मी अधिकारी
16 members
559 photos
5 videos
1 file
79 links
नमस्कार,
स्पर्धा परीक्षा महोत्सव 2019 या कार्यक्रमाबाबत सविस्तर माहिती देन्यासाठी..
18,19,20 जून रोजी पुणे येथे गणेश कला क्रीडा मंच येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे.
http://www.spardhaparikshamahotsav.com
Download Telegram
to view and join the conversation
Forwarded from Mahesh Bade
Forwarded from Mahesh Bade
Forwarded from Mahesh Bade
#MPSC ते उद्योजक
#स्पर्धा परीक्षेचा केलेला अभ्यास व्यवसाय वृद्धी साठी आला कामी
#दुष्काळग्रस्त भागात आधुनिकपद्धतीने शेती
#अपयशाकडून यशाकडे वाटचाल
#स्पर्धा परीक्षा ते यशस्वी शेतकरी
#मोगरा,झेंडू,निशिगंधा, दोडका,वांग्याची शेती
#माळरानावर फुलविली फुलांची शेती
#महिना 1.50 लाख नफा
#उच्च शिक्षित तरुण ( MSc. Organic Chemistry)
#भावाच्या मदतीने शेती फुलविली.

नमस्कार,
आज आपल्या समोर आमचे मित्र विक्रांत वसंतराव पवार जे पुण्यात स्पर्धा परीक्षेचा अभ्यास (MPSC/UPSC) गेल्या 5 वर्षांपासून करत आहे, सततचे येणारे अपयश, सरकारी निर्णयामुळे निघणारे कमी जागेचे प्रमाण,वाढती स्पर्धा या वास्तविक गोष्टींची जाणीव झाल्यामुळे आपल्या समोर दुसरा पर्याय असायला हवा, यासाठी शेती कडे वळण्याचा खूप मोठा धाडसी निर्णय घेतला.आज सर्व तरुण शेती म्हंटल की, त्या पासुन पळ काढतात, पण याला यात काही तरी वेगळे करायचे होते.त्यामुळे शेती मध्ये काही तरी वेगळे करून व्यवसाय निर्माण करायचा होता. तरुणांनी या क्षेत्राकडे सकारात्मक दृष्टया पाहिले पाहिजे.
विक्रांत हा मूळचा सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील येळवी या गावचा आहे.हा तालुका दुष्काळग्रस्त भागात येतो.जिथे पाणी नाही अशा भागात आपण आधुनिक पद्धतीने शेती करायची हा कयास त्यांनी व त्याच्या भावाने बांधला आणि विक्रांत यांनी काळाची पाउले ओळखत आपल्या भावाच्या मदतीने शेती मध्ये आधुनिक पद्धतीने शेती करण्याचा निर्णय घेऊन शेती कडे आपला मोर्चा वळविला, परीक्षा मध्ये यशाच्या जवळ जाऊन देखील यश काही हाताला लागत नव्हते.त्यांनी विचार केला आणि आपल्याला आवड कशात आहे हे ओळखले आणि आपलं गाव येळवी गाठले.आज शेती करतो म्हणाले की घरातील नातेवाईकांना वाटत की एवढ शिक्षण घेतल,एवढा पैसा शिक्षणावर खर्च केला तो काय शेती करणार ,याला वेड लागलं आहे.अरे उद्या तुला कोणी पोरगी देणार नाही मग काय करणार आशा प्रकारचे बोलणं ऐकायला मिळत, ही खरी गोष्ट आहे जी प्रत्येकाला जाणवत असेल.
आज विक्रांतने भावाच्या मदतीने आपल्या 16 एकरात शेती फुलविली आहे.
🛑 मोगरा-:
💐दिवसाला 100 किलो फुले निघतात.
💐1 किलो भाव-:रु. 300/-
(रु.200 ते रु.1000 भाव मिळतो)
💐 एकरी खर्च-: 1.50 लाख
💐3 महिन्यात उत्पन्न सुरू

🛑वांगी-:
🍆एकरी खर्च-: 50 हजार
🍆1 किलो भाव- रु.50/-
🍆2 महिन्यात उत्पन्न सुरू.

🛑झेंडू-:
🔵एकरी खर्च-:50 हजार
🔵1 किलो भाव-:रु.40-50/-
🔵75 दिवसात उत्पन्न चालू

🛑दोडका-:
🔵खर्च-:50 हजार
🔵1 किलो भाव-: रु.30/-
🔵60 दिवसात उत्पन्न चालू.

आज आपल्या रानात त्यांनी कमी पाण्यात ,कमी कालावधीत येणारी आणि मार्केट मध्ये ज्याला सर्वात मोठया प्रमाणात मागणी व भाव देखील मिळतो अशा पिकांची लागवड त्यांनी केली आहे.मोगरा ,गुलछडी,झेंडू, निशिगंधा, वांगी,दोडका,कारली,
अँपल बोर, या सारखी पिके ते आपल्या शेतात घेत आहेत.
स्पर्धा परीक्षेचा अभ्यास आज त्याला या ठिकाणी कामी येत आहे. त्यामुळे आपल्याला जरी यश मिळाले नाही तरी आपण जो 5 वर्ष स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला आहे त्यातून मिळालेलं ज्ञान आज त्याने आपल्या व्यवसाय वृद्धी साठी लावले आहे.आज तो प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहे.
जसे विक्रांतला स्पर्धा परीक्षेत यश मिळाले नाही, तरी हताश न होता आपला दुसरा पर्याय निवडून आपली वाटचाल चालू ठेवली आहे, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांनी काळाची पाऊले ओळखून लवकरात लवकर निर्णय घेणे आवश्यक आहे. स्पर्धा परीक्षेत यश मिळाले नाही म्हणून आपले सर्व काही संपले किंवा आता माझ्या समोर काहीच नाही ही मानसिकता न ठेवता सकारात्मक दृष्टी ठेवून मेहनत घ्या.
विचार करा ,निर्णय घ्या आणि मग मागे पाहू नका अडचणी येणार आहेत आणि त्या आल्या पाहिजे कारण ज्यांना अडचणी येतात तेच मार्ग शोधतात आणि यशस्वी होतात.

महेश बडे-:9158278484
साई डहाळे-:9011144472
किरण निंभोरे-:8484086061
विजय मते-:9975599522
(MPSC STUDENTS RIGHTS)
Forwarded from Mahesh Bade
मागील 6 महिन्यापासून यासाठी राज्य शासनाकडे सतत यासाठी आम्ही पाठपुरावा करत होतो.त्याची उशीरा दखल घेतली गेली.आता फक्त लवकरात लवकर अध्यक्ष आणि सदस्य यांची नियुक्ती व्हावी.
🛑"शासन निर्णय"🛑
🔵सामान्य प्रशासन विभाग

🛑महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष व सदस्य यांच्या नियुक्तीची मार्गदर्शक तत्त्वे निश्चित करणेबाबत.

🔵 अध्यक्ष व सदस्य यांच्या प्राप्त अर्जांची शोध किंवा छाननी समिती गठीत करणे

नमस्कार,
महाराष्ट्र लोकसेवा आयोग ही एक घटनात्मक संस्था आहे.पण गेल्या एक वर्षापासून येथे अध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली नाही. तसेच जवळपास तीन सदस्य यांची देखील नियुक्ती करण्यात आलेली नाही. आज आयोगाचा कारभार प्रभारी अध्यक्ष व एक सदस्य हेच पाहत आहे. आज फक्त 2 जण आयोगाचा कारभार सांभाळत आहे, हे खूप चिंतेची गोष्ट आहे एक वर्षानंतर राज्य सरकारला याबाबत जाग आली आणि घटनात्मक संस्थेमध्ये या रिक्त जागा आहेत त्या भरण्यात याव्यात यासाठी शासन निर्णय काढण्यात आला...

किरण निंभोरे-:8484086061
साई डहाळे-:9011144472
विजय मते-:9975599522
महेश बडे-:9158278484
(MPSC STUDENTS RIGHTS)
Forwarded from Mahesh Bade
Forwarded from Mahesh Bade
#मेगाभरती
#महापरिक्षा_पोर्टल
#मी_बेरोजगार
नमस्कार,
आगामी निवडणूका महापरिक्षा पोर्टल च्या माध्यमातून घेऊ नका साहेब... आहो त्यात लय घोळ आहे. राज्यात तालुका, जिल्हा ठिकाणी हजारोंच्या संख्येने मोर्चे निघाले पण काहीच उपयोग झाला नाही....तेवढं जरा आपलं पण बघा...मेगाभरतीचे..कारण मेगाभरती जोरात चालू आहे....मी बेरोजगार