General science study
511 subscribers
140 photos
95 links
Download Telegram
वनस्पती ऊती

- प्ररोह विभाजी ऊतीमुळे मूळ व खोडाची लांबी वाढते .
- पार्श्व विभाजी ऊतीमुळे झाडाची रुंदी व घेर वाढतो.
- आंतर विभाजी ऊतीमुळे पाने व फाद्यांची वाढ होते.
- हरित ऊती द्वारे वनस्पती अन्ननिर्मितीचे कार्य करतात.
- वायू ऊतीमुळे वनस्पती पाण्यावर तरंगू शकतात.
- पानाच्या देठामध्ये स्थूलकोन ऊती असते.
- पानाच्या शिरा, खोड व बिया दृढ ऊतींनी बनतात.
- झाडाची अपित्वचा पृष्ठभागीय ऊतींनी बनते.

* जलवाहिनी : वनस्पतीच्या मुळापासून वनस्पतीच्या सर्व भागास पाणी पुरविण्याचे काम करते.
* रसवाहिनी : पानाकडून शर्करा व अमिनो आम्लाचे वनस्पतीच्या खोडाकडे व मुळाकडे वहन करतात.
* ऊतींचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राचा Histology म्हणतात.
* वनस्पतींच्या सालीच्या आवरणात सुबेरिन नावाचे रसायन असते.
join- t.me/generalscience_study

जीवनसत्वे

- जीवनसत्वांचा शोध फंक (FUNK) या शास्त्रज्ञाने लावला
- जीवनसत्वाचे दोन प्रकार पडतात.
1.पाण्यात विरघळणारी - ‘ब’ आणि ‘क’
2.मेदात विरघळणारी - ‘अ’,‘ड’,‘इ’,‘के’,

महत्त्वाची जीवनसत्वे

1) ‘अ’ जीवनसत्व (रेटिनॉल)
-‘अ’जीवनसत्वाचा उपयोग त्वचा व दृष्टीसाठी आवश्यक असते.
- स्रोत - पालक, गाजर, टॉमेटो, दूध, दही, अंडी, तेल.
- ‘अ’ जीवनसत्वाच्या अभावी रातांधळेपणा होतो.
- ‘अ’ जीवनसत्वाच्या अधिक्यामुळे कोरडी खाज, हातपाय सूज, केस गळणे,आळस.

2) ‘ब’ जीवनसत्व
- ‘ब’ जीवनसत्वाचे एकुण 8 गट पडतात.
- B1 , B2 , B3 , B5 , B6 , B7 , B9 , B12

i) जीवनसत्व B1 (थायमिन)
- अभावामुळे बेरिबेरी आजार होतो.

ii) जीवनसत्व B2 (रायबोफ्लेविन)
- अभाव - वाढ खुंटणे, ओठ फाटणे, अकाली वृद्धत्व.

iii) जीवनसत्व B3 (निकोटीनेमाईड)
- अभाव - पेलाग्रा हा आजार होतो.

iv) जीवनसत्व B5 (पेन्टॅाथेनिक ॲसिड)
- विकारांचे योग्य कार्य करते.

v) जीवनसत्व B6 (पायरीडॉक्सीन)
- अभाव - त्वचारोग व शरीराचे वजन कमी होणे.

vi) जीवनसत्व B7 (बायो‍टिन)
- अभाव - पॅरालिसिस, अंगदुखी व केस गळणे.

vii) जीवनसत्व B9 (फॉलिक ॲसिड)
- अभाव - ॲनिमिया

viii) जीवनसत्व B12 (सायनोकोबाल्मीन)
- या जीवनसत्वात कोबाल्ट असते.

3) जीवनसत्व - ‘क’ (ॲस्कॉर्बिक ॲसिड)
- हे जीवनसत्व पाण्यात विरघळते.
- रक्त गोठण्यासाठी व जखमा भरून तयार करते म्हणून त्यास वार्धक्याविरोधी जीवनसत्व म्हणतात.
- अभाव - स्कर्व्ही, किडनी स्टोन इ.

4) जीवनसत्व - ‘ड’ (कॅल्सीफेरॉल)
- दात व हाडांच्या आरोग्यासाठी आवश्यक.
- सकाळच्या कोवळ्या उन्हात त्वचा ड जीवनसत्व निर्माण करते.
- अभाव : मुडदुस

5) जीवनसत्व - ‘ई’ (टोकोफेरॉल)
- हे ॲन्टीऑक्सीडन्ट म्हणून काम करते.
- पुनरुत्पादन संस्थेच्या आरोग्यासाठी आवश्यक.
- त्यास वांझपणाविरोधी जीवनसत्व म्हणतात.
- अभाव - वांझपणा

6) जीवनसत्व - ‘के’ (फायलोक्वीनोन)
- रक्त गोठण्याच्या प्रकियेत मदत करते.
- त्यास रक्त गोठण जीवनसत्व म्हणतात.
- अभाव : अविरत रक्तस्त्राव होतो.

थोडक्यात...
- कमी शारीरीक हालचाल असणाऱ्या व्यक्तीसाठी 2500 कॅलरी ऊर्जेची गरज असते.
- कष्टाचे काम करणाऱ्या व्यक्तीसाठी 3800 कॅलरी ऊर्जेची गरज असते.
- मधुमेह असणाऱ्या व्यक्ती इन्सुलीनचे इंजेक्शन घेतात.
- मुडदुस उपचार म्हणून कॉडलिव्हर ऑईल वापरतात.
- पिवळ्या व नारंगी रंगाच्या फळांमध्ये अ जीवनसत्व असते.
- जखमा भरुन काढण्यासाठी आवश्यक घटक - कोलॅजिन.
- ब आणि क ही जीवनसत्व दररोज आहारात घेणे आवश्यक आहे.
- कोबाल्ट असणारे एकमेव जीवनसत्व - B12.

विज्ञान विषयासाठी उपयुक्त चॅनल
join- t.me/generalscience_study

🔸 चार्ल्स डार्विनचा उत्क्रांतीवाद🔸

👉 चार्ल्स डार्विनने Origin of species या
ग्रंथात उत्क्रांतीवादाचा सुप्रसिद्ध सिद्धांत मांडला.
👉त्यांच्या सिद्धांतानुसार तीन तत्वे महत्त्वाची आहेत.
i) Theory of special creation
ii) Theory of Natural selection
iii) Survival of the Fittest theory

* डार्विनचा उत्क्रांतीवाद
“ सर्व सजीव निसर्गनियमांनी क्रमाक्रमाने जन्माला आले ज्या सजीव जाती नैसर्गिक नियमांना तोंड देत उत्क्रांत होतात (जुळवून घेऊ शकतात) त्याच जाती काळाच्या ओघात टिकतात,ज्यांना हे जमत नाही त्या प्राणीजाती नष्ट पावतात व त्यांची जागा नव्या जाती घेतात हे घडायला कोट्यावधी वर्षे लागतात ”.

विज्ञान विषयासाठी उपयुक्त चॅनल
join- t.me/generalscience_study
* काही वनस्पती व प्राण्यांची शास्त्रीय नावे
- तुळस : ऑसीमम सॅक्टम
- आंबा : मँजिफेरा इंडिका
- तांदूळ : ओरिजा सटाईवा
- ऊस : सॅकरम ऑफिसिनॅरम
-join- t.me/generalscience_study
ॲरिस्टॉटलचे प्राणी वर्गीकरण
* जलचर - पाण्यात राहणारे - उदा. मासे
* उभयचर - पाण्यात व जमिनीवर राहणारे - उदा. कासव व साप
* भूचर - जमिनीवर राहणारे - उदा. मानव
* खेचर - हवेत संचार करणारे - उदा.पक्षी
* join- t.me/generalscience_study