History Samadhan Mahajan
10.2K subscribers
609 photos
10 videos
131 files
299 links
इतिहासाचा टेलिग्राम ग्रुप
(Add ur friends)
https://t.me/historysamadhanmahajan

@SRMAHAJAN
Download Telegram
कालरेषा
१. छत्रपती शिवाजी महाराज- १६७४ साली राज्याभिषेक झाला

२. आयझॅक न्यूटन-- १६८७ मध्ये त्याने गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडला. निसर्गाचे नियम असतात, प्रयोग करून ते शोधायचे असतात, हे प्रयोग प्रसिद्ध करायचे असतात जेणेकरून कुणालाही त्या नियमांचा पडताळा घेता येईल, असं न्यूटनचं म्हणणं होतं.
झाडावरून पडणारं सफरचंद आणि समुद्राची भरती-ओहोटी या दोन्ही घटना जडओढ वा गुरुत्वाकर्षणाच्या निसर्गनियमामुळे घडतात हे त्याने सिद्ध केलं आणि आधुनिक विज्ञानाचा पाया रचला.

३. प्लासीची लढाई- १७५७ या लढाईमुळे समृद्ध बंगाल प्रांताचा (आजचा पूर्वी उत्तर प्रदेश, बिहार, बंगाल आणि ओडीशा) महसूल गोळा करण्याचे हक्क ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीला मिळाले
४. औद्योगिक क्रांती-- १७६० ते १८४०
५. पानिपतचं तिसरं युद्ध १७६१
६. फ्रेंच राज्यक्रांती - १७८९ ते १७९९ - राष्ट्रवाद, स्वातंत्र्य, समता, आणि बंधुता या मूल्यांचा जाहिरनामा
७. राजा राममोहन राय- ब्राह्म समाजाची स्थापना १८२८, मुघल बादशहाचे राजदूत म्हणून त्यांनी इंग्लडचा दौरा केला, १८३०.
८. महात्मा ज्योतिराव फुले जन्म १८२७

असा पैस मांडून आपल्या इतिहासाचा आणि वर्तमानाचा विचार केला तर आपल्या समाजापुढचे प्रश्न कोणते हे जाणता येतात, भविष्याचा वेध घेता येतो.
देवगोंडा ज्योतीगोंडा पाटील नावाचा त्यांचा आज्जा. मोठ्ठा घरंदाज आसामी. त्या काळात तो डोक्याला मोठ्ठा रुमाली फटका बांधीत असे म्हणून लोक त्याला रुमाल गोंडा पाटील म्हणत.

एकदा न्यायनिवाड्याकरीता नांदणी मठाचे मठाधिपती असणाऱ्या या देवगोंडा पाटलांना बोलवण्यात आले. न्यायनिवाडा झाला. समेटाची कागदपत्रे तयार झाली. त्या वेळी वडिलधाऱ्या माणसाने देवगोंडा पाटलास सही कराय सांगितले. देवगोंडा मोठा माणूस पण निरक्षर. पाटलाला नामुष्की वाटली. तो घरी आला.

मोठा मुलगा पायगोंडा शेतात काम करत होता. त्याला शेती बंद कराय सांगितलं व आष्ट्याच्या शाळेत शिकायला पाठवलं. शिकायची ठिणगी पेटली ती इथ.

पायगोंडा जैन चतुर्थ समाजातून सातवी पास होणारा सातारा जिल्ह्यातला पहिला माणूस ठरला. तो महसुली खात्यात नोकरीला लागला. नोकरीनिमित्त पायगोंडा कराडात राहू लागला. आपल्या पोरांबरोबर भाड्याच्या ब्राह्मणाच्या घरात तो मांगाच्या पोरांना शिकवत असे. पायगोंडा सधन होता. ऐतवड्यात आंब्याची बाग काढली होती.

त्याला चार मुलं आणि दोन मुली झाल्या. तात्यासाहेब कोल्हापूर संस्थानात वकिल झाला. बळवंतराव मेट्रिक होवून अबकारी खात्यात लागला. बंडेद्र पोलीस खात्यात लागला. आणि चौथा सधन पाटील “भाऊराव” होता.

मनात आणलं असतं बॅरिस्टर होवून लाखांची फी जमवू शकला असता. वडिलकिच्या पुण्याईवर जाहगिरदार झाला असता. शेती करत गावगाडा हाकत बसला असता. बायकोला सोन्याने मढवू शकत असता.

पण भाऊराव “कर्मवीर” झाला.
Forwarded from Kapil pawar geography
DOC-20221217-WA0019.
3.9 MB
Document_1671274921575.pdf
महाराष्ट्र दुय्यम सेवा गट-ब (अराजपत्रित) मुख्य परीक्षा २०२१ पेपर क्रमांक २ , सहायक कक्ष अधिकारी दि.३१/०७/२०२२ यातील प्रश्न

📌 भगवान बाबाजी खुळे, विठ्ठल कुरोलीकर, जाफर हुसेन पिंजारी या क्रांतीकारकांना कोणत्या खटल्यात आठ वर्षाचा कारावास ठोठावला गेला......

📌 उत्तर- पंढरपूर बॉम्ब खटला .......
१५ मार्च १९११ रोजी पंढरपूर बॉम्ब खटल्याचा निकाल लागला. मारुतीराव भोसले कुरोळीकर यांना दहा वर्ष्णाच्या सक्तमजुरीची शिक्षा झाली. पांडुरंग रघुनाथ आचारी यास सात वर्षाची शिक्षा झाली.

📌 भगवान बाबाजी खुळे, विठ्ठल गणेश कुरोळीकर व जाफर हुसेन पिंजारी यांना आठ वर्षाच्या कारावासाची शिक्षा झाली. अल्लाबक्ष शहाबुद्दीन तांबोळी व दिगंबर गवळी यांना चार वर्ष, सखाराम बाळोबा सोनार यांना तीन वर्ष, नामदेव म्हसू न्हावी व नामदेव सखाराम शिंपी यांना प्रत्येकी दोन दोन वर्ष कारावासाची शिक्षा झाली
Wishing all friends a very Happy, healthy and prosperous new year !

आपणा सर्वाना नवीन वर्ष सुख, समृद्धिचे आणि आरोग्यदायी जावो ! आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होवो ही सदिच्छा😊
गोपाळराव जोशी.. आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास गोपाळराव जोशी हे नाव वगळून पूर्ण होऊच शकत नाही. आधुनिक वैद्यकशास्त्रात पदवी मिळवणाऱ्या, डॉक्टर होणाऱ्या हिंदुस्थानातल्या पहिल्या महिला आनंदीबाई जोशी यांचे पती म्हणून गोपाळराव जोशी ओळखले जात असले तरी ही त्यांची पूर्ण ओळख नाही. मात्र इतिहासात हे पात्र नकारात्मक दृष्टिकोनातून, त्यांच्या विविध अवगुणांवर बोट ठेवून रंगवले गेले आहे. एक इरसाल, विक्षिप्त, हेकेखोर व्यक्ती, आपल्या बायकोने शिकावं, डॉकटर व्हावं म्हणून त्यांचा खूप छळ करणारा नवरा, पुण्यातल्या आणि मुंबईतल्या भल्याभल्या लोकांना जेरीस आणणारा पण अत्यंत बुद्धिमान असणारा गोपाळराव जोशी अगदी वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तिमत्त्व आहे.

वर उल्लेख केलेली अनेक स्वभाववैशिष्ट्ये गणपतरावांच्या जीवनातील विविध प्रसंगांतून दिसून येतात. श्री ज. जोशी यांनी आनंदीबाई आणि गोपाळराव जोशी यांच्या जीवनांवर लिहिलेली आनंदी गोपाळ’ ही कादंबरी बरीच गाजली. मात्र गोपाळराव यांच्या एका वेगळ्याच कामगिरीकडे पुर्ण दुर्लक्ष झालं आहे. ती कामगिरी म्हणजे भारतीय पत्रकारितेच्या आणि नियतकालिकेच्या इतिहासात एक वैशिष्ट्यपूर्ण भूमिका त्यांनी बजावली.

गोपाळ विनायक जोशी यांची ही अभूतपूर्व कामगिरी म्हणजे भारतीय पत्रकारितेच्या इतिहासात विसाव्या शतकाच्या अखेरीस त्यांनी अगदी ठरवून घडवून आणलेले एक स्टिंग ऑपरेशन. त्यांच्या या स्टिंग ऑपरेशनमध्ये पुण्यातील विविध क्षेत्रांतील भलीभली, थोर मंडळी अलगदपणे अडकली. गोपाळरावांचे हे स्टिंग ऑपरेशन ग्रामण्य प्रकरण किंवा पंचहौद चहा प्रकरण म्हणून इतिहासात अधिक प्रसिद्ध आहे. मात्र या प्रकरणात गोपाळराव जोशी खलनायक म्हणून रंगवले जातात आणि नायकाची भुमिका जाते बळवंतराव उर्फ लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्याकडे,

न. चि केळकर यांनी लिहिलेल्या लोकमान्य टिळक यांच्या चरित्रात, रमाबाई रानडे यांच्या ‘आमच्या आयुष्यातील काही आठवणी’ या आत्मचरित्रात अशा त्या काळात लिहिलेल्या गेलेल्या अनेक ग्रंथांत या चहाच्या पेल्यांसंबंधीच्या वादळाविषयी विस्तृतपणे लिहिलं गेलं आहे.

स्टिंग ऑपरेशन' या सदरात येणारे सर्व घटक गोपाळरावांच्या या उपद्व्यापात आहेत. ही सर्व घटना गोपाळरावांच्या तल्लख बुद्धीने एक विशिष्ट उद्देश ठेवून आणि खूप दिवस आधीच ठरवून घडवून आणली आहे. घडल्यानंतर उद्दिष्ट्य साधण्यासाठी पुण्यातल्या पुणे वैभव' या वृत्तपत्रात हा सर्व वृत्तांत भरपूर रंगवून त्यात चवीसाठी आणखी मिठमसाला टाकून छापून आणला आहे.

विशेष म्हणजे स्टिंग ऑपरेशमध्ये या खळबळजनक वृत्ताचे श्रेय गोपाळरावांना देण्यात आलं आहे. या बातमीला गोपाळराव जोशी यांची बाय लाईन म्हणजे नाव आहे. अर्थात गोपाळराव त्यावेळी पूर्णवेळ पगारी बातमीदार नव्हते. त्याकाळी अशी पगारी नोकरी अपवादाने असणार कारण नियतकालिकांचे मालक संपादक एकतर हौशी किंवा ध्येयवादी असत.

ही बातमी पूर्ण तपशिलवार प्रसिद्ध झाल्यानंतर योग्य तो किंवा गोपाळरावांना अपेक्षित असलेला परिणाम लगेचच झाला. पुण्यातले समाजजीवन त्यामुळे पूर्ण ढवळून निघाले. त्यात मग इतर अनेकांनी आपली पोळी भाजून घेतली. या चहापानाच्या प्रकरणात कोणकोण अडकले होते याची नुसती यादी पाहिली तरी त्यावरून विविध क्षेत्रांत उडालेला धमाका लक्षात येईल. एकाद्या सुगरणीने खाद्यपदार्थांच्या चवीसाठी विविध घटकांचा वापर करावा तसे गोपाळरावांनी आपले डोके वापरून पुण्यातील सामाजिक, राजकीय, सनातनी, पुरोगामी अशा विविध क्षेत्रांतील लोकांचा या स्टिंग ऑपरेशन साठी भरणा केला होता.

या लोकांमध्ये देशातील एक प्रमुख राजकीय आणि सामाजिक नेते असलेले लोकमान्य बाळ गंगाधर टिळक होते, न्यायमूर्ती म गो रानडे होते, भारत सेवक समाजाचे संस्थापक आणि नंतर उदयास येणाऱ्या गांधीजींचे गुरु गोपाळ कृष्ण गोखले, इतिहासाचार्य वि. का. राजवाडे वगैरेवगैरे.

या प्रकरणात मुख्य व्यक्ती आणि सर्वाधिक हानी पोहोचणारी व्यक्ती अर्थातच लोकमान्य टिळक होते. दीड दोन वर्षे या प्रकरणामुळे खूप लोकांना, खूप कुटुंबांना मनस्ताप सहन करावा लागला. पुण्यातल्या दोन विरुद्ध टोकांना असलेल्या लोकांनी या वेळी प्रतिस्पर्धी गटावर पुरता हल्ला करून या प्रकरणातली रंगत अनुभवली. दीर्घकाळ चाललेल्या या ग्रामण्य प्रकरणात लोकमान्य टिळकांना दोनदा प्रायश्वित घ्यावे लागले. या प्रकरणाचा सक्षमोक्ष करण्यासाठी आणि दोषी लोकांना शिक्षा सुनावण्यासाठी खुद्द शंकराचार्यांची मदत घेण्यात आली होती.

विशेष म्हणजे गोपाळराव जोशी यापैकी कुठल्याही गटांत मोडणारे नव्हते. या स्टिंग ऑपरेशनमुळे पत्रकार गोपाळराव जोशी यांचे एकमेव इप्सित साध्य झाले. हे उद्दिष्ट्य म्हणजे त्याकाळच्या पुणे शहरातील लोकांचा सनातनीपणा, सुधारक मंडळींची प्रत्यक्ष जीवनातील विसंगती उघडकीस आणणे.


हां, इथं सांगायलाच हवं, तर गोपाळराव जोशी हे भारतीय कुटुंब नियोजन चळवळीचे आद्य प्रवर्तक र. धो. कर्वे यांच्या सहकारी शकुंतला परांजपे यांचे चुलत आजोबा, सिने-दिग्दर्शिका सई परांजपे यांचे चुलत पणजोबा. शकुंतला परांजपे यांनी गोपाळराव जोशी यांचे व्यक्तिचित्र रेखाटलं आहे.
निवडक शकुंतला परांजपे' या पुस्तकात हा लेख आहे. या लेखात शकुंतलाबाई लिहितात:

”गोपाळरावांना ढोंग आणि दांभिकपणा बिलकुल खपत नसे. नाना सोंग करून दुसऱ्याचं ढोंग चव्हाट्यावर आणण्याची त्यांना फार खोड. पाणी शिंपडल्यानं माणूस बदलतं काय, असं म्हणून स्वारी बाप्तिस्मा घेऊन ख्रिस्ती झाली आणि पुढल्या रविवारी प्रार्थनेच्या वेळी धोतर नेसून उघड्या पोटावर जानवे घालून चर्चमध्ये जाऊन बसली. तेव्हा तेथील पादऱ्यानं हळूच सुचवलं की, तुम्ही आता ख्रिस्ती झालात तेव्हा जानवं वगैरे काढून नीट पोशाख करावा. “जानवं घालू नये. असं बायबलमध्ये कुठं सांगितल आहे?” असा सवाल गोपाळरावांनी पादऱ्याला केला आणि लवकरच संगमात स्नान करून, आता माझी सर्व पाप धुऊन निघाली आणि मी पूर्ववत हिंदूच आहे, असा आधार धर्मग्रंथातून भटभिक्षुकांना दाखवला. ख्रिस्ती धर्माची टिंगल आणि हिंदू धर्माचीही टिंगलच!”

गोपाळरावांच्या अशा या व्यक्तिमत्वाला साजेसं असं हे स्टिंग ऑपरेशन आहे.

बाळशास्त्री जांभेकर यांनी ६ जानेवारी १८३२ रोजी दर्पण' नियतकालिक सुरू करून मराठी पत्रकारितेचा पाय रचला. महाराष्ट्र सरकारतर्फे ६ जानेवारी हा पत्रकार दिन म्हणून जातो. दर्पण'च्या स्थापनेनंतर पाच दशकांनी - १४ ऑकटोबर १८८० रोजी - गोपाळराव जोशी यांनी हे स्टिंग ऑपरेशन केलं. अर्थात स्टिंग ऑपरेशन’ हा पत्रकारितेत रूढ झालेला अलिकडचा शब्दप्रयोग.

भारताच्या इतिहासात काही वर्षांपूर्वी करण्यात आलेले काही स्टिंग ऑपरेशन्स खूप गाजले. भारतीय जनता पक्षाचे पहिले (आणि आतापर्यंतचे एकमेव ) दलित पक्षाध्यक्ष म्हणून गाजावाजा केलेले बंगारु लक्ष्मण हे लाच घेताना एका स्टिंग ऑपरेशनमध्ये लोकांनी २००१ साली पाहिले. त्यावेळी भाजपच्या नेतृत्वाखाली पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे सरकार होते आणि त्यामुळे पक्षाध्यक्षाची मुदत पूर्ण होण्याआधीच बंगारु यांना दरवाजा दाखवण्यात आला होता.

त्याच काळात जॉर्ज फर्नांडिस यांच्या समता पक्षाच्या नेत्या जया जेटली यांच्यासह इतरही स्टिंग ऑपरेशनमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकले होते. हे स्टिंग ऑपरेशन
तेहेलका डॉट कॉम’ या न्युज पोर्टलने केले होते.

लोकसभेचे अकरा सदस्य २००५ साली संसदेत प्रश्न विचारण्यासाठी लाच घेताना अशाच एका स्टिंग ऑपरेशनमध्ये पकडले गेले होते, त्यामध्ये भाजपचे सहा, बहुजन समता पार्टीचे तीन आणि काँग्रेसचा आणि लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाचा प्रत्येकी एक खासदार होता.

अलिकडच्या काळात मात्र स्टिंग ऑपरेशन घडवून आणण्याचं धाडस कुणाही वृत्त एजन्सीनं वा पत्रकारानं केलं नाही.

गोपाळराव जोशी यांचे हे स्टिंग ऑपरेशन महाराष्ट्राच्या आणि भारतीय इतिहासात गाजलेले आणि सर्वपरिचित असले तरी भारतीय पत्रकारितेच्या इतिहासात या प्रकरणाची साधी दखलही घेतली जात नाही. पत्रकारितेसाठी देशातील पत्रकारितेच्या अभ्यासक्रमांत सोडा, महाराष्ट्रातील आणि पुणे-मुंबईच्या पत्रकारितेच्या अभ्यासक्रमांतसुद्धा या देशातील पहिल्यावहिल्या सर्वाधिक गाजलेल्या स्टिंग ऑपरेशनविषयी शिकवले जात नाही.

गोपाळराव जोशी यांचे एकूण व्यक्तिमत्व अत्यंत वादग्रस्त असले तरी देशाच्या पत्रकारितेच्या इतिहासात पहिलेवहिले स्टिंग ऑपरेशन घडवून आणून समाजजीवनातील अनेक विसंगती चव्हाट्यावर आणण्याचे श्रेय त्यांना निश्चितच द्यावे लागेल.

Camil Parkhe January 1, 2023
सावित्रीबाई फुले या मराठीतील आधुनिकतेचा स्पर्श असलेल्या आद्य कवयित्री. १८५४ साली त्यांचा "काव्य फुले" हा पहिला कविता संग्रह प्रकाशित झाला. सामाजिक भान असलेल्या कविता आणि निसर्ग कविता यात आहेत. मराठीचे आधुनिक कवी केशवसूत या काव्यसंग्रहाच्या प्रकाशनानंतर १२ वर्षांनी जन्मास आले तर त्यांचे कवितालेखन ३२ वर्षांनी सुरु झाले. ते श्रेष्ठ कवी असले तरी "आद्य" नव्हेत हे मराठी साहित्याच्या अभ्यासकांनी लक्षात घेतले पाहिजे.

१८९१ मध्ये सावित्रीबाईंचा दुसरे पुस्तक बावन्न कडवी असलेले खंडकाव्य " बावन्नकशी सुबोध रत्नाकर" प्रकाशित झाले. निद्रेत गेलेल्या समाजाला जागे करण्याचा हा अतुलनीय प्रयत्न होता. साहित्य इतिहासाने मात्र त्याची दखल घेतली नाही. असो. या आद्य मराठी आधुनिक कवयित्रीला आणि अलौकिक आद्य आधुनिक शिक्षिकेला आज जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.
🔹भेटेन नऊ महिन्यांनी ..........कविता व देशभक्त 🔹

📌 सोलापूरचे मलाप्पा धनशेट्टी, अब्दुल रसूल कुर्बान हुसेन, जगन्नाथ शिंदे आणि श्रीकिशन सारडा यांना ६ जून १९३० रोजी सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा दिली. हा खटला भुलाभाई देसाई यांनी चालविला होता.

📌 रामकृष्ण जाजू, रामभाऊ राजवाडे, छन्णुसिंग चंदेले, कवी कुंजविहारी, तुळशीदास जाधव आदींना देखील शिक्षा देण्यात आल्या. १२ जानेवारी १९३१ रोजी येरवडा येथे चौघांना फाशी दिली. हा दिवस सोलापुरात हुतात्मा दिन म्हणून पाळला जातो.

📌 या चौघांना फाशी देण्याआधी विजापूरच्या तुरुंगात असतांना कुर्बान हुसेन कवी कुंजविहारींना म्हणत असत, ‘मनी धीर धरी शोक आवरी जननी, भेटेन नउ महिन्यांनी’ हि कुंजविहारीची कविता गात मी फासावर जाईन.

📌 १९२२ साली चौरीचौरा प्रकरणात फाशी गेलेल्या एकाला ‘आता केव्हा भेटणार?’ असे विचारताच, ‘नऊ महिन्यांनी भेटेन’ असे उत्तर त्याने दिले होते. त्यावर १९२३ मध्ये कुंजविहारीनी लिहिलेली कविता त्या काळात खुप प्रसिद्ध झाली.

📌 सोलापूरचे चार हुतात्मा, लाहोर कट खटल्यातील भगतसिंग, राजगुरू, सुखदेव हे तीन अशा सात हुतात्म्यांवर नागपूरचे नारायण केशव बेहेरे यांनी ‘सप्तर्षी’ कविता लिहिल्यामुळे त्यांना सरकारी नोकरीस मुकावे लागले होते.
शशी थरूर यांचे AN ERA OF DARKNESS हे पुस्तक नुकतेच वाचण्यात आले. काही पुस्तके इतकी प्रसिद्ध व चांगली असतात कि त्या पुस्तकांच्या आधारावर लोक भाषण करतात...स्पीच देतात...डिबेट करतात. इथे परिस्थिती नेमकी उलट झाली. थरूर यांनी आधी मे २०१५ मध्ये ऑक्सफोर्ड मध्ये १५ मिनिटांचे भाषण दिले. ते इतके प्रसिद्ध झाले कि त्यांना अनेकांनी यावर पुस्तक लिहिण्यास सांगितले व त्याच्या परिणामी या चांगल्या पुस्तकाची रचना झाली. (त्यांचे ते प्रसिद्ध भाषण यु ट्यूबवर उपलब्ध आहे, त्याची लिंक -https://youtu.be/f7CW7S0zxv4) अर्थात पुस्तक वाचत असतांना हे सहज लक्षात येते कि, ते भाषण म्हणजे हिमनगाचे टोक होते. इतके डिटेलिंग त्यांनी पुस्तकात दिले आहेत. त्यातील काही मी टिपलेल्या नोंदी-
पुस्तकाच्या सुरुवातीलाच ते पुराव्यानिशी अनेक बाबिंमधून स्पष्ट करतात की इंग्लिशमन आपल्यासाठी आदर्श नव्हते तर त्यांच्यासाठी भारत आदर्श होता....विलियम dalरिम्पल चे लास्ट मुघल किंवा anarchy वाचतांना पण हे लक्षात येते की सुरुवातीचे अनेक ब्रिटिश लोक भारतीय वेशभूषा करत. यांच्यासारखे राहण्याचा प्रयत्न करत. किंबहुना 1857 च्या उठावापूर्वी जी लोक लाल किल्ला परिसरात नोकरीसाठी राहायची. त्यांनी येथील बायांशी लग्न केले. इथल्या प्रथा अंगिकरण्याचा प्रयत्न केला.

इथून लुटून नेलेली लूट इतकी होती की ऑक्सफर्ड डिक्शनरीत लूट शब्द समाविष्ट करण्यात आला. इथल्या पैशांवर तिथे मोठी घरे बांधली महलासारखी. त्यांच्या शैली भारतीय महलासारख्या ठेवण्यात त्यांना भूषण वाटायचे. किंबहुना काहींनी त्या घरांना भारतीय नावे दिली. ही दोन्ही पुस्तके वाचताना कुठेतरी अधोरेखित होते की इंडिया was great at that time....they looted it for their personal use.

आधुनिक काळात ब्रिटनने अनेक देशात युद्ध लढले तेथील जमीन ताब्यात घेतली. चायना, बर्मा, सिलोन ते आफ्रिका त्याकाळात भारतातील लोकांची आर्मी वापरली व त्यांचा खर्च भारतातील करामधून दिला जायचा. दोन्ही महायुद्धात हा प्रकार झाला. ब्रिटन साठी भारतीय सैनिक जगभर लढले अगदी विदेशी युद्धभूमीवर देखील. पहिल्या महायुद्धात 74187 भारतीय सैनिक मृत्युमुखी पडले जे ब्रिटनसाठी लढत होते...असंख्य जखमी झाले. ओटोमन एम्पायरच्या विरोधात 7 लाख भारतीय सैन्य लढत होते मेसोपोटेमिया भूमीवर.

दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ....ब्रिटिश स्टील शिप समुद्रात बुडल्यामुळे भारतातून सात हजार टणाची स्टील शीट रोल युकेला पाठविण्यात आली. जो भारताच्या स्टील इंडस्ट्री साठी एक मोठ्ठा सेट back होता...

स्वामी विवेकानंद एके ठिकाणी म्हणतात, 'British understood the price of everything they found in India but the value of nothing....'

आपलेच सैन्य वापरले...आपलेच येथील राज्य जिंकण्यासाठी...त्या सैन्यावर खर्च आपलाच पण त्या राज्यातून मिळणारे महसूल मात्र ब्रिटनला जात होते. तैनाती फौज याचे उदाहरण आहे. आयडिया ऑफ इंडिया, unity आधी देखील होती अशी रामायण महाभारत, मौर्य गुप्त मुघल मराठा अशा साम्राज्याची उदाहरणे दिली आहेत.

आतापर्यंतची जी साधारण समज आहे...की ब्रिटिशांमुळे आधुनिकता आली, बदल झाले, नवीन विचार सरणी आली, सुधारणा झाल्या...पण शशी थरूर यांनी या पुस्तकात परखडपने हे सर्व मते खोडले आहेत. इतक्या collectively व स्पष्टपने कोणीतरी असे मांडले आहे तेही पुराव्यानुसार...हे माझ्या वाचण्यात पहिल्यांदाच आले (अर्थात तुटक स्वरुपात अनेक ठिकाणी हि माहिती आहे. पण एकत्रित व एक दृष्टीकोन ठेऊन लिहिलेले असे) चॅप्टरची नावे पण तशीच आहेत... did the british give india political unity?

बऱ्याच ठिकाणी विलियम डंलरिंपल च्या विधानांचा आधार घेतला आहे...ते म्हणतात pre colonial era चांगला होता असे नाही पण ब्रिटिश चांगले होते हे सेट झालेले नोशन पूर्ण पने खरे नाही.we are ruling you for your own good... हे 1858 मध्ये राणीच्या जाहीरनाम्यात सूचित होणारे अर्थ खरे नव्हते...

1903 कर्झनच्या दरबारात राजे महाराजे उंची पोशाख घालून आले होते.बादशाह ला खुश करण्यासाठी...गांधींनी त्यांच्या आत्मचरित्रात देखील याचा उल्लेख केला आहे. थरूर म्हणतात ब्रिटिश ड्रेस कोडचा त्रास तेव्हाच्या राजा महाराजांना होताच असे नाही..भारतातल्या उन्हात आजही असंख्य शाळांमध्ये मुलांना टाय बांधावा लागतो...हा तो impact आहे.

Un Indian civil service... नेहरु म्हणतात, त्या काळातील Indian civil service was neither Indian nor civil, nor a service.. जस्टिस सय्यद मुहम्मद कोर्ट जज म्हणून लागतो ..तेथील भेदभाव व दुय्यम वागणूक ला नाराज होऊन 1892 मध्ये राजीनामा देतो तेव्हा तो फ्रस्ट्रेट झालेला असतो..वयाच्या 53 व्या वर्षी मृत्यू होतो तो सर सय्यद अहमद खान यांचा मुलगा असतो...ICS सर्विस या भारतीय ICS लोकांबद्दल भेदभाव पूर्ण वागायच्या. त्यांना पगार देखील कमी, महत्वाची पदे दिली जात नसत.
प्रसिद्ध कवी रुडयार्ड किपलिंग देखील कशा पद्धतीने रेसिस्ट दृष्टिकोन बाळगून होता ते यात दिसते. तसेच ई.एम.फॉस्टर चे प्रसिद्ध पुस्तक ए पॅसेज टू इंडिया मध्ये देखील आहे.

फ्री प्रेस किंवा ब्रिटिशांनी भारतात वृत्तपत्र आणले , लोकांना मत मांडण्याचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले. पण पाहिली प्रिंटिंग प्रेस पोर्तुगीजांनी आणली 1550 मध्ये. ब्रिटिशांचे पाहिले वृत्तपत्र आले 1780 मध्ये ज्यावर 1782 मध्ये बंदी घातली. नंतर अनेक बंदीचे कायदे आणले, जप्ती आणली.

भारतीय कायद्यांमध्ये oppressive legacy आहे. कायद्यात स्री पुरुष भेद आहेत. स्रीला अधिक दोषी ठरवणारे व त्यांच्या colonial needs पुर्ण करणारे आहेत. ब्रिटिश interfered with social customs only when it suited them to do so ....

sedition act ज्यात स्वातंत्र्य पूर्वी महात्मा गांधिंसारख्या अनेकांना अटक झाली. त्याच ॲक्ट खाली 2016 ला jnu विद्यार्थ्याला अटक झाली.

इंडियन सोसायटी मिक्स होती. ब्रिटिशांनी कॉमन लॉ तयार करण्याच्या वेळी भारतीय समाजातील समिश्रता न समजल्याने येतील ब्रम्हणाच्या मदतीने सुरुवातीला जे कोड बनवले त्यावर ब्राम्हणांचा impact राहिला. पूर्वीच्या समाजातील नियम जाती जातीय होते आता ते एकच नियमाने तयार झाले. वरवर पाहता हे न्यायाचे वाटेल पण ज्या घटकांच्या मदतीने हे नवीन नियम तयार करण्यात आले त्यांचे प्रभुत्व त्यातून दिसते. किंबहुना जुने शास्त्र स्मृती शोधून त्यांचे अर्थ लावून एकत्रित केले.

The census joined the map and the museum as a tools of British imperial dominance in 19th century.. जनगणना, map व म्युझियम to control and governed it... ICS अधिकारी हर्बर्ट रिस्ले 1901 च्या जनगणनेचा कमिशनर होता..त्याने ती जनगणना ethnographic census म्हणून घोषित केली...skull व नाकाचे माप घेण्यात आले facial फीचर्स चे photograph काढण्यात आले. ... रिस्लेच्या या सर्व कामामुळे British affirm their own convictions about European biological superiority over Indians...

the myth of enlightened depotism या प्रकरणात ब्रिटिशांच्या धोरणाबद्दल बोलतांना थरूर यांनी विलियम डिगबी यांचे स्टेटमेंट सांगितले आहे की, 1793 ते 1900 या 107 वर्षात जगातील सर्व युद्धांमुळे 5 मिलियन लोक मेले. पण भारतातील दहा वर्षात 1891ते 1900 19 मिलियन लोक दुष्काळात मेले.

the messy afterlife ... यात ते म्हणतात, गेलेली संपत्ती तर परत देणार नाहीत.but just apology करू शकतात. taxes परत देऊ शकत नाही पण personal वस्तू परत देऊ शकतात ज्या लुटून नेल्या. जसे की once world largest diamond 793 कॅरेट चां कोहिनूर. या प्रकरणात कोहिनूर चां प्रवास देखील आहे.

Railway was a big British colonial scam...रेल्वेतील गुंतवणुकीवर वार्षिक 5 टक्के रिटर्न देण्याचे कबूल केले....जे त्या काळातील जास्त होते. ज्या काळात अमेरिकन डॉलरची किंमत दोन हजार पौंड होती.तेव्हा 1850-60 च्या काळात रेल्वेवरील खर्च 18000 पौंड होता. रेल्वेचा शेअर ब्रिटन मध्ये जोरात विकला गेला. पैसा तंत्रज्ञान साहित्य नफा हे सर्व ब्रिटनचे व लॉस झाला तर भारतीयांचा अशी परिस्थिती होती. भारतीय कर्मचारी व प्रवासी दोघांना दुय्यम वागणूक दिली जात असे. भारतीय locomotive बनवण्याची सुरुवात भारतात 1878 ला झाली. जे ब्रिटन पेक्षा स्वस्त होते. म्हणून 1912 मध्ये पार्लमेंट ॲक्ट पास करण्यात आला ज्यातून भारतीय कंपन्यांना locomotive बनवण्यास बंदी घालण्यात आली. पहिल्या महायुद्धाच्या काळात several Indian rail lines were dismantled and shipped out of the country to aid the allied war effort in Mesopotamia.

..गांधी सक्सेस झाले कारण त्यांचे विरोधी ब्रिटिशांनी ते होऊ दिले असा अर्थ ध्वनित होतो. अर्थात ब्रिटीश नाजी किंवा फेसिस्ट असते तर कदाचित नसते पण यश मिळाले या मार्गाला. अहिंसत्मक लढा प्रेरणादायी होता पण सगळीकडे यशस्वी नव्हता. नेल्सन मंडेलाने एकावेळी कबूल केले होते की, अहिंसा कामात आली नाही. भारतात शेवटी शेवटी सैन्याने विद्रोह केला तेव्हा त्यांनी एकवेळ गांधींना तुरुंगात उपवास करायला टाकले पण त्या विद्रोहाला ते डावलू शकले नाही. and when the right and wrong are less clear cut gandhisam flounders. जसे त्यांना फाळणी चुकीची वाटत होती पण ते थांबवू शकले नाही.

ब्रिटिश सोडून गेल्याचा परिणाम दीर्घकाळ राष्ट्रांना भोगावा लागला. आफ्रिकेतील अनेक देशात त्यांनी आखलेल्या बॉर्डर देशादेशात युद्ध घेऊन गेले. युगांडा रवांडा सेनेगल... आदी.

अशा अनेक गोष्टींचा मागोवा घेत व त्याला पुराव्यांची साथ जोडत आपल्या ओघवत्या शैलीत शशी थरूर यांनी लिहिलेले हे पुस्तक वाचनीय आहे.

- समाधान महाजन
सोलापूर येथील गांधी टोपीचा लढा

📌 सविनय कायदेभंग चळवळीत सोलापूर भागात गांधी टोपी हे प्रभावी प्रतीक होते. सोलापूर काँग्रेसचे चिटणीस तुळशीदास जाधव यांनी गांधी टोपी काढली नाही तर त्यांना मारहाण करण्यात आली. सैनिक काठ्यांनी लोकांच्या डोक्यावरील टोपी काढत व नंतर त्या व्यक्तीला पकडण्यात येई. तिरंगा झेंडा, वंदे मातरम् गीत व गांधी टोपी या प्रतीकांनी चळवळीला प्रोत्साहन दिले.

📌 फेन्नर ब्रोक्कवे हे मजूर पक्षाचे ब्रिटनच्या संसदेतील सदस्य भारतीय स्वातंत्र्यचळवळीचे पाठीराखे होते. गांधी टोपी काढण्याची सक्ती सोलापुरात केली जात असल्याबद्दल त्यांनी भारतमंत्री वेजवूड बेन यांना ब्रिटीश संसदेत प्रश्न विचारला तेव्हा स्वतः फेन्नर यांनी डोक्यावर गांधी टोपी घातलेली होती. त्यामुळे ब्रिटनच्या संसदेत प्रथमच गांधी टोपी धारण केलेला खासदार प्रश्न विचारत होता.

📌 १९८५ साली कॉंग्रेसची शताब्दी मुंबईत साजरी होत असतांना तेव्हा वयाची नव्वदी उलटलेले फेन्नर ब्रोक्कवे गांधी टोपी घालून आलेले होते
एक बाप त्याच्या मुलीला म्हणाला 🤠 "तू नुकतीच ग्रॅज्युएट झाली आहेस, ही गाडी मी काही काळापूर्वी घेतली आहे... ती काही वर्ष जुनी आहे. पण मी ती देण्यापूर्वी ती शहरातील एका कार डीलरकडे घेऊन जा आणि विकून टाक, ते किती ऑफर करतात ते पहा."

मुलगी तिच्या वडिलांकडे परत आली आणि म्हणाली: "त्यांनी 1000 युरो देऊ केले कारण कार खूप जुनी आहे"

वडील म्हणाले: धीर धर आणि दुसऱ्या कार डीलरकडे घेऊन जा.

मुलगी तिच्या वडिलांकडे परत येते आणि म्हणते: " त्या शॉपने 100 युरो ऑफर केले कारण ती खूप जुनी कार आहे आणि ती पुन्हा चालवण्यासाठी खूप गुंतवणूक करावी लागेल"

वडिलांनी आपल्या मुलीला वाहन क्षेत्रातील तज्ञ लोकांच्या रॉयल कार क्लबमध्ये सामील होण्यास सांगितले आणि त्यांना कार दाखवली.

मुलीने कार क्लबकडुन वळवली, वळून तिच्या वडिलांना म्हणाली: "क्लबमधील काही लोकांनी मला 100,000 युरो देऊ केले कारण ही एक दुर्मिळ कार आहे जी चांगल्या स्थितीत आहे, उत्तम क्षमता आणि शोधणे खूप कठीण आहे." 🤗

तेव्हा वडील म्हणाले, "तुम्ही योग्य ठिकाणी नसाल तर तुमची काहीच किंमत नाही हे मला तुम्हाला कळवायचे होते."

तुमचे कौतुक होत नसेल तर रागावू नका, याचा अर्थ तुम्ही चुकीच्या ठिकाणी आहात. "अशा ठिकाणी राहू नका जिथे तुमची किंमत कोणी पाहत नाही ."
गांधींचा हरिजन दौरा

📌 ७ नोव्हेंबर १९३३ ते २९ जुलै १९३४ या काळात महात्मा गांधींनी वर्ध्यापासून सुरुवात करून संपूर्ण देशाचा दौरा केला. दहा महिन्यात गांधीजींनी वीस हजार किलोमीटरचा हा दौरा होता.


📌 गांधीजींचा हरिजन दौरा सुरु असतांना १६ जानेवारी १९३४ रोजी बिहारमध्ये झालेल्या भूकंपाने अनेक जन मृत्युमुखी पडले व खूप नुकसान झाले. त्यावेळी गांधीजी म्हणाले होते, “पददलितांवर समाजाने केलेल्या अत्याचारांसाठी निसर्गाने दिलेली हि शिक्षा होय”.

📌 या महात्माजींच्या विधानाचा अनेकांनी विरोध केला. रवींद्रनाथ टागोर यांनी एक पत्रक काढून गांधीजीवर टीका केली. अस्पृश्यता देशभर पाळली जात असतांना परमेश्वराने शिक्षा देण्यासाठी फक्त उत्तर बिहारमधील लोकांचीच निवड का करावी असा रवींद्रनाथचा प्रश्न होता.
सेवाग्राम हे खेडेगाव असूनही राष्ट्रीय नेते व महत्वाच्या आंतरराष्ट्रीय व्यक्तींचे तेथे येणे-जाणे होते. अशा नेत्यांना तेथे जाण्यासाठी जमनालाल बजाज यांनी एक जुनी पुराणी फोर्ड मोटार दिलेली होती. ती ओढण्यासाठी बऱ्याचदा एक बैलजोडी वापरावी लागे. म्हणून तिला बजाजांनी ‘ऑक्सफोर्ड’ असे नाव दिले होते