विचारवेध VicharVedh
127 subscribers
14 photos
1 video
1 file
100 links
विचारवेध हि एक वैचारिक चळवळ आहे. विचार करण्याचे स्वातंत्र्य आणि विचारांची अभिव्यक्ती करण्याचा अधिकार यांचे रक्षण करण्यासाठी विचारवेध प्रयत्नशील आहे. सामाजिक, वैचारिक, आर्थिक, शैक्षणिक, राजकीय विषयांवरील भाषणे विचारवेध यूट्यूब चॅनेल वर प्रसारित केली जातात.
Download Telegram
१ फेब्रुवारी २०२१ रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यावर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. हा अर्थ संकल्प नक्की कोणासाठी आहे? यात महिलांसाठी काय वेगळी तरतूद केली आहे, ती कोणत्या दृष्टीकोंनातून केली आहे? अर्थमंत्री या स्वतः महिला असून सुद्धा स्त्री म्हणजे चूल आणि मूल हाच संकुचित दृष्टीकोन याही अर्थसंकल्पात दिसतो का? या प्रश्नांचा आढावा अर्थतज्ञ किरण मोघे यांनी घेतला आहे. जरूर पहा आणि इतरांनाही नक्की पाठवा.

https://youtu.be/lGWHeFI1YsQ
विचारवेधच्या नव्या उपक्रमातील ही पहिली Short Film नक्की पहा, शेअर करा आणि आपल्या प्रतिक्रिया कळवा.

जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा!

https://youtu.be/cPoepaHFqEw
कोविडविरुद्धच्या लसीकरणाचा दूसरा टप्पा आता सुरू झाला आहे, ज्यात ज्येष्ठ नागरिक आणि काही ठराविक आजार असलेल्या नागरिकांना ही लस दिली जात आहे. परंतु अजूनही या लसीबद्दल काही गैरसमज, शंका आणि प्रश्न उपस्थित होताना दिसतात. याच काही प्रश्नांचे शंकानिरसन डॉ. अनंत फडके यांनी या व्हिडिओद्वारे केले आहे. जरूर पहा आणि इतरांनाही सांगा.

https://youtu.be/tRyZP7z-RX0
Gender bias and gender discrimination is prevalent in all cultures and societies across the world. As a result of this, it has also sneaked up into our technologies, aggravating the gender divide. Vivek Sawant, in this two part series, provides a historical perspective to understand this phenomenon. What is gender bias? How it still continues to affect our technologies? To learn the answers to these questions, do listen to this first part and also share it widely.

Speaker: Vivek Sawant
https://youtu.be/qple3oSPhes
Why Inter-disciplinary sciences don’t thrive in India? In this video, Uttara Nagchoudhuri asks this vital question about the nature of collaboration in science departments in Indian institutes. She also presents her hypothesis to answer this question. Do listen, like, comment and share.

Link: https://youtu.be/OOs8HhYH1nA
स्वप्नील लोणकर या MPSC ची परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्याने 4 जुलै रोजी आत्महत्या केली ही बातमी आपण पहिली असेलच. दुर्दैवाने असा जीव गमवावा लागलेल्या विद्यार्थ्यांमध्ये स्वप्नील हा एकटाच नाहीये. २०१८ मध्ये विचारवेधने MPSC चा अभ्यास करणार्‍या विद्यार्थांची पाहणी केली होती, त्यातून समोर आलेली माहिती मांडणारा हा व्हिडिओ आज आम्ही पुन्हा प्रकाशित करत आहोत. नक्की पहा, शेअर करा आणि यावर गांभीर्याने विचार करा.
Link - https://youtu.be/vqXI7-lzDXs
भारतातील सर्व धर्मांतील बहुसंख्य लोक- ‘आंतरजातीय विवाह थांबवले पाहिजेत,’ या विधानाशी सहमती दर्शवतात, हे ‘प्यू रिसर्च सेंटर’ या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणातून दिसून येते. याचा अर्थ, समाजसुधारकांचे प्रयत्न फारच अपुरे ठरले? की आंतरजातीय विवाहांच्या प्रसारासाठी नव्या प्रकारच्या प्रयत्नांची गरज आहे? वाचा आनंद करंदीकर यांचा नवा लेख.

http://www.vicharvedh.org/blog/majority-in-india-oppose-intercaste-and-interfaith-marriage-pew-research-findings
नमस्कार,
विचारवेध हे वैचारिक घुसळण करण्याचे व्यासपीठ आहे. विचारवेध तर्फे माध्यम संवादक (Media Communicator) प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करत आहोत, त्याबद्दल माहिती:

जनसामान्यांचे प्रश्न टोकदारपणे मांडण्यासाठी तसेच आपली मते व्यक्त करण्यासाठी आजच्या काळात बहुविध समाज माध्यमे (social media) सहज उपलब्ध आहेत. त्यांचा सुयोग्य व प्रगल्भ वापर करणारे “माध्यम संवादक” निर्माण करणे हा या कार्यशाळेचा उद्देश आहे. कार्यकर्ते, नवे लेखक, ब्लॉगर्स, महाविद्यालयीन विद्यार्थी, आणि जागरूक नागरिक यांना या कार्यशाळेत आमंत्रण आहे.
तीन सत्रांमधे ही कार्यशाळा मराठीतून होईल. यात कृती सराव आणि लेखन सराव यांचा समावेश असेल. खात्रीशीर प्रवेश मिळण्यासाठी आधी नावनोंदणी करणे आवश्यक आहे. कार्यशाळेत मर्यादित १०० जागा आहेत.

प्रशिक्षक: संदीप मसहूर (लेखक, गेली तीन दशके सामाजिक क्षेत्रात सक्रीय आणि माध्यम सजगता Media Advocacy जाणकार)

दिनांक व वेळ: ३१ जुलै, १ ऑगस्ट आणि ७ ऑगस्ट तीन दिवस संध्याकाळी ६ ते ७.३०

नावनोंदणी येथे करावी: https://forms.gle/m5T2zJMq73PE73cZ9

नावनोंदणी साठी अंतिम तारीख: ३० जुलै २०२१

Google Meet लिंक: https://meet.google.com/rrw-kjbg-vza

प्रमाणपत्र मिळेल.

अधिक माहिती करिता संपर्क: गौरव – 9359454023, अनिकेत – 8796405429, 9356614300, सचिन – 9833977166.
ईमेल: vicharvedhindia@gmail.com
२०२० मध्ये मोदी सरकारने नवे शैक्षणिक धोरण प्रसिद्ध करून लागू केले. पण या धोरणातील ऑनलाइन शिक्षणाबद्दलचा भाग नंतर घातला असून, त्यावरच जास्त भर दिला जातोय असे दिसत आहे. हा प्रकार कसा फसवा आहे याबद्दल अरविंद वैद्य यांनी सविस्तर विवेचन केले आहे. नक्की ऐका आणि share करा.

Link - https://youtu.be/C-t-r_duTJg
*विचारवेध चर्चागटात सहभागी होण्याचे आवाहन...*

प्रिय विचारवेधी,
कोरोनामुळे बंद पडलेला चर्चागट हा उपक्रम आता online स्वरुपात पुन्हा सुरू करत आहोत. विचारवेध Youtube वरील एक भाषण (विचारवेचा) बघून त्यावर सखोल चर्चा करणे असे याचे स्वरूप आहे. ठराविक 20 ते 25 जणांचा एक गट दर आठवड्याला ठरलेल्या दिवशी आणि वेळी भेटून चर्चा करेल. जे नियमितपणे या चर्चागटांमध्ये सहभाग घेऊ इच्छितात त्यांनी खालील link वर आपले नाव नोंदवावे. एका गटात जास्तीत जास्त 25 सहभागी असतील.

Registration: https://forms.gle/xfGgDiDK7rgpMBvc6

यातील पहिला चर्चागट शनिवारी दिनांक *21 ऑगस्ट 2021* रोजी आयोजित केला आहे. पुढील दर शनिवारी नव्या विषयावर हा चर्चागट सुरू राहील.

*वेळ: संध्याकाळी 4 ते 5*

पहिल्या 4 चर्चागटांचे विषय:

1) नवे शैक्षणिक धोरण फसवे? – अरविंद वैद्य - https://youtu.be/C-t-r_duTJg

2) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भारताच्या घटनासमितीतील पहिले भाषण...आणि आजचा संदर्भ - https://youtu.be/is9ZfF8yCkY

3) पोंर्न आणि मी – आभास केसकर - https://youtu.be/PUhKwJkj7EY

4) बौद्ध धर्म आणि सनातनी हिंदू – आनंद करंदीकर - https://youtu.be/eGjY-NhbCKQ

Google Meet Link: https://meet.google.com/gqe-fbov-bev

चर्चागटात भाग घेण्यापूर्वी ठरलेल्या विषयावरील विचारवेचा पाहणे आवश्यक व तसेच youtube आपली प्रतिक्रियाही नोंदवावी ही विनंती.