मी मराठी कविता समुह.....
3.95K subscribers
2.25K photos
30 videos
4 files
90 links
🙏मी मराठी कविता संग्रह🙏

"मराठी आणि हिंदी ,कविता, लेख"

@khpatil
Download Telegram
_मुक्काम_✍🏻
__________________________

_तुझ्या संघर्षाला । नको मोजमाप ।_
_कष्टावे अमाप । यशासाठी ॥ १ ॥_

_तुझ्या कष्टावर । तुझाच विश्वास ।_
_असू द्यावा खास । सदोदित ॥ २ ॥_

_सुयोग्य दिशेला । पडता पाऊल ।_
_लागते चाहूल । विजयाची ॥३॥_

_विजयी होण्यास । होता दिरंगाई ।_
_करू नको घाई । परतीची ॥४॥_

_शिस्तीसवे थोडे । संयमाचे खत ।_
_सुधारावी पोत । जगण्याची ॥ ५ ॥_

_अल्पशा सुखांना । हुरळून जाने ।_
_दुःखी विव्हळने । बरे नाही ॥ ६ ॥_

_अखंड चालणे । हे ही नसे योग्य।_
_थांबावे सुयोग्य । मुक्कामाला ॥ ७ ॥_

_©®दिनेश अ. कांबळे_
_औरंगाबाद_
_9049315108_
_______________________
एक विरह कवीता........
--------------------------------
दि.24/09/2021
---------------------------------


आता तर जातोयं मी फक्त रोटी कमवायला
पण परत येईल‌ रात्री माझी भुक शमवायला

खुप केले मी ही बचाव आणि हल्ले.. तरी ही..
ऐकं! काय कारण आता कुणाला नमवायला?

विसरून जावू दोघे जण काही गोष्टी नेमक्या
खुप कष्ट पडतात खरं त्या हवे तसे जमवायला

प्रेम हरलं‌ प्रेम!......माणूस कसला विचारता?
काय उरलयं आणखी आयूष्यात गमवायला?

झालं गेलं सखे तू ही ....विसरून जा हवे तर
नको सांगू पून्हा माझं मनं तुझ्यातं रमवायला




श्री.एन.एम.केंद्रे
7218629881
हुंडाबळी

हुंड्यासाठी पैशांसाठी
लई केला तीचा छळ
सुन घराची गा लक्ष्मी
कशी पेटविली धळधळ !!

ज्वाला पेटल्या पेटल्या
कशा भिडल्या आकाशी
दिशा दाहि आक्रन्दति
जीव सोडिना देहाशी !!

झाली तड़फड जीवाची
जैसा पाण्याविना मासा
माय रडे धायधाय
बाप झाला येडापिसा !!

आई बहिन बायको
होती कुणाची ती लेक
होती त्यागाची रे मूर्ति
देवी वात्सल्याची एक !!

नाही फुलली पाकळी
कशी तोडली रे कळी
लोभापाई स्वार्थापाई
झाला तीचा हुंडाबळी !!
वासुदेव महादेवराव खोपडे
सहा पोलीस उपनिरीक्षक(सेनी)
अकोला 9923488556
🌷🌷 🌷गज़ल 🌷🌷🌷
******************
माणसाने कायदे किती पाळायचे
कां? रोज आपलेच हात पोळायचे

संविधान आहे नेमके कुणासाठी
कां? अपराध्यांचे लाड पुरवायचे

राज्यकर्तेच भ्रष्टाचारात लिप्त जेथे
जनतेने च आता पुढे यायचे

आहेत सारेच असुरक्षित येथे
व्यक्त होणे ही महागात पडायचे

फुकटात मिळते तेथेच गर्दी
गरजवंतालाच डावलायचे

लोकशाहीच्या नांवात काय उरले
रोज नव नवे नियम लादायचे

मतासाठी खैरात जाते वाटली
आश्वासन असते विसरायचे

रमेश कृष्णराव भोयर भद्रावती
दि 26/9/2021
हादरून च
जाईल ही युती

राज्यात ही आहे युती
जिल्ह्यात ही आहे युती
गुण्यागोविंदाने सांगतात
आपली जुनीच हो नाती

जिल्ह्यात ही आहे युती
तालुक्यात ही आहे युती
जी प , प स पोट निवडणुकीत
काहो केली यांनी माती

की आपण सारे भाऊ भाऊ
राजकारणात जाऊ वाटून खाऊ
कोणाची ताकद किती हे
आताच आजमावून पाहू

तीन पक्षाची राज्यात युती
चार पक्षाची जिल्हात युती
पोटनिवडणूक लढताय हो
तुम्ही हो समोरा समोर

एक प्रकारे तुम्ही टाकता
जनतेच्या डोळ्यात हो माती
अशी कशी हो तुमची ही
आगळी वेगळी अनोखी युती

मतदारांची करणार दिशाभूल
काय करील कमळाचे फूल
आपण जपावी आपली नाती
हे राजकारणी करतात युती

कोणत्या वेळी कोणाशी हे
स्वार्थासाठी करतील युती
मतदान योग्य व्यक्तीला करा
जागरूक ठेऊन आपली मती

केलीच आहे त्यांनी युती
आता मतदारांनीही करा
असे करा मतदान की आता
हादरून जाईल ही युती
हादरून जाईल ही युती

कवी, आदिम, मोहन बारकू जानकीबाई गुहे
डहाणू, पालघर, विक्रमगड, जव्हार
जय आदिवासी, जय जोहार
वाडा, मोखाडा वसई तलासरी
एक आदिवासी, लाखा ला भारी
दिनांकः 30/9/2021
विषयः निसर्गराजा('हायकू')

निसर्गराजा
शिक्षकी एक दुवा
सर्व मानवा

याचा देखावा
हवा थंड थंड ती
भुलवी मति

श्रावणातील
रिमझिमती सरी
आनंद भारी

सरस्वतीचा
सुंदर हा नमुना
मुरली कान्हा

भेदभावाला
इथे असे मज्जाव
हा प्रेमभाव

संध्याकाळचा
मोहक तो नजारा
अर्थ तो खरा

श्री सुरेश शिर्के
खारघर,पनवेल
मो: 8451892338
आज ही मेरे ह्रदय ने.
मुझसे कहा
मेरा भी ख्याल रखो....
दूसरों की बातों से
मुझे दुख ना पहुंचाओ
व्यायाम योगा टहलना
बाहर का भोजन ना खाना
बस तनाव रहित ही रहना

जीवन भर जो हृदय का ख्याल रखें।
वैसे प्यारे इंसान को दिल में बसाना।

विश्व हृदय दिवस की बधाई और शुभकामनाएं।

डॉ अर्चना श्रेया
बैंगलोर
  *दिनांक  - 30/09/2021*
   
*शीर्षक : - आयुष्याच्या शाळेत*

जन्म होताच सुरू होते
आयुष्याच्या शाळेत शिक्षण
नाती गोती मिळवुनी
जगावे लागते इथे जीवन

सुखदुःखाच्या संगमी बनते
आयुष्याचे भरजरी वीण
प्रत्येकाचा या वाटेवर
होतच असतो जीव क्षीण

मैत्रीच्या सुखद कट्ट्यावरती
विसरून धगधगती आग
पुढे चालत रहावे लागते
धरूनी या निसर्गाची साथ

आयुष्याच्या हिमशिखरावर
तोच जाऊन पोहोचतो
जीवन फार सुंदर आहे
प्रत्येक क्षणाला जो शिकतो

राग ,द्वेष नको इथे
नको कसलेही युद्ध
समतेसाठी मानवी आयुष्य
सांगून गेले तथागत बुद्ध🙏

*सौ.वर्षाताई राज इंगळे जिल्हाध्यक्ष बुलढाणा*
Forwarded from Anil Rathod
🕊️🕊️🕊️🕊️🕊️🕊️
हवं तर......
भंगार विकून जीवन जगावं
पण
जीवनाला भंगार होऊ देऊ नये....

🕊️🕊️🕊️🕊️🕊️🕊️🕊️🕊️🕊️

©अनिल रायसिंग राठोड
आम्ही तिवरंगकर
9766843677
जेष्ठ नागरिक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
म्हातारा

लय वय नाही झाल
फक्त साठीतच आलो
कोण म्हणते रे गड्या
आता मी म्हतारा झालो !!

साऱ्या मिटल्या कायज्या
आता बिनधास्त झालो
आंगात घुसल वार
मी तरनाबांड झालो !!
कोण म्हणते रे गड्या
आता मी म्हतारा झालो !!

बाबा,आबा,काका,मामा
साऱ्या नात्यात मी न्हालो
सर्वांसाठीच जगलो मी
मी माझाच नाही झालो !!
कोण म्हणते रे गड्या
आता मी म्हतारा झालो !!

झालो फक्त सेवा मुक्त
कर्म मुक्त नाही झालो
"माय""भू"च्या ऋणातून
आज मुक्त नाही झालो !!
कोण म्हणते रे गड्या
आता मी म्हतारा झालो !!

वय वाढले देहाचे
मानाने महान झालो
माया,मोह,स्वार्थ,द्वेष
अहंकार मुक्त झालो !!
कोण म्हणते रे गड्या
आता मी म्हतारा झालो !!

केस जरा पिकलेत
नाही नाराज मी झालो
किलकिल्या नजरेन
सूंदर नजारा मी प्यालो !!
कोण म्हणते रे गड्या
आता मी म्हतारा झालो !!

झालो छोट्यां संगे छोटा
मोठ्यां संगे मोठा झालो
हॄदयात बैसुनिया
प्रेम मी निष्पाप प्यालो !!
कोण म्हणते रे गड्या
आता मी म्हतारा झालो !!
वासुदेव महादेवराव खोपडे
सहा पोलीस उपनिरीक्षक (सेनी)
अकोला 9923488556
अभी भी बरसात है

तेज हवा के साथ बादल है
फिर भी क्या कहे
अभी भी बरसात है

फिजाओ मे रंग घुल गऐ वफा के
फिर तलाश है तुम्हारी
फिर भी क्या कहे
अभी भी बरसात है

पंछी उडते है मस्त गगन में
बिना किसी परवाह के
लौट जाते है घोंसलो में गिले परों से
फिर भी क्या कहे
अभी भी बरसात है

#अनिल पंडित
रम्य त्या आठवणी

पाकळ्या पाकळ्यामधूनी
जणू उमलत जाते
आठवणीचा ठसा
प्रश्न पडे मजला एवढा काळ
लोटला कधी अन् कसा

कधी आठवते ती रात्र
नोट्स पूर्ण करण्यासाठी
जागले मी मात्र

कधी आठवते ती शाळेची
दुपार
लेक्चर संपण्याची
पाहिली वाट फार

कधी आठवते ती
संध्याकाळ
मैत्रिणीसोबत केलेली
थट्टा अन् अनुभवलेला
मैत्रीचा कट्टा

कधी आठवणीत येतात
हसवा अन् रडवा क्षण
कधी आठवते ते
घाबरलेले मन


कधी आठवते ती झालेली
चूक
आठवणीत येते ...उत्तर
येत असताना
राहिलेली मी मूक

सुखद दुःखद क्षण हे सारे
मनात वसले
आठवणीत शिरताच मी
सारे क्षण पुन्हा एकदा
जगले


कु. सिध्दी सुरेश बोंद्रे.
माझे विचार
माझ्यासारखे
✍🏻
बापू

बापू तुमच्या देशात
काय काय चाललय
खुळ जाती धर्माचच
घरोघरी वाढलय !!

नेते झाले भ्रष्टाचारी
लाचखोर अधिकारी
डोईजड झाले सारे
हीच आमची लाचारी !!

बनियाची नफेखोरी
दलाली नि बेईमानी
जनता ही सैरभैर
शासनाची मनमानी !!

कुंपनच खाते शेत
रक्षक झाले भक्षक
सिंहासनी हे बैसले
नाग विषारी तक्षक !!

मजूर झाला लालची
कर्मचारी तो आळसी
फुकट रेशन पाई
ह्या देशाची ऐसीतैसी !!

हतबल बळीराजा
करतोय आत्महत्या
राजरोस येथे होते
लोकशाहीची हो हत्या !!

नका बापू तुम्ही आता
आस धाय धाय रडू
पुन्हा आम्ही सारे आता
खरया स्वातंत्र्यास्तव लढू !!
वासुदेव महादेवराव खोपडे
सहा पोलीस उपनिरीक्षक (सेनी)
अकोला 9923488556
Forwarded from Anil Rathod
तिन्का-तिन्का जमाकर
बनता हैं हमारा आशियाँ
परिवार में तब जाकर कही
खेला करती हैं खुशियाँ

🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂

©अनिल रायसिंग राठोड
आम्ही तिवरंगकर
9766843677
© *गज़ल*
~~~~
*जुबाँ से जब कभी अल्फाज़ निकलते है।*
*एक बात में यहाँ हजारो राज़ निकलते है।*

*दोस्तो के चेहरो पर भी नका़ब लगे है और,*
*दुश्मन भी आस्तिन के आसपास निकलते है।*

*ये इत्तेफा़क तो नहीं, की जिनसे भी हमे ठोकर लगी,*
*नजाने क्यू वो ही पत्थर तुम्हारे खा़स निकलते है।*

*जरा सा खुदा मेहेरबान क्या हुवा बेवकुफो पर,*
*नजरअंदाज लोगो के भी नये नये अंदाज निकलते है।*

*वो कहेते है, हमारे लब्ज़ दिल में उतर जाते है,*
*हमारी क़लम से लब्ज़ कहाँ, एहेसास निकलते है।*

*फिरोज की उम्र से हुनर का अंदाजा न लगा लेना,*
*हमारे तज्रुबे ज़रा उमर-दराज़ निकलते है।*
*फिरोज काझी*
© 9325964308

इत्तेफाक - योगायोग
लब्ज - शब्द
तज्रुबे - अनुभव
उमर-दराज - बुजूर्गी वाले, जेष्ठ
नशीब
माहये नशीब नशीब
ब्रम्ह देवाच्या रेघोटया
कर्म बुड़ाल पाण्यात
आशा राहिल्या वांझोटया !!

मांड्या मांड्या सोयाबीन
गच्च होत रे रानात
सार वाहूनिया गेल
मांड्या कम्बर पाण्यात !!

आस कस माह्या देवा
येळ कशी रे आणली
बंद मंदिरात तुवां
लाज सरम ईकली !!

बैला परी बैला संगे
राब राबलो शेतात
कर्म योगाची रे गीता
कृष्णा डूबली पाण्यात !!

सार पिक रे पाण्यात
झाल जीवनाच पाणी
अंधारली जिंदगानी
वाहये डोयातून पाणी !!

पाठीवर मार देवा
नको पोटावर मारू
बळीराजाचा संसार
असा नको रे संहारु !!
वासुदेव महादेवराव खोपडे
सहा पोलीस उपनिरीक्षक (सेनी)
अकोला 9923488556
Forwarded from Anil Rathod
गलतफहेमीया ढेरो लेकर दिलं में
खूबसुरती आईने में ढुंढता हैं....
गौर से देख जरा अपने किरदार कों
सबकुछ तों यह बयाँ करता हैं....

🃏🃏🃏🃏🃏🃏🃏🃏

©अनिल रायसिंग राठोड
आम्ही तिवरंगकर
9766843677
Forwarded from _₹विkant Wakude
दशाक्षरी

कृतीपेक्षा अपयश नसे
कुठल्या पारड्यात महान
सातत्य ठेवल्यावर असे
जीवनाची यशस्वी कमान
_₹विkant
Forwarded from Anil Rathod
काही लोकं भंगार विचाराचे ओझे
झटकायला तयार नसतात .....
तेव्हा
आयुष्यभर तेच ओझं वाहणं
ही त्यांची नियती बनते.....

🐌🐌🐌🐌🐌🐌🐌🐌

©अनिल रायसिंग राठोड
आम्ही तिवरंगकर
9766843677