MPSC Science
67K subscribers
8.6K photos
54 videos
355 files
716 links
Download Telegram
Forwarded from mahesh Mali
Forwarded from mahesh Mali
Forwarded from mahesh Mali
Forwarded from mahesh Mali
Forwarded from mahesh Mali
आरोग्यासाठी उपयुक्त असलेले दूध आणि खजूर यांमध्ये अनेक पौष्टिक तत्त्वांचा खजिना आहे. दूध-खजूर यांचा शेक तर फारच उत्तम. खजूराचे दूध बनवायचे असल्यास दुधात खजूर घालून ते १० मिनिटे उकळवून घ्यावे....
मोबाइल वॉलेट ही तशी नवी पण तरीही वेगाने प्रसार होत असलेली संकल्पना. नोटबंदी आणि २००० ची मोठी नोट चलनात आल्यानंतर तर या संकल्पनेची लोकप्रियता आणि महत्त्व प्रकर्षाने लक्षात येत आहे.

Join @MPSCScience
🔹संत्र

१) संत्र हे एक एक शक्तीवर्धक फळ आहे. संत्र अनेक विकारांवर रामबाण उपाय आहे. संत्र्याचं सेवन केल्यानं सर्दी दूर होते.
२) यासोबत कोरडा खोकला दूर करण्यात देखील संत्री मदत करतं.
३) संत्र हे ओला खोकला असलेल्या कफला पातळ करुन बाहेर काढते.
४) संत्र्यांमध्ये मोठ्या प्रमाणात जीवनसत्व 'क', लोह आणि पोटॅशियम असतं.
५) संत्र्याची सर्वात मोठी विशेषता म्हणजे यामध्ये फ्रुक्टोज, डेक्स्ट्रोज, खनिज आणि व्हिटॅमिन्स असतात आणि हे शरीराला लगेच ऊर्जा देण्याचे काम करते.
६) संत्र्याचा एक ग्लास रस संपुर्ण शरिराला रिलॅक्स करतो. यामुळं आपला तणाव आणि थकवा दूर होतो.
७) पोट साफ न होण्याची समस्या असेल तर संत्र्याच्या रसामध्ये बकरीचे दूध मिसळुन प्यायल्यास खुप फायदा मिळतो.
८) संत्र्याचे नियमित सेवन केल्याने मूळव्याधाची समस्या दूर होते. रक्तस्राव थांबवण्याची क्षमता यामध्ये आहे.
९) खुप ताप असेल तर रुग्णाला संत्र्याचा रस दिल्याने तापमान कमी होते. यात असलेले सायट्रिक आम्ल हे मूत्र रोग आणि किडनीच्या आजारांना दूर करते.
१०) हृदयरोग असलेल्या लोकांना संत्र्याच्या ज्यूसमध्ये मध टाकून दिल्याने आश्चर्यकारक फायदे दिसून येतात.
११) संत्र्याचे नियमित सेवन केल्याने दात आणि हिरड्या चांगल्या राहतात. दात पांढरे होतात आणि तोंडातून दुर्गंधी येण्याची समस्या दूर होते.
१२) संत्र्यामध्ये अँटीऑक्सीडंट्स अधिक प्रमाणात असतात जे कँसरच्या प्रभावाला नष्ट करण्याचा प्रयत्न करतात. कँसरपासुन बचाव करण्यासाठी नियमित संत्र्याचा ज्यूस प्यायल्याने फायदा होतो.
१३) पोटातील गॅस, अपचन, जॉइंट पेन, उच्च रक्तदाब या रोगांसाठी हे रामबाण उपाय आहे.
१४) गरोदर महिला किंवा यकृतचा रोग झालेल्या महिलांसाठी संत्र्याचा ज्यूस खुप फायदेशीर असतो.
१५) गरोदर काळात याचं नियमित सेवन केल्यानं प्रसव वेदनांत आराम मिळतो. यासोबतच बाळाचं आरोग्य खुप चांगलं राहतं.
१६) संत्र्याची साल वाळवून त्याचे चूर्ण तयार करा आणि हे चूर्ण गुलाब जल किंवा दूधात टाकुन चेह-याला लावल्यानं चेहरा स्वच्छ होतो आणि पिंपल्स दूर होतात. ब्लॅकहेड्स आणि सावळेपणा दूर होतो.
१७) संत्र्याचं ताजं फूल बारीक करुन त्याचा रस केसांना लावल्यानं केसांची चमक वाढून केस काळे आणि घनदाट होतात.

संकलक : प्रमोद तांबे
#eMPSCkatta_Current_Affairs

🔹भारतीय कंपनी करणार चंद्रावर स्वारी

अवकाश तंत्रज्ञानाच्या स्पर्धेमध्ये आता खासगी क्षेत्रानेही उडी घेतली असून, या चढाओढीमध्ये ‘टीमइंडस’ या भारतीय कंपनीनेही आपले आव्हान निर्माण केले आहे. चंद्रावर रोव्हर सोडण्यासाठी होत असलेल्या स्पर्धेमध्ये ही कंपनी सहभागी होत असून, भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्रो) सहकार्याने या प्रकल्पावर काम करण्यात येत आहे.

चंद्रावर यान सोडण्याबरोबरच अवकाश तंत्रज्ञानामध्ये खासगी क्षेत्राचा सहभाग वाढावा आणि या तंत्रज्ञानामागील खर्च कमी व्हावा, यासाठी ‘गुगल’ने ‘लुनार एक्स’ ही स्पर्धा जाहीर केली आहे. तीन कोटी डॉलरच्या या स्पर्धेमध्ये ३० कंपन्यांची नावे निश्चित करण्यात आली असून, त्यातील १६ कंपन्या स्पर्धेत आहेत. या १६पैकी चारच कंपन्यांनी प्रक्षेपणाचे करार अंतिम केले आहेत. यामध्ये दोन अमेरिकी आणि एक इस्रायली कंपनीचा समावेश आहे. या स्पर्धेमध्ये सहभागी होणारे रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर किमान ५०० मीटर अंतरापर्यंत प्रवास करावे आणि तेथील माहिती संकलित करावी, अशी अपेक्षा आहे. तसेच, या मोहिमेच्या खर्चापैकी ९० टक्के वाटा खासगी क्षेत्रातून यायला हवा. हे प्रक्षेपण पुढील वर्षी करण्यात येणार आहे. या मोहिमेसाठी ‘टीमइंडस’ ‘इस्रो’च्या ‘अँट्रिक्स’ या व्यावसायिक शाखेबरोबर काम करणार आहे.

‘टीमइंडस’ २०१२पासून ‘इस्रो’बरोबर चांद्रमोहिमेच्या संशोधनामध्ये आहे. या मोहिमेसाठी कार्यक्षम असणारे मॉडेल सादर केल्याबद्दल ‘गुगल’ने २०१४मध्ये या कंपनीला १० लाख डॉलरचे बक्षीस दिले होते. या मोहिमेविषयी ‘टीमइंडस’चे प्रमुख राहुल नारायण म्हणाले, ‘अवकाश संशोधनाच्या क्षेत्रामध्ये ‘इस्रो’ने अनेक दशकांच्या कामातून ठसा उमटविला आहे आणि या वारशाची मदत आम्हाला मिळणार आहे. आमच्यातील करारामुळे, पुन्हा एकदा ही खरेखुरी भारतीय मोहीम असून, भारतातील खासगी आणि सरकारी क्षेत्राचे एक समान स्वप्न आहे, हेच दाखवून द्यायचे आहे.’

पुढील वर्षी मोहीम

‘टीमइंडस’च्या नियोजनानुसार, २८ डिसेंबर २०१७ रोजी या रोव्हरचे प्रक्षेपण करण्यात येणार आहे. त्या आधी तीन वेळा प्रायोगिक प्रक्षेपण होईल. हे रोव्हर २८ जानेवारी २०१८ रोजी चंद्राच्या वायव्य भागातील पृष्ठभागावर पोहोचेल, असा अंदाज आहे. हे रोव्हर तिरंगा ध्वज घेऊन जाणार आहे. या मोहिमेसाठी ‘इस्रो’बरोबर सखोल काम करण्यात येत आहे. मात्र, या मोहिमेवर अंतिम नियंत्रण ‘टीमइंडस’चेच असेल.

उद्योजकांचाही हात

चंद्रावर रोव्हर पाठविण्याच्या या मोहिमेसाठी सहा कोटी डॉलरपर्यंत खर्च येणार आहे. यासाठी १०० जणांचा चमू कार्यरत आहे. यामध्ये ‘इस्रो’तील २० निवृत्त शास्त्रज्ञही आहेत. अनेक उद्योजकांनी या मोहिमेसाठी हात दिला असून, यामध्ये रतन टाटा यांचाही समावेश आहे.

चंद्राच्या पृष्ठभागावर रोव्हर उतरविणे खूपच आव्हानात्मक आहे, याची आम्हाला जाणीव आहे. मात्र, रोव्हरची रचना, विश्लेषण आणि अन्य बाबतींमध्ये आमचा ९० टक्के विश्वास आहे. तर, रोव्हर चंद्रावर उतरविण्याविषयी ७५ टक्के विश्वास आहे. युरोपीय अवकाश संस्थेचे मंगळावर उतरणारे रोव्हर काही महिन्यांपूर्वी कोसळले. त्यामुळे, त्यांची मोठे नुकसान झाले आहे. अन्य प्रतिस्पर्ध्यांची तुलना करता, ‘इस्रो’बरोबर असण्याचा आम्हाला फायदा आहे.
#eMPSCkatta_Current_Affairs

🔹लवकरच इंटरनेटशिवाय मोबाइल बँकिंग सेवा

नोटाबंदीने अर्थव्यवस्था ढवळून निघत असताना सरकार आता 'डिजिटल इंडिया' च्या योजनेला नवे वळण देण्याच्या प्रयत्नात आहे. इंटरनेट कनेक्शनशिवाय सामान्य मोबाइलवरून मोबाइल बँकिंग करता येईल असे स्वस्त तंत्रज्ञान विकसित करावं, अशी सूचना केंद्र सरकारने दूरसंचार कंपन्यांना केली आहे.

अनेक वर्षाच्या दुर्लक्षानंतर अनस्ट्रक्चर्ड सप्लीमेंट्री सर्व्हिस डेटा (युएसएसडी) सुरू करण्यासाठी केंद्र सरकारने दबाव वाढवला आहे. याच्या मदतीने खातेदाराला आपल्या खात्यातील रकमेची माहिती घेता येईल. तसंच छोटी रक्कम दुसऱ्याच्या खात्यात जमा करता येईल.

केंद्रीय ऊर्जामंत्री पियूष गोयल यांच्या उपस्थितीत बँकिंग, दूरसंचार आणि पेमेंट्स इंडस्ट्रीजच्या प्रतिनिधींची शनिवारी बैठक झाली. या बैठकीत युएसएसडीला चालना देण्याचा निर्णय झाला. तसंच या सेवेला दूरसंचार कंपन्यांना प्राधान्य द्यावं लागणार आहे.

युएसएसडी ही इंटर-अॅक्टीव्ह टेक्स मॅसेज सिस्टीम आहे. याद्वारे मोबाइल फोन ग्राहक आपल्या बँकेपर्यंत पोहचू शकतो. देशातील ९० कोटी मोबाइलमध्ये ६० ते ६५ टक्के बेसिक फीचर फोन आहेत. यात स्मार्ट फोन सारखे अॅडव्हान्स फिचर नाहीत. यापार्श्वभूमीवर 'डिजिटल इंडिया'च्या माध्यमातून सामान्य मोबाइलवरून मोबाइल बँकिंगला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे, अशी माहिती एका सूत्राने दिली.
#eMPSCkatta_Current_Affairs

🔹गोव्यात तरुणांना इंटरनेट, टॉकटाईम मोफत; भाजप सरकारची योजना

गोवा सरकारने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तरुण मतदारांना आकर्षित करण्यासाठी मोफत इंटरनेट आणि टॉकटाईम देणारी योजना सुरू केली आहे. डिजीटल इंडिया अंतर्गत ही योजना सुरू करण्यात आली असल्याचे गोवा सरकारकडून सांगण्यात आले आहे.

गोव्यातील एक लाखापेक्षा अधिक तरुणांना इंटरनेट आणि टॉकटाईम सेवा मोफत मिळणार आहे. ५ डिसेंबरपासून या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
तरुणांना मोफत इंटरनेट आणि टॉकटाईम पुरवण्यासाठी गोवा सरकारने वोडाफोन कंपनीसोबत करार केला आहे. या योजनेअंतर्गत १६ ते ३० वर्ष वयाच्या तरुणांना मोफत सिम कार्डसोबत दर महिन्याला १०० मिनिटांचा टॉकटाईम आणि ३ जीबीचा इंटरनेट डेटा वापरता येणार आहे. सरकारच्या या योजनेचा फायदा राज्यातील सव्वा लाख तरुणांना होणार आहे. ‘गोवा युवा संचार योजना सोमवारपासून सुरू करण्यात आली आहे. तरुणांसाठी ही खास योजना सुरू करण्यात आली आहे. मात्र या योजनेचा दुरुपयोग होत असल्यास ही योजना बंद केली जाईल,’ असे गोव्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी सांगितले आहे.
#eMPSCkatta_Current_Affairs

🔹गुगल मॅपला मात देण्याचा ऍपल मॅप्सचा प्रयत्न

गुगल मॅप्सची एकाधिकारशाही संपुष्टात आणण्याच्या तयारीत ऍपल कंपनी आहे. तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज ऍपल आता आपल्या मॅप सर्व्हिसचे इनडोअर नेव्हिगेशन चांगले बनविण्यासाठी ड्रोनची मदत घेणार आहे.

ऍपल डाटा कलेक्शन तज्ञ आणि रोबोटिक्सची टीम बनवत आहे, ही टीम ड्रोनचा वापर करत जुन्या कॅमेरा सेन्सरच्या तुलनेत वेगाने मॅप्सल अपडेट करेल. ऍपलचे ड्रोन अशा ठिकाणांचे तपशील पाठवेल, जेथे स्ट्रिट साइन्स, ट्रक बदलण्याची माहिती आणि बांधकाम सुरू असलेले क्षेत्र आहे. पाठविण्यात आलेला तपशील ऍपल मॅपची टीम अपडेट करेल.

याशिवाय ऍपल आपल्या मॅप्ससाठी एका नव्या वैशिष्टय़ावर देखील काम करत आहे. यांतर्गत कार नेव्हिगेशनसाठी इमारतीच्या आतील माहिती मिळू शकेल. परंतु इनडोअर लोकेशन मॅपिंग काम कसे करेल हे मात्र अजून स्पष्ट झालेले नाही.

ऍपलने 2012 मध्ये मॅप्स सेवेची सुरुवात केली होती, परंतु प्राथमिक काळात यात मोठय़ा त्रुटी राहिल्या होत्या. रियल टाइम ट्रफिकची स्थितीसाठी वर्तमान काळात गुगल मॅप्सला दुसरा कोणताही मॅप मात देऊ शकलेला नाही. परंतु ऍपल यावेळी असा मॅप बनविण्याच्या तयारीत आहे, जो इनडोअर आणि आउटडोअर दोन्ही नेव्हिगेशन करू शकेल.
#eMPSCkatta_Current_Affairs

🔹गुगल, मायक्रोसॉफ्ट, फेसबुकला नोटीस

लैंगिक गुन्ह्यांचे व्हिडीओ सोशल नेटवर्किंग साइटवर शेअर करण्याच्या प्रकारांना आळा घालण्याची आणि सायबरगुन्हे रोखण्याची मागणी करणाऱ्या एका याचिकेप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने गुगल, मायक्रोसॉफ्ट, याहू आणि फेसबुक यांसारख्या इंटरनेट जगतातील बड्या कंपन्यांना नोटीस बजावली आहे. या प्रकरणी ९ जानेवारीपर्यंत उत्तर देण्याचे निर्देश न्यायालयाने या कंपन्यांना दिले आहेत.

बलात्कारासारख्या गुन्ह्यांचे व्हिडीओ काढून सोशल नेटवर्कवर पोस्ट करण्याचे गैरप्रकार होत असून याला आळा घालण्यासाठी या इंटरनेट कंपन्यांनी पावले उचलावीत, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. न्या. एम. बी. लोकूर आणि यू. यू. ललित यांच्या खंडपीठापुढे या प्रकरणी सुनावणी सुरू आहे. याचिकाकर्त्यांच्या वतीने अॅड. अपर्णा भट्ट बाजू मांडत आहेत.

हैदराबादस्थित प्रज्ज्वला या स्वयंसेवी संस्थेने सरन्यायाधीश एच. एल. दत्तू यांना पत्र पाठवून बलात्काराचे दोन व्हिडीओ पेनड्राइव्हवर पाठवले होते. व्हॉट्सअॅपवर सर्क्युलेट झालेल्या या व्हिडीओंबाबतच्या या पत्राची ‘सु मोटो’ दखल सर्वोच्च न्यायालयाने घेऊन या प्रकरणी तपास करण्याचे आदेश सीबीआयला दिले होते.