MPSC Science
66.9K subscribers
8.6K photos
54 videos
355 files
716 links
Download Telegram
. 🌷🌷शास्त्रीय उपकरणे व वापर🌷🌷

• स्टेथोस्कोप - हृदयाची स्पंदने वा ठोके मोजण्याकरिता.

• सेस्मोग्राफ - भूकंपाची तीव्रता व मूलस्थान यांची नोंद करण्याकरिता.

• फोटोमीटर - प्रकाशाची तीव्रता मोजण्याकरिता.

• हायग्रोमीटर - हवेतील दमटपणा मोजणारे उपकरण.

• हायड्रोमीटर - द्रव पदार्थाचे जडत्व मोजणारे उपकरण.

• हायड्रोफोन - पाण्याखाली ध्वनीची आंदोलने मोजणारे उपकरण.

• अ‍ॅमीटर - विद्युत प्रवाह मोजणारे उपकरण.

• अल्टीमीटर - समुद्रसपाटीपासूनची उंची मोजण्यासाठी विमानात वापरतात.

• अ‍ॅनिमोमीटर - वाऱ्याचा वेग व दाब मोजण्यासाठी.

• ऑडिओमीटर - ध्वनीची तीव्रता मोजण्यासाठी.

• बॅरोमीटर - हवेचा दाब मोजण्यासाठीचे उपकरण.

• बॅरोग्राफ - हवेचा दाब अखंडपणे मोजण्यासाठीचे उपकरण.

• मायक्रोस्कोप - सूक्ष्म वस्तू पाहण्यासाठीचे उपकरण.

• लॅक्टोमीटर - दुधाची सापेक्ष घनता मोजण्यासाठीचे उपकरण.

• स्फिग्मोमॅनोमीटर - रक्तदाब मोजण्याचे साधन.
🌷🌷वनस्पती ऊती :🌷🌷

🌿शरीरांच्या भागांना अवयव म्हणतात. अवयव हे ऊती पासून बनलेले असतात. ऊती या पेशिसमुहापासून बनलील्या असतात.

🌷 सजीवांच्या विविध अवयवांची कार्य भिन्न असल्यामुळे यांच्या  रचनेतही फरक दिसून येतो.

🌷वनस्पतींची वाढ हि त्यांच्या मुळ व खोडांच्या अग्रभागी दिसून येते. याचे  कारण म्हणजे अग्रभागासी वाढीसाठी आवश्यक असणाऱ्या ऊती असतात. पेशींच्या विभाजन क्षमतेनुसार वनस्पती उतीचे विभाजी ऊती व स्थायी ऊती असे वर्गीकरण केले जाते.

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷