MPSC Science
67.1K subscribers
8.6K photos
54 videos
354 files
716 links
Download Telegram
विज्ञानवाटा - अंडी आधी कि कोंबडी....
जॉईन करा @MPSCScience
Ques:

१) विद्युत चुंबकीय पट्ट्यापैकी मानवी डोळ्याला दिसणारा प्रकाश ...... ते ....... तरंगलांबी असणारा आहे.

A. ३०००Å ते ७०००Å
B. २०००Å ते ६०००Å
C.४०००Å ते ८०००Å
D. ३५००Å ते ७५००Å

A. ३०००Å ते ७०००Å
----------------------------------------
२) इन्फ्रा-रेड किरणांचा उपयोग खालीलपैकी कशासाठी होतो?

अ) रंग सुकवण्याच्या कामात.
ब) कोंबडीच्या पिल्लांच्या जलद वाढीसाठी.
क) स्नायू दुखी आणि सांधे दुखीवर उपाय म्हणून.
ड) टेलेव्हिजन, स्टिरीओ यांसारख्य साधनांसाठी वापरले जाणारे रिमोट कंट्रोल मध्ये.

A. अ आणि ब
B. केवळ ब
C. अ, ब आणि क
D. वरील सर्व

D. वरील सर्व
------------------------------------
३) फ्लुरोसंट लॅम्प मध्ये खालीलपैकी कोणत्या किरणांचा वापर 'फ्लोरोसन्स' ही प्रक्रिया घडवण्यासाठी होतो?

A. इन्फ्रा-रेड किरणे
B. अति-नील किरणे
C. रेडीओ लहरी
D. क्ष-किरणे

B. अति-नील किरणे
---------------------------------------
४) खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?

अ) विद्युत क्षेत्रामुळे किंवा चुंबकीय क्षेत्रामुळे क्ष-किरणांचे विचलन होते.
ब) एखाद्या वायुतून जात असताना क्ष-किरण त्या वायूचे आयनन करतात.

A. केवळ अ
B. केवळ ब
C. अ आणि ब दोन्ही
D. अ आणि ब दोन्ही नाही

B. केवळ ब
-------------------------------------
५) अपवर्तनाच्या क्रियेतून पूर्ण अंतर्गत परावर्तन निर्माण होण्यासाठी खालीलपैकी कोणत्या बाबींची आवश्यकता असते?

अ) प्रकाश घन माध्यमातून विरल माध्यमात जात असावा.
ब) आपाती कोन क्रांतिक कोनापेक्षा अधिक असावा.

A. केवळ अ
B. केवळ ब
C. अ आणि ब दोन्ही
D. अ आणि ब दोन्ही नाही

C. अ आणि ब दोन्ही
------------------------------------
६) पांढऱ्या प्रकाशाचे त्याच्या घटक रंगात पृथ्थकरण होण्याच्या प्रक्रियेस ....... म्हणतात.

A. प्रकाशाचे अपस्करण
B. प्रकाशाचे विकिरण
C. प्रकाशाचे अपवर्तन
D. पूर्ण अंतर्गत परावर्तन

A. प्रकाशाचे अपस्करण
----------------------------------------
७) खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?

अ) तांबड्या प्रकाशाचे अपस्करण सर्वात जास्त तर जांभळ्या प्रकाशाचे अपस्करण सर्वात कमी होते.
ब) पावसाळ्यात आकाशात दिसणारे इंद्रधनुष्य प्रकाशाच्या अपस्करनामुळेच दिसते.

A. केवळ अ
B. केवळ ब
C. अ आणि ब दोन्ही
D. अ आणि ब दोन्ही नाही

B. केवळ ब
-------------------------------------
८) खालीलपैकी कोणत्या घटना प्रकाशाचे विकिरण या प्रक्रियेमुळे घडतात?

अ) दिवसा सर्वत्र उजेड असतो.
ब) आकाश निळे दिसते.
क) खोल समुद्रात पाणी निळे दिसते.
ड) वाळवंटातील मृगजळ

A. अ आणि ब
B. फक्त ड
C. अ,ब आणि क
D. वरील सर्व

C. अ,ब आणि क
--------------------------------
९) चंद्र क्षितिजावर मोठा दिसण्याचे कारण काय?

A. दृष्टिभ्रम
B. प्रकाशाचे विकिरण
C. प्रकाशाचे अपस्करण
D. प्रकाशाचे अपवर्तन

A. दृष्टिभ्रम
------------------------------------
१०) जोड्या जुळवा.

कॅमेऱ्याचे भाग डोळ्याचे भाग
अ) शटर १) पापणी(eye-Lid)
ब) डायफ्रॅम २) परीतारिका(Iris)
क) अॅपेरचर ३) बाहुली(Pupil)
ड) फिल्म ४) दृष्टीपटल(retina)

अ ब क ड
A. १ २ ३ ४
B. २ ३ ४ १
C. १ २ ४ ३
D. २ १ ३ ४

A. १ २ ३ ४
------------------------------------
विज्ञानवाटा - एक स्मार्ट पदार्थ
सूर्यमालेचा इतिहास सांगणारे लघुग्रह
नवीन वाय-फाय 100 पट वेगवान
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
लोकराज्य अंतिम सत्य आणि योजना अंतिम सत्य पुस्तकाच्या लेखकाकडून स्पर्धा परीक्षा उपयुक्त "अर्थसंकल्प अंतिम सत्य" पुस्तक सादर...

24 मार्च 2017 पासून महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध...

जॉईन करा @eMPSCkatta
Forwarded from Loksatta - लोकसत्ता
काळजी घ्या TB वाढतोय....
Forwarded from Deleted Account
“मिशन अगेन्स्ट सायलेंट किलर” - जीवनसत्व ‘ ब-१२ ’ कमतरता
जीवनसत्व ब१२ अर्थात व्हिटामिन B 12 हे एक जीवनावश्यक आणि शरीरात तयार न होणारे जीवनसत्व आहे. भारतातील आणि तेही आपल्या पुण्यातील डॉक्टर चित्तरंजन याग्निक यांच्या मोठ्या संशोधनात असे समोर आले आहे की, ६०% शाकाहारी आणि ४०% मिस्त्राहारी (शाकाहार आणि मांसाहार दोन्ही खाणारे) लोकांमध्ये जीवनसत्व ब १२ चा अभाव आहे. हे असे का?
“व्हिटामिन B 12” हे जीवनसत्व फक्त प्राणीजन्य अन्नात आढळते. भारत हा प्रामुख्याने शाकाहारी देश आहे. इथले ३० % लोक पूर्ण शाकाहारी असून राहिलेल्या मिस्त्राहारी लोकामध्येसुद्धा मांसाहाराचे प्रमाण अत्यल्प आहे. २००२ च्या संशोधनात असे समोर आले आहे कि भारतात दरडोई प्रतिवार्षिक ५ किलो मांसाहार केला जातो तर अमेरिकेत याच्या २५ पट जास्त मासाहार म्हणजे दरडोई प्रतिवार्षिक १२५ किलो मांसाहार केला जातो. त्यात हिंदू तसेच जैनांमध्ये आणि त्यातल्या त्यात स्त्रियांमध्ये मांसाहाराचे प्रमाण खूपच कमी आहे. प्राणीजन्य अन्नाच्या नावावर चहातून जाणारे दूधच काय ते तेवढे. इतक्या कमी प्रमाणात प्राणीजन्य अन्न खाल्ल्याने “व्हिटामिन B 12” चा अभाव आढळला नाही तर आश्चर्य.
वाढत्या लोकासंखेने जगण्याची स्पर्धा वाढून भारत हा तणावाचे म्हणून मधुमेह असणाऱ्यांचे आणि पित्तविकार असणाऱ्यांचे माहेरघर झाले आहे. या दोन्ही विकारावर नियमित वापरल्या जाणाऱ्या औषधाने “व्हिटामिन B 12” ची कमतरता होवू शकते.
“व्हिटामिन B 12” ची शरीरातील विविध कामे आणि त्याच्या अभावाने खालील गोष्टी घडू शकतात.
१) हे जीवनसत्व चेतासंस्थेच्या म्हणजेच मेंदू , मज्जारज्जू आणि नसांच्या आरोग्यासाठी अतिशय आवश्यक असते. जीवनसत्व ब१२ अभावी चेतासंस्थेला कायमस्वरुपीची इजा होवू शकते. जीवनसत्व ब१२ अभावी पुढील दुष्परिणाम होवू शकतात. हातापायाला मुंग्या येणे,
हातापायाची आग होणे, हातापायाच्या स्नायूंची ताकद कमी होणे, थकवा येणे, कमरेपासून खालचा भाग लुळा पडणे.(subacute combined degeneration of spinal cord), शरीराचा तोल जाणे.
२) डि.येन्.ए (DNA) तयार होण्याच्या प्रक्रियेत महत्वाचा भाग असल्याने या जीवनसत्वाचा पेशी विभाजनातही महत्वाचा वाटा असतो. म्हणूनच
हाडांच्या पोकळीत तयार होणाऱ्या रक्तातील विविध पेशींची निर्मिती जीवनसत्व ब १२ वर अवलंबून असते. त्यामुळे रक्तातील लाल पेशी कमी पडून रक्तक्षय होतो. तसेच पांढऱ्या पेशी कमी पडून वारंवार जंतुसंसर्ग होतो.
पचनसंस्थेची झीज भरून न आल्याने रक्तवाहिन्या फुगून तिथून रक्तस्त्राव होतो.
तोंडाच्या अस्तराची झीज होवून वारंवार तोंड येते.
३) “होमोसिस्टीन” ब१२ “मेथिओनीन”.
“व्हिटामिन B 12” कमतरता झाल्यास अमायनो असिड होमोसिस्टीन शरीरात साठू लागते आणि अमायनो असिड मेथिओनीन कमी पडू लागते.
जादा झालेल्या “होमोसिस्टीन” मुळे रक्त गोठण्याची प्रक्रिया वेगात सुरु होते. त्यामुळे शरीरात विविध रक्तवाहिन्यामध्ये रक्ताच्या गाठी तयार होवून पुढील अवयवाचा रक्तपुरवठा थांबतो. अशी रक्ताची गाठ हृदयाच्या रक्तवाहिनीत झाली तर हृदयविकाराचा झटका येतो तर मेंदूच्या राक्तवाहिनीत अशी गाठ तयार झाल्यास पक्ष्याघाताचा (पॅरालीसीसचा) झटका येतो. तरुण वयात होणाऱ्या हृदयविकाराचा झटक्याचे आणि पक्ष्याघाताचा (पॅरालीसीसचा) झटक्याचे “व्हिटामिन B 12 चा अभाव” हे एक प्रमुख कारण आहे.
मेंदूतील चेतापेशीची एकमेकांशी संपर्क यंत्रणा काही रासायनांमुळे चालते. यापैकी काही मेथिओनीन पासून तयार होतात. मेथिओनीची कमतरता पडल्याने ही रसायने कमी पडतात. त्यामुळे खालील लक्षणे येतात. निराशा अथवा डिप्रेशन (चिडचिड, अतिशय राग येणे, शुल्लक कारणावरून भांडणे, कशातच आनंद न वाटणे, सतत कसलीतरी काळजी वाटणे, इत्यादी.), विसरभोळेपणा किंवा स्मृतीभृंश (Dementia) , भास होणे, इत्यादी.
सर्वात वाईट भाग असा आहे कि विटामिन B12 च्या अभावाने शरीराला होणारी इजा कायमस्वरूपी असते. नंतर विटामिन B12 वाढले तरी आधी झालेली इजा तशीच राहते. मात्र पुढील इजा होत नाही. तेंव्हा काही लक्षण येण्याआधी नियमित वार्षिक तपासणी करत राहणे सर्वात उत्तम.
विटामिन B12 च्या अभाव सापडल्यास उपचार अगदी सोपे आहेत. महिन्यातून एकदा २ मिली ग्रॅम विटामिन B12 इंजेक्शन स्वरुपात घेतल्यावर प्रश्न मिटतो. किती दिवस घ्यायचे हा प्रश्न तसाच राहतो. आहारात मांसाहाराचे प्रमाण वाढवा सांगणे वैद्यकशाश्त्रानुसार तितकस बरोबर नाही. त्यात ते व्यावहारिक तर अजिबात नाही. ज्यांनी कधीही मांसाहार केला नाही त्यांना मांसाहार करायला सांगितला तरी ते करणार नाहीत. त्यात जैन लोकांसारखे धार्मिक निर्बंध असतील, तर नाहीच नाही. मग हा प्रश्न महिन्याला एक इंजेक्शननेच सुटू शकतो. गोळी खावू शकत नाही का? विटामिन B12 आतड्यातून रक्तात शोषले जाण्यासाठी जठरात तयार होणाऱ्या एका
Forwarded from Deleted Account
विशेष घटकाबरोबर (intrinsic factor) ते संयोग पावावे लागते. बऱ्याच लोकांमध्ये (खासकरून वयस्क लोकामध्ये) या घटकाचा अभाव आढळतो. तसेच आतड्याच्या ज्या भागातून ते शोषले जाते {म्हणजे इलीयम(ileum)} तो भाग आजारग्रस्त असेल तर आहारात विटामिन B12 रक्तात शोषले जात नाही. त्यामुळे आजपर्यंत डॉक्टर गोळी लिहून देण्याच्या भानगडीत पडत नसत. पण आता असे सिध्द झाले आहे ही जर ५ मायक्रोग्रॅम ऐवजी १०० ते २००० मायक्रोग्रॅम या डोसमध्ये दिल्यास विटामिन B12चे आतड्यातून रक्तात शोषण होतेच. त्यासाठी जठरात तयार होणाऱ्या एका विशेष घटका(intrinsic factor)ची किंवा इलीयम निरोगी असण्याची गरज नसते. म्हणून आता तोंडाने १०० ते २००० मायक्रोग्रॅम या डोसमध्ये विटामिन B12 ची रोज एक गोळी घेतली तरी पुरे आहे.
ऑपरेशनथेटरमध्ये काम करणारे डॉक्टर आणि रुग्ण नायट्रस ऑक्साइड या भूल देणाऱ्या वायूच्या संपर्कात येतात. फार काळ या वायूंच्या संपर्कात आल्यास शरीरातील विटामिन B12 नष्ट होत जाते आणि त्यात विटामिन B12 च्या अभाव असेल तर कमरेखालचा भाग लुळा पडण्याचा धोका असतो. या संदर्भात वैद्यकशास्त्रातील प्रसिद्ध लॅन्सेट या नियतकालीकात लेख प्रसिद्ध झाला आहे. त्याची ही लिंक http://www.thelancet.com/journals/lancet/article/PIIS0140-6736(05)75143-6/fulltext
वर्षाला नियमित विटामिन B12 तपासणी करून घेतल्यास त्याच्या अभावाने येणाऱ्या संकटाना वेळीच आळा बसेल. मी तर म्हणेन, शाकाहारी लोकांनी रोज एक गोळी खायलासुद्धा काहीच हरकत नाही. पाण्यात विरघळणारे विटामिन असल्याने जादा झालेले विटामिन B12 लघवीमधून लगेच बाहेर पडते. शरीरावर कसलाही दुष्परिणाम होत नाही. पण शरीरात या सायलेंट किलर विटामिन B12 चा अभाव पडल्यास होणार नुकसान गंभीर असू शकते.
विज्ञानवाटा - कणांच्या नव्या कुटुंबाचं दर्शन
Forwarded from MPSC Material
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
जिभेचा रंग काय सांगतो ?

अनेकदा आपण जेव्हा डॉक्टरकडे जातो तेव्हा डॉक्टर आपल्याला जीभ दाखवायला सांगतात. कधी तुम्ही हा विचार केला आहे का की तुमची जीभ पाहुण डॉक्टरला आजाराचं निदान कसं होत असेल. पण आम्ही तुम्हाला आज ही गोष्ट सांगणार आहोत की का डॉक्टर जीभ बघतो.
जीभचा रंग हा तुमच्या शरिराच्या स्थितीचा अंदाज सांगतो. पाहा काय आहे जीभेच्या रंगामागचं खरं कारण.

काय सांगते तुमची जीभ.

१. गुलाबी रंग - गुलाबी रंगाची जीभेवर जर कोणत्याही प्रकारचे डाग नसतील तर तुम्ही पूर्णपणे व्यवस्थित आहात.

२. तुमच्या जीभेवर जर सफेद रंगाचा थर असेल तर तुमच्या पचन क्रिया व्यवस्थित नाही. तुमच्यात अशक्तपणा आहे. काही वेळेस हे वायरल इंफेक्शनचा ही प्रकार असू शकतो.

३. पिवळा रंग - पिवळा रंग सांगतो की तुम्हाला सर्दी, वायरल इंफेक्शन किंवा तुमच्या शरिरात हिट वाढली आहे. काही वेळेस हा पचन न होण्याच्या समस्येचंही संकेत देतो.

४. लाल रंग - लाल रंगाची जीभ ताप, रक्तात उष्णता वाढणे किंवा अंतर्गत जखम आणि इंफेक्शनचं संकेत देते.

५. कोरडी जीभ - जीभ कोरडी पडणे आणि पिवळी पडणे म्हणजे काविळ, अशक्तपणा, कमी झोप, आतड्यांना सूज थकवा याचे संकेत देते.

६. निळा रंग - शरिरात विटामिन बी-2 ची कमतरता आणि महिलांना दुखणे याचा संकेत देते. कोणत्याही औषधाच्या साईड इफेक्टमुळे देखील जीभ निळी पडते.

७. जीभेचा सर्वात पुढचा भाग लाल होणं हा मानसिक समस्येचं संकेत देतो.

८. जीभेछ्च्यावर अनेकदा सफेद डाग तयार होतात हे इंफेक्शन आणि अधिक घाम येण्याचे संकेत असतात.
विल्यम रॉन्टजेन - क्ष - किरणांचा शोध