मी मराठी कविता समुह.....
3.94K subscribers
2.24K photos
30 videos
4 files
90 links
🙏मी मराठी कविता संग्रह🙏

"मराठी आणि हिंदी ,कविता, लेख"

@khpatil
Download Telegram
निशा...

चांदण्यातला रोमांचित प्रवास..
एकांतातील तुझा आभास ..
रातराणीचा प्रगाढ मधुर गंध..
धुंद करणारी वेळ हि बेधुंद..

रातकिड्याचा किर्र आवाज..
वा-याची निराळी गाज..
मी निशा चंदनी
आकाश उतरले अंगणी..

पोर्णिमेचा चंद्र खास
लोचनी तुझे भास..
काळोखात तुझा प्रकाश..
प्रितीत विरघळे अवकाश..

©©पल्लवी पटवर्धन
Forwarded from Anil Rathod
आज 9 जानेवारी
पहिल्या भारतीय मुस्लीम शिक्षिका युगस्त्री फातिमाबी शेख (Fatima Sheikh) यांची जयंती...

आभार माईचे की, मला माईच्या जीवनावर आधारित कविता लिहण्याची संधी मिळाली आणि माझी कविता माईवर आधारित पहिल्याच काव्यग्रंथात प्रकाशित झालीय...
आज माईच्या जयंतीदिनी माईचरणी विनम्र अभिवादन...!!🌷🌷🙏🙏

🎪🎪🎪🎪🎪🎪🎪🎪
©अनिल रायसिंग राठोड
आम्ही तिवरंगकर
9766843677
*चक्र*

भरले जरी धरण
विसर्ग करावा लागतो
ओथंबलेल्या भावनांचा बांध
कधी तरी फोडावा लागतो .....!!

पेटलेल्या वनव्याचा दाह
विझवून विझत नाही
जळालेल्या काळजाला थोडा
प्रेमाचा ओलावा लागतो ...!!

गारठली जरी थंडी
हिमालय थरथरत नाही
गुलाबी थंडीचा मौसम
कधी तरी अनुभवा लागतो ....!!

आले ऋतु गेले ऋतु
चालेल चक्र हे निसर्गाचे
वाढलेला दुरावा मनाचा
आपनच संपवावा लागतो....!!

*सुभाष उमरकर सामनगांव नाशिक*
दूर.....
सांज का बावरी होत आहे....
खंत माझी खरी होत आहे....

वेड का तू मला लावले ते...
जीव खाली वरी होत आहे.....

मौन धरले किती समजले मज...
काळजाची दरी होत आहे.....

अन् मनाला कसे रोज सांगू ...
पावसाची सरी होत आहे .....

रात जाते अशी दूर तेव्हा...
जाळ आता उरी होत आहे ...

खेळ तू मांडला बघ नशीबी.....
मामला तो घरी होत आहे.....

छान झाले तुझे बोलणे बघ..
भूल नाना परी होत आहे...
© बापू भोंग
लेखक, कवी
9763989823
दिनांक-8-1-2022
Forwarded from Anil Rathod
ध्येय सुंदर असते

पण

तिथे पोहोचण्यासाठी

चालावा लागणारा रस्ता मात्र अवघड असतो.

🚦🚥🚥🚦🚥🚥🚦🚥🚥🚦
©अनिल रायसिंग राठोड
आम्ही तिवरंगकर
9766843677
Forwarded from _₹विkant Wakude
असाकसा पाडशील तू
आयुष्यात आनंदाचा तुटवडा
ऐ, जिंदगी घातला मी
हसर्‍या चेहर्‍याचा मुखवटा...!
_₹विkant
*चक्र*

भरले जरी धरण
विसर्ग करावा लागतो
ओथंबलेल्या भावनांचा बांध
कधी तरी फोडावा लागतो .....!!

पेटलेल्या वनव्याचा दाह
विझवून विझत नाही
जळालेल्या काळजाला थोडा
प्रेमाचा ओलावा लागतो ...!!

गारठली जरी थंडी
हिमालय थरथरत नाही
गुलाबी थंडीचा मौसम
कधी तरी अनुभवा लागतो ....!!

आले ऋतु गेले ऋतु
चालेल चक्र हे निसर्गाचे
वाढलेला दुरावा मनाचा
आपनच संपवावा लागतो....!!

*सुभाष उमरकर सामनगांव नाशिक*
विनोदी कविता🙆‍♀️

निंबोणीच्या झाडामागे
सेल्फी घेतला गं बाई
आज माझ्या फोटोला या
लाईक्स का गं येत नाही ?

लाज दाबली ओठात
मान मुरडून पाही
एकाच या फोटोमध्ये
लपल्यात जाईजुई
नीट पाकळ्या डोळ्यांच्या
'ॲप'ने केल्या गं बाई
आज माझ्या फोटोला या
लाईक्स का गं येत नाही ?

मेकअपचा व्याप सारा
ॲप सांभाळतो बाई
चेहऱ्याला निरागस
भाव मात्र देत नाही
मेहनत माझी कुणी
लक्षात का घेत नाही
आज माझ्या फोटोला या
लाईक्स का गं येत नाही ?

वेळ चुकली का माझी
फोटो पोस्ट करण्याची ?
किंवा माझे फाॅलोअर्स
कंटाळले का एकाएकी
फेसबुक अल्गोरिदम
कोळून प्यायले मीही
पाहतेच आता कसे
लाईक्स कमेंट्स येत नाही.

निंबोणीच्या झाडामागे
सेल्फी घेतला गं बाई
आज माझ्या फोटोला या
लाईक्स का गं येत नाही.......!
Forwarded from Anil Rathod
क्षेत्र कोणतेही असू द्या हो..!
प्रयत्न करताना साथ कुणीच देणार नाही,
दुरून बघतील,बघून जातील,विचारतील,
मानसिक खच्चीकरणही करतील,काळ अन वेळ दोन्ही कठीण असते .
तुम्ही मात्र खंबीर राहायला शिका,
स्वतः मजबुतीने उभे राहायला शिका, बाकी सर्व प्रयत्नावर सोडून द्या,
हेच प्रयत्न जेव्हा यशात रूपांतर होतील ना, तेव्हा अगदी राडा घालतील राडा, भल्याभल्याच्या घश्याला कोरड पडतील..
तेव्हा कुणाला बोलण्याची संधीदेखील भेटणार नाही, तेव्हा हिच लोकं सरळ तुम्हाला बोलायला येतील, भेटायला येतील...😊

✒️✒️✒️✒️✒️✒️✒️✒️✒️
©अनिल रायसिंग राठोड
आम्ही तिवरंगकर
9766843677
Forwarded from Anil Rathod
शिंदखेड निवासीनी
राजा छत्रपतींची जननी,

आरंभबिंदू स्वराज्याचिया
नमन माता तव चरणी.

माँ साहेब स्वराज्य जननी माता जिजाऊ जयंतीदिनी मानाचा मुजरा... 🙏🙏
✒️✒️✒️✒️✒️✒️✒️✒️✒️
©अनिल रायसिंग राठोड
आम्ही तिवरंगकर
9766843677
आदर्श आमुचे विवेकानंद शिवाजी
प्रणाम तयांना युवक दिनाचा आजी||धृ||

व्यायाम करावा, खेळावे भरपूर
सुदृढ अंग अन बाहू व्हावे पिळदार
व्यक्तित्वे पसरो प्रसन्नता सभोवार
बोलणे असावे सर्वांशीच मधूर
संकल्प करतो युवक दिनाचा आजी
आदर्श आमुचे विवेकानंद शिवाजी ||१||

परंपरा धर्माचे सखोल ज्ञान मिळवावे
आधुनिकतेशी नाते त्याचे जोडावे
अभिमान असावा आपुल्या पूर्वजांचा
इतिहास तयांचा दिव्य पराक्रमाचा
गुण त्यांचे अंगी येवो प्रार्थितो आजी
आदर्श आमुचे विवेकानंद शिवाजी ||२||

राजमाता जिजाऊ शिवरायांची जननी
अमृत सिंचन झाले शौर्य संस्कारांनी
श्रीराम कृष्णाच्या कथा रोज सांगुनी
घडविला हिंदवी राजा मराठा मानी
मातेस नमितो माथा टेकवूनी आजी
आदर्श आमुचे विवेकानंद शिवाजी ||३||

हिंदु धर्म डंका ज्यांनी जगी गाजविला
विश्वबंधुत्वाचा संदेश जगाला दिधला
वेद-उपनिषदांचा सोपा अर्थ सांगितला
नमस्कार माझा विवेकानंद स्वामीला
गर्वाने सांगू हिंदू आम्ही आजी
आदर्श आमुचे विवेकानंद शिवाजी||४||

हा देश माझा मी युवक देशाचा
अभिमान मला या प्रिय भारत राष्ट्राचा
मी पाईक होईन येथील परंपरांचा
स्वातंत्र्य, बंधुता, समता, समरसतेचा
घेईन प्रतिज्ञा देशसेवेची आजी
आदर्श आमुचे विवेकानंद शिवाजी ||५||

प्रवीण श्रीराम देशमुख
कल्याण
दि. १२ जानेवारी २०२२
📌
*अलक*

*मांजा*

मकर संक्रांत जशी जशी जवळ येत होती ,तशी तशी आकाशात पतंगाची एकच रेलचेल नजरेत पडु लागली .
*एरव्ही पक्षाच्या थव्याने भरलेलं आकाश मात्र मांजा पायात अडकुन मरणप्राय अवस्थेत जमीनीवर पडलेलं दिसत होतं .*

✒️
- *सुभाष उमरकर सामनगांव नाशिक.*
#9022622856
🌷माते जिजाऊ तुझ्याच मुळे 🌷
*******************
माते जिजाऊ तुझ्याच आशिर्वादाने
झाली हिंदविस्वराज्याची स्थापणा
अठरा पगड जाती मध्ये
जागविली स्वराज्याची भावना

विदर्भ कन्या तू शिवबांची माता
जागविला मर्द मराठा अंगाई गाता
तुझ्या थोरवीला टेकवितो
आम्ही सारेच माथा

जमवून मावळे सारे
पेटवली मशाल स्वातंत्र्याची
शस्त्र घेऊन हाती लढले ते
वाढविली शान भगव्याची

सन्मान माता भगिनींचा होई
या मराठा स्वराज्यात
शूर वीर निपजले येथे
आईच्या उदरात

गड किल्ले जिंकून यवनांचे
दहशत भरवली होती
कोथळा फाडला खानाचा
जावळीच्या रानात होता

माते जिजाऊ तुझ्यामुळे घडले
शिवछत्रपती आदर्श राजे
किर्ती चा त्यांच्या डंका
तीन ही लोकात वाजे

रमेश कृष्णराव भोयर भद्रावती
दि. 12/ 1/ 2020
( राज माता जिजाऊला समर्पित )
स्वामी ! तवनामाशी
जवळीक साधता
अस्वस्थ मनाला
मिळते शांतता

स्वामी! तवनामाचे
अनुसंधान टिकावे
भवताप-त्रितापास
हसत हसत सोसावे

स्वामी! तवनामाचा
छंदच जडावा
नामातच देह हा
तवपदीं पडावा

स्वामी! तवनामें
सरावे विकार
मनाचा नामच एक
व्हावा आधार

स्वामी। तवनामीं
विवेकानंद
होईल नि:संशय
होता धुंद


श्री मिलिंद द करमरकर
१२-०१-२०२२ स्वामी विवेकानंद जयन्ती
मिळतील का हो कुठे
मैत्रीच्या बिया
एक झाड लावावं म्हणतो
अंगणात माझ्या

असेल जे सतत
डोळ्या समोर माझ्या
सांगेन मग त्यालाच
सुख दु:खाच्या कथा

काळजी घेईन त्याची छान
निगुतीनी वाढवेन त्याला
खत पाणी घालून घालून
जीव ही लावेन त्याला

रोज फुटेल नवी पालवी
त्याच्या माझ्या नात्याला
फळा फुलांचे येतील बहर
ऋतूमध्ये मैत्रीच्या नात्याला

जाईन तेव्हा जवळ त्याच्या
धरेन अलगद फांदीला
ते ही देईल आधार तेव्हा
माझ्या उतरत्या खांद्याला

बघा कधी तुमच्याही
मैत्रीत आला रुसवा
मैत्रीचं एक झाड
अंगणात तुम्ही रुजवा

म्हणूनच विचारतो
कुठे मिळतील
या मैत्रीचा बिया
सगळेच लाऊ एक झाड
अंगणात आपल्या आपल्या

*बाजार नको मैत्रीचा*
*मित्र असावा खात्रीचा*