Sanatan Sanstha Marathi
3.67K subscribers
469 photos
10 videos
442 links
Official Marathi Telegram Channel of Sanatan Sanstha, an NGO engaged in the spread of scientific spirituality.
Download Telegram
हिंदु धर्माचे श्रेष्ठत्व कथन करणाऱ्या जळगांव येथील अतिप्राचीन डाव्या आणि उजव्या सोंडेच्या स्वयंभू श्री गणेशमूर्ती !🌺

जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील निसर्गरम्य परिसर असलेल्या पद्मालय या पवित्र क्षेत्री असलेले श्री गणेशमंदिर सुप्रसिद्ध आहे. या मंदिरातील श्रीगणेशमूर्ती स्वयंभू असून त्या १०० हून अधिक वर्षांपूर्वी मंदिराजवळ असलेल्या तळ्यात मिळाल्या. साडेतीन सिद्धीविनायकांपैकी (पिठांपैकी) श्रीक्षेत्र पद्मालय पूर्ण पीठ आहे. या मंदिरात डाव्या आणि उजव्या सोंडेच्या अशा दोन श्री गणेशमूर्ती आहेत.

डाव्या आणि उजव्या सोंडेच्या या दोन्ही मूर्ती कशा अवतरल्या त्यासंदर्भातील माहिती आणि महात्म्य जाणून घेण्यासाठी भेट द्या :
https://www.sanatan.org/mr/a/32956.html

Subscribe to our Telegram Channel and share the link : t.me/SSMarathi
जेवणाच्या वेळा कोणत्या असाव्यात ?

निरोगी जीवनासाठी आपण काय आणि किती खातो, यापेक्षा खाल्लेले व्यवस्थित पचवतो कि नाही ?, याला जास्त महत्त्व आहे. आपण जे अन्न ग्रहण करतो त्याचे नीट पचन करण्याचे दायित्व शरिरात असलेल्या जठराग्नीवर असते. हा जठराग्नी, म्हणजेच आपल्या शरिरातील पचनशक्ती ही सूर्याच्या स्थितीवर अवलंबून असते. आकाशात सूर्य असेल, त्या वेळी आपण जे जेवतो, ते चांगल्या रितीने पचते. सकाळचे जेवण सूर्योदयानंतर ३ ते ३.३० घंट्यांत करणे, तसेच सायंकाळचे जेवण सूर्यास्ताच्या अर्धा घंटा पूर्वी करणे, हे आदर्श आहे. वर दिलेल्या आदर्श वेळांमागील तत्त्वही हेच आहे. हे जमतच नसेल, तर पर्याय म्हणून या वेळा प्रत्येकी आणखी दोन ते अडीच घंट्यांनी लांबवता येतात; कारण तेवढ्या वेळेपर्यंत पचनशक्ती चांगली असते.

अधिक माहितीसाठी भेट द्या : https://www.sanatan.org/mr/a/6628.html

Subscribe to our Telegram Channel and share the link : t.me/SSMarathi
🌸 अनंत चतुर्दशी व्रत करण्याची पद्धत (९.९.२०२२) 🌸

गतवैभव प्राप्त करण्यासाठी श्री विष्णुदेवतेला अनुसरून केल्या जाणार्‍या या व्रतामध्ये शेषनाग आणि यमुनेचेही पूजन केले जाते. कोणी सांगितल्यास किंवा अनंताचा दोरा सापडल्यास केल्या जाणार्‍या या व्रताविषयीची अधिक माहिती या लेखातून जाणून घेऊया.

अधिक माहितीसाठी भेट द्या : https://www.sanatan.org/mr/a/756.html

Subscribe to our Telegram Channel and share the link : t.me/SSMarathi
वर्षश्राद्ध केल्यानंतर पितृपंधरवड्यातही श्राद्ध का करावे ?

‘वर्षश्राद्धामुळे त्या त्या विशिष्ट लिंगदेहाला गती मिळण्यास साहाय्य होते. असे झाल्याने त्या त्या व्यक्तीचे प्रत्यक्ष व्यष्टी स्तरावरील ऋण फिटण्यास साहाय्य होते. वर्षश्राद्ध करणे, ही एक हिंदु धर्माने वैयक्तिक स्तरावर नेमून दिलेली ऋण फेडण्याची व्यष्टी उपासनाच आहे, तर पितृपंधरवड्याच्या निमित्ताने समष्टी स्तरावर पितरांचे ऋण फेडणे, हा समष्टी उपासनेचा भाग आहे. व्यष्टी ऋण हे त्या त्या लिंगदेहाप्रती प्रत्यक्ष कर्तव्यपालन शिकवते, तर समष्टी ऋण हे एकाच वेळी व्यापक स्तरावर देवाणघेवाण फेडते.

अधिक माहितीसाठी भेट द्या : https://www.sanatan.org/mr/a/1304.html

Subscribe to our Telegram Channel and share the link : t.me/SSMarathi
📿 दत्ताचा नामजप केल्याने अतृप्त पूर्वजांच्या त्रासांपासून रक्षण कसे होते ? 📿

दत्ताच्या नामजपातून निर्माण होणार्‍या शक्‍तीने नामजप करणार्‍याच्या भोवती संरक्षक-कवच निर्माण होते. बहुतेक जण साधना करत नसल्यामुळे ते मायेत गुरफटलेले असतात. त्यामुळे मृत्यूनंतर अशांचा लिंगदेह अतृप्त रहातो. असे अतृप्त लिंगदेह मर्त्यलोकात (मृत्युलोकात) अडकतात. `श्री गुरुदेव दत्त ।’ या दत्ताच्या नामजपामुळे मृत्युलोकात अडकलेल्या पूर्वजांना गती मिळते. त्यामुळे पुढे ते त्यांच्या कर्मानुसार पुढच्या पुढच्या लोकात गेल्याने साहजिकच त्यांच्यापासून व्यक्‍तीला होणार्‍या त्रासाचे प्रमाण कमी होते.

अधिक माहितीसाठी भेट द्या : https://www.sanatan.org/mr/a/446.html

Download Shraddha App now : Sanatan.org/shraddh-app
श्राद्ध करण्याचा उद्देश

पितृलोक प्राप्त झालेल्या पितरांना पुढच्या लोकांत जाण्यासाठी गती मिळावी, यासाठी श्राद्धविधींद्वारे त्यांना साहाय्य करणे.

आपल्या कुळातील ज्या मृत व्यक्तींना त्यांच्या अतृप्त वासनांमुळे सद्गती प्राप्त झाली नसेल, म्हणजेच ते उच्च लोकात न जाता नीच लोकात अडकून पडले असतील, त्यांच्या इच्छा-आकांक्षा श्राद्धविधींद्वारे पूर्ण करून त्यांना पुढची गती प्राप्त करून देणे.

अधिक माहितीसाठी भेट द्या : https://www.sanatan.org/mr/a/770.html

Download Shraddha App now : Sanatan.org/shraddh-app
🙏🏻 श्राद्धविधी करतांना करावयाची प्रार्थना !

‘शास्त्रमार्गाला अनुसरून प्राप्त परिस्थितीत आमश्राद्ध, हिरण्य श्राद्ध किंवा तर्पण विधी (वरीलपैकी जे केले आहे, त्याचा उल्लेख करावा) केले आहे. याद्वारे पितरांना अन्न आणि पाणी मिळू दे. या दानाने सर्व पितर तृप्त होवोत. त्यांची आमच्यावर कृपादृष्टी राहू दे. आमच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी त्यांचे आशीर्वाद प्राप्त होवोत. दत्तगुरूंच्या कृपेने त्यांना पुढची गती प्राप्त होऊ दे’, अशी श्री दत्तगुरूंच्या चरणी प्रार्थना करावी.

अधिक माहितीसाठी भेट द्या : https://www.sanatan.org/mr/a/74402.html

Download Shraddha App now : Sanatan.org/shraddh-app
👨🏻‍💻 ‘ऑनलाईन’च्या काळात डोळ्यांची काळजी घेण्यासाठी आचरणात आणायचे विविध उपाय ! 👩🏻‍💻

मुलांपासून ते प्रौढ व्यक्तींपर्यंत सर्वजण संगणक आणि भ्रमणभाष यांचा वापर मोठ्या प्रमाणात करत आहेत. या अमर्याद वापरामुळे डोळ्यांवर सर्वाधिक विपरीत परिणाम होत आहेत. बहुतांश जणांचे तहान-भूक हरपून आणि शरिराकडे दुर्लक्ष करून काम चालू असते.

यामुळे डोळे कोरडे पडणे, डोळे लाल होणे, डोळे, डोके, मान दुखणे, व्यवस्थित पचन न होणे, आम्लपित्त (ॲसिडिटी होणे), मलबद्धता होणे, उत्साह न्यून होणे, झोप व्यवस्थित न होणे, स्वभाव चिडचिडा होणे, धरसोड वृत्ती वाढीस लागणे आदी सर्व लक्षणे निर्माण होतात. या सर्व लक्षणांवरून संगणक आणि भ्रमणभाष यांच्या अमर्याद वापराचे घातक परिणाम आपल्या लक्षात येतील. त्यामुळे डोळ्यांसह संपूर्ण शरिराचा एकूण विचार करून उपाययोजना करणे आवश्यक आहे. सध्याच्या ‘ऑनलाईन’च्या काळात डोळ्यांची, तसेच सर्व शरिराची काळजी कशी घ्यावी ? यासाठी हा लेख…

अधिक माहितीसाठी भेट द्या : https://www.sanatan.org/mr/a/80486.html

Subscribe to our Telegram Channel and share the link : t.me/SSMarathi
जाणून घेऊया, वास्तू आणि दिशा संबंधित माहिती

वास्तू आपल्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टीशी निगडित असल्याने बांधकामापूर्वी अनेक गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात. समृद्धी, यश, शांती, चैतन्य यांचा प्रत्यक्ष संबंध वास्तूशी जोडला जात असल्याने वास्तूची निवड आणि बांधकाम करतांना नियोजन अन् वास्तूशास्त्रातील मूलभूत नियम यांचा आग्रह धरतांना बहुतेक जण दिसतात. यामागे अंधश्रद्धेचा भाग नसतो. घर बांधतच आहोत, तर वास्तूचे काही नियम पाळून वास्तूशास्त्राप्रमाणे घर बांधण्याकडे बहुतेकांचा कल असतो. घराचा मुख्य दरवाजा ईशान्येस असावा. गृहिणी स्वयंपाक करतांना तोंड दक्षिणेकडे नसले म्हणजे झाले. दक्षिण किंवा पश्चिमेस शौचालय ठेवल्यास योग्यच.

अधिक माहितीसाठी भेट द्या : https://www.sanatan.org/mr/a/79117.html

Subscribe to our Telegram Channel and share the link : t.me/SSMarathi
देवीला सहावारी साडीपेक्षा नऊवारी साडी अर्पण करणे अधिक योग्य का ठरते ?

नऊवारी साडी अर्पण करणे, हे पूजा करणार्‍याच्या आवश्यकतेप्रमाणे देवीने नऊ रूपांच्या माध्यमातून कार्य करण्याचे प्रतीक आहे. नऊवारी साडीतील नऊ वार (स्तर) हे देवीची कार्य करणारी नऊ रूपे दर्शवतात. नऊवारी साडी अर्पण करणे, म्हणजे मूळ निर्गुण शक्‍तीला, जिच्यात देवीतत्त्वाची, म्हणजेच शक्‍तीची सर्व रूपे सामावलेली आहेत, त्या श्री दुर्गादेवीला तिच्या नऊ अंगांसह (नऊ रूपांसह) प्रगट होऊन कार्य करण्याचे आवाहन करणे होय. ‘९’ हा आकडा श्री दुर्गादेवीच्या कार्य करणार्‍या प्रमुख नऊ रूपांचे प्रतिनिधीत्व करतो.’

अधिक माहितीसाठी भेट द्या : https://www.sanatan.org/mr/a/543.html

Subscribe to our Telegram Channel and share the link : t.me/SSMarathi
नवरात्र - इतिहास आणि महत्त्व

🌺 महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे नवरात्र !

🌺 महिषासुर नावाच्या असुराशी प्रतिपदा ते नवमी असे नऊ दिवस युद्ध करून देवीने नवमीला रात्री महिषासुराचा वध केला. तेव्हापासून तिला महिषासुरमर्दिनी म्हणू लागले.

🌺 नवरात्रीत देवीतत्त्व नेहमीपेक्षा १००० पटीने कार्यरत असते. देवीतत्त्वाचा अधिकाधिक लाभ मिळण्यासाठी नवरात्रीच्या काळात ‘श्री दुर्गादेव्यै नमः ।’ हा नामजप अधिकाधिक करावा.

अधिक माहितीसाठी भेट द्या : https://www.sanatan.org/mr/a/777.html

Subscribe to our Telegram Channel and share the link : t.me/SSMarathi
🌸 विविध देवींना कुठल्या प्रकारची फुले प्रिय आहेत ? 🌸

‘हिंदु धर्मामध्ये ३३ कोटी देवता आहेत. यांमध्ये देव आणि देवी असे प्रमुख दोन प्रकार आहेत. देवी या ईश्‍वराच्या वात्सल्यरूपाचे साकार रूप असतात, तसेच त्या देवतांच्या निर्गुण शक्तीचे सगुण स्वरूप असतात. त्यामुळे देवी शक्तीस्वरूप आणि वात्सल्यमूर्ती असतात. ज्याप्रमाणे देवांची उपासना करणारे उपासक असतात, त्याप्रमाणे देवीची, म्हणजे शक्तीची उपासना करणारे उपासकही असतात. भारतात देवीची ५१ शक्तीपीठे आहेत. या शक्तीपिठांतून प्रक्षेपित होणारी दैवी ऊर्जा आणि चैतन्य यांमुळे भारतभूमीचे संरक्षण होते. या लेखामध्ये आपण देवीची विविध आध्यात्मिक वैशिष्ट्ये जाणून घेणार आहोत.

अधिक माहितीसाठी भेट द्या : https://www.sanatan.org/mr/a/52311.html

Subscribe to our Telegram Channel and share the link : t.me/SSMarathi
जाणूया, चंडीविधानचा अर्थ, प्रकार आणि पद्धती !

चंडी हे श्री दुर्गादेवी हिचे एक नाव आहे. मार्कंडेयपुराणात चंडीदेवीचे माहात्म्य सांगितले असून त्यात तिच्या अवतारांचे आणि पराक्रमांचे विस्ताराने वर्णन केले आहे. त्यातील जवळजवळ सातशे श्लोक एकत्र घेऊन ‘श्री सप्तशती’ नावाचा एक ग्रंथ देवीच्या उपासनेसाठी निराळा काढलेला आहे. ‘सुख, लाभ, जय इत्यादी अनेक कामनांच्या पूर्तीसाठी या सप्तशतीचा पाठ करावा’, असे सांगितले आहे. हा पाठ विशेषतः आश्विनातील नवरात्रीत करतात. काही घराण्यांत तसा कुलाचारही असतो. पाठ केल्यानंतर हवनही करायचे असते. या सगळ्याला मिळून ‘चंडीविधान’ असे म्हणतात.

अधिक माहितीसाठी भेट द्या : https://www.sanatan.org/mr/a/795.html

Subscribe to our Telegram Channel and share the link : t.me/SSMarathi
शुंभ आणि निशुंभ या अजेय असुरांशी युद्ध करून त्यांचा नाश करणारी पार्वतीसुता कौशिकीदेवी !

शुभं आणि निशुंभ या असुर भावांनी अनेक वर्षे ब्रह्मदेवाची कठोर आराधना केली. त्यांच्या तपश्‍चर्येने प्रसन्न झालेला ब्रह्मदेव हंसावर स्वार होऊन त्यांच्यापुढे प्रगट झाला. दोन्ही असुरांनी ब्रह्मदेवाकडे अमर होण्याचे वरदान मागितले. ब्रह्मदेवाने ‘ते वरदान देणे अशक्य आहे’, असे सांगितले. त्यानंतर दोघांनी शक्ती, सैन्य आणि शस्त्रसंपन्न होऊन अजेय होण्याचा अन् त्रैलोकात विजय प्राप्त करण्याचे वरदान मागितले. यासमवेतच ‘कोणत्याही देवाकडून त्यांचा वध होऊ नये, तर अयोनिजा (मातेच्या गर्भातून जन्माला न आलेल्या) अशा दिव्य स्त्री शक्तीविषयी त्यांच्या मनात कामवासना जागृत झाल्यावर तिच्याद्वारे त्यांचा वध होऊ दे’, असे वरदान त्यांनी मागितले. ब्रह्मदेवाने ‘तथाऽस्तु’ म्हटले आणि ते अंतर्धान झाले. कौशिकीदेवीने महाबलशाली आणि अजेय योद्धे शुंभ अन् निशुंभ यांचा नाश करून त्रैलोक्यात सुख आणि शांती यांची स्थापना केली.

भेट द्या : https://www.sanatan.org/mr/a/50482.html

Subscribe to our Telegram Channel and share the link : t.me/SSMarathi
द्वापरयुगात पांडवांनी एका रात्रीत बांधलेले बनखंडी, जिल्हा कांगडा येथील श्री बगलामुखी मंदिर !

दशमहाविद्यांमध्ये श्री बगलामुखी ही एक महाविद्या आहे. श्री बगलामुखीदेवीचे मंदिर कांगडा (हिमाचल प्रदेश) जिल्ह्यातील बनखंडी गावामध्ये आहे. पांडुलिपीमध्ये देवीचे जसे वर्णन आहे, त्याच स्वरूपात देवी येथे विराजमान आहे. देवीचे हे मंदिर महाभारत काळातील आहे. द्वापरयुगामध्ये पांडवांनी अज्ञातवासात असतांना एका रात्रीत हे मंदिर बांधले आणि पूजाअर्चा केली. या मंदिरात प्रथम अर्जुन आणि भीम यांनी युद्धकलेत यशप्राप्ती होण्यासाठी देवीची उपासना केली होती. शत्रूनाशिनी देवी बगलामुखी मंदिरामध्ये विविध प्रकारच्या त्रासांच्या निवारणासाठी शत्रूनाश हवन करवून घेतले जाते. देवीच्या मंदिरामध्ये हवन केल्यानेे मनोवांच्छित फलप्राप्ती होते.

अधिक माहितीसाठी भेट द्या : https://www.sanatan.org/mr/a/75589.html

Subscribe to our Telegram Channel and share the link : t.me/SSMarathi
☘️ दसरा (विजयादशमी) ☘️

दसर्‍याच्या दिवशी एकमेकांना आपट्याचे पान दिल्यामुळे दोन्ही व्यक्तींतील त्याग आणि प्रीती यांत वाढ होते. आपट्याचे पान एकमेकांना देणे, हे आपल्याकडील सोन्याप्रमाणे मौल्यवान वस्तू दुसर्‍याला देण्यासारखे आहे. दसरा हा विजयाचा दिवस असल्यामुळे या दिवशी आपट्याचे मौल्यवान पान एकमेकांना देऊन आनंदोत्सव साजरा करण्यात येतो.  दसर्‍याच्या दिवशी आपट्याचे पान देणे, हे सौजन्यता, समृद्धता आणि संपन्नता दर्शवते.

अधिक माहितीसाठी भेट द्या : https://www.sanatan.org/mr/a/681.html

Subscribe to our Telegram Channel and share the link : t.me/SSMarathi
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
🇮🇳 'आजादी का अमृतमहोत्सव' निमित्त दिल्ली येथे Ministry of Housing & Urban Affairs मार्फत इंडियन स्वच्छता लीग मध्ये मालवण नगर परिषदेला विशेष सन्मान प्राप्त झाला.
मालवण नगर परिषद 'Malvan Warriors' या नावाने या लीग मध्ये सहभागी झाली होती. या स्पर्धेमध्ये (लीग मध्ये) सनातन संस्थेचे सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या सन्मानामध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे. मालवण नगरपालिकेच्या वतीने मी सनातन संस्थेचे, त्यांचे सर्व पदाधिकारी आणि सदस्य यांचे आभार व्यक्त करतो.
- श्री. संतोष जिरगे, प्रशासक तथा मुख्याधिकारी, मालवण नगरपरिषद