MPSC Science
66.8K subscribers
8.6K photos
54 videos
356 files
720 links
Download Telegram
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
🙏 धन्यवाद... धन्यवाद... धन्यवाद... 🙏

आपण दिलेल्या या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

आज आपल्या @eMPSCkatta चॅनेलने 20,000 सदस्यसंख्या पार केली. आपले चॅनेल महाराष्ट्रातील 20K लोकांपर्यंत पोहचवण्यास आपण सर्वांनी सहकार्य केले त्याबद्दल धन्यवाद. आपण आपले काम असेच सुरु ठेवा व आम्हाला आणखी चांगले काम करण्यास प्रोत्साहित करा.

आपणास सांगण्यास आनंद वाटतो कि आपण 10,000 मेंबर चा टप्पा चॅनेल सुरु केल्या पासून 99 व्या दिवशी , तर 20,000 मेंबर चा टप्पा आज 154व्या दिवशी पार केला.यावरून लक्षात येते आम्ही आपल्या पसंतीस उतरलो आहोत, आम्हीही आपल्या याच विश्वासाला पात्र ठरण्याचा प्रयत्न निश्चितच करू.

मित्रानो , आपले चॅनेल दि.6 मे 2016 रोजी सुरु करताना कल्पनाही केली नव्हती इतका उत्स्फूर्त प्रतिसाद आपण आमच्या प्रामाणिक प्रयत्नांना दिला. यातूनच प्रेरणा घेऊन आम्ही आपल्याच मागणीच्या पूर्ततेसाठी आज आणखी 2 नवीन चॅनेल्स सुरु करत आहोत.

1) @MPSCcsat
2) @mpscHRD

चॅनेल च्या नावावरून तुमच्या लक्षात आले असेलच हि दोन चॅनेल्स कशाबद्दल आहेत. अर्थातच @MPSCcsat हे राज्यसेवा पूर्व 2017 ध्यानात घेऊन CSAT साठी , तर @mpscHRD हे राज्यसेवा मुख्य 2017 समोर ठेऊन सुरु केली आहेत. आपण सर्वांनी ती जॉईन करावीत, आम्हाला खात्री आहे आमच्या इतर चॅनेल्स प्रमाणेच आपण या नवीन 2 चॅनेल्स ना पण तितकाच उत्स्फूर्त प्रतिसाद द्याल याची खात्री आहे.

Regards- @eMPSCkattaAdmin

आपल्या सर्व मित्रांना आजच जॉईन करा...
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
🔹नील्स बोर ,भौतिकशास्त्रज्ञ

जन्म - ऑक्टोबर ७, १८८५

नील बोरनी अणूच्या रचनेवर सिध्दांत मांडला.त्यानी अर्नेस्ट रुदरफोर्ड यांच्या अणूच्या प्रतिकृतिमध्ये अामूलाग्र सुधारणा घडवून आणल्या व बोअरची अणूची प्रतिकृती जगासमोर ठेवली.

हर्ट्झ व फ्रांक यांच्या संशोधनावरून असे दिसून आले की, अणूवर इलेक्ट्रॉनाचा आघात होण्याकरिता आघाती इलेक्ट्रॉनामध्ये किमान ऊर्जा असावयास पाहिजे; जेणेकरून अणूमधील विशिष्ट इलेक्ट्रॉन स्थानांतरित होतील. इलेक्ट्रॉनामधील किमान ऊर्जेला आयनीभवन वर्चस् असे म्हणतात. हे वर्चस् निरनिराळ्या मूलद्रव्यांसाठी निरनिराळे असते. प्रत्येक मूलद्रव्य प्रकाशाच्या विशिष्ट वर्णरेषा उत्सर्जित करीत असून त्या मूलद्रव्यातील अणूंच्या शक्य असणाऱ्या ऊर्जा-अवस्थेच्या श्रेणींशी तुल्य असतात.
⇨ नील्स बोर यांना या संशोधनाची पूर्वकल्पना आलेली होती आणि त्यांनी
⇨ पुंज सिद्धांता चा उपयोग करून अणूतील इलेक्ट्रॉनांची मांडणी व त्यांची गती म्हणजे अणूचे स्वरूप स्पष्ट करणारा पहिला सुसंगत सिद्धांत विकसित केला.
Photo from [*SP7*]
जॉईन करा @MPSCScience
New Doc 11 - पॅरिस करार आणि कारारीपणाचा आभास
Forwarded from MPSC Material
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
यशाचा मटा मार्ग - 13 ऑक्टोबर
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
CSAT च्या तयारीसाठी आपले @MPSCcsat हे चॅनेल सर्वांनी जॉईन करावे.

आजपासून CSAT च्या तयारीला सुरवात करत आहोत.

जॉईन करा :
https://Telegram.me/MPSCcsat
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
Forwarded from MPSC Science
पहा पारा आणि अल्युमिनीअम यांची अभिक्रिया कशी होते
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

*वैज्ञानिक क्षेत्राशी संबंधित काही संस्था*


१) *अणू शक्ती आयोग*
A.E.C , मुंबई

२) *भाभा ऑटमिक रिसर्च सेंटर*
B.A.R.C , तुर्भे

३) *इंदिरा गांधी सेंटर फॉर ऑटोमिक रिसर्च*
I.G.C.A.R , कल्पकम

४) *सेंटर फॉर ऍडवांस टेक्नोलॉजी*
C.A.T , इंदौर

५) *इंडियन स्पेस रिसर्च आर्गनाइजेशन*
I.S.R.O , बंगळूुर

६) *विक्रम साराभाई स्पेस सेंटर*
V.S.S.C , तिरुवनंतपुरम

७) *फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी*
P.R.L , अहमदाबाद

८) *श्रीहरिकोटा रेंज*
श्रीहरिकोटा

९) *स्पेस ऍप्लीकेशन सेंटर*
S.A.C , अहमदाबाद

१०) *डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन*
D.R.D.O

११) *नॅशनल इन्फ़ॉर्मेशन सिस्टम फॉर साइन्स अँड टेक्नोलॉजी*
N.I.S.S.A.T

१२) *इंडियन इन्सिटट्यूट ऑफ़ साइन्स*
I.L.S , बंगळूर

१३) *इंडियन साइन्स काँग्रेस असोसिएशन*
I.S.C.A

१४) *डिपार्टमेंट ऑफ़ साइन्स अँड टेक्नोलॉजी*
D.S.T

१५) *सर्वे ऑफ़ इंडिया*
S.L , देहरादून

१६) *इंडियन कौन्सिल ऑफ़ मेडिकल रिसर्च*
I.C.M.R

१७) *कन्झुमर रिसर्च अँड ऐज्यूकेशन सोसायटी*
C.R.E.S , अहमदाबाद

१८) *नॅशनल रिमोट सेन्सिंग एजन्सी*
N.R.S.A
🔹अणुबाँब :

अणुकेंद्रीय स्फोटामध्ये मुख्यत: अणुकेंद्र भंजन (फुटणे) किंवा संघटन (दोन अणुकेंद्रांचा संयोग होणे) या अणुकेंद्रीय विक्रियांच्या द्वारे किंवा या दोन्ही विक्रियांच्या साहाय्याने स्फोटक शक्ती निर्माण होते [→अणुऊर्जा]. २ ऑगस्ट १९३९ या दिवशी आइन्स्टाइन यांनी अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांचे त्यावेळचे अध्यक्ष रूझवेल्ट यांस लिहिलेल्या प्रसिद्ध पत्रात, युरेनियम या मूलद्रव्याच्या भजन-विक्रियेचा उपयोग एक नवीन अत्यंत विध्वंसक बाँब तयार करण्यासाठी होण्याची शक्यता वर्णन केली होती. २ डिसेंबर १९४२ रोजी शिकागो विद्यापीठात फेर्मी यांनी भंजन-विक्रियेची साखळी निर्माण करण्यात प्रथमच यश मिळविले. पुढे कोलंबिया नदीवरील हॅनफर्ड येथे प्लुटोनियमाच्या (अणुबाँब तयार करण्यासाठी उपयुक्त असणाऱ्या एका मूलद्रव्याच्या) उत्पादनासाठी मोठी यंत्रसामग्री उभारण्यात आली.

अणुबाँब निर्माण करण्याचा प्रकल्प जे. रॉबर्ट ओपेनहायमर यांच्या नेतृत्वाखाली लॉस ॲलॅमॉस (न्यू मेक्सिको) येथील प्रयोगशाळेकडे सोपविण्यात आला. १९४५ मध्ये तीन अणुबाँब तयार झाले. पहिल्या प्लुटोनियम (२३९) बाँबचा चाचणी प्रयोग ॲलॅमॉगोर्डो सँड्‌स (न्यू मेक्सिको) या ठिकाणी १६ जुलै १९४५ या दिवशी झाला. पण सर्व जगाचे लक्ष वेधले गेले, ते मात्र ६ ऑगस्ट १९४५ रोजी झालेल्या जपानमधील हीरोशीमा शहरावरील युरेनियम (२३५)च्या अणुबाँब हल्ल्यामुळे. या स्फोटामुळे, जवळजवळ २०,००० टन ट्रायनायट्रोटोल्यूइन (टीएनटी)च्या (एक स्फोटक द्रव्य) स्फोटामुळे जेवढी ऊर्जा निर्माण झाली असती, तेवढी ऊर्जा निमिषार्धात [सु. एक मायक्रोसेकंद (१०-६ सेकंद)] निर्माण झाली व हीरोशीमा शहर जवळजवळ नष्ट झाले. तिसरा प्लुटोनियम (२३९) बाँब नागासाकी शहरावर ९ ऑगस्ट १९४५ रोजी टाकण्यात आला. दोन्ही बाँबचा स्फोट ६५० मी. उंचीवर झाला आणि हवेच्या अत्युच्च दाबामुळे व स्फोटात उत्पन्न झालेल्या प्रचंड उष्णतेमुळे त्या शहरांचा जवळजवळ नाश झाला.

यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबर १९५२ मध्ये पॅसिफिक महासागरातील मार्शल बेटामध्ये ‘माइक’ या नावाच्या हायड्रोजन बाँबचा चाचणी स्फोट करण्यात अमेरिकेने यश मिळविले. १ मार्च १९५४ या दिवशी बिकनी ॲटॉल (मार्शल बेटे) वर जो स्फोट झाला, त्याची शक्ती १५ × १०६ टन टीएनटीच्या शक्तीएवढी होती. मार्च १९५४ मध्ये आणखी एक ऊष्मीय अणुकेंद्रीय (संघटन विक्रियेद्वारे होणारा) स्फोट करण्यात आला. या दोन्हींमध्ये लिथियम हायड्राइड (Li6H2) या द्रव्याचा उपयोग झाला असावा. यापूर्वी ऑगस्ट १९५३ मध्ये रशियाने केलेल्या ऊष्मीय अणुकेंद्रीय स्फोटामध्ये Li6H2चा उपयोग केल्याचे आढळले होते. इंग्लंड, फ्रान्स, रशिया व चीन या चारही राष्ट्रांनी दोन्ही प्रकारचे बाँब तयार यश मिळविले आहे. अमेरिका, रशिया, इंग्लंड व चीन या देशांनी केलेल्या सुरुवातीच्या स्फोटांची माहिती कोष्टक क्र. १ मध्ये दिली आहे.

अणुकेंद्रीय स्फोट : भंजन आणि संघटन-स्फोटांच्या शास्त्रीय भूमिकेचा प्रथमत: थोडक्यात विचार करू. युरेनियम (२३५), युरेनियम

कोष्टक क्र. १ : विविध देशांनी केलेले सुरूवातीचे अणुबाँबचे स्फोट
प्रकार
अमेरिका
रशिया
इंग्लंड
चीन
अणुबाँब
ऑगस्ट
१९४५
ऑगस्ट
१९४९
ऑक्टोबर
१९५२
ऑक्टोबर
१९६४
हायड्रोजन
बाँब
ऑक्टोबर
नोव्हेंबर
१९५२
(१० मेगॅटन)
ऑगस्ट
१९५३
(१मेगॅटन)

जून
१९६७
(५ मेगॅटन)
हवेतील
हायड्रोजन
बाँब
मे
१९५६
(१५ मेगॅटन)
नोव्हेंबर
१९५५
(१० मेगॅटन)

मे
१९५७
(५ मेगॅटन)



(२३३), प्लुटोनियम (२३९) यांमधील भंजन-विक्रियांची साखळी स्वयंचलित असते; उलट युरेनियम (२३८), थोरियम (२३२) यांचे भंजन बाह्य साधनांनी, म्हणजे शक्तिमान न्यूट्रॉनांच्या सतत पुरवठ्याने, सांभाळावे लागते. पहिल्या प्रकारात नुसते ‘भंजन’ म्हणतात व दुसऱ्यास ‘बहिःपोषित भंजन’ म्हणतात. या दोन्ही प्रकारच्या स्फोटांमध्ये वस्तुमानाचे ऊर्जेत रूपांतर होते. आइन्स्टाइन यांनी मांडलेल्या E=mc2[E= ऊर्जा, m= वस्तुमान व c= प्रकाशवेग] या समीकरणाचेच हे अणुस्फोट प्रत्यक्ष पुरावे होत. पण या दोन प्रकारच्या स्फोटांमध्ये, वस्तुमानाचे ऊर्जेत रूपांतर होण्याच्या वेळी घडून येणाऱ्या विक्रिया मात्र भिन्न आहेत. अणुबाँब हा युरेनियम (२३५) अथवा प्लुटोनियम (२३९) यांसारख्या अणूंच्या न्यूट्रॉनाद्वारा घडून येणाऱ्या भंजन-विक्रियेवर आधारित आहे. अशा भंजन-विक्रियेत निर्माण होणाऱ्या खंडांचे वस्तुमान मूळ द्रव्यापेक्षा कमी असते व काही वस्तुमानाचे ऊर्जेत रूपांतर होते. याउलट हायड्रोजन बाँबचा स्फोट हा हलक्या अणुकेंद्रांच्या भारी अणुकेंद्रात रूपांतरण होणाऱ्या संघटनेवर आधारित आहे. उदा., हायड्रोजन व ट्रिटियम (हायड्रोजनाच्या तिप्पट अणुभार असलेला समस्थानिक, →समस्थानिक) यांच्या संयोगामुळे हीलियमाचा अणू तयार होतो. त्याचे वस्तुमान हायड्रोजन व ट्रिटियम यांच्या वस्तुमानापेक्षा कमी असते व या कमी झालेल्या वस्तुमानाचेच ऊर्जेत रूपांतर होते. अशा प्रकारच्या विक्रियांद्वारा फार मोठ्या प्रमाणावर ऊर्जेची उत