MPSC Science
66.9K subscribers
8.6K photos
54 videos
355 files
716 links
Download Telegram
🍀🍀मानवी रक्ताभिसरण संस्था (Human Circulatory System):🍀🍀
🌷रक्तवाहिन्या न्या आपल्या शरीरात रक्ताचे अभिसरण करतात. आपल्या शरीरातील रक्तवाहिन्यांची लांबी सुमारे 97 हजार किमी असते. रक्तवाहिन्यांचे तीन मुख्य प्रकार पडतात.

१) धमन्या (Arteries)

२) शिरा (Veins)

३) केशिका (Capillaries)

🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀
🌷🌷१) धमन्या (Arteries) : 🌷🌷

🍀हृदयाकडून ऑक्सिजनयुक्त रक्ताचे वहन करतात. अपवाद – फुफ्फुसधमनी (Pulmonary Artery)
भित्तिका जाड असून कमी लवचिक असतात.

🍀शरीरात खोलवर स्थित असतात व झडपा नसतात.
रक्तदाब खूप जास्त म्हणजेच 100 mm Hg एवढा असतो.
महाधमनी – धमन्या – धमनिका

🌷🌷२) शिरा (Veins) :🌷🌷

🍀उतींकडून कार्बन डायॉकसाईड युक्त रक्ताचे वहन हृदयाकडे करतात. अपवाद – फुफ्फुसशिरा (Pulmonary Veins)
भित्तिका पातळ असून जास्त लवचिक असतात.

🍀शरीरात त्वचेखाली स्थित असतात व झडपा असतात.
रक्तदाब खूप कमी म्हणजेच 2 mm Hg एवढा असतो.
महाशिरा -शिरा – शिरिका
🌷🌷३) केशिका (Capillaries) :🌷🌷

धमनिका आणि शिरिका यांच्या पेशीतील जाळ्याला केशिका असे म्हणतात.
केशिका अत्यंत बारीक, एकस्तरीय असून भित्तिका पातळ असतात.
केशिकांमुळे पेशींमध्ये पोषद्रव्ये, ऑक्सिजन,कार्बन डायॉकसाईड, विकरे, संप्रेरके तसेच टाकाऊ पदार्थांची देवाण – घेवाण घडून येते

🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🍀🌷🍀🌷


1)सामान्यत: किडनीमधून खालीलपैकी कशाचे गाळण होत नाही ?

A. अमोनिया

B. यूरीक अॅसीड

C. पाणी

D. साखर.

____________________

2) कोळश्याचे त्याच्या ____अवस्थेमध्ये रूपांतरण करुन त्याचा अतिशय कार्यक्षम व स्वच्छ इंधन म्हणून वापर करता येतो.

A. द्रव

B. द्रवे-घन मिश्रण

C. वायू

D. द्रव-वायू मिश्रण.

____________________

3)________ औषधी द्रव्य नैसर्गिक उत्पादन आहे.

A. मॉर्फीन

B. अॅम्पीसिलीन

C. क्लोरोक्वीनाइन

D. फिनसायक्लोडीन.

____________________

4)रेणूमध्ये अणू ____ बलाद्वारे एकत्रित ठेवले जातात.

A. रेवांतरीक

B. अंत रेणु

C. द्विअग्र

D. वान डर वॉल्झ.

____________________

5)बटाटा चीपस् उत्पादक, चीपस् बॅगेत भरताना त्यासोबत एक वायू भरतात, जेणेकरून चीपस् ऑक्सिडाइझ होत नाहीत. खालीलपैकी कोणता वायू यासाठी वापरला जातो?

A. हायड्रोजन

B. सल्फर डायऑक्साइड

C. नायट्रोजन

D. कार्बन डायऑक्साइड.

____________________

6)खालीलपैकी शुद्ध पदार्थ कोणता?

(a) लोह

(b) पेट्रोल

(c) गाईचे दूध

(d) समुद्राचे पाणी

A. (b), (c) आणि (d)

B. (a) फक्त

C. (b) फक्त

D. (c) फक्त.
🟡 प्रश्न.1. अणूत्रिज्या व्यक्त करण्यासाठी पुढीलपैकी कोणते एकक वापरले जाते.?

१. नँनोमीटर

२. डेसीमीटर

३. पिकोमीटर

४. हेक्टामीटर

🔴 प्रश्न.2 . समुद्रातील प्रवाळ खडक हे पुढील कोणत्या संघातील प्राण्यांची मोठी वसाहत असते.?


१. अँनिलिडा संघ

२. निडारिया संघ

३. आर्थोपोडा संघ

४. ईकायनोडर्माटा संघ

५. हेमिकाँर्डाटा संघ
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
मज्जा संस्थेतील संदेश वहन
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
पाण्याचे असंगत आचरण
🌷रक्तातील प्रतिजन (Antigens) आणि प्रतिद्रव्ये (Antibodies) या प्रथिनांच्या आधारावर रक्ताचे वेगवेगळे गट पाडले आहेत.

🌷 रक्तगटांचे A, B, AB, आणि O असे चार मुख्य प्रकार आहेत. त्यांपैकी A, B, आणि O यांचा शोध इ. स. १९०० साली लँडस्टेनर (Dr. Karl Landsteiner) यांनी लावला, तर उरलेला चौथा AB रक्तगट डीकास्टेलो आणि स्टर्ली (Decastellor And Sturli) यांनी १९०२ मध्ये लावला.

🌷लँडस्टेनर यांना या शोधाबद्दल १९३० साली नोबेल पारितोषिक देण्यात आले.
लँडस्टेनर यांनी असे दाखवून दिले की, मानवाच्या तांबडया रक्तपेशींच्या पृष्ठभागावर प्रतिजन (Antigens) असतात, तर प्लाझ्मामध्ये प्रतिद्रव्ये (Antibodies) असतात.

🌷प्रतिजन दोन प्रकारचे असतात. ‘A’ आणि ‘B’ तसेच प्रतिद्रव्येही दोन प्रकारची असतात. Anti ‘A’ किंवा ‘a’ आणि Anti ‘B’ किंवा ‘b’.
A प्रतिजन a प्रतिद्रव्याच्या उपस्थितीमध्ये, तसेच B प्रतिजन b प्रतिद्रव्याच्या उपस्थितीमध्ये परस्परांना चिकटतात आणि त्यामुळे तांबडया रक्तपेशींचे clumping किंवा agglutinisation होते. म्हणजेच A प्रतिजन आणि a प्रतिद्रव्य एकत्र राहू शकत नाही.

🌷 तसेच B प्रतिजन आणि b प्रतिद्रव्य एकत्र राहू शकत नाही.
यावरून, प्रतिजन आणि प्रतिद्रव्ये यांची उपस्थिती किंवा अनुपस्थिती यावरून मानवी रक्ताचे गट पुढीलप्रमाणे केले जातात.


🌿🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷