*❤️मन❤️*
मन कधी झोपत नाही
मध कधी थकत नाही
मन किती असतं चंचल
स्वप्नातही स्थिर राहत नाही .....
मन कायम विचारात राहतं
मन भविष्याचा विचार करतं
मन भूतकाळात रमतं
वर्तमान काळालाही सोडत नाही....
मन अधिर मन बधिर
मन खुळं मन वेडं
मन कुठेही राहू देत
ते कोणासाठी थांबत नाही ...
मन तुझं मन माझं
मन सगळ्यांच्या मनावरचं ओझं
मनात आलं मनाला सांगायचं
सहज ओठी येईल ते बोलायचं ....
मन फुलपाखरू मन स्वच्छंदी
मन फुल मन आनंदी
मन विसरतं काट्याचं बोचणं
त्याची सल त्यालाच कळत नाही ....
मन माझं तू आता तरी समज
मन तुझं माझ्यापुढे उकल
मन आलं तुझ्यावर केव्हाच
तू मात्र समजून घेत नाही .....
❤️❤️✒️✒️❤️❤️
*सुभाष उमरकर सामनगांव नाशिक.*
मन कधी झोपत नाही
मध कधी थकत नाही
मन किती असतं चंचल
स्वप्नातही स्थिर राहत नाही .....
मन कायम विचारात राहतं
मन भविष्याचा विचार करतं
मन भूतकाळात रमतं
वर्तमान काळालाही सोडत नाही....
मन अधिर मन बधिर
मन खुळं मन वेडं
मन कुठेही राहू देत
ते कोणासाठी थांबत नाही ...
मन तुझं मन माझं
मन सगळ्यांच्या मनावरचं ओझं
मनात आलं मनाला सांगायचं
सहज ओठी येईल ते बोलायचं ....
मन फुलपाखरू मन स्वच्छंदी
मन फुल मन आनंदी
मन विसरतं काट्याचं बोचणं
त्याची सल त्यालाच कळत नाही ....
मन माझं तू आता तरी समज
मन तुझं माझ्यापुढे उकल
मन आलं तुझ्यावर केव्हाच
तू मात्र समजून घेत नाही .....
❤️❤️✒️✒️❤️❤️
*सुभाष उमरकर सामनगांव नाशिक.*
➖••[]🎋[]🎋[] #कळी []🎋[]🎋[]••➖
कळीने कळी विकावी हा भोग कोणता रे !
निरागसता निजली येथे हा न्याय कोठला रे !!
हा भक्त शारदेचा कमलेस शोधतो रे !
कोमजते बाल्यपण येथे हा न्याय कोठला रे !!
थकूनी निजेल कान्हा त्या देवकी नसे रे !
यशोदा च खास तुजला बाजार दावते रे !!
पाषाण मंदिरात तो करी स्नान दही दुधाने !
जिता कान्हा परंतु मरतो इथे भुकेने !!
असशील जरी तू कोठे उघड तव नयनास !
दे न्याय गरजवंता कर सिध्द तू स्वतःस !!
➖••[]🌱[]🌱[]🌱[]🌱[]🌱[]••➖
कळीने कळी विकावी हा भोग कोणता रे !
निरागसता निजली येथे हा न्याय कोठला रे !!
हा भक्त शारदेचा कमलेस शोधतो रे !
कोमजते बाल्यपण येथे हा न्याय कोठला रे !!
थकूनी निजेल कान्हा त्या देवकी नसे रे !
यशोदा च खास तुजला बाजार दावते रे !!
पाषाण मंदिरात तो करी स्नान दही दुधाने !
जिता कान्हा परंतु मरतो इथे भुकेने !!
असशील जरी तू कोठे उघड तव नयनास !
दे न्याय गरजवंता कर सिध्द तू स्वतःस !!
➖••[]🌱[]🌱[]🌱[]🌱[]🌱[]••➖
*आसन*
माणसं जातात मागं राहतात
फक्त त्या आठवणी ...
आणि त्याचं ते मोकळं आसन ....
ते तसंच मोकळं राहतं , राहावं !
जीवनाचा अर्थच एवढा असावा कदाचित ....!
त्याची किर्ती त्याची अपकिर्ती
सगळंच तर सोडून जातो तो
एक दिवस
क्षणाचाही विलंब न करता ....!
त्याच्या माघारी उरतात फक्त
सांत्वनाचे दोन शब्द
आणि ....
आणि शब्दात दिसणारी
फक्त हळहळ ....!
मृत्यू कुणाचीही कदर करीत नाही
कुणाचीही तमा बाळगत नाही
जीवनात येणारं ते
अनादी सत्य आहे
अनंत आंधळं चक्रीवादळ आहे ...!
आयुष्य म्हणजे काय ....?
अनेक प्रश्नातून निर्माण होणारा
जटील प्रश्न
सुखदुःखाचा पाठशिवणीचा खेळ ...!
जीवनात स्वप्नपूर्ती चा आनंद लुटायचा
अन् शेवटच्या टप्प्यात कुणाच्या तरी
सुपुर्त करायचा
म्हणुनच वाटत माणसाचं आसन
कायम मोकळच राहावं
आपण गेल्यावर ही ......!
✒️✒️✍️
*सुभाष उमरकर सामनगांव नाशिक.*
माणसं जातात मागं राहतात
फक्त त्या आठवणी ...
आणि त्याचं ते मोकळं आसन ....
ते तसंच मोकळं राहतं , राहावं !
जीवनाचा अर्थच एवढा असावा कदाचित ....!
त्याची किर्ती त्याची अपकिर्ती
सगळंच तर सोडून जातो तो
एक दिवस
क्षणाचाही विलंब न करता ....!
त्याच्या माघारी उरतात फक्त
सांत्वनाचे दोन शब्द
आणि ....
आणि शब्दात दिसणारी
फक्त हळहळ ....!
मृत्यू कुणाचीही कदर करीत नाही
कुणाचीही तमा बाळगत नाही
जीवनात येणारं ते
अनादी सत्य आहे
अनंत आंधळं चक्रीवादळ आहे ...!
आयुष्य म्हणजे काय ....?
अनेक प्रश्नातून निर्माण होणारा
जटील प्रश्न
सुखदुःखाचा पाठशिवणीचा खेळ ...!
जीवनात स्वप्नपूर्ती चा आनंद लुटायचा
अन् शेवटच्या टप्प्यात कुणाच्या तरी
सुपुर्त करायचा
म्हणुनच वाटत माणसाचं आसन
कायम मोकळच राहावं
आपण गेल्यावर ही ......!
✒️✒️✍️
*सुभाष उमरकर सामनगांव नाशिक.*
अक्षय तृतीया
अक्षय तृतीया मुहुर्त आहे शुभारंभ करण्याचा|
सोने चांदी स्थावरमत्ता खरेदी करण्याचा१
अक्षय राहील जवळी तुमच्या, जे जे तुम्ही कराल |
धन दागिने रहावयाला राजेशाही महाल२
आज जन्मले बसवेश्वर अन परशुराम भगवान |
करूया श्रद्धा भावे त्यांना आपण पदवंदन३
ध्यान करू लक्ष्मी विष्णूचे, स्मरण करू ब्रह्माचे |
पितरांसाठी तर्पण करूनी दान जलकुंभाचे४
पूजूया गौरी अन्नपूर्णा माता उमा पार्वती|
धूप दीप नैवेद्य दावूनी करू तीची आरती५
दान करारे पुण्य करारे तुम्ही आजच्या दिवशी|
आनंद सुखाच्या सदनी येतील तुमच्या अक्षय राशी६
प्रवीण देशमुख
कल्याण
अक्षय तृतीया मुहुर्त आहे शुभारंभ करण्याचा|
सोने चांदी स्थावरमत्ता खरेदी करण्याचा
अक्षय राहील जवळी तुमच्या, जे जे तुम्ही कराल |
धन दागिने रहावयाला राजेशाही महाल
आज जन्मले बसवेश्वर अन परशुराम भगवान |
करूया श्रद्धा भावे त्यांना आपण पदवंदन
ध्यान करू लक्ष्मी विष्णूचे, स्मरण करू ब्रह्माचे |
पितरांसाठी तर्पण करूनी दान जलकुंभाचे
पूजूया गौरी अन्नपूर्णा माता उमा पार्वती|
धूप दीप नैवेद्य दावूनी करू तीची आरती
दान करारे पुण्य करारे तुम्ही आजच्या दिवशी|
आनंद सुखाच्या सदनी येतील तुमच्या अक्षय राशी
प्रवीण देशमुख
कल्याण
*पोरी*
काहीच नव्हतं माझ्या कडे
तुला द्यायला
मोकळं आभाळ अन्
भेगाळलेल्या भुयी शिवाय ...
हिरव्यागार काकनात अन्
हिरव्या शालुचा पदर
डोळ्याला लावुन
तू ढसाढसा रडत होतीस
माझ्या पुढ्यात येऊन ...
कुठल्या तोंडाने समजावणार
होतो तुला मी
माझ्या डोळ्यातले अश्रू न लपवता
फाटलेले आभाळ शिवायला
मनाचे धागे पक्के असावे लागतात....
हातात सुई दोरा घेऊन
शिवल्या होत्या तुझ्या आईने
फाटलेल्या संसाराच्या वाकळी
आणि विस्कटलेल्या क्षणाची घडी ...
मी फक्त बघत होतो
तिच्या नजरेतला विश्वास
आणि
तुझ्या भविष्याची धडपड ...
पोरी मीही लढलो झगडलो
माझ्या नशिबा सोबत
फक्त तुझ्यासाठी ..
आज आनंद ओसंडून वाहतो आहे
माझ्या अतंरमनात
तुझ्यात साक्षात लक्ष्मीचं रुप पाहून ....
पण
तुझ्या पासून विभक्त होण्याचे
दुःख नाही लपवता येत मला
मनसोक्त रडावसं वाटत
तुझ्या खांद्यावर डोकं ठेवून ...
पुन्हा वाटतं
मला रडताना पाहून
तुझ्या आईच्या फोटोतुन
अश्रुंचा बांध फुटला तर ?
या आनंदी क्षणासाठीच तर तिने
साठवुन ठेवले नव्हते ना
अश्रुचे तळे ....
म्हणूनच म्हणतो काय देऊ तुला
तेवढीच आठवण जपुन ठेवली मी
तुझा नवा फुलणारा संसार पाहण्यासाठी ....
✒️✒️
*सुभाष उमरकर सामनगांव नाशिक.*
काहीच नव्हतं माझ्या कडे
तुला द्यायला
मोकळं आभाळ अन्
भेगाळलेल्या भुयी शिवाय ...
हिरव्यागार काकनात अन्
हिरव्या शालुचा पदर
डोळ्याला लावुन
तू ढसाढसा रडत होतीस
माझ्या पुढ्यात येऊन ...
कुठल्या तोंडाने समजावणार
होतो तुला मी
माझ्या डोळ्यातले अश्रू न लपवता
फाटलेले आभाळ शिवायला
मनाचे धागे पक्के असावे लागतात....
हातात सुई दोरा घेऊन
शिवल्या होत्या तुझ्या आईने
फाटलेल्या संसाराच्या वाकळी
आणि विस्कटलेल्या क्षणाची घडी ...
मी फक्त बघत होतो
तिच्या नजरेतला विश्वास
आणि
तुझ्या भविष्याची धडपड ...
पोरी मीही लढलो झगडलो
माझ्या नशिबा सोबत
फक्त तुझ्यासाठी ..
आज आनंद ओसंडून वाहतो आहे
माझ्या अतंरमनात
तुझ्यात साक्षात लक्ष्मीचं रुप पाहून ....
पण
तुझ्या पासून विभक्त होण्याचे
दुःख नाही लपवता येत मला
मनसोक्त रडावसं वाटत
तुझ्या खांद्यावर डोकं ठेवून ...
पुन्हा वाटतं
मला रडताना पाहून
तुझ्या आईच्या फोटोतुन
अश्रुंचा बांध फुटला तर ?
या आनंदी क्षणासाठीच तर तिने
साठवुन ठेवले नव्हते ना
अश्रुचे तळे ....
म्हणूनच म्हणतो काय देऊ तुला
तेवढीच आठवण जपुन ठेवली मी
तुझा नवा फुलणारा संसार पाहण्यासाठी ....
✒️✒️
*सुभाष उमरकर सामनगांव नाशिक.*
कुठून सुचतं असं
एकटं एकटं बोलायला
मनातले भाव असे
शब्दात मांडायला ...
खोटं बोलत नाही आरसा
हे स्वतः ला कळतं
जगा समोर व्यक्त होताना
मन का डगमगतं ...
ओरडून सांगावे जगाला
असं तू म्हणतेस
मनाचा तो परिघ मात्र
स्वतः तूच आखतेस....
नको शब्दांचे आराखडे
नको दिखाव्याचे भाव
आरशालाच माहित असतो
घट्ट पा-याचा ठाव . ...
कोणती असते दिशा
आयुष्य जगताना
पुसले जातात ठसे
पुढे पुढे चालताना .....
द्यावा हात कधी
असतो जो सोबतीला
वेळ पुन्हा येत नाही
जीवनात संगतीला ....
✒️✒️
*सुभाष उमरकर सामनगांव नाशिक.*
एकटं एकटं बोलायला
मनातले भाव असे
शब्दात मांडायला ...
खोटं बोलत नाही आरसा
हे स्वतः ला कळतं
जगा समोर व्यक्त होताना
मन का डगमगतं ...
ओरडून सांगावे जगाला
असं तू म्हणतेस
मनाचा तो परिघ मात्र
स्वतः तूच आखतेस....
नको शब्दांचे आराखडे
नको दिखाव्याचे भाव
आरशालाच माहित असतो
घट्ट पा-याचा ठाव . ...
कोणती असते दिशा
आयुष्य जगताना
पुसले जातात ठसे
पुढे पुढे चालताना .....
द्यावा हात कधी
असतो जो सोबतीला
वेळ पुन्हा येत नाही
जीवनात संगतीला ....
✒️✒️
*सुभाष उमरकर सामनगांव नाशिक.*
*निभांरा*
किती जळाला तू लोकांवर
आता सरणावर काय
जळणार आहेस ?
सुक्या सोबत ओलंही जळतं
ही म्हण काय खोटी ठरवणार आहेस .....?
स्वार्थापोटी राज्या तु
आपल्याला नाही सोडलं ...
सुखाच्या शोधात मग
दुःखाला ही डावललं ...!
भेदभाव द्वेश मत्सर सारे
तू अंगाखांद्यावर खेळवले ...
अहमपणात राज्या तू
आई-बाप ही गमावले ...!
ओसरी च्या खाटेचा बघ
आता पाळणा झाला ...
पदराच्या झोळीचा दोर
केव्हाच तुटून गेला ....!
दारावर तोरण तू
किती नवसानं बांधलं होतं ...
हंगाम असु दे कोणाही
बापाचं रक्त गोठलं होतं ...!
सगे सोयरे तर तुला
तेव्हाच परके झाले ...
दोन बुक शिकवुन बापानं
हे स्वप्न नव्हते पाहीले ....!
म्हणुनच म्हणतो राज्या
तेवढा निभांरा जपुन ठेव ..
जगशील तोवर सावली देईल
तेवढी आठवण शिल्लक ठेव ...!
तुझ्या नंतर दोन पिढ्या
याद तुझी ठेवतील ...
घास काढताना पित्राचा
कावळे झाडावर शोधतील ...!
✒️✒️
*सुभाष उमरकर सामनगांव नाशिक.*
किती जळाला तू लोकांवर
आता सरणावर काय
जळणार आहेस ?
सुक्या सोबत ओलंही जळतं
ही म्हण काय खोटी ठरवणार आहेस .....?
स्वार्थापोटी राज्या तु
आपल्याला नाही सोडलं ...
सुखाच्या शोधात मग
दुःखाला ही डावललं ...!
भेदभाव द्वेश मत्सर सारे
तू अंगाखांद्यावर खेळवले ...
अहमपणात राज्या तू
आई-बाप ही गमावले ...!
ओसरी च्या खाटेचा बघ
आता पाळणा झाला ...
पदराच्या झोळीचा दोर
केव्हाच तुटून गेला ....!
दारावर तोरण तू
किती नवसानं बांधलं होतं ...
हंगाम असु दे कोणाही
बापाचं रक्त गोठलं होतं ...!
सगे सोयरे तर तुला
तेव्हाच परके झाले ...
दोन बुक शिकवुन बापानं
हे स्वप्न नव्हते पाहीले ....!
म्हणुनच म्हणतो राज्या
तेवढा निभांरा जपुन ठेव ..
जगशील तोवर सावली देईल
तेवढी आठवण शिल्लक ठेव ...!
तुझ्या नंतर दोन पिढ्या
याद तुझी ठेवतील ...
घास काढताना पित्राचा
कावळे झाडावर शोधतील ...!
✒️✒️
*सुभाष उमरकर सामनगांव नाशिक.*
*डायरी*
कवितेच्या डायरीला
केव्हा तरी हळूच
कान लावुन पाहशील
तेव्हा तुला
अलगदपणे ऐकु येतील
समजुतदार पण
दाबलेले हुंदके
लिहू लिहू म्हणता
राहून गेलेल्या अर्धवट व्यथा
धास्तावलेले शब्द
थरथरणा-या ओळी
कदाचित पोहचणार नाहीत
तुझ्या पर्यंत म्हणून
अडुन राहीलेल्या हाका
काट मारुन खोडलेले
कितीतरी मजकूर
आनुन धैर्य
पुन्हा कुजबुजतील काहीतरी
आणि -
काही शब्दात नसणारी
आठवणीचे मोरपीस
तुला पाहून पुन्हा मोहरतील
मग तू हसशील स्वतःशी
डायरी वर उमटलेल्या कळ्या ठेवून
वाट पाहशील माझ्या परतीची ...
✒️✒️
*सुभाष उमरकर सामनगांव नाशिक.*
कवितेच्या डायरीला
केव्हा तरी हळूच
कान लावुन पाहशील
तेव्हा तुला
अलगदपणे ऐकु येतील
समजुतदार पण
दाबलेले हुंदके
लिहू लिहू म्हणता
राहून गेलेल्या अर्धवट व्यथा
धास्तावलेले शब्द
थरथरणा-या ओळी
कदाचित पोहचणार नाहीत
तुझ्या पर्यंत म्हणून
अडुन राहीलेल्या हाका
काट मारुन खोडलेले
कितीतरी मजकूर
आनुन धैर्य
पुन्हा कुजबुजतील काहीतरी
आणि -
काही शब्दात नसणारी
आठवणीचे मोरपीस
तुला पाहून पुन्हा मोहरतील
मग तू हसशील स्वतःशी
डायरी वर उमटलेल्या कळ्या ठेवून
वाट पाहशील माझ्या परतीची ...
✒️✒️
*सुभाष उमरकर सामनगांव नाशिक.*
📌
*अलक*
शालेय जीवनात परिक्षेत पेपर सोडवताना त्याला सर्वात जास्त रिकाम्या जागा भरायला आवडायच्या .
*पालक सभेत त्याला कोणी तरी विचारले " तुम्ही तुमच्या आयुष्यात आईवडीलांची रिकामी जागा कशी भरून काढली ?" तेव्हा मात्र त्याला जीवनात निर्माण झालेल्या पोकळी ची जाणीव झाली.*
✒️
*सुभाष उमरकर,सामनगांव नाशिक.*
*अलक*
शालेय जीवनात परिक्षेत पेपर सोडवताना त्याला सर्वात जास्त रिकाम्या जागा भरायला आवडायच्या .
*पालक सभेत त्याला कोणी तरी विचारले " तुम्ही तुमच्या आयुष्यात आईवडीलांची रिकामी जागा कशी भरून काढली ?" तेव्हा मात्र त्याला जीवनात निर्माण झालेल्या पोकळी ची जाणीव झाली.*
✒️
*सुभाष उमरकर,सामनगांव नाशिक.*
*सुतार*
लिहिण्यास गाथा प्रेमाची
कथा बाकी आहे
लिहिले असंख्य रकाने
व्यथा बाकी आहे .....!!
होतात पाने काळी
लेखनाची आवड झाली
लिहिले मी काही बाही
बहाणे बाकी आहे ....!!
छंद जडला अतोनात
मला तुला वाचण्याचा
मन वाचले ना कधी तू
कारणे बाकी आहे....!!
धुळ खात पडली जिंदगानी
माझी पुस्तकां सारखी
निरुत्साही शरीराचे बघ
कुजणे बाकी आहे ...!!
हौदोस माजला वाळवीचा
आतून पोकळ झालो
दिखावा असतो वरवरचा
पावडर होणे बाकी आहे.....!!
जात कारागिरीची माझी
रोज लाकडा सवे खेळतो
जळणार त्यातच मी
सरण रचणे बाकी आहे ....!!
✒️✒️
*सुभाष उमरकर सामनगांव नाशिक*
लिहिण्यास गाथा प्रेमाची
कथा बाकी आहे
लिहिले असंख्य रकाने
व्यथा बाकी आहे .....!!
होतात पाने काळी
लेखनाची आवड झाली
लिहिले मी काही बाही
बहाणे बाकी आहे ....!!
छंद जडला अतोनात
मला तुला वाचण्याचा
मन वाचले ना कधी तू
कारणे बाकी आहे....!!
धुळ खात पडली जिंदगानी
माझी पुस्तकां सारखी
निरुत्साही शरीराचे बघ
कुजणे बाकी आहे ...!!
हौदोस माजला वाळवीचा
आतून पोकळ झालो
दिखावा असतो वरवरचा
पावडर होणे बाकी आहे.....!!
जात कारागिरीची माझी
रोज लाकडा सवे खेळतो
जळणार त्यातच मी
सरण रचणे बाकी आहे ....!!
✒️✒️
*सुभाष उमरकर सामनगांव नाशिक*
पावसा
आग ओकतो रवी रोज तो, तापली पृथ्वी धरणी
नको देवूस हुलकावणी राजसा, जगत मागते पाणीधृ
वृषभ नांगरे शेत, पाहतो कास्तकार आकाशी
झाडाच्या शेंड्यावरी बसला, चोच उघडूनी पक्षी
डोंगर सारे तहानलेले, नद्यांची उठली ठाणी
आळविती रे भाट तुजला, गाऊनी तव गाणी१
कोरडा मृग तो गेला, कळेना मजला कोठे तू लपला
घामाच्या लागल्या धारा, जीव प्राण कंठाशी आला
काळे मेघ दिसोत मजला, लवकरी नभांगणी
वाट पाहते सृष्टी तुझीया पावलांची अंगणी२
वारा वाहतो देत कल्पना तुझ्या आगमनाची
घरटी बांधून काक तयारी करतो स्वागताची
तयार होवून उभा कधीचा मयूर रानी वनी
येरे येरे सख्या पावसा भू वरती तू झणी३
प्रवीण श्रीराम देशमुख
कल्याण
आग ओकतो रवी रोज तो, तापली पृथ्वी धरणी
नको देवूस हुलकावणी राजसा, जगत मागते पाणी
वृषभ नांगरे शेत, पाहतो कास्तकार आकाशी
झाडाच्या शेंड्यावरी बसला, चोच उघडूनी पक्षी
डोंगर सारे तहानलेले, नद्यांची उठली ठाणी
आळविती रे भाट तुजला, गाऊनी तव गाणी
कोरडा मृग तो गेला, कळेना मजला कोठे तू लपला
घामाच्या लागल्या धारा, जीव प्राण कंठाशी आला
काळे मेघ दिसोत मजला, लवकरी नभांगणी
वाट पाहते सृष्टी तुझीया पावलांची अंगणी
वारा वाहतो देत कल्पना तुझ्या आगमनाची
घरटी बांधून काक तयारी करतो स्वागताची
तयार होवून उभा कधीचा मयूर रानी वनी
येरे येरे सख्या पावसा भू वरती तू झणी
प्रवीण श्रीराम देशमुख
कल्याण
*पावसा तू*
वाटेतच अडकलाय तू
की वाटच आपली विसरला तू ...?
दाटून येतो कधी
नभ काळेभोर होते
वाटतं बरसेल मनसोक्त
बरसायचे विसरला तू ....?
कुठे सुसाट वेगाने
सुटला बेभान वारा
कुठे पडतात अवकाळी
डोळ्यातून अश्रुंच्या गारा
गोठलेल्या मनाला रे
का सावरायचा विसरला तू.....?
ठक्क पडली भुमी
भेगा पडल्या काळजाला
नांगरुन वखरुन झाल्या जमीनी
शिनले डोळे वाट पाहून
येता येता असा कसा
अश्रू पुसायचे विसरला तू ..?
पिवळं पडलं शिवार
खापड झाली जनावरे
लाही लाही झाली अंगांची
कोरडी पडली पाणवठे
ओल मायेची असता
असा कसा अचानक
पाझरायचा विसरला तू ...?
*सुभाष उमरकर सामनगांव नाशिक.*
वाटेतच अडकलाय तू
की वाटच आपली विसरला तू ...?
दाटून येतो कधी
नभ काळेभोर होते
वाटतं बरसेल मनसोक्त
बरसायचे विसरला तू ....?
कुठे सुसाट वेगाने
सुटला बेभान वारा
कुठे पडतात अवकाळी
डोळ्यातून अश्रुंच्या गारा
गोठलेल्या मनाला रे
का सावरायचा विसरला तू.....?
ठक्क पडली भुमी
भेगा पडल्या काळजाला
नांगरुन वखरुन झाल्या जमीनी
शिनले डोळे वाट पाहून
येता येता असा कसा
अश्रू पुसायचे विसरला तू ..?
पिवळं पडलं शिवार
खापड झाली जनावरे
लाही लाही झाली अंगांची
कोरडी पडली पाणवठे
ओल मायेची असता
असा कसा अचानक
पाझरायचा विसरला तू ...?
*सुभाष उमरकर सामनगांव नाशिक.*
सुप्रभात
मारूती राया हिंमत देधृ
असुर माजले पृथ्वीवरती, तयांचा बिमोड आम्हा करू दे|
त्यासाठी देई शक्ती आम्हा, आशीर्वाद विजयाचा दे१
बलभीमा तू बल आम्हा दे, सुदृढ शरीर, खंबीर मन दे|
व्यायामाची आवड आम्हा दे,करी निर्भय,धैर्य अंगी दे२
रामभक्तीने आसमंत भरू दे, शूर वीर आम्हा होवू दे|
शक्ती बुद्धीचा वापर करूनी, दुर्जन सारे नष्ट करू दे३
हे हनुमंता पवनसुता हे, सक्रिय सज्जन शक्ती होवू दे|
आदर्श तुझा ठेवूनिया, समस्त रावण लंका जळू दे४
प्रवीण देशमुख
कल्याण
मारूती राया हिंमत दे
असुर माजले पृथ्वीवरती, तयांचा बिमोड आम्हा करू दे|
त्यासाठी देई शक्ती आम्हा, आशीर्वाद विजयाचा दे
बलभीमा तू बल आम्हा दे, सुदृढ शरीर, खंबीर मन दे|
व्यायामाची आवड आम्हा दे,करी निर्भय,धैर्य अंगी दे
रामभक्तीने आसमंत भरू दे, शूर वीर आम्हा होवू दे|
शक्ती बुद्धीचा वापर करूनी, दुर्जन सारे नष्ट करू दे
हे हनुमंता पवनसुता हे, सक्रिय सज्जन शक्ती होवू दे|
आदर्श तुझा ठेवूनिया, समस्त रावण लंका जळू दे
प्रवीण देशमुख
कल्याण
*बाप*
माझा काय , तुमचा काय
ह्याचा काय आन् त्याचा काय
सर्वांना मी एकच सांगतो
बाप हा बापच असतो !!धृ!!
स्वतः करतो काम
स्वतः कमावतो दाम
लेकराबाळासाठीच तो
काढीत असतो घाम
का आन् कुणास ठाऊक
सर्वांनाच तो वाईट असतो!!१!!
सर्वांना मी एकच सांगतो
बाप हा बापच असतो
कुणाच्या जिवावर सांगा
करता तुम्ही हिंमत
जन्मदात्या बापालाच का?
देत नाहीत किंमत
चुका केल्या तुम्ही कितीही
तोच माफ करीत असतो!!२!!
सर्वांना मी एकच सांगतो
बाप हा बापच असतो
तुमच्याच शिक्षणापायी
कर्जबाजारी होत असतो
बहिणीच्या लग्नासाठी
सावकाराचा पाय धरतो
लेक जाता सासरी
काळजातून रडत असतो!!३!!
सर्वांना मी एकच सांगतो
बाप हा बापच असतो
सारं आयुष्य त्यानं
तुझ्यासाठीच घातलं
गरज होती तुझी तवा
तु घराबाहेर काढलं
वृद्धाश्रमात राहूनही
प्रत्येक अश्रूत तुलाच पाहतो!!४!!
सर्वांना मी एकच सांगतो
बाप हा बापच असतो
©®ग्रामीण कवी श्रीराम घडे
परभणी
मो 8806042660
माझा काय , तुमचा काय
ह्याचा काय आन् त्याचा काय
सर्वांना मी एकच सांगतो
बाप हा बापच असतो !!धृ!!
स्वतः करतो काम
स्वतः कमावतो दाम
लेकराबाळासाठीच तो
काढीत असतो घाम
का आन् कुणास ठाऊक
सर्वांनाच तो वाईट असतो!!१!!
सर्वांना मी एकच सांगतो
बाप हा बापच असतो
कुणाच्या जिवावर सांगा
करता तुम्ही हिंमत
जन्मदात्या बापालाच का?
देत नाहीत किंमत
चुका केल्या तुम्ही कितीही
तोच माफ करीत असतो!!२!!
सर्वांना मी एकच सांगतो
बाप हा बापच असतो
तुमच्याच शिक्षणापायी
कर्जबाजारी होत असतो
बहिणीच्या लग्नासाठी
सावकाराचा पाय धरतो
लेक जाता सासरी
काळजातून रडत असतो!!३!!
सर्वांना मी एकच सांगतो
बाप हा बापच असतो
सारं आयुष्य त्यानं
तुझ्यासाठीच घातलं
गरज होती तुझी तवा
तु घराबाहेर काढलं
वृद्धाश्रमात राहूनही
प्रत्येक अश्रूत तुलाच पाहतो!!४!!
सर्वांना मी एकच सांगतो
बाप हा बापच असतो
©®ग्रामीण कवी श्रीराम घडे
परभणी
मो 8806042660
✍️ *.. बाप ..* ✍️
बापाच मन कठीण फार,
चटकन हाती लागत नाही
आकाशाहून भव्य अन्
समुद्राची खोली असते ..
स्वच्छ ,शांत,निथळ तरी
तळ हाती लागत नाही .
बाप या शब्दाची महतीच
मोठी न्यारी असते....
समजण्यास त्याला कोणतचं
समीकरण कामास येत नाही ..
सुसूत्रता त्याच्या जगण्यातली
कोणत्याचं सूत्रात बसत नाही ..
म्हणूनच तर बापावर
कविता कोणी करत नाही !
केला खरा आज सायास,
त्याला थोडे शोधण्याचा,
जमेल तेवढा सांगितला,
आधार आमच्या असण्याचा !!
एक मात्र अगदी घरं,
त्यांच्याशिवाय जमत नाही,
आईमार्फत बोलले तरी,
बोलल्याशिवाय राहवत नाही
सोनचाफ्याचं फूल ते सुगंध
कुपीत ठरत नाही !!
*बाप नावाच्या देवाचा*
*थांग कधी लागत नाही....!!*
💞NM💞
✍️ .. सौ .नीता माळी ..
बापाच मन कठीण फार,
चटकन हाती लागत नाही
आकाशाहून भव्य अन्
समुद्राची खोली असते ..
स्वच्छ ,शांत,निथळ तरी
तळ हाती लागत नाही .
बाप या शब्दाची महतीच
मोठी न्यारी असते....
समजण्यास त्याला कोणतचं
समीकरण कामास येत नाही ..
सुसूत्रता त्याच्या जगण्यातली
कोणत्याचं सूत्रात बसत नाही ..
म्हणूनच तर बापावर
कविता कोणी करत नाही !
केला खरा आज सायास,
त्याला थोडे शोधण्याचा,
जमेल तेवढा सांगितला,
आधार आमच्या असण्याचा !!
एक मात्र अगदी घरं,
त्यांच्याशिवाय जमत नाही,
आईमार्फत बोलले तरी,
बोलल्याशिवाय राहवत नाही
सोनचाफ्याचं फूल ते सुगंध
कुपीत ठरत नाही !!
*बाप नावाच्या देवाचा*
*थांग कधी लागत नाही....!!*
💞NM💞
✍️ .. सौ .नीता माळी ..
*तुझ्या आठवणीत*
तुझ्या ओल्या आठवणी
पाऊस आठवताना
बरसाव्या जलधारा
ओंजळीत पडताना .....!!
कुठे शोधु तो ओलावा
सारं आभाळ कोरडं
कुठे पडला पाऊस
झालं काळीज कोरडं...!!
तृष्णा जागली मनाची
ढग आठवणीचे येता
सुटला बेभान वारा
मन दानोफान होता ....!!
वाट पाहतो पाहतो
डोळे चातकाचे घेतो
तुझ्या भेटीसाठी जीव
तेव्हा कासावीस होतो ...!!
कसा हा पाऊस झाला
तुझ्या सारखा निष्ठुर
नाही दया माया त्याला
नाही मातीची कदर ....!!
वाट सरली सरली
सर्जा राजाही थकला
नांगर चालेना भुई
जीव पाण्याला तळला ....!!
तुझं येणं जसं झालं
घे पाऊस सोबतीला
आस मिटेल दुष्काळी
फुलव प्रेमाचा मळा .....!!
✒️
*सुभाष उमरकर सामनगांव नाशिक.*
तुझ्या ओल्या आठवणी
पाऊस आठवताना
बरसाव्या जलधारा
ओंजळीत पडताना .....!!
कुठे शोधु तो ओलावा
सारं आभाळ कोरडं
कुठे पडला पाऊस
झालं काळीज कोरडं...!!
तृष्णा जागली मनाची
ढग आठवणीचे येता
सुटला बेभान वारा
मन दानोफान होता ....!!
वाट पाहतो पाहतो
डोळे चातकाचे घेतो
तुझ्या भेटीसाठी जीव
तेव्हा कासावीस होतो ...!!
कसा हा पाऊस झाला
तुझ्या सारखा निष्ठुर
नाही दया माया त्याला
नाही मातीची कदर ....!!
वाट सरली सरली
सर्जा राजाही थकला
नांगर चालेना भुई
जीव पाण्याला तळला ....!!
तुझं येणं जसं झालं
घे पाऊस सोबतीला
आस मिटेल दुष्काळी
फुलव प्रेमाचा मळा .....!!
✒️
*सुभाष उमरकर सामनगांव नाशिक.*
*कणात*
काय आहे जगणं ?
मुक शब्दांनी भावना मांडणं ....
थरथरत्या हाताने एकमेकांना सावरणं
एकमेकांच्या दुःखाचं गा-हाणे
एकमेकांना सांगणं ....
बस एवढंच आयुष्य आहे ..?
मी तू आणि आपन
आपन म्हणंजे नेमकं कोण ?
नाती मैत्री की समाज ....!
समाज ..??
एकत्र आलेल्या कळपाचे
एक गोंडस नामकरण ...!
कापडी तंबुच्या बांबुना
आपापल्या परीने दोर खंडाच्या
सहाय्याने उभा केलेला शामियाना ...!
हलक्याशा वा-याने हलणा-या
ह्या भक्कम भिंती ...
वादळातच सापडलो नाहीं का ?
आसरा म्हणून आडोशालाच तर
उभे असतो आपण कणात म्हणुन ...
सामान्य होऊन कुठवर तग
धरणार ..?
भावनेच्या प्रवाहात तर
केव्हाच जीर्ण झालो आहोत आम्ही ..
जमिनी पासुन अंतरा अंतरावर ...!
तू किती विश्वासाने म्हणंते
आपल्याला लढावं लागेल ...
पण प्रश्न आहे कोणा सोबत ..?
मी पराभुत योध्दा नाही ...
की रण सोडून पळणारा
रणछोडदास ही नाही ....
पण वित भर पोटाला
धारधार शस्त्राचे वार
सहण होत नाहीत आता .....!!
✒️✒️
*सुभाष उमरकर ,सामनगांव नाशिक.*
काय आहे जगणं ?
मुक शब्दांनी भावना मांडणं ....
थरथरत्या हाताने एकमेकांना सावरणं
एकमेकांच्या दुःखाचं गा-हाणे
एकमेकांना सांगणं ....
बस एवढंच आयुष्य आहे ..?
मी तू आणि आपन
आपन म्हणंजे नेमकं कोण ?
नाती मैत्री की समाज ....!
समाज ..??
एकत्र आलेल्या कळपाचे
एक गोंडस नामकरण ...!
कापडी तंबुच्या बांबुना
आपापल्या परीने दोर खंडाच्या
सहाय्याने उभा केलेला शामियाना ...!
हलक्याशा वा-याने हलणा-या
ह्या भक्कम भिंती ...
वादळातच सापडलो नाहीं का ?
आसरा म्हणून आडोशालाच तर
उभे असतो आपण कणात म्हणुन ...
सामान्य होऊन कुठवर तग
धरणार ..?
भावनेच्या प्रवाहात तर
केव्हाच जीर्ण झालो आहोत आम्ही ..
जमिनी पासुन अंतरा अंतरावर ...!
तू किती विश्वासाने म्हणंते
आपल्याला लढावं लागेल ...
पण प्रश्न आहे कोणा सोबत ..?
मी पराभुत योध्दा नाही ...
की रण सोडून पळणारा
रणछोडदास ही नाही ....
पण वित भर पोटाला
धारधार शस्त्राचे वार
सहण होत नाहीत आता .....!!
✒️✒️
*सुभाष उमरकर ,सामनगांव नाशिक.*
लढायला शस्त्र , हाती खुप होते
लढू कोणाशी मी ,समोर माझेच होते ..
खुप संयम ठेवाला ,मी न लढण्याचा
माझेच मला लढायला , भाग पाडत होते ...
रणकंदन माजले जेव्हा मी माघार घेतली
सगे सोयरेच आप- आपसात लढत होते ....
सांडले रक्त भुमीवर ,निरखून पाहिले कोणी
बदलला रंग मातीचा ,ते कोणा कळले होते ...
कोण हरले कोण जिंकले ,तमा इथे कुणाला
पांढरी पडली कपाळे कुंकू ओघळले होते ...
संधी करू कुणाशी ,धार बोथटलीच नाही
शस्त्राच्या आवाजाने सारे आसमंत दुमदुमले होते ...
अजुन किती वाहतील ,पाट रक्ताचे पाहावे
डोळे दिपून काळीज वेदनेत फाटले होते ....
✒️✒️
*सुभाष उमरकर ,सामनगांव नाशिक.*
लढू कोणाशी मी ,समोर माझेच होते ..
खुप संयम ठेवाला ,मी न लढण्याचा
माझेच मला लढायला , भाग पाडत होते ...
रणकंदन माजले जेव्हा मी माघार घेतली
सगे सोयरेच आप- आपसात लढत होते ....
सांडले रक्त भुमीवर ,निरखून पाहिले कोणी
बदलला रंग मातीचा ,ते कोणा कळले होते ...
कोण हरले कोण जिंकले ,तमा इथे कुणाला
पांढरी पडली कपाळे कुंकू ओघळले होते ...
संधी करू कुणाशी ,धार बोथटलीच नाही
शस्त्राच्या आवाजाने सारे आसमंत दुमदुमले होते ...
अजुन किती वाहतील ,पाट रक्ताचे पाहावे
डोळे दिपून काळीज वेदनेत फाटले होते ....
✒️✒️
*सुभाष उमरकर ,सामनगांव नाशिक.*
*पाऊसा पुर्वी*
तशी आगमना पुर्वीच
चाहुल दिली होती त्याने
त्याच्या येण्याची ....
आणि ती घुसमटत होती
घरच्या एकाकी चौकटीत
अश्रुंच्या पाण्याची वाफ करून ....
तो आल्या आल्याच
बरसणार होता नेहमी सारखच
सवयीचा परिणाम आणि
वादळाची तर तीने
तशी आधीच तयारी केली होती...
प्रश्र्न हा नव्हता की
गळती लागलेल्या घराला
फेरायचे कसे ...?
पण मना सारखेच
फुटलेल्या कौलांना जोडायचे कसे ...?
फाटलेल्या आभाळाला कोणी
शिवलय आजवर .....
तीला दुःख एवढंच होतं
निवा-यासाठी आडोसा शोधण्यात
तीची अख्खी हयात गेली ....
अन् त्याची येण्याची वाट
तिची पुन्हा नव्याने जागी झाली ....
ती मनाशीच आकाशाकडे पाहत पुटपुटली ...
कोसळ बाबा कोसळ नेहमी सारखाच
फक्त एवढंच कर ...
डोळ्यातल्या थेंबाला थिजवु नको
तुफान पडणा-या गारपीटी सारखा .....
✒️✒️
*सुभाष उमरकर सामनगांव नाशिक.*
तशी आगमना पुर्वीच
चाहुल दिली होती त्याने
त्याच्या येण्याची ....
आणि ती घुसमटत होती
घरच्या एकाकी चौकटीत
अश्रुंच्या पाण्याची वाफ करून ....
तो आल्या आल्याच
बरसणार होता नेहमी सारखच
सवयीचा परिणाम आणि
वादळाची तर तीने
तशी आधीच तयारी केली होती...
प्रश्र्न हा नव्हता की
गळती लागलेल्या घराला
फेरायचे कसे ...?
पण मना सारखेच
फुटलेल्या कौलांना जोडायचे कसे ...?
फाटलेल्या आभाळाला कोणी
शिवलय आजवर .....
तीला दुःख एवढंच होतं
निवा-यासाठी आडोसा शोधण्यात
तीची अख्खी हयात गेली ....
अन् त्याची येण्याची वाट
तिची पुन्हा नव्याने जागी झाली ....
ती मनाशीच आकाशाकडे पाहत पुटपुटली ...
कोसळ बाबा कोसळ नेहमी सारखाच
फक्त एवढंच कर ...
डोळ्यातल्या थेंबाला थिजवु नको
तुफान पडणा-या गारपीटी सारखा .....
✒️✒️
*सुभाष उमरकर सामनगांव नाशिक.*
चाहूल पावसाची
मान्सून झाला सक्रीय
घेऊन वादळ वक्रीय
वाटत होता परकीय
कोरडा मृग निष्क्रिय
आगमन पुर्व विदर्भात
येईल महाराष्ट्र दारात
विदर्भात बरसतो जोरात
कारण
मोठे जंगल या विदर्भात
उकाड्याने केले हैराण
जमीनीला लागली तहाण
बळीराजा गाळतो घाम
डोळे आकाशाकडे नम
कारण
शेती मालावरच त्याला मान
हुरहूर मनात मोठी होती
झुरुझुरु तन वेदना देती
करी वरूण देवाला विनंती
खगोल शास्त्राशी नाही युती
कारण
धर्म संस्कृतीची विज्ञानाला नाही संमती
हवामान खात्याच्या अंदाज
कधीच ठरला नाही घरंदाज
हुलकावणी देण्याचा बाज
ऋतु चक्र निसर्ग देते आगाज
कारण
देवभोळा भारतीय समाज
मौसमी खारे वारे परिणीती
पावसाची आखती रणनिती
आम्ही मात्र देव कृपेवरती
वर्षानुवर्षे चालू आहे गणती
कारण
श्रध्देपोटी विज्ञानाला देतो मुठमाती
चाहुल पावसाची लागता
मग्न पुजा पाठ उपवासात
नवस करुणा आर्जव विश्वासात
पर्यावरण हानी नाही ध्यानात
कारण
शुल्लक स्वार्थासाठी जंगल तोड जोरात
वसंत गवळी गोंदिया
मान्सून झाला सक्रीय
घेऊन वादळ वक्रीय
वाटत होता परकीय
कोरडा मृग निष्क्रिय
आगमन पुर्व विदर्भात
येईल महाराष्ट्र दारात
विदर्भात बरसतो जोरात
कारण
मोठे जंगल या विदर्भात
उकाड्याने केले हैराण
जमीनीला लागली तहाण
बळीराजा गाळतो घाम
डोळे आकाशाकडे नम
कारण
शेती मालावरच त्याला मान
हुरहूर मनात मोठी होती
झुरुझुरु तन वेदना देती
करी वरूण देवाला विनंती
खगोल शास्त्राशी नाही युती
कारण
धर्म संस्कृतीची विज्ञानाला नाही संमती
हवामान खात्याच्या अंदाज
कधीच ठरला नाही घरंदाज
हुलकावणी देण्याचा बाज
ऋतु चक्र निसर्ग देते आगाज
कारण
देवभोळा भारतीय समाज
मौसमी खारे वारे परिणीती
पावसाची आखती रणनिती
आम्ही मात्र देव कृपेवरती
वर्षानुवर्षे चालू आहे गणती
कारण
श्रध्देपोटी विज्ञानाला देतो मुठमाती
चाहुल पावसाची लागता
मग्न पुजा पाठ उपवासात
नवस करुणा आर्जव विश्वासात
पर्यावरण हानी नाही ध्यानात
कारण
शुल्लक स्वार्थासाठी जंगल तोड जोरात
वसंत गवळी गोंदिया