चालू घडामोडी Deva Jadhavar
110K subscribers
20.6K photos
359 videos
2.72K files
10K links
सर्व स्पर्धा परीक्षेच्या चालू घडामोडीसाठी अतिशय उपयुक्त चॅनेल...! देवा जाधवर - 9359558186

जॉइन करा @DevaJadhavar
Download Telegram
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
ही MPSC खरंच माझी म्हणू का... असं म्हणायची वेळ आयोगाने आणली आहे.
🤩13314🫡11👌9🔥2
@ सातारा - चालू घडामोडी सेमिनार - 12 संप्टेबर 2026, सकाळी अकरा वाजता
38
बीड_जिल्हा_कोतवाल_भरती_झालेला_पेपर_सप्टेंबर_2023_1.pdf
2.3 MB
बीड जिल्हा - कोतवाल भरती झालेला पेपर - सप्टेंबर 2023.pdf
9
धाराशिव_जिल्हा_कोतवाल_भरती_झालेला_पेपर_सप्टेंबर_2023.pdf
2.4 MB
धाराशिव जिल्हा - कोतवाल भरती झालेला पेपर - सप्टेंबर 2023.pdf
11🙏2
लातूर_जिल्हा_कोतवाल_भरती_झालेला_पेपर_सप्टेंबर_2023.pdf
2.4 MB
लातूर जिल्हा - कोतवाल भरती झालेला पेपर - सप्टेंबर 2023.pdf
8
CMO Maharashtra Tweets:

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई येथे एमपीएससीच्या राज्यभरातून आलेल्या विद्यार्थी प्रतिनिधींची भेट घेऊन त्यांच्याशी विविध मागण्यांवर चर्चा केली. त्यांच्या सर्व मागण्या ऐकून घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्याशी संवाद साधला. त्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या. मुख्यमंत्र्यांच्या चर्चेतील महत्त्वाचे मुद्दे असे:

▪️औषध निरीक्षक परीक्षा पेपरफुटीचा सखोल तपास सुरू. आम्हाला प्रणाली सुधारण्यात रस, लपवण्यात नाही. हा तपास संपलेला नाही, तो शेवटच्या टप्प्यापर्यंत नेण्यात येईल.
▪️ एकूणच सर्वंकष सुधारणांसाठी श्रीमती व्ही. राधा यांच्या अध्यक्षतेत नवीन समिती. सर्वांचा विश्वास आहे, अशाच अधिकार्‍यांची नियुक्ती. ही समिती राज्यभर जाणार आणि सर्व विभागात विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि संबंधितांशी चर्चा करणार. या समितीपुढे आपले प्रश्न आणि सूचना खुलेपणाने मांडा.
▪️ गट ब आणि गट क मुख्य आणि पूर्व परीक्षा 2025 ची चौकशी करणार
▪️ विद्यार्थ्यांच्या इतरही ज्या तक्रारी असतील, त्याच्या निराकरणाची यंत्रणा उभारणार. एसआयटी त्याचा तपास करेल.
▪️ माहिती अधिकारात उत्तरपत्रिका द्यावी, अशी शिफारस एमपीएससीला करण्यात येईल.
▪️ इतरही परीक्षा, ज्यात तक्रारी त्याची फेरतपासणी आणि तोवर मुलाखती थांबवण्यात येईल. कुणाच्याही मनात कोणतीही शंका राहून दीर्घकालीन उपाययोजना आपण करु शकणार नाही.
▪️ गुन्हे शाखेचा तपासाचा प्राथमिक अहवाल सार्वजनिक करण्यात येईल.
▪️ लेंडवे, मराठे, नखाते यांच्या काळात झालेल्या सर्व परीक्षांची चौकशी एसआयटीमार्फत करणार
▪️ राजूरकर कमिटी शिफारसींची पडताळणी करू, योग्य शिफारसींची अंमलबजावणी करणार
▪️ पोलिस भरती: दोन्ही पायाला चीप किंवा आणखी काही पर्याय देणार, प्रत्येक जिल्ह्यात पोलिस भरतीसाठी गुणांचा एकच पॅटर्न करणार
▪️सारथी, बार्टी, महाज्योती याबाबतच्या प्रश्नांचे समाधान करणार
▪️मुलाखती संदर्भात गाईडलाईन ठरवणार, तसे समितीला सूचित करणार
▪️ पीएमसी आणि एमएमआरडीए परीक्षांची सखोल चौकशी केली जाईल. दोषींवर कारवाई करणार
▪️ एमपीएससी अध्यक्ष, सचिव यांच्याविरोधात कोणताही पुरावा दिला, तर स्वतंत्र चौकशी करायला तयार, जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होणारच, कुणालाही वाचवण्याचा प्रश्नच येत नाही.
▪️ कालबद्ध कारवाई करणार, पुढच्या 8 दिवसात ही प्रक्रिया प्रारंभ करणार
▪️ पुढच्या परीक्षा फुलप्रूफ व्हाव्यात, म्हणून लांबणीवर. प्रथमच इतक्या मोठ्या संख्येने भरतीप्रक्रिया होत असल्याने संपूर्ण यंत्रणा सज्जतेनंतरच ती घेणार. पारदर्शिता हाच मुख्य निकष असणार.
▪️ एमपीएससीमध्ये समर्पित तक्रार निवारण कक्ष, सेवानिवृत्त न्यायाधीश त्यासाठी नियुक्त करण्यात येईल.
37
❤️ Current Express - 1 जानेवारी ते 1 सप्टेंबर 2026

😊 स्वतः MPSC मधून यशस्वी मार्गदर्शकांच्या लेखणीतून

👼उपयुक्त - MPSC गट ब / क - (तलाठीसह), सरळसेवा, पोलीस भरती
👼Basic to Advance सर्व घडामोडी
👼सोप्या भाषेत मांडणी
👼सरावासाठी 15 प्रश्नसंच
👼ऑगस्ट 2026 पर्यंत updated

❤️Revision साठी Best

🛒 Amazon link -
https://www.amazon.in/dp/B0HHFXSN1C

📱free व paid courses link -
https://play.google.com/store/apps/details?id=com.maharashtra.academy.pune.app

💩 Whats app -
https://wa.me/919075058049

😱 एकदा बुक शॉप मध्ये जाऊन नक्की पहा.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
10
1_जानेवारी_ते_1_सप्टेंबर_2026_चालू_घडामोडी_MPSC,_सरळसेवा,_पोलीस.pdf
8.9 MB
🔥1 जानेवारी ते 1 सप्टेंबर 2026 चालू घडामोडी

◾️MPSC, सरळसेवा, पोलीस भरती.pdf
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
3
“त्या " अपूर्ण राहिलेल्या स्वप्नाला विनम्र अभिवादन...🙏🏻🪔
आणि त्या स्वप्नामागील वेदना समजून घेण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न...
-----------------

करपलेल्या शेतातून उगवलेले स्वप्न...

महाराष्ट्राच्या मातीत अनेक स्वप्ने रुजतात. कुणाच्या शेतात ज्वारी उगवते, कुणाच्या अंगणात कष्टाचे संस्कार; आणि याच मातीतून एखादा तरुण अधिकारी होण्याचे स्वप्न घेऊन उभा राहतो. गावच्या मातीतून शहराच्या स्पर्धेच्या विश्वात आलेल्या या तरुणाच्या डोळ्यांत केवळ स्वतःचे भविष्य नसते. आई-वडिलांच्या कष्टांना अर्थ मिळावा, घरची परिस्थिती बदलावी आणि आपल्या गावाचे नाव उज्ज्वल व्हावे, अशी अनेक स्वप्ने त्याच्यासोबत चालत असतात.

मात्र काही वेळा परिस्थिती स्वप्नांपेक्षा अधिक कठोर असते. ग्रामीण भागातील दुष्काळ हा केवळ पावसाचा अभाव नसतो. तो शेतकऱ्याच्या उत्पन्नाचा, कुटुंबाच्या आर्थिक स्थैर्याचा आणि पुढच्या पिढीच्या आशेचा प्रश्न असतो. पिके करपली की केवळ शेत रिकामे होत नाही; घरातील आर्थिक गणितही कोलमडते. अशा परिस्थितीत एखादा ग्रामीण तरुण MPSC ची तयारी करत असेल, तर त्याच्या पुस्तकांमागे आई-वडिलांचे कष्ट, त्याग आणि अपूर्ण राहिलेल्या गरजा असतात. तरीही तो अभ्यास करतो. कारण त्याला विश्वास असतो की एक दिवस ही परीक्षा त्याच्या आयुष्याला नवी दिशा देईल.

पण स्पर्धा परीक्षेचा प्रवास सोपा नसतो. अनेक वर्षांचा अभ्यास, सततची अनिश्चितता, आर्थिक अडचणी, परीक्षांचे वेळापत्रक, निकालाची प्रतीक्षा आणि अपयशाची भीती, या सगळ्यांशी विद्यार्थ्याला एकाच वेळी सामना करावा लागतो. त्यातच परीक्षा प्रक्रियेतील गैरप्रकार किंवा पेपरफुटीच्या बातम्या समोर आल्या की प्रश्न केवळ परीक्षेचा राहत नाही; तो विश्वासाचा होतो.

“मी दिवसरात्र जीव तोडून अभ्यास करतोय; पण माझ्या मेहनतीला खरंच न्याय मिळणार आहे का?” हा प्रश्न विद्यार्थ्याच्या मनात निर्माण होणे हीच व्यवस्थेसाठी गंभीर बाब आहे. पेपरफुटीचा सर्वात मोठा परिणाम प्रश्नपत्रिकेवर होत नाही; तो विद्यार्थ्याच्या विश्वासावर होतो, त्याच्या मानसिकतेवर होतो. एका बाजूला ग्रामीण कुटुंब आर्थिक संकटाशी झुंजत असते, तर दुसऱ्या बाजूला त्यांचा मुलगा आपल्या भवितव्यासाठी दिवस-रात्र पुस्तकांशी झुंजत असतो. अशा वेळी परीक्षा व्यवस्थेतील एका गैरप्रकाराची बातमी त्याच्या मनातील अनेक प्रश्नांना जन्म देऊ शकते. म्हणून एखाद्या विद्यार्थ्याच्या दुःखद मृत्यूकडे केवळ वैयक्तिक अपयश या दृष्टीने पाहणे योग्य ठरणार नाही. त्याच्यावर ही वेळ का आली याचासुद्धा गांभीर्याने विचार व्हायला हवा. दुष्काळ, आर्थिक विवंचना, स्पर्धेचा ताण आणि परीक्षा व्यवस्थेवरील अविश्वास यांसारख्या घटकांकडे समाजाने गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. प्रश्न असा आहे की, आपण आपल्या विद्यार्थ्यांकडून फक्त संघर्षाची अपेक्षा करणार आहोत की त्यांच्या संघर्षात व्यवस्थाही त्यांच्या सोबत उभी राहणार आहे?

शासनाने परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणि उत्तरदायित्व अधिक मजबूत केले पाहिजे. गैरप्रकारांच्या तक्रारींवर तातडीने आणि विश्वासार्ह चौकशी झाली पाहिजे. दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे. त्याचबरोबर ग्रामीण आणि आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन, समुपदेशन आणि आधारव्यवस्था अधिक सक्षम करण्याची गरज आहे. कारण MPSC ही केवळ एक परीक्षा नाही. ती महाराष्ट्रातील हजारो कुटुंबांच्या आशेची वाट आहे. त्या वाटेवर चालणारा विद्यार्थी जेव्हा पुस्तक उघडतो, तेव्हा त्याच्यासोबत त्याच्या आई-वडिलांची स्वप्नेही उघडली जातात. शेतात पिके करपली तरी पुढच्या पावसाची आशा शेतकरी धरून ठेवतो. तशीच आशा विद्यार्थ्याच्या मनातही जिवंत राहिली पाहिजे. व्यवस्थेने विद्यार्थ्याला निष्पक्ष संधीची हमी देणे तिचे कर्तव्य आहे.

एका विद्यार्थ्याच्या दुःखद अंताची केवळ हळहळ व्यक्त करून ही घटना संपता कामा नये. त्याच्या स्वप्नामागील दुष्काळ, त्याच्या संघर्षामागील वेदना, आर्थिक विवंचना आणि त्याच्या मनातील व्यवस्थेविषयीचा प्रश्न आपण समजून घेतला पाहिजे. कारण करपलेल्या शेतातूनही स्वप्न उगवू शकते; फक्त त्या स्वप्नाला जगण्याची, लढण्याची आणि पुढे जाण्याची निष्पक्ष संधी देणारी व्यवस्था हवी. मातीतून उगवलेल्या या स्वप्नांना परिस्थितीच्या उन्हात कोमेजू न देता, त्यांना आशेच्या पावसाने बहरण्याची संधी देणे ही समाजाची आणि व्यवस्थेची जबाबदारी आहे. कारण एखाद्या गरीब घरातील विद्यार्थ्याच्या हातातून पुस्तक निसटते, तेव्हा केवळ एक पुस्तक बंद होत नाही—तर एका तरुणाचे स्वप्न, एका घराची आशा आणि एका पिढीचा व्यवस्थेवरील विश्वास डळमळतो. म्हणून आता गरज आहे ती केवळ संवेदना व्यक्त करण्याची नाही, तर अशी व्यवस्था उभी करण्याची, जिथे परिस्थिती गरीब असली तरी संधी गरीब नसेल; जिथे शेत करपले तरी स्वप्ने करपू नयेत...

--अमोलप्रतिभा...

   
78🤝3🔥2
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
61
.      🚨  गुलाल टेस्ट सिरीज  🚨

💥यशाचा गुलाल आता तुमच्याच हाती 🔥

🚩 दररोज स्पष्टीकरणासाहित उत्तरे असलेली महाराष्ट्रातील पहिली Test सिरीज.

➡️2026 मध्ये होणाऱ्या प्रत्येक भरती साठी अत्यंत उपयुक्त Test सिरीज.

👉365 दिवस

👉 365 टेस्ट

#️⃣ संपूर्ण महाराष्ट्रातून तुमची रँक समजणार #️⃣

विषय : मराठी , सामान्यज्ञान , गणित व बुध्दीमत्ता , इतिहास , भूगोल , विज्ञान , राज्यघटना ,अर्थशास्त्र , इंग्रजी , चालू घडामोडी.

👼 प्रत्येक विषयाच्या टॉपिक नुसार घटक टेस्ट व नवीन संभाव्य टेस्ट

➡️ सरळसेवा ते MPSC PYQ.
➡️ पोलीस भरती PYQ
➡️ TCS PYQ
➡️ वनरक्षक PYQ

1️⃣दररोज 30 प्रश्नांची सराव Test.
2️⃣ प्रत्येक प्रश्नाचे स्पष्टीकरण असेल.
3️⃣टॉपिक नुसार सर्व घटक टेस्ट.
4️⃣एका वर्षाचे 11000 + प्रश्न पाठच होणार       
5️⃣प्रत्येक स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त
6️⃣90 + पेपर ची तयारी याच टेस्ट सिरीज मधून.

🔥यशाच्या शिखरावर उधळला जाणारा गुलाल दररोजच्या सरावातूनच तयार होतो हे लक्षात ठेवा...

📱 टेस्ट सिरीज घेण्यासाठी Link ⤵️

https://play.google.com/store/apps/details?id=com.ghdqvz.lgmfey
https://play.google.com/store/apps/details?id=com.ghdqvz.lgmfey

🔥 आपल्या जवळच्या मित्राला पण Share करा.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
9
चालू घडामोडी Deva Jadhavar
.      🚨  गुलाल टेस्ट सिरीज  🚨 💥यशाचा गुलाल आता तुमच्याच हाती 🔥 🚩 दररोज स्पष्टीकरणासाहित उत्तरे असलेली महाराष्ट्रातील पहिली Test सिरीज. ➡️2026 मध्ये होणाऱ्या प्रत्येक भरती साठी अत्यंत उपयुक्त Test सिरीज. 👉365 दिवस 👉 365 टेस्ट #️⃣ संपूर्ण महाराष्ट्रातून…
🟡 बऱ्याच विद्यार्थ्यांनी त्यात नुकतीच लॉन्च केलेली गुलाल नावाची टेस्ट सिरीज ( 365 )  घेतली आहे त्या विद्यार्थ्यांनी दररोज टेस्ट सोडवा व दिलेले स्पष्टीकरण काळजीपूर्वक वाचून घेत चला किंवा तुमच्या पद्धतीने तुम्हाला दररोज कोणत्या विषयाची टेस्ट सोडवायची ते फिक्स करून घ्या तश्या पद्धतीने त्या टेस्ट सोडवा.

📱ज्यांनी गुलाल टेस्ट सिरीज घेतली आहे किंवा घेणार आहे त्यांनी जॉइन करून घ्या...

https://t.me/SpardhaMantraTest
https://t.me/SpardhaMantraTest
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🙏42