EWS Organisation
36 subscribers
19 photos
4 files
24 links
Download Telegram
🚨मित्रांनो, EWS आरक्षण हे टिकलेच पाहिजे..
102 व्या घटनादुरुस्तीने हे आरक्षण आपल्याला मिळालं आहे, त्यासाठी सर्वांनी updated राहणे गरजेचे आहे.

#EWS आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी नक्की👇 Join करा व फॉरवर्ड करा..

t.me/ewsorg
मित्रांनो, आपल्या माहितीनुसार केंद्र शासनाने EWS आरक्षण टिकवण्यासाठी जोरदार प्रयत्न केला आहे. तथापि, मा. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर आपण आपले मत मांडू..🙏
😊✌️✌️
1827_2019_1_1501_39619_Judgement_07-Nov-2022.pdf
3.4 MB
👆 Judgement wherein SUPREME COURT UPHOLDS 10% RESERVATIONS FOR ECONOMICALLY WEAKER SECTIONS (EWS)
मराठा समाजाला स्वतंत्र ,संविधानिक आरक्षण मिळाले तर आर्थिक दुर्बल घटकांतील ( EWS )इतर समाजाला फायदाच होणार आहे, त्यामुळे @ewsorg तर्फे आजपासून पुन्हा सुरू होणाऱ्या मराठा आरक्षण आंदोलनाला जाहीर पाठिंबा..!!! ✌️

#EWS आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी नक्की👇 Join करा व फॉरवर्ड करा..

t.me/ewsorg
मित्रांनो, सर्व धर्मातील #EWS आर्थिक दुर्बल घटकात समावेश असलेल्या सर्व समाजातील विद्यार्थी-मित्रांच्या शैक्षणिक समस्या सोडवण्यासाठी हे स्वतंत्र व्यासपीठ तयार केले आहे.

आपल्या सूचना व अभिप्राय यांचे नेहमी स्वागत असेल..🙏 👇

@mnrp3388

@ewsorg
Forwarded from EWS Organisation
EWS साठी स्वतंत्र संस्था - "अमृत"👆👇
आपले पुढील लक्ष्य वरील संस्था पूर्णपणे सुरळीत सुरू होणे, हे लक्ष्य असून यासाठी सर्व अधिकारी-मित्रांचे सहकार्य आवश्यक आहे..👆👆

@mnrp3388

@ewsorg
🚨MAHA #Amrut (Academy of Maharashtra Research, Upliftment & Training ) 👇

https://www.mahaamrut.org.in/

महाराष्ट्रातील ज्या खुल्या प्रवर्गातील जातींना कुठल्याही स्वतंत्र शासकीय विभाग/संस्था/महामंडळांमार्फत योजनांचा लाभ मिळत नाही, अशा खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थी, युवक-युवती व इतर उमेदवारांसाठी विविध उपक्रम, कार्यक्रम, इत्यादी राबविण्यात येवून व इतर माध्यमातूनही विद्यार्थी, युवक-युवती, इत्यादिचा विकास घडविण्यासाठी, “अमृत” ही नवीन संस्था महाराष्ट्र शासनाने स्थापन केली आहे. सदर संस्थेचे मुख्यालय पुणे येथे आहे.

#EWS आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी नक्की👇 Join करा व फॉरवर्ड करा..

t.me/ewsorg
EWS Organisation pinned «🚨MAHA #Amrut (Academy of Maharashtra Research, Upliftment & Training ) 👇 https://www.mahaamrut.org.in/ महाराष्ट्रातील ज्या खुल्या प्रवर्गातील जातींना कुठल्याही स्वतंत्र शासकीय विभाग/संस्था/महामंडळांमार्फत योजनांचा लाभ मिळत नाही, अशा खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या…»
SEBC अर्थात मराठा उमेदवारांना OBC प्रमाणपत्र मिळाले असेल तर OBC निवडता येईल पण EWS निवडता येणार नाही..🙏🏻
#AMRUT कडून #UPSC मुख्य परीक्षेच्या तयारीसाठी अर्थसहाय्य..

👉 सविस्तर इतर माहिती लिंक वर :
https://www.mahaamrut.org.in/circular.html
READ: MPSC: ‘एमपीएससी’चा ‘कट ऑफ’ वाढल्याने विद्यार्थ्यांवर काय परिणाम?
सदर बातमीमध्ये लोकसत्ता ने EWS प्रवर्गातील उमेदवारांची कमी गुणावरसुद्धा निवड होऊ शकते, असे पूर्णपणे निषेध करण्यासारखे वक्तव्य केले आहे. कमी म्हणजे किती असते हे लोकसत्ता ने स्पष्ट केले पाहीजे…!!!

Ews संघटनेतर्फे या बातमीचा जाहीर 👎👎👎निषेध करत आहोत
शासकीय संगणक टंकलेखन बेसिक कोर्स लघुलेखन
परीक्षा शुल्क प्रतिपूर्तीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

परभणी दि.23 : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात येणाऱ्या शासकीय संगणक टंकलेखन बेसिक कोर्स (जीसीसी टीबीसी) लघुलेखन परीक्षेत जानेवारी २०२६ मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षाशुल्क प्रतिपूर्ती योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या परीक्षेचा निकाल दि. १० मार्च २०२६ रोजी जाहीर करण्यात आला होता.

खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील ‘अमृत’ योजनेच्या लक्षित गटातील पात्र विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. ब्राम्हण, कायस्थ, *कोमटी*, मारवाडी, राजपूत, यलमार अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, वैश्य, नायर, नायडू, कम्मा, बनिया, बंगाली, त्यागी, गुजराथी, ठाकूर, जाट, भूमिहार, लोहाणा, कानबी आदी घटकांचा यात समावेश आहे.

परीक्षाशुल्क प्रतिपूर्तीसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत दि. ३० एप्रिल २०२६ असून, अर्ज अमृत संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर https://mahaamrut.org.in या लिंकवर ऑनलाईन पद्धतीने सादर करावेत. अर्जासोबत सन २०२५-२६ किंवा २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी लागू असलेले उत्पन्न प्रमाणपत्र किंवा ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र, राष्ट्रीयत्व अथवा अधिवास प्रमाणपत्र, लक्षित गटातील जात नमूद असलेला पुरावा (टी.सी., एल.सी., शालेय निर्गम उतारा इ.), जानेवारी २०२६ परीक्षेत उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र तसेच बँक खात्याचा तपशील (पासबुक किंवा रद्द केलेला धनादेश याची स्पष्ट प्रत) सादर करणे आवश्यक आहे. असे आवाहन अमृतचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी केले आहे.
*-*-*-*-*