History Samadhan Mahajan
10.3K subscribers
611 photos
10 videos
131 files
299 links
इतिहासाचा टेलिग्राम ग्रुप
(Add ur friends)
https://t.me/historysamadhanmahajan

@SRMAHAJAN
Download Telegram
UPSC 2022 निबंधाचा पेपर...
प्रबोधन कार ठाकरे लिखित पुस्तिका देवळाचा धर्म , धर्माची देवळे...
केशव सीताराम ठाकरे ( १७ सप्टेंबर १८८५ - २० नोव्हेंबर १९७३ ) प्रबोधनकार या नावाने प्रसिद्ध. हे लेखक, पत्रकार व इतिहास संशोधकही होते. त्यांनी सारथी, लोकहितवादी व प्रबोधन या नियतकालिकांच्या माध्यमातून आधुनिक विचारांचा प्रसार केला. कोदंडाचा टणत्कार,भिक्षुकशाहीचे बंड, देवांचा धर्म की धर्माची देवळे, ग्रामधान्याचा इतिहास, कुमारिकांचे शाप, वक्‍तृत्वशास्त्र इत्यादी ग्रंथासह समर्थ रामदास, संत गाडगे महाराज, रंगो बापूजी, पंडिता रमाबाई, माझी जीवनगाथा (आत्मचरित्र) ही चरित्रे - अशा साहित्यसंपदेची त्यांनी निर्मिती केली.
कै. श्रीधर बळवंत टिळक

लोकमान्य टिळक यांचे सुपुत्र श्री. श्रीधर बळवंत टिळक यांनी आ*त्महत्त्या करण्यापूर्वी डॉ. आंबेडकर यांना जे पत्र पाठविलेले होते, त्याचा संपूर्ण ब्लॉक 'दुनिया' साप्ताहिकाने शनिवार तारीख २ जून १९२८ च्या सातव्या अंकात ३ पानावर छापलेला होता, तो असा :--

Dr. B. R. Ambedkar
॥ श्री ॥
गायकवाड वाडा,
पुणे, ता. २५ मे १९२८
कृ. सा. न. वि. वि.
हे पत्र आपले हाती पडण्यापूर्वी बहुदा मी इहलोकास रामराम ठोकल्याची वार्ता आपले कानी पडेल ! आपल्या’ समाज-समता-संघाचे अंगीकृत कार्य नेटाने पुढे चालू ठेवण्यासाठी सुशिक्षित व समाज-सुधारणावादी तरुणांचे लक्ष या चळवळीकडे अधिकाधिक वेधून घेणे आवश्यक आहे. आपण या कामी अहर्निश झटता याबद्दल मला फार संतोष वाटतो व आपले प्रयत्नांस परमेश्वर यश देईल अशी खात्री वाटते. महाराष्ट्रीय तरुणांनी मनावर घेतल्यास अस्पृश्यता निवारणाचा प्रश्न अवघ्या पाच वर्षात सुटेल. माझ्या बहिष्कृत बांधवांची गाऱ्हाणी प्रत्यक्ष भगवान् श्रीकृष्णाचे चरणारविंदी सादर करण्यासाठी मी पुढे जात आहे. तरी मित्रमंडळीस माझा सप्रेम नमस्कार सांगावा. कळावे, लोभ असावा, ही विनंती.

आपला नम्र,
श्रीधर बळवंत टिळक

बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या भावना प्रदर्शित करणारा लेख दुनिया पत्रासाठी लिहिला, तो त्या पत्राने प्रसिद्ध केला. तो असा :--

कै. श्रीधर बळवंत टिळक

मी ता. २६ मे ला जळगाव येथे बहिष्कृत वर्गाच्या सभेकरिता गेलो होतो. आदल्या दिवशी मी जेव्हा मुंबईहून निघालो त्याच दिवशी रा. श्रीधर बळवंत टिळक यांचे एक पत्र मला आले होते. त्यात आपल्याला दापोलीच्या सभेला येता आले नाही याबद्दल वाईट वाटते वगैरे मजकूर होता. त्यात आ*त्महत्त्या करण्यासारखा प्रसंग ओढवला आहे असा ध्वनि उमटण्यासारखे काहीच नव्हते. दुपारी फार उन्ह असल्यामुळे रा. लबाचंद यांच्या अध्यक्षतेखाली सभा संध्याकाळी ६ वाजता सुरू झाली. सभेस पाच हजार लोक आले असल्यामुळे सभेचे काम फार उत्साहाने चालले होते. हिंदु महासभेच्या कामापेक्षा समाज समता संघाचा कार्यक्रम कसा परिणामकारक आहे या आशयाचे थोडेसे कडाक्याचे भाषण संपवून नुकताच मी खाली बसलो होतो. इतक्यात एक तार आली. तार येण्याचे काही कारण नसताना तार आली यामुळेच मला थोडा धक्का बसला. वाचून पाहातो तो ज्या समता संघाच्या कार्याची महती गाऊन मी खाली बसलो होतो त्याच समता संघाच्या पुणे येथील शाखेचे उपाध्यक्ष माझे मित्र रा. श्रीधर बळवंत टिळक वारले म्हणून बातमी. मी अगदी गांगरून गेलो. आधी हे खरेच वाटेना. परंतु ही तार संघाच्या सेक्रेटरीने केली असल्यामुळे ती खोटी म्हणता येईना. अशा परिस्थितीत एक दुखवट्याचा ठराव मांडून मी सभा सोडून तसाच तडक मुंबईस आलो. गाडीत श्रीधरपंतांच्या मरणासंबंधी अनेक तर्क माझ्या मनात आले व आपण आरंभिलेल्या कार्यातील धडाडीचा एक मोठा जोडीदार नाहीसा झाला हे जाणून माझे मन फार उद्विग्न झाले. श्रीधरपंतांना कोणी तरी दुष्टाने विषप्रयोग केला असावा असा माझा प्रबल तर्क झाला. तारेत मरणाचे कारण काहीच दिलेले नव्हते. तेव्हा मरणाचे कारण हेच की दुसरे कोणते, हे जाणण्यासाठी गाडी मुंबईस केव्हा पोहोचेल असे मला झाले होते. गाडी दादरला पोहोचल्याबरोबर मी माझ्या ऑफिसात गेलो. टाईम्स् हातात घेतो तोच श्रीधरपंतांचे हातचे मरणापूर्वी तीन तास अगोदर मला लिहिलेले एक पत्र टेबलावर पडलेले दिसले. तेव्हा टाईम्स् टाकून ते हाती घेतले. वाचतो तो आ*त्महत्त्या हेच म*रणाचे कारण होय हे अगदी स्पष्ट झाले. तर अगदी कष्टी झालो. श्रीधरपंताला मी थोडासा दोषही आ*त्महत्त्या हा म*रणाचा एक भेसूर प्रकार आहे. परंतु ज्या कारणामुळे ही आ*त्महत्त्या घडली ती कारणे ध्यानात घेतली म्हणजे श्रीधरपंतांची आ*त्महत्त्या मोठी हृदयद्रावक होती असे म्हणणे भाग पडते. आपले आयुष्य केसरी कंपुशी भांडण्यात जाणार, आपल्याला विधायक काम करण्यास अवसर राहाणार नाही. यास्तव जगण्यात हाशील नसून आत्महत्त्या करणे बरे, असे म्हणण्याची पाळी श्रीधरपंतांवर यावी, यासारखी अनिष्ट गोष्ट ती कोणती ?

माझ्या मते श्रीधरपंतांना केसरीत जागा मिळाली असती तर हा घोर प्रसंग आलाच नसता. केसरी पत्रात आपणास जागा मिळावी ही एक त्यांची महत्वाकांक्षा होती. टिळकांच्या म*रणानंतर ज्यांच्या हाती केसरी गेला त्यांनी केवळ टिळकांचा मुलगा म्हणून श्रीधरपंतांना त्यांच्या वडिलांनी केलेल्या उपकारांची फेड या दृष्टीने केसरीच्या चालकांत जागा द्यावयास पाहिजे होती. परंतु टिळकांचा मुलगा म्हणूनच नव्हे तर भारदस्त लेखक या दृष्टीने केसरीच्या संपादक वर्गांत श्रीधरपंतांचा समावेश व्हावयास पाहिजे होता. राजकीय दृष्ट्या ते काही मवाळ नव्हते-जहाल, सुताळ आणि बेताल या सर्वांच्यापेक्षा ते फारच पुढे गेलेले होते. तेव्हा त्यांच्या लिखाणाने केसरीला काही धोका नव्हता. असे असताना त्यांना केसरीत जागा मिळाली नाही, याचे मला राहून राहून मोठेच आश्चर्य वाटते. केसरीत जागा मिळाली असती तरीही केसरी कंपूचा भांड लागून जे
्हायचे ते झालेच असते असे काही लोक म्हणतील. कसेही असो. एवढी गोष्ट खास की, निदान पैशापायी काही भांडण झाले नसते. कारण श्रीधरपंत यांची मनोवृत्ति त्या दृष्टीने अनुदार नव्हती. तसे जर ते असते तर वडिलांची इच्छा पुरी पाडण्याच्या हेतूने त्यांनी ट्रस्ट डीडवर बिनतक्रार सह्या केल्या नसत्या व आज जे केसरीचे ट्रस्टी म्हणून वावरत आहेत त्यांना तसे वावरता आले नसते. केसरी कंपूवर हा त्यांनी केवढा उपकार केला आहे याची आठवण केसरी कंपूला असती तर किती बरे झाले असते.

श्रीधरपंतांचा मृत्यू हा खरोखर दैवदुर्विपाकाचा एक मासला आहे. मनुष्यमात्राच्या आयुष्याच्या पूर्ततेस अवश्य असलेली सामुग्री कै. श्रीधरपंतांच्या भाग्याने त्यांच्या उशास ठेवलेली होती. साधनसामुग्रीचा उपयोग करण्याइतकी बुद्धिमत्ताही त्यांना होती. सार्वजनिक कामाची कलकळ व एखादी गोष्ट तडीस नेण्यास अवश्य असणारी धडाडी या दोन्ही गोष्टी त्यांच्यात ओतप्रोत भरलेल्या होत्या. त्यांचा स्वभाव अगदी प्रेमळ असल्यामुळे जनतेला वश करून घेण्यात त्यांना अवधी लागला नसता. अशा सर्वतोपरी पुढारीपणास लायक असलेल्या तरुणाचा अंत झालेला पाहून कोणास खेद होणार नाही ? सामाजिक सुधारणेच्या बाबतीत त्यांचा जहालपणा सर्वांनाच माहीत आहे. समता संघाच्या कार्यावर त्यांनी किती भर दिला होता हे त्यांच्या पत्रावरुन उघड होत आहेच. समता संघाच्या स्थापनेचा पश्चात्ताप होऊन आत्महत्त्या केली, अशा मूर्खपणाच्या वल्गना करणाऱ्या भालाकाराने आपला शहाणपणा आटोपता घ्यावा,हे बरे.

समता संघाच्या कार्याला त्यांना किती अंतिम स्वरूप द्यावयाचे होते, हे त्यांनी आपल्या गायकवाड वाड्यावर नुसते समाज समता संघ असे नाव न देता 'चातुर्वर्ण्य विध्वंसक समाज समता संघ' हे नाव दिले, यावरून सिद्ध होत आहे. त्यांनी आपल्या वडिलांची समाजकार्य वगळण्यात चुकी झाली, हे प्रांजळपणे कबूल केले, यातच त्यांचा मोठेपणा दिसून येतो. त्यांना स्पष्टपणे कळून आले होते की, अर्ध शतक राजकारणाचा अट्टाहास करूनही त्याच्या फलश्रुतीच्या आड जर कोणती एकादी गोष्ट आली असेल तर समाजकारणाचा अभाव हीच होय. या समजुतीप्रमाणे त्यांचा उद्योगही चालला होता. तो उद्योग किती धडाडीचा होता, हे कोणासही सांगण्याचे कारण नाही. हल्लीच्या काळी महाराष्ट्रातील तरुणांत श्रीधरपंतांच्या तोडीचा तरुण सापडणे अत्यंत कठीण आहे. तरुण महाराष्ट्र परिषदेत जिभल्या पाजळणारे तरुण कोणीकडे आणि आमचे श्रीधरपंत कोणीकडे ? ठरावांतील रेलचेल करून गिरीकंदरी लपून बसणाऱ्या तरुणांतील भेकड तरुण ते नव्हते. त्यांचा निश्चय, जोम व कर्तबगारी ही सारी अवर्णनीय होती. ते जगले असते तर महाराष्ट्रातील अस्पृश्यता निवारण्याचे महान कार्य त्यांनी तडीस नेले असते. याचमुळे श्रीधरपंतांच्या मरणासंबंधी मला थोडा राग येतो.

सामाजिक सुधारणेच्या अंगीकृत कार्यात आपणास केवढे स्थित्यंतर घडवून आणता येईल याची त्यांना यथार्थ कल्पना असावयास पाहिजे होती व त्या कार्यासाठी तरी निदान त्यांनी जगावयास पाहिजे होते. नुसत्या जगण्यात हशील नाही हे तत्त्व मलाहि मान्य आहे. परंतु सफल जीवित स्वार्थासाठी नाही, तरी परार्थासाठी साठवलेच पाहिजे. श्रीधरपंतांना याचा विसर पडला. मला त्यांच्यासंबंधी काय वाटते हे मी त्यांच्या निधनासंबंधीचा लेख लिहिण्यास उद्युक्त झालो आहे, यावरून सर्वांना जाणता येण्यासारखे आहे. कै. श्रीधरपंत टिळक एका ब्राह्मण्याभिमानी गृहस्थाचे चिरंजीव त्यांचे वडील लो. टिळक यांना १९१९ साली जेव्हा मी मूकनायक पत्र चालवीत असे त्यावेळी, दर अंकात जरी नसले तरी अंकाआड, शिव्याशापांची लाखोली वहात असे. ब्राह्मण्याशी अहर्निश झगडणाऱ्या माझ्यासारख्या अस्पृश्य जातीतील एका व्यक्तीने ब्राह्मण्याभिमानी व्यक्तीच्या पोटी जन्मास आलेल्या श्रीधरपंतांचे मरणाने दुःखित व्हावे, हा योगायोग तर त्याच्याहीपेक्षा विशेष विलक्षण आहे, हे कोणीही कबूल करील.

परंतु, हा योगायोगच श्रीधरपंतांच्या मोठेपणाची एक मोठी साक्ष आहे. कोणी काहीही म्हणो, श्रीधरपंतांच्या वडिलांना लोकमान्य ही पदवी अयथार्थ होती. तेली,तांबोळी म्हणून बहुजन समाजाचा उपहास करणाऱ्या व्यक्तीला लोकमान्य म्हणणे म्हणजे लोकमान्य या शब्दाचा विपर्यास करणे, असे आमचे मत आहे. लोकमान्य ही पदवी जर टिळक घराण्यापैकी कोणा एकास साजली असती तर ती श्रीधरपंतासच होय.. टिळकांच्या हातून लोकसंग्रह झाला नाही. खरा लोकसंग्रह श्रीधरपंतच करू शकले असते. तो करण्यास ते उरले नाहीत, ही महाराष्ट्रावरील नव्हे - हिंदुस्थानावरील मोठीच आपत्ति आहे, असे भिक्षुकशाहीच्या कच्छपी नसलेल्या कोणत्याही लोककल्याणेच्छु माणसास कबूल करणे भाग आहे.

ले: डॉ भीमराव आंबेडकर
दुनिया, मुंबई, शनिवार, २ जून १९२८
Forwarded from HISTORY OF INDIA (SUSHILKUMAR AHIRRAO)
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
।। कॉ- शरद पाटील एक बहु आयमी व्यक्तिमत्त्व ।।

महाराष्ट्रातील एक विख्यात प्राच्यविद्यापंडित व सत्यशोधक मार्क्सवादी विचारवंत. जन्म धुळे येथे सत्यशोधक कुटुंबात. त्यांचे वडील तानाजी तुकाराम पाटील (भामरे) धुळे जिल्ह्यामध्ये पहिल्या पिढीतले सत्यशोधक होते. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण धुळे येथेच झाले (१९४२). शाळेत अभ्यासू व शिस्तप्रिय शिक्षक लाभल्यामुळे बालवयातच त्यांना सामाजिक बांधिलकी व ध्येयवादाच्या प्रेरणा मिळाल्या. चित्रकलेच्या आवडीबरोबरच त्यांना अवांतर वाचनाचाही व्यासंग जडला. चित्रकलेची आवड असल्यामुळे एक वर्ष बडोद्याच्या कलाभवनात पेंटिंग कोर्सला (१९४३) व त्यानंतर मुंबई येथील सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. तेथे तिसर्‍या वर्षाला असताना राज्यव्यापी विद्यार्थी संपामुळे त्यांना शिक्षण अर्धवट सोडावे लागले. धुळ्याला परतल्यावर त्यांचा परिचय कम्युनिस्ट कार्यकर्ते व प्रचारकांशी झाला. गव्हाणकर, अमरशेख व अण्णाभाऊ साठे या शाहिरांच्या संपर्कातून ते कम्युनिस्ट पक्षात दाखल झाले (१९४६). चित्रकलेची आवड पाहून त्यांना प्रथम पक्षाच्या मुंबई कार्यालयात स्टाफ आर्टिस्ट म्हणून काम दिले गेले. वर्षभरानंतर धुळ्यात आल्यावर ते गिरणी कामगार चळवळीचे काम करू लागले. १९४८ साली जहाल कम्युनिस्ट कार्यकर्त्यांवर कारवाईचा बडगा उगारला गेला, त्या वेळी त्यांना खानदेश भागातून हद्दपार व्हावे लागले. हद्दपारी संपल्यानंतर ते शेतकरी आघाडीवर काम करू लागले (१९५४). तेथे असताना त्यांनी गोवामुक्ती आंदोलन व संयुक्त महाराष्ट्राची चळवळ यांत सक्रिय सहभाग दिला.

सन १९५६ ते ६० च्या दरम्यान त्यांनी उकाई धरण प्रतिबंधात्मक चळवळ उभारली; परंतु त्यांना पक्षाचा पाठिंबा मिळाला नाही. आचार्य अत्रे यांनी मात्र त्यांच्या या चळवळीला सक्रिय पाठिंबा दिला. भारत – चीन युद्धाच्या वेळेस कम्युनिस्ट भारतविरोधी आहेत असा आरोप होऊन सर्वत्र कम्युनिस्टांची धरपकड सुरू झाली, त्या वेळी त्यांना औरंगाबाद व नाशिक कारागृहात स्थानबद्ध व्हावे लागले (१९६३ – ६५). तीन वर्षाच्या या स्थानबद्धतेत त्यांनी कार्ल मार्क्सचा भांडवल (दास कॅपिटल) हा ग्रंथ समजून घेतला. भारतीय समाज व इतिहास हा मार्क्सच्या तोकड्या लिखाणावरून समजून घेता येणार नाही याची खात्री पटल्यावर त्यांनी या विषयावर स्वतंत्र लेखन करावे या हेतूने स्थानबद्धतेतून सूटताच संशोधनासाठी बडोदे गाठले (१९६६). तेथील वास्तव्यात त्यांनी पंडित विद्याभास्कर मणिशंकर उपाध्याय यांच्या मार्गदर्शनाखाली संस्कृत (पाणिनी) व्याकरणाचे अध्ययन केले.

बडोद्याहून परतल्यावर त्यांनी आदिवासी भागामध्ये काम सुरू केले. पक्षाने जातिव्यवस्थेविरोधात लढा उभारायला नकार दिल्यामुळे पक्षातील संघर्ष वाढत गेला. अखेर त्यांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा राजीनामा देऊन आपल्या सहकार्‍यांसमवेत मार्क्सवाद-फुले-आंबेडकरवाद (माफुआं) ह्या विचारसरणीवर अधिष्ठित सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाची (सकप) स्थापना केली (१९७८). स.क.प.ची चळवळ वैचारिक भूमिका घेऊन लढत होती, अशा परिस्थितीत माफुआंवादी दृष्टीकोन विविध विषयांवर मांडला जावा म्हणून त्यांनी सत्यशोधक मार्क्सवादी नावाचे मासिक सुरू केले (१९८२). त्यांनी १९८२ ते ९२ या काळात विविध आंदोलने उभारून आदिवासींच्या वनअतिक्रमणाचा लढा अखंडपणे चालू ठेवला. यासाठी त्यांना एसआरपीच्या दडपशाहीशी संघर्ष करावा लागला, यातूनच पश्चिम भारतीय स्वायत्त आदिवासी (जनस्थान) राज्याची मागणी पुढे आली.

महाराष्ट्राच्या साहित्य व संस्कृतीच्या चळवळीमध्येही पाटलांचे योगदान महत्त्वाचे राहिले आहे. त्यांनी इतिहास, संस्कृती, समाजकारण व अर्थशास्त्र या क्षेत्रात लेखन केले. शेकडो लेख लिहिले, विविध विचारमंचावर जाऊन वादळी व्याख्याने दिली. त्यांची साहित्य संपदा पुढीलप्रमाणे – दासशूद्रांची गुलामगिरी (खंड १, भाग १ व २, १९८२ व १९८७), जातिव्यवस्थाक सामंती सेवकत्व (खंड २, १९९६), जात्यंतक भांडवलदारी लोकशाही क्रांती व तिची समाजवादी पूर्ती (खंड ३, २००३), प्रिमिटिव्ह कम्युनिझम, मातृसत्ता-स्त्रीसत्ता आणि भारतीय समाजवाद (खंड ४, २०१२) या खंडांमधून त्यांनी सौत्रान्तिक मार्क्सवादी तत्त्वज्ञान, बहुप्रवाही ऐतिहासिक भौतिकवादी अन्वेषणपद्धत, समाजवादी सौत्रान्तिक सौंदर्यशास्त्र व जाणीव – नेणिवान्वेषी तर्कशास्त्र यांची मांडणी केली आहे. या व्यतिरिक्त बुद्ध, भिक्खू आनंद, विशाखा (१९८३), भारतीय तत्त्वज्ञान व नास्तिक मत (१९८४), रामायण – महाभारतातील वर्णसंघर्ष (१९८६), अब्राह्मणी साहित्यांचे सौंदर्यशास्त्र (१९८८), पश्चिम भारतीय स्वायत्त आदिवासी राज्याची भूमिका (१९८९), शिवाजीच्या हिंदवी स्वराज्याचे खरे शत्रू कोण : महंमदी की ब्राह्मणी (१९९२), मार्क्सवाद – फुले – आंबेडकरवाद (१९९३), स्त्री – शूद्रांचा राजा (नाटक, १९९८), नामांतर औरंगाबाद व पुण्याचे (२०११) ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत.

भारतातील जातिव्यवस्था ही शोषण –
ची पायाभूत व्यवस्था आहे, हे त्यांचे आग्रही प्रतिपादन राहिले आहे. या प्रतिपादनाच्या समर्थनार्थ त्यांनी त्यांच्या ग्रंथांमधून मूलगामी लेखन केले. अब्राह्मणी सौंदर्यशास्त्राची मांडणी करून त्यांनी दलित-आदिवासी – ग्रामीण साहित्याची नाळ प्राचीन अब्राह्मणी परंपरेशी जोडली. ‘भारतात सौंदर्यशास्त्र नव्हते, केवळ साहित्यशास्त्र वा अलंकारशास्त्र होते. पश्चिमेत भांडवलदारी लोकशाही क्रांत्यांनंतर सौंदर्यशास्त्र जन्माला आले. भारतात सरंजामदारी जातिव्यवस्था नष्ट झालेली नसल्यामुळे सौंदर्यशास्त्र जन्माला येणे शक्य नव्हते, पण बुद्धाने केलेल्या वर्णदासअंतक समाजक्रांतीनंतर उदयोन्मुख भांडवलदार व कारागीर यांच्यात समता आल्यामुळे दिग्नागने सौंदर्यशास्त्राचे प्रवर्तन करून जाहीर वादसभेमध्ये कालिदासाचा पराभव केल्याचे मेघदूतात कालिदास मान्य करतो. पण सातव्या शतकानंतर जातिव्यवस्था कर्मठ होत गेल्यामुळे तत्त्वज्ञान व सौंदर्यशास्त्र हे अस्ताला गेले. ब्रिटिश अमदानीमध्ये भारतात समाजशास्त्रे, तत्त्वज्ञान व विज्ञाने आली; परंतु महायानाच्या दार्शनिक आकाशगंगेकडे ती जात्यंताने प्रेरित झालेली होती, या बाबीकडे दुर्लक्ष झाले’. याप्रमाणे त्यांनी त्यांची सौंदर्यशास्त्रविषयक भूमिका प्रकट केली आहे. त्यांनी त्यांच्या दुसऱ्या व तिसऱ्या खंडामध्ये दिग्नाग स्कूलच्या या अनन्य योगदानावर प्रकाश टाकला आहे. पश्चिमेत सिग्मंड फ्राइडच्या द्वैती मनाचे संशोधन तत्त्वज्ञान व सौंदर्यशास्त्रामध्ये अद्यापही आलेले नाही. पाटलांनी त्यांच्या सामाजिक सर्वहारांच्या बाजूच्या सौंदर्यशास्त्रामध्ये द्वैती मनाचा व त्याच्या प्रमाणशास्त्राचा विकास केला. त्यांच्या लेखनात एकाच वेळी भारतीय तत्त्वज्ञान, प्राच्यविद्या व मार्क्सवादी तत्त्वज्ञान यांचा प्रत्यय येत असल्याने त्यांच्या लिखानाबद्दल नेहमीच दुर्बोधतेचा आरोप होतो. त्यांच्या लिखानातील संवाद हा डाव्या चळवळीतील कार्यकर्ते व चळवळींशी संबंधित बुद्धिजीवीवर्गाशी येत असल्याने ते आपल्या लिखानात तात्त्विक व व्यावहारिक भाषा हाताळताना बाळबोध शैली हाताळत नाहीत.

त्यांच्या या कार्यासाठी त्यांना महाराष्ट्र इतिहास परिषदेचा वा. सी. बेंद्रे महान इतिहासकार पुरस्कार व रा. ना. चव्हाण प्रतिष्ठानचा महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुरस्कार (२०१४) या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

वयाच्या ८९ व्या वर्षी धुळे येथे त्यांचे निधन झाले.

(लेखन - रवींद्र घोडराज)

संदर्भ :

चव्हाण, रमेश (संपा), क्रांतिकारी सत्यशोधक कॉम्रेड शरद् पाटील, हर्मिस प्रकाशन, पुणे, २०१७.
महात्मा फुलेंनी स्थापन केलेला सत्यशोधक समाज १५० व्या वर्षात पदार्पण करत आहे. संबंधित कार्यक्रमाची माहिती👆
Photo from Samadhan Mahajan
बोस इन नाझी जर्मनी : पडद्याआडचे बोस.

नितिन भरत वाघ.

जर तरचा खेळ मोठा मजेदार असतो. जर मी पंतप्रधान असतो, जर मी पक्षी असतो असे विषय शाळेत असताना निबंधासाठी देत होते. हेच जरा बदलून जर हिटलर दुसरं महायुद्ध जिंकला असता तर? जर नाझी जर्मनीची वसाहत भारतावर लादली गेली असती तर? किंवा हिटलर आणि आईनस्टाईन अशी युती असती तर? तसंच जर सुभाषचंद्र बोस यांचे हिटलरसोबत मिळून भारतावर आक्रमण करण्याची आकांक्षा पूर्ण झाली असती तर? असे विषय घेऊन विचार करायला लागलो तर कल्पना करता येणार नाही अशा भीतीचं सावट मनावर पसरायला लागतं. सुभाषचंद्र बोस म्हणजे भारतासाठी एक गुंतागुंतीचं प्रकरण आहे.
जवळपास १९३४ सालापासून सुभाषचंद्र बोस हिटलरला भारतावर आक्रमण करण्याबाबत पटवून देत होते. शेवटी १७ फेब्रुवारी १९४१ रोजी हिटलरने आपल्या ऑपरेशन स्टाफच्या हायकमांडला अफगाणिस्तानमार्गे भारतावर आक्रमणासाठी तयारी करण्याचा आदेश दिला होता. या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी आणि आक्रमणाच्या तयारीसाठी सुभाषचंद्र बोस २ एप्रिलला बर्लिनला पोहोचले होते. ७ एप्रिलला हाय कमांडच्या जनरल हाल्डरने भारतावर आक्रमण करण्यसाठी किती तुकड्या पुरेशा होतील याचा आराखडा तयार केला होता. ९ एप्रिलला बोस यांनी एक्सिस पॉवरसोबत (जर्मनी, इटली, जपान, हंगेरी, रोमानिया, बल्गेरिया या देशांची युती) सहयोगाची योजना सादर केली. मात्र पुढे कुठे तरी माशी शिंकली आणि आक्रमण लांबले. नंतर पुढे दोन तीन वर्ष नाझी जर्मनीने आणि एक्सिस पॉवरने भारतावर आक्रमण करावं यासाठी सुभाषचंद्र बोस सतत पाठपुरावा करत राहिले. मात्र ती योजना काही सफल झाली नाही. शेवटी भारतावर हिटलरने आक्रमण करण्याआधीच आत्महत्या करून घेतली. त्यासोबत सुभाषचंद्र बोस यांचं भारतावर आक्रमण करण्याच्या प्रयत्नांवर पाणी फेरलं गेलं, शिवाय काही वर्षातच भारताला स्वातंत्र्यसुद्धा मिळून गेलं. मात्र एक गोष्ट निश्चित की या सगळ्या आडवाटेच्या प्रयत्नांमुळे सुभाषचंद्र बोस आधुनिक भारताच्या राजकीय इतिहासात एक कायमस्वरूपी गूढ बनून गेले आहेत. चार वर्षापूर्वी विद्यमान केंद्र सरकार सुभाषचंद्र बोस यांच्याशी निगडित गाजावाजा करत काही अप्रकाशित दस्तावेज प्रसिद्ध करणार होती, त्याचं काय झालं पुढे ते कळलं नाही. किंवा दस्तावेज पाहिल्यानंतर कदाचित ते परत बासनात गुंडाळून ठेऊन दिली असतील. थोडक्यात पंडित नेहरू आणि नंतरच्या अनेक नेत्यांनी सुभाषचंद्र बोस यांचं दफ्तर झाकून ठेवले होते ते योग्यच होतं याचा प्रत्यय आला असेल. असं वाटण्याचं कारण म्हणजे दोन तीन वर्षांपूर्वी रोमेन हायेस (Romain Hayes) या इतिहासकाराने लिहिलेलं ‘बोस इन नाझी जर्मनी’ हे पुस्तक. रोमेन हायेस यांचं स्पेशलायझेशन दुसऱ्या महायुद्धात जर्मनीचं परराष्ट्रीय धोरण काय होतं या विषयात आहे. या पुस्तकात हायेस यांनी सुभाषचंद्र बोस यांचे हिटलर आणि जर्मनीसोबत नेमके कसे संबंध होते याचा सखोल आढावा घेतला आहे. सुभाषचंद्र बोस यांचे नाझी जर्मनीशी नेमके कसे संबंध होते यावर नेमका प्रकाश टाकणारे हे पुस्तक आहे. हा एक असा विषय आहे जो भारतीय इतिहासकारात चर्चिला जात नाही. या पुस्तकात सुभाषचंद्र बोस यांचे व्यक्तिमत्त्व कसे होते तसेच ते किती महत्त्वाकांक्षी होते याचाही प्रत्यय येतो. महात्मा गांधींसोबत असणारे त्यांचे संबंध हा कायम विवादात असणारा मुद्दा इथे काहीअंशी वेगळ्या संदर्भात प्रकाश पाडतो, म्हणजे सुभाषचंद्र बोस राष्ट्रीय कॉंग्रेसचे महत्त्वाचे अधिकारी असताना देखील त्यांनी स्वतंत्रपणे नाझी अधिकाऱ्यांशी गुप्त बैठका घेणे हे गांधींना खचीतच आवडले नसणार आणि या बैठकी गांधींपासून लपून राहिल्या नसणार, त्यासोबतच बोस यांच्या वैयक्तिक महत्त्वाकांक्षा त्यांच्या वैचारिकते आड येत असणार. असे असूनही गांधी आणि बोस यांच्यात एकमेकांप्रती आदर होता. गांधी त्यांना घरातले रस्ता चुकलेलं पोर म्हणत. राजकीय आणि सामजिक विचारांच्या बाबतीत गांधी बोसना म्हणाले होते जेव्हा आपण पूर्णत: एकमेकांच्या विचारांचे होऊन जाऊ तेव्हा एकत्र येऊन काम करू, तोवर आपण वेगळ्याच वाटेने प्रवास करू. तत्कालीन भारतीय नेत्यांसाठी सुद्धा बोस यांचे टोकाचे फॅसिस्ट विचार हा एक अत्यंत वादग्रस्त विषय होता, त्याचाही विचार सदर पुस्तकात आहे. भारतीय जनमानसाला बऱ्यापैकी अज्ञात असलेले बोस या पुस्तकात उजागर होतात. ‘भारतातील सामाजिक रीतीरिवाज आणि परंपरा योग्यप्रकारे राबवण्यासाठी हुकुमशाहीच हवी’ अशा विचारांचे बोस होते. थोडक्यात आधुनिक मनुस्मृती बोसांना अपेक्षित असणार. भारतीय समाज लक्षात घेता, फॅसिझम आणि कम्युनिझम भारतातच प्रथम अवतरेल अशी त्यांची ठाम धारणा होती. बोस यांना एकपक्षीय आक्रमकता आणि प्रसार याचं वावडं नव्हतं, तर गांधी आणि नेहरू यांना भारतासाठी ब्रिटिश साम्राज्यवादा इतकाच धोका नाझीझम आणि फॅसिझमचा वाटत होता. बोस यांनी नाझी आणि एक्सिस पॉवरसोबत केलेल्या युतीमुळे गांधीकेंद्रीत भारतीय स्वातंत्र्य चळवळीला थेट आव्हान मिळाले
. या सगळ्या कश्मकशमध्ये हिटलरला भारतीय राजकारणात किती रस होता आणि सूक्ष्मपणे त्याचं निरीक्षण तो करत होता हे सुद्धा हायेस यांनी मांडलं आहे. ब्रिटीशांनी भारतात ज्याप्रकारची साम्राज्यवादी, वसाहती सत्ता स्थापन केली होती तशीच वसाहती सत्ता त्याला सोव्हिएत युनियनवर स्थापन करायची होती हा मुद्दा प्रकर्षाने समोर येतो. सर्वात महत्वाचे म्हणजे बोस यांना हिटलरने कायमच अंतरावर ठेवलं होतं किंबहुना हिटलरला बोस यांच्यावर विश्वासच नव्हता, असं पुस्तकात दिलेल्या घडामोडी वाचताना वाटत रहातं. हिटलरला बोस याचं भारतीय राजकारणातलं नेमकं मूल्य आणि स्थान आकळलं होतं, जोपर्यंत गांधी नावाची भिंत आडवी आहे, बोस काही करू शकत नाही याची त्याला खात्री असावी. भारतात ब्रिटीश सत्तेला होत असलेला वाढता विरोध रोखण्यासाठी हिटलरने हॅलीफॅक्सला सल्ला दिला होता ‘All you have to do shoot Gandhi. You will be surprised how quickly the trouble will lie down’ साधारण १९३० पासून बोस हिटलरला भेटण्याचा प्रयत्न करत होते शेवटी २९ मे १९४२ला हिटलर आणि बोस यांची बहुप्रतिक्षीत भेट झाली होती. जरी हिटलरने अफगाणिस्तानमार्गे भारतावर आक्रमण करण्याची योजना आखली होती तरी त्याने प्रत्यक्षात अमलात कधीही आणली नाही किंवा भारताविरुद्ध आक्रमण जाहीर केले नाही. शिवाय भारतातल्या ब्रिटिश साम्राज्याला हरवणे जपानचा घास नाही याची त्याला खात्री होती. याच्या उलट मुसोलिनीसोबत बोस यांचे संबंध अत्यंत जिव्हाळ्याचे होते. इतके की बोस मुसोलिनीला ‘बिग बॉस’ म्हणत असत. हिटलरने बोस यांच्या प्रस्तावावर विचार करावा यासाठी मुसोलिनीने प्रयत्न केले होते. जरी बोस यांचा मुख्य तळ बर्लिन होता तरी त्याचं बरंच काम रोम, इटलीतूनच चालत असावे, असा कयास हायेस मांडतात. बोस नाझी जर्मनीत गेल्यामुळे अनेक नैतिक आणि राजनीतिक प्रश्न उभे राहिले होते, त्यात त्यांचे नाझींसोबत कशा प्रकारचा सहयोग होता? त्यासोबत नाझी जर्मनीचे परराष्ट्रधोरण कसे होते यावर प्रश्नचिन्ह बोस यांच्या जर्मनीत स्वागताने उपस्थित झाले. ते भारतातील ब्रिटिशविरोधी प्रयत्नांसंबंधी काय विचार करत होते? या सगळ्यात हिटलरची भूमिका नेमकी काय होती? सर्वात महत्त्वाचे बोस यांनी नाझी जर्मनीसोबत भारताच्या स्वातंत्र्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे काय परिणाम झाले? त्यांचा भारतीय स्वातंत्र्य लढ्यात समावेश झाला की निव्वळ बोस यांचा विक्षिप्तपणा ठरला? या आणि अशा अनेक कळीच्या प्रश्नांची उत्तरे या पुस्तकात मिळतात. अगदी थेट नसली तरी काही उत्तरांचे अंदाज नक्कीच येतात. बोस यांचे १९४१ मध्ये बर्लिनला येणे म्हणजे नाझी सैन्याच्या आक्रमक वृत्तीचा वापर करून भारतावर आक्रमणासाठी उद्युक्त करणे हाच होता. एका साम्राज्यवादी सत्तेचा बिमोड करण्यासाठी दुसऱ्या त्याहून क्रूर साम्राज्यवादी सत्तेची मदत घेणे, असा संधिसाधू विचार बोस यांचा होता मात्र असं करताना त्यांना मूलभूत तात्विक दुविधेचा सामना अर्थात करावाच लागला असणार. मात्र आपलं इस्पित साध्य करण्यासाठी त्यांची कोणत्याही स्तराला जायची तयारी होती हे लक्षात येतं, याचं उदाहरण म्हणजे ब्रिटीशांची भारतातली सत्ता अगदी भरातल्या नाझी सत्तेपेक्षा जास्त क्रूर आहे असं त्यांनी नाझी अधिकाऱ्यांना सांगितलं होतं. बोस नाझी किंवा बोल्शेविक नव्हते तरी १९४४ ला टोकियो विद्यापीठात दिलेल्या भाषणात मांडलं होतं नाझीझम आणि कम्युनिझम यांचं एकत्रित संघटन भारताच्या प्रश्नांचं उत्तर आहे. जर्मनीचं भारतावर आक्रमण म्हणजे जर्मन सैनिकानी स्वातंत्र्य सैनिक म्हणून भारतात येणं आणि भारतीयांनी त्यांना मुक्ती देणारी पथके म्हणून स्वीकारावं अशी कल्पना बोस यांची होती. ब्रिटीशांच्या साम्राज्याचा पाया त्यांच्या भारतीय सैन्याच्या प्रामाणिकतेवर आणि निष्ठेवर आधारलेला होता. त्यामुळे बोस यांना वाटत होतं की ब्रिटीशांचे भारतीय सैनिक जर्मन सैन्याला मदत करतील आणि ब्रिटीशांची सत्ता उलथून टाकतील. उत्तरी-पश्चिम भारतातून आक्रमण करून हळूहळू सगळा उपखंड घशात घालायचा अशी योजना आखली होती. प्रथमदर्शनी बोस याचे जर्मन सैन्याला भारतावर आक्रमणासाठी आमंत्रीत करणे वरवर दिसतो तसा जुगार नव्हता असं लेखकाला वाटतं, ब्रिटिश सत्ता भारतातून घालवण्यासाठी हा तात्काळ मार्ग होता. गांधी आणि नेहरू यांनी भारतावरच्या जर्मन आक्रमणाविरोधात नक्की आवाज उठवला असता, मात्र भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यांचा ‘आवाज’ शांत झाला असता. कारण नेहरूंनी हिटलर आणि जपान यांच्यावर शरसंधान साधत जाहीरच केलं होतं की ते सुभाषचंद्र बोस आणि त्यांच्या पार्टशी संघर्षासाठी तयार आहेत. जे बोस यांच्या डोक्यात होतं तेच हिटलरच्या डोक्यात होतं. हिटलरला आणि जर्मन सैन्याला सुरुवातीला युद्धात यश मिळत होतं, त्याच्या आत्मविश्वासाधारे हिटलरला वाटत होतं आपण भारत जिंकू शकतो. बोस बर्लिनला पळाले त्याआधीच हिटलरने स्वतंत्रपणे आक्रमणाचा फतवा जारी केला होता. बोस यांनी बर्लिनला जाणं नक्कीच
ोग नव्हता. हिटलर काय किंवा बोस काय दोन्ही अतिआत्मविश्वासाचे बळी ठरले, हे पुढच्या काळात काय घडलं त्यावरून लक्षात येतं. मात्र जे जसं घडलं तसं घडलं नसतं तर काय, हा अंगावर शहारे आणणारा प्रश्न शिल्लक राहतोच.
या पुस्तकातून सुभाषचंद्र बोस यांचे दुभंगलेले आणि अविवेकी व्यक्तिमत्त्व समोर येते. त्यांच्या विचारात सातत्य नव्हते तसेच अनेक बाबतीत धरसोड वृत्ती होती. सर्वात महत्त्वाचं म्हणजे महात्मा गांधी आणि सुभाषचंद्र बोस यांच्यात नेमक्या कोणत्या कारणांवरून आणि विचारांवरून भांडण असेल त्याचा बऱ्यापैकी अंदाज या पुस्तकातील घटना, मांडणी वाचून लक्षात येते. आणि गांधी नावाचा माणूस परत काय होता याचा अचंबा वाटत राहतो.

नितिन भरत वाघ.

Bose in Nazi Germany – Romain Hayes, 2011.
Random House India
Rs. 399 /-

#प्रासंगिक_उत्खनन
कर्मवीर भाऊराव पाटील यांचे आपल्या मुलास पत्र...