निबंधाची मराठी माध्यमातून तयारी
875 subscribers
50 photos
1 video
10 files
21 links
मराठी माध्यमातुन निबंध लेखनाची तयारी!
Download Telegram
MPSC & UPSC GS Marathi Booklist.pdf
6 MB
मराठी माध्यमातून #UPSC आणि #MPSC च्या नवीन पॅटर्न नुसार अभ्यास करतांना जी मुख्य समस्या येते, ती म्हणजे मराठीत नेमके कोणते साहित्य उपलब्ध आहेत. त्यावर तोडगा म्हणुन कोणते पुस्तके वाचता येतील या संदर्भात यादी सोबत जोडली आहे.

जर त्यात कोणत्या पुस्तकातून नेमके काय वाचावे हे समजून घ्यायचे असेल तर खाल्ली दिलेल्या लिंक वर आपण ते बघू शकता.

Link -

https://youtu.be/v7GLbsqW8ys

धन्यवाद 🙏🏾

Join
@UPSCin_Marathi
QP-CSM-22-ESSAY-190922 (2).pdf
650.3 KB
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वेबसाईट वर या वर्षीचा निबंधाचा पेपर आला आहे. तो सोबत जोडत आहे.

@EssayInMarathi
यंदाचा शांततेचा नोबेल दोन संस्था आणि एक मानवी हक्क कार्यकर्ते यांच्यात विभागून देण्यात आला आहे. सध्याच्या युक्रेन-रशिया युद्धाच्या पार्श्‍वभूमीवर ही गोष्ट अपेक्षित होती. युद्धाच्या काळात नागरी समाज आणि मानवी हक्क संघटना तसेच कार्यकर्ते काय भूमिका बजावतात याकडे जगाचे लक्ष लागून असते. यंदाच्या शांतता नोबेल निवडीवर या पार्श्वभूमीचे प्रतिबिंब दिसून येते.

UPSC/MPSC च्या दृष्टीने विचार केला असता आपल्या लक्षात येईल की
#GS2 आणि #PSIR मध्ये नागरी समाज, मानवी हक्क आणि मानवी हक्क चळवळी यांचा उल्लेख आपल्याला आढळून येतो. त्यामुळे या घटकांचा सखोल अभ्यास येणाऱ्या परीक्षांच्या दृष्टीने करणे अपेक्षित आहे.

Join
@UPSCin_Marathi
मानवी हक्क, नागरी समाज आणि स्वयंसेवी संस्था यांच्या संदर्भात भूमिका मांडण्याची गरज असणारा निबंध देखील विचारला जाऊ शकतो.

या घटकांचा संदर्भ असलेले एखादे विधान निबंधाचा विषय म्हणून दिले जाऊ शकते.

@EssayInMarathi
चित्रपटातील आशयाच्या संदर्भात समाजाचे प्रतिबिंब असते की समाज चित्रपटाचे प्रतिबिंब. या आशयाच्या निबंधात उदाहरण म्हणून या बातमीतील अधोरेखित केलेला मजकूर वापरता येईल.

Join @EssayInMarathi
दिवाळीच्या खूप सदिच्छा 😊
नोबेल पारितोषिक विजेते साहित्यिक ओऱ्हान पामुक यांची "द नाइट्स ऑफ प्लेग" वरील हे विश्लेषण निबंध कसा गुंफला जाऊ शकतो याच्या माहितीसाठी उपयोगाचे आहे.

Join
@EssayInMarathi
भारतीय जाती व्यवस्थेचे पाळेमुळे मांडणारे सुनील सांगळे लिखित पुस्तक "Caste system in India" या ग्रंथाची समीक्षा वाचनीय आहे. एखाद्या मुद्याला किती अंगाने आणि कोणत्या पातळीवर जाऊन चिकित्सकपणे मांडता येऊ शकते, याचे हे एक चांगले उदाहरण आहे.

Join
@EssayInMarathi
जागतिक आणि स्थानिक परिस्थिती मध्ये तुलना करतांना लिखाणाचा प्रवाह कसा असावा यासाठी हा लेख नक्की वाचा. तसेच यातील विवेकानंदांच्या काही सुभाषितांचा उल्लेख आहे. त्यांचा निबंधात कसा वापर करता येऊ शकतो, याच्यावर देखील विचार करता येऊ शकतो.

Join
@EssayInMarathi
आपण या @UPSCin_Marathi चॅनल वर पूर्व परीक्षा तसेच मुख्य परीक्षेतील #GS च्या संदर्भात महत्त्वाच्या बातम्या, आकडेवारी, आकृत्या टाकत असतो.

पण या व्यतिरिक्त महत्त्वाचे विषय असलेल्या निबंधाच्या घटकाची तयारी करण्यासाठी आपण
@EssayInMarathi हे चॅनल देखील चालवतो. भरपूर निबंधाच्या संदर्भातील चर्चा आपण या चॅनलवर करतो. त्यामुळे तुम्ही ते चॅनल देखील subscribe करावे.

तसेच वैकल्पिक विषयाच्या अनुषंगाने माझा जो ऑप्शनल होता, त्याचे
@PSIRin_Marathi हे चॅनल आपण चालवतो. ज्यांची ऑप्शनल राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय सबंध आहे त्यांनी या चॅनलला बघावे तसेच subscribe देखील करावे.

तसेच आपण आता YouTube वर देखील आलो आहोत.
https://youtube.com/c/UPSCinMarathi या चॅनल च्या माध्यमातून आपण लवकरच आठवड्याच्या चालू घडामोडींचा आढाव, तसेच इतर सामायिक प्रश्न यावर video बनवणार आहोत. सध्या GS आणि PSIR ची मराठी booklist आपण या चॅनल वर video च्या माध्यमातून सांगितली आहे. या चॅनल ला देखील आपण subscribe करावे तसेच notification चालू करावे, जेणे करून नवीन video ची माहीती आपल्याला लवकर कळेल.

आपल्या या चॅनलला दिवसेंदिवस वाढत चाललेल्या प्रतिसादाला बघून मला देखील आपल्यासाठी नवीन content तयार करायचे हुरूप येत आहे. आपल्याला या चॅनलचा फायदा होत असले तर आपण ही पोस्ट आपल्या मित्र-मैत्रिणी सोबत नक्की शेअर करा. मराठी माध्यमातून तयारी करणाऱ्यांसाठी IAS होण्याचा प्रवास सुलभ व्हावा यासाठी आपण मिळून प्रयत्न करू. धन्यवाद 🙏🏾

Join
@UPSCin_Marathi
@EssayInMarathi
@PSIRin_Marathi
निबंध लेखनाच्या संदर्भात आपण लवकरच एक बॅच सुरू करणार आहोत त्याची पूर्ण माहिती लवकरच आपल्या सोबत शेअर करणार आहोत.

या संदर्भात हळू हळू लेखन क्षमता वृद्धी, तसेच टप्प्याटप्प्याने निबंध लेखनाची शब्द मर्यादा कशी वाढवता येईल
, या संदर्भात आपण तयारी करून घेणार आहोत.

मागील वर्षीच्या टॉपिक वर चर्चा तसेच तुम्ही लिहलेले निबंध देखील तपासून दिले जातील.

पुढील माहिती लवकरच आपल्या
@EssayInMarathi चॅनल वर शेअर करण्यात येईल.

धन्यवाद 🙏🏾
स्त्रियांच्या संदर्भात दरवर्षी एक विषय निबंधाच्या पेपरमध्ये देण्यात येतो त्यामध्ये आपल्या युक्तिवादाला उदाहरणाची जोड देणे आवश्यक असते. आपण वरील उदाहरण देऊन स्त्रियांच्या समानतेचा मुद्दा यशस्वीपणे मांडू शकतो. तसेच या प्रकारची कृती इतर क्षेत्रात देखील लागू होणे गरजेचे आहे असे आपण म्हणू शकतो.

Join
@EssayInMarathi
तसं माझं मूळ तर इंजीनियरिंगचं आहे, परंतु स्पर्धा परीक्षामुळे राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध (#PSIR) या विषयाला जवळून अभ्यासायची संधी मिळाली.

कालांतराने पोस्ट ग्रॅज्युएशन पार पडले व नेटची परीक्षा देखील दिली. त्याच काळात upsc मुख्य परीक्षा असल्यामुळे नेटचा अभ्यास काही करता आला नाही. Upsc च्या अभ्यासावर माझी नेट तर आरामशीर निघाली पण JRF (Junior Research Fellowship) 1.07 percentile ने हुकली. अर्थातच तेव्हा संमिश्र भावना होत्या, कारण एका बाजूला नेट निघाल्याचे सुख तर दुसर्‍या बाजूला JRF न मिळाल्याचे दुःख.

त्यामुळे तेव्हाच ठरवले की एकदा तरी थोडा व्यवस्थित अभ्यास करून परीक्षा देऊया. यंदा शिकवण्याच्या प्रक्रियेतून मिळेल तसा वेळ काढून अभ्यास केला व परीक्षा दिली. कालच या परीक्षेचा निकाल लागला आणि मी 99.50% percentile मिळवून JRF पास झालो.☺️ यासर्व प्रक्रियेत अर्थातच #upsc च्या तयारीचा खूप मोठा फायदा मला झाला. तसेच या निकालाच्या नंतर शिकवण्यासाठी आणखी जास्त हुरूप देखील आले आहे.🤩

या सर्व प्रक्रियेत माझ्या सोबत असलेले माझे कुटुंबीय आणि सर्व मित्र-मैत्रिणींचे मी या सुखद क्षणी आभार मानतो. धन्यवाद 🙏🏾

- ज्ञानेश्वर
निबंधाची मराठी माध्यमातून तयारी
निबंध लेखनाच्या संदर्भात आपण लवकरच एक बॅच सुरू करणार आहोत त्याची पूर्ण माहिती लवकरच आपल्या सोबत शेअर करणार आहोत. या संदर्भात हळू हळू लेखन क्षमता वृद्धी, तसेच टप्प्याटप्प्याने निबंध लेखनाची शब्द मर्यादा कशी वाढवता येईल, या संदर्भात आपण तयारी करून घेणार आहोत.…
या बॅचच्या संदर्भात काम चालू आहे. 15 नोव्हेंबर पासून बॅच सुरू करण्याचा प्रयत्न आहे.

बॅचची वैशिष्ट्ये -

1) 300, 600, 900, 1200 शब्द अशी लिखाण क्षमता वृद्धी करून घेण्यात येईल.

2) एकूण वरील चार आणि एक 250 गुणांचा निबंधाचा पेपर तपासून मिळेल.

3) निबंध लेखनासाठी वर्क बूक देण्यात येणार आहे.

4) Telegram channel च्या माध्यमातून audio lectures मधून दीड महिन्यात निबंध लेखनाची तयारी करून घेण्यात येईल.

5) बॅच ची फी माफक असेल.

6) विचार क्षमता वृद्धीसाठी विशेष चर्चा सत्र देखील घेण्यात येतील.

Join @EssayInMarathi
निबंध लेखनातील शब्द संख्येचे चक्रव्यूह भेदतांना लक्षात ठेवायचा कानमंत्र...

@EssayInMarathi
या वर्षी कवींच्या संदर्भात आलेल्या निबंधात ही कविता वापरता आली असती.

Join
@EssayInMarathi
😍आपल्या बॅचचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.🤩

यामुळे येथे काही दिवसांपासून पोस्ट कमी टाकल्या जात आहेत. परंतु उद्या पासून पुन्हा सर्व काही सुरळीत चालू होईल..✌🏾

Join @EssayInMarathi
Essay Batch Sample File.pdf
1.5 MB
आपल्या निबंध कार्यशाळेच्या workbook ची sample फाईल सोबत जोडली आहे.

Addmision झाल्यावर प्रत्येकाला ही pdf वैयक्तिक पातळीवर पाठवली जाईल. त्याची प्रिंट काढून लेक्चर चालू असतांना त्यात value addition करता येईल.

Join
@EssayInMarathi
Essay Batch FAQ
<unknown>
निबंधाच्या कार्यशाळे संदर्भात येणार्‍या कॉमन शंकाचे येथे उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. हा ऑडिओ ऐकल्यानंतर कदाचित तुम्हाला काहीच शंका रहाणार नाहीत. 😇🤗

@EssayInMarathi