MPSC Science
66.9K subscribers
8.6K photos
54 videos
355 files
716 links
Download Telegram
#eMPSCkatta_Current_Affairs

🔹प्रकाशाच्या वेगाबाबत आइनस्टाइनला आव्हान

सिद्धान्ताची पडताळणी लवकरच होणार
प्रख्यात वैज्ञानिक अल्बर्ट आइनस्टाइन याच्या भौतिकशास्त्रातील सिद्धान्ताला आव्हान देणाऱ्या सिद्धान्ताचा पडताळा लवकरच घेतला जाणार आहे, त्यामुळे दुसरा सिद्धान्त खरा ठरला, तर आपले विश्वाचे ज्ञान बदलून जाईल. प्रकाशाचा वेग स्थिर असतो या आइनस्टाइनच्या म्हणण्याविरोधात हा वेग बदलत असतो, असे प्रतिपादन नवीन सिद्धान्तात केले आहे.

आइनस्टाइनने असे म्हटले होते, की कुठल्याही परिस्थितीत प्रकाशाचा वेग हा सारखाच असतो व अवकाश तसेच काळ हे वेगवेगळय़ा परिस्थितीत वेगवेगळे असतात. प्रकाशाचा वेग हा स्थिर असतो, या प्रतिपादनामुळे महाविस्फोटात विश्वाच्या निर्मितीनंतरच्या बालविश्वाबाबतच्या आपल्या संकल्पना त्यावर आधारित आहेत. काही वैज्ञानिकांच्या मते पूर्वीच्या विश्वात प्रकाशाचा वेग खूप जास्त होता. लंडनच्या इम्पिरियल कॉलेजचे जोआओ माग्वेजो यांनी कॅनडातील पेरीमीटर इन्स्टिटय़ूटचे नियायेश अफशोरदी यांच्यासमवेत असा सिद्धान्त मांडला आहे, की त्यात प्रकाशाचा वेग स्थिर नसतो हे भाकीत तपासता येऊ शकेल.

विश्वातील दीर्घिका या स्पंदनांमुळे तयार झाल्या आहेत, कारण त्या वेळी काही भागांतील घनता वेगवेगळी होती. वैश्विक मायक्रोवेव्ह नकाशात या स्पंदनांची नोंद आहे व तो विश्वातील जुना प्रकाश स्पेक्ट्रल इंडेक्स मानला जातो. या स्पंदनांवर प्रकाशाच्या वेगातील बदलांचा परिणाम झाला आहे, असे नवे प्रारूप मांडण्यात आले असून, त्यात स्पेक्ट्रल इंडेक्सचा नेमका आकडा शोधण्याचा प्रयत्न आहे. हा आकडा अचूक काढण्यासाठी विश्वरचना शास्त्रज्ञ प्रयत्नशील आहेत. हा आकडा ०.९६४७८ असल्याचे सांगितले जाते.

१९९० मध्ये हा सिद्धान्त मांडला होता. आता तो परिपक्व अवस्थेत आहे व त्यातील भाकिते तपासली जाऊ शकतात असे माग्वेजियो यांचे म्हणणे आहे. यातील आकडा अचूक निघाला तर आइनस्टाइनच्या गुरुत्व सिद्धान्तात बदल करावे लागतील. प्रकाशाचा वेग बदलतो ही कल्पना प्रथम अचूक वाटत नव्हती, पण आता आकडा हाती असल्याने या मुद्दय़ावरील सिद्धान्ताची पडताळणी शक्य आहे. जर्नल फिजिकल रिव्हय़ूमध्ये हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.
#eMPSCkatta_Current_Affairs

🔹मोबाईल फोन निर्मितीमध्ये उत्तर प्रदेश देशात अग्रगण्य

देशातील 39 मोबाईल निर्मिती करणाऱया केंद्रापैकी 15 प्रकल्प एका उत्तर प्रदेश राज्यात असून सॅमसंग, लाव्हा, इन्टेक्स अशा प्रकारच्या कंपन्यांची निर्मिती क्षमता प्रत्येकी 13.1 दशलक्ष मोबाईल फोन निर्माण करण्याची आहे, असे इंडियन सेल्युलर असोसिएशनने (आयएसए) म्हटले आहे. आंध्रप्रदेशमध्ये दशलक्ष निर्मितीचे 5 कारखाने आहेत. हरियाना 3 (2.5 दशलक्ष), उत्तराखंड आणि दिल्ली 4 (प्रत्येकी 3 दशलक्ष आणि 1.1 दशलक्ष), तेलंगणा 2 केंदे, महाराष्ट्रामध्ये 0.8 व 0.3 दशलक्षांची निर्मिती होते, आयसीएच्या अहवालाने माहिती दिली आहे.

तामिळनाडू, हिमाचल प्रदेश, 50 बंगाल व दमणमध्ये प्रत्येकी एक कारखाना आहे. मोबाईल सेट निर्माण करण्याची नोंद 2014-15 वर्षात 18900 कोटी रुपयांची होती तर 2015-16 मध्ये 54000 कोटींची आहे. ही वाढ 90 टक्क्मयांवरून सुमारे 185 टक्के होते. 2019 मध्ये मोबाईल निर्मिती व्यवसायाने देशात वर्षाला 50 कोटी हॅण्डसेटच्या उत्पादनाचे उद्दिष्ट ठेवले आहे. तर 2025 व्या वषी 125 कोटी हँडसेटचे (15 लाख कोटी रुपये) उत्पादन होण्याची शक्मयता व्यक्त केली आहे.
#eMPSCkatta_Current_Affairs

🔹मोबाईल, कॉम्प्युटरनंतर आता हेडफोनही होणार हॅक

मोबाईल आणि कॉम्प्युटर हॅक होणं ही इंटरनेट वापरकर्त्यांसाठी काही नवी गोष्ट नाही. मात्र आता हेडफोनही हॅक होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. वेबकॅम आणि फेसबुक अकाउंटसारखे आता हेडफोनही हॅक होणार आहेत, असं वृत्त 'आज तक'नं दिलं आहे.

एका रिपोर्टनुसार इज्रायलच्या संशोधकांच्या एका चमूनं हेडफोन हॅक होण्यासंदर्भात खुलासा केला आहे. संशोधकांच्या मते, मालवेयरच्या माध्यमातून तुमच्या हेडफोनमधील मायक्रोफोनला बदलण्यात येणार असून, त्याद्वारे तुमची बातचीतही हॅकर्सच्या माध्यमातून रेकॉर्ड केली जाऊ शकते. इज्रायलच्या बेन ग्युरिओन युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी एक रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे. या रिपोर्टमध्ये कशा प्रकारे तुमचे हेडफोन हॅक करून हॅकर्स तुमचं बोलणं ऐकू शकतात, याची माहिती देण्यात आली आहे. विशेष म्हणजे हेडफोन कॉम्प्युटरला कनेक्ट नसतानाही हॅकर्स तुमची बातचीत ऐकू शकणार आहेत.

हॅकर्स पहिल्यांदा मालवेयरच्या माध्यमातून इअरबर्डमध्ये लागलेल्या स्पीकरला मायक्रोफोनशी जोडतील. त्यानंतर हेडफोन हॅक करून पूर्ण खोलीत सुरू असलेलं संभाषण ते ऐकू शकतील.

इज्रायली संशोधकांनी कॉम्प्युटरमधील ऑडिओ कोडॅक चिपसेट रिअलटेक ऑडियोलाही हॅक केलं आहे. ऑडिओ चिफ हॅक झाल्यानंतर इनपूट आणि आऊटपूटला स्विच करण्यात येते आणि त्यानंतर हेडफोनची इनपूट डिवाइस काम करू लागते. हेडफोनमध्ये इनबिल्ट मायक्रोफोन असल्यास हॅकर्सचं काम सोपं होणार आहे. मात्र मायक्रोफोन नसले तरी हॅकर्स हेडफोन हॅक करू शकतील.
Forwarded from Mpsc Aspirant
घटक:- विज्ञान

जीवनसत्वे -स्रोत व कार्य

@targetmpsc
चालणे हा सगळ्यात उत्तम व्यायाम आहे. अनेक लाइफस्टाइल आजारांवर तर एक बेस्ट मेडिसीन म्हणून याकडे पाहिले जाते. पण कसंही चालणं हे आता चालणार नाही. चालायचं असेल तर नीटच चाला... @MPSCScience
#eMPSCkatta_Current_Affairs

🔹इस्रो एकाच रॉकेटमधून ८३ उपग्रहांचे प्रक्षेपण करणार

भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) जानेवारीत ८३ उपगृह अवकाशात सोडणार आहे. यामध्ये तब्बल ८१ उपग्रह परदेशी असणार आहेत, तर दोने उपग्रह भारताचे असणार आहेत. एकाच रॉकेटच्या मदतीने तब्बल ८३ उपग्रहांचे प्रक्षेपण करुन जागतिक विक्रम करण्याची संधी भारताला असणार आहे. एँट्रिक्स कॉर्पोरेशनमधील उच्चपदस्थ अधिकाऱ्याने याबद्दलची माहिती दिली आहे.

‘कंपनीला उपग्रह प्रक्षेपणातून ५०० कोटी रुपये मिळणार आहेत. तर आणखी एका नव्या उपग्रह प्रक्षेपणासाठी कंपनीला ५०० कोटी रुपये मिळू शकतात. मात्र यासाठीच्या वाटाघाटी अद्याप पूर्ण व्हायच्या आहेत,’ असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.

‘पुढील वर्षाच्या पहिल्या तिमाहीत आम्ही एकाच रॉकेटच्या माध्यमातून ८३ उपग्रह प्रक्षेपित करणार आहोत. यातील बहुतांश उपग्रह हे परदेशी असतील,’ अशी माहिती एँट्रिक्स कॉर्पोरेशनचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राकेश सासीभूषण यांनी दिली आहे. एँट्रिक्स कॉर्पोरेशनकडे इस्रोच्या व्यावसायिक विभागाची जबाबदारी आहे.

‘इस्रोकडून ८३ उपग्रह एकाच कक्षेत सोडले जाणार आहेत. त्यामुळे रॉकेट चालू किंवा बंद करावे लागणार नाही. सर्व उपग्रह प्रक्षेपित होईपर्यंत रॉकेट त्याच कक्षेत कायम राखणे, हे या मोहिमेतील मोठे आव्हान असेल. यासाठी इस्रोकडून ध्रुवीय उपग्रह सोडणाऱ्या यंत्रणेचा वापर करण्यात येईल,’ अशी माहिती एँट्रिक्स कॉर्पोरेशनकडून देण्यात आलेली आहे. एकाचवेळी अनेक उपग्रहांचे प्रक्षेपण करण्याची कामगिरी याआधीही अनेकदा इस्रोने केली आहे.

‘८३ उपग्रह सोडण्यासाठी इस्रोकडून पीएसएलव्ही-एक्सएल रॉकेटचा वापर केला जाणार आहे. १६०० वजनांचे उपग्रह घेऊन पीएसएलव्ही-एक्सएल रॉकेट अवकाशात उड्डाण करेल,’ अशी माहिती एँट्रिक्स कॉर्पोरेशनच्या राकेश सासीभूषण यांनी दिली आहे. मात्र इस्रो प्रक्षेपित करणार असलेले ८३ उपग्रह कोणकोणत्या देशांचे आहेत, हे सांगण्यास सासीभूषण यांनी नकार दिला आहे. यातील काही देशांचे उपग्रह याआधीही इस्त्रोने प्रक्षेपित केले आहेत.

दरम्यान इस्रोने जानेवारीतील मोहिमेसाठी क्रायोजेनिक इंजिनाची चाचणी सुरू केली आहे. क्रायोजेनिक इंजिनांमध्ये वजनदार उपग्रह वाहून नेण्याची क्षमता असते. इस्त्रोकडून ३३ उपग्रहांच्या प्रक्षेपणासाठी जीएसएलव्ही एमएके ३ या लाँचिंग व्हिइकलचा वापर होण्याची शक्यता आहे. तब्बल ४ टन किलो वजनाचे उपग्रह वाहून नेण्याची जीएसएलव्ही एमएके ३ या लाँचिंग व्हिइकलची क्षमता आहे.
Forwarded from mahesh Mali
Forwarded from mahesh Mali
Forwarded from mahesh Mali
Forwarded from mahesh Mali
Forwarded from mahesh Mali
Forwarded from mahesh Mali
Forwarded from mahesh Mali