Bhagirath Academy Pune
41.3K subscribers
6.17K photos
127 videos
634 files
1.35K links
For: UPSC & MPSC STUDY MATERIAL....

OUR MISSION :
“ To churn out ethically-sound and morality-bound civil servants.”

Contact : 9970298197 / 9090906777
Download Telegram
भारतीय राज्यघटनेतील खाली नमूद असलेले कोणते मार्गदर्शक तत्व हे गांधीवादी तत्वे या प्रकारात समाविष्ट होत नाही?
Anonymous Quiz
18%
१) ग्रामपंचायतीचे संघटन
15%
२) कुटीरउद्योगांना प्रोत्साहन
25%
३) जनावरांच्या कत्तलीस प्रबंध
43%
४) स्त्री व पुरुषांना समान कामासाठी समान
जिल्हा नियोजन समितीचे सचिव खालीलपैकी कोण असतात?
Anonymous Quiz
13%
१) पालकमंत्री
66%
२) जिल्हाधिकारी
11%
३) विभागीय आयुक्त
11%
४) मुख्य कार्यकारी अधिकारी
स्वातंत्र्योत्तर काळात खालीलपैकी कोणत्या राज्याने देशात सर्वप्रथम लोकशाही विकेंद्रीकरणाची संकल्पना स्वीकारली?
Anonymous Quiz
23%
१) महाराष्ट्र
54%
२) राजस्थान
14%
३) तामिळनाडू
9%
४) पश्‍चिम बंगाल
लाल मुंगी (Red Ant) जर व्यक्तीला चावली तर आग-आग होऊन खाज सुटते. कारण लाल मुंगीच्या दंशामध्ये ---- असते.
१) टारटारीक आम्ल (Tartaric Acid)
२) ब्युटारीक आम्ल (Butaric Acid) ३) असिटीक आम्ल (Acetic Acid) ४) फॉर्मिक आम्ल (Formic Acid)
Anonymous Quiz
16%
१) टारटारीक आम्ल (Tartaric Acid)
16%
२) ब्युटारीक आम्ल (Butaric Acid)
14%
३) असिटीक आम्ल (Acetic Acid)
54%
४) फॉर्मिक आम्ल (Formic Acid)
मानवी शरीरबांधणीस आवश्यक असणारे खालीलपैकी प्रमुख पोषकद्रव्य कोणते आहे?
Anonymous Quiz
20%
१) पिष्टमय पदार्थ (Carbohydrates)
60%
२) प्रथिने (Proteins)
8%
३) मेद (Fats)
13%
४) जीवनसत्वे (Vitamins)
Photo from Surajkumar Patil
▪️ *भगीरथ दिनविशेष : ११ फेब्रुवारी*

*महत्त्वाच्या घटना:*

२०११
१८ दिवसांच्या जनआंदोलनानंतर होस्‍नी मुबारक यांना इजिप्तची सत्ता सोडणे भाग पडले.
 
१९९९
मध्यप्रदेश सरकारतर्फे दिला जाणारा लता मंगेशकर पुरस्कार प्रसिद्ध संगीतकार इलियाराजा यांना जाहीर.
 
१९९०
२७ वर्षांच्या तुरुंगवासानंतर नेल्सन मंडेला यांची तुरूंगातुन सुटका
 
१९७९
पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी अंदमान निकोबार बेटावरील सेल्युलर जेल राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केले.
 
१९२९
पोप पायस (११ वा) आणि बेनिटो मुसोलिनी यांच्यात झलेल्या ‘लॅटेरान ट्रिटी’ या विशेष करारानुसार ‘व्हॅटिकन सिटी’ हे शहर राष्ट्र इटालीतुन वेगळे करण्यात आले. कॅथॉलिक ख्रिश्चनांचे हे प्रमुख धर्मपीठ आहे.
 
१९११
हेन्र्‍री पिके याने हंटर जातीच्या विमानातून भारतातील पहिली ‘एअर मेल’ अलाहाबादवरुन नैनी या १० किलोमीटर अंतरावरील गावाला वाहून नेली.
 
१८३०
मुंबईचे हंगामी राज्यपाल सर सिडने ब्रेकनिथ यांच्या अध्यक्षतेखाली सभा होऊन ऍग्री हॉर्टिकल्चरल सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेची स्थापना झाली.
 
१८१८
इंग्रजांनी अजिंक्यतारा किल्ला ताब्यात घेतला.

जन्मदिवस :

- 1847: थॉमस अल्वा एडिसन – अमेरिकन संशोधक आणि उद्योजक

▪️स्मृतिदिन:

१९७७
फक्रुद्दीन अली अहमद – भारताचे ५ वे राष्ट्रपती. १९७४ च्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत इंदिरा गांधींच्या नेतृत्त्वाखालील काँग्रेसतर्फे ते निवडून आले. 25 जून १९७५ रोजी आणीबाणीची घोषणा त्यांच्याच कारकिर्दीत करण्यात आली.

१९६८
पण्डित दीनदयाळ उपाध्याय – तत्त्वज्ञ, अर्थतज्ञ, समाजशास्त्री, इतिहासकार, पत्रकार, राजकीय नेते आणि जनसंघाचे एक संस्थापक यांची अज्ञात मारेकर्‍याकडुन हत्या

१९४२
जमनालाल बजाज – प्रसिद्ध गांधीवादी कार्यकर्ते, स्वातंत्र्यसैनिक आणि बजाज उद्योगसमुहाचे प्रणेते
▪️ *भगीरथ UPDATE*

▪️ *अनुराग सिंह ठाकूर आणि जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल यांच्या उपस्थितीत, गुलमर्ग इथे ‘तिसऱ्या खेलो इंडिया हिवाळी स्पर्धांचे उद्घाटन*

- *चर्चेत का*? - *सोर्स : PIB*

- जम्मू काश्मीरमध्ये यानिमित्त नव्या 40 खेलो इंडिया केंद्रांची सुरुवात

- केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी आज जम्मू काश्मीरच्या गुलमर्ग इथे खेलो इंडिया तिसऱ्या हिवाळी क्रीडा स्पर्धेच्या शुभारंभाची घोषणा केली. यावेळी जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल, मनोज सिन्हा, इतर मान्यवर आणि युवा खेळाडू, प्रशिक्षक आणि इतर कर्मचारी उपस्थित होते.

- या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा अनेक दृष्टिनी आकर्षक आणि वैशिष्ट्यपूर्ण ठरला. शांततेचा संदेश देण्यासाठी आकाशात कबूतरे सोडण्यात आली, तसेच, पारंपरिक नृत्यात, अनेकांचे पाय थिरकले. तसेच, यावेळी 40 खेलो इंडिया ई-केंद्रांचेही उद्घाटन करण्यात आले.
▪️ *भगीरथ UPDATE*

▪️ *लखनौ येथे उत्तर प्रदेश जागतिक गुंतवणूकदार परिषद 2023 चे पंतप्रधानांनी केले उद्घाटन* :

- *चर्चेत का*?  - *सोर्स : PIB*
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  उत्तर 
प्रदेशमध्ये लखनौ इथे जागतिक गुंतवणूकदार परिषद 2023 चे उद्घाटन केले. कार्यक्रमादरम्यान त्यांनी 
जागतिक व्यापार प्रदर्शनाचे उद्घाटन केले आणि इन्व्हेस्ट यूपी 2.0 चा
 शुभारंभ केला. उत्तर प्रदेश जागतिक गुंतवणूकदार परिषद 2023 ही 
उत्तर प्रदेश सरकारची प्रमुख
गुंतवणूक परिषद असून, ही परिषद धोरणकर्ते, औद्योगिक क्षेत्रातील नेते, शिक्षण तज्ञ, विचारवंत आणि जगभरातील नेत्यांना एकत्रितपणे 
व्यवसायाच्या संधी शोधण्यासाठी 
आणि भागीदारी करण्यासाठी एकत्र आणणार आहे. पंतप्रधानांनी यावेळी आयोजित प्रदर्शनालाही भेट दिली.

-या अर्थसंकल्पात प्रस्तावित 10 हजार जैव-इनपुट संसाधन केंद्रांचाही त्यांनी उल्लेख केला. भारतात श्री अन्न असा उल्लेख केल्याजाणार्‍या भरड धान्याचे पौष्टिक मूल्य लक्षात 
घेऊन पंतप्रधानांनी भारताच्या श्री 
अन्नाने जागतिक पोषण सुरक्षेच्या 
गरजा पूर्ण केल्या पाहिजेत यासाठी सरकारचे प्रयत्न अधोरेखित केले. 
- श्री अन्न म्हणजे भरड धान्यापासून
 तयार केलेले, रेडी टू ईट आणि रेडी टू कुक अशा क्षेत्रात, गुंतवणूकदारांना संधी मिळू शकतील.

पार्श्वभूमी :

-10-12 फेब्रुवारी 2023 दरम्यान
 होत असलेली उत्तर प्रदेश जागतिक गुंतवणूकदार शिखर परिषद 2023 ही उत्तर प्रदेश सरकारची एक
 पथदर्शी गुंतवणूक परिषद आहे. या
 परिषदेत, धोरणकर्ते, उद्योग धुरीण,
 अभ्यासक, विचारवंत आणि जगभरातील नेत्यांना एकत्रित 
व्यवसायाच्या संधी शोधण्यासाठी 
आणि भागीदारी करण्यासाठी
 एक व्यासपीठ उपलब्ध होईल.

- इन्व्हेस्टर युपी 2.0 ही उत्तर प्रदेशातील सर्वसमावेशक, गुंतवणूकदार-केंद्री आणि सेवा-केंद्री गुंतवणूक व्यवस्था आहे. या परिषदेतून गुंतवणूकदारांना सर्व संबंधित, निश्चित आणि प्रमाणित सेवा देण्याचा सरकारचा प्रयत्न 
असेल.
▪️भगीरथ UPDATE

▪️पंतप्रधानांच्या हस्ते मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथून मुंबई-सोलापूर वंदे भारत आणि मुंबई-  साईनगर शिर्डी वंदे भारत रेल्वेगाड्यांचा हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ :

- *चर्चेत का*? *सोर्स : PIB*

- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 
मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज 
टर्मिनस इथून दोन वंदे भारत रेल्वेगाड्यांना हिरवा झेंडा दाखवून
रवाना केले. मुंबई-सोलापूर वंदे 
भारत आणि मुंबई-साईनगर शिर्डी वंदे भारत अशा या दोन गाड्या आहेत. तसेच, मुंबईतील सांताक्रूझ-चेंबूर 
लिंक रोड आणि कुरार बोगदा अशा दोन प्रकल्पांचेही त्यांच्या हस्ते लोकार्पण झाले. या दोन रस्ते प्रकल्पांमुळे मुंबईत होणारी वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल.

-आतापर्यंत अशा 10 गाड्या देशभरात सुरू झाल्या आहेत. देशातल्या 17 राज्यांत 108 जिल्ह्यांमधून ह्या वंदे भारत रेल्वेगाड्या सुरू आहेत.

*पार्श्वभूमी*:

-मुंबई-सोलापूर वंदे भारत गाडी ही 
देशातील 9 वी वंदे भारत रेल्वे गाडी आहे. या नवीन जागतिक दर्जाच्या 
रेल्वे गाडीमुळे मुंबई आणि सोलापूर दरम्यानची वाहतूक व्यवस्था सुधारेल आणि सोलापूरमधील सिद्धेश्वर, 
सोलापूरजवळील अक्कलकोट, 
तुळजापूर, पंढरपूर आणि पुण्याजवळील आळंदी या महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांसाठी जाणा-या भाविकांचा प्रवासही सुकर होईल.

-मुंबई-साईनगर-शिर्डी वंदे भारत 
गाडी ही देशातील 10 वी वंदे भारत 
रेल्वे गाडी असून या गाडीमुळे 
नाशिक, त्र्यंबकेश्वर, साईनगर शिर्डी आणि शनी शिंगणापूर या महाराष्ट्रातील महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांबरोबरचा 
संपर्क सुधारेल.
🥇Bhagirath IAS Academy
🟠COMBINE PRELIMS 2023 TEST SERIES
🟠Group B & C
🟠Test.01 अर्थव्यवस्था
🟠Discussion
🟠By - Ranjan Kolambe Sir
🕗 At 11:15 Pm
🗓️ 12 February 2023
📌 या टेस्ट च्या Question ची PDF App वर सकाळी 9 पर्यंत उपलब्ध होईल.
App Link -
🔗https://play.google.com/store/apps/details?id=com.bhagirathias.academy
YouTube Live Session
🔗 https://youtube.com/live/ooUVN6g6Bm8
🛑MPSC Mock Interview
🔸BHAGIRATH IAS ACADEMY
--------------------------
🗓️12 February 2023
🕗 8:00 Pm
--------------------------
📍Venue- Bhagirath IAS Academy, 2nd Floor, Kesari Wada, Pune
--------------------------
By - *कपिल पवार सर*
नागपूर महानगर विकास प्राधिकरणाचे उपसंचालक,
वित्त व लेखाधिकारी
--------------------------
अधिक माहिती साठी संपर्क साधा -
☎️ 9970298197 / 9090906777
▪️भगीरथ दिनविशेष : 12 फेब्रुवारी

१५०२: लिस्बन, पोर्तुगाल येथून वास्को-द-गामा भारताच्या दुसर्‍या सफरीवर निघाला.

१९२२: महात्मा गांधीनी असहयोग आंदोलन वापस घ्यायची घोषणा केली.

१९२८: गुजरात च्या बारदोली येथे महात्मा गांधी यांनी सत्याग्रह करण्याची घोषणा केली.

१९९३: एम. एन. वेंकटचलैय्या यांनी भारताचे २५ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

२००३: आवाजापेक्षा दुप्पट वेगवान ब्राह्मोस क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेण्यात आली.

२००३: आवाजापेक्षा दुप्पट वेगवान ब्राह्मोस क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेण्यात आली.

▪️जन्मदिवस :

- १८०९: अब्राहम लिंकन – अमेरिकेचे १६ वे राष्ट्राध्यक्ष

- १८०९: चार्ल्स डार्विन – उत्क्रांतीवादाचा सिद्धांत मांडणारे ब्रिटिश जीवशास्त्रज्ञ

- १८२४: मूळशंकर करसनदास तिवारी तथा स्वामी दयानंद सरस्वती – संस्कृत विद्वान आणि आर्य समाजाचे संस्थापक