मराठी कविता
11.8K subscribers
4.5K photos
187 videos
13 files
50 links
"मराठी भाषेच्या अस्तित्वासाठी आणि मराठी माणसासाठी,कविता, लेख ,आणि बरच काही"

कविता, चारोळी , लेख पाठवण्यासाठी
👇

@PrashantMore

@TusharSasane
Download Telegram
बाप समर्पण
बाप संयम
बाप वाट
बाप दिशा,आशा आणि जगण्याची परिभाषा

बाप धीर
बाप घाम कष्ट
बाप ऊन , पाऊस आणि वारा
बाप वादळ आणि शांत समुद्र

बाप युद्धातील शौर्य आणि युद्धातील शांतता
बाप संधी तील विजय
बाप उघड्या डोळ्याचं स्वप्न

बाप पिंपळ ....... !!!

- सुमित वाघमारे

@Marathi_Kavita
हो....हो...ती तिच जी मी पहिली होती स्वप्नात  ....
स्वप्न सुंदरी...!
ऐकायला थोड वेगळं वाटत पण खरंच, आज ती माझ्या स्वप्नात आली तीला बघण्यासाठी मी खूप वेळ stand  वर उभा असायचो पण आज चक्क ती माझ्या स्वप्नात न बोलवता आली. खूप वाईट वाटल कारण या वेळेस तिचे वाट बघण्याचे कष्ट मी घेतले नव्हते.
हा तर कुठ होतो मी...?
स्वप्नात आली , पुस्तक वगैरे हातात होतच. तो बारीक भिंगाचा चष्मा,ती लांब अशी ओढणी आणि ते मोकळे सोनेरी केस...! तिला पूर्ण बघणार तेवढ्यात आई ने आवाज दिला . मला निघायचं होत आज गाडी न्यायची नव्हती आणि बसही लवकर होती .मी  आवरलं आणि stand वर गेलो. बघतो तर माझी स्वप्न सुंदरी तिथंच उभी होती . तशीच जशी मी स्वप्नात पहिली. वाटलं देव जरा जास्तच खुश आहे माझ्यावर...!
जास्त काही  mekup नव्हता तिचा. फक्त एक छानाशी टिकली होती.म्हटल आता बोलूनच टाकावं ,पण काय करणार हिम्मत होत नव्हती.
तिचा तो dress मला खूप आवडतो पण ती ना,तो आठवड्यातून फक्त गुरुवारीच घालते आणि आज गुरुवार नव्हता,कदाचित तिला कळलं असेल मला तो ड्रेस आवडतो म्हणूनच तिने तो घालला असावा !
काहीतरी चुकल्यासारखी ती कोणालातरी शोधात होती आणि अचानक तिची नजर माझ्यावर पडली. मला काय कराव सुचेना ,मी  सैरावैरा होऊन इकडं तिकड पाहू लागलो. माझी ती अवस्था बघून ती गालातल्या गालात हसू लागली .तिच ते हसन आता एवढ वेड करू लागली की काय सांगू....
पुढ काय होणार -तेवढ्यात तिच कानातलं पडलं. तिच ते लक्षातही नाही आलं पण मला ते समजलं. बघा ना ! ती पुस्तक वाचण्यात मग्न होती आणि मी तिला वाचण्यात मग्न होतो!
काही वेळानं तिला लक्षात आलं आणि ती ते शोधू लागली. मी कशाचाही न विचार करता तिच्याकडे गेलो. काही बोलणार तेवढ्यात ती पुस्तक सावरत कानाला हात लावत म्हणाली  "अहो ते माझं कानातलं !
जरा इथंच कुठेतरी पडले आहे, शोधता का ?"
काय बोलव आता कळेना, मी " हो हो शोधतो " अस म्हणत शोधू लागलो, असा की जस माझचं काळीज हरवलं आहे. आम्ही दोघंही खाली वाकून शोधत होतो. माझ्यातला स्वार्थी माणूस जागा झाला, आणि म्हणाला "कानातलं सापडलं तरी देऊ नको वेड्या! तुला तिला तेवढच जास्त वेळ बघता येईल "
पण काय करू तिची ती कानातलं सापडत नाही म्हणून झालेली तळमळ मला बघवत नव्हती.
माझ्यातल्या त्या स्वार्थी व्यक्तीमत्त्वाला म्हटलं " अरे तिचा चेहरा तर बघ जरा , किती केविलवना झाला आहे . मला तिला सारखं बघण्याची गरज नाही ,ती माझ्या डोळ्यात समावलेली आहे."
बस आता रहावेना. माझ काळीज ओरडू लागलं,अस वाटत आताच बाहेर येत की काय ?  मी लांब झालो आणि माझ्या पायाखाली तीच ते झुमक्यासारखं कानातलं  पडल होत . मी ते उचललं आणि हातात घेतलं . त्या कडे बघितलं आणि मनात म्हटल ' देवा काहीतरी कर, कर ना काहीतरी '
ती अजूनही शोधतच होती. मी गेलो आणि तिने  ते बघितलं. माहित नाही का ?  पण मला ते देऊ वाटत नव्हत. ती पुढ आली, काही म्हणायच्या आत मी पुढ केल " हेच ना "अस म्हणत तिला दिल. आणि " जातो आता " म्हणत निघणार तेवढ्यात "जातो नाही येतो म्हणावं!" असा आवाज आला.मी थांबलो आणि म्हटल " हे जग खूप मोठं आहे येतो म्हटल्याने परत थोडी भेट होणार आहे " यावर ती म्हणाली " या आधी कधी झाली नव्हती आज झाली,यापुढेही होईल" काय बोलाव कळेना. मी स्तभ्य झालो होतो. काही क्षण फक्त तिच्याकडे पाहून होतो मी. "काही बोलायचं " अस म्हणत तिने मला भानात आणलं. मी थोड्या वेळ थांबून म्हटल " तुम्ही रोज इथे येता ." ती' हो ' अस म्हणाली. मला खूप बोलाव वाटत होत पण सुचत नव्हतं. पुढून bus आली ती जाणार तेवढ्यात मी म्हटल " येतो म्हटल्याने भेट होत असेल तर आपली भेट पुन्हा कधी होईल?"
ती सौम्य हसली आणि म्हणाली " नक्कीच आपली भेट होईल " तिच ते हसू अजून मला आठवत आणि ते हसू आठवत तिचा हात हातात घेऊन मी बसतो . हो....! तिच्याशी माझं लग्न झाल. खूप कष्टाने ! पण आजही त्या कानातल्याचे मी खूप आभार मानतो.
तिला मनवन सोप नव्हत पण देव कृपेने माझी "स्वप्न  सुंदरी " माझ्या खऱ्या आयुष्यात उतरली. त्या दिवसा नंतर आमची भेट रोज होत गेली आणि काही दिवसांनीच आमची भेट आमच्या मंडपात झाली अंतरपाटाच्या आडं......! ☺️
                
                                   Anuja sanap..🖤

@Marathi_Kavita
🌷🥀🥀मराठी कविता 🥀🥀🌷

नवीन स्वप्नं घेऊन बाहेर गावी शाळेला निघालो होतो,‌मनात खूप जिद्द होती की काहितरी करायचं, आईवडीलापासून दुर रहाणं कठिण होत... आठवण खुप यायची,पण नंतर हळूहळू वेड्या मनाला समजावलं...
आठवीच वर्ष मन लावून, जीव ओतून अभ्यास केला, त्यालाच सर्वस्व मानलं,पण‌ कुठे तरी एका मैत्रिणीची कमतरता होती, मी अतिशय शांत,सरळ, स्वतः मधेच गुंग...
खूप बोलाव वाटायचं पण कुणी आपलसं नसायचं..पण माझ्या सारख्या शांत स्वभावाला तोंड देण्यासाठी ती माझ्या जीवनात आली, वाटलं पण नव्हतं तिच्याकडं कधी नजर वर करून बघितल पण नव्हतं,आज तिच्याशिवाय दिवसांची सुरुवात पण होत नाही...
दिसायला खूप सुंदर, लाखांच्या गर्दीत सुद्धा उमटुन पडेल‌‌ अशी..
पण ती काय फक्त माझीच हिरोईन नव्हती बरं, खूप जणं तीचे फँन होते..
बिनधास्त मनाची,जशाला तशी‌ वागणारी, दुसऱ्यांना हसवणारी, कधी मलापण हसवेल..
बोलता बोलता कधी एकमेकांची सवय लागली कळालच नाही, काही वेळासाठी जर ती‌ नाही दिसायची तर मन‌ खूप अशांत व्हायचं...
तिन माझ्या शांत स्वभावाला कधी स्वतंत्र केल‌ कळाल‌ पण नाही...
खुप छान आठवणी आहेत माझ्याकडे तीच्या,ज्या आठवल्यावर केव्हा त्या प्रेमळ विश्वात जाऊन येतो‌  हे‌ पण मुळीच कळतं नाही...
म्हणतात ना " आयुष्यात एकदा तरी अशी व्यक्ती भेटते, ती निस्वार्थी पणे आपल्यावर प्रेम करते"!!
आणि गंमत म्हणजे हे माहिती असूनही की ती व्यक्ती कधीही आपली होणार नाही...
तिन मला खूप काही शिकवलं,आज प्रत्येक  क्षणी मला जर यश भेटतय ना,त्यात तिचा मोलाचा वाटा आहे...
ति नेहमी म्हणायची"जे होतं ते चांगल्यासाठीच "तीचे हेच शब्द मला अपयश मिळालेल्या गोष्टी सुधारण्यासाठी मदत करतात...
पण माझी देवाला आणि माझ्या आयुष्याला एक तक्रार आहे कि
"" मला तु सर्व काही दिलं पण तीला का माझ्या आयुष्यात दिलं नाही??""

हाच विचार कधीतरी मनात येतो आणि तेवढ्यातच तिचे शब्द कानावर पडतात" जे‌ होतं ते चांगल्यासाठीच ""...


                              @ Someone

@Marathi_Kavita
स्वतःशी प्रामाणिक असणारी व्यक्ती कधीच दुसऱ्याला फसवू शकतं नाही। कारण तिला चांगल्याप्रकारे माहिती असतं की
कोणाला फसवून तात्पुरत सुख मिळु शकते
मात्र आयुष्यभर समाधानी राहण्याकरिता प्रमाणिकपणाची शिदोरी आपल्याकडे असावी लागते!,,,✍🏻

ओमMशेळके
एकमन#लेखक
 
@Ommshelke

@Marathi_Kavita
किती बरे झाले असते..

किती बरे झाले असते...
प्रेम विकत मिळाले असते..
प्रेम भंगाच्या जाळ्यातून
कित्येक पक्षी उडाले असते..

नसते मजनू, रांझे गावागावाला..
नसते अश्रू हिर, लैलेला..
चहूकडे प्रेम प्रेम असते
विराम असता अखेरच्या धोकाधडीला..

नसते काटे चालतांना पायाला..
नसते फाटे शांत रस्त्याला..
फुलांनी बहरलला असता प्रवास..
नसती ऊन कोमल पाकळीला ..

नसत्या जखमा अंतरी हृदयाला..
नसता कचऱ्याचा बहाणा डोळ्याला..
मनसोक्त हसणे झाले असते
नसता एकांत लपून रडण्याला..

नसता विरह शुद्ध प्रेमाला..
नसता दुःखाचा आरव मनाला..
प्रत्येक प्रेमी असता हर्षित
नसती कारणे एकटे जगण्याला..

नसते कवी, कवित्व संमेलनाला..
नसते शब्दांचे आधार विरहाला..
राम राम शोकाला असता
नसती दाद दुःखद विलापिकेला..

नसती किंमत रंगीबेरंगी पाण्याला..
अश्रू निघतांना घोट घोट पिण्याला..
मद्यालय, मधुशाला बंद असत्या
नसती औषधांची उपमा दारूला..

नसते प्रश्न अखेरच्या उत्तराला..
नसता कागद मृत्यू लिहिण्याला..
आत्महत्येलाही पर्याय असता
नसती शांतता पांचतत्वाच्या पिंजऱ्याला..

नसता विषाचा कलश हाताला..
त्रास उगाच सुरेख देहाला..
भरला असता चंद्र अमृताने
नसती अमावस्या त्याच्या प्रकाशाला..

नसता दोरीचा हार गळ्याला..
त्रास उगाच फिरत्या पंख्याला..
स्तुलाशी शोभले असते फुलदाने
विराम असता लटकण्याला..

@ते.अ.भागवत

#प्रेमिला

@Marathi_Kavita
आयुष्य सुगंधी करावे वाटले फुलांनी पण;
माळरानावर उमलत्या चाफेकळीस टाळले मी

कित्येक गेले निखारे जवळून अताशा तरीही
ऐन पावसात नेमकी, बघ तुझ्यावर भाळले मी

कधीकाळी स्मृतीपर्णावर रेखाटलेले सुख होते
तेच पुस्तक, तेच पान , हजारदा चाळले मी

हृदयामध्ये साठलेले जेवढेही स्नेह होते
होय नशीबा! तेवढेही आसवांतच गाळले मी

प्राक्तनात माझ्या तसे तर,लिहिलेले दु:ख नव्हते
पण तुझ्या सहवेदनेला दु:खातही सांभाळले मी

साक्षी पवार, औरंगाबाद

@Marathi_Kavita
तू गंध फुलांचा

तू गंध फुलांचा
मज मोहून जातो
मी वाऱ्यापरी
तुझ्यात वाहून जातो

तू ऋतू पावसाळी
मी भिजून जातो
तू वाहणारी नदी
मी सागरापरी वाट पाहतो

तू मखमली चादर
मी स्वप्न चांदण्यात राहतो
तू निशब्द पाखरू
मी नजरेत त्या मज शोधतो.....

                  @PrashantMore

@Marathi_Kavita
तात्यासाहेब महात्मा जोतिबा फुले जयंती विशेष

ज्यांनी स्त्री शिक्षणाची सुरूवात केली,
अस्पृश्यता व जातीभेदाला सुरूंग लावला,
आधुनिक भारताचा पाया रचला,
भारतीयांना विज्ञानवादी दृष्टिकोन दिला,
ज्यांच्या मुळे आम्हाला खरे छ. शिवाजी महाराज कळाले,
त्या सत्यशोधक, क्रांतीसुर्य, तात्यासाहेब

महात्मा जोतीराव फुले यांना 196 व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..!!
🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐💐

#ThanksPhuleAmbedkar

@Marathi_Kavita
भीमजयंतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा💐🙏

@Marathi_Kavita
भीमजयंतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा💐🙏💙

@Marathi_Kavita
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
बाबासाहेब
    [ एक अमोल विचार.. 📝 ]

तुमच्या विचारांच्या लढ्याने
तुम्ही समाजाला लढवलं,
बाबासाहेब तुम्ही आमच्यासाठी
पुर्ण संविधानच घडवलं..
भुकेची जाणीव होती तुम्हा,
होती अन्यायाची, आज्ञानाची खंत..
तुमच्या पेनाच्या टोकावर,
आज होतात आपल्या समाजातील
मुलं महंत..
गल्लीच्छ राजकारणात देखील
तुम्ही समाजकारण शोधलं..
आपल्या गरीब जनतेसाठी असं वाटतं,
जनु तुम्ही आमचं नशीबच मोजलं..
धन्य आहात तुम्ही,
जे आमच्या कष्टाच्या घामावर केली होती
तुम्ही सही..
आज तुमच्यामुळेच मिळत आहे
घरोघरी पेन आणि वही..
पेनाची ताकत आज देशालाही समजतीये,
आज सुशिक्षित व्यक्तीच्या काळजात छवी
साहेब तुमचीच उमलतीये..
धन्य झाले जीवन‌ आमचे,
लाभले आम्हास भाग्यविधाते तुम्ही..
शतशः अभिवादन करतो,
आणि या विश्वासाठी,
नक्कीच कामी येवू आम्ही..
तुमच्या विचारांची प्रेरणा
नक्कीच रुजवू आम्ही..

💙 ..जय भीम.. 💙
- अमोल मोरे.. ✍🏻
@AmolmoreAm

@Marathi_Kavita