Bhagirath Academy Pune
41K subscribers
6.05K photos
119 videos
624 files
1.31K links
For: UPSC & MPSC STUDY MATERIAL....

OUR MISSION :
“ To churn out ethically-sound and morality-bound civil servants.”

Contact : 9970298197 / 9090906777
Download Telegram
🟥🔸भगीरथ UPDATE 🔸🟥

🟡 जागतिक व्याघ्र दिन : २९ जुलै

🟡 जागतिक व्याघ्र दिन दरवर्षी २९ जुलै रोजी जगभर साजरा केला जातो. २९ जुलै २०१० रोजी रशिया मधील सेंट पीटर्सबर्ग येथे भरलेल्या व्याघ्र परिषदेत हा
दिवस जागतिक व्याघ्र दिन म्हणून घोषित करण्यात आला.

🟡 दरवर्षी २९ जुलै रोजी वाघ संवर्धनासाठी जागृती करण्यासाठी आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन साजरा केला जातो. वाघांच्या नैसर्गिक निवासस्थानाचे संरक्षण करण्यासाठी जागतिक यंत्रणेला चालना देणे आणि व्याघ्र संवर्धनासाठी जनजागृती करणे हे प्राथमिक लक्ष्य आहे. शिकार आणि बेकायदेशीर व्यापार तसेच अधिवास गमावल्यामुळे वाघांची संख्या सातत्याने कमी होत आहे.
➡️आंतरराष्ट्रीय दिन दरवर्षी “त्यांचे अस्तित्व आमच्या हातात आहे” या घोषणेने किंवा थीमने साजरा केला जातो. वाघाची घटती संख्या आणि जगभरात वाघांचे संवर्धन करणे हे मुख्य उद्दीष्ट आहे. जागतिक वन्यजीव निधी (WWF) च्या मते जागतिक पातळीवर फक्त ३९०० एवढेचं वाघ शिल्लक आहेत. २० व्या शतकाच्या सुरूवातीपासूनच वाघांची संख्या कमी होण्यास सुरुवात झाली. याच एक मुख्य कारण शिकार आहे.
➡️पंतप्रधानांनी जाहीर केलेल्या वाघाच्या अहवालानुसार भारतातील वाघांची संख्या २९६७ एवढी आहे. देशाची जागतिक स्तरावर आतापर्यंतची सर्वाधिक वाघांची संख्या आहे. प्रोजेक्ट टायगरची सुरूवातही १९७३ साली झाली. सध्याच्या परिस्थितीत प्रकल्प टायगर अंतर्गत नियोजित प्रयत्नांमुळे जगातील सर्वाधिक वाघ भारतात आहेत.
🔸🟥भगीरथ UPDATE 🟥🔸

🟡भारतात 44 व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेची सुरुवात

➡️ बुद्धिबळाची सर्वात प्रतिष्ठित स्पर्धा भारतात

➡️बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेचे यजमानपद भारत प्रथमच भूषवित आहे

➡️ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 28 जुलै रोजी चेन्नई येथील जेएलएन इनडोअर स्टेडीयम मध्ये 44 व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेची सुरुवात झाल्याची घोषणा केली.

➡️ तामिळनाडूचे राज्यपाल आर.एन.रवी

➡️ तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के.स्टॅलिन

➡️ केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग सिंह ठाकूर

➡️ तसेच केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री एल. मुरुगन यांच्यासह

➡️ एफआयडीई अर्थात आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाचे अध्यक्ष अर्केडी वोर्कोव्हीच हे देखील यावेळी उपस्थित होते.

➡️ यावेळी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधानांनी जगभरातून भारतात आलेल्या खेळाडूंचे आणि बुद्धिबळ प्रेमींचे स्वागत केले. ही स्पर्धा ‘स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा’दरम्यान होत असल्यामुळे या स्पर्धेच्या आयोजनाच्या काळाच्या महत्त्वाकडे त्यांनी सर्वांचे लक्ष वेधले.

➡️ 44वी बुद्धिबळ ऑलिम्पियाड ही स्पर्धा प्रथमच घडणाऱ्या अनेक गोष्टींची आणि अनेक विक्रमांची साक्षीदार असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. बुद्धिबळ खेळाचा उगम जेथे झाला त्या भारत देशात पहिल्यांदाच बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेचे आयोजन होते आहे. 3 दशकानंतर ही स्पर्धा आशिया खंडात भरविली गेली आहे.
➡️आतापर्यंतच्या काळात  सर्वात जास्त संख्येने देश या स्पर्धेत सहभागी होत आहेत. तसेच सर्वात जास्त संघ या स्पर्धेत खेळणार आहेत

➡️ केंद्रीय मंत्री म्हणाले की 40 दिवसांपूर्वी बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेची सर्वात पहिली मशाल रिले पंतप्रधानांकडे सुपूर्द करण्यात आली आणि त्यांनी ती मशाल आपल्या देशाचा जगप्रसिध्द बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद यांच्याकडे सोपविली.

➡️ आपल्या देशाच्या स्वातंत्र्यप्राप्तीला 75 वर्षे होत असल्याबद्दल साजऱ्या होणाऱ्या अमृतमहोत्सवानिमित्त मशाल रिलेने देशातील विशेष महत्त्वाच्या 75 स्थळांना भेट दिली असे ठाकूर यांनी सांगितले.

🟣 पार्श्वभूमी :

➡️ पंतप्रधानांनी 19 जून 2022 रोजी नवी दिल्ली येथील इंदिरा गांधी राष्ट्रीय स्टेडीयम येथे पहिल्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धा मशाल रिलेची देखील सुरुवात केली होती. या मशालीने 40 दिवसांहून अधिक कालावधीत देशभरातील 75 विशेष महत्त्वाच्या ठिकाणांना भेट देत, सुमारे 20,000 किलोमीटर्सची वाटचाल केली आणि या मशालीचा हा प्रवास महाबलीपुरम येथे समाप्त झाला. त्यानंतर या मशालीने स्वित्झर्लंडच्या एफआयडीई मुख्यालयाकडे कूच केले. 

➡️चेन्नई येथे 28 जुलै ते 9 ऑगस्ट या कालावधीत 44 व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडचे आयोजन करण्यात आले आहे. वर्ष 1927 पासून आयोजित होत असलेल्या या प्रतिष्ठित स्पर्धेच्या यजमानपदाचा मान भारताला यावर्षी पहिल्यांदाच आणि आशियाला 30 वर्षानंतर मिळाला आहे. आतापर्यंतच्या सर्वाधिक संख्येने म्हणजे 187 देश या वर्षीच्या स्पर्धेमध्ये भाग घेत आहेत. भारत देखील आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या क्रीडापथकासह म्हणजे 6 संघांमध्ये विभागलेल्या एकूण 30 खेळाडूंसह या स्पर्धेत सहभागी होत आहे.
🟥 भगीरथ UPDATE 🟥

🟣 केरळ सरकार ऑगस्टमध्ये ऑनलाइन कॅब सेवा 'केरळ सावरी' सुरू करणार

🟡 लोकप्रिय कॉर्पोरेट ऑनलाइन कॅब सेवेला पर्याय म्हणून केरळ सरकार पुढील महिन्यापासून स्वतःची ई-टॅक्सी सेवा सुरू करण्यासाठी सज्ज आहे.

🟡 देशातील कोणत्याही राज्य सरकारकडून अशा प्रकारचा हा पहिलाच उपक्रम असल्याचे मानले जात आहे.

🟡 राज्य कामगार विभाग 'केरळ सावरी' नावाची ऑनलाइन टॅक्सी भाड्याने देणारी सेवा सुरू करत आहे, जी राज्यातील विद्यमान ऑटो-टॅक्सी नेटवर्कला जोडते. राज्यामध्ये प्रचलित असलेल्या परवडणाऱ्या दरांमध्ये जनतेसाठी सुरक्षित आणि विवादमुक्त प्रवास सुनिश्चित करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे.
🟡डॉ. अपूर्वा पालकर यांची महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या प्रथम कुलगुरूपदी नियुक्ती

➡️ डॉ. अपूर्व पालकर यांची महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचे पहिले कुलगुरू (VC) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नवोपक्रम मंत्रालयाने यासंदर्भात आदेश जारी केला.

➡️ डॉ. पालकर सध्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (SPPU) सेंटर फॉर इनोव्हेशन, इनक्युबेशन अँड लिंकेजेसचे संचालक म्हणून कार्यरत आहेत. डॉ. पालकर यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (IIM), अहमदाबाद येथून व्यवसाय प्रशासनात पदवी प्राप्त केली. त्या दोन दशकांहून अधिक काळ व्यवसाय प्रशासनाच्या क्षेत्रात अध्यापन आणि संशोधन करत आहेत.

➡️ व्यवस्थापन विज्ञान अभ्यासक्रमांसाठी अखिल भारतीय प्रवेश परीक्षा आयोजित करणाऱ्या समितीच्या प्रमुख म्हणूनही त्या सक्रिय होत्या. राज्य सरकारने स्थापन केलेल्या शिक्षण समित्यांमध्येही डॉ. पालकर यांचा सहभाग आहे. सकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून डॉ पालकर यांनी काम पाहिले होते. याच काळात तिला प्रतिष्ठित रवी जे मथाई राष्ट्रीय फेलोशिप पुरस्कार मिळाला. ही निवड पुढील दोन वर्षांसाठी करण्यात आली आहे.

➡️ 2017 मध्ये, तत्कालीन केंद्रीय कौशल्य आणि उद्योजकता विकास राज्यमंत्री राजवी प्रताप रुधी यांनी महाराष्ट्रात देशातील पहिले कौशल्य विद्यापीठ स्थापन करण्याची घोषणा केली. तेव्हापासून प्रलंबित असलेला Skilled University Act, 14 एप्रिल 2021 रोजी लागू करण्यात आला. अखेर, या विद्यापीठाला डॉ. पालकर यांच्या रूपाने पहिला कुलगुरू मिळाला आहे.

➡️ राज्यातील तरुणांना एकात्मिक, सर्वांगीण कौशल्य प्रशिक्षण देण्यासाठी आणि राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त कौशल्य-आधारित उच्च शिक्षणाद्वारे त्यांना रोजगारक्षम बनवण्यासाठी राज्यात महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ (सार्वजनिक-अनुदानीत) स्थापन करण्यात आले आहे.

➡️ महाराष्ट्रातील औद्योगिक समूहांचे मोठे जाळे आणि रोजगाराच्या मोठ्या संधींचा विचार करता राज्यात सार्वजनिक कौशल्य विद्यापीठ स्थापन करणे आवश्यक होते. उद्योगांच्या मागणीनुसार तांत्रिक क्षमता आणि विविध कुशल मनुष्यबळ निर्माण करणे हा कौशल्य विद्यापीठाच्या स्थापनेचा उद्देश आहे.
🔹🟣 भगीरथ UPDATE 🟣🔹

🟡 भारतीय नौदलाला 'विक्रांत' ही विमानवाहू नौका मिळाली

➡️कोचीन शिपयार्ड लिमिटेडने (CSL) गुरुवारी (ता. २८) स्वदेशी बनावटीची विमानवाहू (Aircraft) नौका विक्रांत नौदलाकडे (Indian Navy) सुपूर्द केली आहे. विक्रांतची रचना नौदलाच्या इंटिरिअर डायरेक्टरेट ऑफ नेव्हल डिझाईनने केली आहे. ही देशातील पहिली स्वदेशी बनावटीची विमानवाहू युद्धनौका (IAC-१) भारतीय नौदलाला सोपवण्यात आली आहे.

➡️१९७१ च्या युद्धात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या भारतीय नौदल जहाज (INS) विक्रांतच्या (Vikrant) नावावरून हे नाव देण्यात आले आहे. ऑगस्टमध्ये अधिकृतपणे नौदलात (Indian Navy) सामील होऊ शकते. IACच्या समावेशामुळे हिंद महासागर क्षेत्रात (IOR) देशाची स्थिती आणखी मजबूत होईल. CSLने एका प्रसिद्धिपत्रकात विमानवाहू जहाज सुपूर्द केल्याची पुष्टी केली आहे.

➡️ही भारतातील आतापर्यंतची सर्वांत मोठी युद्धनौका (Aircraft) आहे. वजन सुमारे ४५,००० टन आहे. याला देशातील सर्वांत महत्त्वाकांक्षी नौदल जहाज प्रकल्प देखील मानले जाते. भारताची पहिली विमानवाहू युद्धनौकेने १९७१च्या युद्धात महत्त्वाची भूमिका बजावणारी होती. त्याच्या नावावर IACचे नाव ठेवण्यात आले आहे. विक्रांतच्या पुनर्जन्माच्या निमित्ताने ‘आझादी का अमृत महोत्सव’ हा सागरी सुरक्षा बळकट करण्याच्या दिशेने क्षमता निर्माण करण्याच्या देशाच्या उत्साहाचा खरा पुरावा आहे.८८ मेगावॅटची ऊर्जा मिळेलनवीन जहाज २६२ मीटर लांब आणि अधिक प्रगत आहे. याला चार गॅस टर्बाइनद्वारे एकूण ८८ मेगावॅटची ऊर्जा मिळेल. या जहाजाचा कमाल वेग २८ ‘नोट्स’ आहे. सुमारे २०,००० कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प संरक्षण मंत्रालय आणि CSL यांच्यातील करारासह तीन टप्प्यांत पुढे गेला.

➡️७६ टक्के स्वदेशी साहित्य वापरलेIAC तयार करण्यासाठी एकूण ७६ टक्के स्वदेशी साहित्य वापरण्यात आले आहे. जे देशाच्या ‘आत्मनिर्भर भारत’ मोहिमेचे उत्तम उदाहरण आहे. सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाला चालना देते, असे प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे.
🟣🔹भगीरथ UPDATE 🔹🟣

🟡 न्यूझीलंडमध्ये जगातील पहिले तंबाखू विरोधी विधेयक सादर करण्यात आले

➡️ न्यूझीलंडमध्ये नवीन नियम बनवले आहेत. आतापासून न्यूझीलंडमध्ये १८ वर्षांचे असले तरी कोणीही सिगारेट ओढू शकणार नाही. असा नवा नियम त्या देशात निर्माण झाला आहे. हा कायदा लागू करण्यासाठी न्यूझीलंड सरकारने नवीन विधेयक आणले आहे. न्यूझीलंडच्या नवीन कायद्याने तरुण पिढीला कायदेशीररित्या सिगारेट खरेदी करण्यास बंदी घातली आहे. भावी पिढ्या वयाच्या १८ व्या वर्षीही धूम्रपान करू शकणार नाहीत. यावर न्यूझीलंडच्या सर्व खासदारांचे एकमत झाले आहे.
🟥 भगीरथ दिनविशेष 31 जुलै 🟥

🟣 १४९८: पश्चिम गोलार्धात तिसरा प्रवास करताना ख्रिस्तोफर कोलंबस हे त्रिनिदाद बेटांचा शोध लावणारे पहिले युपोपीय ठरले.

🟣 १६५८ : औरंगजेब मुघल सम्राट बनला.

🟣 १९३३: महात्मा गांधी यांनी साबरमती आश्रम सोडला.

🟣 १९५६ : कसोटी सामन्यातील एका डावात सर्व १० गडी बाद करण्याचा विक्रम करणारा जिम लेकर हा पहिला गोलंदाज बनला. या कसोटी सामन्यात त्याने १९ बळी घेतले.

🟣 १९९२ : भारत रत्न पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय सतारवादक पं. रविशंकर यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर

🟡 स्मृतिदिन👇👇

🟣 १८६५ : जगन्नाथ ऊर्फ ’नाना’ शंकरशेठ – दानशूर व शिक्षणतज्ञ, आधुनिक मुंबईचे शिल्पकार (जन्म: १० फेब्रुवारी १८०३)

🟣 १९४०: भारतीय कार्यकर्ते उधम सिंग यांचे निधन. (जन्म: २८ डिसेंबर १८९९)
🟥🔸भगीरथ UPDATE 🔸🟥

🟡 सेमीकंडक्टर पॉलिसी लाँच करणारे गुजरात हे भारतातील पहिले राज्य

➡️ एक मोठा निर्णय घेत, गुजरात सरकारने राज्यात 'गुजरात सेमीकंडक्टर धोरण 2022-07' जाहीर केले. तांत्रिक क्रांतीच्या दिशेने मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या सरकारचे हे मोठे पाऊल आहे. यावेळी बोलताना विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री श्री वाघानी म्हणाले की, सेमीकंडक्टर आणि डिस्प्ले उत्पादन क्षेत्रात सहाय्यासाठी समर्पित धोरण जाहीर करणारे गुजरात हे पहिले राज्य ठरले आहे.

➡️ 'गुजरात सेमीकंडक्टर धोरण 2022-27' हे राज्यातील स्थानिक स्तरावर सेमीकंडक्टर चिप उत्पादन क्षेत्रातील जलद आणि सर्वसमावेशक वाढीस प्रोत्साहन देण्याच्या वचनबद्धतेसह जाहीर करण्यात आले आहे.

➡️ येत्या पाच वर्षांत या धोरणाद्वारे सुमारे दोन लाख नोकऱ्या निर्माण होण्याची अपेक्षा आहे.
🟥🔸भगीरथ UPDATE 🔸🟥

🟡मीराबाई चानू CWG मध्ये जिंकले : सुवर्णपदक
Forwarded from Bhagirath Academy Pune (Surajkumar Patil)
🔸🟥 भगीरथ दिनविशेष 1 ऑगस्ट 🔸🟥

🟡१९१४ : पहिले महायुद्ध – जर्मनीने रशियाविरुद्ध युद्ध पुकारले

🟡१९२०: असहकार चळवळ प्रारंभ

🟡१९२०: महात्मा गांधी यांनी जालियनवाला बाग हत्याकांड घटनेमुळे दु:खी होऊन इंग्रज सरकारने दिलेला ‘केसर ए हिंद’ हा किताब वापस केला.

🟡१९४७: भारत पाकिस्तानच्या फाळणी नंतर लॉर्ड माउंटबॅटन(Louis Mountbatten) हे भारताचे गव्हर्नर जनरल बनले तर मोहम्मद अली जिन्ना हे पाकिस्तानचे गव्हर्नर जनरल बनले.

🟡१९५६: दुर्बा बॅनर्जी या इंडियन एअरलाइन्सच्या तसचं भारतातील पहिल्या महिला वैमानिक बनल्या.

🟡 १९५८: आचार्य विनोबा भावे यांना रॅमन मॅग्सेसे पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.

🟡 २००४ : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापुर विद्यापीठाची स्थापना झाली. ३ ऑगस्ट २००४ रोजी या विद्यापीठाचे औपचारिक उद्‍घाटन झाले.

🟡 जन्मदिवस👇👇

🟡 १९२० : ’लोकशाहीर’ अण्णाणाऊ साठे – लेखक, कवी व समाजसुधारक (मृत्यू: १८ जुलै १९६९)

🟡स्मृतिदिन👇👇

🟣१९२० : लोकमान्य बाळ (केशव) गंगाधर टिळक – समाजसुधारक आणि प्रखर राष्ट्रवादी, भगव्‌दगीतेचे भाष्यकार (जन्म: २३ जुलै १८५६ – रत्‍नागिरी)
Photo from Rutuj Kolambe
Photo from ☺️