Tricks Guru राजेश मेशे सर
20.6K subscribers
4.29K photos
92 videos
600 files
3.03K links
👌 सर्व विषयांचे ट्रिक्स बुक 👌

Subscribe Youtube Trick channel :
http://www.youtube.com/channel/UCQVRqUPr8DUfc7uf21kuXBA

लेखक : राजेश मेशे सर - 7276771791

Created by - @RajeshMeshe

सर्व विषयांचे ट्रिक्स बुक बाजारात उपलब्ध आहेत
Download Telegram
♻️ वाचा :- चालू घडामोडी (जुलै २०२०
------------------------------------------------

• ..................या राज्यातील ‘पोबा’ राखीव वनाला ‘वन्यजीव अभयारण्य’चा दर्जामिळाला आहे. - आसाम.

• कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडकडून बांधला जाणारा आणि जम्मू व काश्मीरमधील कटरा आणि रियासी गावांना जोडणारा भारतातील पहिला तारांवर उभारलेला रेल्वे पूल............... हा होय - अंजी खाड पूल.

• ICARचा ‘स्वामी सहजानंद सरस्वती सर्वोत्कृष्ट विस्तार वैज्ञानिक पुरस्कार 2020’चे विजेता - डॉ बी.एस. सोनटक्की (NAARM).

• ‘FIFA विश्व चषक 2022’ ................ या देशात आयोजित केली जाणार आहे - कतार (अरब प्रांतात प्रथमच).

• .................या राज्य सरकारने विद्यार्थ्यांना अॅनिमेशन व्हिडिओंद्वारे ऑनलाईन शिक्षण देण्यासाठी मोहीम सुरू केली आहे - पंजाब.

• नवे स्टॉक एक्सचेंज मंच जे भारतातील सामाजिक आणि स्वयंसेवी संस्थांना सूचीबद्ध करण्यास परवानगी देणार आहे - सोशल स्टॉक एक्सचेंज (SSE).

• देश आणि विदेशात बौद्धिक संपदेसाठी अर्ज करण्याच्या बाबतीत भारताचा क्रमांक.............. वा लागतो. – 7 वा (प्रथम: चीन; द्वितीय: अमेरिका).

• जागतिक आरोग्य संघटनेनुसार देशात दररोज दर दशलक्ष लोकसंख्येसाठी............. चाचण्या करणे आवश्यक आहेत - 140.

• ‘2020 शक्ती भट्ट पुरस्कार’चे संयुक्त विजेते ................. हे आहेत - आनंद तेलतुंबडे आणि गौतम नवलखा.

• ...............या केंद्रशासित प्रदेशात ग्रामीण उद्योजकतेद्वारे आत्मनिर्भर भारत ही संकल्पना मजबूत करण्यासाठी NABARD ने 15 जुलै रोजी एकूण 44 लक्ष रुपयांच्या विकास प्रकल्पांची सुरुवात केली - अंदमान व निकोबार.

• ...............या राज्यात माजी मुख्यमंत्री के. कामराज यांची 117वी जयंती 15 जुलै 2020 रोजी ‘शालेय शिक्षण दिन’ म्हणून पाळली गेली - तामिळनाडू.

• ‘अल्ट्रा मेगा अक्षय ऊर्जा सौर उद्यान’ योजनेच्या अनुषंगाने, महाराष्ट्र राज्य विद्युत उत्पादन कंपनी (महाजेनको)

• .............या ठिकाणी एकूण 2500 मेगावॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारणार आहे. - साक्री, धुळे जिल्हा.

https://youtu.be/HXGC0ExB_NU
🔴🔴 प्रचंड प्रचंड प्रचंड प्रचंड प्रचंड प्रचंड प्रचंड प्रचंड प्रचंड प्रचंड प्रचंड प्रचंड प्रचंड प्रचंड प्रचंड प्रचंड प्रतिसाद दिल्याबद्दल तुम्हा सर्व विध्यार्थी मित्रांचे खूप खूप खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏

👌 स्पर्धा परीक्षांसाठी अत्यावश्यक पुस्तके 👆

😎 शॉर्ट ट्रिक्स पुस्तके, एकदा वाचून पहा

लेखक - राजेश मेशे सर 7276771791
---------------------------------------------------------
👇👇👇ऑनलाइन ऑर्डर करा👇👇👇

https://www.flipkart.com/search?q=rajesh+meshe+books

https://www.amazon.in/s?k=rajesh+meshe&sprefix=rajesh
---------------------------------------------------------
⭕️ आजच जवळील बुक सेंटरला भेटा ⭕️
---------------------------------------------------------
👌 तुकाराम मुंडे सरांचे मार्गदर्शन -भाग 1

आवडले तर तुमच्या मित्रांना share करा 🙏

स्पर्धा परीक्षा करणाऱ्या प्रत्येक विध्यार्थी ने पाहावे 👇👇👇👇

https://youtu.be/7WHVDLzsZ7c
https://youtu.be/7WHVDLzsZ7c
♻️ बोधकथा नक्की वाचा :- प्रोफेसरने भांड्यात पाणी टाकून त्यामध्ये बेडूक टाकले, यानंतर ते भांडे तापायला ठेवले, पाणी गरम झाल्यानंतर बेडकाचे काय झाले, प्रोफेसरने असे का केले ⁉️

😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊


रिलिजन डेस्क. एका कॉलेजमध्ये फिलॉसफीचे एक प्रोफेसर शिकवायचे. ते वेगवेगळ्या पध्दतींनी विद्यार्थ्यांना आयुष्यातील लहान-लहान गोष्टी समजावण्याचा प्रयत्न करायचे. एक दिवस प्रोफेसरने आपल्या सर्व विद्यार्थ्यांना बोलावले आणि म्हणाले की, आज मी तुम्हाला एक खुप महत्त्वपुर्ण गोष्ट समजावणार आहे.
- सर्व विद्यार्थी लक्षपुर्वक प्रोफेसरचे ऐकत होते. प्रोफेसरने पाण्याने भरलेले एक भांडे घेतले आणि त्यामध्ये बेडूक टाकले. पाण्यात जाताच बेडूक आरामात पोहू लागले. यानंतर प्रोफेसरने ते भांडे तापायला ठेवले.
- भांड्यातील पाणी हळुहळू गरम होत होते. भांड्यामध्ये जे बेडूक होते ते पाण्याच्या वाढत्या तापमानानुसार स्वतःला अॅडजस्ट करत होते. हळुहळू पाणी जास्त गरम होत पण बेडकाला काहीच फरक पडत नव्हता. तो स्वतःला तापमानानुसार तयार करत होता.
- काही वेळानंतर पाण्याचे तापमान वाढले आणि पाणी उकळू लागले. तेव्हा बेडकाचीही सहनशक्ती संपली. त्याला त्या भांड्यात थांबणे कठीण झाले. तेव्हा बेडकाने उडी मारुन भांड्याबाहेर येण्याचा प्रयत्न केला.
- बेडकाने पुर्ण शक्ती लावूनही त्याला त्या भांड्यातून बाहेर पडता आले नाही. प्रोफेसरने तात्काळ त्या बेडकाला बाहेर काढले आणि विद्यार्थ्यांना काही प्रश्न विचारले. प्रोफेसरने विद्यार्थ्यांना विचारले की, बेडूक भांड्याबाहेर उडी का मारु शकले नाही?
- सर्वांनी वेगवेगळे उत्तर दिले. तेव्हा प्रोफेसर म्हणाले - बेडूकाची इच्छा असती तर तो मी पाणी तापायला ठेवल्याबरोर बाहेर येऊ शकत होता. पण बेडूक स्वतःला वातावरणानुसार अॅडजस्ट करण्याचा प्रयत्न करत होता, जेवढे तो सहन करु शकत होता तेवढे त्याने केले.
- पण जेव्हा त्याला वाटले की, जीव वाचवण्यासाठी बाहेर पडावेच लागेल, तेव्हा तो उडी मारु शकला नाही, कारण त्याने अॅडजस्ट होण्याच्या प्रयत्नात त्याची सर्व एनर्जी नष्ट झाली होती. जर मी त्याला बाहेर काढले नसते, तर बेडूक मरुन गेले असते.

🌷लाइफ मॅनेजमेंट
प्रोफेसरने आपल्या विद्यार्थ्यांना ऐकवले की, सर्व लोकांसोबत असेच होते.
आपण नेहमी आपल्या परिस्थितीशी मिळवून घेतो. पण त्यामधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत नाही.
पण जेव्हा आपण पुर्णपणे परिस्थितींमध्ये अडकतो तेव्हा आपल्याला वाटते की, मी योग्य वेळी बाहेर पडायला पाहिजे होतो. पण तोपर्यंत वेळ गेलेली असते.
या कथेमधील बोध म्हणजे योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची कला म्हणजेच जीवन जगण्याची कला होय.

https://youtu.be/7WHVDLzsZ7c
https://youtu.be/7WHVDLzsZ7c
1)अति मद्य सेवनामुळे ….. या जीवनसत्वाचा अभाव निर्माण होवून पेलाग्रा हा विकार जडतो.

बी-1 👈
बी-5
बी-7
बी-2


2)पूर्व महाराष्ट्रातील विशेषतः चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यातील परंपरागत जलसिंचन तलावास काय म्हणतात?

पाणलोट
शेततळी
मालगुझरी 👈
जोहड


3)जगातील पहिल्या हायड्रोजन रेल्वेचे उद्घाटन कोठे झाले आहे?

जर्मनी👈
जपान
फ्रान्स
रुस


4)सलाबत खानचा मकबरा हे कोणाचे वास्तविक नाव आहे?

आलमगीर
ताहीराबाद
भुईकोट किल्ला
चाँदबिबी महल 👈


5)समुद्रातील ……. या प्राण्यामुळे मोती मिळतात.

सी-लिली
ऑयस्टर 👈
स्टिंग रे
यापैकी नाही


6)डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी …… येथे झाला.

नागपूर
आंबवडे
महू 👈
जबलपूर


7)राऊस सार्कोमा (RVS) या विषाणूमुळे ….. हा रोग उद्भवतो?

एड्स
कृष्ठरोग
कर्करोग 👈
हिवताप


8)जगातील सर्वात कॅशलेस व्यवहार कोणता देश करतो?

बेलारूस
बेल्जियम 👈
फ्रान्स
कॅनडा


9)‘विद्वान’ चे स्त्रीलिंगी रूप कोणते?

विद्या
विद्वानिण
विदुषी 👈
विधवा


10)…. संस्था क्रांतिकारी राष्ट्र्वादाशी संबंधित होती.

अभिनव भारत 👈
होमरूल लीग
बॉम्बे असोसिएशन
यापैकी नाही


11)खालीलपैकी कोणाला ऑलम्पिक पदक मिळालेले नाही?

मेरी कोम
दिपा कर्मारकर 👈
कर्नाम मल्लेश्वरी
साक्षी मलिक


12)पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे जन्मस्थान ….. आहे.

राहुरी
पेडगाव
चोंडी 👈
राशिन


13)पहिल्या भारतीय अमेरिकन ज्यांची अमेरिकेच्या सिनेटवर निवड झाली आहे?

कमला शिरीन
कमला हॅरीस 👈
राधा नारायण
मृणालिनी रॉय


14)राष्ट्रपतीच्या निवडणुकीत खालीलपैकी कोणत्या गृहाचे सदस्य भाग घेत नाहीत?

विधानपरिषद 👈
लोकसभा
राज्यसभा
विधानसभा


15)‘थंडा फराळ करणे’ या वाक्य प्रचाराचा अर्थ काय?

भरपेट फराळ करणे
फराळ करणे
थंड जेवण करणे
उपाशी रहाणे 👈



16)स्वच्छ भारत अभियानाचे घोष वाक्य.

एक कदम स्वच्छता की ओर 👈
हमारा भारत स्वच्छ भारत
हम स्वच्छ भारत स्वच्छ
स्व्च्छताही उन्नती है


17)आंतरराष्ट्रीय महिला दिन …… हा आहे?

१० आॅगस्ट
१६ सप्टेंबर
८ मार्च 👈
११ डिसेंबर


18)नागराज मंजुळे या दिग्दर्शकाचा खालीलपैकी कोणता चित्रपट नाही?

दुनियादारी 👈
सैराट
पिस्तुल्या
फँड्री


19)आशियाई विकास बँक चे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या शहरात आहे?

दिल्ली
ढाका
मनिला 👈
कोलंबो


20)सिक्कीम या राज्याची राजधानी कोणती?

इंफाळ
कोहिमा
गंगटोक 👈
आगरतळा

https://www.flipkart.com/search?q=rajesh+meshe+books
♻️ वाचा :- भारतातील सर्वात मोठे

१. भारतातील सर्वात मोठे राज्य ( क्षेत्रफळ ) राजस्थान
२. भारतातील सर्वात मोठे राज्य ( लोकसंख्या ) उत्तर प्रदेश
३. भारतातील सर्वात जास्त लोकसंख्येचे शहर मुंबई
४. भारतातील सर्वात मोठा जिल्हा लडाख ( काश्मीर )
५. भारतातील सर्वात मोठा किल्ला आग्रा
६. सर्वात मोठा दरवाजा बुलंद दजवजा ( फत्तेपूर शिक्री )
७. भारतातील सर्वात मोठे वाळवंट थर ( राजस्थान )
८. भारतातील सर्वात मोठा नागरी सन्मान भारतरत्न
९. भारतातील सर्वात मोठा लष्करी सन्मान परमवीर चक्र
१०. भारतातील सर्वात मोठे मंदिर ( क्षेत्रफळ ) रामेश्वरम मंदिर (४००० फूट लांब )
११. भारतातील सर्वात मोठे चर्च सेंट कॅथेड्रल, गोवा
१२. भारतातील सर्वात मोठा गुरुद्वारा सुवर्णमंदिर, अमृतसर
१३. भारतातील सर्वात मोठी म्हशजीद जामा म्हशजीद (दिल्ली )
१४. भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर चिलका सरोवर ( ओरिसा )
१५. भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर वुलर सरोवर ( जम्मू – काश्मीर )
१६. भारतातील सर्वात मोठा पशूमेळा सोनापूर मेळा (हरियाणा )
१७. भारतातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश सुंदरबन ( प. बंगाल )
१८. भारतातील सर्वात मोठे मानवनिर्मित सरोवर गोविंदसागर
१९. क्षेत्रफळाने सर्वात मोठा केंद्रशासित प्रदेश अंदमान आणि निकोबार
२०. भारतातील सर्वात मोठा दिवस २१ जून
२१. भारतातील सर्वात मोठा धबधबा गिरसप्पा धबधबा
२२. भारतातील सर्वात मोठे संग्रहालय न्याशनल संग्रालय, कोलकत्ता
२३. भारतातील सर्वात मोठे लेण्याचे देऊळ कैलास मंदिर ( महाराष्ट्र )
२४. भारतातील सर्वात मोठे प्राणिसंग्रहालय झूऑजिकल गार्डन ( अलीपूर )
२५. भारतातील सर्वात मोठा घुमट गोल घुमट (विजयपूर, कर्नाटक )
२६. भारतातील सर्वात मोठी सार्वजिनक बँक स्टेट बँक ऑफ इंडिया
२७. भारतातील सर्वात मोठा रेल्वे प्लॅटफॉर्म गोरखपूर ( उ. प्रदेश )
२८. भारतातील रस्तयांचा सर्वात मोठा पूल गांधी सेतू, (पाटणा, बिहार )
२९. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ दिल्ली
३०. भारतातील सर्वात मोठे प्रेक्षागृह षण्मुखानंद सभागृह, मुंबई
३१. भारतातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडिअम इडन गार्डन (कलकत्ता )

https://youtu.be/HXGC0ExB_NU
https://youtu.be/HXGC0ExB_NU
♻️ कृष्णा नदी - शोर ट्रिक्स

संदर्भ पुस्तक :- शॉर्ट ट्रिक्स महाराष्ट्र भूगोल
Forwarded from Police Bharti - राजेश मेशे सर (Rajesh Meshe Sir)
👆 विध्यार्थी प्रिय झाले - शॉर्ट ट्रिक्स पुस्तके 👆

शॉर्ट ट्रिक्स पुस्तकांना प्रचंड प्रतिसाद दिल्या बद्दल तुम्हा सर्व विध्यार्थी मित्रांचे खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏

😊 विश्वास नसेल बसत तर, स्वतः वाचा स्वतः खात्री करा

आपलाच - लेखक राजेश मेशे
♻️ हे वाचले आहे का :- ​हवामानदृष्ट्या स्मार्ट शहर मूल्यांकन आराखडा (CSCAF 2.0)

- केंद्रीय गृहनिर्माण व नगरविकास मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्या हस्ते 11 सप्टेंबर 2020 रोजी “हवामानदृष्ट्या स्मार्ट शहर मूल्यांकन आराखडा 2.0 (क्लायमेट स्मार्ट सिटीज अॅसेसमेंट फ्रेमवर्क –CSCAF 2.0) तसेच ‘स्ट्रीट फॉर पीपल’ आव्हान अश्या दोन उपक्रमांचे उद्घाटन करण्यात आले.

◾️CSCAF 2.0 विषयी ठळक बाबी :

- मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेला ‘स्मार्ट शहर अभियान’ CSCAF 2.0 कार्यक्रम राबवित आहे.

- CSCAFचा उद्देश -
हवामान बदलाचा सामना करण्यासाठी एक निश्चित आणि ठोस आराखडा तयार करणे तसेच त्याचे नियोजन आणि अंमलबजावणीची योजना आखणे, त्यासाठीच्या गुंतवणुकीचा अंदाज घेणे.

- या आराखड्यात 28 निदर्शकांसह पाच मुख्य क्षेत्रे आहेत - ऊर्जा आणि हरित इमारती; नगरनियोजन, हरितक्षेत्र आणि जैवविविधता; दळणवळण आणि हवेची गुणवत्ता; जलव्यवस्थापन; आणि घनकचरा व्यवस्थापन.

- या योजनेच्या अंमलबजावणीसाठी राष्ट्रीय नगरविकास संस्थेनेही CSCAFच्या अंमलबजावणीला मंजुरी दिली आहे.

- ‘स्ट्रीट फॉर पीपल’ आव्हान शहरी रस्ते चालण्यास सुलभ करण्यासाठी आणि पादचाऱ्यांसाठी अधिक सुरक्षित करण्यासाठी उपाययोजना करण्याविषयीचे आव्हान आहे.

- याचा उद्देश आपल्या शहराला जलद, अभिनव आणि कमी खर्चात होणारी व्यवस्था विकसित करण्यासाठी प्रेरणा देणे आहे.

https://www.flipkart.com/search?q=rajesh+meshe+books
2. तुकाराम मुंडे सरांचे मार्गदर्शन -भाग 2 👇

https://youtu.be/gwRH12QDj_0
https://youtu.be/gwRH12QDj_0

1. तुकाराम मुंडे सरांचे मार्गदर्शन -भाग 1 👇

https://youtu.be/7WHVDLzsZ7c
https://youtu.be/7WHVDLzsZ7c

आवडले तर तुमच्या मित्रांना share करा 🙏

स्पर्धा परीक्षा करणाऱ्या प्रत्येक विध्यार्थी ने पाहावे 🙏🙏🙏
♻️ वाचा :- महत्त्वाचे प्रश्न उत्तरे

● ‘कोना कोना उम्मीद’ मोहीमेचा प्रारंभ कोणत्या बँकेनी केला?

*उत्तर* : कोटक महिंद्रा बँक

● जगातला सर्वात उंच रेल्वे पूल कुठे बांधण्यात येत आहे?

*उत्तर* : जम्मू व काश्मीर

● ‘खेलो इंडिया’योजनेच्या सर्वसाधारण परिषदेच्या पहिल्या बैठकीचे अध्यक्ष कोण होते?

*उत्तर* : किरेन रीजीजू

● ऑल इंडिया रेडिओच्या वार्ता सेवा विभागाच्या महासंचालक पदावर कोणाची नियुक्ती करण्यात आली?

*उत्तर* : जयदीप भटनागर

● महिला सक्षमीकरणासाठी कोणत्या राज्याने ITC, HUL आणि P&G या संस्थांसोबत सामंजस्य करार केला?

*उत्तर* : आंध्रप्रदेश

● ‘गांधीयन यंग टेक्नॉलॉजिकल इनोव्हेशन अवॉर्ड 2020’ हा पुरस्कार कोणत्या संस्थेला देण्यात आला?

*उत्तर* : भारतीय तंत्रज्ञान संस्था, खडगपूर

● HDFC बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

*उत्तर* : शशिधर जगदीशन

● “स्वच्छ भारत रेव्होल्यूशन” या पुस्तकाचे संपादक कोण आहेत?

*उत्तर* : परमेश्वरन अय्यर

https://www.flipkart.com/search?q=rajesh+meshe+books
♻️ 9 वाजता Live लेक्चर आहे

लेखक :- राजेश मेशे सर ( शॉर्ट ट्रिक्स भूगोल व मराठी पुस्तके)

फ्री लेक्चर बॅच सुरू आहे, तुमच्या मित्रांना पण बॅच जॉईन करायची असेल तर 7276771791 या व्हाट्सअप्प नंबर वर नोंदणी करण्यास सांगा 🙏🙏

खालील चॅनल वर Live लेक्चर असेल Subscribed केले नसेल तर करून ठेवा 👇👇👇

https://www.youtube.com/c/TricksMPSCUPSC