चालू घडामोडी Deva Jadhavar
95.8K subscribers
17.4K photos
194 videos
2.35K files
8.68K links
सर्व स्पर्धा परीक्षेच्या चालू घडामोडीसाठी अतिशय उपयुक्त चॅनेल...! देवा जाधवर - 9359558186

जॉइन करा @DevaJadhavar
Download Telegram
बाई मी धरण, धरण, धरण बांधिते
माझं मरण, मरण, मरण कांडीते, न बाई मी धरण...

झुंजमुंजु ग झालं
पीठ जात्यात आटलं
कणी कोंडा ग, कोंडा ग कोंडा मी रांधिते, न बाई मी धरण...

दिस कासऱ्याला आला
जीव मागे घोटाळला
तान्हं लेकरू, माझं लेकरू, पाटीखाली मी डालते, न बाई मी धरण...

काय सांगू उन्हाच्या झळा
घावाखाली फुटे शिळा
कढ दाटे, कढ दाटे, पायी पाला मी बांधिते, न बाई मी धरण...

पेरापेरात साखर
त्यांचं पिकलं शिवार
घोटभर पाण्यासाठी सारं रान धुंडाळीते, न बाई मी धरण...

येल मांडवाला चढे
माझ्या घामाचे ग आळे
माझ्या अंगणी, माझ्या अंगणी,
पांचोळा ग पडे, न बाई मी धरण...

- दया पवार
https://youtube.com/playlist?list=PLWmxc2hvIh9rRpGfVMAvo8wO3Gefz8oFR&si=w_5Km8xf7Xz3mdBn
95👌17
फलटण परिसरातील विद्यार्थी .... आवर्जून भेटू !!!
36😁5🥰3🔥2
53🔥3👌3
60👏7🏆4🔥1
🔥25482🏆17👏3