NET SET Exam
7.47K subscribers
153 photos
109 files
243 links
Download Telegram
Forwarded from SET/NET/TAIT 2026
5_6055274988183748984.pdf
177.9 KB
5_6055274988183748984.pdf
Forwarded from SET/NET/TAIT 2026
5_6055274988183748986.pdf
24.1 KB
5_6055274988183748986.pdf
Forwarded from SET/NET/TAIT 2026
एका सांकेतिक लिपीत LEARN=55 आणिTENT=63 असतील तर ,RUN=?
Anonymous Quiz
22%
54
43%
56
26%
60
9%
62
Forwarded from SET/NET/TAIT 2026
216,343,512, 729 ?
Anonymous Quiz
36%
1000
29%
1001
27%
1010
8%
1100
Forwarded from SET/NET/TAIT 2026
*PET परीक्षेचे स्वरूप, अभ्यासक्रम व तयारी*
★ डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या PET परीक्षेत PET पेपर 1 हा General Attitude आणि PET पेपर 2 हा विषयाशी व संशोधन पद्धतीशी निगडित आहे.
★परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग पद्धती लागू असून चुकीच्या उत्तराला 0.5 गुण वजा केले जाणार आहेत.

*PET पेपर 1: General Attitude*
PET पेपर 1 मध्ये 100 गुणांसाठी 100 प्रश्न विचारण्यात येणार असून वेळ 90 मिनिटे असणार आहे. PET पेपर एकमध्ये विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमातील पुढील घटकांचा अभ्यास करावा लागणार आहे.
*★Analytical Reasoning (विश्लेषणात्मक तर्क)*
*★Numerical Ability (अंकगणितीय योग्यता) ★Language Competency (भाषाविषयक क्षमता)*
*★Computer(संगणक)*
*★Environment Awareness (पर्यावरण विषयक जागरूकता)*
*★Logical Reasoning of Data Interpretation (तार्किक दृष्टीने माहितीचे विश्लेषण)*
वरील सर्व घटक नेट-सेट परीक्षेच्या पेपर एकच्या अभ्यासक्रमात समाविष्ट आहेत, त्यादृष्टीने आपणास सदर घटकातील इत्यंभूत मुद्यांची माहिती अभ्यासण्यासाठी पुढील संदर्भ पुस्तके अत्यंत उपयुक्त ठरतील.

*1.NET/SET/PET परीक्षा संपूर्ण मार्गदर्शक - डॉ.शशिकांत अन्नदाते (चौथी आवृत्ती), के'सागर पब्लिकेशन्स, पुणे*
या पुस्तकात PET अभ्यासक्रमातील सर्व घटकांचे मुद्देसुद, आकृतीद्वारे विश्लेषण असून प्रत्येक घटकांचे साधारण 300 वस्तुनिष्ठ प्रश्न दिलेले असल्याने सदर पुस्तक आपणास परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
*तसेच PET परीक्षेच्या पेपर 1 च्या अभ्यासक्रमातील घटकानुसार पुढील स्वतंत्र पुस्तकेही विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरतील.*
■विश्लेषणात्मक तर्क क्षमतेसाठी के'सागर/अनिल अंकलगी/पंढरीनाथ राणे तसेच नेट सेट परीक्षेतील प्रश्नांचा सराव करावा.
■अंकगणितीय योग्यतेसाठी सतीश वसे/के सागर/वा. ना.दांडेकर
■भाषाविषयक क्षमतेसाठी नेट सेट परीक्षेतील आकलनविषयक उतारे सोडवावेत तसेच इंग्रजी व मराठी व्याकरणातील समानार्थी, विसुद्धार्थी शब्द, वाकप्रचार अभ्यासावेत.
■संगणक घटकासाठी MSCIT पुस्तक व अन्नदाते यांच्या पुस्तकातील माहिती अभ्यासावी.
■पर्यावरण विषयक जागरूकता घटकासाठी एरीक भरूचा पुस्तक वाचावे व नेट सेट पुस्तकातील प्रश्न सोडवावेत.
■तार्किकदृष्टीने माहितीचे विश्लेषण करिता डॉ.आर.एस.अग्रवाल व डॉ.अन्नदाते यांच्या पुस्तकातील माहितीचा व प्रश्नांचा सराव करावा.
*PET पेपर 1 उत्तीर्ण होण्यासाठी खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना किमान 50 टक्के व मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना 45 टक्के गुण आवश्यक आहेत.*

*PET परीक्षा पेपर 2 अभ्यासक्रम व तयारी*

■PET पेपर 1 उत्तीर्ण असणारे विद्यार्थीच पेपर 2 देऊ शकतात.
■PET पेपर 2 साठी 90 मिनिटे वेळ असून 100 गुण आहेत.
*■ PET पेपर 2 हा पदव्युत्तर विषयाशी संबंधित व त्या विषयाच्या संशोधन पद्धतीशी निगडित असतो.*
■PET पेपर 2 साठी पदव्युत्तर विषयाच्या अभ्यासक्रमात नेमलेली संदर्भ पुस्तके व नेट सेट पेपर दोनची पुस्तके वाचावीत.
■पेट पेपर दोन मध्ये साधारणपणे विषयाशी संबंधित 50 टक्के प्रश्न व 50 टक्के प्रश्न संशोधन पद्धती विषयाशी निगडित विचारले जाऊ शकतात.

*PET परीक्षा पेपर 2 दिनांक*
21 फेब्रुवारी 2021

*संशोधन पद्धती विषयाचे सर्वसाधारण स्वरूप व तयारी*
संशोधन पद्धती (Reserch Methodology) विषयाच्या पेपरमध्ये साधारणपणे संशोधनाचा अर्थ, संशोधनाचे प्रकार,वैज्ञानिक विचारपद्धती, ज्ञान मिळविण्याचे मार्ग व संशोधन, संशोधकांची गुणवैशिष्ट्ये, चांगल्या संशोधन प्रक्रियेचे निकष,संशोधनाचा प्रत्यक्षवादी, चिकित्सक दृष्टीकोन, संख्यात्मक व गुणात्मक संशोधन आणि त्यातील फरक,संशोधन पायऱ्या, संशोधन समस्या, संशोधन आराखडा, चांगल्या संशोधन अहवालाची वैशिष्ट्य, मूलभूत, उपयोजित व कृती संशोधन, संशोधन समस्येचे स्रोत, सम्बधित साहित्याचा
आढावा कशा घ्यावा,परिकल्पना अर्थ व तिचे प्रकार, गृहीतके, परिकल्पना व गृहीतके, जनसंख्या व नमुना निवड व त्याचे स्वरूप, चांगल्या नमुन्यांची वैशिष्ट्य व प्रकार,पथदर्शक अभ्यास, ऐतिहासिक, प्रायोगिक, सर्वेक्षण, व्यक्ती
अभ्यास,कार्योत्तर,वांशिक, सहसंबंध इत्यादी संशोधन पद्धती,संशोधन विकास पूरक परिषद, कार्यशाळा व इतर बाबी, शोधनिंबध, प्रबंध लेखनाची रूपरेखा, संशोधनाची विविध साधने, संशोधनात संख्याशास्त्र वापर, माहिती तंत्रज्ञानाचा संशोधनात उपयोग, संदर्भ लेखनाचा पद्धती, संशोधन अहवालातील संक्षिप्त रूपे इत्यादी मुद्यांवर प्रश्न विचारले जाऊ शकतात.
संशोधन पद्धती विषयाचा अभ्यास करतांना संशोधनातील संकल्पना बारकाईने समजावून घेणे आवश्यक आहे, तसेच संशोधन विषयावरील संदर्भ पुस्तकांचे वाचन करणे आवश्यक आहे.तसेच या विषयावरील वस्तुनिष्ठ प्रश्न सोडविण्याचा सराव आवश्यक आहे, संशोधनावरील प्रश्न सोडवण्यासाठी नेट सेट पेपर एक साठीची पुस्तके तसे
Forwarded from SET/NET/TAIT 2026
च संशोधनाची बेसिक पुस्तके वापरता येऊ शकतात.संशोधनाचे प्रश्न सोडवण्यातून विद्यार्थी मित्रांनो तुमच्या अभ्यासात अचूकता येईल.
संशोधन पद्धती पेपरच्या तयारीसाठी पुढील पुस्तके उपयुक्त ठरतील.
1.सामाजिक संशोधन पद्धती - डॉ.प्रदीप आगलावे, विद्या प्रकाशन, नागपूर
2.संशोधन पद्धती - पीएच.डी प्रवेश परीक्षा परीक्षाभिमुख विवेचन व 500 वस्तुनिष्ठ प्रश्न - डॉ.शशिकांत अन्नदाते, के'सागर पब्लिकेशन्स
3.शोधनिबंधाची लेखनपद्धधती - मिलिंद मालशे, लोकवाड्मय गृह
4.सामाजिक अनुसंधान - राम आहुजा
5.साहित्यसंशोधन वाटा व वळणे -डॉ.सुधाकर शेलार, अक्षरवाड्मय प्रकाशन, पुणे
6.Research Methodology - C R Kothari
7.Research in Education - John Best
8.Designs of Social Research - Das & D K Lal
अधिक माहितीसाठी आजच पुढील टेलिग्राम चॅनेल जॉइन करा. https://t.me/phd07
Forwarded from SET/NET/TAIT 2026
Forwarded from SET/NET/TAIT 2026
Forwarded from SET/NET/TAIT 2026
खालीलपैकी कोणत्या परिकल्पनेस पर्यायी परिकल्पना म्हणतात?
Anonymous Quiz
31%
शून्य परिकल्पना
27%
संशोधन परिकल्पना
20%
प्रश्न परिकल्पना
22%
दिशात्मक परिकल्पना
Forwarded from SET/NET/TAIT 2026
गुणात्मक संशोधनाचे प्रमुख दृष्टिकोन कोणते आहेत?
Anonymous Quiz
14%
लोक पद्धती शास्त्र संशोधन
12%
घटना शास्त्रीय संशोधन
11%
स्वाभाविक चौकशी
63%
वरील सर्व
Forwarded from SET/NET/TAIT 2026
Forwarded from SET/NET/TAIT 2026
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
सेट-नेट व पीएच.डी प्रवेश परीक्षा (PET) संपूर्ण मार्गदर्शक - डॉ. शशिकांत अन्नदाते सर
हे पुस्तक सेट, नेट, पेट अशा पात्रता परीक्षेसाठी अत्यंत दर्जेदार आहे. या पुस्तकात नविन अभ्यासक्रमातील दहाही घटकांचा सखोल परामर्श घेतला आहे. संकल्पनात्मक स्पष्टता, तक्ते व आकृत्याद्वारे प्रत्येक मुद्याचे विश्लेषण करण्यात आले आहे व प्रत्येक घटकानुसार 300 पेक्षा अधिक सराव प्रश्नांचाही समावेश या पुस्तकामध्ये करण्यात आला आहे. सेट-नेट-पेट परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त संदर्भ ग्रंथ म्हणजे अन्नदाते सरांचे सेट-नेट-पेट संपूर्ण मार्गदर्शक पुस्तक होय !!!
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Forwarded from SET/NET/TAIT 2026
संभाव्यता नमुना निवड पद्धतीचा ------- हा गुण नाही.
Anonymous Quiz
35%
पूर्वग्रह रहितता
22%
वस्तुनिष्ठता
26%
व्यक्तिनिष्ठता
17%
शास्त्रीयता
Forwarded from SET/NET/TAIT 2026
संशोधनाची जनसंख्या, न्यादर्श संशोधन अहवालाच्या----- प्रकरणात मांडतात.
Anonymous Quiz
30%
संशोधन कार्य पद्धती
22%
संबंधित साहित्याचा आढावा
17%
निष्कर्ष
31%
माहितीचे विश्लेषण व अर्थनिर्वचन
Forwarded from SET/NET/TAIT 2026
*PET Exam 2021*

*Update& Research*
*Methodology questions*

*PET exam Update*

*1.डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद PET परीक्षेचे अर्ज भरण्याची अंतिम मुदत 18 जानेवारी 2021 आहे.*

*2.शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर पीएच.डी रिक्त राखीव प्रवर्ग विद्यार्थ्यांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 27 जानेवारी 2021 आहे.PET परीक्षेचे वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.*

*संशोधन पद्धती-महत्वपूर्ण प्रश्नोत्तरे* *(Research Methodology- Important questions)*
*Join*- https://t.me/phd07

*१) संशोधकांनी संशोधन विषयाची निवड प्रामुख्याने कोणत्या बाबीवर करावी?*
अ) समस्येची समर्पकता √
ब) उपलब्ध निधी
क) मार्गदर्शकाचे मत
ड) ग्रंथांचे उपलब्धतेवर

*२)............ संशोधन अभ्यासासाठी गृहीतक आवश्यक असेलच असे नाही ?*
अ) प्रमाणभूत
ब) सहसंबंधात्मक
क) प्रयोगात्मक
ड) ऐतिहासिक√

*३) संशोधन लेखाच्या सुरुवातीस काय लिहिणे अपेक्षित आहे?*
अ) संक्षेप
ब) सारांश"√
क) उद्दिष्टे
ड) प्रस्तावना

*४).घटना शास्त्रीय संशोधनाला कोणते संशोधन म्हणतात?*
अ) रुपविवेचन वादी √
ब) लोक पद्धती शास्त्र
क) स्वाभाविक निरीक्षण
क) आशय विश्लेषण

*५). एखाद्या महाविद्यालयाचे दर्जा ठरविण्यासाठी संशोधनात कोणते साधन वापरावे लागेल ?*
अ) विद्यार्थी मुलाखत
ब) निरीक्षण
क) पदनिश्चयन श्रेणी
ड) वरील सर्व√

*६). संशोधन संदर्भ लेखनात एकापाठोपाठ संदर्भ आल्यास काय लिहावे?*
अ ) उनि
ब) मागील प्रमाणे
क) ता.क
ड) तत्रैव√

*७). संदर्भ नोंदविण्याचे नियमावली काय म्हणतात?*
अ)bibliography √
ब) MLA style
क) Style Guide
ड) ibid

*८). संशोधनातील सिद्धांतासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती आहे?*
अ) परिकल्पना
ब) गृहीतके
क) समस्येचे स्पष्टीकरण
ड) सामान्यीकरण√

*९). संशोधनात पडताळा सूचीचा वापर करण्याचे उद्देश पुढीलपैकी कोणता आहे ?*
अ) गुण तपासणी
ब) दर्जा तपासणी
क) क्रमांकन ठरविणे
ड) अस्तित्व तपासणे√

*१०) समस्यात्मक बालकांच्या शैक्षणिक प्रगतीमधील अडचणी अभ्यासण्यासाठी कोणत्या संशोधन पद्धतीचा उपयोग होतो?*
अ) सर्वेक्षण
ब) प्रायोगिक
क) वांशिक
ड) व्यक्ती अभ्यास√

*प्रश्नासाठीचे संदर्भ पुस्तक*

*संशोधन पद्धती - पीएच.डी प्रवेश परीक्षा परीक्षाभिमुख विवेचन व 500 वस्तुनिष्ठ प्रश्न - डॉ.शशिकांत अन्नदाते, के'सागर पब्लिकेशन्स*(प्रकाशकांच्या परवानगीने)

*PET बाबत महत्वपूर्ण माहिती प्राप्त करण्यासाठी खालील टेलिग्राम चॅनेल जॉइन करू शकता.*
https://t.me/phd07