MPSC Science
67K subscribers
8.6K photos
54 videos
355 files
716 links
Download Telegram
Forwarded from MPSC Material
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from MPSC Material
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🌷🌷प्राण्यांच्या वर्गीकरणाबद्दल संपूर्ण माहिती 🌷🌷

·         सृष्टी -प्राणी

·         उपसृष्टी - मेटाझुआ

विभाग -1 : असमपृष्ठरज्जू प्राणी

संघ

1.    प्रोटोझुआ- अमिबा , प्लाझामोडीयम, पॅरामेशियम इ.

2.    पोरीफेरा - सायकॉन , बाथस्पंज , हयलोनिमा

3.    सिलेंटराटा - हायड्रा, फायसेलिया, सी-अनिमोन

4.    प्लॅटीहेल्मिन्थीस - प्लॅनेरीया , लिव्हरफ्ल्युक , टेपवर्म

5.    नेमॅटहेल्मिन्थीस - अॅस्कॅरिस , फायलेरीया , हुकवर्म

6.    अॅनिलीडा- गांडूळ , लीच , नेरीस

7.    आथ्रोपोडा - खेकडा , झुरळ , कोळी

8.    मोलुस्का - शंख , शिंपला , गोगलगाय

9.    इकायानोडर्माटा - तारामासा , सी - अर्चीन , सि - ककुंबर

10. हेमिकॉर्डाटा - बेलॅनोग्लॉसस , सॅकोग्लॉसस
🌷🌷विभाग -२ : समपृष्ठरज्जू प्राणी🌷🌷

संघ - कॉर्डाटा

उपसंघ -

1.    युरोकॉर्डाटा - अॅसिडीयन , डोलीओलम, ऑईकोप्ल्युरा

2.    सेफॅलोकॉर्डाटा - अॅम्फीऑक्सस

3.    व्हर्टीब्रेटा -

·         वर्ग 1- सायक्लोस्टोमाटा - पेट्रोमायझॉन , मिक्झीन

·         वर्ग 2- पायसेस - डॉगफिश. रोहू

·         वर्ग 3- अम्फिबिया - बेडूक , टोड

·         वर्ग 4- रेप्टीलीया - कासव , पाल

·         वर्ग 5- एवज - पोपट , बदक

·         वर्ग 6- मॅमॅलिया - वटवाघूळ, खार, मानव
🌷🌷विभाग -1 : असमपृष्ठरज्जू प्राणी🌷🌷

संघ : प्रोटोझुआ -

·         हे एकपेशीय आणि सुक्मदर्षीय सजीव आहेत.

·         पेशीय भक्षण पद्धतीने अन्नग्रहण करतात.

·         प्रजनन - व्दिविभाजन, बहुविभाजन

·         उदा. अमिबा , एन्टामिबा , युग्लीना , प्लाझमोडीयम, पॅरामेशियम

अमिबा -

·         गोड्या पाण्याची तळी, डबके, सरोवरामध्ये आढळतात.

·         आकार अनियमित असतो.

प्लाझमोडीयम -

·         अंत:पेशीय रक्तशोषी परजीव

·         मानवाच्या पांढऱ्या पेशीत

·         मालेरीयास कारणीभूत असतो.

·         अॅनाफेलीस मादिकडून प्रसार होतो.
🌷🌷संघ : पोरीफेरा -🌷🌷

·         शरीरावर असंख्य छिद्रे असतात.

·         त्यांना ऑस्टिया म्हणतात.

·         सर्व प्रकारच्या स्पंजाचा या संघात समावेश होतो.

·         प्रचलन न करणारे , आधात्रीशी सलग्न व असममीत प्राणी

·         उदा. सायकॅन , युस्पॉजिया
🌷🌷संघ : सिलेंटराटा -🌷🌷

·         समुद्रात आढळतात.

·         अरिय सममित व व्दिस्तरिय

·         देह गुहा असते.

·         शरीराला एक मुख असून त्याभोवती संवेदनक्षम शुंडके असतात.

·         प्रजानन मुकुलायन या अलैंगिक प्रकाराने होते.

·         उदा. कोरल्स , सिअॅनिमोन , हायड्रा , जेलीफिश
🌷🌷संघ : प्लॅटीहेल्मिन्थीस -🌷🌷

·         शरीर रिबीन प्रमाणे चपटे , त्रिस्तरीय , व्दिपार्श्व सममित असते.

·         पोशिंद्याला चिकटून राहण्यासाठी अधरचूशक

·         अन्नद्रव्ये शोषून घेण्यासाठी मुखचुषक असतात.

·         बहुतेक प्राणी अंत:परजीवी असतात.

·         उदा. प्लॅनेरीया , लिव्हरफ्ल्युक , टेपवर्म
🌷🌷संघ : नेमॅटहेल्मिन्थीस -🌷🌷

·         शरीर लांबट , बारीक आणि दंडाकृती असते.

·         त्यांना गोलाकृमी म्हणतात.

·         अंत:परजीवी व एकलिंगी असतात.

·         माणसात रोगानिर्मिती करतात.

·         उदा.  अॅस्कॅरिस , फायलेरीया , हुकवर्म , पिनवर्म
🌷🌷संघ : अॅनिलीडा -🌷🌷

·         लांबट , दंदाकृती असून खंडीभूत कृमी म्हणतात.

·         त्रिस्तरीय ,लांबट , देहागुहायुक्त व्दिपार्श्व सममित असतात.

·         लैंगिक प्रजनन करतात.

·         उदा. गांडूळ , लीच , नेरीस
🌷🌷संघ : आथ्रोपोडा -🌷🌷

·         प्राण्यांमधील सर्वात मोठा संघ

·         प्रचालानासाठी संधीयुक्त उपांगे असतात.

·         त्रिस्तरीय व्दिपार्श्व, सममित

·         शरीर खंडीभूत ,त्यावर कायातीन युक्त आवरण असते.

·         एकलिंगी असून लैंगिक प्रजनन करतात.

·         उदा. खेकडा , झुरळ , कोळी , मधमाशी , डास, विंचू , गोम
🌷🌷संघ : मोलुस्का -🌷🌷

·         प्राण्यातील दुसरा मोठा संघ

·         बहुसंख्य जलचर असून शरीर अखंडित , मृदू , कवचाने , अच्छादलेले , त्रिस्तरीय, व्दिपार्श्व, सममित/ असममीत असते.

·         हे प्राणी एकलिंगी असतात.

·         उदा. शंख , शिंपला , गोगलगाय
🌷🌷संघ : इकायानोडर्माटा -🌷🌷

·         फक्त समुद्रातच आढळतात.

·         त्रिस्तरी , एकलिंगी

·         कॅल्शीयम कार्बोनेटचे कठीण कवच असते.

·         पुनरुदभवन क्षमता असते.

·         उदा . तारामासा , सी - अर्चीन , सि - ककुंबर
🌷🌷संघ : हेमिकॉर्डाटा -🌷🌷

·         प्रामुख्याने सागरनिवासी

·         शरीर मृदू , अखंडित ,त्रिस्तरीय, व्दिपार्श्व, सममित

·         फक्त भृणवस्थेत पृष्ठरज्जूंचे अस्तित्त्व असते.

·         शरीराचे तीन भाग - सोंड , कॉलर , प्रकांड

·         श्वसनासाठी कल्लाविदरे असतात.

·         लैंगिक प्रजनन करतात.

·         उदा . बेलॅनोग्लॉसस , सॅकोग्लॉसस
Forwarded from MPSC Science
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
इयत्ता 7 वी विज्ञान पुस्तकातील कीटकभक्षी वनस्पती venus flytrap भक्ष पकडताना....!

नुसते ऐकले होते, आज पाहायला पण मिळाले....

Sent by- K. Pawar
🔰मानव पालेभाज्यांतील सेल्युलोज पचवू शकत नाही,कारण……….हे विकर त्याच्या जठरात नसते..?


1} सेल्युलेज
2} पेप्सीन
3} सेल्युलीन
4} सेल्युपेज


🔰आधुनिक जैवतंत्रज्ञान …………. पातळीवर कार्य करते.?

1} अवअणू
2} अणू
3} रेणू
4} पदार्थ


🔰डोळ्याच्या कर्करोगाच्या उपचारासाठी भाभा अणुसंशोधन केंद्राने कोणता प्रकाश स्त्रोत तयार केला?

1} आयोडीन-१२५
2} अल्बम-३०
3} ल्युथिनिअरम-१७७
4} सेसिअम-१३७


======================
 🌷🌷अलैंगिक प्रजनन :🌷🌷

🎄🎄वनस्पती -🎄🎄

1.    शाकीय प्रजनन - मूळापासून (रताळे), खोडापासून (हळद, कांदा, बटाटा, शवंती), पानापासून (पानफुटी, कलेंचा)

2.    विभाजन - एकपेशी, सजीव, जिवाणू, क्लोरेल्ला, शैवाल 

3.    कलिकायन -    किन्व यीस्ट 

4.    बिजाणूजन्य - बुरेशी 

5.    खंडिभवन - शैवाल, स्पायरोगायरा 
 लैंगिक प्रजनन:

🌷🌷वनस्पती -🌷🌷

·         सपुष्प वनस्पतीमध्ये फुलांचा लैंगिक प्रजननात सहभाग असतो.

🌷🌷प्राणी -🌷🌷

·         नर आणि मादीच्या संयोगातून गर्भोशयात युग्मनज तयार होतो आणि वाढीतून नवीन जीव तयार होतो.

·         वृक्काचे (किडनी) कार्य कृत्रिम पद्धतीने केले जाते. त्या क्रियेला 'डायलेसिस (व्याष्लेषण)' म्हणतात.

·         बल्बच्या दिव्यात तंगस्टनची तार असते. तंगस्टनची संज्ञा W आहे. वुलफ्रेम (Wolfram) या जर्मन नावावरून ती घेतली आहे.

·         आंदोलन काल (T) हा दोलकाच्या लांबीवर अवलंबून असतो. लांबी वाढवली की काल वाढतो.

·         कुत्री, वटवाघूळ हे प्राणी अवश्राव्य ध्वनी एकू शकतात.

·         परावर्तन होताना ध्वनीची येणारी दिशा आणि परावर्तीत दिशा लंबाशी सारखाच कोन करतात.

·         जे सजीव स्वत:चे अन्न स्वत: तयार करतात त्यांना स्वयंपोषी म्हणतात. तर ज्यांना अन्नासाठी इतरांवर अवलंबून रहावे लागते त्यांना परपोषी म्हणतात.

·         विकरांच्या क्रियेमुळे अन्नातील घटकांचे विघटन होऊन तयार झालेल्या रसायनिक पदार्थांचे रक्तात शोषण होते आणि त्यांचा वाढीसाठी, झीज भरून काढण्यासाठी उपयोग होतो याला सात्मिकरन म्हणतात.

·         हिरव्या वनस्पतींना अन्न तयार करण्यासाठी कार्बन डायोक्साइड, प्रकाश, हरितद्रव, पाणी या घटकाची गरज असते.

·         आयोडीन द्रावणाने पदार्थ पिष्टमय आहे किंवा नाही याची परीक्षा करता येते.