महाराष्ट्र विधिमंडळाचे #हिवाळीअधिवेशन सोमवार ८ ते रविवार १४ डिसेंबर २०२५ या कालावधीत #नागपूर मध्ये होणार आहे. १३ डिसेंबर शनिवार आणि १४ डिसेंबर रविवार शासकीय सुट्टीच्या दिवशीही दोन्ही सभागृहाचे कामकाज घेण्याचा निर्णय विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला.
भारताच्या संविधानाची गौरवशाली अमृत महोत्सवी वाटचालया ऐतिहासिक पर्वानिमित्त २६ मार्च २०२५ रोजी विधानसभेत चर्चा झाली होती. या वेळी झालेल्या चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या भाषणाचे पुस्तक स्वरूपातील संकलन महाराष्ट्र विधिमंडळ वि.स. पांगे संसदीय प्रशिक्षण केंद्राच्या पुढाकारातून करण्यात आले आहे. या पुस्तकाचे प्रकाशन मंगळवार,९ डिसेंबर २०२५ रोजी राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते करण्यात येणार आहे, असे विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी यावेळी सांगितले.
विधानभवन येथे आयोजित बैठकीला विधान परिषद सभापती प्रा.राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्यमंत्री चंद्रकांतदादा पाटील, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे,जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार उपस्थित होते.

❤34🙏3
वाराणसी येथे कोणताही लिखित दस्तऐवज किंवा पुस्तकाचा संदर्भ न घेता आणि पठणात एकही चूक न करता सलग ५० दिवस संपूर्ण शुक्ल यजुर्वेद (मध्यनंदिनी शाखा) पठण हे दंडक्रम पद्धतीने करून महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातील १९ वर्षीय, देवव्रत महेश रेखे या तरुणाने उल्लेखनीय असा विक्रम केला आहे. यामध्ये त्याने प्रत्यक्षात २.५ लाख पदांसह २००० हून अधिक मंत्रांचे पठण केले, हा एक अलौकिक पराक्रम आहे. भारतीय वेदशास्त्र परंपरेचा हा गौरव असून वेदमूर्तींच्या कुटुंबातील देवव्रत रेखे या मराठी तरुणाने हिंदू धर्माची पताका देशभरात उंचावली आहे. इतक्या लहान वयात वेद पारायणात अलौकीक विक्रम केला
❤271🫡56👏21🤔18😎7👌5🏆4🤝3🔥2🥰2