वाराणसी येथे कोणताही लिखित दस्तऐवज किंवा पुस्तकाचा संदर्भ न घेता आणि पठणात एकही चूक न करता सलग ५० दिवस संपूर्ण शुक्ल यजुर्वेद (मध्यनंदिनी शाखा) पठण हे दंडक्रम पद्धतीने करून महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातील १९ वर्षीय, देवव्रत महेश रेखे या तरुणाने उल्लेखनीय असा विक्रम केला आहे. यामध्ये त्याने प्रत्यक्षात २.५ लाख पदांसह २००० हून अधिक मंत्रांचे पठण केले, हा एक अलौकिक पराक्रम आहे. भारतीय वेदशास्त्र परंपरेचा हा गौरव असून वेदमूर्तींच्या कुटुंबातील देवव्रत रेखे या मराठी तरुणाने हिंदू धर्माची पताका देशभरात उंचावली आहे. इतक्या लहान वयात वेद पारायणात अलौकीक विक्रम केला
❤272🫡56👏21🤔18😎7👌5🏆4🤝3🔥2🥰2
हैदराबाद मेट्रो रेल लिमिटेडने (HMRL) महिलांच्या सुरक्षेत आणि प्रवासातील सोईत वाढ करण्याच्या उद्देशाने मोठे पाऊल उचलले आहे. त्यांनी सुरक्षा पथकात 20 ट्रान्सजेंडर कर्मचाऱ्यांचा समावेश केला आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, मेट्रोमध्ये महिला प्रवाशांना अधिक सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
❤174👌26🥰11😎8🏆4🤔2👏1