NET SET Exam
7.47K subscribers
153 photos
109 files
243 links
Download Telegram
Forwarded from SET/NET/TAIT 2026
Answer key SET Paper 1 by Shashikant Shinde.pdf
7.4 MB
Answer key SET Paper 1 by Shashikant Shinde.pdf
*स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड पीएच.डी प्रवेश परीक्षा 2022 जाहिरात प्रसिद्ध ; जाणून घ्या PET परीक्षेचा अभ्यासक्रम व तयारी कशी करावी?*
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड यांच्या पीएच.डी प्रवेश परीक्षेची (PET) जाहिरात नुकतीच प्रसिद्ध झाली आहे. याद्वारे विविध विषयांच्या पीएच.डी पदवीसाठीच्या रिक्त जागांची माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीची संपूर्ण माहिती, PET प्रवेश परीक्षेचे स्वरूप व अभ्यासक्रम पुढीलप्रमाणे आहे.

*PET परीक्षा दिनांक* - 27 मे 2022

*अर्ज करण्याचा दिनांक*
13 एप्रिल 2022 ते 27 एप्रिल 2022

*अर्हता*
1.खुला प्रवर्ग किमान 55 टक्के गुण आवश्यक
2.मागास प्रवर्ग किमान 50 टक्के गुण आवश्यक
*(पदव्युत्तर परीक्षेत अंतिम वर्षाला असणारे विद्यार्थी PET परीक्षेसाठी अर्ज करू शकतात असे महितीपत्रकातील पान क्रमांक 6 वर नमूद करण्यात आले आहे.)*

*PET परीक्षा फिस*
1.एस.सी, एस.टी प्रवर्ग व दिव्यांग विद्यार्थी - 1200 रुपये
2.ओपन,ओबीसी व एन.टी- 1500 रुपये

*PET परीक्षेतून सवलत (Exemption) दिलेले विद्यार्थी परीक्षा फिस*
1.एस.सी, एस.टी प्रवर्ग व दिव्यांग विद्यार्थी - 1200 रुपये
2.ओपन,ओबीसी व एन.टी- 1500 रुपये
*(NET, SET, GATE, अनुभवी प्राध्यापक व शिक्षक यांना PET परीक्षेतून सवलत देण्यात आली आहे, त्याची सविस्तर माहिती महितीपत्रकात पान क्रमांक 10 व 11 वर नमूद करण्यात आली आहे.)*

*PET 2022 नोंदणी लिंक व वेबसाइट*
1.www.srtmun.ac.in
2.https://www.srtmun.ac.in/en/academic/pet-2022.html

*PET परीक्षेचा अभ्यासक्रम व तयारी*
PET परीक्षा एकूण 100 गुणांची असून त्यात 100 प्रश्न विचारले जाणार आहेत. दोन्ही पेपरसाठी एकूण 2 तासांचा म्हणजे 120 मिनिटांचा वेळ असणार आहे.याचाच अर्थ Section A साठीचा वेळ 60 मिनिटे व Section B साठीचा वेळ 60 मिनिटे असेल.दोन्ही पेपरमध्ये प्रत्येकी 50 प्रश्न असतील. परीक्षा ऑनलाइन होणार आहे. तसेच परीक्षेसाठी निगेटिव्ह मार्किंग पद्धती लागू नाही. PET परीक्षेचे सेंटरची माहितीसाठी विद्यार्थ्यांनी माहितीपत्रक पुढील लिंकवर काळजीपूर्वक वाचावे.
https://www.srtmun.ac.in/en/academic/pet-2022.html
*Section A चा अभ्यासक्रम हा "संशोधन पद्धती" विषयाशी निगडित आहे. तर Section B अभ्यासक्रम हा पदव्युत्तर (M.A., M.Sc, M.Com) विषयाशी निगडित आहे. या दोन्ही पेपरची सविस्तर माहिती व त्याची तयारी कशी करायची हे आता बघूया.*

*Section A: संशोधन पद्धती विषयाची तयारी*
विद्यार्थी मित्रांनो पेपर एकचा अभ्यासक्रम हा संशोधन पद्धती (Reserch Methodology) विषयाचा असणार असून हा पेपर सर्व विषयाच्या विद्यार्थ्यांना समान स्वरूपाचा असणार आहे. यावर 50 प्रश्न 50 गुणांसाठी विचारले जातील.
या पेपरमध्ये साधारणपणे संशोधनाचा अर्थ, संशोधनाचे प्रकार, वैज्ञानिक विचारपद्धती, ज्ञान मिळविण्याचे मार्ग व संशोधन, संशोधकांची गुणवैशिष्ट्ये, चांगल्या संशोधन प्रक्रियेचे निकष,संशोधनाचा प्रत्यक्षवादी, चिकित्सक दृष्टीकोन, संख्यात्मक व गुणात्मक संशोधन आणि त्यातील फरक,संशोधन पायऱ्या, संशोधन समस्या, संशोधन आराखडा, चांगल्या संशोधन अहवालाची वैशिष्ट्य, मूलभूत, उपयोजित व कृती संशोधन, संशोधन समस्येचे स्रोत, सम्बधित साहित्याचा आढावा कशा घ्यावा,परिकल्पना अर्थ व तिचे प्रकार, गृहीतके, परिकल्पना व गृहीतके, जनसंख्या व नमुना निवड व त्याचे स्वरूप, चांगल्या नमुन्यांची वैशिष्ट्य व प्रकार,पथदर्शक अभ्यास, ऐतिहासिक, प्रायोगिक, सर्वेक्षण, व्यक्ती अभ्यास,कार्योत्तर,वांशिक, सहसंबंध इत्यादी संशोधन पद्धती,संशोधन विकास पूरक परिषद, कार्यशाळा व इतर बाबी, शोधनिंबध, प्रबंध लेखनाची रूपरेखा, संशोधनाची विविध साधने, संशोधनात संख्याशास्त्र वापर, माहिती तंत्रज्ञानाचा संशोधनात उपयोग, संदर्भ लेखनाचा पद्धती, संशोधन अहवालातील संक्षिप्त रूपे इत्यादी मुद्यांवर प्रश्न विचारले जाऊ शकतात.
संशोधन पद्धती विषयाचा अभ्यास करतांना संशोधनातील संकल्पना बारकाईने समजावून घेणे आवश्यक आहे, तसेच संशोधन विषयावरील संदर्भ पुस्तकांचे वाचन करणे आवश्यक आहे.तसेच या विषयावरील वस्तुनिष्ठ प्रश्न सोडविण्याचा सराव आवश्यक आहे, संशोधनावरील प्रश्न सोडवण्यासाठी संशोधनाची बेसिक पुस्तके आणि नेट सेट पेपर एक साठीची पुस्तके वापरता येऊ शकतात.संशोधनाचे प्रश्न सोडवण्यातून विद्यार्थी मित्रांनो तुमच्या अभ्यासात अचूकता येईल.

*संशोधन पद्धती पेपरच्या तयारीसाठी काय वाचाल?*

*1.PET संशोधन पद्धती : परीक्षाभिमुख विवेचन व 500 वस्तुनिष्ठ प्रश्नांची तयारी (तिसरी आवृत्ती) - डॉ.शशिकांत अन्नदाते, के सागर पब्लिकेशन्स (अत्यंत उपयुक्त संदर्भ)*