*प्रपोज डे*
❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
भलेही नकार नव्हता ,शब्दात तुझ्या
होकाराचा इशारा मला कळलाच नाही .....!!
लाख बहाणे केले तू ,मला टाळण्याचे
योग भेटीचा येणे ,जुळलाच नाही ....!!
आतूर होता जीव ,फुलपाखरचं जीणं
मोह मिलनाचा मी ,सोडलाच नाही ...!!
कधी भेटली कधी , हसुन बोलली
जीव तुझा माझ्यावर भाळलाच नाही ...!!
मी माझ्या आनंदी ,जगण्यावर भर दिला
ध्यास तुझ्या ध्येयाचा तू सोडलाच नाही ....!!
चल गडे एकदा , नव्याने जगुन पाहु
आयुष्य चार दिवसांचे ,बाकी काहीच नाही ...!!
*सुभाष उमरकर सामनगांव नाशिक*
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
भलेही नकार नव्हता ,शब्दात तुझ्या
होकाराचा इशारा मला कळलाच नाही .....!!
लाख बहाणे केले तू ,मला टाळण्याचे
योग भेटीचा येणे ,जुळलाच नाही ....!!
आतूर होता जीव ,फुलपाखरचं जीणं
मोह मिलनाचा मी ,सोडलाच नाही ...!!
कधी भेटली कधी , हसुन बोलली
जीव तुझा माझ्यावर भाळलाच नाही ...!!
मी माझ्या आनंदी ,जगण्यावर भर दिला
ध्यास तुझ्या ध्येयाचा तू सोडलाच नाही ....!!
चल गडे एकदा , नव्याने जगुन पाहु
आयुष्य चार दिवसांचे ,बाकी काहीच नाही ...!!
*सुभाष उमरकर सामनगांव नाशिक*
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
अप्रतिम लेख आहे नक्की आवडेल.
*OUT LET*
लाखो जीव घेणार्या क्रूर *हिटलरने* शेवटी आत्महत्या केली !........
सुंदर विचार देणारे *साने गुरुजी* आत्मघात करुन घेतात.
मनशक्ती नावाचं मनाला खंबीर करण्याचं शिक्षण देणारे लोणावळ्याचे *स्वामी विज्ञानानंद* मंत्रालयावरुन उडी मारुन जीव देतात.
आध्यात्मिक गुरु अशी ओळख निर्माण केलेले व कित्येकांना आधार देणारे *भैय्युजी महाराज* आपलं जीवन आपल्या हातानं संपवतात.
पॉझिटिव्ह विचार देणारा चित्रपट करुनही *सुशांत सिंग राजपुतनं* नैराश्यातून आत्महत्या केली.
-आणि आता सहा आठ महिन्यांपूर्वी नैराश्याशी लढा कसा द्यायचा हे शिकवणाऱ्या *शीतल (आमटे) करजगी* आपलं जीवन संपवतात.
-आजची नागपूरची बातमी *उच्च विद्याविभूषित, दिवंगत कुलगुरूच्या पत्नी तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ. ज्योत्स्ना मेश्राम* यांनी नवव्या माळ्यावरून उडी घेऊन नैराश्यातून आत्महत्या केली.
या काही सेलिब्रिटींच्या उदाहरणातुन काय शिकायचं आपण? ........
पाण्यात शांतपणे पोहोणारं बदक वरुन शांत दिसत असलं तरी पाण्याखाली त्याचे पाय वेगानं हलत असतात. शांत पोहोतोय हे दाखवण्यासाठी करावे लागणारे त्याचे कष्ट फक्त त्यालाच माहित असतात.
*माणुस वर वर दिसतो तितका आतून खंबीर असेलच असं नाही.* त्याच्या मनात वेगळी खळबळ असु शकते, जी आपल्यापर्यंत पोहोचत नसते किंवा तो त्या आनंदी आणि सुखी चेहर्याच्या आड लपवत असतो, लपवण्याचा प्रयत्न करत असतो. शेवटी काय...?? वर सुंदर ताजमहाल असला तरी खाली कबरच आहे हे विसरुन चालणार नाही.
भय्यूजी महाराजांनीआत्महत्या केल्या नंतर ABP माझा चॅनलने एक परिचर्चा घडवून आणली होती.
त्यात बोलताना भय्यूजी महाराजांचे मित्र - श्री. अशोक वानखेडे यांनी मानवी स्वभावाचा फार चांगला पैलू सांगितला. भैय्यूजी महाराज स्वतः एक *अध्यात्मीक* गूरू होते परंतू ते एक व्यक्ती पण होते. आपल्या मनातील *स्ट्रेस* बाहेर काढायला त्याच्या जवळ *outlet* नव्हता. डॉ. शितल आमटे (बाबा आमटे यांची नात - त्याचं ही अगदी भैयु महाराजासारखं झाले.)
*इतकं महत्वाचं असतं का हे outlet ?*
होय !!!
कोट्यावधी रूपये खर्च करून पाण्यासाठी विशाल *धरण* बांधलं आणि समजा त्याला outlet च दिले नाही तर काय होईल? निश्चितच धरण फुटेल. इतकं महत्वाचं असते हे *waste weir* ...मानवी शरीर म्हणजे विविध पंचतत्वापासून सांधलेलं एक *धरणच* आहे. या शरीरात समस्यांची आवक अति प्रमाणात झाली तर हे शरीररूपी धरण फुटेल की राहील ?
*मुंबई का तुंबते? पुरेसे outlets राहिले नाहीत.*
म्हणून आपलं outlet सदैव सताड उघडं ठेवा. आपल्या तोंडाचे *outlet* वापरून आपल्या समस्या आपल्या माणसांना सांगा. आपल्या अंर्तमनाचं outlet open करण्यासाठी meditation चा अवलंब करा आणि शक्य झाल्यास जगातील सगळ्यात मोठं *outlet* म्हणजे आपले डोळे, ते उघडा. फुटून जाऊ द्या अश्रूंचा बांध...वाहून जाऊ द्या.. स्ट्रेस, दुःख, उपेक्षा.. पिस्तुलच्या गोळीने डोक्याला छिद्र पाडण्यापेक्षा, पंख्याला लटकण्यापेक्षा.. हे केव्हाही सोपं नाही का.?
*म्हणूनच मित्र नावाच्या खांद्याचा आधार घ्या. मन मोकळं करा. बेस्ट आउटलेट परीवार आणि मित्र!*
हसा ! बोला ! रडा ! भांडा !
व्यक्त व्हा !! मुक्त व्हा.. !!
*काळजी घ्या....*
🙏😊🙏सोडून गेल्यावर *"ᴍɪss ʏᴏᴜ"* म्हणण्यापेक्षा
🙏😊🙏सोबत आहे तोपर्यंत *"ᴡɪᴛʜ ʏᴏᴜ"* म्हणा. आपुलकीची माणसं मिळायला खुप मोठं भाग्य लागतं.
*समस्त मित्राना समर्पित...*
💐🙏🙏💐
*OUT LET*
लाखो जीव घेणार्या क्रूर *हिटलरने* शेवटी आत्महत्या केली !........
सुंदर विचार देणारे *साने गुरुजी* आत्मघात करुन घेतात.
मनशक्ती नावाचं मनाला खंबीर करण्याचं शिक्षण देणारे लोणावळ्याचे *स्वामी विज्ञानानंद* मंत्रालयावरुन उडी मारुन जीव देतात.
आध्यात्मिक गुरु अशी ओळख निर्माण केलेले व कित्येकांना आधार देणारे *भैय्युजी महाराज* आपलं जीवन आपल्या हातानं संपवतात.
पॉझिटिव्ह विचार देणारा चित्रपट करुनही *सुशांत सिंग राजपुतनं* नैराश्यातून आत्महत्या केली.
-आणि आता सहा आठ महिन्यांपूर्वी नैराश्याशी लढा कसा द्यायचा हे शिकवणाऱ्या *शीतल (आमटे) करजगी* आपलं जीवन संपवतात.
-आजची नागपूरची बातमी *उच्च विद्याविभूषित, दिवंगत कुलगुरूच्या पत्नी तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ. ज्योत्स्ना मेश्राम* यांनी नवव्या माळ्यावरून उडी घेऊन नैराश्यातून आत्महत्या केली.
या काही सेलिब्रिटींच्या उदाहरणातुन काय शिकायचं आपण? ........
पाण्यात शांतपणे पोहोणारं बदक वरुन शांत दिसत असलं तरी पाण्याखाली त्याचे पाय वेगानं हलत असतात. शांत पोहोतोय हे दाखवण्यासाठी करावे लागणारे त्याचे कष्ट फक्त त्यालाच माहित असतात.
*माणुस वर वर दिसतो तितका आतून खंबीर असेलच असं नाही.* त्याच्या मनात वेगळी खळबळ असु शकते, जी आपल्यापर्यंत पोहोचत नसते किंवा तो त्या आनंदी आणि सुखी चेहर्याच्या आड लपवत असतो, लपवण्याचा प्रयत्न करत असतो. शेवटी काय...?? वर सुंदर ताजमहाल असला तरी खाली कबरच आहे हे विसरुन चालणार नाही.
भय्यूजी महाराजांनीआत्महत्या केल्या नंतर ABP माझा चॅनलने एक परिचर्चा घडवून आणली होती.
त्यात बोलताना भय्यूजी महाराजांचे मित्र - श्री. अशोक वानखेडे यांनी मानवी स्वभावाचा फार चांगला पैलू सांगितला. भैय्यूजी महाराज स्वतः एक *अध्यात्मीक* गूरू होते परंतू ते एक व्यक्ती पण होते. आपल्या मनातील *स्ट्रेस* बाहेर काढायला त्याच्या जवळ *outlet* नव्हता. डॉ. शितल आमटे (बाबा आमटे यांची नात - त्याचं ही अगदी भैयु महाराजासारखं झाले.)
*इतकं महत्वाचं असतं का हे outlet ?*
होय !!!
कोट्यावधी रूपये खर्च करून पाण्यासाठी विशाल *धरण* बांधलं आणि समजा त्याला outlet च दिले नाही तर काय होईल? निश्चितच धरण फुटेल. इतकं महत्वाचं असते हे *waste weir* ...मानवी शरीर म्हणजे विविध पंचतत्वापासून सांधलेलं एक *धरणच* आहे. या शरीरात समस्यांची आवक अति प्रमाणात झाली तर हे शरीररूपी धरण फुटेल की राहील ?
*मुंबई का तुंबते? पुरेसे outlets राहिले नाहीत.*
म्हणून आपलं outlet सदैव सताड उघडं ठेवा. आपल्या तोंडाचे *outlet* वापरून आपल्या समस्या आपल्या माणसांना सांगा. आपल्या अंर्तमनाचं outlet open करण्यासाठी meditation चा अवलंब करा आणि शक्य झाल्यास जगातील सगळ्यात मोठं *outlet* म्हणजे आपले डोळे, ते उघडा. फुटून जाऊ द्या अश्रूंचा बांध...वाहून जाऊ द्या.. स्ट्रेस, दुःख, उपेक्षा.. पिस्तुलच्या गोळीने डोक्याला छिद्र पाडण्यापेक्षा, पंख्याला लटकण्यापेक्षा.. हे केव्हाही सोपं नाही का.?
*म्हणूनच मित्र नावाच्या खांद्याचा आधार घ्या. मन मोकळं करा. बेस्ट आउटलेट परीवार आणि मित्र!*
हसा ! बोला ! रडा ! भांडा !
व्यक्त व्हा !! मुक्त व्हा.. !!
*काळजी घ्या....*
🙏😊🙏सोडून गेल्यावर *"ᴍɪss ʏᴏᴜ"* म्हणण्यापेक्षा
🙏😊🙏सोबत आहे तोपर्यंत *"ᴡɪᴛʜ ʏᴏᴜ"* म्हणा. आपुलकीची माणसं मिळायला खुप मोठं भाग्य लागतं.
*समस्त मित्राना समर्पित...*
💐🙏🙏💐
*प्रेम विरह*
प्रेम माझं तिला दिसलं नाही,
जीव तिचा माझ्यात गुंतला नाही,
वेड माझं तिला कळलं नाही,
स्वप्न पाहायचं मात्र मी सोडलं नाही..
गुलाबाचं फुल तिने घेतलं नाही,
मागे वळून सुद्धा पाहीलं नाही,
प्रीत माझी बहरली नाही,
प्रयत्न करायचं मात्र मी सोडलं नाही..
होकार तिचा मिळवणे जमलं नाही,
वास्तव मला कबूल झालं नाही,
असणं माझं तिला आवडलं नाही,
तिच्यासाठी झुरणं मात्र मी सोडलं नाही..
@प्रा.योगेश त्रिंबकराव भोसले
प्रेम माझं तिला दिसलं नाही,
जीव तिचा माझ्यात गुंतला नाही,
वेड माझं तिला कळलं नाही,
स्वप्न पाहायचं मात्र मी सोडलं नाही..
गुलाबाचं फुल तिने घेतलं नाही,
मागे वळून सुद्धा पाहीलं नाही,
प्रीत माझी बहरली नाही,
प्रयत्न करायचं मात्र मी सोडलं नाही..
होकार तिचा मिळवणे जमलं नाही,
वास्तव मला कबूल झालं नाही,
असणं माझं तिला आवडलं नाही,
तिच्यासाठी झुरणं मात्र मी सोडलं नाही..
@प्रा.योगेश त्रिंबकराव भोसले
तुझ्या मौनाचा अर्थ
न समजण्या इतका
अरसिक नव्हतो मी .....
अन् तू माझ्याशी
कुठलं नातं जोडतेस
हे ही जाणुन होतो ....
पण तू मात्र
तसे भासवु देत नव्हती
कारण .....
तुझ्या हास्यावर
टिप्पणी करण्यास माझ्या
शब्दकोषात कदाचित
शब्द अपुरे होते ....
तुझ्या प्रत्येक भेटीत
तुला भेटण्याची उत्कृटता
मी लपवु शकलो नाही .....
पण माझी ही
धडपड पाहून तू फक्त
हास्य करीत राहीली .....
✒️✒️
*सुभाष उमरकर सामनगांव नाशिक.*
न समजण्या इतका
अरसिक नव्हतो मी .....
अन् तू माझ्याशी
कुठलं नातं जोडतेस
हे ही जाणुन होतो ....
पण तू मात्र
तसे भासवु देत नव्हती
कारण .....
तुझ्या हास्यावर
टिप्पणी करण्यास माझ्या
शब्दकोषात कदाचित
शब्द अपुरे होते ....
तुझ्या प्रत्येक भेटीत
तुला भेटण्याची उत्कृटता
मी लपवु शकलो नाही .....
पण माझी ही
धडपड पाहून तू फक्त
हास्य करीत राहीली .....
✒️✒️
*सुभाष उमरकर सामनगांव नाशिक.*
सुर्याला आम्ही सुर्य म्हणालो
म्हणुनच तो सुर्य झाला .....
माणसाला माणूस म्हणून जगण्याला
तेव्हाच खरा अर्थ आला ...!!
सारीच समिकरणं मांडली आम्ही
आमचं मोठेपणा सिध्द करण्याला ...
माणसाची जात विसरला माणुस
जाती जातीत विभागून स्वतः ला .....!!
स्त्री पुरुष समानतेच्या गप्पा
त्याने खुप मोठमोठ्या केल्या...
सत्य मनाच्या आरशात पाहताना
सा-या घोषणा फोल गेल्या ....!!
जगणे एवढाच ध्यास का
माणसाच्या डायरीत लिहिला होता...
सैतानी वृत्ती बाळगताना
माणुसकी मात्र विसरला होता ....!!
नको माणसा तू आता
माणसा सारखा वागु ....
नामकरण सृष्टीचे करताना
स्वतः चे गुणधर्म नको सांगू ....!!
सुर्य म्हणून जन्माला यायला
युगे युगे वाट पाहावी लागेल ...
माणुस स्वतः म्हणून घेण्यासाठी
फक्त माणुसकीने वागावं लागेल .....!!
*सुभाष उमरकर सामनगांव नाशिक.*
म्हणुनच तो सुर्य झाला .....
माणसाला माणूस म्हणून जगण्याला
तेव्हाच खरा अर्थ आला ...!!
सारीच समिकरणं मांडली आम्ही
आमचं मोठेपणा सिध्द करण्याला ...
माणसाची जात विसरला माणुस
जाती जातीत विभागून स्वतः ला .....!!
स्त्री पुरुष समानतेच्या गप्पा
त्याने खुप मोठमोठ्या केल्या...
सत्य मनाच्या आरशात पाहताना
सा-या घोषणा फोल गेल्या ....!!
जगणे एवढाच ध्यास का
माणसाच्या डायरीत लिहिला होता...
सैतानी वृत्ती बाळगताना
माणुसकी मात्र विसरला होता ....!!
नको माणसा तू आता
माणसा सारखा वागु ....
नामकरण सृष्टीचे करताना
स्वतः चे गुणधर्म नको सांगू ....!!
सुर्य म्हणून जन्माला यायला
युगे युगे वाट पाहावी लागेल ...
माणुस स्वतः म्हणून घेण्यासाठी
फक्त माणुसकीने वागावं लागेल .....!!
*सुभाष उमरकर सामनगांव नाशिक.*
*ती आणि... ती*
पृथ्वीच्या पोटाचा
प्रियसीच्या ओठांचा
कधीच अंदाज
लावु नये ....
कारण एकीने
उदरात अन्
दुसरीने अधरात
खुप गुपित
लपवले आहे ...!!
पृथ्वीच्या गतीचा
प्रेयसीच्या नितीचा
कधीच मागोवा
घेऊ नये
एकीचा व्यास
दुसरीचा ध्यास
एक दिवस
घेऊनच बुडतो ....!!
पृथ्वीचा आस
प्रेयसीची कास
कोणी कधीच
धरु नये
एकीच्या व्याप्तीला
दुसरीच्या युक्तीला
जगी तोड नाही ....!!
पृथ्वीवरील सृष्टी
अन्
प्रेयसीची दृष्टी
खुप दूरवर
पसरलेली आहे
एकीचे सौंदर्य
आणि
दुसरीचे गांभिर्य
कळता कळत नाही....!!
पृथ्वीच्या पाठीवर
प्रेयसीच्या गाठीवर
सारं आयुष्य
बांधलेलं आहे
एक शिरावर
दुसरी उरावर
सारी जिंदगानी
आम्हाला पोशित असते ....!!
पृथ्वीचे आयुष्यमान
प्रेयसीचे वयोमान
कधीच कोणाला
कळणार नाही
एकीचा अंत
दुसरीचा उगम
याचा परिणाम
कोणालाच माहीत
नाही .....!!
✒️✒️
*सुभाष उमरकर सामनगांव नाशिक.*
पृथ्वीच्या पोटाचा
प्रियसीच्या ओठांचा
कधीच अंदाज
लावु नये ....
कारण एकीने
उदरात अन्
दुसरीने अधरात
खुप गुपित
लपवले आहे ...!!
पृथ्वीच्या गतीचा
प्रेयसीच्या नितीचा
कधीच मागोवा
घेऊ नये
एकीचा व्यास
दुसरीचा ध्यास
एक दिवस
घेऊनच बुडतो ....!!
पृथ्वीचा आस
प्रेयसीची कास
कोणी कधीच
धरु नये
एकीच्या व्याप्तीला
दुसरीच्या युक्तीला
जगी तोड नाही ....!!
पृथ्वीवरील सृष्टी
अन्
प्रेयसीची दृष्टी
खुप दूरवर
पसरलेली आहे
एकीचे सौंदर्य
आणि
दुसरीचे गांभिर्य
कळता कळत नाही....!!
पृथ्वीच्या पाठीवर
प्रेयसीच्या गाठीवर
सारं आयुष्य
बांधलेलं आहे
एक शिरावर
दुसरी उरावर
सारी जिंदगानी
आम्हाला पोशित असते ....!!
पृथ्वीचे आयुष्यमान
प्रेयसीचे वयोमान
कधीच कोणाला
कळणार नाही
एकीचा अंत
दुसरीचा उगम
याचा परिणाम
कोणालाच माहीत
नाही .....!!
✒️✒️
*सुभाष उमरकर सामनगांव नाशिक.*
*रेघोट्या*
तारुण्यात गंध
वेडाच झालो मी ...
स्पर्शात तुझ्या त्या
स्वर्ग पाहिला मी ....!!
जावे विसावून तुझ्या
काळ्याभोर केशात गं ...
मिटून डोळे असा
वेडाच पाहतो मी ....!!
दिसता सामोरी
ओठी शब्द न येती ...
मग सारेच स्वतःशी
एकटाच सांगतो मी ....!!
हसतात लोक मजला
तुझ्या नादाने ...
तुझ्या आठवणीत
धुंद राहतो मी ....!!
शब्दात तुझ्या माझे
जीवन अडकले ...
एकाच शब्दात तुझ्या
घायाळ झालो मी ....!!
कवितेत शब्द गुंफण्यास
लेखणी केली पुढे ...
पांढ-या कागदावर
रेघोट्या ओढतो मी ....!!
*सुभाष उमरकर सामनगांव नाशिक.*
तारुण्यात गंध
वेडाच झालो मी ...
स्पर्शात तुझ्या त्या
स्वर्ग पाहिला मी ....!!
जावे विसावून तुझ्या
काळ्याभोर केशात गं ...
मिटून डोळे असा
वेडाच पाहतो मी ....!!
दिसता सामोरी
ओठी शब्द न येती ...
मग सारेच स्वतःशी
एकटाच सांगतो मी ....!!
हसतात लोक मजला
तुझ्या नादाने ...
तुझ्या आठवणीत
धुंद राहतो मी ....!!
शब्दात तुझ्या माझे
जीवन अडकले ...
एकाच शब्दात तुझ्या
घायाळ झालो मी ....!!
कवितेत शब्द गुंफण्यास
लेखणी केली पुढे ...
पांढ-या कागदावर
रेघोट्या ओढतो मी ....!!
*सुभाष उमरकर सामनगांव नाशिक.*
*पाऊलखुणा*
जपुन ठेविन मी उरी
तुझ्या पाऊलखुणा ....
गंध दरवळतो मनी
अजुन तुझ्या श्वासातला .....!!
जेव्हा मनातलं गुपित
तू माझ्या कानात बोलली ...
अर्थ नाही कळला त्यावेळी
आता भासवितो सहज गुणगुणली ....!!
माझेच चुकले त्यावेळी
अन् चुकते आहे यावेळी...
पण खेळात चुकांना
क्षमा नसते अशा वेळी ....!!
आजवर गोलकिपर म्हणून
ठोकर मारली मी ....
नेमक्या वेळी त्यावरुन
तोंडघशी पडलो मी ...!!
काही घडलेच नाही
मी इतरांना भासवितो ...
माझाच मी आता
स्वतः ला फसवितो ....!!
नाही मी अजुन हरलो नाही
पेनाल्टी माझ्या पक्षात आहे ..
देवच जाणे काय लिहिलेले
माझ्या भविष्यात आहे ....!!
जखम पायावर पण
घाव खोल मनात आहे ...
सध्या तरी मी तुझ्या
पाऊलखुणा जपीत आहे ...!!
*सुभाष उमरकर सामनगांव नाशिक.*
जपुन ठेविन मी उरी
तुझ्या पाऊलखुणा ....
गंध दरवळतो मनी
अजुन तुझ्या श्वासातला .....!!
जेव्हा मनातलं गुपित
तू माझ्या कानात बोलली ...
अर्थ नाही कळला त्यावेळी
आता भासवितो सहज गुणगुणली ....!!
माझेच चुकले त्यावेळी
अन् चुकते आहे यावेळी...
पण खेळात चुकांना
क्षमा नसते अशा वेळी ....!!
आजवर गोलकिपर म्हणून
ठोकर मारली मी ....
नेमक्या वेळी त्यावरुन
तोंडघशी पडलो मी ...!!
काही घडलेच नाही
मी इतरांना भासवितो ...
माझाच मी आता
स्वतः ला फसवितो ....!!
नाही मी अजुन हरलो नाही
पेनाल्टी माझ्या पक्षात आहे ..
देवच जाणे काय लिहिलेले
माझ्या भविष्यात आहे ....!!
जखम पायावर पण
घाव खोल मनात आहे ...
सध्या तरी मी तुझ्या
पाऊलखुणा जपीत आहे ...!!
*सुभाष उमरकर सामनगांव नाशिक.*
*कोडे*
कोण असे मनी
ध्यानी नुसताच ध्यास
चालते फिरते पुतळे
फक्त आणि फक्त आभास ...!!
जो तो हरवला
स्वत:च्या विश्वात रमला
आभासी जगात मध्ये
आपला मानुस च विसरला ...!!
नाती नाही नातलग नाही
खोट्या दुनियेत मित्राचा बाजार
चार दिशेला मुख सर्वांची
झाला संवादाचा व्यापार ...!!
बोलु कुणाशी मी
भिंतीचे कान बहिरे झाले
डोळस मनाचे बोलके डोळे
पाहताना आता आंधळे झाले ...!!
घरी जा दारी जा
जा आता कुठे मयतीला
हातात असतो अंबानी
अन् नेट असते सोबतीला ...!!
तुझा माझा सहवास ही
पुर्वी किती गोड होता
फाडलेल्या वहीच्या पानात ही
प्रेमाचा सुगंध होता ...!!
कुठे हरवले ते कबुतर
नाती जोडणारे पोस्टमन
पिंज-यातला बंदीस्त पोपटही
शीळ घालीत होतं मन....!!
पैसा देव की देव पैसा
कोण आता सांगणार आहे
तुझ्या माझ्या नात्याचे
कोडे कोडेच राहणार आहे ...!!
*सुभाष उमरकर सामनगांव नाशिक.*
कोण असे मनी
ध्यानी नुसताच ध्यास
चालते फिरते पुतळे
फक्त आणि फक्त आभास ...!!
जो तो हरवला
स्वत:च्या विश्वात रमला
आभासी जगात मध्ये
आपला मानुस च विसरला ...!!
नाती नाही नातलग नाही
खोट्या दुनियेत मित्राचा बाजार
चार दिशेला मुख सर्वांची
झाला संवादाचा व्यापार ...!!
बोलु कुणाशी मी
भिंतीचे कान बहिरे झाले
डोळस मनाचे बोलके डोळे
पाहताना आता आंधळे झाले ...!!
घरी जा दारी जा
जा आता कुठे मयतीला
हातात असतो अंबानी
अन् नेट असते सोबतीला ...!!
तुझा माझा सहवास ही
पुर्वी किती गोड होता
फाडलेल्या वहीच्या पानात ही
प्रेमाचा सुगंध होता ...!!
कुठे हरवले ते कबुतर
नाती जोडणारे पोस्टमन
पिंज-यातला बंदीस्त पोपटही
शीळ घालीत होतं मन....!!
पैसा देव की देव पैसा
कोण आता सांगणार आहे
तुझ्या माझ्या नात्याचे
कोडे कोडेच राहणार आहे ...!!
*सुभाष उमरकर सामनगांव नाशिक.*
*मित्रा*
बदल तू मित्रा ,मीही बदललो आहे
मैत्रीचा साचा ज्यांनी त्यांचा ठरवला आहे..!!
तुझ्या विजयात, आनंदी मी झालो
विजयाचा उन्माद तुझ्या चेहऱ्यावर दिसला आहे ...!!
ठेवली नाही मित्रा, भिड लाज लज्जेची
कमरेचे सोडून तू, बांधले डोक्याला आहे ..!!
माझे मुक्त जगणे होते तसेच आहे
तुझा भ्रमनिरास तुझ्या ,कृतीने झाला आहे.....!!
मैत्रीची परिभाषा कधी तुला कळलीच नाही
खोट्या वाह वाहत तू ,पुरता गुरफटला आहे ....!!
दर्दी मी मनाचा ,तू गर्दीला भुलला
निंदा तुझी होता वेदना मला आहे..!!
नको सोबत तुझी ,मी समर्थ झालो
माझ्या यशाचा अर्थ ,मला कळला आहे ...!!
*सुभाष उमरकर सामनगांव नाशिक*
बदल तू मित्रा ,मीही बदललो आहे
मैत्रीचा साचा ज्यांनी त्यांचा ठरवला आहे..!!
तुझ्या विजयात, आनंदी मी झालो
विजयाचा उन्माद तुझ्या चेहऱ्यावर दिसला आहे ...!!
ठेवली नाही मित्रा, भिड लाज लज्जेची
कमरेचे सोडून तू, बांधले डोक्याला आहे ..!!
माझे मुक्त जगणे होते तसेच आहे
तुझा भ्रमनिरास तुझ्या ,कृतीने झाला आहे.....!!
मैत्रीची परिभाषा कधी तुला कळलीच नाही
खोट्या वाह वाहत तू ,पुरता गुरफटला आहे ....!!
दर्दी मी मनाचा ,तू गर्दीला भुलला
निंदा तुझी होता वेदना मला आहे..!!
नको सोबत तुझी ,मी समर्थ झालो
माझ्या यशाचा अर्थ ,मला कळला आहे ...!!
*सुभाष उमरकर सामनगांव नाशिक*
*पान*
पिकून पडलेल्या पानांचं
जीर्ण होत जाणं ...
तरी त्यांच्या जाळीदार नक्षीनं
जीवनाचं रहस्य सांगणं .....
माझ्या अंगणात पडलेल्या पानाला
मी असाच न्याहाळीत असतो !
तू दिलेल्या पानानं
वहीच्या खोल काळजात
केलेली खोलवर जखम
त्यावर आठवणीची खपली
चढू नये म्हणून .....
मनाच्या खोल गाभा-यात
सतत ओली ठेवतो ,!
हलकेच तूच दिलेलं
मोरपीस फिरवित ....
*सुभाष उमरकर सामनगांव नाशिक.*
पिकून पडलेल्या पानांचं
जीर्ण होत जाणं ...
तरी त्यांच्या जाळीदार नक्षीनं
जीवनाचं रहस्य सांगणं .....
माझ्या अंगणात पडलेल्या पानाला
मी असाच न्याहाळीत असतो !
तू दिलेल्या पानानं
वहीच्या खोल काळजात
केलेली खोलवर जखम
त्यावर आठवणीची खपली
चढू नये म्हणून .....
मनाच्या खोल गाभा-यात
सतत ओली ठेवतो ,!
हलकेच तूच दिलेलं
मोरपीस फिरवित ....
*सुभाष उमरकर सामनगांव नाशिक.*
*तुझं प्रेम....*
काय लिहू म्हणतेस ?
सरस्वती च्या थाटात प्रश्न ...!
अर्थात तुझ्या कडून अनपेक्षित
माझ्या कडून अनुत्तरित ...
लिहिणारच असशील तर
मनातील ते लिही सर्व ...
तुझा विश्वास तुझं प्रेम
सर्व काही कुशल क्षेम ...
कधी काळी तुच लिहिलेलं
काही क्षणात तुच पुसलेलं ...!
लिहशील ते मला सारं ?
गिरवशील लेखणी माझ्या साठी !
लिहिलं तर वाचीन म्हणतो
मिळालं तर जपून ठेवीन म्हणतो
तुझं प्रेम .....
*सुभाष उमरकर सामनगांव नाशिक.*
काय लिहू म्हणतेस ?
सरस्वती च्या थाटात प्रश्न ...!
अर्थात तुझ्या कडून अनपेक्षित
माझ्या कडून अनुत्तरित ...
लिहिणारच असशील तर
मनातील ते लिही सर्व ...
तुझा विश्वास तुझं प्रेम
सर्व काही कुशल क्षेम ...
कधी काळी तुच लिहिलेलं
काही क्षणात तुच पुसलेलं ...!
लिहशील ते मला सारं ?
गिरवशील लेखणी माझ्या साठी !
लिहिलं तर वाचीन म्हणतो
मिळालं तर जपून ठेवीन म्हणतो
तुझं प्रेम .....
*सुभाष उमरकर सामनगांव नाशिक.*
*सहज मनातलं*
सोबत तुझी मिळाली
जणु पौर्णिमेची रात्र
चंद्र चांदण्यांच्या प्रकाशात
न्हाऊन निघाली गात्र ...!!
बेरंग होते जगणे
झाली रंगाची उधळण
अनेक रंगांची तू
कशी होईल धुळवड ...!!
साथ अशीच असावी
अंता पासुन अनंता पर्यंत
तुझ्या माझ्या संसाराची
राहावी शेवटच्या श्वासापर्यंत....!!
लाभला सहवास तुझा
ओळखीच्या दोन शब्दांचा
होतो मग आभास
आजन्म तुझ्या सहा-याचा ....!!
शब्द देतात आधार
ओळख आपली करतात
मी मनातले विचार तेव्हा
सहज कागदावर उमटतात ....!!
✒️✒️
*सुभाष उमरकर ,सामनगांव नाशिक.*
सोबत तुझी मिळाली
जणु पौर्णिमेची रात्र
चंद्र चांदण्यांच्या प्रकाशात
न्हाऊन निघाली गात्र ...!!
बेरंग होते जगणे
झाली रंगाची उधळण
अनेक रंगांची तू
कशी होईल धुळवड ...!!
साथ अशीच असावी
अंता पासुन अनंता पर्यंत
तुझ्या माझ्या संसाराची
राहावी शेवटच्या श्वासापर्यंत....!!
लाभला सहवास तुझा
ओळखीच्या दोन शब्दांचा
होतो मग आभास
आजन्म तुझ्या सहा-याचा ....!!
शब्द देतात आधार
ओळख आपली करतात
मी मनातले विचार तेव्हा
सहज कागदावर उमटतात ....!!
✒️✒️
*सुभाष उमरकर ,सामनगांव नाशिक.*
निष्ठा बदलते आहे
निष्ठा बदलण्यासाठी धारीष्ट्य
घ्यावे लागतात अपार कष्ट
जवळचेच होतात रूष्ट
वेडा झाला म्हणतात हा दुष्ट
विज्ञानाचा अंगीकार जिवनांत
सुर्य तारे चंद्र ग्रह अंतराळात
आकाश का बरे म्हणतात
उंच उडतो स्पर्शाच्या नादात
चंद्र देव म्हणून मान्यता पावला
माणसाने त्याच्याच छाताडावर पाय ठेवला
सुर्यदेव दृष्य तरी अस्पृश्य ठरला
आणि मग निष्ठेलाच तडा गेला
विद्देची देवता सरस्वती शारदा
सा-या जगातील मानव विद्यार्थी
दृष्टीभ्रम की बुध्दीला आली बबधिरता
फोटोत दिसल्या साऊ मुक्ता फातीमा
कशी काय निष्ठा ढळली असावी
अशी वेड्यांत गीणती का व्हावी
महिमा ही विज्ञानाची तर नसावी
आधात्म्याला ती कां बरे ती न दिसावी.
वसंत गवळी गोंदिया
निष्ठा बदलण्यासाठी धारीष्ट्य
घ्यावे लागतात अपार कष्ट
जवळचेच होतात रूष्ट
वेडा झाला म्हणतात हा दुष्ट
विज्ञानाचा अंगीकार जिवनांत
सुर्य तारे चंद्र ग्रह अंतराळात
आकाश का बरे म्हणतात
उंच उडतो स्पर्शाच्या नादात
चंद्र देव म्हणून मान्यता पावला
माणसाने त्याच्याच छाताडावर पाय ठेवला
सुर्यदेव दृष्य तरी अस्पृश्य ठरला
आणि मग निष्ठेलाच तडा गेला
विद्देची देवता सरस्वती शारदा
सा-या जगातील मानव विद्यार्थी
दृष्टीभ्रम की बुध्दीला आली बबधिरता
फोटोत दिसल्या साऊ मुक्ता फातीमा
कशी काय निष्ठा ढळली असावी
अशी वेड्यांत गीणती का व्हावी
महिमा ही विज्ञानाची तर नसावी
आधात्म्याला ती कां बरे ती न दिसावी.
वसंत गवळी गोंदिया
*प्रीत तुझी माझी*
प्रीत तुझी माझी अशीच बहरत जावी,
साथ तुझी जन्मोजन्मी मिळावी,
तूच राहावी सतत ओठी,
अशाच राहोत रेशीमगाठी...
प्रीत तुझी माझी अशीच बहरत जावी,
आस वाटे मजला नेहमी,
मी आहे सतत सोबती,
जाणीव असू दे तुझ्या मनी...
प्रीत तुझी माझी अशीच बहरत जावी,
होतील स्वप्न पूर्ण पाहिले जे मिळूनी,
फुलेल घरटे सुखाचे या जीवनी,
जगू प्रेमाचे क्षण सतत हसूनी....
@✒️प्रा.योगेश त्रिंबकराव भोसले,
बीड.
प्रीत तुझी माझी अशीच बहरत जावी,
साथ तुझी जन्मोजन्मी मिळावी,
तूच राहावी सतत ओठी,
अशाच राहोत रेशीमगाठी...
प्रीत तुझी माझी अशीच बहरत जावी,
आस वाटे मजला नेहमी,
मी आहे सतत सोबती,
जाणीव असू दे तुझ्या मनी...
प्रीत तुझी माझी अशीच बहरत जावी,
होतील स्वप्न पूर्ण पाहिले जे मिळूनी,
फुलेल घरटे सुखाचे या जीवनी,
जगू प्रेमाचे क्षण सतत हसूनी....
@✒️प्रा.योगेश त्रिंबकराव भोसले,
बीड.
*निवडूंग*
घराच्या कोपऱ्यात
वेगळं आकर्षक म्हणून
निवडूंगला मी नित्यनेमाने
पाणी देत राहिलो ....
कळलेच नाही स्पर्शातही
वेदनेचा आभास आहे ....!
तुझ्या वेणीत अलगतपणे
गुलाबाचे फुल मावळताना
तुझ्या लटक्या रागाने
झालेली जखम .....
आजही चिघळत आहे
रक्ताळलेल्या काळजातून ....!
म्हणुनच मी आता
नात्यांचे बंध बांधत नाही
हृदयात होणा-या जखमांची
भीती वाटते मला ....
बाभळीला हळदीचा आलेला बहर
किती काळ पिवळा असतो ....?
*सुभाष उमरकर सामनगांव नाशिक.*
घराच्या कोपऱ्यात
वेगळं आकर्षक म्हणून
निवडूंगला मी नित्यनेमाने
पाणी देत राहिलो ....
कळलेच नाही स्पर्शातही
वेदनेचा आभास आहे ....!
तुझ्या वेणीत अलगतपणे
गुलाबाचे फुल मावळताना
तुझ्या लटक्या रागाने
झालेली जखम .....
आजही चिघळत आहे
रक्ताळलेल्या काळजातून ....!
म्हणुनच मी आता
नात्यांचे बंध बांधत नाही
हृदयात होणा-या जखमांची
भीती वाटते मला ....
बाभळीला हळदीचा आलेला बहर
किती काळ पिवळा असतो ....?
*सुभाष उमरकर सामनगांव नाशिक.*
*फुलपाखरू*
फुलपाखराचं जीणं माझे
चार दिवसांची धडपड आहे
घेतो कोणी चिमटीत मला
रंगवुन त्याला आनंद देणे आहे
या फुलांचे त्या फुलांन सोबत
सुख दुःख मी वाटत फिरतो
नको हेवा करु माणसा माझा
जगण्याचा खरा आनंद मी घेतो
कशास हवे ते राजे राजवाडे
मोकळे श्वास तिथे गुदमरले आहे
स्वच्छंदी जगण्यासाठी आजही
मोकळे आकाश खुले आहे
रंगबिरंगी दुनिया माझी
स्वप्नात ही स्वप्नावलीची सोबत आहे
स्वप्न आजचे जगुन घेतो
स्वप्न उद्याचे डोळ्यात आहे
मोह नाही मत्सर, द्वेष नाही
नाही मज गर्व कशाचा
जो आला तो मित्र जाहला
जगण्याचा काळ आहे किती क्षणाचा ..
या मनातून त्या मनावर
अधिराज्य मी असेच करणार
चार दिवसांचं जगणं माझं
प्रत्येकाच्या स्मरणात ठेवणार ....
*सुभाष उमरकर सामनगांव नाशिक.*
फुलपाखराचं जीणं माझे
चार दिवसांची धडपड आहे
घेतो कोणी चिमटीत मला
रंगवुन त्याला आनंद देणे आहे
या फुलांचे त्या फुलांन सोबत
सुख दुःख मी वाटत फिरतो
नको हेवा करु माणसा माझा
जगण्याचा खरा आनंद मी घेतो
कशास हवे ते राजे राजवाडे
मोकळे श्वास तिथे गुदमरले आहे
स्वच्छंदी जगण्यासाठी आजही
मोकळे आकाश खुले आहे
रंगबिरंगी दुनिया माझी
स्वप्नात ही स्वप्नावलीची सोबत आहे
स्वप्न आजचे जगुन घेतो
स्वप्न उद्याचे डोळ्यात आहे
मोह नाही मत्सर, द्वेष नाही
नाही मज गर्व कशाचा
जो आला तो मित्र जाहला
जगण्याचा काळ आहे किती क्षणाचा ..
या मनातून त्या मनावर
अधिराज्य मी असेच करणार
चार दिवसांचं जगणं माझं
प्रत्येकाच्या स्मरणात ठेवणार ....
*सुभाष उमरकर सामनगांव नाशिक.*
*निर्जीव पुतळा*
तुझ्यावर असलेले प्रेम
व्यक्त करायला मला
बरीच वर्ष वाट पाहावी लागली.....!
आज भेटली अचानक
किती दिवसांनी
सहज बोलुन गेलीस...हसत हसत ...
तू बदलला च नाही अजुनही ....!
हो आहे तसाच आहेस मी.....
तीच्या कडे न पाहताच म्हणालो ...
"पण तू खुप बदलली ग...
फुललेलं फुल ,पानगळीच पान झालीस ....!
मी नाही बदलली
परिस्थीती बदलली आता ...
भुतकाळत किती दिवस जगणार होते मी ...?
दोष कुणाचा मला माहित नाही पण ..
दोष मी कुणाला देऊ ..तरी कशाला ..!
मी म्हटलो जाऊ दे
सुखात आहेस ना तू ....?
भरलेल्या डोळ्यांनी पाहत होती ....!
ती किती सहज
घाव करून गेली काळजाला
वार करून गेलीस त्या क्षणाला ...!
" निर्जीव पुतळ्याची पुन्हा पुन्हा
रंगरंगोटी करण्याला जर
तू सुख म्हणत असशील तर ...?
हो मी खरंच सुखी आहे .माझ्या आयुष्यात ..."
जखमांची मोजदाद
करू शकलो नाही मी तेव्हा ...
मी कधी तीच्या कडे तर कधी चौकात ..
वर्षोन वर्ष उभ्या असलेल्या
पुतळ्याकडे पाहत होतो...!
रंगरंगोटी करून नविन केले होते त्याला
आताच समाज म्हणना-या लोकांनी .....
ती नजरे आड होई पर्यन्त.....!
✒️✒️
*सुभाष उमरकर , सामनगांव नाशिक.*
तुझ्यावर असलेले प्रेम
व्यक्त करायला मला
बरीच वर्ष वाट पाहावी लागली.....!
आज भेटली अचानक
किती दिवसांनी
सहज बोलुन गेलीस...हसत हसत ...
तू बदलला च नाही अजुनही ....!
हो आहे तसाच आहेस मी.....
तीच्या कडे न पाहताच म्हणालो ...
"पण तू खुप बदलली ग...
फुललेलं फुल ,पानगळीच पान झालीस ....!
मी नाही बदलली
परिस्थीती बदलली आता ...
भुतकाळत किती दिवस जगणार होते मी ...?
दोष कुणाचा मला माहित नाही पण ..
दोष मी कुणाला देऊ ..तरी कशाला ..!
मी म्हटलो जाऊ दे
सुखात आहेस ना तू ....?
भरलेल्या डोळ्यांनी पाहत होती ....!
ती किती सहज
घाव करून गेली काळजाला
वार करून गेलीस त्या क्षणाला ...!
" निर्जीव पुतळ्याची पुन्हा पुन्हा
रंगरंगोटी करण्याला जर
तू सुख म्हणत असशील तर ...?
हो मी खरंच सुखी आहे .माझ्या आयुष्यात ..."
जखमांची मोजदाद
करू शकलो नाही मी तेव्हा ...
मी कधी तीच्या कडे तर कधी चौकात ..
वर्षोन वर्ष उभ्या असलेल्या
पुतळ्याकडे पाहत होतो...!
रंगरंगोटी करून नविन केले होते त्याला
आताच समाज म्हणना-या लोकांनी .....
ती नजरे आड होई पर्यन्त.....!
✒️✒️
*सुभाष उमरकर , सामनगांव नाशिक.*
*🌹🌹ती🌹🌹*
ती म्हणजे कोण ..?
मनातील भावना ,केलेली कल्पना
असलेली इच्छा की
पुर्ण न होणारी आकांक्षा ...!
ती का असते शब्दा शब्दात
तीच्या पासून सुरुवात होते
तीच्यापाशी अंत ....
ती असते जगण्यात
तीच दिसते मरण्यात ....
ती असते ममता दुःखातली
ती असते माया सुखातली
ती मोह आहे तीच देह आहे ...
तीच असते पुजा निरंतर चालणारी
तीच असते आरती
आयुष्य उजळून टाकणारी ....
ती खुशी आहे मनमुराद जगणारी
ती चेतना आहे
जगायला चालना देणारी ....
ती निशा आहे काळोखात बहरणारी
ती उषा आहे
प्रत्येक दिवसाचे नविन स्वप्न सजवणारी ...
तीच आहे सुमन अन्
तीच आहे सुहास ...
तीच व्यास आहे
ती जगण्याचा ध्यास आहे
ती क्षणाची पत्नी परंतु
अनंत काळाची माता आहे
ती बंधन आहे राखीची
ती लळा आहे लेकीची ...
ती आहे म्हणुनच मी आहे
ती आहे म्हणुन हे सर्व आहे ...
✒️✒️
*सुभाष उमरकर सामनगांव नाशिक.*
ती म्हणजे कोण ..?
मनातील भावना ,केलेली कल्पना
असलेली इच्छा की
पुर्ण न होणारी आकांक्षा ...!
ती का असते शब्दा शब्दात
तीच्या पासून सुरुवात होते
तीच्यापाशी अंत ....
ती असते जगण्यात
तीच दिसते मरण्यात ....
ती असते ममता दुःखातली
ती असते माया सुखातली
ती मोह आहे तीच देह आहे ...
तीच असते पुजा निरंतर चालणारी
तीच असते आरती
आयुष्य उजळून टाकणारी ....
ती खुशी आहे मनमुराद जगणारी
ती चेतना आहे
जगायला चालना देणारी ....
ती निशा आहे काळोखात बहरणारी
ती उषा आहे
प्रत्येक दिवसाचे नविन स्वप्न सजवणारी ...
तीच आहे सुमन अन्
तीच आहे सुहास ...
तीच व्यास आहे
ती जगण्याचा ध्यास आहे
ती क्षणाची पत्नी परंतु
अनंत काळाची माता आहे
ती बंधन आहे राखीची
ती लळा आहे लेकीची ...
ती आहे म्हणुनच मी आहे
ती आहे म्हणुन हे सर्व आहे ...
✒️✒️
*सुभाष उमरकर सामनगांव नाशिक.*
📌
*अलक*
आज महिला दिनाच्या दिवसभराच्या व्यस्त कार्यक्रमातून ती थकुन भागुन घरी आली अन् घरभर पसरलेला पसारा आवरताना तीची नजर बेडरूममध्ये पडलेल्या नवरोबा कडे गेली .
*"अरे तुम्ही कधी आलात ? दमला असाल ना तुम्ही ,थांबा तुम्हाला गरम गरम चहा करून देते " दिवसभराचा सगळा थकवा विसरून ती तडक स्वयंपाकघराकडे वळली .*
✒️
*सुभाष उमरकर,सामनगांव नाशिक.*
*अलक*
आज महिला दिनाच्या दिवसभराच्या व्यस्त कार्यक्रमातून ती थकुन भागुन घरी आली अन् घरभर पसरलेला पसारा आवरताना तीची नजर बेडरूममध्ये पडलेल्या नवरोबा कडे गेली .
*"अरे तुम्ही कधी आलात ? दमला असाल ना तुम्ही ,थांबा तुम्हाला गरम गरम चहा करून देते " दिवसभराचा सगळा थकवा विसरून ती तडक स्वयंपाकघराकडे वळली .*
✒️
*सुभाष उमरकर,सामनगांव नाशिक.*