आयुष्यात आपल्याला नक्की काय करायचे आहे हे काही मूलांचे आधीच स्पष्ट असते. पण अशीही काही मूले असतात जे पुढील आयुष्याचा जास्त विचार न करता पुढे जात राहतात. मी त्यातलाच एक होतो. इंजिनियरींगला प्रवेश घेतला होता पण त्यानंतर पुढे काय करायचे हे स्पष्ट नव्हते. ग्रॅज्युएशनला असेपर्यंत स्पर्धा परीक्षांचा निर्णय घेतला नव्हता. पीएसआय व आयपीएस हे समानार्थी शब्द वाटायचे. इंजिनीरिंगला शेवटच्या वर्षाला असताना Cognizant मध्ये प्लेसमेंट झाली. आयटीमध्ये जाण्याची अजिबातच इच्छा नव्हती. तोपर्यंत हळूहळू यूपीएससीचा आवाका कळण्यास सुरुवात झाली होती. सरते शेवटी cognizant ची ऑफर नाकारून यूपीएससी करण्याचा निर्णय पक्का झाला. इतर सर्व मुलांप्रमाणे जोरदार अभ्यास केला, म्हणावे तसे यश येत नव्हते.
गेल्या पाच वर्षात कधी पूर्व, कधी मुख्य तर कधी मुलाखतीतून बाहेर फेकले गेलो. पण माझे प्रयत्न बघून घरच्यांच्या व काही मित्रांच्या अपेक्षा वाढत होत्या. NABARD Grade A च्या परीक्षेत अगदी अर्ध्या गुणाने अंतीम निवड हुकली. स्पर्धा परीक्षा हे असे क्षेत्र आहे जिथे तुम्हाला सतत प्रयत्न चालूच ठेवावे लागतात. अखेर माझ्या त्या सततच्या प्रयत्नांना यश आले. २१ ऑक्टोबरला दुपारी दीड वाजता Reserve Bank of India(RBI) चा निकाल लागला आणि या परीक्षेत माझी Class I अधिकारी म्हणून निवड झाली. या पोस्टलाच Manager किंवा Grade B Officer असेही म्हणतात. Reserve Bank of India मध्ये उलटी चढण असते. सुरुवात Assistant, Grade A, Grade B व शेवटी Grade F पर्यंत पोहोचता येते. पण हा माझा प्रवास नक्कीच सोपा नव्हता, आणि असे कठीण प्रवास कोणाच्यातरी पाठिंब्याशिवाय पूर्णही होत नाहीत.
या सर्व प्रवासात आई-वडिलांनी नेहमीच खंबीर पाठिंबा दिला. अनिल दादा (Dy. CEO) व रोहिणी ताई (तहसीलदार) यांनी कायमच प्रेरीत केले. जेव्हा-जेव्हा खचलो तेव्हा पंकज दाजी (M. D., बालरोगतज्ज्ञ) व वैशालीताई (M. D., स्त्रीरोगतज्ज्ञ) यांनी नेहमीच माझं मनोबल उंचावलं. हर्षा ताई व वैभव दाजी यांनीही नेहमी मला पाठिंबा राहिला. या सर्व प्रवासात घरच्यांनी कधीच मला कसलीही उणीव भासू दिली नाही. प्रवासात चाणक्य मंडल परिवारातील मित्र व मा. अविनाश धर्माधिकारी सर यांनी कायमच प्रेरणा दिली. अनेक हिऱ्यासारखे मित्र जोडले गेले. त्यांच्याबद्दल एका वेगळ्या पोस्टमध्ये लिहिलंच.
नवीन प्रवास चालू करत आहे आपल्या सर्वांचा आशीर्वाद माझ्यासोबत असू द्या☺️✨🙌

❤60👍28🔥16🤔8👏1😁1
Swapnil has written a Message in Marathi, those who can understand should read it, I am requesting Swapnil to give same message in English, I will post it here. 🙏
👍43😁7🤔3