History Samadhan Mahajan
10.3K subscribers
611 photos
10 videos
131 files
299 links
इतिहासाचा टेलिग्राम ग्रुप
(Add ur friends)
https://t.me/historysamadhanmahajan

@SRMAHAJAN
Download Telegram
Forwarded from Kapil pawar geography
Audio from kapilpawar84
Forwarded from Kapil pawar geography
Mangroves forest ...


२६ जुलै.. mangroves वने परिसंस्था संवर्धन दीन

विश्वास पाटील हे साहित्यातील मोठे नाव. त्यांचे आतापर्यंत प्रकाशित झालेले अपवाद वगळता सर्व साहित्य माझ्या वाचनात आले आहे. पण विश्वास पाटलांनी अण्णा भाउंवर लिहिलेले हे पुस्तक मला जास्त आवडले. यात संशोधन आहे. स्वतः लेखकाला असलेली आस्था दिसते. अण्णा भाऊंच्या अनेक कादाबार्यांचा आढावा आहे. त्याचे रसग्रहण आहे.
या पुस्तकातून अनेक गोष्टी कळतात. ज्या मला महत्वाच्या वाटल्या त्या अशा-
1930-31 च्या काळात अण्णांचे वडील भाऊ साठे आपले कुटुंब घेऊन वाटेगाव ते मुंबई हा प्रवास पायी करतात. हा प्रवास जीवघेणा आहे त्या काळात तो खूपच बिकट होता शिवाय परिस्थिती गरिबीची. तेव्हाचे वाटेगाव हे कुरुंदवाडी संस्थानात होते.
फकीरा ही कादंबरी अण्णांनी 1959 मध्ये लिहिली. व्यक्तिरेखा राधा व विष्णूपंत कुलकर्णी या व्याक्तीरेखांबद्द्ल खांडेकरांनी देखील कौतुक केले होते.
14 मार्च 1931 रोजी प्रदर्शित झालेला पहिला बोलपट आलमआरा. गिरगावच्या मेजेस्टीक सिनेमात अण्णांनी पाहिला होता. तेव्हा पालव नावाच्या एका तरूणाकडून त्यांनी तिकीट मिळविले होते. कालांतराने तो पालव नावाचा तरुण पैलवान 'मास्टर भगवान' या नावाने मोठा नट बनला.
1938 मध्ये अनेक दिवस चाललेल्या संपामुळे अण्णांनी मुंबई सोडली. गावी आले. 1925 च्या कायद्याने मांग जमातीला गुन्हेगार जमातीच्या यादीत टाकले होते. त्यामुळे आता जगणे अधिकच वाईट झाले होते.
अण्णांच्या आईचे नाव वालूबाई साठे, मोठ्या भावाचे नाव शंकर व दोन बहिणी होत्या. मे 1940 मध्ये त्यांचे लग्न झाले. कोंडूबाई उर्फ कोंडाबाई यांच्याशी त्यांचा विवाह झाला. अण्णांचा दुसरा विवाह जयवंताबाई दोडके यांच्याशी झाला होता. गायन आणि अभिनयाच्या आवडीसोबतच दांडपट्ट्यासारखा मैदानी खेळ ते खेळत असे. त्यात त्यांना आवड होती. शंकर भाऊ साठे त्यांच्या मुलाखतीत म्हणतात अण्णा भाऊ स्वतः जिवंत नाग पकडत व त्यांना खेळवतसुद्धा.
अण्णाभाऊ म्हणतात 'मी फार वाचतो. कारण वाचन हे लेखकाच्या उद्योगाला पोषक असते. ते जर नसेल तर चांगली साहित्यनिर्मिती शक्य नाही.'
1938 मध्ये वाटेगावला आलेले अण्णा 1942 मध्ये पुन्हा मुंबईत गेले. या मधल्या काळात त्यांनी प्रचंड वाचन केले.
एक मे 1942 या जागतिक कामगार दिनाच्या दिवशी मुंबईत जन नाट्य परिषदेची अर्थात ईपटाची IPTA ची स्थापना झाली. ( IPTA - Indian people's Theater Association. ) मे 1943 मध्ये तिला भारतीय स्वरूप देण्यात आले. मुंबईतील इपटाच्या संस्थापक सदस्यांमध्ये लेखक ख्वाजा अहमद अब्बास, शास्त्रज्ञ डॉक्टर होमी भाभा, अण्णाभाऊ साठे, अली सरदार जाफरी, श्री सरमाळकर आणि अनिल डिसिल्वा यांचा समावेश होता. लवकरच रांगडा ढोल वादक हे या संस्थेचे मानचिन्ह बनले. पुढे सांस्कृतिक जगाला जाग आणणारी ही देशातील अग्रगण्य संस्था बनली. काही वर्षातच हिंदी कवी कैफी आझमी, मजरुह सुलतानपूरी, साहिर लुधियांवी, बलराज सहानी, ईस्मत चुगताई, शैलेंद्र, सलील चौधरी आदी मंडळी IPTA मध्ये शामिल झाली.
इप्टाच्या अभ्यासमंडळाची शिबिरे अलाहाबाद, कानपूर, कलकत्ता आदि ठिकाणी होत त्यांचे सन्मानाचे अध्यक्षस्थान अण्णा भाऊकडे राहत असे. अण्णाभाऊ साठे तेव्हा फक्त तेवीस चोवीस वर्षांचे होते.
कम्युनिस्ट पक्षाचे तेव्हाचे नेते श्रीपाद अमृत डांगे हे अण्णांसाठी दैवत होते. त्यांचा मोठा प्रभाव अण्णांवर होता. अण्णा भाऊंना लिहिते ठेवण्यासाठी कम्युनिस्ट पक्षाकडून लेबर कॅम्पात त्यांच्या भाडेकरू संघाच्या ताब्यात असलेली खोली उपलब्ध करून देण्यात आली होती. पार्टीला फंड साठी दोन लाखांची रक्कम उभी करायची होती तेव्हा माझ्याकडे पैसे नाहीत, मात्र पोवाडा आहे असे अण्णांनी वरिष्टांना सांगितले होते.
तिसरी कसम व इतर प्रसिद्ध हिंदी गाण्यांचे गीतकार कवी शैलेंद्र हे अण्णा भाऊंचे चांगले मित्र होते. शैलेन्द्र हे सुरुवातीला रेल्वेच्या माटुंग्याच्या मेकेनिकल विभागात एक शिकाऊ उमेदवार म्हणून दाखल झाले होते पण त्यांचे मन तिथे रमले नाही. संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या काळात अण्णांच्या आग्रहासत्व कवी शैलेन्द्र यांनी 'जाग मराठा आम जमाना बदलेगा' हे गीत लिहिले जे शाहीर अमर शेख यांच्या आवजात म्हटले जायचे.
तीसच्या दशकात मुंबईत अनेक आंबेडकरी जलसे स्थापन झाले होते. ज्यात अडागळे, साळवे, केरुजी बेगडे, भीमराव दादा कर्डक, जगताप, भालेराव मंडळींचे जलसे होते. आंबेडकरी विचार सामान्य अशिक्षित जनतेपर्यंत पोहचविण्याचे काम या जलशांनी केले. पूर्वीचे सत्यशोधकीय जलसे हे आंबेडकरी जलशांचे प्रेरणा स्थान होते.
1946 मध्ये अण्णाभाऊ दोन महिने तुरुंगात होते. आजारातून बरे झाल्यावर फेब्रुवारी 1968चा महिना अण्णा भाऊंनी जळगावमध्ये काढला. त्यांच्या वडिलांचे मित्र साधू साठे यांचे चिरंजीव दिनकर साठे विक्रीकर विभागात होते ते आग्रहाने अण्णांना जळगावला घेऊन गेले.
अण्णा भाऊ साठे यांचा मृत्यु 18 जुलै 1969 ला हृदय विकाराच्या धक्क्याने झाला. त्यांना अवघे 49 वर्षांचे आयुष्य लाभले. अण्णांच्या अंत्य यात्रेत दया पवार, नारायण सुर्वे, अर्जुन डांगळे, वामन होवाळ आदी मंडळी उपस्थित होती.
त्या आधी आचार्य अत्रे यांचे 13 जून 1969 रोजी निधन झाले होते. अण्णांच्या मनावर त्याचा मोठा परिणाम झाला होता. ते अधिकच हळवे झाले. अत्रे गेल्यानंतर शिवाजी पार्क च्या त्यांच्या घराच्या परिसरात अत्र्यांच्या सदनाकडे डोळे लावून घळाघळा रडत राहायचे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत लढतांना ते अत्रेंना मोठ्या भावा प्रमाणे मानायचे. " भाऊ गेला आता आमची मराठी भाषा पोरकी झाली" असे ते म्हणत. अत्रेंच्या निधना नंतर शासनाने त्यांची कदर केली नाही याचे अण्णांना प्रचंड दुःख होते. अर्थात अण्णांनंतर देखील वेगळे काय झाले होते.
29 ऑगस्ट 1969 रोजी पुणे सोलापूर रस्त्यावरील इंदापूर जवळ शाहीर अमर शेख यांचे मोटार अपघातात निधन झाले. संयुक्त महाराष्ट्र चळवळ गाजविणाऱ्या या तीन महनीय व्यक्तींचा मृत्यु एकाच वर्षी जून जुलै व ऑगस्ट या तीन महिन्यात एका पाठोपाठ एक झाला.
अण्णा भाऊंचे साहित्य-
अण्णा भाऊंच्या एकूण कथांची संख्या 170 च्या आसपास भरते. त्यातील जवळपास 55 कथा स्रीविश्वावर आहेत असे लेखकाचे म्हणणे आहे.
आधुनिक अश्वथामा नावाची कथा त्यांनी भाषावार प्रांतरचनेच्या प्रश्नावरून मराठी व गुजराथी समाजात उद्भवलेल्या उद्रेकावर लिहिली आहे.
अण्णा भाउंनी मक्झीम गॉर्कीला आपले साहित्यातील गुरु व आदर्श मानले होते. त्यांच्या टेबलावर गॉर्कीचा पुतळा ठेवलेला असायचा.
संयुक्त महारष्ट्र चळवळीचे गीत बनलेली लावणी 'माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होतीय काहिली' हि अण्णा भाउंनी 1955 मध्ये लिहिली. शाहीर अमरशेख यांनी ती जानेवारी 1956 मध्ये पहिल्यांदा लोकांपुढे म्हटली.
कादंबऱ्या
चित्रा (1951)
चंदन (1959)- कामगारनायिका म्हणून चंदनचे चित्रण.
वैजयंता (1959)- यावर चित्रपट आला ज्याचे दिग्दर्शक गजानन जहागीरदार हे होते. नायिका जयश्री गडकर या होत्या तर गाणी माडगुळकर यांनी लिहिली होती व वसंत पवार यांनी संगीत दिले होते.
आवडी (1961)- या कादंबरीवर 'टिळा लावते मी रक्ताचा' हा चित्रपट आला. तो २८ जुलै 1969 रोजी प्रदर्शित झाला. त्याच दिवशी त्यांचा मृत्यू झाला.
आग (1962)
माकडीचा माळ (1963)
फुलपाखरू (1967)
आघात (1968)
वारणेचे खोरे
फकीरा- 1961 मध्ये महारष्ट्र शासनाचा उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार मिळाला. तसेच दिग्दर्शक कुमार चंद्रशेखर यांनी त्यावर चित्रपट केला होता. सुर्यकांत मांढरे प्रमुख भूमिकेत होते. तसेच हिंदी अभिनेते जयराज व सुलोचनाबाई फकिराच्या आई वडिलांच्या भूमिकेत होते. तसेच सावळारामची भूमिका स्वतः अण्णांनी केली होती.
कथासंग्रह
चिरागनगरची भुते (1958)
गजाआड (1959)
बारबाद्या कंजारी (1960)
नवती
ठासलेल्या बंदुका (1961)
वरील सर्व संदर्भ हे विश्वास पाटील यांच्या अण्णा भाऊंची दर्दभरी दास्तान या पुस्तकातील आहेत.
- समाधान महाजन
निशिकांत अनंत भालेराव

वडील गांधीवादी होते. 'गांधी आमचा कोण लागतो?' या त्यांच्या लेखाने अनेकांच्या डोळ्यात पाणी यायचे. पण आमच्या घरी मात्र लोकमान्य टिळक यांचाच एक जोरकस फोटो होता, मोठया साईजचा.पाहिला की पटायचेच की ते 'राष्ट्रीय असंतोषाचे जनक' का होते ते. अतिशय स्फूर्तिदायी अशी ती फ्रेम होती. शिवाय वडिलांच्या साप्ताहिक मराठवाडा च्या सराफा येथील कार्यालयात त्यांच्या टेबलावर लोकमान्यांचा अर्धाकृती नऊ इंची स्मृतिचिन्ह होते. ते समोर ठेवूनच ते लिहीत असत. त्या चिन्हावरील अर्ध पुतळा फार तेजस्वी वाटायचा मला. पुढे शाळेत 'टिळकांच्या पुतळ्याजवळ' या कुसुमाग्रजांच्या कवितेतील ओळीं
'ती कणखर मूर्ती धीट मराठी थाट
आदळतो जीवर अजून पश्चिम-वात,
ती अंजिक्य छाती ताठर अन् रणशील.
जी पाहुनि सागर थबके, परते आत.'
आठवल्या की ते स्मृतिचिन्ह आठवायचे, आणि फोटोही.1966 मध्ये सराफा मधून'मराठवाडा'कार्यालय पैठण गेट भागात स्थलांतरित होताना हा अमूल्य ठेवा गहाळ झाला. त्याची बोचणी वडिलांना वाटत राहिली. पण तसे तेजस्वी 'स्मृतिचिन्ह'त्यांना मिळालेच नाही.15 ऑगस्ट 1968 ला साप्ताहिक मराठवाडा चे दैनिकात रूपांतर झाले. संस्थापक आ. कृ.वाघमारे यांच्या मृत्यूची हेडलाइन घेऊनच या दैनिकाचा जन्म झाला. नानासाहेब गोरे, आणि केसरी चे संपादक, लोकमान्यांचे नातू जयवंतराव टिळक प्रमुख पाहुणे होते.तेव्हा वडिलांना जयवंतराव यांच्या हस्ते एक 4 फुटी 'सोटा' भेट देण्यात आला होता असे म्हणत की नाठाळाच्या माथी मारण्यासाठी याचा वापर करावा. त्या कार्यक्रमातील भाषणात वडिलांनी जयंतराव यांच्याकडे लोकमान्यांच्या टेबलावरील मोमेंटो ची मागणी केली होती.पण पुढे सगळ्यांनी खूप शोध घेऊनही त्यांना हवे असलेले 'लोकमान्य' मिळाले नाहीत.1988 मध्ये केसरी ट्रस्ट ने काही मोमेंटो बनवले त्यातील एक आमच्याघरी आला जो वडिलांना पसंद पडला नाही. 'आमच्या मनात लोकमान्यांची जी प्रतिमा आहे तिच योग्य आहे, या मोमेंटो मध्ये तो प्रभाव नाही' असे ते म्हणाल्याचे आठवते.

वडिलांकडे महात्मा गांधी च्या पत्रव्यवहाराचे खंड होते. त्यातील फक्त लोकमान्य टिळक यांना लिहिलेल्या पत्राच्या पानातच बुकमार्क ठेवलेले होते.लोकमान्य हे गांधीजी पेक्षा 13 वर्षांनी मोठे होते. आणि लोकमान्य यांच्या मृत्यू आधी चार-पाच वर्षे गांधीजी च्या राजकिय -सामाजिक सहभागाचा प्रारंभ होत होता. मला हे फार इंटरेस्टिंग वाटायचे. कारण त्या दोघांची मतभिन्नता आणि ब्रिटिश राजवट उलथवून टाकण्याबाबतच्या दृष्टीकोनात असलेला फरक. त्या खंडात एक पत्र आहे(The Collected Works Of Mahatma Gandhi:Tilak Vol 15) ज्यात गांधीजी नी टिळकांना लिहिलंय की 'तुम्ही माझ्या मुलाखतीचा जो मसुदा आणि संदर्भ मला पाठवलेत, ते तसे नाहीच. माझे नाव, एखाद्या मुलाखतीला, लेखाला वापरण्याचा अधिकार मी कोणालाच दिलेला नाही. मुळात काँग्रेस ला काय म्हणायचे आहे तेच मला ठाऊक नाही कारण मी काँग्रेस मध्ये आत्ता नाहीच आहे. माझे म्हणणे वेगळे होते, तुम्ही वेगळे म्हणत आहात, तेव्हा मुलाखत प्रसिद्ध न करणे उत्तम. शिवाय आपण खाजगी चर्चा विनिमय करत होतो.ती तशीच राहणे उचित आहे. मला काही मित्रांनी कार्यक्रमाचे निमंत्रण दिले म्हणून मी आलो होतो. तुमच्या समोर मी एक अस्थायी प्रस्ताव ठेवला होता इतकेच. तेव्हा माझ्या इच्छेला आपण मान द्याल आणि अनावश्यक वृत्तपत्रीय वादात मला ढकळणार नाही अशी आशा.(27 जुलै 1915)
दुसरे एक पत्र 25 ऑगस्ट 1918 चे. लोकमान्यांनी गांधीजींना आजारपणातून बरे होण्यासाठी ,तशा सदिच्छा देण्यासाठी लिहिले होते. त्याच्या उत्तरात गांधीजी म्हणतात ' तुम्ही पत्रातून माझ्या तब्येतीची काळजी दाखवली आणि सहानुभूती व्यक्त केली ते अपेक्षितच होते. कारण तुम्हाला माझी काळजी कशी काय वाटणार नाही.?माझे दुखणे कमी झालेय, पण काही दिवस पडूनच रहावे लागणार आहे. मी काँग्रेस च्या म्हणा किंवा मवळांच्या अधिवेशनास येणार नाहीय. कारण तुम्हाला ठाऊक आहे.तुमची आणि श्रीमती बेझंट यांची मते माझ्या पेक्षा वेगळी आहेत.(मौंटेग्यू चेम्सफोर्ड योजना संदर्भात)मवाळांच्या विषयी आणि कृती कार्यक्रमा विषयीही माझी मते वेगळी आहेत. आपणही 'सत्याग्रह' हे दुर्बळांचे हत्यार आहे असे म्हणता, माझे मत भिन्न आहेच.मवाळ आणि जहाल यांना एकत्र बांधण्यात मला रस नाही. मला तुमच्या आणि कोणाच्याच आड यायचे नाहीय. प्रत्येकाने आपली भूमिका सरकारपुढे मांडावी असे वाटते.-मोहनदास'
31 मे 1919 रोजी गिरगाव मधील शांताराम चाळीत गांधीजींचे लोकमान्यांच्या सन्मानार्थ भाषण झाले. व्हॅलेंटाइन चिरोल यांच्या विरुद्धच्या खटल्यात लोमान्यांना जो त्रास झाला, त्यांचा जो खर्च झाला त्याबद्दल ही सभा होती. ज्यात गांधीजींनी लोकांना आवाहन करून फंड जमा केला. लोकमान्यांच्या देशसेवे विषयी आणि भूमिकेबद्दल जी प्रशंसा गांधीजींनी केली ती उभयता मधील वैचारिक प्रगल्भता दर्शवते.
31 जुलै 1920 च्या सायंकाळी जेव्हा गांधीजींना समजले की लोकमान्य अस्वस्थ आहेत आणि उपचाराला प्रतिसाद देत नाहीत. तेव्हा संपूर्ण रात्र त्यांनी जागून काढली, प्रार्थनेत ते मनाला दिलासा देत राहिले. महादेव भाई रात्री उठले आणि त्यांनी गांधीजींना खिन्न पाहिले तेव्हा विचारले बापू कसली चिंता करताय?गांधी म्हणाले ' लोकमान्य नाहीत ही कल्पनाच करवत नाही, उद्या आणि या पुढे लढ्यात आणि स्वातंत्र्यसंग्रामात जे प्रश्न संकटे, अडथळे येतील तेव्हा मार्ग कोण सुचवणार,? दिशा कोण दाखवणार आम्हाला! लोकमान्य नसतील तर मला आधार कोणाचा?'

- निशिकांत अनंत भालेराव
चले जाव!

महात्मा गांधींच्या संयत स्वभावाच्या हे विपरीत होतं.
पण, गांधींनी ८ ऑगस्ट १९४२ ला केलेलं भाषण ऐतिहासिक होतं. मुंबईच्या गवालिया टॅंकवरून गांधींनी ब्रिटिशांवर हल्ला चढवला आणि 'चले जाव' अशी घोषणा देशभर दुमदुमली. 'माझ्या आयुष्यातलं हे सगळ्यात मोठं आंदोलन आहे', असं म्हणतानाही, 'व्यक्तिगत कोणाविषयीही माझ्या मनात वैरभावना नाही', हे सांगायलाही गांधी विसरले नाहीत.

दुसरं महायुद्ध सुरू होतं हे खरं, पण इंग्रज एवढेही व्यस्त नव्हते. त्यांनी गांधींसह कॉंंग्रेसचे सगळे प्रमुख नेते तुरूंगात धाडले. तेव्हा रुझवेल्टची अमेरिका वगळता कोणीही गांधींसोबत नव्हते. गांधी त्या अर्थाने एकटे होते. मात्र, कधी नव्हे त्या आक्रमकतेने गांधी स्वातंत्र्यासाठी आग्रही होते. अर्थात, दुस-या महायुद्धाच्या निमित्ताने ब्रिटिशांची कोंडी करायचीच, पण जर्मनी- इटलीच्या फॅसिझमला विरोध करायचा, हे त्याहून महत्त्वाचं, ही कॉंग्रेसची भूमिका होती. नेताजी सुभाषचंद्र बोसांच्या मनात मात्र, 'जर्मनी-इटली-जपान' यांची मदत घेऊन इंग्रजांपासून देश स्वतंत्र करून घ्यायचा, असं होतं. त्यासाठी त्यांनी फक्त आझाद हिंद सेनाच नाही, 'गव्हर्नमेंट इन एक्साइल' असं सरकार स्थापन केलं. पुढं जपानच्या मदतीनं नेताजींनी अंदमान- निकोबार स्वतंत्रही केलं. पण, ब्रिटिशांनी दीडशे वर्षांत केले नसतील, एवढे अत्याचार जपान्यांनी अंदमानवर केले, तेव्हा कदाचित बोसांना या व्यूहरचनेतील गडबड समजली असेल.

'क्रिप्स मिशन' हा बुडणा-या बॅंकेचा 'पोस्ट-डेटेड चेक' आहे, अशा शब्दांत गांधींजींनी इंग्रजांना ठणकावले आणि अखेर 'चले जाव'ची घोषणा करत 'जिंकू किंवा मरू' असे देशाला सांगितले.

आणखी एक सांगायला हवं.
'चले जाव' ही घोषणा 'कॉइन' केली ती थोर स्वातंत्र्यसेनानी आणि समाजवादी नेते युसुफ मेहेर अली यांनी. हे तेच, ज्यांनी 'सायमन गो बॅक' ही घोषणा शब्दबद्ध केली होती! तेव्हा मौलाना आझाद कॉंग्रेसचे अध्यक्ष होते.

हे सगळं धगधगतं अग्निकुंड पेटलेलं असताना 'हिंदू महासभा' ही आज स्वतःला देशभक्त समजणारी संघटना या आंदोलनापासून केवळ दूर नव्हती. उलटपक्षी, ती या 'चले जाव' आंदोलनाला विरोध करत होती. ब्रिटिशांना अधिकृतपणे पाठिंबा देत होती. 'ब्रिटिशांच्या सैन्यात भरती व्हा', असे आवाहन हिंदू महासभा करत होती.
बॅ. वि. दा. सावरकर यांची तेव्हाची भाषणे वा श्यामाप्रसाद मुखर्जींची विधाने तेच सांगतील. मुस्लिम लीगसोबत तीन ठिकाणी सत्तेत असलेली हिंदू महासभा त्या वेळी फक्त सत्ता उपभोगत होती.

सावरकर तेव्हा हिंदू महासभेचे अध्यक्ष होते आणि ते 'चले जाव'च्या विरोधात ठामपणे होते. ब्रिटिशांच्या बाजूने त्याहूनही अधिक ठोसपणे सावरकर उभे राहिलेले होते. गोळवलकर गुरूजी तेव्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक होते. त्यांनीही 'चले जाव'वर बहिष्कार घातला, तर हिंदू महासभेच्या मुंजेंनी जाहीरपणे इंग्रजांना सांगितले होते: "ब्रिटिश आणि हिंदुत्ववादी हे सदैव एकमेकांसोबत असतील. तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवा."

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक परिवर्तनाच्या आणि समतेसाठीच्या लढ्यात त्या वेळी गुंतले होते. त्यांच्यालेखी तो लढा मुख्य होता. केवळ ब्रिटिश गेल्याने क्रांती होणार नव्हती. आणि, ते खरेच होते. खुद्द नेहरूंनीही 'डिस्कव्हरी ऑफ इंडिया'त तो मुद्दा अधोरेखित केला होता.
मात्र, इकडे सामाजिक परिवर्तनालाही विरोध आणि तिकडे ब्रिटिशांना पाठिंबा देत 'मुस्लिम लीग'सोबत 'चले जाव'ला विरोध करणारे फक्त हिंदू महासभा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हेच होते.

'चले जाव' आंदोलन ब्रिटिशांनी संपवलं, पण याच 'चले जाव'ने स्वातंत्र्याचा मार्ग प्रशस्त केला. क्रांतीचा रस्ता खुला झाला. ब्रिटिशांना 'चले जाव' म्हणतानाच, आपला संघर्ष साम्राज्यशाहीच्या विरोधात आहे, ब्रिटिश माणसांच्या विरोधात नाही, हे गांधींनी आवर्जून सांगितलं होतं.

आठ वा नऊ ऑगस्टच्या निमित्ताने सांगावे, असे 'त्यांच्याकडे' काही असणार नाही. म्हणून ते भलत्याच गोष्टी सांगत राहतील.
पण, तुम्हाला तरी हा इतिहास माहीत असावा!

- संजय आवटे
जीनांच्या वडिलांचे नाव जिना पुंजा आणि आईचे नाव मिठीबाई होते.

गांधी आणि महंमद अली जिना एकाच प्रदेशातील. दोघांच्या गावातील अंतर तीस-पस्तीस मैलांचे. गांधी हिंदू वैश्य समाजातील 'मोध' या जातीत जन्मले होते आणि वैश्यांच्या श्रेणीबद्ध जातीत त्यांच्या जातीचा क्रम खूप खालचा होता. त्यामुळे त्यांना जान्हवे घालण्याची परवानगी नव्हती. याउलट जिना यांचे आजोबा हे वैश्य समाजातील ' लोहाना ' या जातीचे होते. त्या जातीचा क्रम वरचा होता म्हणून त्यांना जानवे घालण्याची परवानगी होती. जीनांच्या आजोबांना त्यांच्या जातीने बहिष्कृत केल्यामुळे त्यांनी पुढे इस्मायली खोजा या पंथाचा स्वीकार केला. जिनांच्या वडिलांचे नाव जिना पुंजा आणि आईचे मिठीबाई. ही हिंदू पद्धतीचे नावे आहेत त्यांच्या संपूर्ण घराण्यात पहिले मुस्लिम नाव महम्मद अली जिना यांचेच होते.

- गांधी : पराभूत राजकारणी आणि विजयी महात्मा
रावसाहेब कसबे ( पेज नंबर१८३)
Combine मुख्य परीक्षा ,राज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षा, upsc पूर्व व मुख्य,सरळ सेवा ...

भारताचा भूगोल अभ्यास साठी परिपूर्ण सोर्स

भगीरथ भारत भूगोल

लेखक - कपिल पवार

प्रकाशन - भगीरथ, पूणे...

अत्यंत उपयुक्त व कमी वेळेत अभ्यास करता येईल या साठी रामबाण
ये है INDIA की युनिटी !
--------------------
काँग्रेससोबत मतभेद झालेले असले तरी आझाद हिंद सेनेच्या रेडिओवरून सुभाषचंद्र बोस आशीर्वाद मागतात गांधींचे. आझाद हिंद सेनेच्या पलटणीला नावं देतात गांधी आणि नेहरूंची. गांधींना 'राष्ट्रपिता' म्हणून संबोधतात बोसच. बोसांनी स्थापन केलेल्या इंडियन नॅशनल आर्मीवर जेव्हा खटला सुरू होतो तेव्हा बचाव करण्यासाठी वकील उभा राहतो त्याचं नाव असतं जवाहरलाल नेहरू !

कितीही मतभेद असले तरी गांधी बाबासाहेबांच्या नावाची शिफारस करतात संविधान सभेसाठी. बाबासाहेब गांधींचे टीकाकार असूनही स्वातंत्र्य लढ्यातलं त्यांचं योगदान मान्य करतात.

र धों कर्वे यांच्यावर जेव्हा खटला सुरू होता तेव्हा त्यांच्यासाठी लढणारे वकील बाबासाहेब आंबेडकर असतात आणि 'सुधारक' चालू रहावा याकरता आगरकरांना ५००० रुपयांची मदत देऊ करणाऱ्या राजाचं नाव राजर्षी शाहू महाराज असतं !

टिळकांवर राजद्रोहाचा खटला सुरू झाल्यावर महंमद अली जिना नावाचा इसम कोर्टात युक्तिवाद करत असतो आणि 'इंकिलाब जिंदाबाद' घोषणा देतो हसरत मोहानी अन ती घोषणा जगून लोकप्रिय करणा-या माणसाचं नाव असतं शहीद भगतसिंग.

१४ नोव्हेंबर १९४९ रोजी नेहरूंवरील गौरवपर ग्रंथाच्या प्रकाशनावेळी पटेल सांगतात, "लोक आम्हा दोघांना वेगळं करु शकत नाहीत, एवढे आम्ही जवळ आलेलो आहोत. आम्हा दोघांमधलं बंधुतुल्य प्रेम सर्वांना ठाऊक आहे. पंतप्रधान नेहरू हे राष्ट्रासाठी 'आयडॉल' आहेत, जनसामान्यांचे 'हिरो' आहेत. त्यांच्या प्रशंसेकरता माझ्याकडं पुरेसे शब्द नाहीत."

सरदार पटेल गेल्यानंतर १५ डिसेंबर १९५० ला नेहरूंनी जे स्टेटमेंट दिलं त्यात म्हटलं आहे:
" शेजारी बसून आम्ही दोघांनी किती काळ एकत्र व्यतीत केला, हे तुम्हाला ठाऊक आहेच. मी या रिकाम्या बाकाकडे पाहीन तेव्हा माझं एकटपण अधिक दाटून येईल. मी एकटा पडलो आहे, उदासीची पोकळी जाणवते आहे. आपण आपल्या स्वातंत्र्य चळवळीतला मोठा 'कॅप्टन' गमावला आहे."

अशी किती उदाहरणं सांगावीत !

ही आमच्या स्वातंत्र्य चळवळीतली 'युनिटी' आहे,
तिचा स्टॅच्यु करून ती टिकत नाही नि सेल्फी काढून वाढत नाही.
ती तर जिवंत गाथा आहे.
हाच INDIA आहे नि हाच भारतही.

त्यामुळे विद्वेष पेरणा-यांनो,
याद राखा
महापुरुष, क्रांतिकारक यांच्या योगदानासोबत खेळू नका. ती जितीजागती माणसं होती, काहीही घुसडायला ती कुठल्या कादंबरीतली पात्रं नाहीत !

म्हणून तर कवी म्हणतो:
“भारतमाते पुत्र शहाणे अमित तुला लाभले
तुझ्या कुशीला परि जन्मली काही वेडी मुले
काही वेडी मुले तयांची भडकूनी गेली मने
क्रांती पूजा केली त्यांनी रुधिराच्या तर्पणे"

भारतमाता की जय !
-
श्रीरंजन आवटे
१८०३ सालापासून इंग्रजांशी अथक युद्धे करत त्यांना भारतातून बाहेर हाकलण्यासाठी अविरत युद्धे करत राहिलेले भारतीय स्वातंत्र्याचे आद्य प्रणेते महाराजा यशवंतराव होळकर यांचे नाव सुवर्णाक्षरांनी लिहिले गेले आहे. त्यांनी मुकंदरा येथून आग्र्यापर्यंत पाठलाग करत मॉन्सनसारख्या कसलेल्या सैनानीची जी दुर्गती केली त्यामुळे इंग्लंडची पार्लमेंट हादरली. भारताबाबतची सर्व धोरणे त्यांना बदलावी तर लागलीच पण गव्हर्नर जनरल वेलस्लीसारख्या त्या काळात मुत्सद्दी मानल्या जाणा-या धुरंधराचीही हकालपट्टी करावी लागली. भरतपुरच्या युद्धाने तर इंग्रजांचे कंबरडे मोडले. हा सर्व लढा एकाकी राहिला कारण ब्रिटीशांचे मांडलिकत्व पत्करून ऐषारामाची सवय लागलेले भारतीय रजवाडे यशवंतरावांनी वारंवार आपल्या स्वातंत्र्य युद्धात सहभागी व्हा अशी आवाहने करूनही त्यापासून दूर राहिले. त्यामुळे हा लढा एकहाती झाला. पण यशवंतराव जिद्दी होते. भारतीय स्वातंत्र्य हा त्यांचा १८११मध्ये शेवटचा श्वास घेईपर्यंत त्यांचा ध्यास राहिला.

३ डिसेंबर १७७६ रोजी पुणे जिल्ह्यातील वाफगाव येथील किल्ल्यात त्यांचा जन्म झाला. युवावस्थेत ते प्रवेशले तेंव्हापासून त्यांच्यावर संकटांची वादळे कोसळू लागली. महायोद्धे सुभेदार तुकोजीराजे होळकर यांचे ते कनिष्ठ पुत्र. अहिल्यादेवींच्या वत्सल आणि धोरणी सहवासात त्यांची वाढ झाली. पण १७९५मध्ये दुर्दैवाने अहिल्यादेवी गेल्या. पिता तुकोजीराजे होळकर यांचे त्यानंतर अवघ्या दोनच वर्षात म्हणजे १७९७ मध्ये देहावसान झाले. याचा लाभ घेऊन दुस-या बाजीरावाने आपल्या बलाढ्य सरदारांची मदत घेत होळकर संस्थान हडप करण्याचा चंग बांधला. थोरले बंधू काशीराव बाजीरावाच्या कह्यात गेले. होळकर गादीचा लायक वारस मल्हारराव (द्वितीय) पेशव्यांची भेट घेऊन गादीचा मसला सोडवावा या विचाराने पुण्यात आपल्या बंधुंसह आले असताना मध्यरात्री अचानक हल्ला करुन खुन करण्यात आला. या हल्ल्यातुन वाचलेल्या यशवंतराव आणि त्यांचे बंधु विठोजी यांना जीव वाचवण्यासाठी पळून जावे लागले. नागपूरकर भोसलेंनी त्यांना आश्रय देण्याच्या नावाखाली कैदेत टाकले आणि त्यांना पेशव्यांच्या हवाली करण्याचा चंग बांधला. यशवंतरावांनी कडेकोट पहा-यातून, अकरा फुट उंचीच्या भिंतीवरून उडी मारून तेथून पलायन केले. खिशात दमडी नाही, फक्त अन्यायी पेशवाई संपवायची ही आकांक्षा. अशा अवस्थेत त्यांनी खिशात दमडी नसता, शिंदे-पेशव्यांचे सैन्य त्यांना पकडण्यासाठी मागे लागले असता, त्यांनी हिमतीने खानदेशातील भिल्लांची सेना उभारत केवळ आपल्या पराक्रमाच्या जीवावर कसलेल्या सेनानींशी युद्धे करत माळवा व महेश्वर जिंकून घेतले. होळकर संस्थान पेशव्यांच्या घशातून काढून घेतले. पेशवाईशी पूर्ण संबंध तोडण्यासाठी त्यांनी स्वत:चे स्वातंत्र्य घोषित केले. ६ जानेवारी १७९९ रोजी राज्याभिषेक करून घेत त्यांनी स्वत:ची राजमुद्रा घोषित केली. शिवरायांनंतर करून घेतलेला हा दुसरा आगळा राज्याभिषेक.



पेशवा गप्प बसला नाही. विठोजी होळकर यांनीही महाराष्ट्रात पेशवाईविरुद्ध उठाव केला. ब्रिटीश सैन्याची मदत घेऊन विठोजी होळकर यांचा पराभव करुन कैद करण्यात आले. शनिवार वाड्यासमोर हत्तीच्या पायाखाली चिरडून त्यांची निघृण हत्या केली गेली. यशवंतराव पुण्यावर चालून आले. हडपसर येथे महायुद्ध झाले. पेशवे व दौलतराव यांच्या सेनेचा समूळ विनाश केला. बाजीराव पेशवा घाबरून पळत सुटला तो सरळ इंग्रजांना शरण गेला. ३१ डिसेंबर १८०२ रोजी यशवंतराव त्यांना विनवण्या करत असतानाही वसईला त्यांच्याशी तह करून पेशवाईचा अस्त करून घेतला.

या क्षणापासून यशवंतराव इंग्रजांबाबत सावध झाले. इंग्रजांचा धोका विस्तारत चालला आहे हे त्यांच्या एव्हाना लक्षात आल्याने त्यांनी आपसांतील वैरभावाला मुठमाती देत, अगदी दौलतराव शिंद्यांशी व नागपुरकर भोसलेंशीही मेळ घालण्याचा प्रयत्न केला. देशभरच्या संस्थानिकांना पत्रे पाठवत, भेटत त्यांना भारत इंग्रजांपासुन स्वतंत्र करण्याचा चंग बांधला. पण यश मिळत नव्हते. सारे राजे-रजवाडे आपले मांडलिकत्व पत्करत असताना यशवंतराव का आपल्या बाजूने येत नाही या प्रश्नाने इंग्रजही चकित झाले. त्यांनी यशवंतरावाशी तह करण्याचा प्रयत्न केला तर यशवंतरावांनी त्यांना वाटाण्याच्या अक्षता दाखवल्या. शेवटी इंग्रजांनी १६ एप्रिल १८०४ रोजी युद्ध घोषित केले तर त्या युद्धाची सुरुवात यशवंतरावांनी केली. २२ मे १८०४ रोजी त्यांच्यावर चाल करून यायच्या तयारीत असलेल्या कर्नल फॉसेटच्या कुछ येथील तळावर अचानक हल्ला करून तेथील दोन बटालियन कापून काढल्या. इंग्रजांविरुद्ध सुरु केलेया स्वातंत्र्ययुद्धाची ही सलामी होती.
त्यानंतर एका पाठोपाठ एक अशा इंग्रजांशी कडव्या लढाया देत अशक्यप्राय वाटणारे विजय मिळवले. मुकुंद-याच्या युद्धात त्यांनी अभिनव युद्धतंत्र वापरत इंग्रजांची समुळ फौज कापुन काढली. याचे पडसाद इंग्लंडमधेही पडले आणि भारताबद्दलचे संपुर्ण धोरण बदलणे इंग्रजांना भाग पडले. "काय वाट्टेल त्या अटींवर यशवंतराव होळकरांशी शांततेचा तह करा..." असा आदेश घेऊन नवा गव्हर्नर जनरल भारतात आला. इकडे भरतपुरच्या युद्धात यशवंतरावांनी अजुन नव्या तंत्राने इंग्रजांना धुळ चारली. याच युद्धात सहभागी असणारे इंग्रज सेनानी नंतरच्या (१८१५ च्या) नेपोलियनच्या प्रसिद्ध वाटर्लू युद्धातही सामील होते आणि त्यांनी नोंदवुन ठेवलेय की ‘भरतपुरचे युद्ध वाटर्लुपेक्षा अवघड होते’. तेथपासुनच यशवंतराव व नेपोलियनची तुलना सुरु झाली.

"आधी देशाचे स्वातंत्र्य..." हा यशवंतरावांचा नारा १८०३ पासुन घुमला होता. पण या लढ्यात दुर्दैवाने कोणीही रजवाड्यांनी साथ न दिल्याने हा लढा एकाकीच राहिला. तरीही त्यांची विजयाची उमेद मिटली नाही. शीख तरी आपल्या युद्धात सामील होतील या आशेने जनरल लेक पाठीशी असतानाही पार लाहोर गाठले. पण त्यांनीही इंग्रजांच्या नीतीला बळी पडून यशवंतरावांना साथ देण्यास नकार दिला. पारतंत्र्याची मोहिनीच एवढी पडली होती कि स्वातंत्र्याचा अर्थच भारतीय रजवाडे विसरून गेले होते.

पण यशवंतराव नाउमेद झाले नाहीत. त्यांनी तात्पुरता इंग्रजांशी आपल्या अटींवर मैत्रीचा तह केला तो पुन्हा एकट्याच्या बळावर उभारी घेण्यासाठी. सारा देश सूप्त असतांना एक मनुष्य एकाकीपणे झुंजत होता, त्याला इंग्रज या भुमीवर नको होते. माळव्यात परत येताच त्यांनी सर्वप्रथम आपली राजधानी भानपुरा या आताच्या मंदसोर जिल्ह्यातील शहरात हलवली. आता कोणी आपल्याला तोफा देणार नाहीत याची खात्री पटल्याने तेथे त्यांनी तोफा ओतण्याचा मोठा कारखाना काढला. एक लक्ष प्रशिक्षित सैन्य उभारण्याच्या दिशेने त्यांनी वेगाने वाटचाल सुरु केली. कारखान्यात रात्रंदिवस तोफा ओतायचे काम सुरु होते. मेजर माल्कम हा यशवंतरावांचा कडवा विरोधक, पण तो म्हणतो, स्वत: यशवंतराव अनेकदा फाउंड्रीत तोफा ओतायचे काम करत असत. ध्येयाशी एवढी निष्ठा कोणातही आढळुन येणार नाही. आपल्या राज्यात आल्या आल्या, खरे तर एवढी दोन-अडिच वर्षांची दौड, सततची जीवघॆणी युद्धे, जीवावरची संकटे यातुन निघालेल्या कोणत्याही माणसाने शांततेचा उपयोग काही काळ तरी विश्रांतीसाठी केला असता...पण यशवंतराव खरच अजब रसायन होते. या मागे त्यांचे कारण होते...योजना होती.

हे लाखाचे सैन्य आणि दोनशे मोठ्या तोफा त्यांना हव्या होत्या...

कारण त्यांनी स्वत:च सरळ इंग्रजांची तत्कालीन राजधानी कलकत्त्यावर आक्रमणाची योजना आखली होती. देशाचे स्वातंत्र्य सर्वोपरी होते...स्वत:ची विश्रांती नाही! पण हे अथक कष्ट शरीराला किती मानवणार? १८११ मध्ये त्यांचा अकाल झाला. भारताच्या क्षितीजावर उगवलेल्या पहिल्या स्वातंत्र्यसूर्याचा अस्त झाला. कलकत्यावरील स्वारी राहूनच गेली. स्वतंत्र भारताने नेहमीच त्यांचे कृतज्ञतापूर्ण स्मरण केले पाहिजे.

-संजय सोनवणी
इंग्रजी राज्य भारतात स्थापन झाल्याबरोबर त्यालाअनेक मार्गांनी विरोध करणाऱ्यांमध्ये राजे उमाजी नाईक यांचं नाव अतिशय महत्त्वाचं आहे. आज त्यांच्या जयंतीनिमित्त सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात त्यांच्या स्मृती जागवल्या गेल्या.

इतिहास विभागातील आमचे सहकारी डॉ. राहुल मगर यांनी लंडनच्या ब्रिटिश लायब्ररीतून मिळवलेली उमाजी नाईक यांच्या पवाड्याची प्रत या निमित्ताने विद्यापीठाला दिली. ती जयकर ज्ञानस्रोत केंद्राच्या प्रमुख प्रा. डॉ. अपर्णा राजेंद्र यांनी मा. कुलसचिवांच्या उपस्थितीत स्वीकारली.

१८८८ मध्ये म्हणजे उमाजी नाईकांना इंग्रजांनी फाशी दिल्यानंतर ५६ वर्षांनी त्यांची स्मृती जागवण्यासाठी 'उमाजी नायकाचा पवाडा' शंकर गणपत चिंचणकर यांनी मुंबईत प्रकाशित केलेला आढळतो. 'येसुकवि' हे या पवाड्याचे कवी असावेत. १८५७ मधील इंग्रजविरोधी उठाव आणि १८७५ मधील दख्खनचे दंगे इंग्रजांनी निपटून काढल्यानंतरही लोकांच्या मनातील स्वातंत्र्याकांक्षा जिवंत रहावी यासाठी लोकस्मृतींचे पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न म्हणून या प्रकाशनाकडे पाहता येते.

१८१८ मध्ये पुणे परिसरात इंग्रजी राज्य स्थापन झाल्याबरोबर उमाजी नाईकांनी आपल्या सहकाऱ्यांसह इंग्रजांना विरोध सुरू केला. पण संस्थानिकांच्या आणि स्वकीयांच्या फितुरीमुळे त्यांचा प्रयत्न अल्पजीवी ठरला याचं वर्णन या पवाड्यात आहे.

सहा महिनें स्वारी हिंडली| किल्ल्याभोंताली | काही नाही लाभ हाताला | साहेब मनामधिं भ्याला | इंग्रज बुद्धिचे घर | करुन फीतुर | पत्र पाठविलें पंताला| द्या धरुन उमाजीला अवघें पंत मिळून| विचार करून| पत्र पाठविलें उमाजीला| नाईक यावें भेटीला उमाजी नाईक बोलला | आपल्या लोकांला| द्या घोडा बसायाला| जातों पंताच्या भेटीला घोड्यावर स्वार झाला| हातांमधिं भाला| चालून भोराला गेला| बैठक मुजरा केला तेव्हा पंत धनी बोलला | आपल्या लोकांला| धरा धरा उमाजीला| चावीकुलूप वाड्याला तेव्हां भुजाबा नाईक बोलला| आपल्या लोकांला| उशिर कां झाला दादाला| चला जाऊं दादाच्या भेटीला संगे पाच्छे तलवार | आगीचे घर| वाघनखचढविलें बोटाला| शूर मर्द तयार झाला घोड्यावर स्वार झाला| हातांमधि भाला| चालून भोराला गेला|तें दोन प्रहरि दंगा केला तेव्हा भुजाबा नाईक बोलला| पंत धन्याला| उमाजी दाखवां आह्मांला| कट्यार लाविन पोटाला| उमाजी म्हणे पंताला|भुजाबाने लाल डोळा केला|

मौखिक परंपरेने लोकस्मृतीत रुजलेली आणि एका भारतीय माणसाने सव्वाशे वर्षांपूर्वी प्रकाशित केलेली ही उमाजींची जीवनकहाणी म्हणजे एक दुर्मिळ ऐतिहासिक साधन आहे. ज्या इंग्रजांच्या विरुद्ध उमाजी लढले त्यांनीच जतन केलेल्या लंडनच्या ब्रिटिश लायब्ररीतून मिळवणाऱ्या डॉ. राहुल मगर यांच्या प्रयत्नांमुळे ते पुन्हा एकदा प्रकाशात येते आहे.