खान अब्दुल गफ्फार खान यांना महाराष्ट्रीय जनतेकडून आहेर देण्यासाठी वर्गणीचे आवाहन!
साधनेच्या 6 डिसेंबर 1969 च्या अंकात प्रसिद्ध झालेले निवेदन.
#FromTheArchives

भारताचे पुरातन नाव मेलुहा
जेंव्हा या देशाला भारत हे नाव पडले नव्हते, हिंदुस्तान आणि इंडिया ही नावेही आली नव्हती तेंव्हा भारताला ‘मेलुहा’ हे नाव होते असे पुरावे सुमेरियन दस्तावेजांनी आपल्याला लाभलेले आहेत. सुदैवाने आपल्या प्राकृत भाषांनीही हा पुरातन पुरावा जपून ठेवला आहे. पण मेलुहा (मेलुक्खा अथवा मिलिच्छ) या शब्दाचा अपभ्रष “म्लेंच्छ” असा करत वैदिक आर्यांनी त्या शब्दाचा अर्थच बदलवन्याचा प्रयत्न केल्याने हे मुळचे राष्ट्रनाम मागे पडले. त्यानंतर ऋषभनाथपुत्र चक्रवर्ती भरतावरून भारत हे नाव प्रचलित झाल्यानंतर तर ते विस्मरणातच गेले. चिकटून राहिले ते हिणार्थाने भारतातील मूळ रहिवाशांना. नंतर म्लेंच्छ ही सद्न्या विदेशी परधर्मीय/परभाषिक लोकांना बहाल केली गेली. अर्थात ही सांस्कृतिक उलथापालथ कशी झाली हेही आपल्याला समजावून घ्यावे लागणार आहे.
सुमेरियन दस्तावेजांनुसार मागन, दिल्मून या देशांप्रमाणेच मेलुहा हा त्यांचा मोठा व्यापारी भागीदार होता. मागन म्हणजे आताचा अरब अमिरात आणि ओमान हे देश होत. दिल्मून म्हणजे इराणचा काही भाग. मेलुहा येथून सागवानी लाकूड, मौल्यवान खनिजे, तांब्याच्या लगडी, शोभिवंत दगड, गोमेद, नीलमणी व त्यापासून केलेले अलंकार, हस्तिदंत, सोने, मोती यासारख्या मौल्यवान वस्तूंबरोबरच मोर, कोंबड्या, कुत्रे आदी प्राणी-पक्षीही मेलुहातून तेथे निर्यात केले जात असत. सिंधू संस्कृतीच्या अनेक मुद्राही तेथे सापडलेल्या आहेत. हा व्यापार समुद्रमार्गे तसेच खुश्कीच्या मार्गानेही होत असे.
दक्षिण सुमेरमध्ये मेलुहाच्या व्यापा-यांनी अनेक वसाहती वसवलेल्या असल्याचेही उल्लेख उपलब्ध आहेत. दक्षिण सुमेरमधील गिर्सू या नगराराज्यातील गुआब्बा शहर हेच या वसाहतीचे एक स्थान होते असे मानले जाते. अक्काडीयन साम्राज्याच्या काळात सम्राट रीमुश याने इलम विभागात मेलुहाच्या सैन्याशी युद्ध केल्याची नोंदही उपलब्ध आहे. अक्काडचा एक सम्राट सार्गोनचा नातू नारम-सीन (इसपू २३३४-२२१८) यानेही आपले मेलुहाच्या सैन्याशी युद्ध झाल्याचे नोंदवून ठेवले आहे. एन्की आणि निन्हुर्स्ग या पुराकथेतही मेलुहा देशाचा उल्लेख आला आहे.
मेलुहा हे भारताचेच नाव होते हे बहुसंख्य विद्वानांनी मेलुहाहून सुमेरला आयात केल्या जाणा-या वस्तूंवरून निश्चित केले आहे. हे नाव फक्त सिंधू संस्कृतीच्या परीसरापुरते मर्यादित होते कि संपूर्ण देशाचे यावरही विस्तृत चर्चा झालेली असून त्याबद्दल मात्र काही विभिन्न मते आहेत. पण हे नाव संपूर्ण उपखंडाचे असावे हे दाखवणारे पुरावे प्राकृत भाषांनी व नंतर अपभ्रषित संस्कृतने राखून ठेवलेले आहेत. मायकेल विट्झेल यांनी स्पष्ट केले आहे कि संस्कृत म्लेंच्छ हा शब्द प्राकृत मिलीच्च्छ (पाली-मेलुखा) या शब्दाचा सुमेर्यान अपभ्रंश आहे. शतपथ ब्राह्मणामध्ये (इसपू १००० किंवा ८००) म्लेंच्छ हा शब्द पहिल्यांदाच येतो. हा तोच काळ आहे जेंव्हा वैदिक भारतात प्रवेशले. म्लेंच्छ या शब्दाची संस्कृतात कोणतीही व्युत्पत्ती नाही. किंबहुना हा इंडो-युरोपियन भाषेतीलही शब्द नाही. मग हा शब्द येथील लोकांना वैदिकांनी का वापरला हा प्रश्न जेंव्हा निर्माण झाला आणि मेलुहा हे नाव सुदूर सुमेरमध्ये वापरले गेल्याचे आढळले तेंव्हा म्लेंच्छ हा शब्द मेलुहा (सुमेरियन) किंवा मिलीच्छ (मेलुखा) या प्राकृत-पाली शब्दांशीच निगडीत असून हे भारतीय उपखंडाचे मुळचे नाव होते हे लक्षात आले.
वैदिक लोकांनी म्लेंच्छ हे नाव विदेशात राहणा-या भिन्नभाषी लोकांना दिलेले नाव नाही तर तेच नाव मुळचे येथील प्रदेशाचेही होते. भारतीय लोकांची भाषा मूळच्या वैदिक भाषेपेक्षा वेगळी असल्याने वैदिक आर्यांच्या दृष्टीने येथील लोकभाषा परक्या व आधी अनाकलनीय असल्याने फ्रेंचांची फ्रेंच तशीच मिलीच्ह लोकांची भाषा म्लेंच्छ असा बदल करत तो भाषावाचकही केला. वैदिक येथेच रुळल्यावर आणि येथील भाषा आपलीशी केल्यानंतर त्यांनी सरसकट परभाषिकांना म्लेंच्छ ही सद्न्या देऊन टाकली तर ते स्वत: ज्या प्रांतात वसले होते तेथील भाग आर्यावर्त व तेथे आर्य भाषा बोलणारे लोक राहतात अशा नोंदी त्यांच्या ग्रंथांत करून ठेवल्या.
हे येथेच मर्यादित राहिले नाही तर त्यांनी म्लेंच्छ (व शुद्रही) हे संबोधन केवळ वैदिकेतर भारतीयांनाच नव्हे तर शक, हुंण, कुशाण, कम्बोज, किरात, बाह्लीक इत्यादींनाही बहाल करून टाकले. हा शब्द एखाद्या शिवीसारखा अवमानजनक अर्थाने वापरला जाऊ लागला व पुढे देशनाम म्हणून हा शब्द गायबच झाला. वैदिक आर्य ज्या भागात वसले त्या भागाला त्यांनी “आर्यावर्त” असे नाव दिल्याने तर आर्यावर्ताच्या बाहेर असलेले सारेच त्यांच्या दृष्टीने म्लेंछ ठरले. हाच शब्द त्यांनी वैदिकेतर शूद्र टोळीलाही आधी वापरून पुढे अन्य सर्वच प्रान्तांतील एतद्देशियांनाही उद्देशून वापरल्यामुळे शुद्र व म्लेंच्छ म्हणजे जेही कोणी वैदिक धर्मीय नाहीत ते येथील मुळचे रहिवासी असा या शब्दाचा अर्थविस्तार झाला. पुढे पुढे तर म्लेंच्छ (मिलीच्छ) आणि शुद्र

ाकृत सुद्द) हे शब्द समानार्थी झाले.
यात वैदिकांचा दुराभिमान दिसून आला तरी त्यामुळे या देशातील मुळचे लोक स्वत:ला कोणत्या नावाने संबोधित होते हे मात्र जतन होऊन राहिले. मिलीच्छ या शब्दाचा सुमेरियन अपभ्रंश म्हणजे मेलुहा व वैदिक अपभ्रंश म्हणजे म्लेंच्छ असा आहे असे अस्को पार्पोला, मायकेल विट्झेल, अहमद हसन दानी यांसारख्या जागतिक कीर्तीच्या विद्वानांनीही या मताची पुष्टी केलेली आहे.
म्हणजेच सनपूर्व २२०० मध्ये भारताचे नाव बाहेरच्या जगाला मेलुहा म्हणून माहित होते तर भारतीय स्वत:ला मिलीच्छ म्हणवत होते. मिलीच्छ या शब्दाचा सुमेरियन अपभ्रंश मेलुहा तर वैदिक भाषेतील अपभ्रंश म्लेंच्छ. हा शब्द वेदांमध्ये येत नाही कारण या देशाशी त्यांचा परिचय फक्त सिंधू नदीच्या खो-यापर्यंत सीमित होता. त्यांना येथील लोक आपल्या भूभागाला कोणत्या नावाने ओळखतात हे माहित असण्याचे कारण नव्हते. पण ते जसे भारतात आले. ते येथील लोकांना तुच्छच (अनार्य) समजत असल्याने म्लेंच्छ हे मुलनिवासींचे देशनामही पुढे शुद्र (खरे तर ही सिंध प्रांतातील अभिर, शिबी, किरात, गुर्जर इ. जमातींप्रमाणे एक ऐतिहासिक जमात होती) या टोळीनावाप्रमाणेच ‘हीण’ या अर्थाचे बनले.
पण आज आपल्या हाती जी माहिती उपलब्ध आहे त्यावरून आपल्या देशाचे सर्वात आधीचे ज्ञात नाव मिलीच्छ (मेलुखा) होते व विदेशी लोक त्याला मेलुहा म्हणत असत हे आता सिद्ध झाले आहे. सिंधू संस्कृतीतील लोक व्यापाराच्या निमित्ताने तेथे जात असल्याने व वसाहतीही वसवल्या असल्याने त्यांना त्यांचे मूळ देशनाम माहित असणे स्वाभाविक असले तरी त्यांना या देशाचा पूर्ण विस्तार व येथे राहणा-या विविध जमाती माहित नव्हत्या असे आपण अन्दाजू शकतो.
पुढे मात्र मिलीच्छ हे देशनाम मागे पडले पण तो शब्द तेवढा मात्र “म्लेंच्छ” व “मेलुहा” या अपभ्रंशीत स्वरूपात जतन होऊन राहिला. पुढे ऋषभनाथपुत्र भरताने विनिय नगराचे राज्य विस्तारले त्यामुळे देशाला भारत असे नाव प्राप्त झाले. त्या इतिहासाची नोंद हिंदू व वैदिक पुराणांनीही करून ठेवली. विनिय नगराचेही नाव इतिहासात बदलत राहिले. ते पुढे इक्ष्वाकूनगर व साकेत झाले तर इसवी सनाच्या दुस-या शतकानंतर त्या नगराचे नाव अयोध्या असे रूढ होऊ लागले. जगभर देश व प्रांत (नगर व गावेही) नाव बदलत राहिल्याचा इतिहास आहे. कधी हे सांस्कृतिक उलथापालथी किंवा सत्ता बदलत गेल्यामुळे झालेले आहे.
-संजय सोनवणी

https://bolbhidu.com/?p=106480
एका अधिकाऱ्याने मनावर घेतलं अन् बांधवगडच्या २२०० वर्ष जुन्या लेण्या जगासमोर आल्या

BolBhidu.com
एका अधिकाऱ्याने मनावर घेतलं अन् बांधवगडच्या २२०० वर्ष जुन्या लेण्या जगासमोर आल्या
मध्य प्रदेशातील बांधवगढ टायगर रिजर्व्हमध्ये पुरातत्व विभागाकडून संशोधन चालू होतं. या संशोधनात जवळपास १,२०० ते २,२०० वर्षांपूर्वीची अनेक हिंदू मंदिर आणि बौद्ध लेण्या सापडल्या आहेत. प्राचीन वस्तू इतक्या मोठ्या संख्येने आणि इतक्या उशिरा सापडल्यामुळे अनेकांना…
हॅपी बड्डे!
दोन ऑक्टोबर १८६९ रोजी मोहनदास करमचंद गांधी यांचा जन्म झाला. आपण ज्यांना ओळखतो, त्या 'राष्ट्रपिता महात्मा गांधीं'ची जन्मतारीख मात्र ती नव्हे. रोज नव्याने जन्मणारा हा माणूस सतत स्वतःवर प्रयोग करत राहिला. मातीत रुतलेले पाय आणि तरीही आकाशाकडे फैलावलेले हात, असा हा माणूस वाढत गेला. या लहान चणीच्या माणसानं त्यातून असं विलक्षण तेज मिळवलं की फाळणीनंतर नौआखालीत पेटलेल्या दंगलीत तो एकटा उतरला आणि अवतीभवतीच्या ज्वालांची पर्वा न करता निघाला. लॉर्ड माउंटबॅटन यांनी तेव्हा गांधींना पत्र लिहिलं होतं. माउंटबॅटन म्हणतात, ‘प्रिय गांधी, पंजाबात आमच्याकडं ५५ हजार सैनिक आहेत. आणि, तरीही दंगल आटोक्यात येत नाहीए. बंगालमध्ये आमच्या सैन्यात एकच माणूस आहे. आणि, तिथं मात्र दंगल पूर्णपणे शमलेली आहे. या ‘वन मॅन बाउंड्री फोर्स’बद्दल मी कृतज्ञता व्यक्त करु शकतो का?’
आज सगळीकडे वणवा पेटलेला असताना तर गांधींची पुन्हा पुन्हा आठवण येत राहाते. मूलतत्त्ववादानेच मुख्य प्रवाहाची जागा बळकावल्याचे लक्षात येते. अशावेळी, गांधी आठवत राहातात. इंग्रजांच्या विरोधात लढतानाही विखाराला थारा न देणारा हा महात्मा इतिहासाच्या पानापानातून दिसत राहातो.
"हिंसेचीच भाषा आज ऐकू येत असताना, गांधी कसे आणि किती उपयोगाचे ठरणार आहेत?", असा प्रश्न एका तरूण अभ्यासकाने मला विचारला. "गांधींचा काळ वेगळा होता. आता गांधी आले, तरी ते काही करू शकणार नाहीत. युद्धज्वर हा नव्या जगाचा आजार आहे आणि विखार हीच जगाची भाषा आहे. त्याला इलाज नाही आणि प्रेमाच्या भाषेचा उपयोगही होणार नाही.", असे तो मला निराशेने सांगत होता.
मी म्हटले, मित्रा, हाच तर गांधींसाठी सर्वोत्तम काळ आहे. गांधींचा काळ काही वेगळा नव्हता. तो याहून भयंकर होता. पहिले आणि दुसरे महायुद्ध अशा युद्धज्वर वाढलेल्या काळात जगभरात हिटलर आणि मुसोलिनी जन्माला येत असताना, भारतात मात्र 'गांधी' जन्माला आले! गंमत बघा. मुसोलिनी पत्रकारिता सोडून राजकारणात आला १९१२ मध्ये. हिटलर जर्मनीत आला १९१३ मध्ये. आफ्रिका सोडून गांधी भारतात परतले १९१५ मध्ये.
हिटलर जर्मनीचा राष्ट्रीय नेता झाला, तो १९२१ मध्ये.
मुसोलिनी इटलीचा पंतप्रधान झाला, तो १९२२ मध्ये.
महात्मा गांधी भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे अध्यक्ष झाले १९२४ मध्ये. साधर्म्य इथेच थांबत नाही. हिटलर, मुसोलिनी, गांधी हे तिघेही लेखक, पत्रकार, प्रतिभावंत कम्युनिकेटर! हिटलरने त्याचे आत्मचरित्र 'माइन काम्फ' लिहिले ते १९२३ मध्ये. गांधींनी त्यांचे आत्मचरित्र 'माझे सत्याचे प्रयोग' लिहिले ते १९२७ मध्ये. मुसोलिनीचे आत्मचरित्र 'माय ॲटोबायोग्राफी' आले ते १९२८ मध्ये. एकाच काळात, हिटलर - मुसोलिनी राज्य करत असताना, महात्मा गांधी जन्माला आले. हिटलर आणि मुसोलिनी संपले, पण गांधी आजही रोज नव्याने जन्माला येत असतात.
'One Little Man of India’ अशी ज्याची ओळख परदेशात करुन दिली जात असे, तो गांधी नावाचा माणूस पुन्हा पुन्हा भेटत राहतो. नव्या नव्या प्रदेशात, नव्या नव्या रुपात त्याचं पुनरुत्थान होत असतं. कधी तो मार्टिन ल्युथर किंगच्या रुपात भेटतो आणि सांगतो, ‘आय हॅव अ ड्रिम’! कधी खान अब्दुल गफारखानांच्या रुपानं ‘सरहद गांधी’ म्हणून भेटतो. कधी नेल्सन मंडेलांच्या वज्रमुठी उंचावत वर्णभेदाविरुध्द आरोळी ठोकतो. कधी गांधींचेच शब्द घेऊन उसने, आमचा बराक ओबामा म्हणतो, 'Be the change, you believe in... Yes, we can!'
आजचा काळ कठीण खरा, पण म्हणूनच सर्वोत्तम आहे, गांधी पुन्हा जन्माला येण्यासाठी. आणि गांधींना पुन्हा जन्मायचे आहे, अवघ्या जगाला 'सन्मति' देण्यासाठी!
कधी कधी मला असं वाटतं, आपणच नव्यानं जन्माला आलो तर! आपल्यातही काही अंश असेलच की आपल्या बापाचा. आपल्या राष्ट्रपित्याचा. आपण का नाही होऊ शकणार गांधी? आतला आवाज ऐकू शकणारा, सत्याचे प्रयोग करणारा, स्वतःवर रोज प्रयोग करणारा हा गांधी आपल्यातही असेलच की. त्याला प्रत्यक्षात आणता यायला हवे.
गांधी म्हणजे निव्वळ गप्पा नाहीत. स्कॉलरली मांडणी नाही. आवेशपूर्ण भाषणं नाहीत.
गांधी म्हणजे विचार आणि कृती यातलं अद्वैत.
गांधी म्हणजे, थेट तसं जगणं.
'वैष्णव जन तो तेने कहिये जे, पीड़ पराई जाने रे , असं होता येईल आपल्याला? एवढं सच्चं होता येईल आपल्याला? जो आपल्याला शत्रू वा स्पर्धक मानतो, त्याच्यावरही प्रेम करता येईल? वणवा शमवण्यासाठी अनवाणी पायानं, निर्भय मनानं धावता येईल? एखाद्या लहानग्याच्या निरागसतेनं आणि कुतुहलानं रोज जगाकडं नव्यानं बघता येईल आपल्याला? अशा झपाटलेपणानं आयुष्यभर काम करता येईल आपल्याला?
का नाही जमणार?
दूर तिकडच्या मंडेला आणि ओबामांना जमलं.
तर, तुला-मला का नाही जमणार?
गांधींचा आजचा हा बड्डे तुझा-माझा, त्याचा-तिचा प्रत्येकाचाच जन्मदिन ठरो.
हॅपी बड्डे!
- संजय आवटे
Follow History Samadhan Mahajan on Telegram: https://t.me/historysamadhanmahajan

Telegram
History Samadhan Mahajan
इतिहासाचा टेलिग्राम ग्रुप
(Add ur friends)
https://t.me/historysamadhanmahajan
@SRMAHAJAN
(Add ur friends)
https://t.me/historysamadhanmahajan
@SRMAHAJAN
*🏆परीक्षेला जाता जाता 🏆
संयुक्त पूर्व परीक्षा - 2022
दिनांक 8 ऑक्टोंबर 2022
8 ऑक्टोंबर 2022 रोजी होणारी संयुक्त पूर्व परीक्षा विद्यार्थी मित्रांसाठी अत्यंत महत्त्वाची घडी आहे .
या अनुषंगाने काही महत्त्वाच्या बाबी अधोरेखित करतो.
1) या परीक्षेत वेळेचे नियोजन गरजेचे आहे .आपण राज्यसेवा पूर्वपरीक्षेत जसे Round घेतो तसे येथे करता येणार नाही, त्याकरिता लगेच निर्णय घ्यावा व पुढे जावे असा माझा अनुभव आहे .
2) प्रश्न किती सोडवावे याचा आपला नेहमीचा पॅटर्न लक्षात ठेवा.
* 1.Ans - ✅
* ( दोन पैकी एक ) - ✅
* ( तीन पैकी एक ) - ✅
* ( चार पैकी एक ) - Skip
यानुसार जेवढे सोडवता येतील तेवढे .
3) यापूर्वी परीक्षा दिली असल्यास त्या परीक्षेमध्ये कोणत्या चुका झाल्या त्याचा आढावा घ्या ,त्या चुका यावेळी कशा टाळता येतील याचा प्रयत्न करा.
4) सर्वात महत्वाचे परीक्षेला जाण्यापूर्वी तुम्ही स्वतःचे हॉल तिकीट सोबत घेतले असल्याची खात्री नक्की करा त्यासोबतच आयडी प्रूफ साठी एक ओरिजनल डॉक्युमेंट सोबत ठेवा जसे की पॅन कार्ड आधार कार्डची झेरॉक्स कॉपी आणि ओरिजनल कॉपी सोबत ठेवणे आवश्यक आहे .
5) परीक्षा केंद्रावरती वेळेत पोहोचणे आवश्यक आहे .पण चलविचलित न होता स्वतः चा कोणताही गोंधळ होऊ न देता वेळेचे योग्य नियोजन करून परीक्षा केंद्रावर ठरलेल्या वेळेत उपस्थित राहावे .
6) परीक्षा केंद्रावर पोहचल्यावर आपला बैठक क्रमांक खोली क्रमांक काळजीपूर्वक तपासून बघा.
7) साधारण एक तास आधी तुम्ही तुमच्या सीटवर बसलेला असता - (त्यावेळी नेमकं काय करायचं )
* निगेटिव्ह विचार करू नका.
* पेपर कसा येईल याचा विचार न करता स्वतःच्या अभ्यासावर विश्वास ठेवून मी योग्यरीत्या परीक्षेला सामोरे जाईल असा आत्मविश्वास ठेवा.
* पेपर सोडवताना तुम्ही कोणती स्ट्रॅटेजी वापरणार आहात याचा जास्त विचार करा
8) शेवटी सर्वात महत्त्वाचे जे आपल्या हातात आहे त्यासाठी अथक प्रयत्न करा ,आपल्या नियंत्रणात नाही त्या गोष्टींचा विचार करू नका.
💐 सर्वांना कम्बाईन पूर्व परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा💐
कपिल जयकर पवार
उपसंचालक , नागपूर प्रदेश विकास प्राधिकरण, नागपूर
लेखक- भगीरथ भारत भूगोल व भगीरथ महाराष्ट्र भूगोल
Guest faculty @ Bhagirath IAS academy,pune

उद्या Combine Prelims...
सूचना:
1. प्रश्न व्यवस्थित वाचा.
2. पेपर सोपा किंवा अवघड आल्यास react होऊ नका.
3. एखादा येणारा प्रश्न चुकल्यास tension घेऊ नका.
4.शांत राहा.
5. येणारा प्रश्न चुकला नाही पाहिजे याची काळजी घ्या.
6. पेपर सोडविताना घड्याळाकडे लक्ष द्या.
7. शेवटच्या प्रश्नापर्यंत संयम ठेवा.
Relaaaaaaaaaax Have a Paper First...
मनोहर भोळे सर

Combine Pree Exam Ans Geography_08-10-2022.pdf
14 MB
Combine Pree Exam Ans Geography_08-10-2022.pdf
DOC-20221014-WA0020..pdf
4.4 MB
1942 च्यालढ्यातील चिमुरची शोकांतिका.pdf
संदर्भ - आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास, खंड दुसरा, के.के. चौधरी

📚 राज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षेचा सुधारित अभ्यासक्रम (मराठीत) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
📑 https://mpsc.gov.in/downloadFile/english/6013

मराठीत ऐतिहासिक चरित्रे लिहिण्याची पद्धत इंग्रजांच्या अनुकरणाने आली. बखर आणि इतिहास यातील फरक एतद्देशीय विद्वानांच्या लक्षात येवू लागला. बखरी म्हणजे इतिहास व कल्पित याची भेसळ. त्यामुळे त्यातुन अन्य अस्सल पुरावे मिळाल्याखेरीज खरा इतिहास हाती लागण्याची शक्यता कमीच. विविध संदर्भसाधने धुंडाळत एकंदरीत घटनाक्रम कालानुक्रमनाने मांडत तटस्थ निरिक्षणे नोंदवत पुढे जाणे म्हनजे ऐतिहासिक चरित्र लेखन. चरित्र लेखन करत असतांना लेखकाला सर्वच संदर्भ साधने उपलब्ध होतातच असे नाही. अनेकदा संदर्भसाधनांतील माहितीचा अन्वयार्थ लेखक आपापल्या मगदुराप्रमाणे लावत असतो. अनेक चरित्रे ही अभिनेवेशापोटी लिहिली जात असतात. त्यामुळे परिपुर्ण चरित्र असे कितीही प्रयत्न केला तरी लिहिले जाईलच असे नाही. स्वजातीयांनी वा वंशजांनी लिहिलेली चरित्रे ही शक्यतो अविश्वसनीय बनतात हा अनुभव वाचकांना असतोच.
"थोरले सुभेदार मल्हारराव होळकर" या चरित्राचे विशेष म्हणजे हे चरित्र लिहिणारा लेखक दुरान्वयानेही होळकर घराण्याशी संबंधीत नाही वा धनगर समाजाशीही संबंधीत नाही. त्यामुळे या चरित्र ग्रंथात चरित्रनायकाचे अकारण उदातीकरण करण्याचा प्रकार आढळास येत नाही. मल्हाररावांचे गुण-दोष त्यांनी मोकळेपणाने चर्चीले आहेत ते त्यामुळेच.
हे चरित्र पुणे (बुधवार पेठ) येथील नवा किताबखाना या प्रकाशनसंस्थेने सन १८९३ साली प्रसिद्ध केले. म्हणजेच हा ग्रंथ लिहिण्याचे काम तत्पुर्वीच काही वर्ष आधीच सुरु झाले असले पाहिजे. येथे आपल्याला या काळात (पुर्वी व नंतर) कोणती चरित्रे प्रकाशित झाली होती याचा धावता आढावा घ्यायचा आहे. या शतकात अनेक चरित्रे ही काव्यमय असून गद्य चरित्रांची संख्या मात्र अत्यल्प अशी दिसते. छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र सर्वप्रथम मांडण्याचे श्रेय महात्मा फुले यांच्याकडे जाते. त्यांनी लिहिलेला "शिवाजी महाराजांचा पवाडा" १८६८ मद्धेच प्रकाशित झाला असला तरी शिवाजी महाराजांचे केळुस्कर गुरुजी लिखित अभ्यासपुर्ण गद्य चरित्र प्रसिद्ध व्हायला १९०६ साल उजाडावे लागले. म. फुले यांच्यानंतर "शिवाजी चरित्र" हे शिवाजी महाराजांचे काव्यमय चरित्र लिहिले ते गणेशशास्त्री लेले यांनी. दक्षीणा प्राइझ कमिटीने शिवचरित्र काव्य स्पर्धेत या काव्याला पारितोषिक मिळाले व ते कमिटीनेच १८७३ साली प्रसिद्ध केले. दरम्यानच्या काळात बापु गोखले, भास्करराव दामोदर पलांडे यांची चरित्रे अनुक्रमे १८७७ व १८७८ साली प्रकाशित झाल्याच्या नोंदी मिळतात. त्याच्या प्रती मला उपलब्ध होवू शकल्या नाहीत परंतु ही गद्य चरित्रे होती एवढे मात्र निश्चयाने म्हणता येते. अजुनही काही गद्य चरित्रे प्रकाशित झाली पण त्यांची संख्या अत्यल्प होती. संशोधकीय शिस्त पाळत लिहिले गेलेले पहिले चरित्र म्हणुन प्रस्तुत "सुभेदार थोरले मल्हारराव होळकर यांचे चरित्र" याचा निर्देश करता येईल. या दृष्टीनेही या चरित्राचे मराठी सारस्वतात ऐतिहासिक महत्व आहे.
१८९३ नंतर प्रसिद्ध झालेले चरित्र म्हणजे गजानन देव लिखित "श्रीमंत अहिल्याबाई यांचे चरित्र". हे चरित्र १८९५ साली प्रकाशीत झाल्याची नोंद मिळते. अर्थात मुळ ग्रंथ आज उपलब्ध नाही. तो कोणत्या संस्थेने प्रकाशित केला होता याची माहितीही प्रयत्न करुनही मला उपलब्ध झालेली नाही.
बखरी या इतिहासाची अस्सल साधने होत कि नव्हेत याबाबत अनेक इतिहासकारांनी चर्चा केली आहे. वि. का. राजवाडे हे बखरींना कमास्सल साधन मानत असत व पत्रांना अस्सल साधने मानत असत. परंतु इतिहासातील अनेक पत्रे हीसुद्धा खोटी, दिशाभुल करणारी आहेत हे सिद्ध झाले असल्याने इतिहास हा शेवटी तारतम्यानेच शोधावा लागतो. असे असले तरी बखरींचे मोल कमी होत नाही. पण सर्वात महत्वाची बाब म्हणजे मराठी बखर लेखनाच्या ऐन भरात दोन अडिचशे बखरी लिहिल्या गेल्या असाव्यात असा अंदाज राजवाडे देतात. १९५७ साली कै. र. वि. हेरवाडकर यांच्या "मराठी बखर" या व्हीनस प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या ग्रंथात सुमारे १४० बखरीच काय त्या उपलब्ध आहेत व त्यातील ऐतिहासिक म्हणता येतील अशा केवळ ७८ बखरीच काय त्या उपलब्ध आहेत असा अंदाज व्यक्त केला आहे. त्यातही अनेक बखरी त्रुटीत स्वरुपात उपलब्ध आहेत. त्यातीलही प्रक्षिप्त किती हे सांगणे दुरापास्त आहे एवढा विरोधाभास त्या-त्या बखरींत दिसुन येतो.

"काव्येतिहास संग्रह" हा मराठी इतिहासातील काशिनाथ नारायण साने यांनी पोटाला चिमटा काढुन केलेला उद्योग म्हनजे त्यांनी उपलब्ध होतील ती ऐतिहासिक पत्रे व बखरी प्रकाशित करण्याचा चंग बांधला. पुढे १८९७ मद्धे भारतवर्ष आणि ऐतिहासिक लेख संग्रहाच्या माध्यमातुन दत्तात्रेय पारसनिस आणि वासुदेवशास्त्री खरे यांनीही ऐतिहासिक साधने प्रसिद्ध करुन इतिहासाच्या लुप्त होवू पाहणा-या ठेव्यात मोलाची भर घातली. त्यामुळे आज अनेक साधने आपल्याला उपलब्ध झाली असली तरी विपन्नावस्थेमुळे व मराठी माणसाच्या इतिहासाबाबतच्या अनास्थेमुळे काव्येतिहास संग्रहाच्या अनेक प्रती भेळी बांधण्याच्या कामी आल्या तर काही कसरीचे पोट भरत्या झाल्या. कै. र. वि. हेरवाडकरांनी आपल्या "मराठी बखर" या १९५७ साली प्रसिद्ध झालेल्या पुस्तकात ७८ बखरी ऐतिहासिक असल्याचे नोंदवले होते. परंतु पुढे शोध घेता त्यातील सुमारे २०% बखरीही आज दुष्प्राप्य झालेल्या आहेत.
तरीही आजही उपलब्ध असलेल्या शकावल्या, बखरी, पत्रे, पोवाडे इ. काही लाखांत भरणा-या कागदपत्रांपैकी फक्त १५ ते २० हजार कागदपत्रेच काय ती प्रकाशित झालेली आहेत. खरेच ही इतिहासाबद्दलची मराठी माणसाला शरम वाटावी अशी अनास्था आहे. त्यामुळेच ज्या इतिहासकार/संकलकांनी पदरमोड करत आयुष्ये मराठ्यांचा इतिहास जतन करण्यासाठी, छापुन प्रसिद्ध करण्यासाठी घालवली त्यामुळे त्यांच्यातील काही स्वभावधर्म-दोषांकडे दुर्लक्ष करुनही आपणास त्यांचे ऋणी रहावे लागते.

बाबासाहेब अभ्यासायचेअसतील तर अगोदर तत्कालीन परिस्थितीशी एकरूप व्हावे लागेल, त्यावेळच्या दलितांसाठी काय सोयी किंवा संसाधने होती? याचा विचार करावा लागेल, कदाचित एका कमेंटमध्ये हे सगळं लिहिता येणार नाही. बाबासाहेबांवर बरेच लेखन झाले आहे, तरीही जाणीवपूर्वक त्यांचे लेखन अथवा भाषणे सरकार प्रकाशित करीत नाही, बाबासाहेबांचे भाषण आणि लेखन यावर सरकारने 22 खंड काढले आहेत परंतु त्यातही बराच घोळ घालून ठेवला आहे, मी माझ्या वॉलवर ह्यातील बऱ्याच त्रुटी मांडल्या होत्या, खैरमोडे आणि किर यांनी सुद्धा लेखन एकांगी केलेलं आहे. त्यामुळे बाबासाहेबानी स्वतः लिहिलेली पुस्तके व त्यांचे मूकनायक, बहिष्कृत भारत यामधील भाषणे, लेख हे वाचून तत्कालीन परिस्थिती समजण्यास मदत होते. सरकारने छापलेल्या खंडातील बराचसा भाग हा मा.फ.गांजरे लिखित एकूण खंड ७ ह्यातून घेतला आहे,परंतु सरकारी खंड आणि गांजरे यांचे खंड ह्यातील भाषेत कमालीची तफावत आहे.22 व्या चरीत्रमय खंडात तर असंख्य चुका आहेत. शंभर वर्षांपुर्वी १९१८ साली बाबासाहेबानी शेतकर्यांच्या व्यथा, त्यांच्यापुढच्या शेतीसमस्या मांडणारं पुस्तक लिहिलं. "स्मॉल होल्डींग्ज इन इंडीया अॅंड देअर रेमेडीज". त्यांचे हे पुस्तक बऱ्याच जणांना माहीत नाही,शेतीवरचा बोजा कमी करा, एकच मुल शेतीत ठेवा, बाकीच्यांना तिथून बाहेर काढा नी उद्योग, व्यापार, शिक्षण, सेवा क्षेत्रात घाला.
शेतीमालाला योग्य बाजारभाव, सिंचन आणि उद्योगाचा दर्जा मिळायला हवा.
शेतकरी सुखी तर देश सुखी.
हे उपाय तातडीने केले नाहीत तर शेतकरी डेंजर झोनमध्ये येईल असं भाकीत त्यांनी शंभर वर्षांपुर्वी केलं होतं. डॉ. बाबासाहेबांनी 1929 साली पहिली शेतकरी परिषद घेतली. त्यांनी विधीमंडळावर काढलेला पहिला मोर्चा "दलितांचा" नव्हता तर शेतकर्यांचा होता.कसणाराला जमीन मिळावी म्हणून त्यांनी 1932 मध्ये खोती रद्द करण्याचे विधेयक मांडले.डॉ. बाबासाहेब हे "फक्त" दलितांचे हे समीकरण इतके घट्टपणे कोरले गेलेय की 1919 साली सर्वप्रथम "सर्व भारतीयांना" मतदानाचा अधिकार मिळाला पाहिजे" असे साऊथबरो कमिटीला सांगणारे
डॉ. बाबासाहेब फारसे कोणाला माहित नसतात.
देशाचे उर्जामंत्री, पाटबंधारे मंत्री, सार्वजनिक बांधकाम खात्याचे व विमान वहातूक खात्याचे मंत्री असलेले बाबासाहेब देशाला "उर्जा साक्षरता व जल साक्षरतेची सर्वाधिक गरज आहे" असं 1942 साली सांगत होते. देशातली पहिली 15 धरणं बांधणारे, देशातल्या मोठ्या नद्या एकमेकीला जोडून दुष्काळ हटवण्याची योजना करणारे बाबसाहेबच होते,Moin K बाबासाहेबांच्या लेखनातील,भाषणातील आणि त्यांनी केलेल्या कार्यातील अजून बऱ्याच गोष्टी समोर आल्या नाहीत, ज्या बद्दल आजही आपण अनभिज्ञ आहोत किंवा वरवरची माहिती आहे ते म्हणजे,१२ मे १ ९ ५६ ला बी.बी.सी ( ब्रिटीश ब्रॉड कॉस्टिंग कार्पोरेशन लंडन ) येथे " मला बौद्धधम्म का आवडतो ? सध्याच्या जागतिक परिस्थितीत तो किती उपयुक्त आहे " ही महत्वपूर्ण भाषणे डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या हस्ताक्षरातील दस्तावेज उपलब्ध असतांना छापली गेली नाहीत, तसेच २० मे १९५६ ला "व्हाईस ऑफ अमेरिका" येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले भाषण "भारतीय लोकशाहीचे भवितव्य" हेही छापले नाही.
अमेरिकेच्या कॅनडा भागाच्या "विक्वेब" शहरात १९४२ मध्ये जागतिक पॅसिफिक रिलेशन परिषद ( Pacific Relationship Conference ) झाली.त्या साठी बाबासाहेबानी "भारतातील अस्पृश्यता" हा प्रबंध लिहिला होता,बाबासाहेबांचे सहकारी एन. शिवराज यांनी परिषदेत त्या प्रबंधाचे वाचन केले होते,तसेच बाबासाहेबानी भारतातील जमिनीची माहिती गोळा केली होती, त्यातील जी जमीन "waste land" (पडीक जमीन) आहे,अशा जमिनीवर स्वतंत्र वसाहत उभी करणे,केंद्र सरकारचा निधी, अनुसूचित जातींना लागवडीयोग्य जमिनीचे हस्तांतरण,तसेच या योजनेसाठी आयोगाचे गठन, या सर्व मागण्या बाबासाहेबानी इंग्रजांकडून मान्य करून घेतल्या होत्या,पण काँग्रेस सरकारने ती योजना अमलात आणली नाही या बाबतचे ते दस्तावेज आहेत.ते ही प्रकाशित झाले नाहीत. तसेच बाबासाहेब राउंड टेबल कॉन्फरन्स मध्ये १९३० ते १९३३ मध्ये निर्माण केलेल्या सब कमिटीचे सदस्य होते, त्या कमिटी पुढील प्रमाणे, 1)member of Federal Structure Committee ( संघीय रचना समिती) 2) Member of Provincial Constitution (प्रांतीय संविधान सदस्य) 3) Member of Minorities Committee(अल्प संख्यांक समिती सदस्य) 4) Member of Franchise Committee(मताधिकार समिती सदस्य) 5) Member of Defence Committee (संरक्षण समिती सदस्य) 6) Member of Ser- vices Committee( सेवा समिती सदस्य) 7) Member of General Review (सामान्य पुनरावलोकन सदस्य) या कमिटीवर असताना बाबासाहेबानी केलेले कार्य अजूनही प्रकाशित झाले नाही.