MahaTransco
84 subscribers
287 photos
16 videos
1 file
11 links
MahaTransco, a wholely owned corporate entity under the Maharashtra Government.
Download Telegram
Scan to view our Mahatransco Dairy (English & Marathi), Executive Planner (VIP Diary) & Calendar-2024

#Digital_India #Digital_Mahatransco #Scan_QR #MSETCL
मराठी भाषा संवर्धन पंधरवडयानिमित्त आयोजिलेल्या कार्यक्रमाचे विविध वृत्तपत्रांनी केलेले कव्हरेज.
फोटोओळी : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या (महापारेषण) वतीने भाईंदर येथील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्ये आयोजिलेल्या दोन दिवसीय स्वयंचलन (ऑटोमेशन) परिषदेचे उदघाटन करताना महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमार. शेजारी संचालक (संचलन) श्री. संदीप कलंत्री, मुख्य अभियंता श्री. शशांक जेवळीकर, श्री. महेश भागवत.
------------------------------------
अभियंत्यांनी नावीन्यपूर्ण कामांवर भर द्यावा : डॉ. संजीव कुमार
-------
महापारेषणची दोन दिवसीय स्वयंचलन परिषद
---------------------
मुंबई, दि. २२ : विजक्षेत्रात झपाट्याने मोठे बदल होत आहेत. विशेषतः तंत्रज्ञानामुळे विजक्षेत्रात आमुलाग्र क्रांती झाली आहे. त्यामुळे अभियंत्यांनी आपल्या कामांमध्ये सुधारणा करून नावीन्यपूर्ण कामे करण्यांवर भर दिला पाहिजे``, असे आवाहन महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमार (भा.प्र.से.) यांनी केले.

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी (महापारेषण) च्या वतीने भाईंदर येथील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी येथे दोन दिवसीय स्वयंचलन (ऑटोमेशन) परिषद आयोजिली आहे. या परिषदेचे उदघाटन डॉ. संजीव कुमार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी उपस्थित अभियंत्यांना मार्गदर्शन करताना डॉ. संजीव कुमार बोलत होते. याप्रसंगी महापारेषणचे संचालक (संचलन) श्री. संदीप कलंत्री, कार्यकारी संचालक (संचलन) श्री. रोहिदास मस्के, स्वयंचलन, दूरसंचारण, नवकल्पना व विद्युत संरक्षण प्रणालीचे मुख्य अभियंता श्री. शशांत जेवळीकर, राज्य भार प्रेषण केंद्राचे मुख्य अभियंता श्री. महेश भागवत, मुख्य अभियंता श्री. पीयूष शर्मा उपस्थित होते.

डॉ. संजीव कुमार पुढे म्हणाले, गेल्या दोन दशकात विजक्षेत्रात वेगाने बदल होत आहेत. त्यामुळे अभियंत्यांनीही आपल्या कामांमध्ये योग्य ते बदल करून सृजनशील व नावीन्यपूर्ण उपक्रम राबवावेत. जागतिक पातळीवर कोणते बदल होत आहेत, याचा चिकित्सक अभ्यास करून आव्हानांना तोंड दिले पाहिजे.``

प्रास्ताविकात श्री. शशांक जेवळीकर यांनी महापारेषणसमोरील आव्हाने, स्वयंचलन (ऑटोमेशन) क्षेत्रातील बदल, सायबर सुरक्षा व नावीन्यपूर्ण कामे याविषयी माहिती दिली.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महापारेषणच्या स्वयंचलन व विद्युत संरक्षण प्रणालीचे अधीक्षक अभियंता श्री. विशाल वाघचौरे, श्री. सुधीर ढवळे, प्रशिक्षण विभागाचे अधीक्षक अभियंता श्री. संजीवकुमार बद्देला आणि स्वयंचलन, दूरसंचारण, नवकल्पना व विद्युत संरक्षण प्रणाली टीमने परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार श्रीमती विभावरी बाविस्कर यांनी मानले.
----------
विविध विषयांवर प्रशिक्षण घ्या-डॉ. संजीव कुमार
----
प्रशिक्षण विभागाने यापुढेही मानव संसाधन व अभियंत्यांसाठी नवनवीन विषयांवर आधारित प्रशिक्षण आयोजित केले पाहिजे. प्रशिक्षणामुळे कामांत सकारात्मक बदल होतील. आपल्या काही सूचना असतील तर थेट माझ्याशी बोला. चांगल्या सूचनांचे स्वागत करून तातडीने अंमलबजावणी करू, असे डॉ. संजीव कुमार यांनी सांगून दोन दिवसीय परिषदेला शुभेच्छा दिल्या.