, पुणे' अशी नोंद आहे.)

``जोतीरावांच्या वडिलांनी तर त्यांना केव्हाच घरातून घालवून दिले होते. ना पित्याचा आश्रय, ना स्वतःचा धंदा. त्यामुळे त्यांची संसारात फारच आर्थिक कुचंबणा झाली. अशा परिस्थितीत त्यांना पुण्यातील स्कॉटिश मिशनऱ्यांचा मुलींच्या शाळेमध्ये शिक्षकाची नोकरी करणे भाग पडले. ही शाळा ख्रिस्ती- मिशनऱ्यांनी १८५४ जुलै महिन्यात मिशनच्या आवारात सुरू केली होती. मुलींचे वसतिगृहही तेथेच होते. त्या संस्थेमध्ये टाकलेली मुले, अनाथ मुले आणि ख्रिस्तीधर्म स्वीकारलेल्या गरीब लोकांची मुले आणि ज्यांच्यावर मिशनचा पूर्ण ताबा होता अशी मुले त्या संस्थेत शिकत होती. जेवणाखाण्याची तेथेच व्यवस्था असे.
पुण्यातील स्कॉटिश मिशनऱ्यांचा मुलींच्या शाळेची माहिती देताना एका इतिवृत्तात चालकांनी असे म्हटले आहे की, 'सध्या आमच्याकडे वसतिगृहामध्ये राहणारी १३ मुले आहेत. दिवसा त्यांचे शिक्षण होत असताना दुसरी ४० मुले त्यांच्याबरोबर शिकतात. पुण्यातील एक अत्यंत उत्साही आणि निपुण शिक्षक आमच्या शाळेत दररोज चार तास शिक्षणाच्या कार्यात साह्य करावयास लाभला आहे याविषयी आम्हांला समाधान वाटते. ते म्हणजे परोपकारबुद्धीचे आणि कनिष्ठ जातींच्या मुलींच्या शिक्षणासाठी अविरत झगडणारे आणि ज्यांच्या कार्याची शिक्षामंडळीने आणि स्वतः सरकारने मनापासून प्रशंसा केली, ते जोतीराव फुले होत. त्यांनी आमच्या मोठ्यात मोठ्या शिक्षणविषयक आशा फलद्रूप केल्या, " असे धनंजय कीर यांनी ओरिएण्टल ख्रिश्चन स्पेक्टेटर, फेब्रुवारी १८५५ चा हवाला देऊन लिहिले आहे.
जेम्स मिचेल यांचे एक चिरंजिवसुद्धा आपल्या वडिलांप्रमाणे धर्मगुरु बनले आणि नंतर स्कॉटिश मिशनच्या पुणे केंद्रात जॉन मरे मिचेल यांच्यासह काम करत होते असे जॉन मरे मिचेल यांनी आपल्या आत्मचरित्रात लिहिले आहे.
रेव्हरंड जेम्स मिचेल आणि मिसेस मिचेल यांनी जोतिबा आणि सावित्रीबाई फुले यांच्या जडणघडणीत अशाप्रकारे अत्यंत महत्त्वाचे योगदान दिले आहे.
जेम्स मिचेल यांचे माथेरान येथे २८ मार्च १८६६ रोजी वयाच्या ६६ वर्षी निधन झाले.
Camil Parkhe, January 15, 2024

१४ जानेवारी १७६१
पानिपतच्या युद्धात मराठ्यांचा पराभव झाला.
दुर्रानी साम्राज्याच्या आक्रमणापासून मुघल सत्तेचं रक्षण करण्याची जबाबदारी मराठ्यांनी घेतली होती. त्यात त्यांचा पराभव झाला.
या पराभवाला पेशव्यांचं ब्राह्मणी नेतृत्व जबाबदार होतं अशी टीका केली जाते.
देशी-परदेशी, ब्राह्मणी-अब्राह्मणी हे वाद आजही चालू आहेत.
मात्र १७५७ साली पलाशीच्या लढाईत बंगालच्या नबाबाचा पराभव झाला आणि समृद्ध बंगाल प्रांताची सूत्रं ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीकडे आली होती.
ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनी ही एक जॉईंट स्टॉक कंपनी होती.
या कंपनीत स्वामीनिष्ठा हे मूल्य नव्हतं. कारण कंपनीची मालकी पिढीजाद नव्हती. कंपनीतलं कोणतंही पद पिढीजाद नव्हतं. कर्तबगारी दाखवणारा, जोखीम घेऊन कामगिरी पार पाडणारा आणि कंपनीच्या उत्पन्नात घसघशीत वाढ करणार्या व्यक्तीला कंपनीत सर्वोच्च स्थानी जाण्याची संधी होती.
बंगालचा नबाब असो की अवधचा वा मुघल असोत की दुर्रानी वा मराठे यापैकी कोणत्याही राज्यकर्त्याकडे अशी सिस्टीम वा प्रशासकीय पद्धती नव्हती. अशी पद्धत असू शकते हेही त्यांना ठाऊक नव्हतं. म्हणून तर कंपनीला ते कंपनी बहादूर म्हणू लागले.
पानिपतच्या लढाईत मराठ्यांचा विजय झाला असता तरिही तो क्षणिक ठरला असता. कारण राज्यकारभार करण्याची नवी पद्धत मराठे, मुघल वा अन्य कोणत्याही राजाकडे नव्हती.
बंगाल प्रांताची सूत्रं हाती आल्यावर ईस्ट इंडिया कंपनीने गंगा खोर्यातील शेतीत आमूलाग्र बदल केला. अफू आणि कापसाची म्हणजे नगदी पिकांची शेती करण्याची सक्ती शेतकर्यांवर केली. परिणामी १७७० साली पहिला मानवनिर्मित दुष्काळ पडला. या दुष्काळात सुमारे १ कोटी लोक मेले असा अंदाज आहे. मात्र कंपनीच्या उत्पन्नात ५० टक्क्यापेक्षा अधिक वाढ झाली. अफूची निर्यात चीनला करण्यासाठी कंपनीने चीनसोबत युद्धं केली. त्याचे परिणाम आजही चीनच्या परराष्ट्र धोरणावर झालेले दिसतात. वसाहतवादी पाश्चात्य शक्तींच्या हातातलं प्यादं म्हणजे भारत अशी आजच्या चीनची धारणा आहे.
पानिपतच्या पराभवाची मीमांसा करताना मराठी विद्वानांनी, इतिहासकारांनी या संदर्भांची म्हणजेच जागतिक परिप्रेक्ष्याची दखल घेतलेली नाही. ब्रिटिशांनी मराठ्यांकडून हिंदुस्थानची सूत्रं हाती घेतली अशी मांडणी करून मराठी लोकांचा अभिमान, गर्व चेतवण्याची मांडणी २१ व्या शतकातही केली जाते.
- सुनील तांबे

सर जॉन माल्कम हा मुंबईचा गव्हर्नर (१ नोव्हेंबर १८२७–५ डिसेंबर १८३०) होता. वयाच्या तेराव्या वर्षीच तो ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या लष्करात भरती होऊन तिसऱ्या इंग्रज-म्हैसूरकर युद्धात ऐन विशीत लढला होता. माळव्यातील अंदाधुंदी संपवून तेथे सुव्यवस्था प्रस्थापित करणे व हे बिकट कार्य त्याने केले. शेवटच्या दोन इंग्रज-मराठे युद्धांत तसेच अंजनगाव-सुर्जीच्या तहात (१८०३) मॅल्कमने आपली मुत्सद्देगिरी व युद्धकौशल्य दाखविले. यामुळे शिंद्यांचे स्वतंत्र अस्तित्व संपुष्टात आले. पुढे १८०४–०५ मध्ये शिंदे, होळकर इ. मातब्बर मराठे सरदारांशी इंग्रजांनी केलेल्या युद्ध किंवा मैत्री तहांची योजना त्याचीच होती. मराठ्यांच्या राजकारणाबाबत हा माल्कम ईस्ट इंडिया कंपनीत तज्ज्ञ मानला जात असे.
हे आठवण्याचे कारण, जेव्हां इंदूरला होळकरांचा राजवाडा पाहिला तिथे बाहेर अहिल्याबाई होळकरांचा पुतळा आहे. तिथे माल्कमचे एक quote आहे. तो म्हणतो, "IT IS AN EXTRAORDINARY PICTURE- A FEMALE WITHOUT VANITY, A BIGOT WITHOUT INTOLERENCE..... A BEING EXERCISING IN THE MOST ACTIVE AND ABLE MANNER DESPOTIC POWER, NOT MERELY WITH SINCERE HUMILITY, BUT UNDER THE SEVEREST MORAL RESTRAINT THAT A STRICT CONSCIENCE COULD INPOSE ON HUMAN ACTION."
अर्थात इंग्रजांच्या प्रमाणपत्राची आपल्याला गरज नाहीं. पण सहिष्णूता, प्रामाणिकपणा, नम्रता या गुणांबरोबरच कठोर विवेक आणि नैतिक अधिष्ठान याचे असाधारण उदाहरण असा उल्लेख महत्त्वाचा आहे. प्रशासक म्हणून जमीन महसूली व्यवस्था, सिंचन यात अहिल्याबाई होळकरांनी मोठे काम केलें होतें. माळव्यात फिरताना ' हा तलाव अहिल्याबाईंनी निर्माण केला होता ' असे उद्गार अनेकदा कानावर पडत. महसूल वसुली आणि न्याय, पोलीस खात्याचा कारभार त्या स्वतः पाहत. अहिल्याबाईंची सत्ता अमराठी मुलुखात लोकांना ' परकी ' वाटली नाही. हे आजही जाणवते. मल्हारराव होळकरांच्या मृत्यूनंतर सुमारे चार दशके माळव्यातला त्यांचा कारभार हा स्ट्यूर्त गॉर्डन सारखे अभ्यासक"most stable in eighteenth century" मानतात.
रघुनाथराव पेशवे विरुध्द अहिल्याबाई होळकर; घाट बांधणी व जीर्णोद्धार यांच्या पलीकडे जाऊन हा इतिहास पाहिला पाहिजे. प्रशासकिय कारभाराच्या चौकटीवर इतिहास पाहिला तर खूप वेगळा दिसतो. आणि आपल्याला आजच्या संदर्भातही काही गवसते.
- कौस्तुभ दिवेगावकर

पानिपतच्या महासंग्रामात दुश्मनाने नव्हे तर कळीकाळानेच बहाद्दर, रगेल मराठ्यांना नामोहरम केले !
— विश्वास पाटील
काल रात्री बाराच्या दरम्यान हरियाणातील समालखा नावाच्या गावातील काही तरुणांनी मला फोन केला. ते भावनाविवश होऊन विचारत होते, “अखिरकार #पानिपत के जंगे मैदान मे, मराठों की क्यू हार हुई? सबसे महत्वपूर्ण वजह बताइये पाटील जी.”
त्या प्रश्नाचे उत्तर पंधरा-वीस दिवसांपूर्वीच मला दिल्लीमध्ये मिळाले होते. अकादमीच्या बैठकीसाठी मी गेलो होतो. तेव्हा दिल्लीत तीन जाडजूड ब्लॅंकेट्स अंगावर घेऊन झोपलो होतो.
तरीही मध्यरात्रीनंतर मी कुडकुडत उठलो, असा भयाण गारठा आणि अशी अंगात भाल्याच्या पात्यासारखी घुसणारी ती भयंकर थंडी. त्या रात्रीने अगदी मेटाकुटीस आणले होते.
अशी अवस्था असते उत्तरेतली डिसेंबर जानेवारीच्या अंग गोठवणाऱ्या थंडीची. अफगाणांच्या अंगावर लोकरीचे व चामड्याचे लांब कोट आणि गुडघ्यापर्यंतचे लंबे बूट होते. उलट मराठे शेतात असोत किंवा #रणांगणात अंगावर अत्यंत कमी व साधी कपडे.
अन लढाईच्या आधी जवळपास अडीच ते तीन महिने पानिपतवर #लाख_मराठा अडकून पडला होता. त्यावेळच्या असंख्य कागदपत्रातून धनधान्यविना झालेले माणसाजनावरांचे हाल, कालवा फुटल्यामुळे मराठ्यांची जनावरे शेवटी पाण्याला सुद्धा मोताद झाली होती.
तरीही त्यादिवशी 14 जानेवारी 1761 ला मराठ्यांच्या उपाशी माणसाजनावरानी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत रणमैदानावर मुसंडी मारली होती. जिद्दीचा जलवा दाखवला होता.अहमदशाह अब्दालीचे सैन्य दुपारी जंगेमैदान सोडून पळू लागले होते. दुश्मनाच्या फौजेला खिंडारे पडून सुद्धा मराठ्यांना तो विजय हाशील करता आला नाही. कारण माणसाजनावरांच्या पोटात दहा दहा दिवस आधीपासून काही नव्हते हे एक कारण. पण दुर्दैवाने त्याच दिवशी दक्षिणयान सुरू होते. त्यामुळे सूर्याची किरणे मराठ्यांच्या माणसाजनावरांच्या डोळ्यात थेट घुसत होती. उपाशी पोट, त्यात डोळ्यातले ते सूर्यकिरणांचे पाझरने. त्यामुळे शेकडो वीर व जनावरे भोवळ येऊन जागच्या जागी कोसळली होती. त्यांच्या त्या अत्यंत हलाचा फायदा घेऊन शत्रूने मोडलेले रणमैदान पुन्हा सावरले होते. पण पानिपतात शेवटी विजय कोणाचा झाला ?
ह्या घमसान महायुद्धानंतर दुसऱ्या दिवशी अब्दालीने विजयाचा जो जाहीरनामा काढला आहे. त्यामध्ये त्याला आपल्या शत्रूच्या जागी त्यांच्या पुरानातील रुस्तुम ईस्पिनदार आठवले. यासारखी यशाची पावती ती दुसरी कुठली ? जगाच्या इतिहासात एवढे प्रचंड #रणांगण जिंकून सुद्धा अब्दालीसारख्या विजयी वीराला दिल्लीच्या गादीवर बसायचे धाडस झाले नाही. तो हिंदुस्थानातून निघून गेला , याचा अर्थ पानिपतची त्याने किती मोठी दहशत खाली असेल याची कल्पनाच केलेली बरी.
मी जेव्हा मार्च 1986 मध्ये पानिपतच्या जंगे मैदानाला भेट दिली होती. तेव्हाचा माझा लेख #पुणे सकाळच्या रविवार आवृत्तीमध्ये प्रकाशित झाला होता. तोही या निमित्ताने सापडला.
माझ्या त्या भेटी वेळी स्मारकाचे काम थोड्या प्रमाणावर सुरू झाले होते. तेव्हा सुद्धा चार चार फूट जमिनीमध्ये छोट्या-मोठ्या तोफांची चाके आणि घोड्यांचे सांगाडे आढळत होते.
आजही पानिपतच्या वीरांची सदाशिवरावभाऊ, दत्ताजी शिंदे, विश्वासराव, जनकोजी, दमाजी गायकवाड , मल्हारराव होळकर, समशेर बहादूर, सरदार पायगुडे, सरदार गंधे, इब्राहीमखान गारदी अशा हिंदुस्तानासाठी लढलेल्या सर्व जातीजमाती व धर्माच्या वीरांचे स्मरण झाल्यावर अभिमानाने छाती फुलून गेल्याशिवाय राहत नाही.
कवी गोविंदाग्रजांच्या शब्दात कौरव पांडव संगरतांडव
द्वापारामध्ये होय अति
तसे #मराठे गिलचे साचे
कलित लढले पानपती !
. …#विश्वास_पाटील.
#battleofpanipat #MarathaWarriors #Panipat1761 #warriorspirit #panipat #marathahistory #vishwaspatil
#maratha

आशा आणि निराशा...
ह्या दोन शब्दातच जणू आपल आयुष्य गुंफलेल असतं..
काल MPSC चा रिझल्ट आला..
पण ती येण्याआधी सगळ्या मार्कांची ची गोळा बेरीज करून मनात लेखी परीक्षेचे आणि interview चे काही गणित घालून आपली मेरिट लिस्ट आधीच तयार असते...
ह्यामध्ये आपण बसू की नाही ...
आणि मग वाट बघत असतो interview संपण्याची कारण आयोग त्यादिवशी च result लावणार अशी प्रथा चालू झाली ना...
तोपर्यंत खेळ चालू असतो आशेचा...
आणि मग result लागला की आशेचा किरण ठळक होतो नाहीतर मग निराशा येते आपल्या पदरी ..
हे लिहिताना आमची सगळी निराशेची वर्ष समोरून गेली... ह्या exam मध्ये पण जवळची काही लोक होती राहून राहून हेच वाटायचं की आजची रात्र वैऱ्याची..
खरच 19जून 2020 ती रात्र आमच्यासाठी वैऱ्याचीच होती...
समजू शकते मी त्या सर्वांच्या भावना ज्यांच नाव लिस्ट मध्ये नाही...
आता लगेच तरी मी नाही म्हणणार उठा आणि कामाला लागा .. practically it is not at all possible...
उलट मी सांगेन take ur time... Take deep breath... First think what u actually want ... R u really ready for next year n then enter in this war...
एकच सांगेन आपल्या निराशेला स्वतःवर हावी होऊ देऊ नका...🙏
N those who r selected very congratulations 🎉💐
By प्रेरणा प्रमोद चौगुले.

Maharashtra Geography Sample pdf.pdf
12 MB
Maharashtra Geography Sample pdf.pdf
Sample copy
महाराष्ट्र भूगोल
आवृत्ती -4 थी
आपल्या सर्वांच्या मागणी नुसार प्रथमच 4 -colour आवृत्ती केली आहे .जरूर आपण एक कॉपी आपल्या साठी reseve ठेवा ....

मुस्लीम मुलींसाठी भारतात पहिली आधुनिक शाळा सुरु करणारे रेव्हरंड वझीर बेग
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत १८४०च्या दशकाच्या मध्यात पुण्यात केवळ मुस्लीम समाजातील मुलींसाठी एक स्वतंत्र शाळा सुरु करण्यात आली होती आणि या शाळेतील शिक्षक होते वझीर बेग.
अठराव्या शतकाच्या अखेरीस ब्रिटिशांच्या ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता भारतात पाय रोवू लागली आणि त्यानंतर देशात आधुनिक शिक्षणपद्धत रुढ झाली. अमेरिका आणि इंग्लंडमधून धर्मप्रसारासाठी आलेल्या ख्रिस्ती मिशनरींनी या देशात पहिल्यांदाच विविध धर्मांच्या आणि जातीजमातींच्या मुलांमुलींसाठी आधुनिक शिक्षणाची दरवाजे खुली केली.
त्याआधी भारतात शतकानुशतके शिकण्याचा आणि शिकवण्याचा अधिकार प्रामुख्याने ब्राह्मण जातीच्या लोकांना होता.
आधुनिक सर्वसमावेशक शिक्षणास सर्वांत प्रखर विरोध झाला तो इथल्याच लोकांकडून.
या शाळांत शिकण्यासाठी मुलांमुलींना गोळा करणे हे अत्यंत अवघड काम होते. अनेकदा या मुलांमुलींनी शाळेत यावे यासाठी दरवेळेस त्यांना पैसे, कपडेलत्ते पुरवावे लागत असे. मुलांमुलींच्या पालकांच्या शिक्षणाबाबतच्या अनास्थेमुळे नव्याने सुरु झालेल्या या शाळा अल्पावधीत बंद पडत असत.
अमेरिकन ख्रिस्ती मिशनरींनी मुलींसाठी स्वतंत्र शाळा मुंबईत १८२४ सालीच सुरु केली होती. तिथल्या शाळेत गंगाबाई या तरुणीने शिक्षिका म्हणून काम केले होते. मात्र लवकरच कॉलऱ्याच्या साथीत त्यांचे निधन झाले होते.
पुण्यातच एका मुस्लीम कुटुंबात जन्म झालेल्या आणि तरुणपणात ख्रिस्ती धर्म स्वीकारलेल्या वझीर बेग यांच्याकडे भारतात केवळ मुस्लीम मुलींसाठी आधुनिक शिक्षणपद्धतीची असलेली पहिलीवहिली शाळा सुरु करण्याचे श्रेय जाते.
वझीर बेग आणि महात्मा जोतिबा फुले एकाच वयाचे. जोतिबांप्रमाणे वझीर बेग यांचाही जन्म १८२७च्या आसपासचा.
बेग यांचा ख्रिस्ती धर्माकडे १८४२ पासून ओढा होता, बहुधा जोतिबा फुले यांच्याप्रमाणे त्यांनीसुद्धा स्कॉटिश मिशनरींनी पुण्यात चालवलेल्या शाळांत शिक्षण घेतले असावे. मात्र उघडपणे त्यांनी आपली धर्मश्रद्धा व्यक्त केली नाही.
आपल्या धर्मांतराचा आपल्या मुस्लीम कुटुंबावर काय विपरीत परिणाम होईल या शंकेने त्यांनी आपली धर्मश्रद्धा लगेचच प्रकट केली नाही.
एका सरकारी शाळेचे हेडमास्तर होण्यास त्यांनी नकार दिला, याचे कारण म्हणजे स्वतःला एक मुस्लीम म्हणवून घेत आणि आपली धर्मश्रद्धा लपवून ज्ञानदान करण्यास ते तयार नव्हते.
स्कॉटिश मिशनरींच्या प्रभावामुळे ख्रिस्ती झालेल्या पुण्यामुंबईतील पहिल्या काही व्यक्तींमध्ये वझीर बेग या मुस्लीम व्यक्तीचा समावेश होता. एका स्कॉटिश मिशनरी कुटुंबाशी संपर्क आल्यानंतर १८४६ च्या सप्टेंबर महिन्यात त्यांनी बाप्तिस्मा घेऊन उघडपणे ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला.
हे स्कॉटिश मिशनरी कुटुंब म्हणजे सावित्रीबाई आणि जोतिबा फुले या दोघांचेही शिक्षक असलेले रेव्हरंड जेम्स मिचेल दाम्पत्य असावेत.
याचे कारण म्हणजे या काळात या स्कॉटिश मिशनरी कुटुंबाचे पुण्यात वास्तव्य होते. रेव्हरंड जॉन स्टिव्हन्सन आणि जेम्स मिचेल यांनी १८३० ला पुण्यात स्कॉटिश मिशनचे काम सुरु केले. स्टिव्हन्सन यांनी लवकरच ईस्ट इंडिया कंपनीचे चॅप्लेन (धर्मगुरु) पद स्विकारले.
त्यानंतर पुण्यात स्कॉटिश मिशनची धुरा जेम्स मिचेल त्यांच्या आयुष्याच्या अखेरीपर्यंत म्हणजे १८६६ पर्यंत वाहत होते. मिसेस मार्गरेट शॉ मिचेल यांच्याकडे सावित्रीबाई फुले यांनी अद्यापनाचे धडे घेतले.
अलीकडेच प्रदर्शित झालेल्या
बेग यांच्या धर्मांतरामुळे त्यांच्या स्वकियांनी त्यांना प्रचंड विरोध केला. त्यांना त्यांच्या हत्येची धमकीसुद्धा देण्यात आली होती.
यानंतर पुण्यात रेव्हरंड जेम्स मिचेल यांच्या शाळेत बेग शिकवू लागले. स्कॉटिश मिशनच्या शाळेत बेग हे एक उत्तम शिक्षक मानले जात असत. स्कॉटिश मिशनरी जेम्स मिचेल यांच्या याच शाळेत नंतर जोतिबा फुलेसुद्धा शिक्षक होते, जोतिबांच्या हंटर कमिशनला दिलेल्या निवेदनात याचा उल्लख आहे.
याच काळात वझीर बेग यांनी पुण्यात केवळ मुस्लीम मुलींसाठी एक स्वतंत्र शाळा सुरु केली होती.
जॉन टेरेन्स यांनी

सत्यशोधक' चित्रपटात जोतिबांचे शिक्षक म्हणून रेव्हरंड जेम्स मिचेल यांच्यावर काही प्रसंग चित्रित करण्यात आले आहेत. मला हा एक सुखद धक्का होता.
कारण सावित्रीबाई आणि जोतिबा फुले या महात्मा दाम्पत्याच्या बहुतेक चरित्रांत जेम्स मिचेल दाम्पत्याचा
शिक्षक पतिपत्नी' असा थेट उल्लेख टाळला जातो. बेग यांच्या धर्मांतरामुळे त्यांच्या स्वकियांनी त्यांना प्रचंड विरोध केला. त्यांना त्यांच्या हत्येची धमकीसुद्धा देण्यात आली होती.
यानंतर पुण्यात रेव्हरंड जेम्स मिचेल यांच्या शाळेत बेग शिकवू लागले. स्कॉटिश मिशनच्या शाळेत बेग हे एक उत्तम शिक्षक मानले जात असत. स्कॉटिश मिशनरी जेम्स मिचेल यांच्या याच शाळेत नंतर जोतिबा फुलेसुद्धा शिक्षक होते, जोतिबांच्या हंटर कमिशनला दिलेल्या निवेदनात याचा उल्लख आहे.
याच काळात वझीर बेग यांनी पुण्यात केवळ मुस्लीम मुलींसाठी एक स्वतंत्र शाळा सुरु केली होती.
जॉन टेरेन्स यांनी
स्टोरी ऑफ अवर मिशन्स : वेस्टर्न अँड सेंट्रल इंडिया’ या १९०२ साली प्रकाशित झालेल्या पुस्तकात लिहिले आहे :
`
स्कॉटिश मिशनच्या अगदी सुरुवातीच्या काळात इस्लाम धर्मातून ख्रिस्ती झालेल्या वझीर बेग यांनी काही काळ मुस्लीम मुलींसाठी एक शाळा चालू केली होती. त्याशिवाय डॉ. मरे मिचेल यांनी आपल्या शाळेत सत्तर मुलींना आणण्यास यश मिळवले होते.विशेष नमूद करण्याची बाब म्हणजे या शिक्षणासाठी एक छोटीशी रक्कम फी म्हणून सुद्धा आकारली जात असे.
त्यानंतर काहीं काळाने अशीच एक शाळा प्रखर विरोधाला तोंड देत एकदोन वर्षे चालवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र या कार्यात सातत्य नव्हते, मिस स्मॉल यांची नेमणूक करण्यात आली तेव्हा समाजाच्या या घटकासाठी (मुस्लीमांसाठी) काहीच करण्यात येत नव्हते. ‘’
हिंदुस्थानी आणि पर्शियन भाषांवर वझीर बेग यांचे प्रभुत्व होते. त्याशिवाय अरेबिक, तुर्की आणि इंग्रजी भाषा ते शिकले. पुण्यात ते नंतर लॅटिन आणि ग्रीक भाषासुद्धा शिकले. ख्रिस्ती मिशनरी म्हणून कार्य करण्याचे आपल्याला पाचारण आहे अशी त्यांची भावना होती.
वझीर बेग यांनी १८५३ साली ईशज्ञानाचा अभ्यासक्रम पूर्ण केला आणि १८५४ साली ते स्कॉटलंडला गेले, तेथे युनिव्हर्सिटी ऑफ एडिनबर्गमध्ये वैद्यकशास्त्राचा अभ्यासक्रम पूर्ण करण्याचे त्यानीं ठरवले होते. या विद्यापीठाच्या कागदपत्रांत मात्र त्यांचे नाव दिसत नाही.
लंडन येथील रॉयल कॉलेज ऑफ सर्जन्सचे सदस्यत्व त्यांना १८६१ साली मिळाले. मेलबर्न येथे आल्यानंतर स्थानिक प्रेस्बीटेरियन चर्चच्या लोकांनी त्यांचे स्वागत केले. पोर्ट अल्बर्ट येथे १८६४ साली धर्मगुरु म्हणून त्यांचा दीक्षाविधी झाला.
सिडनी येथील युनिव्हर्सिटी ऑफ सिडनी येथे पौर्वात्य भाषा आणि साहित्य या विषयांवर अरेबिक ही मुख्य भाषा ठेवून व्याख्यातेपद निर्माण केले होते, त्या पदावर १८६६च्या डिसेंबर महिन्यात बेग यांची नियुक्ती झाली. अशाप्रकारे ऑस्ट्रेलियात पहिल्यांदाच पौवार्त्य संशोधनासाठी एक विभाग स्थापन झाला होता.
त्याशिवाय पौर्वात्य भाषांसाठी अनुवादक म्हणून ऑस्ट्रेलियन सरकारने बेग यांची नेमणूक केली, मात्र विद्यार्थ्यांच्या पुरेशा संख्येअभावी हे व्याख्यातेपद काही काळच टिकले. नॉर्थ कॅरोलिनातील ग्रीनव्हिल येथील बॅप्टिस्ट कॉलेजने त्यांना १८६४साली मानद डॉक्टर ऑफ लॉ (एलएलडी) पदवी प्रदान करुन त्यांच्या विद्वत्तेचा सन्मान केला.
वझीर बेग ऑस्ट्रेलियात प्रेस्बीटेरियन चर्चचे धर्मगुरू बनले. बेग यांच्या या आध्यात्मिक जीवनक्रमातील या घटनेचे जॉन टॉरेन्स या लेखकाने आपल्या पुस्तकात भारतातील त्याकाळच्या एका महत्त्वाच्या राजकीय घटनेशी तुलना केली आहे.
एका भारतीय नेत्याची लंडनमधल्या हाऊस ऑफ कॉमन्समध्ये कायदा करण्यासाठी निवड झाली आहे असे या लेखकाने म्हटले आहे. ब्रिटिश संसदेत पहिले भारतीय नागरीक (१८९२-९५) म्हणून निवड होणाऱ्या दादाभाई नौरोजी यांचा हा संदर्भ आहे हे उघड आहे.
क्विन्सलँड येथील प्रेस्बीटेरियन चर्चमध्ये १८६७ साली काही काळ धर्मगुरु म्हणून काम केल्यानंतर बेग चालमर्स चर्चचे प्रमुख होते. या पदाचा त्यांनीं १८८२ साली राजीनामा दिला. प्रेस्बीटेरियन चर्चच्या युतीचे ते खांदे समर्थक होते आणि चर्चच्या अनेक समित्यांवर त्यानीं काम केले. बेग यांनी लिहिलेल्या
सरकारने आमच्या मिशनला रक्कम दिली नव्हती तरी आमच्या शाळेत १८६२ च्या मे महिन्यात मुलींची संख्या तिनशेपर्यंत वाढली होती.

मॅन्युअल ऑफ प्रेस्बीटेरियन प्रिन्सिपल’ चे सिडनी येथे १८७० साली प्रकाशन झाले. रोमन कॅथोलिक पंथाचे बेग कट्टर विरोधक होते.
बेग यांचा विवाह मार्गारेट रॉबर्टसन स्मिथ यांच्याशी १२ मार्च १८७२ रोजी झाला होता आणि त्यांना दोन मुले होती.
रेव्हरंड वझीर बेग यांचे वयाच्या ५८ व्या वर्षी त्यांचे ४ जानेवारी १८८५ रोजी निधन झाले आणि वेव्हर्ले कबरस्थानांत त्यांना चिरविश्रांती देण्यात आली.
मुस्लीम समाजातील मुलींना आधुनिक पद्धतीचे शिक्षण देण्याच्या कार्यांत स्कॉटिश मिशनच्या वझीर बेग यांना यश आले नाही, तरी काही वर्षांनी स्कॉटिश मिशनच्याच मिशनरींना या कार्यांत अगदी भरीव यश मिळाले.
जोतिबा फुले यांचे एक प्रेरणास्थान असलेल्या,पुण्यातल्या संस्कृत कॉलेजचे म्हणजे आताच्या डेक्कन कॉलेजचे काही काळ प्राचार्य (व्हिझिटर) असलेल्या रेव्हरंड जॉन मरे मिचेल यांनी पुण्यात केवळ मुस्लीम मुलींसाठी एक शाळा सुरु केली होती. या शाळेस मुस्लीम मुलींचा नुसता चांगलाच प्रतिसाद लाभला नाही तर या शाळेची असलेली फी भरण्याससुद्धा मुलींचे पालक तयार होते.
भारतात लोकांचा मुलींच्या शिक्षणा बत असलेल्या दृष्टिकोनाबाबत आणि स्कॉटिश मिशनच्या मुस्लिम मुलींसाठी चालवलेल्या स्वतंत्र शाळेबाबत विस्तृत माहिती जॉन मरे मिचेल यांनी आपल्या आत्मचरित्रात लिहिली आहे. ती अशी :
`
ब्राह्मण आणि इतर जातींचे लोक आपल्या मुलांच्या शिक्षणाबाबत खूप उत्साही होते तरी आपल्या मुलींच्या शिक्षणाबाबत ते बेफिकीर होते. मिशनरींच्या आणि स्टुडंट्स सोसायटी ऑफ बॉम्बेच्या उदाहरणामुळे स्थानिक लोकांनी याबाबत पुढारी घेतला आणि सरकारने त्यांना सर्व प्रकारचे उत्तेजन दिले. यासाठी सरकारने दक्षिणा फंडातून दरवर्षी सहाशे रुपयांची रक्कम पुरवली. मात्र या शाळांत मुलींची संख्या फक्त दिडशे होती. सरकारने आमच्या मिशनला रक्कम दिली नव्हती तरी आमच्या शाळेत १८६२ च्या मे महिन्यात मुलींची संख्या तिनशेपर्यंत वाढली होती.
सर्वांत खास बाब म्हणजे आमच्या मिशनची एक मुस्लिम समाजातील मुलींसाठी एक स्वतंत्र शाळा होती आणि या शाळेचा संपूर्ण खर्च या विद्यार्थिनींनी दिलेल्या फिमधून चालवला जात होता.
या शाळेत विद्यार्थिनींची संख्या सत्तर होती. त्याकाळात केवळ मुस्लिम मुलींसाठी चालवली जाणारी पुण्यातील ही एकमेव शाळा होती.''
त्याकाळात शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांकडून फी घेणे ही एक विशेष बाब म्हणावी लागेल. याचे कारण एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला कोलकाता, नंतर मुंबईत, अहमदनगर आणि पुण्यात ख्रिस्ती मिशनरींनी शाळा सुरु केल्या तेव्हा शाळेतल्या मुलांमुलींसाठी अन्न, कपडेलत्ता किंवा काही रक्कम यासारखे आमिष देणे आवश्यक असायचे.
नंतरच्या काळातसुद्धा म्हणजे अगदी जोतिबा आणि सावित्रीबाई फुले यांनासुद्धा आपल्या शाळांत विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी असे करावे लागत असे.
मुंबईत आणि पुण्यातही मुलींच्या बोर्डिंग स्कुल्स चालवाणाऱ्या जॉन मरे मिचेल यांच्या पत्नी मारिया मॅकेन्झी मिचेल यांनी या संदर्भात एक मजेशीर टिपण्णी केली आहे.
भारतातील मुस्लीम समाजातील काही समाजसुधारकांनीसुद्धा केवळ मुस्लीम मुलींसाठी शाळा सुरु केल्या होत्या, मात्र त्यासाठी खूप काळ जावा लागला होता. त्यादृष्टीने अव्वल ब्रिटिश अमदानीच्या काळात वझीर बेग आणि जॉन मरे मिचेल यांची ही कामगिरी फार मोलाची असे म्हणावे लागेल.
भारतातील स्त्रीशिक्षणाच्या इतिहासात रेव्हरंड वझीर बेग आणि रेव्हरंड जॉन मरे मिचेल यांनी केलेले हे महत्त्वाचे योगदान कदाचित विस्मृतीत गेले असते. मात्र स्कॉटिश मिशनसंबंधीच्या दस्तऐवजांत आणि विविध पुस्तकांत मुस्लीम मुलींसाठी असलेल्या या शाळांबाबत उल्लेख आढळतो. त्यामुळे वझीर बेग आणि जॉन मरे मिचेल यांच्या या ऐतिहासिक कार्याची नोंद राहिली आहे.
Camil Parkhe, January 25, 2024

‘आठवणी व संस्मरणे’ : स्वातंत्र्यपूर्व काळात समाजाची निरलस सेवा करणाऱ्या बहुजन समाजातील एका कर्तबगार स्त्रीची, ‘भगिनी जनाक्का’ची जीवनकथा
https://www.aksharnama.com/client/granthnama_article_detail/7030