Niranjan blog वरून..
पोरींनो,
अभ्यास करायची संधी मिळत असेल तर त्या संधींचं सोनं करा.. तुमच्या प्रयत्नांमध्ये तसुभरही कमतरता ठेवू नका.. तुम्हाला सगळ्याच गोष्टी मोजून मापून मिळत गेल्यात आजवर अगदी अभ्यासासाठी वेळही मिळला तो ही मोजून मापूनच.. आजवर झालेलं तुम्ही बदलू शकत नाहीत पण आज तुम्हाला संधी आहे पुढच्या आयुष्य भरासाठी कुणाकडून तरी प्रत्येक गोष्ट मोजून मापून मिळविण्यातून सुटका करून घेण्याची.. स्वतःचं अस्तित्व घडविण्याची.. या नोकऱ्या सगळं काही नसतात हे मी नेहमीच सांगत आलोय पण तुमच्यासाठी मात्र या नोकऱ्या म्हणजेच सर्व काही आहे असं स्वतःला ठामपणे सांगून मोठ्या जिद्दीने अभ्यास करा. जग लाख बदललं असेल पण गावाकडच्या बाईसाठी तरी ते जग अजूनही खूप दूर आहे. सगळं जग बदलायच तेव्हा बदलेल आज तुम्हाला संधी आहे स्वतःपुरतं जग बदलण्याची.. ती सोडू नका.. तुम्हाला अभ्यासासाठी "मिळालेल्या" काळात नोकरी मिळवणं हे स्वतः समोरचं सर्वात मोठ्ठं ध्येयं ठेवा.. त्यापेक्षा काहीच आणि कुणीच महत्त्वाचं नाही हे नेहमी लक्षात ठेवा.. माझा अभ्यास होत नाही किंवा अभ्यासात मन लागत नाही असं म्हणण्यापुर्वी शंभर वेळा विचार करा तुमच्या सोबत शिकणाऱ्या त्या मुलीचा जीला दहावी नंतर शिकताच आलं नाही किंवा बारावी नंतर.. किंवा तीचाही जी खूप हुशार होती, जीने मोठ्या जिद्दीने ग्रॅज्युएशन पुर्ण केलं पण नंतर मात्र पुढे शिकता आलं नाही किंवा नोकरी मिळण्यापुर्वीच अंगावर इतर जबाबदाऱ्या पडल्या.. खरंच त्या मुलींचा विचार करत चला अधूनमधून.. अमर्त्य सेन missing women बद्दल बोलतात ना.. हे तसंच आहे.. missing women officers वगैरेही म्हणता येईल.. UPSC मध्ये 300+ मुली पास झाल्या, पहिल्या चार ranks मुलींनीच मिळवलेत हे खूप कौतुकास्पद.. तुम्हीही करू शकता हे खरंतर तुम्हाला करावच लागेल तुमच्याकडे पर्यायच नाही.. आर्थिक स्वावलंबन आणि सक्षमीकरण हीच गोष्ट शाश्वत आहे.. बाकी सगळं अवलंबित्व आहे म्हणूनच तर म्हणतोय तुम्हाला पर्याय नाहीये.. मी स्वतः पाहिल्यात अशा missing women officers.. गावाकडे येतो तेव्हा दरवेळी दिसतात.. दरवेळी मनात प्रचंड कोलाहल होते.. अभ्यासाची संधी मिळालेल्या पोरींना ओरडून ओरडून सांगावसं वाटतं हे सगळं.. म्हणून हा सगळा लेखन प्रपंच.. पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला नोकरी मिळवायचीच आहे.. ही इच्छा नाही तर गरज आहे.. एक नितांत महत्त्वाची गरज.. आणि हो, मोठी नोकरी मिळाल्यानंतर त्या पोरींसाठी जमेल ते, शक्य ते सर्व करा ज्यांना ही संधी मिळू शकली नाही🙏
~निरंजन🌿
#MissingWomenOfficers

संयुक्त मुख्य परीक्षा 2023 का संयुक्त पूर्व परीक्षा 2024 - एक द्विधा मनस्थिती
1. आपण जर 2-3 मुख्य परीक्षा दिल्या असेल तर मुख्य परीक्षेचा अभ्यास करावा.
2. मागील 2-3 पूर्व परीक्षा पैकी एक जरी पूर्व परीक्षा पास झाला असाल तर मराठी, इंग्रजी तसेच पूर्व परीक्षेवर अवलंबून असलेल्या मुख्य परीक्षेचा अभ्यास करावा.
3. जर 2-3 वर्षांपासून खराखुरा cut off पेक्षा 3-4 मार्क कमी पडत असेल आणि या वेळेचा पूर्व परीक्षेचा पेपर चांगला गेला असेल, तर मुख्य परीक्षेचा अभ्यास करा.
4. जर 2-3 वर्ष(वा त्याहून अधिक) आपण एकदाही पूर्व परीक्षा पास झालो नसेल आणि या वेळेला पहिल्या Ans.key प्रमाणे किमान 5 मार्क पेक्षा जास्त आपण मागील वर्षाच्या कट ऑफ ला कमी असाल तर डायरेक्ट पूर्व परीक्षा 2024 चा अभ्यासाला लागावे.
कारण पूर्व परीक्षा हाच मुख्य परीक्षेचा बेस आहे हे कधीच विसरता कामा नये. जर -पॉलिटीचा अभ्यास उत्तम रित्या झाला नसेल तर कायदा समजणारच नाही. -सामान्य विज्ञान चा बेस तयार झाला नाही तर, विज्ञान-तंत्रज्ञान समजणार नाही.
-इतिहास, पॉलिटी ,प्रशासन हा बेस क्लिअर झाला नाही तर, मानवी हक्क ,अधिनियम, माहितीचा अधिकार हे विषय समजणारच नाही.
जोपर्यंत आपला पूर्व परीक्षेचा अभ्यास योग्य पद्धतीने होत नाही तो पर्यंत आपण पूर्व परीक्षा पास होत नाही आणि तोपर्यंत मुख्य परीक्षेच्या अभ्यासाला तसे पाहिले तर काही विशेष महत्त्व प्राप्त होत नाही हे समजायला हवं.
Change in work is Rest या उक्तीप्रमाणे एखादा महिना मुख्य चा अभ्यास केला पूर्वला अनुसरून तर चालू शकेल परंतु; 6-6 महिने मुख्य चा अभ्यास तेव्हाच करा जेव्हा आपण पूर्व परीक्षा पास होतोय.
धन्यवाद
डॉ. अनिरुध्द क्षीरसागर, ऑर्थोपेडिक सर्जन.
स्पर्धा परीक्षा लेखक व समुपदेशक
वैद्यकीय अधिकारी विशेषज्ञ गट- अ (पात्र व निवड)

मी त्या फायटर ला घाबरत नाही जो 1000 वेगवेगळ्या प्रकारच्या किक मारू शकतो , पण त्या फायटर ला घाबरतो ज्याने एकाच प्रकारची किक हजार वेळेला प्रॅक्टिस केली आहे .
ब्रूस ली त्याच्या व्यूहरचनेबद्दल बोलताना .

शशिच्या मनातले : "एमपीएससी, क्लास आणि आपण..."
http://shashichyamanatale.blogspot.com/2023/06/blog-post.html?m=1

Blogspot
"एमपीएससी, क्लास आणि आपण..."
चुकीची मांडणी, चुकीचा इतिहास पसरवला जाण्याच्या काळात कागदपत्रे, प्रत्यक्ष भेटी, पुरावे, वास्तूंचा अभ्यास, लोककथा व परंपराचा अभ्यास या साऱ्यातून आकाराला आलेली शिवाजी महाराजांवरील, विश्वास पाटील लिखित महासम्राट ही कादंबरीमाला अत्यंत महत्वाची आहे. "रणखैंदळ"
https://samasdiary.blogspot.com/2023/06/blog-post_12.html
https://samasdiary.blogspot.com/2023/06/blog-post_12.html
Blogspot
महासम्राट - रणखैंदळ
वाचक ज्याची आतुरतेने वाट पाहत होते त्या विश्वास पाटील यांच्या बहुचर्चित महासम्राट मालिकेतील दुसरा भाग मे २०२३ मध्ये प्रकाशित झाला. साधारण ...
ऐसा ज्ञानसागरू : बखर मुंबई विद्यापिठाची
अरुण टीकेकर
दीडशे वर्षांपूर्वी कलकत्ता, मुंबई आणि मद्रास येथील विद्यापीठे स्थापन झाली. त्यापूर्वीच मुंबई ही देशाची अनभिषिक्त आर्थिक राजधानी झाली होती. मुंबई हे शहर जगाची पूर्वेकडील व्यापारपेठ होती. उद्यमामुळे झालेली आर्थिक प्रगती आणि नामवंत गुरु शिष्यांच्या जोड्यांनी केलेली वैचारिक प्रगती यांच्या सहयोगातून मुंबईत सुधारणा पर्वास प्रारंभ झाला. हाच तो बहुचर्चित प्रबोधन-काळ. १८५७ मध्ये मुंबई विद्यापीठाची स्थापना होणे, आणि सर बार्टल फ्रिअर सारख्या धाडसी गव्हर्नरने किल्ल्याची तटबंदी तोडण्याचा १८६० साली निर्णय घेणे हे मुंबई शहराच्या वाढीसाठी उपयुक्त ठरलेले दोन महत्त्वाचे निर्णय. यापुढील विद्यापीठाची आणि शहराची वाढ समांतरच होणार होती. ती कशी झाली, त्यामुळे समाजाचे प्रबोधन होऊन मुंबईने देशस्तरावर सर्वच क्षेत्रांचे नेतृत्व कसे मिळवले... हा सारा रोमहर्षक इतिहास या पानांवर ग्रथित आहे. मुंबईसंबंधी प्रकरण, नंतर विद्यापीठाच्या विकासाच्या आलेखाची काही प्रकरणे, असा आकृतिबंध लेखकाने स्वीकारल्याने १९ व्या शतकातील शैक्षणिक आणि अन्य घडामोडी आपल्यासमोर घडत आहेत असा आभास होतो, इतका वाचक गुंगून जातो.

वाचनीयता हा या इतिहास-लेखनाचा विशेष मानावा लागेल. किंबहुना पक्के संशोधन वाचनीय असू शकत नाही, या गैरसमजाला या ग्रंथाने पुन्हा एकवार छेद दिला आहे.
सुनील तांबे
मोठं बोधन म्हणजे प्रबोधन. ही संकल्पना भारतात ब्रिटीशांच्या आगमनानंतर आली. कारण देशातील सुशिक्षितांचा अर्थातच उच्चवर्णीयांचा परिचय आधुनिक राज्यपद्धती, अर्थव्यवस्था, शिक्षणव्यवस्था आणि समाजव्यस्थेशी झाला.
बंगालमध्ये ही प्रक्रिया सर्वप्रथम सुरु झाली कारण १७५७ मध्ये ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीचं राज्य तिथे स्थिरावलं. या आधुनिक व्यवस्थेशी भारतीय संस्कृतीची सांगड घालण्याच्या प्रयत्नांतून बंगाल रेनेसां अर्थात बंगालच्या प्रबोधनाची चळवळ सुरु झाली. आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली मुद्रा उठवणं हे त्या प्रबोधनाचं महत्वाचं आशयसूत्र होतं.
राजा राममोहन राय हे त्याचे उद्गाते तर रविंद्रनाथ ठाकूर त्याचा अंतबिंदू मानले जातात. परिणामी बंगाली संस्कृतीने जगदीशचंद्र बोस, मेघनाद साहा (दलित) यांच्यासारखे आंतरराष्ट्रीय दर्जाचे वैज्ञानिक, अमर्त्य सेन, अभिजीत बानर्जी हे अर्थतज्ज्ञ, सत्यजित राय, मृणाल सेन इत्यादींसारखे चित्रपटकर्मी, तस्लिमा नसरीनसारखे लेखक ही बंगाल प्रबोधनाची देण आहे. बंगाल प्रबोधनाचे बिनीचे शिलेदार ब्राह्मण आणि कायस्थ होते.
याउलट मद्रास प्रेसिडेन्सीमधील प्रबोधनाचे नायक, रामस्वामी पेरीयार यांच्यासारखे ब्राह्मणेतर होते. त्यांनी आर्यभटांना कडवा विरोध केला. त्यांना क्षत्रियत्वाची आस नव्हती. परिणामी द्रविड आत्मसन्मान चळवळीनेही मणिरत्नम, ए. आर. रहमान, कमल्हासन यांच्यासारखे आंतरराष्ट्रीय दर्जाचे कलावंत निर्माण केले. अडूर गोपाळकृष्णन यांचाही वारसा तोच आहे.
महाराष्ट्रातील ब्राह्मणेतर चळवळ वर्णोन्नतीची होती. साहजिकच क्षत्रियत्व या चळवळीच्या केंद्रस्थानी होतं. त्यामुळे महाराष्ट्राला गायपट्ट्याचं आकर्षण आजही आहे. नामदेव ढसाळ सारखे आंबेडकरवादी विश्वकवी हा अपवाद आहे. बंगाल, महाराष्ट्र आणि मद्रास प्रबोधन यांचा तौलनिक अभ्यास मराठी भाषेत कुणी केला असल्याचं मला माहीत नाही. ती माझी मर्यादा आहे.
- सुनील तांबे

वेदांची मुळ भाषा कोणती? त्यावर पर्शियन आणि प्राकृतांचा एवढा प्रभाव का? वैदिकांचे स्थलांतर व त्यादरम्यान त्यांच्या भाषेवर प्रभाव पडत गेला आणि मुळ भाषाच बदलत आजच्या वेदांची भाषा तयार झाली आहे काय?
जे. ब्लॉख म्हणतात, ऋग्वेदाच्या भाषेचे अवेस्त्याच्या भाषेशी निकटचे साम्य असून काही ध्वनी बदलले कि त्याचे सरळ वैदिक भाषेमद्ध्ये रुपांतर होऊ शकते. ....ऋग्वेदातील दहावे मंडल वगळता उर्वरित भागाचा अभ्यास केला असता असे लक्षात येते कि त्यावर अनेक संस्करणे झालेली असून ती उणे केली तर एकाच कोणत्यातरी शुद्ध भाषेचा संबंध लागतो. ऋग्वेदाच्या संपादकांनी अन्य धार्मिक साहित्याच्या भाषेला काही प्रमाणात तरी आपलेसे केलेले दिसते. अशा भाषिक उधारीची अनेक उदाहरणे ऋग्वेदात आहेत. ऋग्वैदिक व्याकरणही अशा भाषिक प्रदुषनाने दुषित असल्याचे अनेक संकेत मिळतात. वैदिक भाषा ही पाश्चिमात्य भाषा होती, जशी अवेस्त्याची ज्यात र आणि ल हे वर्ण मिश्र होऊन जातात. ऋग्वेदातील व्याकरणही दोन भाषांचे मिश्रण होतांना झालेला भाषिक संघर्ष दाखवते असा जे. ब्लॉख यांच्या वैदिक भाषेबद्दलच्या कथनाचा सारांश आहे. (Formation of the Marathi Language By J. Bloch, Motilal Banarsidass Publ., 1970, पृ.२)
प्राकृत भाषांना कोणत्याही एकाच उगमापर्यंत नेता येत नाही. त्या किमान संस्कृत भाषेतून तर नक्कीच उगम पावलेल्या नाहीत, ज्याप्रमाणे भारतीय विद्वान आणि होप्फर, लास्सेन, ज्यकोबी वगैरे समजतात. वैदिक भाषेचा शब्दसंग्रह आणि व्याकरण हे प्राकृत प्रकृतीशी मिळते, अभिजात संस्कृतशी नाही, त्यामुळे संस्कृतमधुन प्राकृत भाषा विकसित झाल्या हे मत मान्य करता येत नाही असे रिचर्ड पिशेल स्पष्टपणे, अनेक उदाहरणे देत नमूद करतो. (A Grammar of the Prākrit Languages By Richard Pischel, Motilal Banarsidass Publ., 1981, पृ. ५)
प्राकृत भाषांतील अनेक शब्द व प्रत्यय संस्कृतपेक्षा वैदिक भाषांशी अधिक मेळ खातात. प्राकृत जर संस्कृत भाषेतून उत्पन्न झाली असती तर असे झाले नसते. वैदिक भाषा व प्राकृत भाषा पुरातन प्राकृतातुनच उत्पन्न झाल्या असाव्यात कारण त्याशिवाय असे साम्य आढळून आले नसते. वैदिक भाषा ही संस्कृताशी समकक्ष नसून प्राकृताशी समकक्ष अथवा प्राकृतसमान आहे आणि त्यातल्या त्यात पाली भाषेशी वैदिक भाषेचे अधिक साधर्म्य दिसून येते असे हरगोविंददास टी. सेठ सप्रमाण दाखवून देतात. आपले मत सिद्ध करण्यासाठी त्यांनी अनेक उदाहरणे दिली आहेत ती अशी-
१. वैदिक भाषेत ऋकाराऐवजी प्राकृताप्रमाणेच अनेकदा उकार येतो. उदा.वृंद ऐवजी वुइंद, ऋतु ऐवजी उउ, पृथिवीऐवजी पुहवी, कृत ऐवजी कुठ.
२. प्राकृतात संयुक्त वर्णांच्या ठिकाणी एक व्यंजन लोप पावते व आधीचा -हस्व स्वर दीर्घ होतो. उदा. दुर्लभ - दूलह, विश्राम- वीसाम इत्यादि
३. प्राकृतात अनेकदा द चा ड होतो तसा वैदिक भाषेतही दिसून येत. उदा. दंड- डंड, दंस-डंस इत्यदि.
४. तृतीया विभक्तीच्या बहुवचनामध्ये देव आदि अकारांत शब्दांची रुपे प्राकृतात देवेहि, गभीरेहि, ज्येठ्ठ्येहि अशी होतात. ऋग्वेदातही देवेभि, गम्भीरेभि, ज्येष्ठेभि अशी रुपे मिळुन येतात.
५. वैदिक भाषेतही प्राकृताप्रमानेच चतुर्थीच्या ठिकाणी षष्ठी विभक्ति असते.
६. प्राकृतात अनेकदा द्विवचनाऐवजी बहुवचन असते. वैदिक भाषेतही असेच प्रयोग सर्रास आढळतात. उदा. इंद्रावरुणौ ऐवजी इंद्रावरुणा, नरौ हे ऐवजे नरा हे इत्यादि. (Paia-sadda-mahannavo(a Comprehensive Prakrit-hindi Dictionary) by Pandit Hargovind Das T. Sheth, Motilal Banarsidass Publ., पृ. २२-२५)
७. वैदिक भाषांत असंख्य प्राकृत शब्द आले आहेत जे इंडोयुरोपियन भाषेला अज्ञात होते. उदा. मेर्होफर यांनी उपसर्ग असलेल्या पण इंडो-युरोपियन नसलेल्या भाषा ऋग्वेदात आलेल्या अनेक शब्दांचे मुळ आहेत असे दाखवून दिले होते. मायकेल विट्झेल यांनी 'क - का' हे मुंड अथवा 'कि' असा उपसर्ग असलेल्या शब्दांची तुलना मुंड आणि खासी भाषेत व्यक्तीचे पदवाचक स्थान दर्शवण्यासाठी केल्या जाणा-या शब्दांशी केली. यातून त्यांनी जेही अनार्य शब्द होते त्याची यादीच बनवली. ते शब्द असे-
काकम्बीर, (एक प्रकारचा वृक्ष), ककर्दु (काठी), कपर्दिन् (जटा), कर्पास (कापूस), कवन्ध (शिरविरहित धड), किमीद (भुतांचा एक प्रकार), कुलाय (घरटे), कुलिश (कु-हाड), उंदुरु (उंदीर), लांगल (नांगर), नारिकेल (नारळ) नीर (पाणी), बिल (बीळ) इत्यादि. मायकेल विट्झेल पुढे म्हणतात की हे शब्द सिंधु संस्कृतीच्या विस्मृतप्राय भाषेतून वैदिकांनी घेतले असावेत. हे शब्द मुंड व खासी भाषेतून किंवा कुभा-विपाशा बोलीभाषेतून आले असले पाहिजे असेही मत इट्झेल यांनी व्यक्त केले आहे. (Witzel, Michael (1999). "Substrate Languages in Old Indo-Aryan (Rigvedic, Middle and Late Vedic)" (PDF). Electronic Journal of Vedic Studies. 5 (1).

Archived from the original (PDF) on 6 February २०१२) याचा अर्थ वेदपुर्व भाषाच आजतागायत बदल स्विकारत टिकुन राहिल्या आहेत असे आपल्याला म्हणता येईल.
८. बरो यांनी १९५५ मध्ये दाखवून दिले होते की पाचशेपेक्षा अधिक शब्द अनार्य भाषांमधून आले असुन ऋग्वेदाच्या सुरुवातीच्या मंडलांत अशा शब्दांचे प्रमाण कमी दिसते तर उत्तरोत्तर वाढत जाते. याचाच अर्थ असा की आपल्या मुळ स्थानावरुन सरकत वैदिक जसजसे अनेक थांबे घेत पंजाबपर्यंत पोहोचले तसे ऋग्वेदाच्या पुनर्रचनेत येथील भाषांचा प्रभाव वाढु लागला. हे जे शब्द नोंदले गेले आहेत जे जसेच्या तसे प्राकृतावरुन स्विकारले गेलेले आहेत. ध्वनीबदल करुन साफसुफ केलेले शब्द यात अंतर्भुत नाहीत त्यामुळे त्यांना आर्य भाषेतील शब्द म्हटले तर जसेच्या तसे घेतल्या गेलेल्या शब्दांना अनार्य भाषांचे ठरवले.
वैदिक लोक जसजसे सिंध, पंजाबमधुन बिहारकडे सरकू लागले तसतशी या प्रवासात क्रमश: ऋग्वेदोत्तर वैदिक साहित्याच्या भाषेवरची आधीच्या प्रांतांची छाप जाऊन नंतरच्या स्थानिक प्राकृतांची छाप दिसून येते. ऋग्वेदातील भाषा ही अनेक बोलीभाषांचे मिश्रण आहे. गांधारी, शौरसेनी, अर्धमागधी आणि नंतर मागधी प्राकृताचे प्रभा वैदिक भाषेवर दिसुन येतात. वैदिक रचनेवरील प्राकृतचा प्रभाव सहज लक्षात येण्यासारखा आहे. ऋग्वेदात अवेस्तात येणारे अनेक शब्द आहेत पण ते ऋग्वेदोत्तर साहित्यातून मात्र ते गायब झालेले आहेत. ऋग्वैदिक भाषेवर काबुल ते पंजाब या भागातील प्रांतीक भाषांचाच अधिक प्रभाव आहे असे मायकेल विट्झेल म्हणतात. (TRACING THE VEDIC DIALECTS, M. Witzel, Cambridge, Mass, Version July 27,1987, पृ, १-१५, published Paris 1989) विट्झेल यांनी आपल्या मतांत अनेकदा बदल केला आहे. असे असले तरी वैदिक भाषांवर कोणत्या प्राकृत अथवा अनार्य भाषांचा प्रभाव होता हे ते सांगु शकलेले नाहीत कारण प्राकृत भाषांना ते मिडल इंडो-युरोपियन भाषा म्हणतात.
ब्रोंकहोर्स्ट यांनी त्यांच्या ग्रंथात एक मुलभुत प्रश्न उपस्थित केला आहे आणि तो म्हणजे वैदिक भाषेचे, म्हणजे छांदसचे व्याकरण लिहित असतांना पाणिनीला उपलब्ध असलेल्या ऋग्वेदांची भाषा आज आपल्याला उपलब्ध असलेल्या ऋग्वेदासारखीच होती काय? या प्रश्नाचे उत्तर देतांना त्यांनी म्हटले आहे की पाणिनीला उपलब्ध असलेल्या वैदिक साहित्याची भाषा बरीचशी वेगळी होती. ऋग्वेद आपल्यापर्यंत त्याच्या मुळ स्वरुपात पोहोचलेला नाही. ऋग्वेदाच्या पाणिनीकालीन आवृत्तीत असलेले संधीचे नियम आताच्या ऋग्वेद आवृत्तीत आढळत नाहीत. शिवाय तत्कालीन आवृत्तीतील ध्वन्यात्मक नियमांत तर हे विशेषकरुन दिसते कारण आताच्या आवृत्तीत अनेक ध्वनीबदल झाले असल्याचे आढळते.
पाणिनीनंतरच्या काळात ऋग्वेद संहितेत संधी आणि ध्वन्यात्मकतेत बदल झाले आहेत हेच यावरुन सिद्ध होते. वेदांचे जतन काळजीपुर्वक केले आहे हे विधान त्यामुळे शंकास्पद होते.....तैत्तिरिय ब्राह्मण आणि तैत्तिर्तिय आरण्यकात तर आज असे व्याकरण प्रयोग आलेले आहेत जे पाणिनीने सर्वस्वी नाकारलेले होते. तैत्तिरिय साहित्यही पाणिनीला जसे उपलब्ध होते तशा भाषेत सर्वस्वी आज उपलब्ध नाही. यजुर्वेदाचीही हीच अवस्था आहे. (Greater Magadha- Studies in the Culture of Early India by Johannes Bronkhorst, Brill, 2007, पृ १८३-१८४, १९३-१९४)
याचा अर्थ एवढाच होतो की वेदांची भाषा आणि त्यातील कथन आणि आज उपलब्ध असलेले भेसळ भाषेतील वेद आणि त्यातील कथन यात खूप फरक पडलेला आहे. वेदश्रेष्ठता जपणा-यांनी अवश्य जपावी. वास्तव मात्र वेगळेच आहे.
-संजय सोनवणी
(प्राकृत आणि पाली भाषांचा इतिहास या पुस्तकातून)

२२ जून
चापेकर बंधू - रॅंड आयर्स्ट - गणेशखिंड
वॉल्टर चार्ल्स रॅंड हा आय सी एस ऑफीसर होता. इंग्लंडमधल्या लिव्हरपूलजवळ त्याचं आयुष्य गेलं. १८९७ मध्ये त्याचा खून होण्यापूर्वी १३-१४ वर्षे तो भारतातच - खास करून मुंबईच्या आसपास होता. रॅंडचे कागद अभ्यासत असताना त्याच्या हस्ताक्षरातलं हे पत्र ब्रिटीश लायब्ररीत मिळालं. २३ सप्टेंबर १८८३ चं त्याच्या हस्ताक्षरातलं हे पत्र. तो अंडर सेक्रेटरीला लिहीतोय की त्याने मुंबईला जाण्यासाठी 'व्हिक्टोरीया' जहाजात जागा बुक केली आहे. पण त्याला अजून ऑफीशियल सेलिंग ऑर्डर्स (Sailing Orders) मिळालेल्या नाहीत. त्या डलविचला पाठविण्याची व्यवस्था व्हावी. २४ सप्टेंबरला हे पत्र इंडीया ऑफीसला मिळाले आणि २६ तारखेला त्याच्या सेलिंग ऑर्डर्स पाठवल्या गेल्यासुध्दा (हे सगळे तारखांचे शिक्के पत्रावर आहेत!)
त्याचा आणि आयर्स्टचा खून झाल्यावर ३ महिन्यांच्या आत श्रीमती रॅंड व श्रीमती आयर्स्ट ह्यांना स्पेशल पेन्शन सुरु झाले. श्रीमती रॅंड ह्यांना वार्षिक £१८७ व त्यांच्या मुलांना प्रत्येकी वार्षिक £२१ मिळत होते तर श्रीमती आयर्स्ट ह्यांना वार्षिक £१५० व त्यांच्या मुलांना वार्षिक £१५ मिळत असत. दोघेही ऑन-ड्यूटी मारले गेले असल्याने ही खास वाढीव दराने पेन्शने होती. हे सगळे पेन्शनचे कागद ब्रिटीश लायब्ररीत आहेत.
दामोदर चापेकरांच्या पत्नी दुर्गाबाई (ज्यांचे नावही आपल्याला माहीत नसते!) १८९७ मध्ये फक्त १७ वर्षांच्या होत्या. ह्या पुढे ६० वर्षे - म्हणजे १९५६ पर्यंत जगल्या - १९४७ मध्ये भारत स्वतंत्र झाल्यानंतर ९ वर्षे जगूनही ना त्यांना कोणते पेन्शन मिळाले ना कोणते त्यांचा नवरा स्वातंत्र्यसैनिक असल्याचे ताम्रपट - माझ्यामते २२ जूनची ही खरी शोकांतिका आहे!
- संकेत कुलकर्णी (लंडन) यांची जुनी पोस्ट.