मूकनायक आणि आंबेडकरी पत्रकारिता- प्रा. हरी नरके
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शंभर वर्षापुर्वी मूकनायक हे वर्तमानपत्र सुरू केले. लोकशिक्षण, लोकसंघटन, लोकजागरण आणि जातीनिर्मुलन ही उद्दिष्टे गाठण्यात त्याला फार मोठे यश आले. त्याकाळात मुख्य प्रवाहातील वर्तमानपत्र म्हणजे केसरी. तो सनातन्यांच्या हातात होता. मूकनायकाची जाहीरातसुद्धा छापायला केसरीने नकार दिला होता.
पहिल्या अंकात बाबासाहेब लिहितात, " हिंदू धर्म तीन गटात विभागला गेलेला आहे.
१. ब्राह्मण, २. ब्राह्मणेतर,
३. बहिष्कृत
ब्राहमण व इतर उच्चवर्णिय हे जातीव्यवस्थेचे लाभार्थी असल्याने जात टिकावी यासाठी स्वाभाविकपणे त्यातले बहुसंख्य झटतात.
सत्ता व ज्ञान नसल्याने ब्राह्मणेतर मागासले व त्यांची उन्नती खुंटली. मात्र ते कारागिर वा शेतकरी असल्याने चरितार्थ चालवू शकले.
दुर्बलता, दारिद्र्य व अज्ञान या त्रिवेणी संगमात अफाट बहिष्कृत समाज नागवला गेला. आमच्या या बहिष्कृत लोकांवर होत असलेल्या व पुढे होणार्या अन्यायावर उपाययोजना सुचविण्यास, तसेच त्यांची भावी उन्नती व तिचे मार्ग यांच्या खर्या स्वरूपाची चर्चा होण्यास वर्तमानपत्रासारखी अन्य भुमीच नाही. परंतु मुंबई इलाख्यात निघत असलेल्या वृत्तपत्रांकडे न्याहाळून पाहिले असता असे दिसून येईल की, त्यातील बरीचशी पत्रे विशिष्ट जातीचे हितसंबंध पाहाणारी आहेत. इतर जातींच्या हितांची त्यांना परवा नसते. इतकेच नव्हे तर केव्हा केव्हा त्यांना अहितकारक असेही त्यातून प्रलाप निघतात.
दीनमित्र, जागरूक, डेक्कन रयत, विजयी मराठा, ज्ञानप्रकाश, सुबोधपत्रिका वगैरे पत्रांतून बहिष्कृत समाजाच्या प्रश्नांची चर्चा वारंवार होते. मात्र बहिष्कृतांच्या प्रश्नांना पुरेशी जागा मिळत नाही.
तेव्हा बहिष्कृतांच्या प्रश्नाला वाहिलेले स्वतंत्र पत्र हवे म्हणून मूकनायकचा जन्म आहे. यापुर्वी सोमवंशीय मित्र, हिंद नागरिक, विटाळ विध्वंसक, बहिष्कृत भारत निघाली आणि बंदही पडली. तेव्हा स्वजनोद्धारासाठी मूकनायक जगायला हवा. "
बाबासाहेबांनी वर उल्लेख केलेले एकही वर्तमानपत्र आज चालू नाही.
केसरी निघतो, पण तो फारसा कोणी वाचत नाहीत. एकेकाळी सर्वाधिक लोकप्रिय असलेले हे वर्तमानपत्र आज लोकप्रियता आणि खप याबाबतीत पहिल्या हजार वृत्तपत्रांमध्येही नाही. काळ फार बलवान असतो. त्याकाळात केसरी देशात नंबर एक होता. तेव्हा त्याचा खप ३०००(तीन हजार अंक) होता.
आज खपाच्या व प्रभावाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील पहिली १० वर्तमानपत्रे बघितली तर त्यातल्या ४० टक्क्यांचे मालक जैन, मारवाडी आहेत, ४० टक्क्यांचे मालक मराठा आहेत आणि २० टक्क्यांचे मालक इतर उच्चवर्णिय आहेत. इलेक्ट्रॉनिक माध्यमांची स्थितीही यापेक्षा वेगळी नाही.
अनु. जाती/जमाती/ओबीसीचे यात एकही वृत्तपत्र नाही. पहिल्या २०० तही यातल्या कोणाचा नंबर लागत नाही. काही सटरफटर, लंगोटी पत्रे स्वत:ला नायक, राजा, सम्राट, बादशहा म्हणवतात,पण ते म्हणजे पोतराजा किंवा वासुदेवातले राजे, सम्राट असतात.
समाज माध्यमं सर्वांना खुली असली तरी अनु. जाती/जमाती/ओबीसीचे बहुसंख्य लोक त्यांचा वापर वाढदिवस, सणसमारंभ आणि धार्मिक कार्ये असल्या गोष्टींसाठी करताना दिसतात. प्रबोधनासाठी ही माध्यमे फार कमी लोक वापरतात.
लिंगभाव, जात, वर्गीय विषमता, धार्मिक भेदभाव आणि असहिष्णूता यांच्यावर प्रहार करणारे मुद्रीत वा इलेक्ट्रॉनिक माध्यम आज बलुतेदार, अलुतेदार, ओबीसी वा वंचितांच्या मालकीचे आहे काय? शिक्षण, ज्ञाननिर्मिती, जातीनिर्मुलन, स्त्रीपुरूष समता, संवादातून विद्रोह आणि चिकित्सेकडे, संसाधनांचे फेरवाटप या फुले- आंबेडकरी मुल्यांना वाहिलेली किती वर्तमानपत्रे आज दिसतात?
जात टिकवण्यासाठी सत्ताधारी जाती, करोडपती आणि निवडणुका जिंकणारे अभिजन जिवापाड झटताहेत. विषमतेचे बळी मात्र घोर निद्रेत आहेत.
१०० वर्षांने ही स्थिती आहे.
आणखी १०० वर्षांनी काय असेल?
मूकनायक स्थापना ३१ जानेवारी १९२०, वार्षिक वर्गणी अडीच रूपये,
संपादक- पांडूरंग नंदराम भटकर / ज्ञानदेव घोलप
प्रकाशक- डॉ. भीमराव आंबेडकर
-प्रा. हरी नरके, ३१ जानेवारी २०२३

UPSC CSE notification out.
1. Date of commencement of application - 01 February 2023.
2. Last date of application - 21 February 2023.
3. Approximate vacancies - 1105

मौर्य घराण्याचा शेवटचा राजा बृहद्रथ याची हत्या करुन त्याचा सेनापती पुष्यमित्र शृंग इसपु १८४ मद्धे सत्तेवर आला. मौर्य घराण्याचे तत्पुर्वीचे सारे लेख प्राकृतात आहेत. शृंग घराणे हे वैदिक धर्माचे पुनरुज्जीवन करणारे मानले जाते. त्याच्याच काळात मनुस्मृती लिहिली गेली तसेच त्याने दोन अश्वमेध यज्ञ केले असे म्हटले जाते. अशोकानंतरचे मौर्य राजे हे बौद्ध धर्मीय असल्याने त्यांचे शिलालेख प्राकृतात होते असे जरी गृहित धरले तर मग वैदिक धर्माचा समर्थक आणि प्रोत्साहनकर्ता आणि बौद्ध धर्माचा विरोधक पुष्य़मित्र शृंगाने तरी संस्कृताचा आश्रय घेतला असता. पण तसे दिसत नाही.
शृंग घराण्याने इसपू १८४ ते इसपु ७३ या कालात (जवळपास १११ वर्ष) राज्य केले. सम्राट अशोकाच्या निधनानंतर अवघ्या ५० वर्षात शृग घराणे सत्तेत आले. शृंग नेमके कोणत्या वंशाचे/जातीचे/वर्णाचे याबातचा तिढा विवादास्पद असला तरी भारतीय विद्वानांचे हे घराने ब्राह्मण होते असे साधारण मत दिसते. प्रस्तूत विषयाशी अर्थात त्याचा संबंध नसल्याने या विषयात फारसे जाण्याचे हशील नाही. परंतू अशोकानंतर अवघ्या ५० वर्षांत सत्तेवर आलेले आणि बौद्धधर्म विरोधी असलेल्या शृंग घराण्याच्या कालात किमान शृंगांनी जर अस्तित्वात असती तर संस्कृत भाषेचा उपयोग केला असता हे उघड आहे, मग जनभाषा काहीही असो.
पुष्यमित्राच्या अश्वमेधांची माहिती मिलते ती अयोध्या येथे आणि पुराणांत. त्याने कोनतीही नाणी पाडलेली दिसत नाहीत कारण बहुदा त्याने राज्याभिषेक न करता आपले मुळची "सेनापती" हीच पदवी कायम ठेवली म्हणून.
पुष्यमित्रानंतर मालविकाग्निमित्र या कालिदासाच्या प्रसिद्ध नाटकाचा नायक अग्नीमित्र सत्तेवर आला. मथुरा विभागात त्याची नाणी सापडलेली आहेत. त्याची नाणी सर्वस्वी प्राकृत भाषेत असून त्यावर "अग्गीमितासा" असे अग्नीमित्राचे मुळचे नांव पंच केलेले आहे. हेही संस्कृतचे अस्तित्व नसल्याचा पुरावा आहे. कारण भाषा कोणतीही असो...नांवात कोणी बदल करत नाही अथवा नांवाचे भिन्नभाषित रुपांतरे वापरत नाही कारण लिपी एकच आहे व ती म्हनजे ब्राम्ही. ब्राह्मीत नंतरच्या काळात संस्कृत लेखही ब्राह्मी लिपीतच लिहिले गेलेले आहेत. म्हनजे ब्राह्मी लिपी व्यक्तिनांवाचे मूळ रुप (जे आपल्याला आज संस्कृतच मुळचे वाटते) लिपीबद्ध करायला कोणतीच अडचण नव्हती.
थोडक्यात "अग्गीमित" हेच मुळचे नांव असून अग्नीमित्र हे नंतरचे संस्कृतीकरण आहे हे उघड आहे. पुष्यमित्राचेही अयोद्ध्या लेखात नांव "पुस्समित सूग" असे आहे व त्याच्या वंशाला "सुगाना" असे म्हटले गेले आहे हेही येथे उल्लेखनीय आहे. (कनिंगह्यम : Coins of India). शृंगांच्या काळातील असंख्य शिलालेख उपलब्ध झालेले आहेत, परंतू ते सर्व प्राकृतात आहेत. काही शब्द मात्र प्राकृताकदून संस्कारित होतांना दिसतात. उदा. अधित्थावना या प्राकृत शब्दाचे रुप अधिष्ठापना. अशी अनेक अर्ध-संस्कृत ते संस्कृत शब्दरुपे या कालात भारहूत, सांची येथील शूंगांच्या अखत्यारीत असलेल्या भागांत पहायला मिलतात...परंतु लेख प्राकृतात आहेत. (Epigraphical Hybrid Sanskrit: Th Damsteegt.)
दानभूती हा शृंग वंशातील राजा मानला जातो. कनिंगह्यमच्या मते तो शृंगांचा सामंत असावा. भारहूत येथे एका दानलेखात त्याचेच नांव "वच्छीपुत दानभूती" असे कोरलेले आहे. हे प्राकृतात आहे हे उघड आहे. भारहूत येथीलच एका लेखात "सुगाना राजे" असा शृंगांचा उल्लेख आहे.
या काळात संस्कृत राजभाषा असल्याचाही कोणताही पुरावा नाही. ग्रीक राजदूत हेलिओडोरस हा शृंगांच्या दरबारी इसपू ११० मद्धे होता. त्याचा शॄंगांची तत्कालीन राजधानी विदिशेजवळ एक गरुडस्तंभ आहे. त्याने तो पांचरात्र संप्रदायातील तत्कालीन पूज्य देवता वासुदेवाला अर्पण करण्यासाठी उभारला. (पहा: पांचरात्र संप्रदाय) या स्तंभावर त्याने लेख कोरवला असून तो सर्वस्वी प्राकृतात आहे. एक परकीय राजदूत लेख कोरवून घेतांना प्राकृत भाषा वापरत होता ही संस्कृत भाषेची सर्वस्वी अनुपस्थिती दर्शवते.
या लेखात "गरुडध्वजो" व "देवदेवासा" हे अर्ध-संस्कृत रुपांतर सोडता अन्य मजकुर सर्वस्वी प्राकृतात आहे. म्हनजेच काही शब्द सोयीसाठी (देवदेवस्य ऐवजी देवदेवासा) संक्रमनावस्थेत होते. शृंगांच्या कालातही संस्कृत अस्तित्वात नसून ती बनत होती. शब्दांची सुलभ रुपांतरे होऊ लागली होती. अस्तित्वात असती तर अशी मिश्र रुपांतरे न मिळता शुद्ध रुपांतरे दिसली असती.
शृंग घराणे वैदिकाभिमानी असल्याने (वा तसा समज असल्याने) त्यांच्या १११ वर्षांच्या राजवटीत कोठेतरी, एकतरी शुद्ध अथवा वैदिक संस्कृतातील लेख मिळायला हवा होता. परंतु प्रत्यक्षात शृंग कालात विकसीत होनारी...संस्कृत बनू पाहनारी प्राकृत व तीही काही शब्दरुपे मिळतात. शुद्ध संस्कृत म्हनता येईल असा लेख सोडा एखाद-दुसरा शब्दही मिळत नाही, ही बाब उल्लेखनीय आहे.
संस्कृत आधी आणि नंतर प्राकृत हा क्रम समूळ चुकीचा आहे.
-संजय सोनवणी

“हिंदू समाजाची सुधारणा करणे हे आमचे ध्येय नाही. आमचे स्वातंत्र्य मिळविणे हे आमचे ध्येय आहे.” - डॉ. बाबासाहेब आंबेडकर ..... हे वाक्य बाबासाहेब कधी बोलले... तर १९३६ च्या मुंबई इलाखा महार परिषदेत जी परिषद मुंबई मधील नायगाव भागात झाली होती व जिचे अध्यक्ष बी. एस व्यंकटराव होते.
महाराजा सयाजीराव गायकवाड(१७ मार्च १८६३-६ फेब्रुवारी १९३९).
भूतपूर्व बडोदे संस्थानाचे अत्यंत पुरोगामी वृत्तीचे, कर्तृत्ववान संस्थानिक (कार. १८८१-१९३९). मूळ नाव गोपाळराव काशीराव गायकवाड. नासिक जिल्ह्यातील कवळाणे येथे जन्म. खंडेराव महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांची पत्नी महाराणी चिमणाबाई ७ मे १८८५ रोजी निधन पावली. त्याच वर्षी २८ डिसेंबर रोजी त्यांचा दुसरा विवाह झाला. त्यांची तीन तरुण मुलेही अकालीच मरण पावली.
दिवाण सर टी. माधवराव यांनी सयाजीरावांना राज्यकारभाराचे शिक्षण दिले. गादीवर आल्याबरोबर (२८ डिसेंबर १८८१) त्यांनी आर्थिक दृष्ट्या राज्याची स्थिती सुधारण्यासाठी उपाययोजना केली. प्रशासकीय जबाबदारीची विभागणी हे तत्त्व राज्यकारभारात लागू करून राज्ययंत्रणेत सुरळीतपणा निर्माण केला. सल्लागार नेमून कल्याणकारी योजना अंमलात आणल्या (१८८३). न्यायव्ववस्थेत सुधारणा केल्या. ग्रामपंचायतींचे पुनरुज्जीवन केले (१९०४) तसेच सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची योजना सुरू करून (१८९३) अल्पावधीतच ती सर्व राज्यभर लागू केली (१९०६). गरीब, गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्त्या देऊन उच्च शिक्षणाची सोय केली. औद्योगिक कलाशिक्षणाकरिता ‘कलाभूवन’ ही संस्था स्थापन केली. ‘प्राच्य विद्यामंदिर’ या संस्थेच्या वतीने प्राचीन संस्कृत ग्रंथांचे संशोधन व प्रकाशन करण्यास उत्तेजन दिले. ‘श्रीसयाजी साहित्यमाला’ व ‘श्रीसयाजी बाल ज्ञानमाला’ या दोन मालांमधून उत्तम ग्रंथांची भाषांतरे प्रसिद्ध केली. संस्थानात गावोगावी वाचनालये स्थापन केली. फिरत्या वाचनालयांचीही सोय केली.
सामाजिक क्षेत्रात त्यांनी केलेली कामगिरीही महत्त्वपूर्ण आहे : पडदापद्धतिबंदी, बालविवाहबंदी, मिश्रविवाह, स्त्रियांचा वारसा, कन्याविक्रयबंदी, अस्पृश्यतानिवारण, विधवाविवाह इ. सुधारणा प्रत्यक्ष अंमलात आणल्या. घटस्फोटासंबंधीचा कायदा सर्व भारतात पहिल्यांदाच त्यांनी जारी केला. हरिजनांसाठी अठरा शाळा काढल्या (१८८२). डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली आणि त्यांची संस्थानात उच्च पदावर नेमणूकही केली. सुधारणांच्या प्रत्यक्ष पुरस्कारामुळे त्यांना ‘राष्ट्रीय सामाजिक परिषदे’च्या अध्यक्षपदाचा मान मिळाला (१९०४).
बडोदे ही कलापूर्ण प्रेक्षणीय नगरी ठरली, याचे कारण त्यांनी बांधलेल्या सुंदर वास्तू. लक्ष्मीविलास राजवाडा, वस्तुसंग्रहालय, कलावीथी, श्री सयाजी रुग्णालय, नजरबाग राजवाडा, महाविद्यालयाची इमारत वगैरे वास्तूंनी बडोद्याची शोभा वाढविली आहे.
त्यांना प्रवासाची अत्यंत आवड होती व त्यांनी जगभर प्रवास केला. जेथे जेथे जे जे चांगले असेल, ते ते चोखंदळपणे स्वीकारून आपल्या संस्थानाची सर्वांगीण भरभराट करण्याचा त्यांनी सतत प्रयत्न केला. लंडनला भरलेल्या पहिल्या दोन गोलमेज परिषदांनाही ते हजर होते. लो. टिळक, बाबू अरविंद घोष या थोर नेत्यांशी त्यांचा घनिष्ठ संबंध होता. राष्ट्रीय आंदोलनाला त्यांचा अप्रत्यक्ष पाठिंबा होता, असे म्हटले जाते. ज्ञानवृद्धी, समाजसुधारणा व शिस्तबद्ध प्रशासन या सर्वच बाबतींत ते यशस्वी ठरले. ‘हिंदुस्थानातील शेवटचा आदर्श राजा’ या शब्दांत त्यांचे यथोचित वर्णन पंडित मदनमोहन मालवीय यांनी केले आहे. मुंबई येथे त्यांचे निधन झाले.
संदर्भ : १. आपटे, दा. ना. श्री. महाराज सयाजीराव गायकवाड (तिसरे) यांचे चरित्र, ३ खंड, मुंबई, १९३६.
२. जोशी, चिं. वि. श्री सरकार सयाजीराव महाराज गायकवाड यांचे चरित्र व सूक्तिसंग्रह, बडोदे, १९३६.
३. दांडेकर, वि. पां. सयाजीराव गायकवाड, पुणे, १९३३

माऊंटस्टुअर्ट एल्फिन्स्टन आणि स्वातंत्र्य : प्रा. हरी नरके
माऊंटस्टुअर्ट एल्फिन्स्टन हा मुंबई प्रांताचा गवर्नर असताना त्याचा एक ब्रिटीश मित्र त्याला भेटायला गेला. संध्याकाळची वेळ होती.
मित्राची अपेक्षा होती की एल्फिन्सटन आपल्याला पेयपान देईल. पण तसं काही झालं नाही. एल्फिन्सटन लेखन करण्यात व्यस्त होता.
मित्रानं विचारलं, " एव्हढं काय लिहितोयस?"
"पाठयपुस्तकं लिहितोय, भारतीय मुलांसाठी." एल्फिन्स्टन म्हणाला.
मित्र नाराज झाला. "भारतीय लोक रानटी आहेत. त्यांना अजिबात शिकवू नये. तसं केल्यास ते जागृत होतील आणि स्वातंत्र्य मागतील. आपल्याला हा देश सोडून जावं लागेल."
एल्फिन्स्टन म्हणाला, " तुझं खरंय."
"अरे मग कशाला शिकवायचं आपण त्यांना? आहेत तसेच अज्ञानी आणि गुलामीत राहू देत सडत."
एल्फिन्स्टन म्हणाला, "मित्रा, स्वातंत्र्य हे असं मूल्य आहे की जन्माला आलेला प्रत्येक माणूस स्वातंत्र्य मागणारच. फरक एव्हढाच आहे की शिकला तर माणूस लवकर स्वातंत्र्य मागेल. अर्थात नाही शिकला तरी एक ना एक दिवस उशीरा का होईना पण माणूस स्वातंत्र्य मागणारच."
एल्फिन्स्टन पुढं म्हणाला, "आपण भारतीयांना शिकवतोय त्यात आपलाच फायदा आहे. माणसं अडाणी असतील तर त्यांच्यावर जास्त काळ राज्य करता येईल, पण जेव्हा ती उठाव करतील तेव्हा ती तुझ्यामाझ्या वंशजांना तलवारीनं कापून काढतील
आणि आपण त्यांना शिकवलं तर ते जा म्हणून नक्कीच सांगतील पण ते तोंडानं आपल्या वंशजांना चले जाव म्हणून सांगतील."
: प्रा. हरी नरके

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन वर्धा येथे संपन्न झाले.
पहिले साहित्य संमेलन १८७८ रोजी पुण्यामध्ये न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले होते.
९६ वर्षांनी पुन्हा एकदा प्रसिद्ध कायदे पंडित न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर अध्यक्षस्थानी लाभले आहेत. हा एक सुवर्णयोगच म्हणावा लागेल.

आज रमाबाई आंबेडकर यांची जयंती ...
त्यांना विनम्र अभिवादन...
यानिमित्ताने...
दिनांक ३० डिसेंबर १९३० रोजी इंग्लंड वरून डाॅ बाबासाहेब आंबेडकरांनी 'रमाई' यांना लिहिलेले पत्र आजहि काळजाला पिळवटून टाकतं...
प्रिय रमा !
कशी आहेस रमा तू? तुझी, यशवंताची आज मला खूप आठवण आली. तुमच्या आठवणीनं मन खूपच हळवं
झालं आहे आज. मागल्या काही दिवसातली माझी भाषणे फारच गाजली. परिषदेतील सर्वोत्कृष्ट भाषणे, प्रभावी वक्तृत्वाचा सर्वोत्कृष्ट नमुना असे माझ्या भाषणांबद्दल इकडच्या वर्तमानपत्रांमधून लिहून आले आहे. या पहिल्या गोलमेज परिषदेतील माझ्या भूमिकेचा विचार मी करीत होतो. आणि डोळयापुढे आपल्या देशातील सर्व पीडितांचे संसार माझ्या डोळयासमोर उभे राहिले.
दुःखांच्या डोंगराखाली ही माणसे हजारो वर्षे गाडली गेली आहेत. या गाडलेपणाला पर्याय नाही हीच त्यांची समजूत आहे. मी हैराण होतो आहे रमा ! पण मी झुंज देतो आहे. माझी बौध्दिक शक्ती परमवीर झाली होती जणू ! खूप भावना मनात दाटून आल्या आहेत. खूपच हळवे झाले आहे मन. खूपच व्याकूळ झाले आहे मन! आणि घरातल्या तुम्हा सर्वांची आठवण आली. तुझी आठवण आली. यशवंताची आठवण आली.
मला तू बोटीवर पोचवायला आली होतीस. मी नको म्हणत होतो तरी तुझे मन तुला धरवले नाही. तू मला पोचवायला आली होतीस. मी गोलमेज परिषदेला जात होतो. माझा सर्वत्र जयजयकार सुरु होता. तू पाहत होतीस. तुझं मन गदगदून आलं होतं. कृतार्थतेनं तू ओथंबून आली होतीस. तू शब्दांनी बोलत नव्हतीस; पण तुझे डोळे जे शब्दांना सांगता येत नसते तेही सांगत होते. तुझं मौन शब्दाहून अधिक बोलकं झालं होतं. तुझ्या गळयातील आवंढा तुझ्या ओठापर्यंत येऊन थडकत होता. ओठातील शब्दांच्या भाषेपेक्षा डोळयातील आसवांचीच भाषा त्यावेळी तुझ्या मदतीला धावली होती.
आणि आता इथे लंडनमध्ये या साऱ्याच गोष्टी मनात उभ्या राहिल्या आहेत. मन नाजूक झाले आहे. जीवात कालवाकालव होत आहे. कशी आहेस रमा तू ! आपला यशवंत कसा आहे? माझी आठवण काढतो तो? त्याचे संधीवाताचे दुखणे कसे आहे? त्याला जप रमा ! *आपली चार मुलं आपल्याला सोडून गेलीत. आता आहे फक्त यशवंत. तोच तुझ्या मातृत्त्वाचा आधार आहे आता. त्याला आपण जपलं पाहिजे. यशवंताची काळजी घे रमा !* यशवंताला खूप अभ्यास करायला लाव. त्याला रात्री अभ्यासाला उठवीत जा. माझे बाबा मला अभ्यासासाठी रात्री उठवीत. तोवर ते जागे राहत. मला ती शिस्तच त्यांनी लावली. मी उठलो, अभ्यास सुरु केला की ते झोपत असत. अगदी प्रारंभी मला रात्री अभ्यासाला उठण्याचा कंटाळा येई. त्यावेळी अभ्यासापेक्षा झोप महत्त्वाची वाटे. पुढे तर *आयुष्यभरासाठी झोपेपेक्षा अभ्यासच मोलाचा वाटत राहिला. याचं सर्वात जास्त श्रेय माझ्या बाबांना आहे. माझ्या अभ्यासाची वात तेवत राहावी म्हणून माझे बाबा तेलासारखे जळत राहत. त्यांनी रात्रीचा दिवस केला. अंधाराचा उजेड केला. माझ्या बाबांच्या कष्टांना आता फळे आली*. फार फार आनंद वाटतो रमा आज. रमा यशवंताच्या मनाला असाच अभ्यासाचा छंद लागला पाहिजे. ग्रंथाचा त्याने ध्यास घेतला पाहिजे.
रमा, वैभव, श्रीमंती या गोष्टी निरर्थक आहेत. तू अवतीभोवती पाहते आहेसच. माणसं अशाच गोष्टींच्या सारखी मागे लागलेली असतात. त्यांची जीवनं जिथून सुरु होतात तिथच थांबलेली असतात. या लोकांची आयुष्ये जागा बदलीत नाहीत. *आपल्याला असं जगून चालायचं नाही रमा. आपल्याजवळ दुःखांशिवाय दुसरं काहीच नाही. दारिद्रय, गरिबी यांच्याशिवाय आपल्याला सोबत नाही. अडचणी आणि संकटे आपल्याला सोडीत नाहीत. अपमान, छळ, अवहेलना या गोष्टी आपल्याला सावलीसारख्या जखडलेल्या आहेत*
*मागे अंधारच आहे. दुःखाचे समुद्रच आहेत. आपला सूर्योदय आपणच झाले पाहिजे रमा. आपणच आपला मार्ग झाले पाहिजे. त्या मार्गावर दिव्यांची ओळ आपणच झाले पाहिजे. त्या मार्गावर जिद्दीचा प्रवास आपणच झाले पाहिजे*
*आपणाला दुनिया नाही. आपली दुनिया आपणच निर्माण केली पाहिजे* आपण असे आहोत रमा. म्हणून म्हणतो यशवंताला खूप अभ्यास करायला लाव. त्याच्या कपडयांची काळजी घे. त्याची समजूत घाल. त्याच्यात जिद्द जागव. मला तुझी सारखी आठवण येते. यशवंताची आठवण येते.
मला कळत नाही असं नाही रमा, मला कळतं की तू दुःखांच्या या वणव्यात स्वतः करपून जात आहेस. पाने गळत जावीत आणि जीव सुकत जावा त्याप्रमाणे तू होते आहेस. पण रमा मी तरी काय करु ! एका बाजूने हात धुवून पाठीशी लागलेले दारिद्रय. दुसऱ्या बाजूने माझ्या जिद्दीने घेतलेला वसा. वसा ज्ञानाचा !
मी ज्ञानाचा सागर उपसतो आहे. मला इतर कशाचे यावेळी भान नाही; पण ही शक्ती मला मिळवण्यात तुझाही वाटा आहे. तू इथे *माझा संसार शिवत बसली आहेस. आसवांचे पाणी घालून माझे मनोबल वाढवीत आहेस* म्हणून मी बेभान मनानं ज्ञानाच्या तळगर्भाचा वेध घेतो आहे.

खरं सांगू रमा, मी निर्दय नाही. पण जिद्दीचे पंख पसरून आकाशात उडणाऱ्या मला कोणी सादही घातली, तरी यातना होतात. माझ्या मनाला खरचटतं आणि माझ्या रागाचा भडका उडतो. मलाही हृदय आहे रमा ! मी कळवळतो. पण *मी बांधलो गेलो आहे क्रांतीशी ! म्हणून मला माझ्या स्वतःच्या भावना चितेवर चढवाव्या लागतात. त्याच्या तुला, यशवंतालाही कधी झळा पोचतात. हे खरं आहे*; पण यावेळी रमा मी हे उजव्या हाताने लिहितो आहे आणि डाव्या हाताने अनावर झालेली आसवे पुसतो आहे. सुडक्याला सांभाळ रमा. त्याला मारु नको. मी त्याला असे मारले होते. त्याची आठवणही कधी त्याला करुन देऊ नको. तोच आता तुझ्या काळजाचा एकुलता एक घड आहे.
*माणसांच्या धार्मिक गुलामगिरीचा, आर्थिक आणि सामाजिक उच्चनीचतेचा आणि मानसिक गुलामगिरीचा पत्ता मला शोधायचा आहे. माणसाच्या जीवनात या गोष्टी ठाण मांडून बसलेल्या आहेत. त्यांना पार जाळून-पुरुन टाकता आला पाहिजे. समाजाच्या स्मरणातून आणि संस्कारातूनही या गोष्टी नाहीशा झाल्या पाहिजेत*
रमा ! तू हे वाचते आहेस आणि तुझ्या डोळयात आसवं आली आहेत. कंठ दाटला आहे. तुझं काळीज थरथरायला लागलं आहे. ओठ कापू लागले आहेत. मनात उभे राहिलेले शब्द ओठापर्यंत चालतही येऊ शकत नाहीत. इतकी तू व्याकूळ झाली आहेस.
रमा, तू माझ्या आयुष्यात आली नसतीस तर? तू मनःसाथी म्हणून मिळाली नसतीस तर? तर काय झालं असतं? केवळ संसारसुखाला ध्येय समजणारी स्त्री मला सोडून गेली असती. अर्धपोटी राहणे, गोवऱ्या वेचायला जाणे वा शेण वेचून त्याच्या गोवऱ्या थापणे किंवा गोवऱ्या थापायच्या कामावर जाणे कोणाला आवडेल? स्वयंपाकासाठी इंधन गोळा करायला जाणे, मुंबईत कोण पसंत करील. घराला ठिगळे लावणे, वस्त्रांना शिवत राहणे, एवढयाच काडयाच्या पेटीत महिना निभला पाहिजे, एवढेच ध्यान्य, एवढेच तेलमीठ पुरले पाहिजे हे माझ्या मुखातून बाहेर पडलेले गरिबीचे आदेश तुला गोड वाटले नसते तर? तर माझे मन फाटून गेले असते. माझ्या जिद्दीला तडे गेले असते. मला भरती येत गेली असती आणि तिला त्या त्या वेळी लगेच ओहोटीही लागली असती. माझ्या स्वप्नांचा खेळच पार विस्कटून गेला असता रमा ! माझ्या जीवनाचा सगळा सूरच बेसूर झाला असता, सगळीच मोडतोड झाली असती. सगळाच मनःस्ताप झाला असता. मी कदाचित खुरटी वनस्पतीच झालो असतो. जप स्वतःला जशी जपतेस मला. लवकरच यायला निघेन काळजी करु नकोस.
सर्वांस कुशल सांग.
कळावे,
तुझा
भीमराव
लंडन
३० डिसेंबर १९३०
-----
(शमीभा पाटील यांच्या वॉलवरून साभार)

१० फेब्रुवारी १९४० च्या फॉरवर्ड ब्लॉक पत्रातील अग्रलेखात सुभाषचंद्रांनी जवाहरलाल नेहरू यांच्याबाबत असे म्हटले होते कि, “वर्ध्यापासून दूर कुठेही गेले कि ते सिंहगर्जना करत असतात. वर्ध्याच्या वाटेवर ते असले कि त्यांच्या रागाचा पारा उतरतो. ते थंडपणे विचार करू लागतात. पण जेव्हा ते वर्ध्याला पोहचतात तेव्हा या सिंहाचे रुपांतर शेळीत झालेले असते.”
अर्थात महात्मा गांधी तेव्हा वर्धा येथे राहत असत.

असा पाहिजे आत्मविश्वास😊
मुंबई म्युनसिपाल्टीच्या समोर बरीच वर्ष काही रिकामी जागा होती.तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळा उभारावा अशी मागणी कोल्हापूरच्या छत्रपती शाहू महाराजांनी केली.फिरोजशहा मेहतांनी या मागणीला विरोध केला.त्यांचे म्हणणे होते कि,'छत्रपती शिवाजी महाराज मला वंदय आहेत,पण त्यांचा मुंबईशी संबंध काय?' पुढे पंचम जॉर्ज यांचा पुतळा त्या जागेवर उभारावा असा ठराव कॉर्पोरेशन मध्ये आणला.अर्थातच त्यालाही फिरोजशहांनी कडाडून विरोध केला.ते म्हणाले, 'मुंबईच्या नागरी जीवनाशी बादशहाचा संबंध काय? पंचम जॉर्ज असतील भरतखंडाचे बादशाह,पण त्यांनी मुंबई च्या नागरी जीवनासाठी काय केले आहे?' त्यावर सर दिनशा वांचा संतापून म्हणाले, 'शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा ठराव फेटाळता व आज बादशहाच्या पुतळ्याचा ठराव फेटाळला , मग त्या जागेवर स्वतःचा पुतळा फिरोजशहाना उभा करायचा आहे कि काय?' यावर फिरोजशहांणी ठासून उत्तर दिले होते कि, "का नाही?ईश्वर करील तर तसेही होईल."
अखेर तसेच झाले व आज त्या जागेवर फिरोजशहा मेहता यांचा पुतळा आहे.
-जुन्या आठवणी; लेखक प्रबोधनकार ठाकरे.प्रथम आवृत्ती-10 नोव्हेंबर 1948, किंमत -2 रु.
संदर्भ-फेब्रुवारी 2016 ललित मासिकातील यामिनी पानगावकर यांचा लेख

वैयक्तिक सत्याग्रह
आंदोलनाची सुरुवात - १७ ऑक्टोबर १९४० रोजी झाली. पहिले सत्याग्रही विनोबा भावे व दुसरे सत्याग्रही पंडित नेहरू होते.
गांधीजी स्वतः या सत्याग्रहात भाग घेणार नव्हते. आधीच अडचणीत असलेल्या सरकारची आणखी कोंडी करणे त्यांना मान्य नव्हते.
प्रत्येक सत्याग्रही गांधींनी स्वतः निवडले होते. चळवळीच्या व्यूहरचनेनुसार प्रत्येक भागात निवडक व्यक्तींनी मर्यादित प्रमाणावर सत्याग्रह सुरू करावा.

इतिहासातील काही बाबी तुमच्या आमच्या अपेक्षा बाहेरच्या झालेल्या असतात. आपल्याला ठामपणे वाटते असे नसेल झाले ....
फॅक्ट, तथ्य वेगळे असतात, लिखित व इतर पुरावे उपलब्ध असतात. त्यामुळे इतिहासाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याने ओपन माईंड असणे गरजेचे असते.
आपल्या वाटण्याने इतिहास झालेला नसतो. या ठिकाणी मी पाठवत असलेल्या माहितीपर पोस्ट फक्त फॉरवर्ड नसतात. अधिकृत पुस्तकातील त्या माहिती असतात.

१८०७ ते १८२२ पर्यंतच्या कालाचा मुत्सद्दी पण दुर्दैवी राणी मैनाबाई पवार (धार संस्थान) यांचा इतिहास वाकणकर संग्रहात सापडतो. त्यांची पत्रे ऐतिहासिक दृष्ट्या महत्वाची आहेत. आद्य महिला स्वातंत्र्य सेनानी यांच्याबाबतही दोन महत्वाचे उल्लेख त्यांच्या पत्रात मिळून येतात.
त्यांच्या १९ फेब्रुवारी १८१८ च्या पत्रात गेली दीड वर्ष दोनेक हजार सैन्यासह नर्मदेच्या उत्तर तीरी बंडाळी केली असून ती झकणावाडा (राजगड) येथे आता असून ती पुढे कोठे जाईल याचा अंदाज नाही असे लिहिलेले आहे.
पण पुढच्याच पत्रात केयूरसाहेबाने (विल्यम केईर) भीमाबाई बुळे यांना राजगड पासून चार कोसावर दतीगार येथे पकडल्याचा वृत्तांत असून तिचा सरंजाम (सैन्य) विखुरले असल्याचाही वृत्तांत मैनाबाई पवार देतात.
(पृष्ठ- ५८ – ५९. ६१, शिंदेशाही इतिहासाची साधने, भाग ४, वाकणकर संग्रह, संपादक- अनंत वामन वाकणकर, प्रकाशक- आनंदराव भाऊ फाळके, १९३५)
इंग्रजांविरुद्ध भीमाबाई होळकर (माहेरचे आडनाव बुळे) यांनी होळकर सैन्याचा फितुरीमुळे महिदपूर येथे इंग्रजांशी झालेल्या पराभव झाल्यानंतर आपले पिता महाराजा यशवंतराव होळकर यांच्या पावलावर पाउल ठेवत स्वत:चे सैन्य उभे करून गनिमी काव्याने लढा पुकारला होता. भीमाबाई होळकर पहिल्या महिला स्वातंत्र्य सेनानी. रानोमाळ भटकत त्यांनी इंग्रजांशी छापेमारी पद्धतीने युद्ध करण्याचे तंत्र अवलंबले. शेवटी रोशन खान या त्यांच्याच एका सेनानीच्या फितुरीमुळे त्यांचाही घात झाला आणि अटकेत पडावे लागले.