चालू घडामोडी Deva Jadhavar
110K subscribers
20.6K photos
357 videos
2.72K files
10K links
सर्व स्पर्धा परीक्षेच्या चालू घडामोडीसाठी अतिशय उपयुक्त चॅनेल...! देवा जाधवर - 9359558186

जॉइन करा @DevaJadhavar
Download Telegram
🚨 पोलीस भरतीतील बोगस प्रमाणपत्रांचा प्रश्न गंभीर आहे!

राज्यात MPSC सारख्या स्पर्धात्मक परीक्षांमध्ये पेपरफुटीची प्रकरणे समोर येत असतील, तर पोलीस भरती प्रक्रियेतही पारदर्शकता आणि कठोर पडताळणी अत्यंत गरजेची आहे.

आजपर्यंत पोलीस भरतीमध्ये पेपरफुटीचे मोठे प्रकरण समोर आलेले नसले, तरी बोगस प्रमाणपत्रांचा मुद्दा निश्चितच चिंताजनक आहे.

🫵 भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त आणि विशेषतः क्रीडा प्रमाणपत्रांचा गैरवापर करून काही जण भरती झाल्याची प्रकरणे समोर आली आहेत.

अनेक वेळा अशी प्रकरणे भरती झाल्यानंतर एक-दोन वर्षांनी उघडकीस येतात. संबंधितांवर कारवाई होते; मात्र त्या काळात प्रामाणिकपणे मेहनत करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संधीवर त्याचा परिणाम होतो.

📌 पुणे जिल्हा पोलीस दलात बोगस क्रीडा प्रमाणपत्रांच्या प्रकरणात सर्वात मोठी कारवाई झाल्याचे समोर आले आहे. मुंबई पोलीस दलासह अनेक जिल्ह्यात अशा प्रकारच्या प्रकरणांवर कारवाई करण्यात आली आहे.

⚠️ हा प्रकार कुठेतरी थांबला पाहिजे!

पोलीस भरती ही हजारो विद्यार्थ्यांच्या मेहनतीशी आणि त्यांच्या भवितव्याशी जोडलेली प्रक्रिया आहे. त्यामुळे—

प्रमाणपत्रांची कठोर पडताळणी करून प्रामाणिक उमेदवारांना न्याय मिळावा
यासाठी सर्वांनी एकत्रितपणे आवाज उठवण्याची आणि कायदेशीर व लोकशाही मार्गाने पाठपुरावा करण्याची तयारी ठेवली पाहिजे. 🙏

🇮🇳 मेहनत करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला न्याय मिळालाच पाहिजे!
108🔥9💯5
हा माणूस एकदम खरा ❤️
🔥16428💯21🫡2
जा. क्र. 010/2026 महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त मुख्य परीक्षा - 2025 या परीक्षेतील राज्य कर निरीक्षक संवर्गाच्या अनाथ (संस्थात्मकA/B) प्रवर्गाच्या 02 पदांसहित सुधारित शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
10
जाहिरात क्रमांक ०१५/२०२६ मुंबईचे नगरपाल कार्यालयातील बेलीफ व लिपिक गट क स्पर्धा परीक्षा २०२६ - प्रश्नपत्रिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/prev_que_papers/9#
2
*पोलीस भरती २०२६-२७ वार्षिक वेळापत्रकाबाबत आयोजित बैठकीची सविस्तर माहिती.*

*दिनांक:* ०८ सप्टेंबर २०२६, दुपारी २:०० ते ३:००

*स्थळ:* मंत्रालय, मुंबई

*अध्यक्ष:* मा.ना. श्री. योगेश कदम साहेब, गृहराज्यमंत्री, महाराष्ट्र राज्य.

गृहराज्यमंत्री मा.ना. श्री. योगेश जी कदम साहेब यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस भरती २०२६-२७ च्या वेळापत्रकाबाबत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.

*बैठकीस उपस्थित मान्यवर:*
१. मा. आ. बच्चू कडू साहेब - विधानपरिषद आमदार (VC द्वारे उपस्थित)
२. मा. श्री. कृष्णप्रकाश सर - अतिरिक्त पोलीस महासंचालक (ADGP), महाराष्ट्र
३. मा. श्री. रवींद्र पाटील सर - उपसचिव, गृहविभाग
४. कक्ष अधिकारी व संबंधित विभागाचे इतर अधिकारी

*बैठकीतील चर्चेचा गोषवारा:*

*१. पोलीस भरतीचे वार्षिक वेळापत्रक जाहीर करण्याबाबत:*
मा. आ. बच्चू कडू साहेब यांनी इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातही पोलीस भरतीचे निश्चित वार्षिक वेळापत्रक जाहीर करावे, अशी मागणी केली. यावर प्रशासनाने गतवर्षीच्या प्रलंबित नियुक्त्या, प्रशिक्षणास होणारा विलंब व मधल्या काळात येणाऱ्या निवडणुका या अडचणी विशद केल्या.

सविस्तर चर्चा अंती मा. मंत्री महोदयांच्या निर्देशानुसार ADGP मा. कृष्णप्रकाश सर यांनी दरवर्षी निश्चित रिक्त होणाऱ्या जागांच्या अनुषंगाने *जानेवारी ते मार्च* या कालावधीत अंदाजित वार्षिक वेळापत्रक घेणे शक्य असल्याबत सकारात्मक प्रतिसाद दिला. शासनाने लवकरच तसे परिपत्रक जारी करावे, अशी भूमिका घेण्यात आली. त्यावर मंत्रीमहोदय यांनी मुख्यमंत्री महोदय यांच्याशी चर्चा करून लवकरच परिपत्रक जारी करण्याबाबतचे भाष्य केले.

*२. रिक्त पदांचा आढावा:*
सध्या दिनांक ३०/०६/२०२६ पर्यंत सुमारे *८,९७० रिक्त पदे* उपलब्ध असून यामध्ये वाढ होणार आहे. या जागांच्या अनुषंगाने वार्षिक वेळापत्रकाचे काम तात्काळ सुरू करण्याचे निर्देश मा. मंत्री महोदयांनी दिले.शिवाय, ह्या विषयावर मुख्यमंत्री महोदय यांच्याशी देखील चर्चा करणार असल्याचे नमूद केले.

*३. होमगार्ड यांना वयोमर्यादेत सवलत:*
पोलीस भरतीत होमगार्ड जवानांना ५ वर्षांची वयोमर्यादा सवलत (३३+५) देण्याबाबत सविस्तर चर्चा झाली. यावर ADGP सरांनी सकारात्मकता दर्शवली.

*४. कुंभमेळ्याच्या अनुषंगाने भरती:*
कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस भरती लवकर घेण्याची आवश्यकता प्रशासनाने नमूद केली व त्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधांची (Infrastructure) गरजही विषद केली.

*५. पोलीस उपनिरीक्षक (DPSI / PSI) बाबत महत्त्वाचे निर्णय:*
अ) खात्यांतर्गत पोलीस उपनिरीक्षक पदासाठी आवश्यक असलेल्या दक्षता प्रमाणपत्रातील किरकोळ शिक्षा वगळण्याबाबत गृहविभागाचे उपसचिव मा. रवींद्र पाटील सर यांना निर्देश देण्यात आले. किरकोळ शिक्षेमुळे उमेदवारांचा परीक्षा देण्याचा अधिकार हिरावला जातो, असे मा. मंत्री महोदयांनी नमूद केले.
ब) DPSI परीक्षा मागील ३ वर्षांपासून बंद असल्यामुळे वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांसाठी एक विशेष संधी (One Time Age Relaxation) देण्याचे निर्देश देण्यात आले. याबाबत मा. मुख्यमंत्री महोदय देखील सकारात्मक असल्याचे सांगण्यात आले.
क) DPSI २०२६ च्या ९२ जागांच्या मागणीपत्रात जागावाढ करण्याबाबत तसेच दरवर्षी Direct PSI च्या रिक्त राहणाऱ्या जागांसाठी स्वतंत्र धोरण आखण्याबाबत चर्चा झाली.

*एकंदरीतच गृहराज्यमंत्री महोदय, प्रशासन व मा. आ. बच्चू कडू साहेब यांच्यात अत्यंत सकारात्मक व फलदायी चर्चा झाली. त्यामुळे पोलीस भरती व DPSI च्या उमेदवारांसाठी लवकरच आनंदाची बातमी मिळेल,अशी अपेक्षा आहे.*
63
🚨 पोलीस भरती 2026-27 🚨

आधी ग्राउंड होईल... 🏃‍♂️💪
त्यानंतर लेखी परीक्षा... 📝

जशी तुमची जोरदार तयारी सुरू आहे,
तशीच तुमची तयारी सातत्याने सुरू ठेवा! 🔥 Only Khaki
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
49👏3💯3
पोलीस भरतीसाठी लागणारी  महत्वाची  कागदपत्रे....👆

तुम्ही कोणत्या कॅटेगिरीमध्ये आहे तुम्हाला कोणते कागदपत्रे लागतात ते काढून घ्या.

पोलीस भरतीला लागणारी सर्व कागदपत्रे काढून ठेवा

एकदा की पोलिस भरतीची जाहिरात आली त्यानंतरच्या तारखेला काढलेले कागदपत्र हे चालत नाही लक्षात ठेवा. 

सर्व कागदपत्रे ही भरतीच्या अगोदरची पाहिजे म्हणून तयार करून ठेवा...
20
बीड_जिल्हा_कोतवाल_भरती_झालेला_पेपर_सप्टेंबर_2023.pdf
2.3 MB
बीड जिल्हा - कोतवाल भरती झालेला पेपर - सप्टेंबर 2023.pdf
15
SSM 2025 - Retotalling Announcement.pdf
348.6 KB
जाहिरात क्रमांक ००१/२०२६ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२५ - गुणांच्या फेरपडताळणीबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
10
उच्च न्यायालय मुख्य न्यायाधिस 50 वे - त्रिपाठी
👏49242
MPSC गट क पूर्व परीक्षा 2026 पुढे ढकलली आहे.

नवीन तारीख : 3 जानेवारी 2027
76🤩48🫡24🏆5👌3