राज्यशास्त्र मराठी माध्यम (PSIR in Marathi)
1.26K subscribers
81 photos
1 video
37 files
45 links
राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय सबंध या विषयाची मराठी मधुन सुबोध आणि सोप्पी माहिती.

#UPSCinMarathi #PSIRinMarathi
Download Telegram
भारतावर इराणच्या संदर्भात आर्थिक निर्बंधांची कदाचित ही सुरवात असू शकते. जर हे निर्बंध असेच वाढले तर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाची त्यावर काय प्रतिक्रिया असते, यावर भारत-इराण संबंधांची पुढील दिशा ठरेल..

@PSIRin_Marathi
PSIR पेपर 2 मध्ये संयुक्त राष्ट्र सुधारणांच्या संदर्भात दरवर्षी प्रश्न असतो किंवा इतर कोणत्या तरी प्रश्नाच्या उत्तरात आपण त्यांचा उल्लेख करू शकतो.

Join
@PSIRin_Marathi
राजकीय पक्षांची आश्वासने आणि त्यात निवडणूक आयोगाची भूमिका यासंदर्भात ही बातमी महत्त्वाची आहे.

#GS2 #PSIR1-B

Join
@UPSCin_Marathi
यंदाचा शांततेचा नोबेल दोन संस्था आणि एक मानवी हक्क कार्यकर्ते यांच्यात विभागून देण्यात आला आहे. सध्याच्या युक्रेन-रशिया युद्धाच्या पार्श्‍वभूमीवर ही गोष्ट अपेक्षित होती. युद्धाच्या काळात नागरी समाज आणि मानवी हक्क संघटना तसेच कार्यकर्ते काय भूमिका बजावतात याकडे जगाचे लक्ष लागून असते. यंदाच्या शांतता नोबेल निवडीवर या पार्श्वभूमीचे प्रतिबिंब दिसून येते.

UPSC/MPSC च्या दृष्टीने विचार केला असता आपल्या लक्षात येईल की
#GS2 आणि #PSIR मध्ये नागरी समाज, मानवी हक्क आणि मानवी हक्क चळवळी यांचा उल्लेख आपल्याला आढळून येतो. त्यामुळे या घटकांचा सखोल अभ्यास येणाऱ्या परीक्षांच्या दृष्टीने करणे अपेक्षित आहे.

Join
@UPSCin_Marathi
भारत आपल्या पंचशील धोरणाच्या अंगाने ठाम भूमिका घेत आहे, परंतु प्रश्न असा आहे की बदललेल्या परिस्थितीत आपण स्विकारलेल्या वास्तववादी परराष्ट्र धोरणाच्या अनुषंगाने हे काल सुसंगत आहे का?

Join
@PSIRin_Marathi
चायनीज राजकीय संस्था चायनीज दृष्टिकोनातून : भाग १
- प्रथमेश पुरुड (आंतरराष्ट्रीय सबंध अभ्यासक)



आजपासून (१६ ऑक्टोबर) सुरू होणाऱ्या चायनीज कम्युनिस्ट पक्षाच्या २० व्या राष्ट्रीय अधिवेशनाकडे जगाचे लक्ष लागून आहे. जागतिक मंदीच्या पाश्र्वभूमीवर जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था कोणत्या नवीन आघाड्यांवर मार्गक्रमण करेल याची उत्सुकता जगातील राष्ट्रीय बाजारपेठांना आहे. त्याचबरोबरीने या राष्ट्रीय अधिवेशनात चीनी राष्ट्रपती शी जिनपिंग हे ऐतिहासिक तिसरा कार्यकाळ स्विकारणार आहेत. मावळत्या १९ व्या अधिवेशनात दोन कार्यकाळाची बंधने संपुष्टात आल्यानंतर अपेक्षेप्रमाणे त्यांना तिसरे कार्यकाळ मिळेल. आधुनिक चीनी इतिहासात माओ झेडाँग व डेंग झाओपिंग यांच्यानंतर शी जिनपिंग तिसरे मोठे नेते बनले आहेत....

Join @PSIRin_Marathi

पूर्ण लेख लिंक 👇🏾


https://irmarathionline.wordpress.com/2022/10/16/%e0%a4%9a%e0%a4%be%e0%a4%af%e0%a4%a8%e0%a5%80%e0%a4%9c-%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a4%95%e0%a5%80%e0%a4%af-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a5%e0%a4%be-%e0%a4%9a%e0%a4%be%e0%a4%af/?s=08
#PSIR

राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध या विषयातील पेपर-1 भाग-अ मध्ये राजकीय विचारप्रणाली हा घटक चॅप्टर सात आणि आठ अंतर्गत येतो.

सदर लेक्चर मध्ये विचारप्रणाली या संकल्पनेचा अर्थ, व्याप्ती, मर्यादा आणि वैशिष्टय़ शिकवण्यात आले आहे. तसेच विचारप्रणाली या संकल्पनेकडे बघण्याचे विविध आयाम देखील चर्चिले आहेत.

https://youtu.be/Lt_RcxTlTRo
#PSIR Lecture - 2

राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध या विषयातील पेपर-1 भाग-अ मध्ये राजकीय विचारप्रणाली हा घटक चॅप्टर सात आणि आठ अंतर्गत येतो.

सदर लेक्चर मध्ये विचारप्रणालींचे स्थित्यंतरे तसेच विचारप्रणालीचा अंत या संकल्पनेचा वाद प्रतिवादाची चर्चा आपण केली आहे.

Join @PSIRin_Marathi

https://youtu.be/1cTlk_2fpAs
या घटनेच्या पार्श्वभूमीवर चीनची सत्ता संरचना आणि एकपक्षीय शासन संरचनेतील गुणदोष या संदर्भात आपण विचार करून ठेवणे अपेक्षित आहे.

Join @PSIRin_Marathi
PSIR च्या batch संदर्भात कोणाला काही माहिती हवी असेल किंवा अडचणी येत असतील तर त्यांनी @mauliwrites या ID वर संपर्क साधा.
दिवाळीच्या खूप सदिच्छा 😊
चीनची सत्ता संरचना समजून घेण्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे.

#PSIR पेपर 2 Sec A

तुलनात्मक राजकारण

Join
@PSIRin_Marathi
चीन मध्ये एका मागोमाग एक प्रधानमंत्री बदलत असल्याने #GS2 मधील विविध देशांच्या संविधान आणि सत्ता संरचनेच्या तुलनात्मक अभ्यासाच्या घटकाच्या अनुषंगाने इंग्लंड महत्त्वाची केस स्टडी आहे.

तसेच
#PSIR ऑप्शनल मध्ये दुसर्‍या पेपर च्या तुलनात्मक राजकारण या घटकासाठी याचा अभ्यास करणे गरजेचे आहे.

Join
@PSIRin_Marathi
ज्यांच्यावर 150 वर्ष राज्य केलं, त्याच देशात आपले मूळ सांगणारी एक व्यक्ति 75 वर्षांनी इंग्लंडची प्रधानमंत्री होईल, असे त्याकाळी कोणी सांगितले असते. तर हे त्यांना, आपल्याला, अगदी सर्वांनाच हास्यास्पद वाटले असते. पण 'उदारमतवादी लोकशाहीची' हिच तर खरी ताकद आहे.

@PSIRin_Marathi
अत्यंत विस्तृत आणि पाश्चात्त्य हेजीमनीच्या बंदिस्त चौकटाला छेद देणारे आंतरराष्ट्रीय संबंधांचे अभ्यासक प्रथमेश यांचे हे विश्लेषण जरूर वाचा. नजीकच्या काळातील चीनवर मराठीत लिहीलेले हे एक महत्त्वाचे लिखाण आहे.

Join @PSIRin_Marathi

https://www.loksatta.com/sampadkiya/features/look-at-china-from-the-angle-of-china-what-will-you-see-asj-82-3219243/
राज्यशास्त्र पेपर 1 मध्ये बहुसांस्कृतिकता या घटकात उदाहरण म्हणुन यातील अधोरेखित केलेला घटक वापरता येऊ शकतो.

Join
@PSIRin_Marathi
आपण या @UPSCin_Marathi चॅनल वर पूर्व परीक्षा तसेच मुख्य परीक्षेतील #GS च्या संदर्भात महत्त्वाच्या बातम्या, आकडेवारी, आकृत्या टाकत असतो.

पण या व्यतिरिक्त महत्त्वाचे विषय असलेल्या निबंधाच्या घटकाची तयारी करण्यासाठी आपण
@EssayInMarathi हे चॅनल देखील चालवतो. भरपूर निबंधाच्या संदर्भातील चर्चा आपण या चॅनलवर करतो. त्यामुळे तुम्ही ते चॅनल देखील subscribe करावे.

तसेच वैकल्पिक विषयाच्या अनुषंगाने माझा जो ऑप्शनल होता, त्याचे
@PSIRin_Marathi हे चॅनल आपण चालवतो. ज्यांची ऑप्शनल राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय सबंध आहे त्यांनी या चॅनलला बघावे तसेच subscribe देखील करावे.

तसेच आपण आता YouTube वर देखील आलो आहोत.
https://youtube.com/c/UPSCinMarathi या चॅनल च्या माध्यमातून आपण लवकरच आठवड्याच्या चालू घडामोडींचा आढाव, तसेच इतर सामायिक प्रश्न यावर video बनवणार आहोत. सध्या GS आणि PSIR ची मराठी booklist आपण या चॅनल वर video च्या माध्यमातून सांगितली आहे. या चॅनल ला देखील आपण subscribe करावे तसेच notification चालू करावे, जेणे करून नवीन video ची माहीती आपल्याला लवकर कळेल.

आपल्या या चॅनलला दिवसेंदिवस वाढत चाललेल्या प्रतिसादाला बघून मला देखील आपल्यासाठी नवीन content तयार करायचे हुरूप येत आहे. आपल्याला या चॅनलचा फायदा होत असले तर आपण ही पोस्ट आपल्या मित्र-मैत्रिणी सोबत नक्की शेअर करा. मराठी माध्यमातून तयारी करणाऱ्यांसाठी IAS होण्याचा प्रवास सुलभ व्हावा यासाठी आपण मिळून प्रयत्न करू. धन्यवाद 🙏🏾

Join
@UPSCin_Marathi
@EssayInMarathi
@PSIRin_Marathi