सामान्य विज्ञान By Sandip Kawale
223 subscribers
66 photos
1 video
24 files
124 links
"सामान्य विज्ञान" विषया बद्दल स्पर्धा परीक्षा उपयोगी रोज 5 प्रश्न स्पष्टीकरणा सह..गरजू आणि प्रमाणिक प्रयत्न,.......!!!

संपर्क :- @science3737
Download Telegram
❇️ सामान्य विज्ञान ❇️
==============
Explained By :- @sandipkawale

प्रश्न :-- 5) एकमेकांपासून 1 मिलीमीटर अंतरावर असलेली दोन रेखाछिद्रे पडद्यापासून 1 मीटर अंतरावर ठेवलेल्या आहेत. त्यांच्यावर 500 नॅनोमीटर तारंगलांबी ची शलाका सोडल्यानंतर पडद्यावर व्यतिकरण परिणामामुळे (interference effect) तयार झालेल्या पंक्तिमधील अंतर किती?
.... ( राज्यसेवा पूर्व - 2018)
पर्याय:
1) 5.0 mm
2) 0.5 mm
3) 5.0 cm
4) 0.05 mm

◆◆ T Channel: @gkiran123
======================

स्पष्टीकरण :---

दिलेल्या माहितीनुसार,

d = दोन स्लिट मधील अंतर
= 1mm = 1× 10^-3 मीटर

D = स्लिट आणि पडद्या मधील अंतर
= 1 मीटर

तरंगलांबी = 500 nm
= 5 × 10^ -7 मीटर

दोन तरंगलांबी मधील अंतर

D × तरंगलांबी
= -------------
d

1 × 5 × 10^-7
= ---------------
1 × 10-3

= 5 × 10^ -4

= 0.5 mm

दोन तरंग लांबी मधील अंतर
= 0.5 mm

उत्तर : [ पर्याय (2) बरोबर ]
Explained by :- @sandipkawale
==========★★★==========
https://t.me/joinchat/AAAAAD994psmj7jTZkFksQ
सामान्य विज्ञान

 आकाशगंगा :

🔸सूर्य हा एक तारा असून त्या भोवती पृथ्वीसहित 8ग्रह फिरतात.

🔸 चंद्र हा पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह आहे.

🔸  प्रत्येक दिवशी चंद्रोदय आदल्या दिवसापेक्षा सुमारे 50 मिनिटे उशिरा होतो.

🔸चंद्राला पृथ्वीभोवती एक परिभ्रमण करण्यास 27.3 दिवस लागतात.

🔸एका अमावस्येपासुन दुसर्यार आमवस्येपर्यंतचा काळ 29.5 दिवसांचा असतो.

🔸एकूण 88 तारकासमूह मानले जातात. त्यातील 37 तारकासमूह उत्तर खगोलीय तर 51 तारकासमूह दक्षिण खगोलीय आहेत.

🔸प्राचीन भारतीय खगोल अभ्यासकांनी 27 नक्षत्रांची कल्पना केली आहे.

🔸 प्लूटो आणि त्याच्यासारख्या इतर खगोलीय वस्तूंना आता बटुग्रह म्हणून ओळखतात.

🔸बुधाचा परिभ्रमणकाळ फक्त 88 दिवस तर नेपच्यूनचा सुमारे 146 वर्षे इतका मोठा असतो.

🔸 बुध हा सूर्याचा सगळ्यात जवळचा आणि सगळ्यात लहान ग्रह आहे. 

🔸पृथ्वीच्या सर्वात जवळचा ग्रह म्हणजे शुक्र. त्याला 'पहाटतारा' म्हणतात.

🔸 पृथ्वीच्या कक्षेत असलेल्या बुध आणि शुक्र यांना 'अंतर्ग्रह', तर कक्षेबाहेरील ग्रहांना 'बाह्यग्रह' म्हणतात.

🔸 'मंगळ' हा पहिला बाह्यग्रह आहे.

🔸 सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह म्हणजे 'गुरु'

🔸गुरूला एकूण 63 उपग्रह आहेत.

🔸शनि या ग्रहाची घनता पाण्यापेक्षा कमी आहे.

🔸 शुक्राप्रमाणे युरेनस देखील पूर्वेकडून पश्चिमेकडे स्वत: भोवती परिवलन करतो.

🔸 धूमकेतूचे पुच्छ सूर्याच्या विरुद्ध बाजूने असते.

🔸 हॅले हा धूमकेतू 76 वर्षानी दिसतो. आता 2060 मध्ये दिसेल.

🔸 भारताचा पहिला उपग्रह आर्यभट्ट 19 एप्रिल 1975 रोजी सोडण्यात आला.

🔸 त्यानंतर इन्सॅट, आय.आर.एस., कल्पना - 1, एज्युसॅट, भास्कर, इ. उपग्रह आपण अवकाशात सोडले आहेत.

🔸 ‘इस्त्रो’ या संस्थेमार्फत आतापर्यंत 21 उपग्रह सोडण्यात आले. 

🔸 GMRT म्हणजे जयंट मिटेरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप.

🔸 टाटा इन्सिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (TIFR) ने ती खोडद येथे बसविली.

🔸 आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे धोक्यात आलेल्या वनस्पती व अन्य वन्य प्राणी यांच्या संरक्षणासाठीचा करार 1975 पासून अंमलात आला आहे.

🔸 जैवविविधतेच्या संरक्षणासाठी ब्राझील रिओ-द-जनिरो येथे झालेल्या 1992 च्या वसुंधरा परिषदेत जैववैविध्य करारावर सह्या करण्यात आल्या.

 चुंबकत्व :
🔸 5 मार्च 1872 रोजी जॉर्ज वेस्टिंग हाऊस या संशोधकाने रेल्वेसाठी एअर ब्रेक प्रथम वापरले.

🔸 चुंबकाकडे लोह, निकेल, कोबाल्ट या धातूंचे तुकडे आकर्षित होतात.

🔸 मोकळ्या टांगलेल्या स्थितीमध्ये दक्षिणोत्तर स्थिर राहणे, हे चुंबकाचे वैशिष्ट आहे.

 अणूंची संरचना :

🔸 इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्युट्रॉन हे अणूतील मूलकण आहेत. 

🔸 अणूच्या केंद्रकात प्रोटॉन आणि न्युट्रॉन असतात. अणूच्या केंद्रकाभोवती इलेक्ट्रॉन परिभ्रमण करतात.

🔸  प्रोटॉन धनप्रभारीत, इलेक्ट्रॉन ऋण प्रभारीत तर न्युट्रॉनवर कोणताच प्रभार नसतो.

🔸 अणुक्रमांक (Z) म्हणजेच अणुतील इलेक्ट्रॉन किंवा प्रोटॉनची संख्या.

🔸 अनुवस्तुमानांक म्हणजे अणुतील प्रोटॉन आणि न्युट्रॉन यांच्या संख्याची बेरीज.

🔸  मूलद्रव्याच्या संस्थानिकात अणुक्रमांक सारखाच असून अणूवस्तुमानांक भिन्न असतो.

🔸 मूलद्रव्याच्या इतर मूलद्रव्यांशी संयोग पावण्याचा क्षमतेला 'संयुजा' म्हणतात.

🔸🔸 महत्वाचे मुद्दे :

🔸 विषाणूंभोवती प्रथिनांचे आवरण असते.

🔸  जीवणूंमध्ये केंद्रकाऐवजी मुक्त गुणसुत्रे असतात.

🔸  स्टॅफिलोकोकस जीवाणू खधापदार्थावर वाढताना एण्टेरोटॉक्झिन नावाचे विषारी रसायन तयार करतात. 

🔸 पेनिसिलीन नावाचे प्रतिजैविक पेनिसिलिअमपासून बनले आहे.

🔸 साथीचे रोग- कॉलरा, विषमज्वर, इन्फ्लुएंझा, हगवण, डोळे येणे, इ.

🔸 संसर्गजन्य रोग – क्षय, इन्फ्लुएंझा, इ.

🔸  संपर्कजन्य रोग – खरूज, इसब, गजकर्ण, इ. 

🔸 पिसळलेला कुत्रा, माकड, मांजर किंवा ससा यांच्या चावल्यामुळे रेंबीज होतो.

🔸 रोबर्ट कॉक याने क्षय रोगाचे जिवाणू शोधून काढले.

🔸 WHO तर्फे क्षयरोग निर्मुलन कार्यक्रम राबविला जातो. त्यासाठी DOT केंद्र काढली आहेत. (Directly Observed Treatment)

🔸  मनुष्यप्राणी 'व्हीब्रिओ कॉलरा' या कॉलर्याचचा जिवाणू वाहक आहे. 

🔸 लसीकरण – बीसीजी, त्रिगुणी पोलिओ, गोवर, व्दिगुणी, धनुर्वात, कविळ-ब.

🔸 त्रिगुणी लस घटसर्प, धनुर्वात व डांग्या खोकला या रोगांस प्रतिबंध करते.
🅾 G.kiran'$( विज्ञान + तंत्रज्ञान )🅾
========================
@Gkiran'$ Maths Acdmy. Pune

0⃣ प्रश्न क्र :- 9)...जर द्रावनाचा pH 1 पासून 4 पर्यंत वाढविल्यास त्यातील हायड्रोजन (H+) ची तीव्रता..
(ASO-2015)
पर्याय :---. @sandipkawale
1) कमी होते 2) वाढत जाते

3) तसेच राहते 4) वरीलपैकी नहीं

उत्तर : [ पर्याय (1) बरोबर ]

स्पष्टीकरण :-
🔸 जस - जसा pH वाढत जातो तस-तसे हैड्रोजन आयन चे प्रमाण कमी-कमी होत जाते.

◆◆T Channel : @gkiran123


0⃣ प्रश्न क्र. 10).. pH मापणी ही पाणी द्रावनाची आम्लता मोजन्या साठी वापरली जाते. ही मापनी हायड्रोजन आयन (H+) चे सकेंद्रनावर (concentration) आधारित असते. खालीलपैकी काय आम्ल नाही ?
.... ( राज्यसेवा 2016)
पर्याय :-- @sandipkawale
1) केळी 2) रक्त

3) दूध 4) टोमॅटो

उत्तर :- [ पर्याय(2)बरोबर ]

🔘 स्पष्टीकरण :-
वरील प्रश्ना मध्ये आपल्याला फक्त रक्ताचा pH माहित असणे गरजेचे होते . जो 7.35 ते 7.45 दरम्यान असतो. म्हणजेच रक्त हे आम्ल नसून अंशतः आम्लारी आहे. म्हणजेच बेसिक आहे.

Cont: @gkiran999/88305 00819
=========================
https://telegram.me/gkiran123
https://t.me/joinchat/AAAAAD994psmj7jTZkFksQ
🅾 G.kiran'$( विज्ञान + तंत्रज्ञान )🅾
========================
@Gkiran'$ Maths Acdmy. Pune

0⃣ प्रश्न क्र :- 11....क्षार नियंत्रणाचे काम हे मानवी शरीरातील अड्रेनल ग्रंथिकडून केले जाते. त्या कुठे विसवालेल्या असतात?
( राज्यसेवा :- 2016)
पर्याय :--- @sandipkawale
1) मुत्रपिंडामध्ये

2) मुत्रपिंडावर

3) मुत्रपिंडाच्या विरुद्ध बाजूस

4) दोन्ही मूत्रपिंडामध्ये

उत्तर:- [पर्याय क्र (2) बरोबर.]

स्पष्टीकरण :-
अधिवृक्क ग्रंथी (Adrenal Gland)

1⃣ ही ग्रंथी विशिष्ट असे संप्रेरक स्रावते ज्यामुळे रक्तातील क्षारांचे प्रमाण नियंत्रित केले जाते.

2⃣ ही ग्रंथी मुत्रपिंडावर वसलेली असते ज्याद्वारे सोडियम चे प्रमान नियंत्रित केले जाते

3⃣ Adrenaline हे संप्रेरक या ग्रंथिद्वारे स्रावले जाते

4⃣ Adrenaline हे संप्रेरक मानुस रागात असताना , भीतीने घाबरला असताना , तनावात असताना मदत करते म्हणून याला आपातकालीन संप्रेरक(emergency hormone) म्हणतात.

◆◆T Channel : @gkiran123


0⃣ प्रश्न क्र.12)...
ऑक्सिश्वसनाच्या शेवटी काय तयार होते ?
(राज्यसेवा - 2015)
पर्याय :-- @sandipkawale
1) CO2 + CO

2) CO2 + NO

3) CO2 +O2

4) CO2 + H2O

उत्तर :- [पर्याय क्र( 4) बरोबर]

🔘 स्पष्टीकरण :- ऑक्सिश्वसन करताना ऑक्सीजन आत मध्ये घेतला जातो आणि कार्बन डाइऑक्साइड बाहेर टाकला जातो.
या प्रक्रिये मध्ये सोबतच पाणी पण वाफ़ेच्या स्वरुपात बाहेर पडत असते.
==========================
https://t.me/joinchat/AAAAAD994psmj7jTZkFksQ
🅾 G.kiran'$( विज्ञान + तंत्रज्ञान )🅾
========================
@Gkiran'$ Maths Acdmy. Pune

प्रश्न क्र 13)...जीवाणु मधील प्रजानणाची (reproduction) सर्वात प्रभावी पद्धती कोणती ?
( PSI - 2011)

पर्याय:--- @sandipkawale

1) मुकुलायन ( budding)

2) पुनर्जीवन ( regeneration)

3)द्विखंडन ( binary fission)

4) युग्मकी एकत्रीकरण (genetic union)

उत्तर : [ पर्याय (3) बरोबर ]

🔘 स्पष्टीकरण :-
मुकुलायन - हायड्रा मध्ये होते.

पुनर्जनन - हे प्लेनेरीआ मध्ये होते.

खंडीभवन - हे स्पायरोगायरा मध्ये होते.



◆◆T Channel : @gkiran123

0⃣ प्रश्न क्र. 14).. स्पायरोगायरा प्रजनन (reproduction) खालीलपैकी कोणत्या पद्धतीने होते?
.... ( STI- 2016)
पर्याय :-- @sandipkawale

1) शाकीय (vegetative)

2) लैंगिक (sexual)

3) वरील दोन्ही प्रकारे

4) वरील दोन्ही प्रकारे नाही

उत्तर :- [ पर्याय(4)बरोबर ]

🔘 स्पष्टीकरण :-
स्पायरोगायरा मध्ये प्रजनन हे खण्डिभवन (fragmentation) या अलैंगिक प्रजनन पद्धती द्वारे होते.
योग्य वातावरण मिळाल्या नंतर स्पायरोगायरा ची वाढ व विभाजन वेगाने होते यामध्ये त्याचे अनेक खंडांमध्ये रूपांतरण होते...

Cont: @gkiran999/88305 00819
=========================
https://t.me/joinchat/AAAAAD994psmj7jTZkFksQ
🅾 G.kiran'$( विज्ञान + तंत्रज्ञान )🅾
========================
@Gkiran'$ Maths Acdmy. Pune

प्रश्न क्र 14)...कोरडी कडधान्ये, साखर, पिठ, हवाबंद केलेली फळे व भाज्या ही सर्व उदाहरणे खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या अन्नपदार्थाची आहे.?
(State Excise pre- 2017)

पर्याय:--- @sandipkawale
1) नाशवंत पदार्थ

2) उपान्त्य नाशवंत पदार्थ

3) टिकाऊ किंवा स्थिर पदार्थ

4) वरीलपैकी कोणतेही नाही

उत्तर : [ पर्याय (3) बरोबर ]

🔘 स्पष्टीकरण :-

🎯🎯 अन्नरक्षण पद्धती (food preservative techniques) 🎯🎯

🔸 गोठानिकरण (chilling)
कमी तापमानाला अन्नापदार्थातील जैविक व रासायनिक प्रक्रियांचा वेग मंदावतो त्यामुळे अन्नापदार्थ खुप काळ टिकू शकतात. यासाठीच घरातील शीतकपाटाचा उपयोग करतात.

🔸 धुरिकारण (smoking)
यामध्ये धुर देवून अन्न संरक्षित केले जाते. यासाठी अल्युमिनिअम फॉस्पाइड वापरतात.

🔸 किटकनाशकाचा वापर (use of insecticide)
पोत्यात धान्य भरल्या नंतर मेलॅथिओनचा फवारा पोत्यावर मारतात.

🔸 किरनिकरण (radiation)
या पद्धतित अन्नपदार्थावर अयनिभवन करणाऱ्या किराणांचा मारा करतात. उदा. X-ray , ग्यामा किरण. या प्रक्रियेमुळे सूक्ष्मजीव , बुरशी व किटकांचा नाश होतो. फळाणचा पिकण्याचा कालावधी वाढतो. तसेच अंकुरण्याची प्रक्रिया मंद झाल्यामुळे बटाटे , कांदे इ. पदार्थ जास्त कालावधी साठी टिकू शकतात.

🔸 वायुचा वापर (use of gases)
वेफर्स व इतर पदार्थ हवाबंद पिशव्यांमध्ये बंद करताना नायट्रोजन वायुचा वापर करुन त्यातील कीटक व बुराशीच्या वाढीला आळा घातला जातो.

🔸 नैसर्गिक परिरक्षक ( natural preservative)
निसर्गतः उपलब्ध असणारे पदार्थ यात प्रामुख्याने मीठ , साखर, तेल, वापरून बनवलेली लोनची , जॅम , मुराम्बे इ. पदार्थ तयार करतात.

🔸पाश्चरिकरण
या पद्धतीत दूध विशिष्ठ तापमानाला उदा. 80℃ ला 15 मिनिटे तापवले जाते व नंतर ताबडतोब थंड केले जाते यामुळे दुधातील सूक्ष्मजीवांचा नाश होऊन ते दीर्घकाळ टिकते.


◆◆T Channel : @gkiran123

Cont: @gkiran999/88305 00819
=========================
https://t.me/joinchat/AAAAAD994psmj7jTZkFksQ
🅾 G.kiran'$( विज्ञान + तंत्रज्ञान )🅾
========================
@Gkiran'$ Maths Acdmy. Pune

प्रश्न क्र 16)... कोणते जीवनसत्व हे शरीरातील कॅल्शिअम व फॉस्परस च्या आंतरिक शोषणा साठी जबाबदार आहे? ( PSI - 2014)

पर्याय:--- @sandipkawale

1) Vit - A

2) Vit - D

3) Vit - E

4) Vit - K

उत्तर : [ पर्याय (2) बरोबर ]

🔘 स्पष्टीकरण :-

📌 Vit - A - रेटिनॉल (Retinol)

मुख्य कार्य - रात्र दृष्टी साठी डोळ्यात दंडपेशिमध्ये रोडॉप्सिन या रंगद्रव्याची निर्मिति करने.

अभावाचा परिणाम :- रातआंधळे पणा

📌 Vit - D - कॅल्सिफेरॉल (Calciferol)
कार्य :- शरीरातील कॅलशिअम व फॉस्परस चे प्रमाण नियंत्रित ठेवणे.
अभाव :- लहान मुलांमध्ये मुडदुस

📌 Vit - E - टोकोफेरॉल ( Tocopherol)
कार्य :- या जिवंसत्वास Antioxident जीवनसत्व म्हणतात.
शरीराच्या रोगप्रतिकार यंत्रणेत भाग घेतात.

आभाव :- याच्या अभावामुळे वांझपणा येतो.

📌 Vit - K - फायलोक्विनोन (Phylloquinone)
कार्य :- रक्त गोठवण्याच्या प्रक्रियेत मदत करते.
ग्लूकोज चे ग्लायकोजन मध्ये रूपांतर करने.
आभाव :- रक्त गोठन्यास विलंब.

◆◆T Channel : @gkiran123


Cont: @gkiran999/88305 00819
=========================
https://t.me/joinchat/AAAAAD994psmj7jTZkFksQ
🅾 G.kiran'$( विज्ञान + तंत्रज्ञान )🅾
========================
@Gkiran'$ Maths Acdmy. Pune

प्रश्न क्र 17)...एका साधारण प्रौढाकरता पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे?

अ) रक्तात सर्वसाधरणपने ग्लुकोजचे प्रमाण उपाशी पोटी 70 mg % पर्यन्त असावे .

ब) जेवनानंतर रक्तातील सर्वासाधारण ग्लूकोज प्रमाण 140 mg % पर्यंत असावयास हवे.
( MPSC राज्यसेवा - 2016)

पर्याय:--- @sandipkawale

1) फक्त अ

2) फक्त ब

3) दोन्ही बरोबर.

4) दोन्ही नाही.

उत्तर : [ पर्याय (2) बरोबर ]

🔘 स्पष्टीकरण :-
🔸 सर्वसाधारण मनुष्या मध्ये उपाशी पोटी रक्ता मध्ये ग्लूकोज चे प्रमाण हे 80 mg/dL असेल तर त्याला योग्य प्रमाण म्हणतात.
आणि जेवण केल्या नंतर 2 तासांपर्यंत ग्लूकोज चे रक्तातील प्रमाण 140 mg/dL पर्यन्त असेल तर ते योग्य समजले जाते..

◆◆T Channel : @gkiran123

0⃣ प्रश्न क्र. 18) विषाणु (viruse) ...... असतात.
.... ( राज्यसेवा- 2014)
पर्याय :-- @sandipkawale

1) एकपेशीय (unicellular)

2) पेशीभित्तिका रहीत पेशी (cellular withought cell wall)

3) बहुपेशीय (multicellular)

4) अपेशीय जीव.(Non cellular)

उत्तर :- [ पर्याय(4)बरोबर ]

🔘 स्पष्टीकरण :-
🎯🎯 विषाणू 🎯🎯

🔸यांचा अभ्यास इलेक्ट्रॉनिक सुक्ष्मदर्शक वापरून केला जातो.

🔸 यामध्ये रचना साधी असून पेशीरस व अंगके नसतात.

🔸 विषाणू भोवती प्रथीनांचे आवरण असत

🔸 त्यामध्ये DNA किंवा RNA असतात.

🔸 त्यांच्यामुळे वनस्पती व प्राणी यांच्या मध्ये विविध रोग निर्माण होतात.

Cont: @gkiran999/88305 00819
=========================
https://t.me/joinchat/AAAAAD994psmj7jTZkFksQ
🅾 G.kiran'$( विज्ञान + तंत्रज्ञान )🅾
========================
@Gkiran'$ Maths Acdmy. Pune
0⃣ प्रश्न क्र. 27)...सान्द्रिभवना (condensation) दरम्यान उत्सर्जित होणाऱ्या उष्णतेस काय म्हणतात ?
.... ( राज्यसेवा- 2017)
पर्याय :-- @sandipkawale

1) आर्द्रता (humidity)

2) अनुद्भुत उष्णता ( latent heat)

3) बाष्पिभवन (Evaporation)

4) संप्लवन (sublimation)

उत्तर :- [ पर्याय (2) बरोबर ]

🔘 स्पष्टीकरण :-
🔸 Latent Heat🔸
पदार्थाचे स्थायुतुन द्रवात वा द्रवातून वायुत रूपांतर होताना लागणारी उष्णता किंवा उत्सर्जित केलेली ऊर्जा म्हणजे latent heat होय.
आर्द्रता :- कोणत्या ही ठिकानच्या
वातावरणात असलेले बाष्पाचे प्रमाण. त्याचे दोन प्रकार,
1) सापेक्ष आर्द्रता.
2) निरपेक्ष आर्द्रता.
◆◆T Channel : @gkiran123

प्रश्न क्र. 28)...अभ्रक कपडयांच्या इस्त्रित वापरले जाते.यासन्दर्भात योग्य विधान ओळखा.

अ) अभ्रक विजेचा सुवाहक आहे.

ब) अभ्रक उष्णतेचा सुवाहक आहे.
.... ( राज्यसेवा- 2016)
पर्याय :-- @sandipkawale

1) फक्त अ

2) फ़क्त ब

3) दोन्ही बरोबर.

4) दोन्ही चूक.

उत्तर :- [ पर्याय (2) बरोबर ]

🔘 स्पष्टीकरण :--
🔸 अभ्रक 🔸
- याचा उपयोग उष्णतेचा सुवाहक म्हणून केला जातो.
-विविध उपकरणांमध्ये वापर केला जातो.
- विजेचा दुर्वाहक आहे आणि उष्णतेचा सुवाहक आहे म्हणूनच इस्त्री मध्ये वापरले जाते.


Cont: @gkiran999/88305 00819
=========================
https://t.me/joinchat/AAAAAD994psmj7jTZkFksQ
🅾 G.kiran'$( विज्ञान + तंत्रज्ञान )🅾
========================
@Gkiran'$ Maths Acdmy. Pune
0⃣ प्रश्न क्र. 29)... प्रकाशाचे अस्तित्व ज्या सूक्ष्म कणांमुळे तयार होते त्या कणांना(particles) काय म्हणतात ?
.... ( राज्यसेवा- 2012)
पर्याय :-- @sandipkawale

1) इलेक्ट्रान

2) पॉझिट्रोन

3) फोटॉन

4) प्रोटॉन

उत्तर :- [ पर्याय (3) बरोबर ]

🔘 स्पष्टीकरण :-
- सूर्यप्रकाश इंफ्रारेड किरनांपासून बनालेला असतो.
- फोटॉन -
- हा मुलभुत कनांचा प्रकार आहे.
- हा कण वस्तुमान विरहित असतो.
- यावर कोणताही विद्युत प्रभार नसतो.
- हा स्थिर कण आहे.

◆◆T Channel : @gkiran123

प्रश्न क्र. 30)...लेसरच्या सहाय्याने पर्यावरण सनियंत्रित करण्याच्या तंत्राला काय म्हणतात ?
.... ( राज्यसेवा- 2015)
पर्याय :-- @sandipkawale

1) रडार.(RADAR)

2) सोनार.(SONAR)

3) लेडार.(LEDAR)

4) लिडार.(LIDAR)

उत्तर :- [ पर्याय (4) बरोबर ]

🔘 स्पष्टीकरण :--
🔸लिडार(LIDAR) 🔸
Light Detection and Ranging
- याचा वापर इमारतिमध्ये पडलेले तडे स्कॅन करण्यासाठी होतो.
- 3D मॉडल तयार करण्या साठी उपयोग होतो.
- खडक कसे तयार झाले हे तपासन्या साठी.
- ढगांची तपासणी करण्या साठी.

SONAR - Sound Nevigation and Ranging.

RADAR - Radio Detaction and Ranging.

Cont: @gkiran999/88305 00819
=========================
https://t.me/joinchat/AAAAAD994psmj7jTZkFksQ
🅾 G.kiran'$( विज्ञान + तंत्रज्ञान )🅾
========================
@Gkiran'$ Maths Acdmy. Pune
0⃣ प्रश्न क्र. 31)...नैसर्गिक स्रोतातिल कोणत्या घटका पासून चरबी आणि तेल मिळते ?
....( राज्यसेवा पूर्व- 2018)
पर्याय :-- @sandipkawale

1) कर्बोदके. (carbohydrates)

2) लिपिड.(Lipid)

3) प्रथिने.(Protein)

4) टर्पिन.(Terpin)

उत्तर :- [ पर्याय (2) बरोबर ]

🔘 स्पष्टीकरण :-
- स्निग्ध पदार्थ हे लिपिड पासून बनलेले असतात.

- यांना चरबियुक्त पदार्थ म्हणतात.

- मेद पेशीच्या आकारमाना पैकी सुमारे 85% भाग मेदाचा असतो..

-स्रोत :- मांस, आंडी, प्राणिजन्य आणि वनस्पतिजन्य तेल.

- कोलेस्टेरॉल हे पण लिपिड पासून बनलेले असते.
◆◆T Channel : @gkiran123

प्रश्न क्र. 32)...विटामिन बी-12 चे खालीलपैकी स्रोत कोणते आहे?
.... ( राज्यसेवा- 2017)
पर्याय :-- @sandipkawale

1) मांस, मासे, यकृत व लहान आतड़यातील जीवाणु.

2) मशरूम, धान्य व काजू.

3) भाकरी, भात, ब्रोकोली व सोयाबीन.

4) वरीलपैकी सर्व.

उत्तर :- [ पर्याय (1) बरोबर ]

🔘 स्पष्टीकरण :--
🔸Vit B - 12🔸
शास्रीय नाव - सयनोकोबॅलॅमीन

मुख्य कार्य -
1) लाल रक्तपेशी तयार होण्यासाठी ,

2)न्यूक्लिक अम्लांचे संश्लेषण ,

3)नायट्रोजन चे चयापचय.

Cont: @gkiran999/88305 00819
=========================
https://t.me/joinchat/AAAAAD994psmj7jTZkFksQ