MPSC Science
67K subscribers
8.6K photos
54 videos
354 files
716 links
Download Telegram
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
Pavel Durov. ( Russian )

The Founder of Telegram Messaging App.
#eMPSCkatta_Current_Affairs

🔹अंतराळातील कचरा कमी करण्यासाठी जपानने सोडले रॉकेट

पृथ्वीच्या कक्षेत फिरणाऱ्या अंतराळातील कचरा काढण्यासाठी आणि त्यांची निर्मिती कमी करण्यासाठी जपानने एक यान सोडले आहे. या यानाला अर्धा मैल म्हणजेच 700 मीटर लांब शेपटी जोडलेली असून ती अॅल्युमिनियमचे तुकडे आणि स्टीलच्या तारांनी बनविलेली आहे.

एका मासेमारी कंपनीच्या सहकार्याने हे उपकरण तयार करण्यात आले आहे. अंतराळात सध्या 10 कोटी कचऱ्याचे तुकडे असल्याचा अंदाज आहे. यात जुने उपग्रह, उपकरण आणि रॉकेटचे भाग यांचा समावेश आहे. याला कूनोतोरी असे नाव देण्यात आले असून जपानी भाषेत त्याचा अर्थ करकोचा असा होतो.

यातील काही भाग अत्यंत वेगाने पृथ्वीभोवती फिरत आहेत. त्यांचा वेग 28,000 प्रति तास आहे. पृथ्वीभोवती फिरणाऱ्या दळवळणाच्या उपग्रहांना त्यामुळे भयंकर अपघात किंवा हानी होऊ शकते.

सोव्हियत रशियाने 1957 साली ‘स्पुटनिक’ हा पहिला मानवनिर्मित उपग्रह अवकाशात सोडला होता. तेव्हापासून हा कचरा जमा झाला आहे. विविध उपग्रहांमध्ये होणाऱ्या धडका आणि उपग्रहविरोधी हत्यारांच्या चाचण्यांमुळे ही समस्या आणखी गंभीर बनली आहे.

दक्षिण जपानच्या तानेगाशिमा अंतराळ केंद्रातून शुक्रवारी या रॉकेटचे प्रक्षेपण करण्यात आले. आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्राच्या दिशेने ते झेपावले आहे. या रॉकेटची शेपटी अंतराळातील वस्तूंची भ्रमणकक्षा बदलून त्यांना वातावरणाच्या दिशेने ढकलेल. तिथे या वस्तू जळून जातील.

अंतराळातील कचरा कमी करून अंतराळवीरांसाठी ते सुरक्षित करावे, यासाठी आंतरराष्ट्रीय उपक्रमाचा हा भाग आहे. निट्टो सीमो कं. या मासेमारीसाठी जाळे बनविणाऱ्या कंपनीने त्यासाठी मदत केली आहे.
यशाचा मटा मार्ग - 12 डिसेंबर
Forwarded from MPSC Material
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from Deleted Account
🔹मलेरियाशी लढा

जागतिक लोकसंख्येच्या निमपट म्हणजे ३.२ अब्ज लोकांना मलेरियाचा धोका संभवतो. मलेरिया निर्मूलनासाठी भारतातूनच नव्हे तर जगभरातून प्रयत्न होत आहेत. २०३० पर्यंत मलेरियामुक्त भारताचे स्वप्न रंगवले जात असले तरी त्यासाठीचे प्रयत्न, निधी सारेच अपुरे आहे...

मलेरियाची सद्यस्थिती, उपलब्ध आणि आवश्यक निधी, निर्मूलनासाठी उपाय या साऱ्याची जागतिक आणि भारतीय आकडेवारी सांगणारा हा अहवाल....
👇👇👇👇👇👇👇👇👇